Skip to main content

तर्कतीर्थ महोदय ,

तर्कतीर्थ महोदय ,
मी मालक चालक नाही , परंतु जे काही चालक मालक मंडळाकडून केले गेले आहे त्याला माझा सहर्ष पाठिंबा आहे.
कारण सांगतो.
रोज आपण भरपूर लिहिता.
आमच्यासारखे जाता जाता संस्थळावर चक्कर मारणारे लोक असतात त्यांना नवीन लेख यात मुख्यतः तुमचेच लेख दिसतात.
तुमचे विषय 'उच्च' दर्जाचे आणि विचार प्रवर्तक असण्याची दाट शक्यता असणारे वाटतात.
प्रॉब्लेम असा होतो की अशा डीप विचारप्रवर्तक लेखांमध्ये आमच्यासारख्या सामान्य वाचकाला रस वाटत नसतो.
बहुतांश लेख याच पद्धतीचे बघितल्यावर कंटाळा येऊन आमच्यासारखे सामान्य लोक संस्थळावर इतर काय सुरु आहे हे न बघता कन्नी मारतात ( म्हणजे पळून जातात , नूमवितील तुम्हाला कन्नी याचा वेगळा अर्थ सांगायला नको. )
त्यामुळे जे झालंय ते ठीकच झालंय असे वाटत आहे.
तुमचे लेख आहेतच . विचक्षण वाचक ( उदाहरणार्थ आमचे मित्र न बा )यांच्यासारखे वाचक संस्थळावर जिथे आहेत तिथे जाऊन वाचतीलच तुमचे लेख.
फक्त आमच्यासारख्या फडतूस वाचकांना इतर सामान्य लेखांकडे नजर टाकायला मिळेल.

तेव्हा हा खुनशीपणा वाटला तुम्हाला , तरी तो तसा नसावा. ते 'सामान्य फडतूस वाचकांचे तुष्टीकरण आहे' असा चालक मालक मंडळींवर करून मी खाली बसतोय.

बाकी आपल्याला भेटायचं आहेच एकदा , कोथरूड मधेच राहता , लंके सरांचे विद्यार्थी आहात ( माझ्यासारखे ) तेव्हा एकदा भेटूयात. तेव्हा सविस्तर ...
कसें ?

अभ्या.. Tue, 18/08/2026 - 18:44

In reply to by तर्कतीर्थ

पिवळा शर्ट तोही निळ्या फुलांची नक्षी असणारा, लाल तुमान आणि गुलबक्षी टोपी घालून कुणीतरी कर्वे नगर स्टँड जवळ एक जुनी कंट्रोल केबिन आहे त्यासमोर हातात चाफ्याचे फुल घेऊन उभे रहा. दोघांनीही हा वेश केल्यास उत्तम.
तिथेच नंबर एक्सचेंज करा. लगेच आपापल्या घरी जाऊन फोनवर बोला.

अहिरावण Tue, 18/08/2026 - 19:40

In reply to by अभ्या..

>>>तिथेच नंबर एक्सचेंज करा. लगेच आपापल्या घरी जाऊन फोनवर बोला.

का? तिथेच ते बोलत राहीले प्रत्यक्ष किंवा समोरासमोरच फोनवर तर बरं दिसणार नाही का?

'न'वी बाजू Tue, 18/08/2026 - 23:36

In reply to by अभ्या..

लगेच आपापल्या घरी जाऊन फोनवर बोला.

घरी जाऊन फोनवर? बोले तो, लँडलाइन? कोण वापरते ती आजकाल? किंबहुना, असते कोणाच्या घरी ती आजकाल?

गवि Tue, 18/08/2026 - 20:36

खालील मार्ग आहे. बघा विचार करून.

१. दोघांपैकी एकाने (समजा तर्कतीर्थ) आपल्या मोबाइल किंवा संगणकावर एक पब्लिक की आणि प्रायव्हेट की जोडी तयार करावी. यासाठी कोणते स्टँडर्ड वापरायचे हे पब्लिकली इथे कॉमेंटमधे लिहिणे पूर्ण सेफ आहे.

२. मग तर्कतीर्थ यांनी इथे पब्लिकली फक्त आपली पब्लिक की पोस्ट करावी. प्रायव्हेट की उराशी जपून ठेवावी. कोणालाही देऊ नये.

३. दोघेही ठरलेले स्टँडर्ड आणि सुसंगत एन्क्रिप्शन टूल वापरतील. दोघांचे ऍप्लिकेशन वेगळे असले तरी चालेल.

४. अबापट यांनी तर्कतीर्थ यांची ती पब्लिक की वापरून आपला फोन नंबर किंवा ईमेल एनक्रिप्ट करावा.

५. तयार झालेला एनक्रिप्टेड मजकूर अबापट यांनी इथे ऐसीवर सार्वजनिकपणे कॉमेंट करून टाकावा. तो मजकूर सर्वांना दिसेल. पण तो डिक्रिप्ट करण्यासाठी लागणारी प्रायव्हेट की फक्त तर्कतीर्थ यांच्याकडे असल्यामुळे संपर्क माहिती फक्त त्यांनाच वाचता येईल.

६. दोन्ही बाजूंनी माहिती पाठवायची असल्यास दुसरी व्यक्तीही आपली पब्लिक की पोस्ट करेल आणि स्वतःची प्रायव्हेट की स्वतःकडेच ठेवेल.

ऐसी आयडी ऐसीवर स्पूफ करता येत नसल्याने हा मार्ग सुरक्षित आहे.

याखेरीज अजूनही सोपे लॅटरल थिंकिंग युक्त सोल्युशन डिस्पोजेबल ईमेल आयडी तात्पुरते वापरून करता येईल. त्यात नेमका आलेला ईमेल जेन्युइन आहे का हे तपासण्याचे सरळ सोपे मार्ग आहेत. एक कोडे म्हणून ते कोणीतरी सोडवावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/08/2026 - 22:12

In reply to by गवि

'...बंदरात जाऊन घेऊन या!'

किंवा 'दुल्हन की बिदाई का वख्त' याची आठवण करून दिलीत. त्यात तर मिलिंद सोमण आहे.

'न'वी बाजू Wed, 19/08/2026 - 02:06

In reply to by गवि

आर्यभटीय पद्धतीत एन्क्रिप्ट करून इथेच लिहा. पब्लिक की-प्रायव्हेट की वगैरेंची भानगडच नको! (सिंधुआज्जींच्या ‘ज्लखिण्न्ठप्थॉभ्री’सारखे काहीतरी निष्पन्न होऊ शकेल त्यातून कदाचित, परंतु, तो धोका पत्करण्यालायक आहे.)

इथे, ही पद्धत वापरून कोणीही तो नंबर डीकोड करू शकेल, हा (वरकरणी) धोका आहे खरा. परंतु, पद्धतीचा किचकटपणा लक्षात घेता, कोणाला पडली आहे इतकी फाइट मारण्याची, आणि तीदेखील केवळ तर्कतीर्थांचा (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, अबापटांचासुद्धा) नंबर मिळविण्याकरिता? Security by obscurity झिंदाबाद!

या पद्धतीत धोका जर काही असलाच, तर तो म्हणजे, इतका किचकटपणा पत्करून नंबर एन्कोड करण्यात तर्कतीर्थ आणि अबापट दोघेही आळस करतील, आणि एकमेकांना आपापले नंबर देण्याचा प्लान रहित करतील,  हा आहे. And that’s precisely the beauty of the आर्यभटीय scheme!

(पाहा आपले पूर्वज थोर होते की नाही?)

Rajesh188 Tue, 18/08/2026 - 20:39

पब्लिक प्लॅटफॉर्म असलेल्या समाज माध्यम वर एकमेका चे mobile नंबर कसे exchange करायचे?
Ai 1000 तरी पर्याय सांगेल आहे काय आणि नाही काय

Rajesh188 Tue, 18/08/2026 - 21:21

English वर्णमाला मधील दहा अक्षरे लिहा.
त्या खाली +,-, ×, ÷, ही चिन्ह लिहा सहज मोबाईल नंबर सांगता येईल. आणि कोणाला कळणार पण नाही. कारण इतकी मेहनत कोणी घेणार नाही तुमचा मोबाईल नंबर जाणून घेण्या साठी

गवि Tue, 18/08/2026 - 21:28

In reply to by Rajesh188

सध्या असे माना की हा धागा वाचणारे सर्व पब्लिक अज्ञात आहे आणि त्यांना आपला संपर्क क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती मिळणे हे अत्यंत नकोसे आहे. यासाठी एक दोन उपाय आहेत तांत्रिक. (नॉन AI)

'न'वी बाजू Tue, 18/08/2026 - 23:43

In reply to by गवि

मुळात नंबर एन्क्रिप्ट करण्यासाठी इतकी फाईट मारायची कशासाठी, तर्कतीर्थ यांचे आतापर्यंतचे धागे तसेही पब्लिक आहेत, कोणीही वाचत नाही, तर तेथेच पब्लिक केला नंबर तर कोण वाचणार आहे, असा आक्षेप घेणार होतो. परंतु,

धागा वाचणारे सर्व पब्लिक अज्ञात आहे आणि त्यांना आपला संपर्क क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती मिळणे हे अत्यंत नकोसे आहे.

हा मुद्दा वाचला.

अगदी बरोबर आहे म्हणणे. (विशेषेकरून, ठळक केलेला भाग.) पटले.

'न'वी बाजू Tue, 18/08/2026 - 23:50

In reply to by 'न'वी बाजू

...I take that back!

त्यांना आपला संपर्क क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती मिळणे हे अत्यंत नकोसे आहे.

हे नक्की कसे parse करायचे? कोणाला नकोसे आहे? अज्ञात पब्लिकला, की तर्कतीर्थ यांना?

(बोले तो, 'त्यांना' हे 'आपला सं.क्र. किंवा वै.मा.' याबरोबर जाते, की 'अत्यंत नकोसे'बरोबर?)

 

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/08/2026 - 22:10

सदस्यांच्या प्रोफाईलमध्ये जा. तिथे त्या व्यक्तीला इमेल करायची सोय आहे. तुमचा इमेल पत्ता त्यांना दिसणार नाही. तुमचं इमेल फक्त त्यांनाच दिसेल. मलाही कुणाचीही इमेलाइमेली दिसणार नाही.

अण्णा, तर्कतीर्थ साबुदाण्याची खिचडी उत्तम रांधतात. कितीक वर्षं बरा अर्धाही करतोय. पण ती मज्जा नाय!

'न'वी बाजू Wed, 19/08/2026 - 01:37

विचक्षण वाचक ( उदाहरणार्थ आमचे मित्र न बा )यांच्यासारखे वाचक संस्थळावर जिथे आहेत तिथे जाऊन वाचतीलच तुमचे लेख.

'न'बांची बदनामी थांबवा!!!!!!

सई केसकर Wed, 19/08/2026 - 05:39

तर्कतीर्थ आणि बापट यांची इन्स्टा खाती असतीलच. तर्कतीर्थ खाली स्वतःचे खरे नाव लिहितात. त्यावर बापट यांनी जावं आणि त्यांना नॉर्मल माणसांसारखे DM करावे. हा माझा नंबर.
आणि एकदा एकाने नंबर दिला की परत दुसऱ्याने तो लेखी देण्यात काय हशील? असं जेव्हा होतं तेव्हा कुणीच कुणाला फोन करत नाही.
बघा इतकं एआय असूनही तुम्हाला नंबर कसा पाठवायचा हा प्रश्न पडलाच की नाही? आणि आता प्रत्यक्ष एखाद्या मनुष्यवर्गातील स्पेसीमेनला भेटण्याचीही मानसिक तयारी करावी लागेल. कारण ते तुमच्या म्हणण्याला विरोध करू शकतात. बापट तर नक्कीच.

'न'वी बाजू Wed, 19/08/2026 - 06:34

In reply to by सई केसकर

…स्वतःवरून जगाची पारख करणे उचित नव्हे, वगैरे वगैरे गविशेठनी मला एकदा लेक्चर मारले होते, ते आपल्या जागी ठीकच आहे, परंतु, कितीही झाले, तरी अबापट काय, तर्कतीर्थ काय, किंवा मी काय, ही थोड्याफार फरकाने साधारणतः एकाच वयोगटातील माणसे. आणि, माझ्यापुरतेच बोलायचे, तर मी इन्स्टावर नाही, आणि DM म्हणजे नक्की काय (किंवा कशाशी खातात) हे मला आजतागायत ठाऊक नाही. (नॉर्मल माणसे जर DM करीत असतील, तर मी abnormal आहे. आणि, यात मला यत्किंचितही वैषम्य वगैरे वाटत नाही. परंतु, तो पूर्णपणे वेगळा मुद्दा.)

तर सांगण्याचा मतलब, तर्कतीर्थ किंवा अबापट यांची स्थिती कदाचित माझ्याइतकी वाईट (abnormal) नसेलही; कदाचित, ते माझ्याहून अधिक savvy असू शकतील. (Which is not saying much, but, that, again, is a different point altogether.) परंतु तरीही, हा प्रश्न अशा प्रकारे सोडविता येईल, हे (ठाऊक असूनही) त्यांना चटकन सुचेलच, असे नाही.

(तुम्ही, on the other hand, काय बुवा, तरुण मंडळी…)

असो चालायचेच.

'न'वी बाजू Wed, 19/08/2026 - 07:21

In reply to by सई केसकर

कदाचित, त्यांना नंबरांची अदलाबदल करायचीच नसेल, तर?

कदाचित, त्यांना परस्परसंपर्क करून प्रत्यक्षात भेटायचेच नसेल, तर?

कदाचित, आपण नंबरांची अदलाबदल करू पाहात आहोत, आणि तेणेकरून एकमेकांना प्रत्यक्षात भेटू पाहात आहोत, अशी त्यांना (for whatever reason known only to themselves) पब्लिकसमोर केवळ बतावणीच करायची असेल, तर?

म्हणजे असे पाहा. कोथरुडात राहणारे, नूमवित शिकलेले, झालेच तर ते जे कोणी लंके सर आहेत/होते त्यांचे (आजमितीस हयात असलेले) माजी विद्यार्थी जगात पुष्कळ असतील. Fair enough. त्यातले अनेक जण एकमेकांना भेटत असतील किंवा भेटू इच्छीत असतील, नि भेटण्याकरिता एकमेकांशी संपर्क करू पाहात असतील. Again, fair enough. Perfectly within their prerogatives. परंतु, त्याकरिता ते आपला rendezvous इथे उघड्या फोरमवर कशाला ठरवू पाहतील? जणू हा एखादा (SWM seeking SWF-छाप) Personals section असल्यागत? तुम्हीच सांगा, ते जर एकमेकांना भेटू पाहताहेत (आणि, त्यांनी इच्छा असल्यास (at their own respective risks) एकमेकांना अवश्य भेटावे; त्याबद्दल तुम्हाला, मला, किंवा अन्य कोणाला काही प्रत्यवाय असण्याचे काहीच कारण नाही.), तर तो त्यांचा आपसांतील मामला आहे; त्याचा ज़िक्र आणि/किंवा त्याची चर्चा इथे पब्लिकमध्ये व्हावी, असे त्यांना कधी वाटेल काय/का वाटेल? कोठलेही दोन भेटोत्सुक (‘मीलनोत्सुक’ म्हणणार होतो, परंतु, दुर्दैवाने त्याचा भलताच अर्थ होतो.) असे कधी करतील काय?

नाही म्हणजे, अबापट यांचे तर्कतीर्थ यांजप्रति प्रस्तुत अनावृत पत्र एरवी आपल्या जागी ठीकच आहे. To the point आहे, आणि puts the point across, I must say, rather succinctly. परंतु, त्यातील शेवटचा (काहीसा खाजगी स्वरूपाचा) परिच्छेद हा public consumptionकरिता काहीसा चमत्कारिक वाटला, इतकेच.

बाकी, जग हे असेच चालायचे. चालू द्यात बापडे!

सई केसकर Wed, 19/08/2026 - 08:00

In reply to by 'न'वी बाजू

मीही आता इंस्टाग्रामवर नाही. पण माझं वेगळं आहे. सौ चूहे खा के, बिल्ली चली हज। हे माझं इतर अनेक बाबतीत झालं आहे. पण ते म्हणतात ना, the only way is the way through the whole thing.

बतावणी करायची शक्यता कमी. अबापट नक्की भेटू इच्छित असणार. त्याशिवाय ते लिहिणार नाहीत. ते अनेकांना भेटतात. आणि त्या मनाने सर्वसंचारी आहेत. So घडेल ही भेट.

'न'वी बाजू Wed, 19/08/2026 - 08:44

In reply to by सई केसकर

So घडेल ही भेट.

Why reassure me? ही भेट घडली काय, किंवा न घडली काय, मला त्याबद्दल सोयरसुतक नाही, नि असण्याचे काही कारणही नाही.

किंबहुना, हेच तर सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे इतका वेळ!

असो.

तर्कतीर्थ Wed, 19/08/2026 - 10:53

श्री० बापट,

व्यनि केला आहे, तो मिळाला का हे कळवावे. तसेच मिळाला नसल्यास माझ्या सार्वनिक असलेल्या (लॉक्ड नसलेल्या) फेसबुक प्रोफाईलवर फ़्रेण्डरिक्वेस्ट पाठवावी. अपरिचित लोकांच्या फ़्रेण्डरिक्वेस्ट मी स्वीकारत नाही.