दोन सूक्ष्म कथा
दोन सूक्ष्म कथा
=========
-राजीव उपाध्ये

कलाकार - युवाल रॉबिचेक
क्र०२
लेक बराच वेळ शांतपणे फोनमध्ये गढून गेली होती.
तिला एक-दोनदा हाक मारली पण तरी तिने उत्तर दिले नाही
तेव्हा मी तिच्याजवळ जाऊन फोनमध्ये डोकावले
तर मॅडम मला लाईव्ह लोकेशन ट्रॅकींग करताना दिसल्या
ते पण उबेरवर
फ्लाईट असती तर गोष्ट वेगळी होती
शेवटी मी न राहवून तिला विचारले
"हा काय नवा वेडपटपणा?"
तेव्हा मॅडम उसळून म्हणाल्या,
"बाबा, माझी मैत्रीण एकटी प्रवास करत्येय
आणि आजकाल सेफ नसतं
आम्ही सगळ्या मैत्रीणी एकमेकीना प्रवास करताना
लाईव्ह लोकेशन शेअर करतो...
आणि हां तुम्हाला माहित नसलं तर सांगत्ये
आम्ही एकमेकींचे पिरीयड पण ट्रॅक करतो."
माझ्यापेक्षा माझ्या लेकीला चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले या भावनेने गदगदून आले
क्र० १
दरवर्षी प्रमाणे यावर्षी विद्यापीठांची जागतिक मानांकने जाहिर झाली तेव्हा मी कन्येला अभिमानाने आय०आय०टी० मुंबैचे मानांकन सांगितले.
तेव्हा अत्यंत नम्रपणे ती मला म्हणाली, "बाबा, जी०एस०ए० यावर्षी जगात ८ व्या स्थानावर आहे, एन०आय०डी० ८१ व्या स्थानावर आहे आणि आय०डी०सी० कुठेच नाहीये".
मग मी स्वत:ला थोबाडित मारली आणि हात चोळत गप्प बसलो...
श्री० नवी बाजू
श्री० नवी बाजू
सांगण्याचा मतलब, एखादी शाळा ही जगात अमक्यातमक्या नंबरावर असेलही, परंतु, that fact does not automatically reflect upon each and every student of that institution.
बापलेकीच्या खेळकर कुरघोड्या तुम्हाला कळू नयेत याची दया आली. बाकी विधानांबद्दल काही न बोलले बरे...
शिवाय, “Patriotism is,…
शिवाय, “Patriotism is, fundamentally, a conviction that a particular country is the best in the world because you were born in it.” असे कायसेसे शॉ की कोणीतरी म्हणून गेलेला आहेच.
काही वर्षांपूर्वी असे ही संशोधन वाचनात आले होते - Believing You Can Get Smarter Makes You Smarter
बाय द वे - माझ्या एका ज्ञानी…
बाय द वे - माझ्या एका ज्ञानी/विद्वान मित्राने सांगितलेले एक कारण चिनी वर्चस्वाचे एक कारण त्यांची आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत ही श्रद्धा. तसेच ज्यू पण स्वत:ला ईश्वराची लाडकी लेकरे ’समजतात’. संदर्भ हवा असेल तर काढून देईन. वेळ लागेल...
"आपण आहोत परमेश्वराचे(ने) निवडले" - https://www.youtube.com/watch?v=xbgqXz1voC8
.
तसे तर काय, आम्ही अमेरिकनसुद्धा स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी समजतो. म्हणून काय झाले?
‘अंदर की बात’ आमची आम्हाला ठाऊक!
(तो माज फार फार तर काही काळ चालू शकतो. त्याचा दीर्घकालीन उपयोग होत नाही.)
(आणि, सदाशिवपेठी लोक१ स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी समजत नाहीत? त्यांच्या परिघाबाहेर कोण विचारतो त्यांना?)
(चिन्यांचे तूर्तास चालून जाते, कारण ते अद्याप ‘तेथे’ (कोठेच) ‘पोहोचलेले’ नाहीत, म्हणून. जेव्हा ‘पोहोचतील’, तेव्हा हीच वृत्ती त्यांच्या ऱ्हासास (हळूहळू) कारणीभूत होईल.)
(यहुद्यांचे म्हणाल, तर — आजकाल त्यांच्यावर यत्किंचितही टीका करणे म्हणजे स्वतःवर आपोआप antisemitismचा आरोप ओढवून घेण्यासारखा माहौल असला, तरीही, तो धोका पत्करून लिहितोच — जग जोपर्यंत त्यांना डोक्यावर उचलून घेत आहे, तोवर त्यांचा माज चालेल. नाहीतर कुत्रे विचारणार नाही. त्या माजाला inherently काहीही किंमत नाही.
किंबहुना, इस्राएलच्या स्थापनेइतकी यहुद्यांची (एक जमात म्हणून) अधोगती नाझी वंशसंहारामुळेसुद्धा झाली नसेल.२)
१ किंवा, मुंबईचे/दिल्लीचे/लाहौरचे लोक. (इतर ठिकाणांचेसुद्धा असतील.)
२ हे नाझी वंशसंहाराचे (किंवा, नाझींचे) समर्थन नव्हे!२अ त्यांनी जे काही केले, ते गर्हणीयच होते. त्याबद्दल वाद नाही. परंतु, तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे.
२अ हेदेखील स्पष्टपणे लिहावे लागते आजकाल. काय दिवस आलेत!
Glory by association
पञ्चतंत्रातला हा श्लोक तुम्हाला माहित नाही का?
महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः।
पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥
आणखी एक -
शशिना च निशया च शशी
शशिना निशया च विभाति नभ:।
मणिना वलयं वलयेन मणि:
मणिना वलयेन विभाति कर: ।
कविना च विभु: विभुना च कवि
कविना विभुना च विभाति सभा॥
मराठीत
एक सडका आंबा सगळ्या इ०
या वरून तुमचा आक्षेप फिजुल आहे, हे पुरेसे सिद्ध झाले आहे.
.
वापरलेलं चित्र आवडलं. फारच क्युट आहे.
>>>अवांतर: एखादा शिक्षक (शाळामास्तर) जेव्हा रिटायर होतो, तेव्हा त्या निवृत्तीस ‘रजोनिवृत्ती’ म्हणून संबोधणे कितपत सयुक्तिक ठरेल? (कारण, निवृत्तीबरोबरच पीरियडही संपतात!)
(झालेच तर, शाळेत जेव्हा एखाद्या शिक्षकाचा पीरियड चालू असतो, तेव्हा त्यास ‘रजस्वला’ म्हणता येईल काय?)
अतिअवांतर: रबींद्रनाथांची ‘शांतिनिकेतन’ ही शाळा हिंदुपरंपरावादी होती. तेथे पीरियडला बाहेर बसत.
(मूळ लेखकाची माफी मागून) हे विनोदही मला खूप आवडले.
अवांतर:
पहिल्या युनिट टेस्टचा निकाल लागला आणि मुलाला मराठीत खूप चांगले मार्क मिळाले. याचं श्रेय त्यानं बाईंनी निबंधात त्याच्या ऱ्हस्व दीर्घ चुका काढल्या नाहीत याला दिले. मग मी विचारलं की का नाही काढल्या चुका? तर तो म्हणे की माझ्या कल्पनाशक्तीला त्यांनी अधिक मार्क दिले. मी म्हणाले की काय होता विषय? तर तो म्हणाला, मला पंख असते तर. मग मी विचारलं तू काय लिहिलंस? तर तो म्हणाला की मी असं लिहिलं की मी ट्राफिकमध्ये अडकलेल्या रुग्णांना इस्पितळात पोहोचवले असते.
मग त्यानं मला विचारलं की तू काय लिहिलं असतंस?
मी म्हणाले की मी असं लिहिलं असतं, की मला पंख असते तर मी माझ्या शत्रूंच्या डोक्यावर नेम धरून हागलो असतो. त्यांच्या गाड्यांच्या काचा नित्यनेमाने खराब केल्या असत्या.
हे काही त्याला आवडलं नाही. पण मला खात्री आहे त्यानं नंतर माझी कल्पना बसमध्ये शायनिंग करायला वापरली असणार.
.
तर तो म्हणाला की मी असं लिहिलं की मी ट्राफिकमध्ये अडकलेल्या रुग्णांना इस्पितळात पोहोचवले असते.
तुमच्या मुलाचेही बरोबरच आहे, म्हणा. म्हणजे, मराठीचे शिक्षक या कॅटेगरीखाली ज्या प्रकारातले लोक बसवतात, ते लक्षात घेता, मार्क मिळवायचे असतील, तर हे असेच लिहावे लागते. (कितीही far-fetched, out of the world, impractical असले, तरीही. मराठीचेशिक्षकजमातीला या असल्याच कल्पना भावतात.)
हे काही त्याला आवडलं नाही.
वास्तविक, मला तुमची कल्पना फारच आवडली, भावली. शक्यकोटीतली आहे, practical आहे.
परंतु, मार्क्सवादी दृष्टिकोनातून पाहायचे झाले, तर recipe for disaster आहे. म्हणजे, कल्पनाशक्तीसाठीचे मार्क कापून झाल्यावर, शुद्धलेखन जर चुकले जरी असते, तरीही त्याचे मार्क कापायला जागा उरली नसती.
मराठीचेशिक्षकजमातीला अशा कल्पनांचे सनातन वावडे असते. (त्यात पुन्हा तुम्ही त्या बाई असल्याचा ज़िक्र केलात. The female of that species is deadlier than the male. चालायचेच.)
प्रश्न कसे विचारावेत?
इतिहासाचा अभ्यास करताना इजिप्तची संस्कृती असलेल्या धाड्याखाली "What is a mummy?" असा प्रश्न होता. मी त्याला म्हणाले की हा प्रश्न पेपरात काही "इजिप्तबद्दल प्रश्न" असा येणार नाही. त्यामुळे त्यांनी "What is a mummy?" विचारलं तर तू प्लीज "daddy's wife" असं लिही. मार्क गेले तर जाऊदे. पण त्यानं हेही ऐकलं नाही. हा प्रश्न "What is an Egyptian mummy?" असा विचारायला हवा. त्यालाही मी "an Egyptian mother" असं उत्तर दिलं असतं कारण इजिप्तची बाई एखाद्या रोमन माणसाशी लग्न करूच शकते.
भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत कोणत्यातरी धड्यातला "What is a scale?" असा प्रश्न आला. त्यावर मी म्हणाले की तू असं का नाही लिहिलंस, "it is a measuring instrument made out of wood, plastic or metal. Sometimes 15 cm long, sometimes 30 cm long."
पण त्यानं बरोबर नकाशा वर स्केल म्हणजे काय ते लिहिलं आणि मला वेड्यात काढलं.
असो. आपली मुलं शिक्षण व्यवस्थेत भरडून निघता बघवत नाही.
…
त्यांनी "What is a mummy?" विचारलं तर तू प्लीज "daddy's wife" असं लिही.
Well, not necessarily…
(परंतु, मुद्दा लक्षात आला. तसेही, हल्ली त्या पिढीची awareness level किती असते, कल्पना नाही — आम्ही त्या वयात ढ होतो — परंतु, आपण होऊन त्यांचे हे ज्ञानवर्धन करून देण्यात कितपत हशील आहे, हाही एक प्रश्न आहेच.)
हा प्रश्न "What is an Egyptian mummy?" असा विचारायला हवा. त्यालाही मी "an Egyptian mother" असं उत्तर दिलं असतं कारण इजिप्तची बाई एखाद्या रोमन माणसाशी लग्न करूच शकते.
Wrong again! म्हणजे, उत्तर ठीक आहे, परंतु कारणमीमांसा चुकली. इजिप्तची बाई mother (आणि म्हणून mummy) होण्याकरिता तिने कोणाशी लग्न केले याने फरक पडू नये. (किंबहुना, तिने कोणाशीही लग्न केले नाही, तरीही फरक पडू नये. तरीसुद्धा ती Egyptian mother (आणि म्हणून Egyptian mummy) होऊ शकतेच.)
मात्र, एक अपवाद आहे. आम्हां अमेरिकनांत motherला mummy म्हणत नाहीत; mommy म्हणतात. त्यामुळे, एखाद्या अमेरिकनाच्या लेखी एखादी Egyptian mother ही Egyptian mummy ठरेलच, असे नाही. (किंबहुना, बहुतकरून ठरणार नाही.) मात्र, चारपाच हजार वर्षांपूर्वी कापडात गुंडाळून लोणचे घालून ठेवलेली एखादी इजिप्शियन व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) ही त्याच्या लेखी Egyptian mummy नक्की ठरेल. आता, अशी एखादी व्यक्ती ही एकसमयावच्छेदेकरून कोणाची तरी mommy असणे हे अगदीच अशक्य नाही. मात्र, एखादी Egyptian mommy ही एखाद्या अमेरिकनाच्या लेखी Egyptian mummy ठरण्याकरिता, चार ते पाच हजार वर्षांपूर्वी तिचे लोणचे घालून तिला कापडात गुंडाळून ठेवलेली असणे पूर्वावश्यक आहे.
(सांगण्याचा मतलब, Jokes do not necessarily translate well even within two dialects of the same language. चालायचेच. (अर्थात, आमच्या भाषेला तुम्ही इंग्रजी गणत नसाल, तर गोष्ट वेगळी.))
"What is a scale?" असा प्रश्न आला. त्यावर मी म्हणाले की तू असं का नाही लिहिलंस, "it is a measuring instrument made out of wood, plastic or metal. Sometimes 15 cm long, sometimes 30 cm long."
A scale could also be a lever with the fulcrum in the middle and with two arms of equal lengths which can be used to compare two masses. Or, it could be a feature of the skin of, for example, a fish.
माझ्या लेखी ही सगळीच उत्तरे बरोबर आहेत. (भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेबद्दल बोलायचे झाले, तर या सर्वांचा भूगोलाशी काही ना काही संबंध जोडून देता येईलच.) पण लक्षात कोण घेतो?
पण त्यानं बरोबर नकाशा वर स्केल म्हणजे काय ते लिहिलं आणि मला वेड्यात काढलं.
टिपिकल मार्क्सवादी अप्रोच. (करावे लागते पण. काय करणार!)
असो. आपली मुलं शिक्षण व्यवस्थेत भरडून निघता बघवत नाही.
आमच्या वेळी आम्हीही असेच भरडून निघालो. आता आपल्या मुलांची वेळ आहे. (‘पाळी आहे’ लिहिणार होतो; वेळीच स्वतःस आवरले!)
परीक्षेत मी table या इंग्रजी शब्दाकरिता मराठी प्रतिशब्द ‘पाढा’ असा लिहिला होता. उत्तर बरोबर होते; बाईंनी मार्क कापले! बहुधा ‘मेज’ हे उत्तर अपेक्षित असावे, किंवा कसे, नकळे. आता, ‘मेज’ हा शब्द मला तेव्हाही ठाऊक होता, नाही असे नाही. परंतु, तो उत्तर म्हणून वापरावासा वाटला नाही. दोन कारणे होती. एक म्हणजे, ‘मेज’ हा शब्द आमच्या वेळेससुद्धा सामान्य वापरातून बाद झालेला होता. दुसरे म्हणजे, ‘मेज’ हा शब्दसुद्धा खरे तर मुळात मराठी नाही. (पोर्तुगीज आहे.) भले एके काळी मराठीत वापरात असला, तरीही. समजा, मी उत्तर म्हणून ‘टेबल’ असे (देवनागरीत) लिहिले असते, तर बाईंनी मार्क कापले नसते काय? (‘टेबल’ हा शब्द वास्तविक मराठीत चांगला रुळलेला आहे.) मग ‘मेज’ असे लिहून तरी कसे चालेल?
(ठीक. ‘मेज’ हा शब्द पोर्तुगीज आहे, हे मला तेव्हा ठाऊक नव्हते, हे आता कबूल करायला हरकत नाही. तरीसुद्धा, ‘मेज’ हा शब्द तेव्हा सामान्य वापरात नव्हता, म्हटल्यावर, बाईंना तरी तो ठाऊक असेल किंवा नाही, याबद्दल मला खात्री नव्हती. म्हणजे, मी मारे ‘मेज’ म्हणून लिहायचो, आणि बाई (शब्द ठाऊक नसल्यामुळे) चूक द्यायच्या, नि मार्क कापायच्या! Damned if you do, and damned if you don’t. अशा वेळेस काय करावे बरे? म्हणून त्यातल्या त्यात safe पर्याय म्हणून ‘पाढा’ लिहून दिले, झाले. आणि तरीही बाईंनी मार्क कापलेच!)
आम्ही भरडून निघालो, म्हणून आमच्या मुलांनीही भरडून निघालेच पाहिजे, हे आमच्या मनाला (आणि/किंवा सदसद्विवेकबुद्धीला) पटत नाही खरे. परंतु, आम्हाला विचारतो कोण? जग हे परंपरावादी आहे, त्याला काय करणार?
असो चालायचेच.
उत्तर असे द्यावे
सहावीच्या हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत "दो यौगिक शब्द लिखिये" याचे उत्तर लिहिताना यौगिक म्हणजे दोन भिन्न अर्थ असलेले शब्द जोडून (जसे की "पाठशाला" , "रसोईघर") बनलेले शब्द असतात ही भानगड माहीत नसल्याने मी "शवासन" व "प्राणायाम" असे "यौगिक" शब्द लिहिल्याचे आठवले.
बरोबर आहे.
हेटरोनॉर्मेटिव्ह आणि पितृसत्ताक जगात राहिल्यानं असं होतं.
व्हॉट इज अ मम्मी?
- द बेअरर ऑफ युटरस दॅट प्रोडयुस्ड मी.
हे अधिक योग्य.
पण ती सरोगेट असेल तर काय?
दत्तक आई असेल तर काय?
व्हॉट इस अ मम्मी, हा प्रश्न फारच फिलॉसॉफिकल होऊ लागला आहे.
>>परीक्षेत मी table या इंग्रजी शब्दाकरिता मराठी प्रतिशब्द ‘पाढा’ असा लिहिला होता.
नशीब तुम्हाला पेरियॉडिक टेबल म्हणजे काय याचं उत्तर कुणी विचारलं नाही. तुमच्या विचारांची सध्याची दिशा बघता...
…
खरे आहे. तुम्ही आणि तुमचे मित्र एकमेकांचे पीरियड ट्रॅक करीत नसा, ही खरोखरच शरमेची बाब आहे.
(एकमेकांचे ऑफ पीरियड भरून काढायला नियोजनाचे साधन म्हणून ही पद्धत खरे तर अतिशय उपयुक्त ठरली असती. परंतु, आपल्या भारतीय परंपरेत विचार करणे हे पाप आहे, त्याला काय करणार? चालायचेच.)
अवांतर: एखादा शिक्षक (शाळामास्तर) जेव्हा रिटायर होतो, तेव्हा त्या निवृत्तीस ‘रजोनिवृत्ती’ म्हणून संबोधणे कितपत सयुक्तिक ठरेल? (कारण, निवृत्तीबरोबरच पीरियडही संपतात!)
(झालेच तर, शाळेत जेव्हा एखाद्या शिक्षकाचा पीरियड चालू असतो, तेव्हा त्यास ‘रजस्वला’ म्हणता येईल काय?)
अतिअवांतर: रबींद्रनाथांची ‘शांतिनिकेतन’ ही शाळा हिंदुपरंपरावादी होती. तेथे पीरियडला बाहेर बसत.
बरे मग?
जगात कोठलीतरी शाळा कोठल्यातरी नंबरावर असायचीच, आणि दुसरी एखादी शाळा कोठेही नसायचीच.
शिवाय, “Patriotism is, fundamentally, a conviction that a particular country is the best in the world because you were born in it.” असे कायसेसे शॉ की कोणीतरी म्हणून गेलेला आहेच.
सांगण्याचा मतलब, एखादी शाळा ही जगात अमक्यातमक्या नंबरावर असेलही, परंतु, that fact does not automatically reflect upon each and every student of that institution.
Guilt by associationप्रमाणे glory by associationदेखील फ़िज़ूलच.
पण लक्षात कोण घेतो? चालायचेच.