तुमचा मेंदू सडत आहे का?
तुमचा मेंदू सडत आहे का?
=================
-राजीव उपाध्ये मे (२०२५)
सरन्यायाधीशांनी नुकत्याच केलेल्या काही टिप्पण्यामुळे विशिष्ट वर्ग दुखावला गेला आणि बरीच धूळ उडाली. त्यात सरन्यायाधीश पदावर बसलेली किती ताणात असते याबद्दल कुणीही संवेदनशीलता दाखवल्याचे दिसले नाही. ती क्वचित चुकू शकते याचे भान निर्माण व्हायला जीवशास्त्राचे बेसिक ज्ञान आणि वेगळीच परिपक्वता असावी लागते.
पण ते असो. असा तीव्र प्रतिक्रियेचा अनुभव मी मांडलेल्या एका संकल्पनेबाबत पण मी घेतल्या असल्याने मला आता त्याचं काहीही वाटत नाही! भारतीय समाजाची कटू सत्य पचवायची क्षमता शून्याच्या पण खाली आली आहे, इतकाच त्याचा अर्थ!
पण ते जाऊ दे... ध्यान या माझ्या लाडक्या विषयाकडे वळतो. कारण ध्यान आणि वास्तव पचविण्याची क्षमता यांचा निकटचा संबंध आहे (आणि सरन्यायाधीशांची वास्तव पचवायची क्षमता निश्चितच जास्त असणार याची मला खात्री आहे. ते ध्यान नक्कीच करत असणार आणि त्यांच्यावर उखडलेला वर्ग नक्कीच करत नसणार. कारण तरूणाई जर ध्यान करत असती तर देश वेगळा दिसला असता. असो.)
ध्यानाने काही साधकांना सिद्धी निर्माण होतात असे पतंजली म्हणतो. काही लोकांचे असे म्हणणे आहे की सिद्धी पतंजलीने ध्यानमार्गापासून ढळू नये म्हणून निर्माण केलेली गाजरे आहेत. पण माझ्या अनेक वर्षांच्या ध्यानाभ्यासाने, चेताशास्त्राच्या अभ्यासाने असे मत बनले आहे की ध्यानाने सिद्धी नक्कीच प्राप्त होत असणार. फक्त त्यांचे स्वरूप लोकमानसातील सिद्धी या कल्पनेच्या स्वरूपापेक्षा किंचित वेगळे आहे, असे मला वाटते.
माझ्या मते ध्यानाने प्राप्त होणार्या ठळक सिद्धी दोन - १. ताण नियंत्रण क्षमतेत वाढ आणि २. मेंदूच्या लवचिकतेमध्ये दिसून येणारी वाढ
या दोन्ही सिद्धी फक्त ध्यान केले म्हणून साध्य होत नाही तर त्यासाठी पोषण आणि इतर वातावरण पण तितकेच महत्त्वाचे असते. ध्यान करत आहात पण आजुबाजुचे वातावरण मात्र आघात करत असेल तर ध्यानाच उपयोग होणं मला कठीण वाटतं. शिवाय आडात नसेल तर पोहर्यात येत नाही. त्यामुळे फकत ध्यान करतो म्हणून या सिद्धी प्राप्त होतील, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
वर उल्लेख केलेल्या दोन सिद्धींपैकी ताण नियंत्रण याबद्दल बोलले जाते पण मेंदूच्या लवचिकतेबद्दल फार कमी बोलले जाते.
अतिताणामुळे मेंदूच्या अधिकारी कार्यांवर (एक्झिक्युटीव्ह फंक्शन) म्हणजे उपाग्रखण्डाच्या क्षमतेवर परिणाम होऊन विवेक संपतो आणि मनुष्य अविवेकी बनतो, हे विज्ञानाने पुरेसे सिद्ध केले आहे. पण ध्यानाने हे थोपवले जाते, नव्या चेतापेंशीच्या जोडण्या निर्माण होऊ शकतात. नव्या चेतांपेशीच्या जोडण्या निर्माण झाल्याने केवळ भावनिक नियंत्रण साध्य होत नाही तर वास्तवाचा अर्थ नव्याने अर्थ शोधण्याची क्षमता निर्माण होणे, नव्याने अनेक सहसंबंधांचे, कार्यकारणभावाचे ज्ञान होणे इ० परिणाम हे या सिद्धीचे आविष्कार आहेत. त
माझा एक गमतीदार अनुभव
मला अलिकडे अचानक एक साक्षात्कार झाला (मेंदूच्या लवचिकतेचा आविष्कार). काही माणसांचा आपल्याकडे बघायचा दृष्टीकोन गढूळलेला किंवा विकृत का असतो याचे मला कायम कोडे पडले होते. काही माणसांना मी अजिबात सहन होत नाही. बरं मी या लोकांच्या शेपटीवर कधी पाय दिला आहे असं पण नाही (तसं असेल तर एखाद्याला आपल्याबद्दल असलेली अढी थोडी फार समर्थनीय आहे, असे म्हणता येते. पण इथे तसं पण काही दिसत नाही.
मग माझा कारण नसताना तिरस्कार करणार्या व्यक्तीमध्ये अचानक एक समान धागा लक्षात आला. याचे श्रेय मी माझ्या ध्यानवर्धित लवचिकतेला देतो. या सर्व व्यक्तींना भयानक किंवा अनिंयंत्रित मधुमेह आहे असे लक्षात आले. माझ्यासाठी हा एक मोठ्ठा आणि महत्त्वाचा शोध होता. कारण या शोधामुळे मला या लोकांना लांब ठेवायची आणि त्यांना माफ करायची बुद्धी झाली, नाहीतर मी स्वत:लाच त्रास देत बसलो असतो.
मग उत्सूकता निर्माण झाली की अशा अनियंत्रित मधुमेहाने मेंदू सडत किंवा किडत असेल का? आणि मग या क्षेत्रात झालेल्या संशोधनाचा आढावा घेतला तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला...
अनियंत्रित मधुमेहाचा कॉग्निटीव्ह फॅकल्टीज होणारा परिणाम, तसेच उत्पादकतेवर होणारा परिणाम अस्वस्थ करणारा आहे. याबाबत सापडलेले संशोधन पुढे जोडत आहे.
तेव्हा तुमच्याशी कुणी विचित्र वागत असेल तर ती व्यक्ती मधुमेही असायची शक्यता खुप आहे. अशा लोकांना माफ करा आणि त्यांच्यापासून दूर राहा.
-तसेच साखरं हे विष आहे हे सत्य स्वीकार करा आणि त्याचा प्रचार करा
- कर्बोदके प्रमाणात सेवन करा
- इंशुलीन स्पाईक्स टाळा
संदर्भ (सौजन्य चॅटजीपीटी)
Diabetes and Cognitive Impairment
1. Xue M, Xu W, Ou YN, et al. (2019)
Diabetes mellitus and risks of cognitive impairment and dementia: A systematic review and meta-analysis of 144 prospective studies.
Journal: Ageing Research Reviews
DOI: 10.1016/j.arr.2019.100944
[ScienceDirect abstract](https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S1568163719300157…)
2. Biessels GJ, Despa F. (2018)
Cognitive decline and dementia in diabetes mellitus: mechanisms and clinical implications.
Journal: Nature Reviews Endocrinology
DOI: 10.1038/s41574-018-0048-7
[Nature Reviews article](https://www.nature.com/articles/s41574-018-0048-7?utm_source=chatgpt.com)
3. Cukierman T, Gerstein HC, Williamson JD. (2005)
Cognitive decline and dementia in diabetes—systematic overview of prospective observational studies.
Journal: Diabetologia
DOI: 10.1007/s00125-005-0023-4
[Springer article](https://link.springer.com/article/10.1007/s00125-005-0023-4?utm_source=…)
4. Moran C, Beare R, Wang W, et al. (2019)
Type 2 diabetes mellitus, brain atrophy, and cognitive decline.
Journal: Neurology
DOI: 10.1212/WNL.0000000000006955
[Neurology journal](https://www.neurology.org/doi/10.1212/WNL.0000000000006955?utm_source=c…)
---
Diabetes and Productivity / Work Performance
5. Breton MC, Guénette L, Amiche MA, et al. (2013)
Burden of diabetes on the ability to work: a systematic review.
Journal: Diabetes Care
DOI: 10.2337/dc12-0354
[Diabetes Care article](https://diabetesjournals.org/care/article/36/3/740/37918/Burden-of-Diab…)
6. Shim YT, Lee J, Toh MPHS, et al. (2018)
Health-related quality of life and productivity in type 2 diabetes patients in Singapore.
Journal: BMJ Open Diabetes Research & Care
DOI: 10.1136/bmjdrc-2018-000577
[PMC full text](https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6224294/?utm_source=chatgpt.com)
7. Bommer C, Sagalova V, Heesemann E, et al. (2018)
Global Economic Burden of Diabetes in Adults: Projections From 2015 to 2030.
Journal: Diabetes Care
DOI: 10.2337/dc17-1962
[Diabetes Care article](https://diabetesjournals.org/care/article/41/5/963/36511/Global-Economi…)
8. Kumpatla S, Kothandan H, Tharkar S, Viswanathan V. (2013)
The costs of treating long-term diabetic complications in a developing country: India.
Journal: Journal of Diabetes & Metabolic Disorders
[SpringerOpen article](https://link.springer.com/article/10.1186/2251-6581-12-47?utm_source=ch…)
9. The Impact of Diabetes on Productivity in India (2021)
Journal: Diabetes Care
DOI: 10.2337/dc21-0929
[Diabetes Care article](https://diabetesjournals.org/care/article/44/12/2714/138481/The-Impact-…)
10. Pawaskar M, Camacho FT, Anderson RT, Cobden D, Joshi AV, Balkrishnan R. (2008)
Health care costs and work productivity associated with diabetic patients with macrovascular comorbid conditions.
Journal: Population Health Management
[PubMed entry](https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/19108649/?utm_source=chatgpt.com)
निरीक्षण नाही म्हणून विचारलं.
आपली प्रतिक्रिया काय असेल हे व्यक्तीनुसार ठरेल. पण साधारणपणे बरे न वागणारे लोक सर्वसाधारणपणे सगळ्यांशीच असे वागतात; असं माझं निरीक्षण. म्हणून विचारलं.
माझ्या ओळखीत कुणीच तीव्र मधुमेही नाहीत. मी ज्या ओळखीतल्या लोकांचं असह्य वर्तन बघितलं आहे, त्यांतले कुणीच मधुमेही नाहीत; किंवा कदाचित एक इसम असेल.
मधुमेह नसतानाही लोकांशी बरे न वागणारे बरेच लोक मी बघितले आहेत. आणि या विधानांना काही अर्थ नाही, हे मलाही मान्य आहे. एक हायपोथेसिस म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांत इतरांशी कुजकटपणे वागण्याचं प्रमाण मधुमेह नसणाऱ्यांपेक्षा जास्त असेल, हे पडताळून बघण्यासाठी मला मान्य करता येईल.
मला एक कळत नाही
आपण तज्ञ डॉक्टर नसू, आपण शरीर शस्त्र मधील संशोधक नसू, मुळात आपल्याला त्या विषयातील खोल ज्ञान नसेल तर.
शारीरिक क्रिया कशा चालतात ह्या वरील फक्त लेख वाचून आपण त्या विषयात हक्क ने बोलू च कसे शकतो..
1 सेल चा deatail अभ्यास करुन ती समजून घेण्यास संशोधक लोकांचे आयुष्य जाते..
शर्करा प्राधिन संयोग चे दुष्परिणाम वर हजार पाना चे अत्यंत सविस्तर शोध निंबंध असतील .
जे संशोधक नाहीत, डॉक्टर नाहीत त्यांना ते कसे समजेल. आणि मला समजलंय असा तरी दावा कसा करता येईल..
मधुमेही लोक सर्वांशी तिरस्कार ने वागतात, विनाकारण कोना च हि तिरस्कार करतात अशी उदाहरणे समाजात नाहीत हे सत्य आहे आणि अनेक लोक तसें अनुभव सांगू शकतात.
आजच्या तरुणांचं मोठं दुर्दैव
आम्ही जेव्हा तरुण होतो. म्हणजे आम्ही काही जेन झी नाही. आम्ही मिलेनियल. तर आम्ही जेव्हा २० - २५ वर्षांचे होतो तेव्हा आमचं सुदैव असं होतं की आम्ही जे काही ऑनलाइन करायचो त्याचा गंधही त्याकाळच्या ५०+ लोकांना नसायचा. त्यावर देवनागरीत प्रतिक्रिया लिहिणे तर अकल्पित गोष्ट होती.
त्यामुळे पुढच्या पिढीचं आयुष्य आणखीन कठीण कसं होत जातं त्याचं हे एक उदाहरण..शिवाय गेल्या १४ वर्षांत १ लाख सरकारी शाळा बंद झाल्या आहेत असं आजच वाचलं. आणि मराठी विषयात भरपूर मुलं नापास झाली आहेत दहावीला. कदाचित त्यांचे शिक्षक त्यांना शिकवण्याऐवजी मेलडी रीळ बघण्यात हरवले असावेत.
माझा लेटेस्ट HBA1C 5.5 आहे.
माझीही अनेक लोकांशी कायमची भांडणं झाली आहेत. पण त्यांना डायबेटिस आहे किंवा नाही हे विचारण्यापेक्षा मी पैसे देऊन डॉक्टरला विचारलं "माझी अशी भांडणं का होतात?"
त्यावर मला समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे मला माझ्या शत्रूंचे लॅब रिपोर्ट शोधून काढावे लागत नाहीत.
त्यापेक्षासुद्धा…
माझीही अनेक लोकांशी कायमची भांडणं झाली आहेत. पण त्यांना डायबेटिस आहे किंवा नाही हे विचारण्यापेक्षा मी पैसे देऊन डॉक्टरला विचारलं "माझी अशी भांडणं का होतात?"
त्यावर मला समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे मला माझ्या शत्रूंचे लॅब रिपोर्ट शोधून काढावे लागत नाहीत.
त्यापेक्षासुद्धा, भारतात असे वाटेल त्याचे/तिचे लॅब रिपोर्ट वाटेल त्याला/तिला सहज मिळू शकतात काय? (कोठे ईबेवर विकतात, की डार्कवेबवर? की, उघडउघड महात्मा फुले मंडईत? (किंवा, जुन्या बाजारात?))
भारतात ‘पेशंट प्रायव्हसी’ नावाचा काही प्रकार (झालेच तर, त्या संबंधीचे कायदे वगैरे) अस्तित्वात नाही(त) काय? (की (चुकून असलेच तर) नुसते कागदोपत्रीच आहेत?)
‘Privacy is not an Indian value’ असे आम्ही जे बोंबलून बोंबलून कंटाळा येईपर्यंत सांगत असतो१, ते याचमुळे! ((हिंदुस्थानात जोवर हिंदुस्थानी लोक आहेत, तोवर) हिंदुस्थानचे भले होणे कदापि शक्य नाही, आणि याला कारणीभूत हिंदुस्थानी लोकच आहेत. असोत बापडे.) झालेच तर, भारताकडे सॉफ्टवेअरादि औटसोर्सिंगच्या ऐन उमेदीच्या काळात, आपला (सोशल सेक्युरिटी नंबरपासून ते मेडिकल रेकॉर्ड्सपर्यंत काय वाटेल तो) खाजगी डेटा कोठला रँडम इंडियन भामटा हाताळीत असेल (नि त्याचे तो काय करीत असेल), या कल्पनेने येथे अमेरिकेत अनेकांची झोप उडत असे (आणि, (अनेक कारणांपैकी) या(ही) एका कारणामुळे येथील जनतेत औटसोर्सिंगला (आणि, त्यातही, भारताप्रति औटसोर्सिंगला) विरोध असे), ते आठवून गेले. (यात कदाचित काही अंशी रेसिझमचा भाग असू शकला, तरी, यामागे काही तथ्य नाहीच, असे (एक भूतपूर्व भारतीय नागरिक तथा ब्राउन कातडीचा भारतवंशी म्हणून) निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकणार नाही!) (आजकाल भारतातील टॅक्स ऑथॉरिटीज़ एनाराय-ओसीआय मंडळींचे परदेशातील टॅक्स आयडी नंबर (उदा., सोशल सेक्युरिटी नंबर, वगैरे) मागतात, त्यामागे त्यांच्याजवळ वैध कारणे असू शकतीलही. परंतु, त्याबद्दल काळजी वाटते, ती याचमुळे.) असो चालायचेच.
माझा लेटेस्ट HBA1C 5.5 आहे.
Thanks for letting me know. I was dying to have this very interesting information!
(वास्तविक, ही माहिती (१) तुम्ही, (२) तुमचे डॉक्टर, आणि फार फार तर (३) तुमचे अतिनिकटचे नातेवाईक (पक्षी: नवरा. आईवडील. फार फार तर मुलगा. Next of kin. बस्स, आणखी कोणीही नाही.) यांजव्यतिरिक्त इतर कोणालाही उपलब्ध असण्याचे काही वैध कारण आहे काय?)
(असो. ही माहिती आता सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिलेलीच आहेत, तर पुढील वेळेस तुमचा stool analysis reportसुद्धा सार्वजनिक कराच, म्हणतो. त्यातसुद्धा बरीच सुरस तथा चमत्कारिक माहिती असेल, जिच्यात अलम दुनियेस रस असण्याचे कारण असू शकेल. झालेच तर गायनॅकचा रिपोर्ट. (Pap smear वगैरे?))
पण लक्षात कोण घेतो? चलता है, हिंदुस्तान है!
१ आणि, Minding one’s own business is not an Indian virtue, असेही. परंतु, ते असो.
हा हा
पण मला डायबेटिस नाही हे त्यांना कसे कळणार? म्हणून मी मला किती डायबेटिस नाही याचा आकडा दिला!
तुम्ही इन्स्टाग्रामवर काही वेळ घालवलेला दिसत नाही (अर्थात तुम्ही तिथे गेला असता तर तिथली किमान १०० अकाउंट बंद झाली असती तुमच्या कमेंटमुळे) पण तिथं एक माणूस आहे. तो काहीही खाऊन दाखवतो. म्हणजे खीर, पुरणपोळी, मोदक इत्यादी. आणि प्रत्येकवेळी सगळ्यांना दोन तासांनी त्याची साखर मोजून दाखवतो. आणि या या पदार्थाने अमुक अमुक युनिट साखर वाढते असं जाहीर करतो..आणि त्यानुसार त्याचे प्रेक्षक तो पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही असं ठरवतात.
वर मी सांगितलं तसेच लोक आपणहून ही माहिती लोकांना देतात. दीक्षित डाएट करून आमचा HBA1C ९ चा ८ झाला वगैरे.
jokes aside - ध्यानामुळे एका…
jokes aside - ध्यानामुळे एका वर्षानंतर काय घडणार आहे ते एक वर्षं आधीच लक्षात येतं का?
याचं उत्तर हो असे देता येईल.
ध्यानाने माझं डोकं मॉण्टे कार्लो सिम्युलेटर प्रमाणे चालते. त्या मुळे भविष्यकाळातील शक्यतांचा अंदाज बांधता येतो.
बाकी डॉ०चा सल्ला कुणी कशासाठी घ्यावा हा ज्याचा त्याचा आणि त्या व्यक्तीच्या आप्तांचा प्रश्न आहे. मी कुणाशी भांडत बसत नाही. सरळ आयुष्यातून वजा करतो.
भवभूतीच्या कालोह्ययं निरवधि: या श्लोकावर माझा अढळ विश्वास आहे...
सई केसकर, श्री० नवी बाजू…
सई केसकर, श्री० नवी बाजू
समजा माझा पगार महिना १०० रु आहे. पगाराच्या जागी तुम्ही श्रेष्ठतेचा कोणताही निकष लावू शकता...
आता समजा तुमचा पगार महिना १००० रू आहे आणि म्हणून तुम्ही मला तुम्ही मला तुच्छपणे वागवता किंवा उंटावरून शेळ्या हाकता (प्रश्न न समजाऊन घेता) नको ती अक्कल शिकवत राहता किंवा वैयक्तीक नुकसान करत राहता.
पण तिसरी क्ष व्यक्ती आहे. तिचा पगार आहे महिना १ लक्ष रू, ती तुमच्यापेक्षा हुशार आणि कर्तृत्ववान आहे. ही व्यक्ती मात्र मला सन्मानाने वागवते. माझा पगार १०० चा ५०० कसा होईल यावर युक्त्या सांगते. प्रसंगी शक्य ती मदत करते. मुख्य म्हणजे माझ्या आनंदात, दु:खात सहभागी होते, तेव्हा मला प्रश्न पडतो की तुम्हाला मी महत्त्व का द्यावे. माझ्या दृष्टीने तुमचे माझ्या आयुष्यातले स्थान संपलेले आहे, हे तुम्हाला स्वीकारता का येत नाही.
तेव्हा तुम्हाला वाटते (१००० रू पगार आहे म्हणून) म्हणून मी डॉक्टरकडे जावे हे मत मला हास्यास्पद वाटते.
हा व्यकीगत पर्सेप्शनचा प्रश्न आहे. काही लोक माझ्याकडे येतात तेव्हा ते माझ्याकडचा पुस्तकांचा पसारा बघून नाकं मुरडतात तर काही कौतूकाने माझ्याशी त्यावर गप्पा मारतात. काहीना तर फक्त परीक्षा घ्यायची खोड असते...
तात्पर्य - समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर तिचे आपल्या आयुष्यातील स्थान ठरते...
श्री० नवी बाजू
भारतात डॉ० पेशंटचे खाजगीपण आणि स्वायत्तता या दोन्हीचा आदर करत नाहीत.
.
श्रेष्ठ असणे किंवा नसणे याचा इथे प्रश्नच नाही.
कालच कुठेतरी ऐकलं की भारतात आता ६ पैकी ४ (का असाच काही भयानक रेशो) लोक डायबेटिक असतात. तुमचं सामाजिक वर्तुळ जितकं संपन्न आणि दीर्घायुषी तितकं हे प्रमाण अधिक असणार. अशा परिस्थितीत तुमचे ज्यांच्याशी खटके उडतात त्यांना डायबेटिस असण्याची शक्यताच मुळात डायबेटिस नसण्यापेक्षा जास्त आहे!
मग जी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागते ती डायबेटिक आहे म्हणून वाईट वागते की भारतीय आहे म्हणून वाईट वागते हे कसं ठरवणार? मला वाटतं भारतीय आहे म्हणून वाईट वागण्याची शक्यता जास्त आहे.
अक्कल शिकवणे, अनाहुत सल्ले देणे, फुकटेगिरी करणे, भोचकपणा करणे, सतत तुलना करणे, एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही असं त्यानं/तिनं सांगूनही तीच पुन्हा पुन्हा करणे, वगैरे वगैरे भारतीय लोकच अधिक करतात. आणि द्वेष करण्यात तर आपण एक नंबर आहोत.
>>>श्रेष्ठ असणे किंवा नसणे…
>>>श्रेष्ठ असणे किंवा नसणे याचा इथे प्रश्नच नाही.
तुम्हाला माझ्या पिढीच्या मानसिकतेबद्दल काहीच माहित नाही. प्रत्यक्ष त्या व्यक्तींना भेटल्याशिवाय मी काय म्हणतो ते समजणार नाही.
माझं निरीक्षण अनियंत्रित मधुमेहींबद्दल आहे, मी सरसकट विधान केलेलं नाही. गंमत म्हणजे माझ्या बायकोचे पण असेच अनुभव आहेत...
बाकी तुमचा ए१सी जाहिर करायची आवश्यकता नाही. ते प्रतिसादावरूनच समजते ... हा हा हा!
.
‘विधान खोडून काढलेले नाहीये’ याचा अर्थ ‘विधान सिद्ध झालेले आहे’ असा (किंवा, ‘विधानात तथ्य आहे’, असाही) आपोआप होत नाही, हा एक भाग.
विधान खोडून काढण्याचे कष्ट घेण्याइतके दखलपात्र कदाचित कोणाला वाटले नसू शकेल, हा दुसरा.
(तसेही, विधान सिद्ध करण्याची जबाबदारी (असलीच, तर) विधान करणाऱ्यावर असते, ते खोडून काढण्याची जबाबदारी इतरांवर नसते, असेही एक विधान ऐकलेले आहे, बुवा. खरेखोटे ते विधान करणारेच जाणोत. असो.)
(सांगण्याचा मुद्दा, ‘मी झोपतो करून हिमालयाची उशी’ हे विधान आजतागायत कोणीही खोडून काढलेले नाही, याचा अर्थ श्री. नानू सरंजामे हे हिमालयाची उशी करून झोपतात, असा होऊ नये, इतकेच.)
.
जे सत्य वैद्यकाच्या पाठ्यपुस्तकातून शिकवले जाते ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही
वैद्यकाच्या पाठ्यपुस्तकातील ‘सत्ये’ ही कालवशात् (जसजशी नवनवीन माहिती उपलब्ध होत जाते, तसतशी) बदलू शकतात. (किंबहुना, कोठल्याही वैज्ञानिक सिद्धांताबद्दल हे म्हणता यावे.)
त्यामुळे, ‘ते सिद्ध (वा असिद्ध) करण्याची आवश्यकता नाही’, हे पूर्णपणे पटू शकत नाही. (ते सिद्ध (अथवा असिद्ध) करू शकणारा काही नवीन विदा असल्यास तो अवश्य मांडता यावा.)
तुम्ही जरा जास्तच सरसकटीकरण…
तुम्ही जरा जास्तच सरसकटीकरण केले आहे का?
ध्यानधारणेने सिद्धि -- ध्यान करण्याचे फायदे आहेत हे मान्य आहे. पण
"माझ्या मते ध्यानाने प्राप्त होणार्या ठळक सिद्धी दोन - १. ताण नियंत्रण क्षमतेत वाढ आणि २. मेंदूच्या लवचिकतेमध्ये दिसून येणारी वाढ
या दोन्ही सिद्धी फक्त ध्यान केले म्हणून साध्य होत नाही तर त्यासाठी पोषण आणि इतर वातावरण पण तितकेच महत्त्वाचे असते. ध्यान करत आहात पण आजुबाजुचे वातावरण मात्र आघात करत असेल तर ध्यानाच उपयोग होणं मला कठीण वाटतं. शिवाय आडात नसेल तर पोहर्यात येत नाही. त्यामुळे फकत ध्यान करतो म्हणून या सिद्धी प्राप्त होतील, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. "
यात जरा विरोधाभास आहे असे वाटते. ध्यानामूळे स्थितप्रज्ञता यायला पाहिजे ना?
अनियंत्रित मधुमेहामूळे वर्तन समस्या निर्माण होते हे विधान जरा बदल करून लिहायला पाहिजे.
कुठल्याही आजारपणामूळे आणि तोही दीर्घकाळ आणि गंभिर स्वरूपाचा असेल तर मनुष्य चिडचिडा होतो हे खरे आहे.
पण राग आणि तिरस्कार या वेगवेगळ्या भावना आहेत.
काहीजण तुमचा तिरस्कार करतात असे तुम्हाला कशामूळे वाटले. तुम्ही कारणे शोधलीत का? जे तुमचा तिरस्कार करतात (असे तुम्हाला वाटते) त्यांच्याशी काही संवाद साधलात का? आणि तुमचा तिरस्कार करणारे सगळे म्हणजे १००% लोक मधुमेही आहेत का? तसेच तुमच्या संपर्कातील लोक म्हणजे - कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, ओळखीपाळखी, आणि सहध्यायी किवा कर्मचारी यांची एकूण संख्या, त्यातील तुमच्याबरोबर भांडण, वाद, शत्रुत्व असणारे किती? त्यातही तुमचा तिरस्कार करणारे किती? आणि त्यातील मधूमेही किती? त्यापैकी अनियंत्रित मधूमेही किती? या सर्वांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढलेला आहे का? आणि तरीही तो १००% बरोबर असण्याची शक्यता नाहीच ना?
@मनीषा मी सरसकट विधान केलेलं…
@मनीषा
मी सरसकट विधान केलेलं नाही.
मला काय म्हणायचं ते परत एकदा स्पष्ट करतो.
एक उदा० - समजा तुम्हाला जखम झाली आहे. ही जखम भरून येण्यासाठी जेव्हा उपचार केले जातात. तेव्हा निर्जंतुकीकरण, मलमपट्टी, अन्य तोंडावाटे घ्यायची औषधे इ० उपचार तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा जखमेवर खपली धरते तेव्हा. ही खपली परत परत काढली गेली तर जखम भरून यायला वेळ लागतो किंवा चिघळते.
ध्यानाने स्थितप्रज्ञता येण्यासाठी उपाग्रखण्डाचे अमिग्दलावर/लिम्बिक सिस्टीम्वर पुरेसे नियंत्रण नवीन चेतापेशी, नव्या जोडण्या या द्वारे येणे अभिप्रेत असते. यासाठी पोषक वातावरण नसेल तर यात अडथळे येतात आणि मग उपयोग झाला नाही म्हणून लोक ध्यानाला कचर्याच्या टोपलीत टाकतात.
>>>अनियंत्रित मधुमेहामूळे वर्तन समस्या निर्माण होते हे विधान जरा बदल करून लिहायला पाहिजे.
मधुमेहामुळे मेंदू कसा सडतो हे दाखवणारे एम०आर०आय० इथे टाकायला हवे असतील तर टाकू शकेन, पण "डायबेटीक ब्रेन न्युरोपथी/डॅमेज" अशा बीजसंज्ञा घेऊन शोध घेतल्यास भरपूर माहीती मिळेल.
आता तुमच्या इतर मुद्यांबद्दल-
लोक एकमेकांचा तिरस्कार अनेक कारणांनी करतात. माझा तिरस्कार का होतो याची कारणे मला माहित आहेत. काही लोकांच्या अनियंत्रित डायबिटीसमुळे त्यात अधिक भर पडत असणार, हा योगायोग किंवा कार्यकारणभाव मला ध्यानामुळे समजला. इतकंच माझं म्हणणे आहे.
विधान खोडून काढणं
शर्करा-प्रथिन हे जे सुप्रसिद्ध विधान आहे, ते करण्यासाठी आणि खोडून काढण्यासाठीही काही अभ्यास लागतो, किंवा काही धाडस आवश्यक असतं. या दोन्हींचा अभाव असेल ते लोक विधान करायला वा खोडायला जाणार नाहीत.
मात्र निरीक्षणातून काही विधानं करणं त्यातल्या त्यात सोपं असतं. उदाहरणार्थ, ज्या मुलांच्या चपलांचा आकार मोठा असतो, साधारणपणे त्यांची शब्दसंपदा अधिक असतो, लहान चपला वापरणाऱ्या मुलांपेक्षा. (चपला आणि भाषिक कौशल्याचा थेट संबंध नाही, वयानुसार चपलेचा आकार आणि भाषिक कौशल्यं वाढतात.)
तुमचं एक मूळ विधान - मधुमेही लोक भांडखोर, कुजकट वगैरे असतात - असेल बुवा निरीक्षणातून हा तुमचा अनुभव. इतरांचा अनुभव निराळाही असू शकतो. किंवा मधुमेह आणि स्वभावाचा फार संबंध नसेलही; मध्ये काही confounding factor येत असेल, वरच्या चपला-शब्दसंपदा उदाहणात वय हा मुद्दा महत्त्वाचा आहे तसा.
(आणखी एक उदाहरण…)
तुमचं एक मूळ विधान - मधुमेही लोक भांडखोर, कुजकट वगैरे असतात - असेल बुवा निरीक्षणातून हा तुमचा अनुभव. इतरांचा अनुभव निराळाही असू शकतो. किंवा मधुमेह आणि स्वभावाचा फार संबंध नसेलही; मध्ये काही confounding factor येत असेल, वरच्या चपला-शब्दसंपदा उदाहणात वय हा मुद्दा महत्त्वाचा आहे तसा.
सई केसकरांच्या वरील एका प्रतिसादातून:
कालच कुठेतरी ऐकलं की भारतात आता ६ पैकी ४ (का असाच काही भयानक रेशो) लोक डायबेटिक असतात. तुमचं सामाजिक वर्तुळ जितकं संपन्न आणि दीर्घायुषी तितकं हे प्रमाण अधिक असणार. अशा परिस्थितीत तुमचे ज्यांच्याशी खटके उडतात त्यांना डायबेटिस असण्याची शक्यताच मुळात डायबेटिस नसण्यापेक्षा जास्त आहे!
नाही, वरील premiseबद्दल (किंवा, खरे तर त्याच्या विरोधात) मला काहीही म्हणायचे नाही — stands perfectly to logic. फक्त, ठळक केलेल्या वाक्यातून ‘लोक जसजसे दीर्घायुषी होत जातात, तसतसे त्यांच्यातील मधुमेहाचे प्रमाण वाढत जाते’ असे जे सूचित होते आहे, ते थोडे गमतीदार वाटते खरे. (ते चुकीचे आहे, असे मला म्हणायचे नाही. किंबहुना, ते तर्कास व्यवस्थित उतरते. जितके लोक अधिक जगतील, तितकी त्यांना मधुमेह होण्याची संधी वाढत जाणार. (जन्मतः मेलेल्याला मधुमेह होणे शक्य नाही.) त्यामुळे, समाज एकंदरीत जितका दीर्घायुषी, तितकी, ceteris paribus१, त्यात मधुमेहींचे प्रमाण होण्याची शक्यता अधिक असणार, हे पटू शकते. फक्त, हे थोडे गमतीदार — काहीसे परस्परविरोधी — वाटू शकते, इतकेच.)
अर्थात, मधुमेह हे दीर्घायुष्याचे (आणि/किंवा दीर्घायुष्य हे मधुमेहाचे) द्योतक नव्हे. (कारण तर नव्हेच नव्हे. मानदंडही नव्हे.) मात्र, वरीलप्रमाणे, समाजातील दीर्घायुष्याच्या प्रमाणाचे आणि समाजातील मधुमेहाच्या प्रमाणाचे काही नाते असू शकते, हे पटण्यासारखे आहे.
(विदा चुकीचा नसू शकतो. परंतु, बरोबर विद्यातून चुकीचा निष्कर्ष काढता येणे हे तितकेही अशक्य असावे काय?)
१ हा शब्दप्रयोग कसेही करून घुसडायचाच होता.
दीर्घायुष्य
तुम्हाला माझं विधान गमतीदार वाटलं कारण तुम्ही दीर्घायुष्य म्हणजे काहीतरी चांगलं, सकारात्मक आहे असं मानता. ते तसं तेव्हाच असतं जेव्हा मनुष्य दीर्घायुषी आणि रोगमुक्त असतो. मला वाटतं अलीकडे वैद्यकीय क्षेत्रातही दीर्घायुषी (आणि डायबेटीसारखे आजार) असण्याला एक नकारात्मक छटा प्राप्त झाली आहे. इतकंच काय, गर्भधारणा ३५ वर्षांच्या पुढे झाल्यास तिला हाय रिस्क "जेरियाट्रिक" प्रेग्नंसी म्हणतात.
आता थोडं पूर्वी कसं सगळं छान होतं छाप स्मरणरंजन
पूर्वी माणसं डायबेटिस होण्याआधी क्षय होऊन मरायची. बऱ्याचदा हा संसर्ग दुधातून व्हायचा (कारण तेव्हा पाश्चारयझेशन अस्तित्वात नव्हतं). स्त्रिया ७-८ बाळंतपणं होऊन शेवटी पंचविशीत बाळंतपणातच मरायच्या (compare that to 35 year old first timers today!) कारण गर्भनिरोधक नव्हते. आणि असले तरी ते पाप होते. मुलाने पाचवा वाढदिवस बघणे ही फार मोठी मजल होतो. कारण तेव्हा अँटीबायोटिक नसल्याने कोणताही संसर्ग जीवघेणा ठरू शकायचा.
हे सगळं बंद झाल्यावर लोक दीर्घायुषी झाले. पण दीर्घायुष्य इज नॉट इक्वल टु निरोगी आयुष्य! आता एखाद्या सत्तर वर्षांचा इसमाला तीव्र डायबेटिस असेल, त्याला आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करावा लागत असेल, त्यानं आयुष्यभर जमवलेलं धन हॉस्पिटलच्या घशात जात असेल, त्याला हवं ते हवं तेव्हा खाता येत नसेल, नोकरी नसेल, घरात कंटाळा येत असेल तर तो तिरसटासारखा वागला तर त्यात काय आश्चर्य? यासाठी मधुमेह - प्रथिन संयोग समजून घेण्याचीही गरज नाही.
आणि अल्झायमर हा तिसरा डायबेटिस आहे असं कुठेतरी वाचलं होतं..अनेक वर्षं इन्सुलिन रेसिस्टन्स असल्याने मेंदूचे synapses बत्थड होतात असं काही. पण याला उपायही आहे. त्याला नोबेल मिळालं आहे. बराच काळ उपाशी राहिलं की शरीर स्वतःच्याच कमकुवत पेशी खाऊ लागतं. त्यामुळे बराच कचरा साफ होतोच पण नवीन न्युरॉन्सची निर्मितीही होते.
असं काही म्हणलं की लगेच, "म्हणूनच हिंदू धर्मात उपासाची परंपरा आहे" वगैरे लोक बोलू लागतात..असो..
तर सांगण्याचा मुद्दा असा की आपल्या ८ जेनेटिक कॉपीज करून २५ व्या वर्षी मेलेलं चांगलं की ३५ व्या वर्षी एकच जेनेटिक कॉपी तयार करून ९० वर्षं डायबेटिसग्रस्त आयुष्य जगलेलं चांगलं?
अदितीतैंनी वर अभ्यास वगैरेचा…
अदितीतैंनी वर अभ्यास वगैरेचा अनावश्यक बागुलबुवा उभा करून वर शर्करा-प्रथिन संयोगाचे गांभिर्य कमी करायचा प्रयत्न केला आहे.
ज्याला अधिक जाणून घ्यायचे त्यांनी ही क्लीप बघावी.
https://www.youtube.com/watch?v=oZuK8ajA5iE
माझी त्यांना एक नम्र विनंती आहे - त्या उच्चविद्याविभुषित आहेत. तेव्हा किमान त्यांनी तरी मी न वापरलेले ("मधुमेही लोक भांडखोर, कुजकट वगैरे असतात") शब्द माझ्या तोंडी घालू नये.
नवे कोडे-योगायोग की कार्यकारण भाव
सई केसकरांनी वर म्हटल्याप्रमाणे -
अक्कल शिकवणे, अनाहुत सल्ले देणे, फुकटेगिरी करणे, भोचकपणा करणे, सतत तुलना करणे, एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही असं त्यानं/तिनं सांगूनही तीच पुन्हा पुन्हा करणे, वगैरे वगैरे भारतीय लोकच अधिक करतात. आणि द्वेष करण्यात तर आपण एक नंबर आहोत.
आणि
भारत मधुमेहाची जागतिक राजधानी आहे, या सत्यांचा एकमेकांशी सहसंबंध हा केवळ योगायोग की कार्यकारण भाव याचा छडा लावण्यासाठी ध्यानस्थ व्हावे म्हणतो...
आजचीच बातमी
Emotional and Mental Health: Glycaemic highs and lows affect mood, cognition, and energy levels. Hypoglycaemia can cause anxiety and brain fog; chronic hyperglycaemia is linked with depression and irritability. Research increasingly recognizes that emotional well-being is tightly linked to blood sugar stability, and both should be addressed in diabetes care.
https://www.msn.com/en-in/health/other/how-poor-glycemic-control-quietl…
**समारोप**
वरील सर्व चर्चा ए०आय० ला भरवली आणि त्यावर ए०आय० चे भाष्य देऊन समारोप करत आहे-
तुमच्या लेखाभोवती झालेली चर्चा ही प्रत्यक्षात “मधुमेहामुळे मेंदूवर परिणाम होतो का?” एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती पुढे जाऊन आधुनिक भारतीय मध्यमवर्गीय मनोवस्था, ऑनलाइन वादसंस्कृती, बौद्धिक अहंकार, अनुभव विरुद्ध शास्त्र, ध्यान विरुद्ध अकादमिक शंका, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — “मानवी वर्तनाला जैविक स्पष्टीकरण देता येते का?” — या प्रश्नांपर्यंत पोचली आहे.
तुमच्या मूळ लेखात तीन स्तर होते. पहिला स्तर तुलनेने मजबूत होता — uncontrolled diabetes, glycation, insulin resistance, neurodegeneration, executive dysfunction, mood dysregulation यांच्यातील संबंध. हा भाग तुम्ही हवेतून आणलेला नव्हता. त्याला वैद्यकीय साहित्याचा आधार आहे. AGEs, neuroinflammation, vascular damage, cognitive decline, “type 3 diabetes” ही लोकप्रिय संज्ञा — हे सगळे चर्चिलेले विषय आहेत. त्यामुळे “मधुमेह फक्त पाय कापतो, मेंदूला हात लावत नाही” अशी भूमिका घेणे अज्ञान ठरेल.
पण तुमच्या लेखातील दुसरा स्तर धोकादायक होता — “माझ्याशी विचित्र, विकृत, तिरस्काराने वागणाऱ्या लोकांत uncontrolled diabetes common होता” हा तुमचा निरीक्षणाधारित दावा. हा दावा hypothesis म्हणून मांडला असता तर त्यावर तर्कशुद्ध चर्चा झाली असती. पण तुम्ही तो अनेक ठिकाणी “साक्षात्कार”, “मोठा शोध”, “responses वरून A1C समजते” अशा स्वरूपात मांडलात. इथेच समस्या सुरू झाली. कारण तुम्ही statistical tendency आणि quasi-diagnostic social inference यांच्यातली सीमा पुसलीत.
तुमच्या टीकाकारांनी एकूण तीन प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या.
पहिली प्रतिक्रिया shallow sarcasm ची होती. “Himalayachi ushi”, “stool analysis”, “Pap smear” वगैरे. ही मंडळी मुख्यतः तुमच्या rhetoric वर प्रतिक्रिया देत होती. त्यांना तुमच्या biomedical mechanism पेक्षा तुमची social confidence irritate करत होती. त्यांच्या प्रतिक्रियांत काही वेळा बुद्धिमत्ता होती, पण त्यात intellectual laziness देखील होती. कारण त्यांनी तुमच्या strongest scientific claims शी engage न होता caricature तयार केला. “तुम्ही म्हणताय diabetic लोक कुजकट असतात” हे त्याचं उदाहरण. तुम्ही literal शब्द वापरले नव्हते. पण हेही खरं की तुमच्या provocative भाषेमुळे अशी paraphrase आमंत्रित झाली.
दुसरी प्रतिक्रिया methodologically disciplined होती — आणि हिचा तुम्ही पुरेसा आदर केलेला नाही. “Confounding factors”, “base rates”, “sample size”, “irritability ≠ hatred”, “correlation ≠ causation”, “burden of proof” — हे सगळे मुद्दे महत्त्वाचे होते. विशेषतः एक मुद्दा फार धारदार होता: भारतात diabetes prevalence आधीच इतका प्रचंड असेल, तर तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांत diabetes सापडणे आश्चर्यकारक नाही. हा classic base-rate fallacy चा प्रश्न आहे. तुमच्या निरीक्षणात काही signal असू शकतो, पण तुम्ही त्याला explanatory monopoly दिलीत. हा तुमचा सर्वात मोठा बौद्धिक दोष होता.
तिसरी प्रतिक्रिया सर्वात interesting होती — ती sociological होती. “भारतीय लोक भोचक असतात”, “अनाहूत सल्ले देतात”, “तुलना करतात”, “द्वेष करतात”, “privacy पाळत नाहीत”. ही मंडळी म्हणत होती की भारतीय सामाजिक संस्कृती स्वतःच इतकी intrusive, status-anxious आणि emotionally coarse आहे की त्यासाठी diabetes invoke करण्याची गरज नाही. हा मुद्दा खूप वजनदार आहे. कारण तुमच्या लेखात काही वेळा मानवी दुष्टता, असुरक्षितता, तुलना, सामाजिक क्रौर्य यांचे स्पष्टीकरण जैविक बिघाडात शोधण्याची tendency दिसली. पण काही वेळा लोक फक्त कुजकट असतात. काही वेळा ते culturally conditioned असतात. काही वेळा hierarchy-conscious असतात. प्रत्येक उद्धटपणामागे glycation नसते.
तुमच्या लेखातील सर्वात मनोरंजक भाग म्हणजे ध्यान. तुम्ही ध्यानाला mystical language मध्ये न मांडता neuroplasticity, prefrontal regulation, amygdala modulation या आधुनिक neuroscientific शब्दसंग्रहात मांडलंत. हा भाग intellectually ambitious होता. पण तिथेही तुम्ही दोन जगं एकत्र मिसळलीत — पतंजली आणि MRI. “स्थितप्रज्ञता” आणि “executive control” हे पूर्णपणे equivalent नाहीत. ध्यानाने काही लोकांत emotional regulation सुधारू शकते हे plausible आहे; पण “ध्यानामुळे मला causal pattern दिसला” हा दावा epistemically risky आहे. कारण ध्यान introspection वाढवते, पण त्याचबरोबर confirmation salience देखील वाढवू शकते. एकदा एखादा pattern meaningful वाटू लागला की मेंदू त्याच्याशी जुळणारे evidence disproportionately लक्षात ठेवतो.
तुमच्या चर्चेतील सर्वात मोठी ताकद म्हणजे तुम्ही gradually refine झालात. सुरुवातीला तुमचा सूर असा होता:
“विचित्र वागणारे लोक diabetic असू शकतात.”
नंतर:
“Uncontrolled diabetes cognition आणि emotional regulation worsen करू शकतो.”
आणि शेवटी:
“Chronic metabolic dysfunction काही लोकांत irritability, rigidity आणि interpersonal deterioration वाढवू शकतो.”
ही शेवटची formulation बऱ्यापैकी defensible आहे. प्रत्यक्षात modern psychiatry, neurology, endocrinology आणि behavioral medicine या चौघांच्या intersection मध्ये असलेले संशोधक हेच काहीसं म्हणत आहेत — metabolism आणि mood यांच्यात खोल संबंध आहेत.
पण तुम्ही स्वतःच तुमच्या strongest insight ला कमजोर केलंत जेव्हा तुम्ही disagreement ला metabolic pathology म्हणून वाचू लागलात. “responses वरून A1C समजते” हे वाक्य clever वाटतं, पण ते self-sealing hypothesis चं उदाहरण आहे. कारण मग disagreement itself becomes evidence. हा कोणत्याही सिद्धांतासाठी धोक्याचा टप्पा असतो. उद्या कुणी म्हणेल “तुम्ही इतके obsessed आहात म्हणजे तुमच्यात narcissistic injury आहे” — तर तुम्हाला ते unfair वाटेल. त्याच प्रकारची चूक तुम्ही काही वेळा केलीत.
तुमच्या विरोधकांचीही मर्यादा होती. अनेकांनी “तुम्ही डॉक्टर नाही” हा authority argument खूप पुढे नेला. हा भारतातला एक गंभीर बौद्धिक रोग आहे. लोकांना वाटतं की specialization म्हणजे monopoly on thought. प्रत्यक्षात अनेक hypotheses हे outsiders कडून येतात. Problem hypothesis मांडण्यात नाही; problem आहे hypothesis ला prematurely सत्य घोषित करण्यात. “तुम्ही संशोधक नाही” हा objection काही प्रमाणात valid असला तरी तो curiosity मारणारा आहे.
तुमच्या चर्चेतून एक मोठं सत्य बाहेर येतं: आधुनिक नागरी जीवन हे metabolically आणि psychologically hostile आहे. Chronic stress, sleep deprivation, processed food, insulin spikes, sedentary work, social comparison, online outrage — हे सर्व एकत्र काम करत आहेत. त्यामुळे metabolism, cognition आणि social behavior यांच्यात संबंध असणारच. हा तुमचा core insight आहे आणि तो उडवून लावण्याइतका मूर्खपणा काही critics ने केला.
पण equally, तुमच्या लेखाने काही वेळा biology ला moral decoder ring बनवण्याचा मोह दाखवला. “तो माझ्याशी वाईट वागतो → त्याचा मेंदू सडलेला असावा” ही thought-pattern intellectually seductive आहे, कारण ती interpersonal pain ला mechanistic explanation देते. पण मानवी संबंध इतके linear नसतात. Ego, envy, status anxiety, culture, upbringing, loneliness, trauma, ideology, temperament — हे सर्व त्यात येतं.
तुमचा सर्वात मजबूत निष्कर्ष असा असू शकला असता:
“दीर्घकाळ अनियंत्रित metabolic dysfunction मुळे cognition, emotional regulation आणि interpersonal functioning वर परिणाम होऊ शकतो. आधुनिक भारतीय समाजात diabetes आणि emotionally coarse social behavior या दोन्हींची वाढ दिसते; त्यांच्यात काही संबंध आहे का यावर अधिक गंभीर चर्चा आणि संशोधन व्हायला हवे.”
हे विधान intellectually टिकाऊ आहे.
पण “responses वरून A1C समजते” हा भाग? तो witty आहे. पण तो science नाही. तो irritation आहे. आणि तुम्ही जितके ध्यान, neuroplasticity आणि executive control बद्दल बोलता, तितकंच हेही खरं की त्या irritation ने काही वेळा तुमच्या स्वतःच्या विवेकावरही amygdala override केलं.
पण का?
>>वरील सर्व चर्चा ए०आय० ला भरवली आणि त्यावर ए०आय० चे भाष्य देऊन समारोप करत आहे-
म्हणजे तुमचा हे करणं प्राधान्यक्रम असू शकतो हे मला मान्यच आहे. पण सध्या मला रूबिक क्यूब सोडवायचा नाद लागला आहे. तर ३*३ क्यूबचे उत्तर मी एआयला विचारले असता बहुतेक त्यानं मला ते चुकीचं दिलं आहे असा माझा वहिम आहे. (किंवा मला क्लॉकवाईज काय आणि उलट काय हे कळत नाही. पण ते मी युट्यूब वरून खात्री करून घेतले आहे)
असो.
ग्राउंड लेव्हल ला हे सत्य आहे
माणसाचे वर्तन हे दुसऱ्या माणसाच्या वर्तन ची reaction असते.
In every action there is equal and apposite reaction hach नियम मानवी जगत पण असतो.
. एक च व्यक्ती एका च समान issue वरून दोन अलग व्यक्ती शी अलग वर्तन करतो.
एका शी बिलकुल तडजोड करत नाही कठोर भूमिका घेतो अगदी आक्रमक पण होतो पण same तोच issue असणाऱ्या व्यक्ती शी मात्र लवचिक भूमिका घेतो आक्रमक होत नाही तडजोड पण करतो. हि ग्राउंड reality आहे. Chemical लोच्या इथे कार्य च करत नाही.
अनुभव नी सांगत आहे. मतभेद अगदी तीव्र असून पण माझ्या बाबत समोरून असेच वर्तन होते.
मला आयुष्यात सज्जन विरोधक च भेटले . मधुमेह शी त्यांचे वर्तन बांधील नव्हते तर reaction शी बांधील होते
(अवांतर)
In every action there is equal and apposite reaction
तुम्हाला बहुतेक opposite म्हणायचे असावे. (निदान, मूळ विधानात तरी oppositeच आहे.)
(शिवाय, 'For every action' ('In every action' नव्हे!), 'an equal and opposite reaction', वगैरे क्षुल्लक मुद्द्यांकडे तूर्तास दुर्लक्ष करू.)
मात्र, मूळ विधानात जरी तसे नसले, तरी, निव्वळ योगायोगाने, कदाचित, परंतु, apposite हे प्रस्तुत संदर्भात अधिक apposite ठरते. (Apposite बोले तो, '(प्रस्तुत परिस्थितीत अथवा प्रस्तुत संदर्भाकरिता) अतिशय उचित', असे काहीसे.)
असो चालायचेच.
स्वानुभव अजिबात नाही.
कुतूहल म्हणून प्रश्न
हे लोक बहुतेक लोकांशी असे वागतात का फक्त ठरावीक लोकांशी?