सूचना
सध्यापुरतं अपडेटचं काम झालेलं आहे. याचे कुठलेही दृश्य बदल नाहीत.
दिनवैशिष्ट्य
८ डिसेंबर
जन्मदिवस : कवी होरेस (६५), पथदर्शी सिनेदिग्दर्शक जॉर्ज मेलिए (१८६१), शिल्पकार कामिय क्लोदेल (१८६४), संगीतकार जीन सिबेलियस (१८६५), चित्रकार दिएगो रिव्हेरा (१८८६), अभिनेता धर्मेंद्र (१९३५), क्रिकेटपटू हेमंत कानिटकर (१९४२), 'डोअर्स'चा गायक व संगीतकार जिम मॉरिसन (१९४३), अभिनेत्री शर्मिला टागोर (१९४४), गायिका शिनीड ओकॉनर (१९६६)
मृत्युदिवस : गणितज्ञ जॉर्ज बूल (१८६४), 'बीटल' जॉन लेनन (१९८०)
---
विश्व हवामान दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - रुमानिया, उझबेकिस्तान.
१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४१ : ज्यूंचे शिरकाण - लॉद्झजवळील चेल्म्नो कंन्संट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
१९७६ : 'इगल्स' रॉक ग्रूपचे विख्यात गाणे 'हॉटेल कॅलिफोर्निया' प्रदर्शित झाले.
१९८० : 'बीटल' जॉन लेननची हत्या.
१९८७ : शीतयुद्ध : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्यामध्ये अण्वस्त्रसाठा कमी करण्याविषयी ऐतिहासिक करार.
१९९१ : रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोव्हिएत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- अबापट
५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन (sic)
'आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन' की 'आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायविरोध दिन'?
बोले तो, आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायाला विरोध आहे (पक्षी: राष्ट्रांतर्गत वेश्याव्यवसाय चालेल), की वेश्याव्यवसायाला आंतरराष्ट्रीय विरोध आहे?
(अर्थाचा अनर्थ होतो हो! जरा जपून लिहा की.)
असो, हेही दिवस जातील.
गॉसिनी
खरे तर हे "'ॲस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी एक" असे पाहिजे. परंतु, त्याहूनही मोठी घोडचूक म्हणजे, 'ॲस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी, गॉसिनी हा चित्रकार (कधीही) नव्हता. गॉसिनीने स्वत:स पूर्णपणे 'ॲस्टेरिक्स'च्या कथा-संवाद-शब्दांकन यांना वाहून घेतले होते, तर सहजनक उदेर्झो हा चित्रकार होता; (निदान सुरुवातीच्या काळात तरी) चित्रे काढण्याचे खाते पूर्णपणे उदेर्झोकडे होते, नि उदेर्झोने चित्रे काढण्यास स्वत:स पूर्णपणे वाहून घेतलेले होते.
(पुढे गॉसिनी अकाली नि अचानक वारल्यानंतर, चित्रे काढण्याबरोबरच कथा-संवाद-शब्दांकन यांचीसुद्धा धुरा उदेर्झोच्या खांद्यांवर येऊन पडली.)
सारांश, गॉसिनी हा चित्रकार कधीही नव्हता. अर्थात, 'दिनवैशिष्ट्यां'मधील गलथानपणा हे आता 'ऐसी'चे वैशिष्ट्य झालेले आहे; त्यात आश्चर्यजनक असे काहीही वाटत नाही. परंतु, फ्रेंच गोष्टींमध्येसुद्धा असला गलथानपणा व्हावा, ही मात्र आश्चर्याची बाब आहे.
आभार. ही दुरुस्ती आता केली
आभार. ही दुरुस्ती आता केली आहे.
…
दखल घेतली गेली, याबद्दल परमेश्वराचे आभार आहेत!
- रेखाटनकार: चेक.
- लेखक: चेक. (मात्र, मूळ लेखक रेने गॉसिनीच्या अकाली मृत्युपशचात, उर्वरित मालिकेकरिता.)
(अवांतर: या मालिकेच्या दोन्ही मूळ जनकांच्या (रेने गॉसिनीच्या तथा आल्बेर (आल्बेर्तो?) उदेर्झोच्या) मृत्युपश्चातसुद्धा ही मालिका अद्याप चालू आहे. उदेर्झोने त्याच्या वृद्धापकाळी, त्याच्या मृत्यूच्या काहीच वर्षे अगोदर, या मालिकेची धुरा एका पूर्णपणे नव्या (तथा तरूण) लेखक-रेखाटनकार जोडगोळीच्या खांद्यांवर सोपविली, तथा या मालिकेतून आपले अंग पूर्णपणे काढून घेतले. त्यामुळे, आता वेगळेच लोक ही मालिका चालवितात. (तो दर्जा, ती उत्स्फूर्तता आता राहिली नाही, परंतु तरीही, काहीकाही अंक अजूनही चांगले आहेत; नव्हे, उत्कृष्ट आहेत. परंतु, आता it’s a hit or a miss. अर्थात्, उदेर्झोच्या कारकीर्दीतसुद्धा अखेरीअखेरीस हे होऊ लागले होतेच म्हणा. चालायचेच. कालाय तस्मै नमः!)
(अतिअवांतर: ही मालिका मुळात फ्रेंचमध्ये आहे. त्यात पुन्हा मध्यंतरी या मालिकेचे इंग्रजीत (उत्कृष्ट) रूपांतर करणारे मूळ (ब्रिटिश) भाषांतरकारसुद्धा निधन पावले. (Anthea Bell & Derek Hockridge.) तशी फारा वर्षांपूर्वी Robert Steven Caron नावाच्या एका इसमाने या मालिकेची अमेरिकन-इंग्रजी आवृत्ती काढण्याचासुद्धा प्रयत्न केला होता, म्हणा; परंतु, (अमेरिकनांच्या सदभिरुचीच्या अभावामुळे) ती आवृत्ती फारशी न चालल्याकारणाने बंद पडली. तसाही त्या आवृत्तीचा दर्जा ब्रिटिश भाषांतरांच्या तुलनेत अगदीच सुमार होता. अलीकडे (या मालिकेची धुरा नवोदितांच्या खांद्यांवर पडल्यानंतर) पुन्हा या मालिकेस नवे इंग्रजी (ब्रिटिश तथा अमेरिकन) भाषांतरकार लाभले आहेत. (नव्या अंकांची) ब्रिटिश भाषांतरे (जुन्या ब्रिटिश भाषांतरकारांची सर कदाचित नसली, तरीही) अद्यापही सरस आहेत; उलटपक्षी, (जुन्या तथा नव्या अंकांच्या) नव्या अमेरिकन भाषांतरांचा दर्जा कित्येक पटींनी सुधारला जरी असला, तरीही, (जुन्या किंवा नव्या) ब्रिटिश भाषांतरांची सर त्यांना नाही.)
धागा!!
'न'बांच्या नावाचा धागा बघून कित्ती कित्ती आनंद झाला म्हणून सांगू!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कित्ती कित्ती
नबा कित्ती कित्ती ज्ञानी आहेत नै? चक्क, ऐसीला त्यांच्या सूचनेप्रमाणे दुरुस्ती करावी लागली!
उच्चार: शंका
अधोरेखित शब्द हा Joãoच्या देवनागरी ट्रान्सलिटरेशनचा प्रयत्न असावा, अशी शंका येते. (चूभूद्याघ्या.)
तसे असल्यास:
१. रोमन लिपीतील Jचा उच्चार स्पॅनिश नियमांप्रमाणे 'ह' असा होतो खरा; परंतु, तसा तो (शेजारच्याच प्रदेशातली भाषा असली, तरीही) पोर्तुगीजमध्येसुद्धा होतो काय? (माझ्या कल्पनेप्रमाणे होत नसावा. पोर्तुगीज नियमांप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे, त्या नावाचा उच्चार 'जुआंव' असा व्हावा. (चूभूद्याघ्या. याबद्दल अधिक तपास करून खात्री करून घ्यावी लागेल. ãचा उच्चार सानुनासिक व्हावा.))
२. उलटपक्षी, (त्यापूर्वी पोर्तुगाल हे स्पेनचे अंकित राष्ट्र असल्याकारणाने) स्पॅनिश नियमांप्रमाणे ट्रान्सलिटरेशन केले असावे, म्हणावे, तर हे अनेक कारणांकरिता शक्य नाही.
२अ. रोमनच्या स्पॅनिश आवृत्तीत ã असे अक्षरचिन्ह नाही. रोमनच्या स्पॅनिश आवृत्तीत nच्या डोक्यावर टिल्डा (~) बसू शकतो (जसे: ñ, उच्चारी: न्य.); मात्र, (पोर्तुगीज आवृत्तीप्रमाणे) aच्या टाळक्यावर तो बसू शकत नाही. (उलटपक्षी, पोर्तुगीज आवृत्तीत तो स्पॅनिश आवृत्तीप्रमाणे nच्या मस्तकावर आरोहण करू शकत नाही; मात्र, aकरिता तो शिरोधार्य असू शकतो, नि अनुनासिकासमान ठरतो.)
२ब. पोर्तुगीजमधील João या नावाचे स्पॅनिशमध्ये Juan (उच्चारी: हुआन) असे रूपांतर होते. त्यामुळे, स्पॅनिश नियमांप्रमाणे लिहायचे अथवा ट्रान्सलिटरेट करायचे असते, तर हे नाव Juan असे लिहावे (तथा हुआन असे ट्रान्सलिटरेट करावे) लागले असते. (स्पॅनिशमधील Juan, पोर्तुगीजमधील João, इंग्रजीतील John, फ्रेंचमधील Jean (उच्चारी: जाँ? चूभूद्याघ्या; याबद्दल येथील फ्रेंचतज्ज्ञच खात्रीलायक काय ते सांगू शकतील.), जर्मनमधील Johann (उच्चारी: योहान), अरबीतील यूहन्ना अथवा याह्या, ही सर्व एकाच नावाची विविध भाषांतील रूपे आहेत. अधिक माहितीसाठी येथे तथा येथे पाहा.)
सांगण्याचा मतलब, होआव हे कोठल्याही परिस्थितीत निखालस चुकीचे आहे. सबब, कृपया अधिक तपास करून दुरुस्त करणार काय?
जुआंव!
उच्चार 'होआव' असा होत नसून, 'जुआंव' असा काहीसा होत असावा, असे वाटते.
(तसेही, रोमी लिपीतील Jचा उच्चार पोर्तुगीजमध्ये स्पॅनिशातल्याप्रमाणे 'ह' असा होत नसून, काहीसा फ्रेंचमधल्या 'ज'सारखा होत असल्याचे कळते. (चूभूद्याघ्या.))
इजा झाला, बिजा झाला, तिजा…
यापूर्वी २०१४मध्ये एकदा आणि २०१८मध्ये दुसऱ्यांदा सांगून झालेले आहे; आज तिसऱ्यांदा सांगतोय: ‘कैद-ए-आझम’ नव्हे, ‘काइद-ए-आझम’ किंवा ‘कायदेआझम’.
दुरुस्तीची (किंवा, नपक्षी, जमत नसल्यास हे सदर कायमचे बंद करण्याची) अपेक्षा अर्थातच खूप पूर्वी सोडून दिलेली आहे.
मला तरी “कायदेआझम” हाच शब्द
मला तरी “कायदेआझम” हाच शब्द माहीत आहे.
२०३२?
आता चवथ्यांदा २०३२ मध्ये सांगा!
.
नाही, तशी गरज नाही.
ती दुरुस्ती (कधी नव्हे ती) मागे कधीतरी करण्यात आली.
लुई पाश्चर
लुई पाश्चरचा आज २००वा वाढदिवस. या निमित्तानं मटामध्ये पाश्चर आणि लिस्टर यांच्या मैत्रीबद्दल आलेला लेख -
मानवी सुरक्षेची वैज्ञानिक मैत्री
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
‘मानवी सुरक्षेची वैज्ञानिक मैत्री’ हे काय मराठी आहे का?! तळवलकर हयात असते तर तळमळले असते. वारल्यानंतर त्यांचं दफन केलं असतं तर कबरीत गडबडा लोळले असते.
जास्त बरा उच्चार ‘पास्तर’, पण ते एक राहू द्या.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मास्तर...
हो ते शीर्षक इंग्लिशमध्ये दवणीय विचार करून, मग चाट गणपतीला विचारून लिहिल्यासारखं वाटलं खरं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Hagia Sophia चा उच्चार हाया
Hagia Sophia चा उच्चार हाया सोफिया असा होतो तसाच तो लिहिला जावा.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
त्याहीपेक्षा मूलभूत…
आयासोफ्या (हल्लीच्या तुर्की उच्चारानुसार(?); चूभूद्याघ्या.) बांधून पूर्ण झाले तेव्हा इस्तंबूलला इस्तंबूल म्हणत नसावेत बहुधा.
(पण लक्षात कोण घेतो?)
चट्टग्राम
चट्टग्राम.
(इन एनी केस, ‘चितगाव’ नव्हे.)
१९ जानेवारी १९९०
काश्मीरमधील लाखो भारतीय हिंदूंची क्रूर हत्या, बलात्कार, जाळपोळ, लूट...
ऐसी आजचे दिनवैशिष्ट्य यात उल्लेख आहे का?
मॅक्डॉनल्ड्स…
कालच्या ‘दिनवैशिष्ट्यां’त पुढील बातमी होती:
आजच्या ‘दिनवैशिष्ट्यां’त पुढील बातमी आहे:
यावरून पुढील प्रश्न निर्माण होतात:
१. ३० जानेवारी १९९० रोजी उघडलेले रशियातील पहिलेवहिले मॅक्डॉनल्ड्स हे मॉस्कोव्यतिरिक्त इतरत्र उघडले होते काय?
२. त्याच्याच पुढच्या दिवशी, ३१ जानेवारी १९९० रोजी, मॉस्कोतसुद्धा (मॉस्कोतील पहिलेवहिले) मॅक्डॉनल्ड्स उघडले काय?
बाकी, मॅक्डॉनल्ड्सला ‘मॅकडोनाल्ड्स’ म्हणणाऱ्या/रीच्या बैलाला घो! (नशीब ‘मॅकडोलांड’ लिहिले नाही!)
पण आमी मॅक्डोनाल्ड्सच म्हणतो,
पण आमी मॅक्डोनाल्ड्सच म्हणतो, होय कनाय रे शंकऱ्या!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
Old Mc'Donalds ....
इआय इआय ओ! हेच का ते ? शेतात बटाटे उगवणारे ?
पार्सिंग/वाक्यरचना…
ट्रकमध्ये स्फोटके तमिळ अतिरेक्यांनी कोलंबोमध्ये भरली, हे व्यवस्थित कळले. परंतु,
१. ट्रक उडवला नक्की कोणी?
२. ज्या सेंट्रल बँकेच्या दारात ट्रक उडवला, ती सेंट्रल बँक नक्की कोणत्या गावची?
...
टायरमध्ये हवा जॉन डनलॉपने भरली, हे ठीक. पेटंट नक्की कोणी दाखल केले?
(तसेही, जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरात असे नक्की काय विशेष आहे, की त्याकरिता कोणी पेटंट घ्यावे?)
५ फेब्रुवारी
अभिषेक बच्चन ही इतकी महत्त्वाची व्यक्ती आहे काय, की जेणेकरून त्यांच्या जन्मदिवसाची 'दिनवैशिष्ट्यां'त नोंद व्हावी?
(उलटपक्षी, याच तारखेस नि आजच झालेल्या श्री. परवेज़ मुशर्रफ यांच्या निधनाची 'ऐसी'ने दखल घेतलेली दिसत नाही. चालायचेच.)
पुण्यस्मरण
लता मंगेशकर
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
कॉमनवेल्थ
राष्ट्रकुल.
बाकी चालू द्या.
ष
घोषाल.
बाकी चालू द्या.
मुत्सद्दी नाना फडणवीसांची आज
मुत्सद्दी नाना फडणवीसांची आज पुण्यतिथी.
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमधले ते अर्धे शहाणे होते म्हणे ...
(पुणे तिथे काय उणे?)
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
?????
?????
काय घडले?
आदरांजली
मी आत्ताच ही बातमी वर्तमानपत्रात वाचली.
तीन एक वर्षापूर्वी त्यांनी लोकसत्ताच्या बुकमार्क सदरात हरारीच्या पुस्तकांवर लिहिलेले परिक्षण लक्षातर राहिले होते. माझे पुस्तक वाचून झाल्यावर अलिकडेच (काही आठवड्यांपूर्वी) ते लेख मी पुन्हा शोधून वाचले होते.
राहूल बनसोडे व मी एका आयटी
राहूल बनसोडे व मी एका आयटी कंपनीत एकत्र काम केले होते. त्यावेळी त्याचे लिखाणाचे गुण माहीत नव्हते. आदरंजली.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
?
हे वाक्य अत्यंत मोघम आहे.
‘हक्क लादला’ म्हणजे नक्की काय केले?
??
समभाग??????
बोले तो, बाँब टाकून नाटोने युद्धाचे शेअर्स विकत घेतले काय?
(बहुधा सहभाग म्हणायचे असावे. परंतु, अर्थात, ‘ऐसी’कडून याहून बऱ्याची अपेक्षा नाही.)
(आणि आम्हीदेखील कसले दळभद्री! संध्याकाळची चढविल्यावर१ आम्हाला असल्याच गोष्टी प्रकर्षाने, पहिल्याप्रथम, लख्ख दिसतात.)
—————-
१ बोले तो, आम्ही रोज संध्याकाळी चढवीत नाही. (नाहीतर ‘दिनवैशिष्ट्य’कारांची धडगत नव्हती!) परंतु, जेव्हा केव्हा संध्याकाळी चढवितो, तेव्हा असल्या घोडचुका प्रकर्षाने जाणवितात! (शुद्धीत असतानासुद्धा जाणवितात; परंतु, शुद्धीत असताना क्वचित्प्रसंगी आम्ही त्यांजकडे दुर्लक्षसुद्धा करू शकतो. परंतु, चढविलेली असताना? Absolutely no tolerance!) (अर्थात, Not that I owe anybody an explanation, परंतु तरीही.)
!!!
अगोदर एकदा लक्षात आणून देऊनसुद्धा ही भयंकर घोडचूक अद्याप दुरुस्त करण्यात आलेली नाही. काय म्हणावे?
(या दराने, कदाचित, ही चूक दुरुस्त होण्याअगोदर आमची गेलेली श्रेणिसुविधा परत येईलसुद्धा; कोणी सांगावे?)
?
ही 'दिनवैशिष्ट्यां'त दखल घेतली जाण्याच्या लायकीची बातमी नक्की काय म्हणून गणली जाते?
सॅमसोनाईट
दिनवैशिष्ट्यांमधून हा उल्लेख वगळलेला दिसतो.
काहीही असले तरी सॅमसोनाईटच्या त्या प्रकल्पात कामाला असलेल्या ऐसीकरांनी तिथे काम करताना आलेल्या अनुभवांवर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल.
टिनटिन’चा जनक
'एर्जे', नव्हे काय?
या सद्गृहस्थाचे खरे नाव जॉर्जऽ रेमी (Georges Remi); आद्याक्षरे (उलट्या अनुक्रमाने) RG ((फ्रेंचमध्ये) उच्चारी एर् जे), म्हणून याचे टोपणनाव एर्जे. (बेल्जियन सद्गृहस्थ; फ्रेंचभाषक.) इतका साधा मामला आहे हा.
फ्रेंच उच्चारांच्या बाबतीतसुद्धा 'ऐसीअक्षरे'च्या 'दिनवैशिष्ट्यां'त घोडचुका होऊ लागल्या, बोले तो लानत आहे. संबंधितांकरिता शरमेची बाब आहे. (उद्या त्या दुसऱ्या सुप्रसिद्ध (काल्पनिक) फ्रेंचभाषक बेल्जियन सद्गृहस्थाचे नाव 'पॉयरॉट' म्हणून लिहाल! काही सांगवत नाही.)
असो चालायचेच.
(खरे तर 'टिनटिन' म्हणजेसुद्धा मुळात (फ्रेंचमध्ये) 'तँतँ'; परंतु, इंग्रजीभाषक जगतात त्याचा 'टिनटिन' हाच उच्चार प्रचलित असल्याकारणाने चालून जाते.)
सर्वांना
सर्वांना
नवरात्रीच्या शुभेच्छा !
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
'शनाल'??????
Chanelमधल्या eचा उच्चार 'आ' फ्रेंचच्या नक्की कोणत्या नियमानुसार व्हावा बरे?
फ्रेंचमध्ये eचा उच्चार 'आ' होण्याकरिता गेला बाजार त्या eपुढे एखादे अनुनासिक कडमडावे लागत नाही काय?
----------
इथे पाहा. उच्चार 'कोको शनेल' असा असल्याचे म्हटले आहे.
आभार. आता दुरुस्ती केली आहे.
आभार. आता दुरुस्ती केली आहे.
!
“ॲलिस इन द वंडरलँड” नव्हे हो; “ॲलिस इन वंडरलँड”!
सकाळीसकाळी एखादा पिसाळलेला भारतीय मनुष्य चावला काय?
(खरे तर Alice’s Adventures in Wonderland; परंतु, संक्षेपात Alice in Wonderland चालते.)
१९७१ : नाईल नदीवरच्या आस्वान
दिनविशेषात एवढंच दिसतंय. या धरणाचं १५ जानेवारीला १९७१ ला काय झालं?
चोप्य-पस्ते
१९७१ : नाईल नदीवरच्या आस्वान धरणाचे लोकार्पण.
इथे जानेवारी महिन्यातल्या सगळ्या दिवसांचं दिनवैशिष्ट्य दिसेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कारण!
कोसळले, की डोंगरावर जाऊन आदळले? (अर्थात, डोंगरावर जाऊन आदळल्यावर gravity would have taken its course आणि विमान त्यानंतर कोसळले असणारच, परंतु, 'म्हशीच्या मृत्यूचे कारण "मोटारीखाली सापडून"च्या ऐवजी "बुडून"' असे नोंदविले जाऊ नये, इतकेच.)
जो प्रकार घडला त्याला सीफिट
जो प्रकार घडला त्याला सीफिट असे म्हणतात. CFIT
Controlled flight into terrain.
आभार
अधिक तपशील देऊ शकाल काय?
इंजिनसहित सर्व उपकरणे
इंजिनसहित सर्व उपकरणे व्यवस्थित चालू असताना, सर्व कंट्रोल्स हातात आणि व्यवस्थित ऑपरेट होत असताना, विमानात कोणताही तांत्रिक दोष नसताना पायलटने विमान जमिनीवर आदळणे, पाडणे, पडू देणे, पडण्यास कारणीभूत होणे.
यात मोजण्यातील चूक, अंदाज चुकणे, इम्पल्सिव्ह निर्णय, थकवा आणि अनेक कारणे असू शकतात. या १९६६ वाल्या फ्लाईटबाबतीत पायलटला असे वाटले की माँ ब्लों (उच्चारी चुभूदेघे) पर्वत आपण पर केला आहे, आणि त्याने आधीच खाली उतरायला सुरुवात केली
दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि चिल्लरखुर्दा
प्रस्तुत अपघातानंतर पन्नासेक वर्षांनी सापडलेले अनपेक्षित अवशेष: https://www.bbc.com/news/magazine-26436090
. . .
अवांतर: Bizarrely, this was the second Air India crash in the same area. Sixteen years earlier another plane, a Constellation known as the Malabar Princess, had gone down on the mountain, also on its approach to Geneva. So the wreckage of two aircraft is scattered over the area.
'ब्रिटिश इंडिया ॲक्ट'??????
१९३५ साली पारित झालेल्या संबंधित कायद्याचे अधिकृत नाव 'गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९३५' असे होते ना? हा 'ब्रिटिश इंडिया ॲक्ट' कोठून आला?
दुसरे म्हणजे, या ॲक्टान्वये हिंदुस्थानला संघराज्याचा दर्जा कधीपासून मिळाला? हं, पुढेमागे कधीतरी 'फेडरेशन ऑफ इंडिया' स्थापित करण्याची तरतूद ('प्रस्ताव' म्हणा ना!) या कायद्यात होती खरी, परंतु प्रत्यक्षात ही तरतूद कधीच अंमलात आणली गेली नाही. विकीवरील माहितीनुसार:
(प्रत्यक्षात ही तथाकथित 'फेडरल' तरतूद हिंदुस्थानकरिता कशी 'पॉयझन पिल' होती, याचे विवेचन विकीवरच येथे वाचावयास मिळेल.)
(माझ्या त्रोटक नि ऐकीव माहितीप्रमाणे, 'पुण्याच्या मंडईत अंजिराचे भाव काय आहेत सध्या?' हा सुप्रसिद्ध प्रश्न पु.लं.नी
न.वि.गाडगिळांनान.चिं. केळकरांना याच 'फेडरेशन'च्या मुद्द्याच्या संदर्भात विचारला होता. असो.)आज स्वामी रामदेवचा मेणाचा
आज स्वामी रामदेवचा मेणाचा पुतळा तुसाड संग्रहालय, न्यूयॉर्क मध्ये लागणार. पहिले भारतीय सन्यासी ज्यांचा पुतळा संग्रहालयात लागणार. योगाच्या प्रसारात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान यासाठी.
अभिनंदन पटाईतकाका !!
अभिनंदन पटाईतकाका !!
लवचिकता
पुतळा कोणत्या आसनात आहे...?
बाकी पुतळा रामदेव बाबाच्या शरीरासारखा आणि भूमिकांसारखा लवचिक नसेल
बोथा
आँ!!!!!!
आम्ही तरी एफ. डब्ल्यू. डीक्लर्क असे कायसेसे नाव ऐकले होते ब्वॉ.
(हं, आता, हे डीक्लर्कमहोदय ब्लॅकफेस लावून हिंडत असल्यास कल्पना नाही — निदान, आमच्या तरी वाचनात तसे कधी आले नाही. मात्र, कितीही ब्लॅकफेसने झाकले, तरीही पांढरे कातडे उगवल्यावाचून राहात नाही, म्हणतात. असो चालायचेच.)
——————————
किंबहुना, ‘दिनवैशिष्ट्यां’तील वरील नोंदीत (अपेक्षेप्रमाणे) असंख्य घोडचुका आहेत. या संदर्भात योग्य माहिती (बरीचशी विकीवरून संकलित केलेली) पुढीलप्रमाणे:
- सर्वप्रथम, पी. डब्ल्यू. बोथा हे दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे श्वेतवर्णी राष्ट्राध्यक्ष किंवा अपार्थाइड राजवटीचे अखेरचे राष्ट्राध्यक्ष यांपैकी काहीही नव्हेत. अगोदर म्हटल्याप्रमाणे, दोन्ही मान(?) श्री. एफ. डब्ल्यू. डीक्लर्क यांना जातात.
- दुसरे म्हणजे, ३ फेब्रुवारी १९८९ रोजी श्री. पी. डब्ल्यू. बोथा यांनी जो राजीनामा दिला, तो राष्ट्राध्यक्षपदाचा नव्हे, तर केवळ (सत्ताधारी) पक्षाध्यक्षपदाचा. (खरे तर (विकीवरील माहितीप्रमाणे) ३ फेब्रुवारीला नव्हे, २ फेब्रुवारीला, परंतु ते असो. घोडचुकांच्या या मांदियाळीत एका दिवसाच्या एवढ्याश्या फरकाने काय फरक पडतो? सबब, तो फरक सोडून देऊ.) मात्र, राष्ट्राध्यक्षपदी ते कायम राहिले.
- त्यापुढे, मार्च १९८९मध्ये त्यांच्या पक्षाने राष्ट्राध्यक्षपदाकरिता श्री. डीक्लर्क यांची निवड केली; मात्र, त्या वेळेस श्री. बोथा यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडण्यास (राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास) नकार दिला; त्याचबरोबर, मार्च १९९०पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा आपला घटनादत्त अधिकार असल्याचाही दावा केला. त्यानंतर झालेल्या वाटाघाटींत, तडजोड म्हणून, श्री. बोथा यांनी सप्टेंबर १९८९मध्ये होणाऱ्या पुढील निवडणुकींपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहावे, आणि त्यानंतर ‘निवृत्त’ होऊन, श्री. डीक्लर्क यांना राष्ट्राध्यक्षपदी रुजू होऊ द्यावे, असे ठरले.
- मात्र, १४ ऑगस्ट १९८९ रोजी, काही राजकीय कुरबुरींच्या निमित्ताने, श्री. बोथा यांनी तडकाफडकी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला, आणि श्री. डीक्लर्क यांची सुरुवातीस हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून, आणि त्यानंतर महिन्याभराने नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. श्री. डीक्लर्क यांच्या राजवटीत पुढे हळूहळू अपार्थाइड शासनपद्धतीच्या समाप्तीस सुरुवात होऊन मतदान आणि निवडणुका सर्व वंशांच्या नागरिकांकरिता खुल्या झाल्या, आणि १९९४ साली झालेल्या पुढील निवडणुकीत श्री. नेल्सन मंडेला यांचा पक्ष बहुमताने निवडून येऊन श्री. मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले. आणि अशा रीतीने श्री. डीक्लर्क हे दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष तथा अपार्थाइड राजवटीखालील अखेरचे राष्ट्राध्यक्ष ठरले. (पुढे श्री. मंडेला यांच्या राजवटीत त्यांनी (श्री. थाबो म्बेकी यांच्यासमवेत) सह-उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काही काळ पदभार सांभाळला.)
असो चालायचेच.
विजेरी झुकझुकगाडी
त्यापूर्वी भारतातील रेल्वेगाड्या परदेशातून आयात केलेल्या विजेवर चालत होत्या काय?
१८ फेब्रुवारी (संकीर्ण)
विद्युत्घट (बॅटरी, किंवा खरे तर इलेक्ट्रिक सेल) या संकल्पनेचा शोध व्होल्टाने लावला, हे बरोबर. मात्र, आधुनिक बॅटरीमागील तत्त्व त्याने शोधले, असे म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?
व्होल्टाचे जे काँट्रॅप्शन होते, ते म्हणजे एका काचेच्या भांड्यात सल्फ्यूरिक ॲसिड, त्यात एक तांब्याची आणि एक जस्ताची काडी बुचकळलेली, नि त्या दोन काड्यांना तारा जोडलेल्या, असला प्रकार होता. (एकंदरीत, अवजड, आणि हिंडताना वगैरे बरोबर बाळगायला अत्यंत धोकादायक (सल्फ्यूरिक ॲसिडमुळे) असले प्रकरण होते ते.) आधुनिक विद्युत्घटाची संरचना तथा घटना (म्हणजे, घटक वगैरे) याहून पूर्णपणे वेगळी असते.
(अवांतर: एकच विद्युत्घट असेल, तर तो सेल. अनेक विद्युत्घट एकमेकांना (श्रेणीमध्ये किंवा समांतर) जोडले, तर जे बनते, ती बॅटरी.)
ही पाच शहरे म्हणजे नक्की कोणती?
पण… प्लूटो तर ग्रह नाही, म्हणून ठरले ना?
नावे सुचवा चढाओढ
पुण्यातून पर्वती, चतुःशृंगी, झालेच तर हनुमानटेकडी (आणि वाटल्यास तळजाईसुद्धा) वेगळी करून त्यांचे जर वेगळे शहर केले, तर त्याला काय नाव द्यावे बरे?
पुण्याची चौपाटी?
पुण्याची चौपाटी हे नाव कसं राहील?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किरकोळ बदल
किरकोळ बदल करुन पुणेरी पाटी असं नांव ठेवावं.
एकक?
५५५.३५ काय?
फूट? इंच? सेंटिमीटर? मैल? किलोमीटर? नॅनोमीटर? अंगुळे? योजने? प्रकाशवर्षे? नक्की काय?
वचन?
प्रस्तुत हिंदूचे नाव, गाव, पत्ता काही समजू शकेल काय?
आणि, फक्त एकाच (अनामिक) हिंदूवर लावला, तर त्याबद्दल आजतागायतसुद्धा इतकी बोंब का मारून राहिलेत हिंदुत्ववादी लोक?
की (चेन्नईच्या) ‘हिंदू’ वर्तमानपत्रावर लावला, असे म्हणायचे आहे? (तरीसुद्धा, ‘हिंदू’ वर्तमानपत्राचे मालक-चालक नि औरंगजेब, आपापसात पाहून घेतील ना काय ते! हिंदुत्ववाद्यांना काय पडलेय त्याबद्दल?)
भूस्थिर??????
१९ एप्रिल
‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह: बरोबर. (मी प्राथमिक शाळेत असताना ‘आज की ताज़ा ख़बर’ होती ही!)
‘रश्या’च्या साहाय्याने: ‘रश्या’ची आता सवय झाल्याकारणाने ‘रश्या’बद्दल खुसपट काढणार नाही, परंतु, तत्वतः, हे साहाय्य रशियाचे नसून सोविएत संघाचे होते. परंतु, तेही एक वेळ सोडून देऊ.
पण… पण… पण… हा उपग्रह भूस्थिर नव्हता हो!!! उगाच उत्साहाच्या भरात वाटेल ते ठोकून देऊ नका!!!
(नक्की खात्री नाही, परंतु भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह बहुधा १९८१ साली सोडलेला ‘ॲपल’ (APPLE - Ariane Passenger PayLoad Experiment) हा असावा. (चूभूद्याघ्या.))
——————————
आणखी दुरुस्ती: या उपग्रहाचे नाव, झालेच तर ज्या प्राचीन भारतीय गणिती-ज्योतिर्विदाचे नाव या उपग्रहास दिले गेले, त्या गणिती-ज्योतिर्विदाचे नाव, हे ‘आर्यभट्ट’ असे नसून ‘आर्यभट’ असे होते.
सायगॉन
३० एप्रिल
सायगाव??????
Saigon हे नाव संस्कृतोद्भव नसावे!!! (चिनी-उद्भव असण्याची शक्यता अधिक. (चूभूद्याघ्या.))
——————————
तसेच, Chittagongचे देवनागरीकरण ‘चितगाव’ करणारे डोक्यात जातात! (इंग्रजांची री ओढून) ‘चिट्टगाँग’ असे (अपभ्रष्ट) रूप न लिहिणे समजू शकतो, परंतु, ‘शुद्ध’ लिहिण्याची एवढीच जर का पडलेली असेल, तर मग एक तर (‘अधिकृत’ बंगालीतल्याप्रमाणे) ‘चट्टग्राम’ असे तरी लिहा, नाही तर मग (चट्टग्रामीय स्थानिकांप्रमाणे) ‘चाटगांव’ असे तरी लिहा. परंतु, हे ‘चितगाव’ काय आहे? (त्यापेक्षा मग ‘चिट्टगाँग’ काय वाईट?)
BTW
BTW
री ओढणे म्हणजे नेमके काय?
री नावाची ओढण्याजोगी अशी कोणती वस्तू असते की ती ओढल्यामुळे अनुकरण करता येते?
'री' बोले तो...
...'सारेगमपधनि'मधील 'रे' हा स्वर. (त्याला विकल्पाने 'री' असेही म्हणतात. ('रिषभ'चा संक्षेप?))
दात्यांच्या शब्दकोशातून:
काही का असेना, त्यानिमित्ताने
काही का असेना, त्यानिमित्ताने "दूधवाल्या सायकरा"ची आठवण आली! ".... पात्राला दोन आणे हा आता माझा दर आहे..." वगैरे वीकएंडला निवांतपणे "निष्काम साहित्यवाचन" करेन याचं!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
१९०१ : पं. विष्णू दिगंबर
आज सव्वाशे वर्षांनंतर (१२३ वर्षांनंतर, to be precise) त्या महाविद्यालयाची काय प्रगती आहे, कुणाला ठाऊक आहे का?
विकीवर याची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे, पण ठिकाण दिलेले नाही.
.
बहुधा फाळणीनंतर ते मिरजेस हलले. (चूभूद्याघ्या.) आजमितीस त्याच्या अवस्थेबद्दल कल्पना नाही.
..
‘गंधर्व महाविद्यालय’ की ‘गांधर्व महाविद्यालय’?
आम्ही ‘गांधर्व महाविद्यालय’ म्हणून ऐकले होते… (चूभूद्याघ्या.)
गान्धर्व महाविद्यालय अजुन
गान्धर्व महाविद्यालय अजुन चालू आहे. पुण्यात तरी चालू आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
२ जून १९६६चे मंगळयान???
हे कोठले?
व्हायकिंग-१ तर माझ्या आठवणीप्रमाणे १९७०च्या दशकाच्या मध्याच्या आसपास कधीतरी (१९७५? १९७६? नक्की साल नि तारीख विकीवर पडताळून सांगतो, परंतु बहुधा १९७६.) मंगळावर उतरले. बराच गाजावाजा झाला होता तेव्हा, मला चांगलेच आठवते. मी शाळेत होतो तेव्हा.
मग १९६६ साली उतरलेले हे मंगळयान कोठले? आणि, १९६६ साली बोले तो, चंद्रावर पहिला मानव १९६९ साली उतरला, त्याच्याही अडीच-तीन वर्षे अगोदर. मग त्याचा गाजावाजा कसा झाला नाही?
Something just doesn’t add up.
अधिक तपासाअंती…
अधिक तपासाअंती, १९६६ साली या तारखेला सर्व्हेयर-१ हे अमेरिकेचे (निर्मनुष्य) यान चंद्रावर उतरले (मंगळावर नव्हे!), असे कळते. ‘दिनवैशिष्ट्यां’चा अचूकतेचा कित्ता अर्थातच गिरविण्यासारखा आहे; नेहमीच राहिला आहे.
…
(तसेही, चंद्रावरसुद्धा उतरलेले हे पहिलेवहिले अवकाशयान नसून, चंद्रावर उतरलेले अमेरिकेचे पहिले अवकाशयान होय, असे कळते. त्याच्या चार महिने अगोदर सोव्हिएत संघाचे लुना-९ हे यान चंद्रावर उतरले होते. (लुना-९ हेसुद्धा चंद्रावर उतरलेले पहिलेवहिले अवकाशयान नसून, चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलेले पहिलेवहिले अवकाशयान म्हणता येईल. लुना-९च्या अगोदर सोव्हिएत संघाची नि अमेरिकेची अनेक अवकाशयाने चंद्रावर जाऊन कोसळली होती. असो चालायचेच.)
६२२ : प्रेषित महंम्मद पैगंबर
ला इलाह इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह.
शर्यत...
हं??????
मग त्याअगोदर दोन वर्षांपूर्वी, १९०७मध्ये, घडलेला हा प्रकार कोणत्या भावाने?
दुरुस्ती
दुरुस्तीबद्दल आभार.
गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा "चमत्कार"…
हा ‘चमत्कार’ एटीअँडटी या अमेरिकन टेलिफोन कंपनीने घडवून आणला (किंवा गेला बाजार स्पॉन्सर केला), अशी एक किंवदंता/(कॉन्स्पिरसी) थियरी तत्कालीन अमेरिकास्थित भारतीयांच्या गोटांतून प्रचलित होती.
(मोबाइलपूर्व जमाना होता तो. शिवाय, लँडलाइनवरूनसुद्धा, लाँग डिस्टन्स कॉलिंग/इंटरनॅशनल कॉलिंग (मराठीत: एसटीडी/आयएसडी) हे आजच्यासारखे स्वस्त नव्हते. त्यात पुन्हा एटीअँडटी, स्प्रिंट, तथा (आता दिवंगत) एमसीआय हे तीनच (प्रमुख) सेवादाते. (इतरही छोटेमोठे होते, परंतु ते रीसेलर होते.) त्यातला एटीअँडटीचा वाटा (मार्केट शेअर) सिंहाचा. अशा परिस्थितीत, अमेरिकेत राहणारा/री प्रत्येक भारतीय जर आपापल्या साप्ताहिक ‘इंडिया कॉल’वर ‘गणपतीने दूध पिण्याच्या चमत्कारा’ची (भारतीयांनाच साजेश्या उत्साहाने) चावूनचावून चर्चा करू लागला/ली, आणि त्यातून प्रत्येक कॉलची लांबी जर (कॉलवर दोन्ही बाजूंना असलेल्या व्यक्तींची संख्या गुणिले तीन मिनिटे) एवढी जरी वाढली, तरी त्यातून एटीअँडटी कंपनीचा रेव्हेन्यू तथा नफा किती वाढला असेल! शिवाय, knowing Indians, अशा चर्चा या काही तेवढ्या एका आठवड्यापुरत्याच मर्यादित नसणार, गेला बाजार काही आठवडे तरी चालत राहणार. त्यामुळे… चालायचेच.)
रोचक!
हे मला माहीत नव्हतं.
जग आपल्याभोवती फिरतं, कारण आपल्याकडे खूप पैसा आहे; असं मानणाऱ्या इलॉन मस्कला भारतीयांचा जोरदार पाठिंबा असावा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अतातुर्क
हे सद्गृहस्थ दररोज दिवसाकाठी अर्धा लिटर राकी रिचवायचे, म्हणे! त्यातून मग जे व्हायचे, तेच झाले — यकृत खराब होऊन सद्गृहस्थ वारले.
असो चालायचेच.
१९७७ : देवीरोगाचे उच्चाटन
आंतरराष्ट्रीय पातळीवर या संदर्भात खूप जोरदार तथा concerted प्रयत्न झाले.
१९७७ साली महाराष्ट्रात गावोगावी, खेड्यापाड्यांतून भिंतीभिंतीवर ‘देवीचा रोगी कळवा, १००० रुपये मिळवा’ असे (शासकीय) संदेश रंगविलेले असत, असे आठवते. (१००० रुपये ही रक्कम १९७७ साली खूपच मोठी होती.)
(अतिअवांतर: यावरून आठवले. महात्मा गांधी हे एक मोठे anti-vaxxer होते. “देवीची लस टोचून घेणे हे दुसऱ्याची ओकारी चाटण्याइतके गलिच्छ आहे; देवी हा रोग मुळात जंतुसंसर्गामुळे होतच नाही, तर पोटातील संतुलन बिघडल्यामुळे होतो; लसीकरण हे एक पाश्चिमात्य थोतांड असून खुद्द पाश्चिमात्य विचारवंतांचा त्यास विरोध आहे; सरकारने लोकांवर लसीकरण लादणे हे गर्हणीय असून, प्रत्येक जागरूक नागरिकाने त्याचा सविनय कायदेभंगाने विरोध केला पाहिजे, नि वेळप्रसंगी त्याकरिता तुरुंगात जाण्यास सज्ज राहिले पाहिजे” वगैरे वगैरे काहीबाही लिहून ठेवलेले आहे त्यांनी!
नाही म्हणजे, गांधीजींना एक थोर राजकीय नेता म्हणून आम्ही मानतो. परंतु, इतर अनेक क्षेत्रांत (अर्थकारण, आरोग्य, वगैरे) ते असे अक्कल गहाण टाकल्यासारखे का करायचे, ते समजत नाही. आणि, लोकांनीसुद्धा त्यांना नको तिथे ‘बापू वाक्यं प्रमाणम्’ म्हणून कसे काय उचलून धरले, याचेही आश्चर्य वाटते. असो चालायचेच. किंवा, ‘चलता है, हिंदुस्तान है’.)
ट्रंप्या, मंडेला, गोपीनाथ
ट्रंप्या, मंडेला, गोपीनाथ मुंडे, मेदेवदेव, सिरिमाओ बंदारनायके हे सगळे आणि ह्यांच्यासारखे लाखो पुढारी असेच लोक दिसले की काही पण बडबडायचे. गांधी वेगळे का असतील. आपण कोणी मोठे आहोत आणि आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असं वाटणं हीच तर पुढारीपणाची खूण!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अयोय्यो!
अयोय्यो! तुम्ही तर ही म्हणजे पार गाढवाची गांड करून टाकलीत. (बोले तो, गाढवाच्या गांडीत नाही का, काय/कोणी वाटेल ते शोधा, हमखास सापडते (कारण कोणी ना कोणी कधी ना कधी ते तेथे धाडलेले असतेच), तद्वत्. अत्यंत सर्वसमावेशक ठिकाण!) ट्रंप, मंडेला, नि गांधी (नि आणखी कोणकोण) एकसमयावच्छेदेकरून हजेरी लावून राहिले की हो!) चालायचेच.
ते ठीक आहे हो! इथे त्याहून वाईट प्रकार आहे. म्हणजे, इथे हे लोकांसमोर बडबडत नाहीयेत, तर संकीर्ण रोग आणि त्यांचे उपचार यावर पुस्तक लिहून बसलेत. नि त्या पुस्तकात देवीरोगावर एक आख्खे स्वतंत्र प्रकरण आहे.
आता तुम्ही म्हणाल, की आजकाल कोणी वाटेल तो सोम्यागोम्या — अगदी ‘फॉक्स न्यूज़’वरच्या शॉन हॅनिटी/(कै.) रश लिम्बॉ/ग्लेन बेक-प्रभृती गावगुंडांपर्यंत नि भडभुंज्यांपर्यंत (गावगुंड नि भडभुंजे यांची क्षमा मागून) — उठतो नि पुस्तक लिहितो, ‘बार्न्स अँड नोबला’त नाहीतर ‘ॲमेझॉन’वर (किंवा अगदीच तिथेही जर जमले नाही तर लेखकाच्या स्वतःच्या वेबसाइटीवर) ते काही महिने झळकते, नि मग यथावकाश सगळेजण (दस्तुरखुद्द लेखकापर्यंत) त्याबद्दल विसरून जातात, त्यापेक्षा हे वेगळे कसे? तर त्याला उत्तर असे, की जमाना बघा ना! छापील शब्दावर विश्वास ठेवण्याचा काळ होता तो! आजकाल पुस्तके किती जण विकत घेतात, विकत घेतलीच तर किती जण वाचतात, वाचलेच तर त्यात काय लिहिलेय ते किती जणांना समजते, समजलेच तर किती जणांना ते लक्षात राहते, नि लक्षात राहिलेच तर किती जण त्यावर विश्वास ठेवतात? माझ्या अंदाजाप्रमाणे खूपच कमी! (गावगुंडांची पुस्तके तर गावगुंडाचे खिसे भरण्यासाठी बकरे विकत घेत असावेत. नि गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ, अरुंधती रॉय, सलमान रुश्दी, झालेच तर अगदी एन रँड वगैरे असल्या तात्कालिक “लै भारी” कॅटेगरीतल्या लेखकांची पुस्तके चारचौघात सांगण्यासाठी, किंवा मग ‘नाहीतर लोक काय म्हणतील?’ या लोकलज्जेस्तव.)
दुसरी गोष्ट म्हणजे, उपरोल्लेखित गावगुंडांना त्यांच्या मर्यादित (उजव्या) इकोसिस्टमबाहेर कोण कुत्रा विचारतो? गांधीजींची तशी अवस्था होती काय?
सांगण्याचा मतलब, गावगुंडांकडून तशीही वेगळी अपेक्षा आम्ही करत नाही. गांधीजींकडून किमान जबाबदारीची (आमची) अपेक्षा अंमळ अधिक आहे, इतकेच.
(अर्थात, हा आमचा प्रॉब्लेम आहे, गांधीजींचा नव्हे, हे आगाऊ मान्य आहेच. अपेक्षांचे ओझे!)
…
(साधेच उदाहरण घ्या. इथेच बाजूला ‘तर्कतीर्थ’ नामक कोणीतरी ‘मेंदूचे आरोग्य आणि विवेक’ या विषयावर काही लेख पाडलेला आहे. कोणी तरी तो गंभीरपणे घेत आहे काय? फार कशाला, कोणी त्याकडे ढुंकून पाहत तरी आहे काय?
आता, हाच लेख जर गांधीजींनी पाडला असता, तर?
एक प्रयोग करून पाहा. (शक्यतो लेखकाच्या पूर्वपरवानगीने) तो लेख गांधीजींच्या नावाखाली फेसबुकावर डकवून पाहा. पाहा ‘लाइकां’चा धोधो पाऊस कोसळतो की नाही ते!
असो चालायचेच.)
गांधी फक्त एका गोष्टीसाठी
गांधी फक्त एका गोष्टीसाठी पटतात- ते म्हणजे, स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ते सर्वसमावेषक, सर्व घटकांच्या सहभागातून चाललेल्या आणि अहिंसक आंदोलनातून मिळेल या विचारासाठी.
बाकी, माझी मूळ प्रतिक्रिया अशा अर्थाने होती की जो जो पुढारपण आलं की ज्या विषयाची अक्कल नाही ते पण बोलावसं वाटतं आणि ते चालून जातं.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
+
नेमके! म्हणूनच म्हटले, राजकीय नेते म्हणून आम्ही त्यांना मानतो.
परंतु म्हणून, नको त्यात वाटेल ते?
खरे आहे म्हणा. दोष गांधींचाही नाही, आणि नको तिथे त्यांना उचलून धरणाऱ्या पब्लिकचाही नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, दोष आमच्या अपेक्षांचा आहे.
चालायचेच.
जम्मू-कश्मीर विलीनीकरण
“सब कुछ लुटा के होश में आए, तो क्या किया”?
(लंडन) ‘टाइम्स’
त्यापूर्वी काय करायचे?
(‘टाइम्स’बद्दल कल्पना नाही, परंतु इंग्लंडात वृत्तपत्रे माझ्या कल्पनेप्रमाणे गेला बाजार शिवाजीमहाराजांच्या काळापासून तरी अस्तित्वात असावीत. (कोणास ठाऊक, कदाचित त्याही आधीपासूनसुद्धा.) आता, ही वृत्तपत्रे जर हाताने छापीत असतील, तर कठीण आहे! बोले तो, हाताने रोज अश्या किती प्रती छापणार, नि त्या किती जणांपर्यंत पोहोचणार? म्हणजे, चौथ्या इष्टेटीचे सर्क्युलेशन तेव्हा मूठभर लोकांपुरतेच मर्यादित होते की काय?)
?
जाहीरनामा न काढता सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांबद्दल प्रस्तुत कायद्यात काहीच तरतूद नव्हती काय?
असो; हेही नसे थोडके. सुधारणा ही टप्प्याटप्प्यानेच होते, म्हणतात.
(तसेही, जाहीरनामा नक्की कोणी काढायचा (किंवा काढायचा नाही), सती जाणारीने, की मदत करणाऱ्यांनी, ते नीटसे समजले नाही.)
——————————
माझ्या मते, एका अधिकच्या स्वल्पविरामाने काम भागण्यासारखे आहे.
“१८२९ : लॉर्ड बेंटिकने जाहीरनामा काढून, सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला.”
(चूभूद्याघ्या.)