Skip to main content

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ६

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---

चिमणराव Mon, 10/12/2018 - 17:53

तिरशिंगराव, तुम्ही बदल करून दुपारी दिलेला फोटो परत गायब झाला आहे.
लेखात दिलेलल्या सर्व पायऱ्या चेक करा॥ अल्बम 'शेअर्ड अल्बम' दिसल्यावरच त्यातला फोटो क्लिक करून पुन्हा लिंक घ्यावी लागते.

तो फोटो फेसबुकवरून >>view full size >> address bar मधली लिंक वापरून >>

चिंतातुर जंतू Thu, 13/12/2018 - 17:54

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) जानेवारी १०-१७ दरम्यान होणार आहे. त्यासाठी सदस्यनोंदणी चालू झाली आहे. (अधिक तपशील इथे)

चिंतातुर जंतू Fri, 21/12/2018 - 13:26

चित्र संवाद भाग ५९ - अक्षरलेखनकार र. कृ. जोशी यांच्याविषयी
सहभाग - माधुरी पुरंदरे (अरुण खोपकर यांच्या लेखाचे अभिवाचन), प्रमोद रिसवडकर, प्रसन्न हळबे
रविवार २३ डिसेंबर सकाळी ११ ते १२:३०
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
अधिक माहिती इथे

बिटकॉइनजी बाळा Fri, 21/12/2018 - 15:37

In reply to by चिंतातुर जंतू

चित्रव्यूह की चलतचित्रव्यूह मध्ये आहे ना हा लेख?

प्रमोद रिसवडकर, प्रसन्न हळबे हे लोक कोण आहेत?

चिंतातुर जंतू Fri, 21/12/2018 - 16:09

In reply to by बिटकॉइनजी बाळा

चित्रव्यूह की चलतचित्रव्यूह मध्ये आहे ना हा लेख?

हो. इथे उल्लेख आहे.

प्रमोद रिसवडकर, प्रसन्न हळबे हे लोक कोण आहेत?

हे र.कृं.चे विद्यार्थी होते.

अमुक Fri, 21/12/2018 - 19:23

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद!
ह्या कार्यक्रमाचे चित्रीकरण होणार आहे का?

चिंतातुर जंतू Fri, 21/12/2018 - 19:35

In reply to by अमुक

बहुधा नाही. 'चित्र संवाद' हा उपक्रम दृश्यकलांचे काही माजी विद्यार्थी / आजी शिक्षक मिळून हौसेनं चालवतात. व्याख्यात्यांना मानधन वगैरे खर्च त्यांना परवडत नाहीत. तसंच सर्वांना खुला असला तरी तो प्रामुख्यानं कलेच्या विद्यार्थ्यांच्या कक्षा थोड्या व्यापक करण्यासाठी चालवला जाणारा उपक्रम आहे. त्यामुळे बहुधा प्रवेश शुल्कही नसतं. एकंदरीत स्वरूप पाहता त्याचं व्यावसायिक चित्रीकरणही बहुधा होत नसावं.

अमुक Fri, 21/12/2018 - 20:52

In reply to by चिंतातुर जंतू

व्यावसायिक चित्रणाची अपेक्षा अजिबात नाही. स्मार्ट फोन वा डीएसएलाअर कॅमेरे तिवईवर स्थिर लावूनही जमतंच. ते शक्य नसेल तर किमान ध्वनिमुद्रण तरी करता यावं. हेतू दुर्मीळ विषयाचं दस्तावेजीकरण हा आहे. किती चांगल्या दर्जाचं चित्रण वा मुद्रण झालं हा भाग दुय्यम.

चिंतातुर जंतू Sat, 22/12/2018 - 15:33

In reply to by अमुक

कुणी असं हौशी दस्तावेजीकरण जरी केलं तरी ते त्याच्या मर्यादित व्यक्तिगत वर्तुळापुरतं राहणार. संयोजकांना असा काही उत्साह असल्याचं दिसत नाही.

अबापट Thu, 24/01/2019 - 12:55

उद्या , म्हणजे २५ जानेवारी २०१९ ला शिशा कॅफे , एबीसी फार्म्स , कोरेगाव पार्क येथे विनीत अलुरकर आणि बावधन बूझ बँड , ' बीटल्स ट्रिब्यूट ' कॉन्सर्ट करणार आहेत.
विनीत अलुरकरचे सादरीकरण चांगले असते असा पूर्वानुभव .
इच्छुकांनी लाभ घ्यावा . प्रवेशमूल्य असण्याची शक्यता असू शकते .

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/01/2019 - 04:01

सध्या ऑस्टिन, टेक्सास, संयुक्त संस्थाने, एथे (॥तिर्री कृपा॥ होऊन) मराठी लोकांची मंगळागौर परिषद भरलेली आहे. तिचे तपशील इथे सापडतील.

ऐसीवरचे काही चुकार लोक तिकडे सापडतील.
चुकार अदिती राजन मुक्तसुनीत

चिंतातुर जंतू Fri, 25/01/2019 - 12:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परिषद भरलेली आहे. तिचे तपशील इथे सापडतील.

आता ऑस्टिनवर काही हल्ला वगैरे झाला तर महाराष्ट्राचा अभ्यास करायला फक्त नवी बाजू उरणार बहुतेक.

तिरशिंगराव Fri, 25/01/2019 - 17:14

In reply to by चिंतातुर जंतू

आम्ही पण स्वत:ला Independent Scholar वगैरे ,समजत होतो. पण जगाने आमची दखलच घेतली नाही!

चिंतातुर जंतू Wed, 12/06/2019 - 15:55

International shorts collective

लघुपटाला पूर्ण लांबीच्या चित्रपटांइतकं वलय आणि प्रसिद्धी मिळत नसली तरीही ह्या माध्यमाचा प्रभावी वापर करून जगभर उत्तमोत्तम निर्मिती होत असते. बर्लिन चित्रपट महोत्सवात लघुपटांसाठी एक स्वतंत्र विभाग असतो. त्यातले आणि इतर महोत्सवांतले काही निवडक लघुपट पाहण्याची संधी पुण्यात ह्या वीकेंडला आहे.

वेळ : १५ जून दु. ४ पासून.

4 PM : Dialogues (Queer Mix Berlinale Shorts and Generation Section) – 78 minutes
6 PM : People only sing when they are in love (Animation / Experimental) + The German Short Film Award on Tour – 150 minutes

१६ जून सकाळी १० पासून

10 AM : Short Export – 78 minutes
11:25 AM : Short films from France (TCIFF) – 65 minutes
1 PM : International Short Films in competition (TCIFF) – 140 minutes

स्थळ : एनएफएआय फेज २ (कोथरुड)
ठिकाणाचा नकाशा आणि इतर माहिती फेसबुक इव्हेंट पानावर

प्रवेशमूल्य : नाही. अठरा वर्षं पूर्ण असलेल्यांना ओळखपत्र दाखवून 'प्रथम येणारास प्रथम प्रवेश' तत्त्वानुसार प्रवेश मिळेल.

महोत्सवाचं वेळापत्रक इथे

बिटकॉइनजी बाळा Wed, 12/06/2019 - 20:24

In reply to by चिंतातुर जंतू

शनिवारी जाईन. इकडचं कुणी असेल तर भेटू तिकडे.
परवा कोकण एक्स्प्रेसला उत्तम तिसऱ्या थाळी खाल्ली. तुमचा फेस्टिव्हल बोअर झाला तर पुन्हा ताव मारायचा विचार आहे.
मित्राच्या आग्रहाखातर रविवारी सुदर्शनला "वाफाळते दिवस" हा प्रयोग पाहायला जायचंय. त्यामुळे रविवारी नाही जमणार बहुतेक.

आदूबाळ Mon, 17/06/2019 - 17:43

In reply to by बिटकॉइनजी बाळा

रविवारी सुदर्शनला "वाफाळते दिवस" हा प्रयोग पाहायला जायचंय

प्लीज आल्यावर परीक्षणटैप काही लिहाल का? याबद्दल खूप ऐकलंय (बरंही आणि वाईटही), पण पाहायचा योग आला नाही.

बिटकॉइनजी बाळा Mon, 17/06/2019 - 19:42

In reply to by आदूबाळ

आबा, प्रयोग 14 जूनला की 16 जूनला होता हे कळलं नाही. मित्राने गंडवलं.
मित्रही स्कॅट लव्हर प्रकारातला असल्याने तो हा शो पाहायला कोणत्या हेतूने नेणार होता हे कळणार नाहीच, पण आता हा पाहावाच लागणार!

बिटकॉइनजी बाळा Sat, 15/06/2019 - 14:28

In reply to by चिंतातुर जंतू

ठिकाणाचा नकाशा आणि इतर माहिती फेसबुक इव्हेंट पानावर

त्यांच्या पेजवरच्या नकाशावर फेज २ कोथरूड शनिवारवाड्याजवळ आहे.
*rollingeyes*
*rollingeyes*
*rollingeyes*

बिटकॉइनजी बाळा Mon, 17/06/2019 - 19:41

.

चिंतातुर जंतू Wed, 26/06/2019 - 11:34

गिरीश कार्नाड यांच्या भाषणाचे व लेखाचे वाचन
मकरंद साठे यांचे व्याख्यान
विषय : स्वातंत्र्य, समकालीन पेच आणि राष्ट्रवाद

वेळ : २९ जून २०१९ सं. ७ वाजता
स्थळ : पत्रकार भवन सभागृह, नवी पेठ, गांजवे चौकाजवळ, पुणे
प्रवेशमूल्य नाही.

चिंतातुर जंतू Fri, 28/06/2019 - 10:11

चित्रकार अतुल दोडिया यांचे व्याख्यान : विषय 'निर्भयता'
आज दु. १२ वा. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, पुणे
प्रवेश विनामूल्य

चिंतातुर जंतू Mon, 23/09/2019 - 11:41

'वॉटरमार्क फिल्म क्लब' गेले काही महिने कोथरुडात सुरू आहे. त्याविषयी :

नेटफ्लिक्स आणि इतर साधनांचा सुकाळ असतानाही अनेक सिनेमे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. देशोदेशींचे विविध प्रकारचे, विविध विषयांवरचे आणि विविध शैलींतले नवेजुने सिनेमे दाखवून आणि त्यावर चर्चा करून प्रेक्षकांची जाण वाढवण्यासाठी कोथरुडात (महात्मा सोसायटीजवळ) हा फिल्म क्लब चालू केला आहे. विविध सांस्कृतिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचे लोक त्याद्वारे सिनेमाचा आस्वाद घेत आहेत. चित्रपटांची निवड मी करतो आहे. क्लबचे स्वरूप खाजगी आणि सभासदांसाठी आहे. सभासदत्वासाठी १८ वर्षं पूर्ण होणं आवश्यक आहे. मोठा पडदा आणि सुसज्ज ध्वनियंत्रणा वापरून HD दर्जाचे सिनेमे दाखवले जातात. आगामी सिनेमाची माहिती इमेल आणि व्हॉट्सॲपवर पाठवली जाते.

अधिक माहिती आणि सदस्यत्वाच्या फॉर्मसाठी संपर्क : 9422016044 watermarkfilmclub@gmail.com

फॉर्म भरून दिल्यावर चार सिनेमे विनाशुल्क पाहता येतील. त्यानंतर सभासदत्व शुल्क भरण्याचा निर्णय घेता येईल.
वेळ : दर महिन्याच्या विषम शनिवारी दुपारी चार वाजता
स्थळ : २६ नवविनायक सोसायटी, गांधीभवनामागे, कोथरूड. बंगल्याच्या ६०० चौ. फूट तळघरात थिएटरची सोय आहे.

सभासद होण्यासाठी वर्गणी रु. १५०० वार्षिक आणि ७५० सहामाही (जुलै ते डिसेंबर) आहे.

चिंतातुर जंतू Sat, 04/01/2020 - 14:38

In reply to by चिंतातुर जंतू

फिल्म क्लबची २०२०साठीची सदस्यनोंदणी सुरू झाली आहे.
अधिक माहिती आणि सदस्यत्वाच्या फॉर्मसाठी संपर्क : 9422016044 watermarkfilmclub@gmail.com

वेळ : दर महिन्याच्या विषम शनिवारी दुपारी चार वाजता
स्थळ : २६ नवविनायक सोसायटी, गांधीभवनामागे, कोथरूड. बंगल्याच्या ६०० चौ. फूट तळघरात थिएटरची सोय आहे.

सभासद होण्यासाठी वर्गणी रु. १५०० वार्षिक आणि ७५० सहामाही (जुलै ते डिसेंबर) आहे.

चिंतातुर जंतू Wed, 11/12/2019 - 17:12

दर वर्षीप्रमाणे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) जानेवारी महिन्यात होईल. ह्या वेळच्या तारखा - ९-१६ जानेवारी. ज्यांना यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणीला इथे सुरुवात झाली आहे.

तिरशिंगराव Mon, 16/12/2019 - 10:05

In reply to by चिंतातुर जंतू

रजिस्टर करायला जमत नाही. माझ्याकडे २५० केबी पेक्षा साईझचा फोटो नाही. आणि फोटोशिवाय ते पुढे जात नाही.

चिंतातुर जंतू Mon, 16/12/2019 - 15:37

In reply to by तिरशिंगराव

माझ्याकडे २५० केबी पेक्षा साईझचा फोटो नाही.

मोठ्या बाइटसाइझचा फोटो लहान करता येतो. उदा. इथे एक उपाय सापडेल. किंवा इथे

चिमणराव Mon, 16/12/2019 - 19:47

किंवा हे app on Google Play Store.
Photo and Picture Resized ( by - farluner apps and games )
Quick and fast.

याच डीवेलपरचे आणखी एक app आहे फोटो क्रॉप साठी. त्यात फोटोची साईझ कमी होऊ देत नाही. हेसुद्धा लागते. इतर apps cropping करताना मूळ साईजचा विध्वंस करतात. तसे होऊ देत नाही.
PhotoCrop - Crop the Picture. ( by - farluner apps and games )

चिंतातुर जंतू Tue, 24/12/2019 - 16:05

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात समावेश झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट विभाग आणि व्याख्यानं वगैरे इतर कार्यक्रमही जाहीर झाले आहेत.

अधिक माहिती इथे.

चिंतातुर जंतू Wed, 08/01/2020 - 10:33

पिफचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑस्करविजेत्या अर्जेंटिनी दिग्दर्शकाच्या चित्रपटाने उद्घाटन होणार आहे. वेळापत्रकाचे अधिक तपशील (पीडीएफ) इथे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

चिंतातुर जंतू Tue, 28/01/2020 - 18:30

सध्या मुंबईत चुकवू नयेत अशी तीन-चार प्रदर्शनं सुरू आहेत. जमेल त्यांनी लाभ घ्यावा :

  1. सुधीर पटवर्धन यांचं मोठं सिंहावलोकन एनजीएमए इथे सुरू आहे. ते १२ फेब्रुवारीपर्यंत आहे. अधिक माहिती इथे
  2. नुकत्याच दिवंगत झालेल्या अकबर पदमसी यांचं एक छोटेखानी प्रदर्शन समोर म्युझियममध्ये जहांगीर निकोलसन दालनात सुरू आहे. ते ९ एप्रिलपर्यंत आहे. अधिक माहिती इथे.
  3. 'रिदम हाऊस'शेजारच्या गल्लीत दिल्ली आर्ट गॅलरीमध्ये 'Primitivism and Modern Indian Art' हे प्रदर्शन सुरू आहे (५ फेब्रुवारीपर्यंत). अधिक माहिती इथे.
  4. नलिनी मलानी यांचं प्रदर्शन भाऊ दाजी लाड संग्रहालयात ३१ मार्चपर्यंत सुरू आहे. अधिक माहिती इथे.

चिंतातुर जंतू Wed, 29/01/2020 - 16:07

In reply to by चिमणराव

जहांगिरला सात वर्षांनी येतो/ लागतो नंबर.

प्रदर्शन जहांगीर कलादालनात नसून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील जहांगीर निकोलसन दालनात आहे.

चिंतातुर जंतू Mon, 24/02/2020 - 16:35

आजपासून कोथरुडात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सारंग नाट्यमहोत्सव सुरू होत आहे. तिकिटे बुक माय शो आणि नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महोत्सवाचे फेसबुक पान पाहणे.

चिंतातुर जंतू Tue, 28/04/2020 - 17:55

लॉकडाउनच्या काळात अनेक लोक फेसबुक लाइव्ह येऊन जात आहेत. मराठीतले सध्याचे एक लोकप्रिय लेखक हृषीकेश गुप्ते सध्या ऐसीवर कोकणातल्या माणसांविषयी सदर लिहीत आहेत. त्यांचा फेसबुक लाइव्ह कट्टा येत्या गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

चिंतातुर जंतू Tue, 28/04/2020 - 20:51

'ऐसी अक्षरे'शी संबंधित असणारे इतिहास संशोधक शैलेन भांडारे यांचाही फेसबुक लाइव्ह कार्यक्रम काही दिवसांपूर्वी झाला. त्यांचा विषय ऐसी अक्षरे'च्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाशी संबंधित होता. इच्छुकांनी लाभ घ्यावा : दुवा.

चिंतातुर जंतू Thu, 07/05/2020 - 19:20

सध्या अनेक जण फेसबुक लाइव्ह येऊन कट्टे भरवत आहेत तसंच काही सकस आणि विधायकही उपलब्ध होत आहे. पर्यवरणतज्ज्ञ अतुल देउळगावकर आणि लेखक नंदा खरे शनिवारी फेसबुक लाइव्ह येणार आहेत.
वेळ : शनिवार ९ मे दुपारी ४
विषय : काल, आज आणि 'उद्या'
स्थळ : अतुल देऊळगावकर यांची फेसबुक भिंत

चिंतातुर जंतू Sat, 09/05/2020 - 16:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा दुवा नंतरही चालावा बहुतेक -
अतुल देऊळगावकर यांच्या भिंतीवरून
(लिंक संपादित केली आहे, कारण आधीच्या लिंकवरचा व्हिडिओ काढून नव्या लिंकवर टाकला गेला आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/05/2020 - 22:49

In reply to by चिंतातुर जंतू

नाही चालला. देऊळगावकर लिष्टीत आहेत तरीही!

चिंतातुर जंतू Thu, 07/05/2020 - 19:23

१० मे १८५७ला भारतीय सैन्यात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरू झाला. त्या निमित्तानं शैलेन भांडारे पुन्हा एकदा फेसबुक लाइव्ह येणार आहेत.
विषय : Money and the "Mutiny" - Numismatic Reflections on the Great Revolt of 1857-59
वेळ : रविवार १० मे संध्या. ७:३० वा.
स्थळ : शैलेन भांडारे यांची फेसबुक भिंत

चिंतातुर जंतू Fri, 08/05/2020 - 20:12

ओबरहाऊसन फिल्म फेस्टिव्हल हे जगातील सर्वात महत्त्वाच्या लघुपट महोत्सवांपैकी एक आहे. ह्या वर्षी करोनामुळे त्यांनी ऑनलाइन जाण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दहा युरोमध्ये सुमारे ३५० आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट पाहायची संधी आहे.
वेळ : दि. १३-१८ मे.
अधिक माहिती इथे आणि फेसबुक पानावर

चिंतातुर जंतू Fri, 29/05/2020 - 15:14

लॉकडाऊनच्या निमित्ताने जे फेसबुक लाइव्ह कार्यक्रम होत आहेत त्यात काल अतुल देऊळगावकर यांनी लेखक महेश एलकुंचवार यांच्याशी गप्पा मारल्या. त्याचे रेकॉर्डिंग आता यूट्यूबवर उपलब्ध झाले आहे.

चिंतातुर जंतू Sun, 14/06/2020 - 11:21

मराठीतील लोकप्रिय लेखक नारायण धारप यांच्याविषयी निःशुल्क कट्टा आज संध्याकाळी ४ वाजता. सध्याचे लोकप्रिय लेखक हृषीकेश गुप्ते धारपांच्या कथा, अतींद्रिय अस्तित्वं, भय यावर बोलतील आणि मग थोड्या प्रतिक्रिया, थोडी चर्चा असं ढोबळ स्वरूप आहे. अधिक तपशील इथे

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 16/06/2020 - 01:04

Join the online seminar on "Science in Ancient India: Reality vs Myth" on 28th June (Sunday), by Prof. Soumitro Banerjee.
To participate in the seminar, please register here: https://forms.gle/oPdwkrDQrdpSNwwg7.

Professor, Indian Institute of Science Education and Research (IISER) - Kolkata, India
Date: 28th June 2020 (Sunday)
Time: 6:30 PM (IST) or 3;00PM (CEST)
Abstract: In this seminar, Prof. Banerjee will discuss the developments in various fields of science and technology in ancient India from a historical and social science perspective. He shall also emphasize how unscientific and wrong information is being spread in the name of ancient science and contrast them with reality.

To participate in the seminar, please register here: https://forms.gle/oPdwkrDQrdpSNwwg7.

We shall share the link to join the seminar to the registered participants only.

चिंतातुर जंतू Wed, 17/02/2021 - 18:45

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ या वर्षी ११-१८ मार्च दरम्यान होणार आहे. त्यासाठी सभासद नोंदणी आता चालू झाली आहे (दुवा). या वर्षी काही फिल्म्स ऑनलाइन दाखवल्या जातील आणि भारतातून त्या पाहता येतील.

अधिक माहिती आणि अपडेट्स फेसबुकवर -

19th Pune International Film Festival: Global Cinema.
Delegate Registrations are now open! Visit the link in bio to register.

#CelebratingCinema #PIFF2021 #PIFFहोतंय

Posted by PIFF - Pune International Film Festival on Wednesday, February 17, 2021

भाऊ Thu, 18/02/2021 - 11:28

माहितीसाठी धन्यवाद!
स्क्रिनिंग वेळा काय असणार? नोंदणीच्या वेळा दिल्यात त्याच का? ऑफलाईन साठी त्या काळात कधीही पाहू शकणार का?
ऑफिस सुरू झाल्याने या चौकश्या.

चिंतातुर जंतू Thu, 18/02/2021 - 11:59

In reply to by भाऊ

ऑफलाईन - प्रत्यक्ष थिएटरमध्ये असेल त्यामुळे खेळांच्या वेळा पाळूनच होईल. ऑनलाईनसाठी सिनेमा पाहून संपवायला काही मुदत असेल.

चिंतातुर जंतू Thu, 04/03/2021 - 19:52

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ या वर्षी ११-१८ मार्च दरम्यान होणार आहे. स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा आज झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग -

मराठी स्पर्धा विभाग -

भाऊ Wed, 10/03/2021 - 15:51

करोना रुग्णांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेत पुणे फिल्म फाउंडेशनने ११ ते १८ मार्च दरम्यान होणारा १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान होईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे.

चिंतातुर जंतू Mon, 15/03/2021 - 15:03

In reply to by भाऊ

ऑनलाईन पाहण्यासाठीचा दुवा आता उपलब्ध आहे. या दुव्यावर १८-२५ मार्च दरम्यान सुमारे २५ सिनेमे उपलब्ध होतील. त्यांची यादी आणि ट्रेलर वगैरे माहिती आता तिथे उपलब्ध आहे. प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी काही कालावधी असेल. त्यापूर्वी इथे जाऊन नावनोंदणी करावी लागेल. वयाचा दाखला, फोटो, वगैरेंची छाननी करून मग सदस्यत्व दिले जाईल.

चिंतातुर जंतू Mon, 14/02/2022 - 18:27

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ या वर्षी ३-१० मार्च दरम्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा आज झाली आहे -

चिंतातुर जंतू Fri, 25/02/2022 - 23:16

मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची यादी आज जाहीर झाली आहे -

त्याचप्रमाणे जागतिक सिनेमा विभागातील चित्रपटांची नावे दोन भागांत इथे आणि इथे पाहता येतील.

अबापट Tue, 13/09/2022 - 20:16

The story of the Live Aid 1985 concert

On the 13th of July 1985, the biggest multivenue benefit concert ever took place at the Wembley stadium, London, and the John F Kennedy stadium, Philadelphia. It was attended by 72,000 people at Wembly and 90,000 at Philadelphia. The event was seen by 1.98 billion people live on TV.
We are planning a private screening of an edited version of a two part documentary made by the BBC (Part 1: Against all odds and Part 2: Rocking all over the world) at Watermark Film club in Kothrud on the 25th of September 2022. (https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9)

The documentary traces the story of Live Aid from its humble beginnings, a pop tune cobbled together in the back seat of a taxi, to the eve of the biggest televised event ever staged on both sides of the Atlantic. Against the background of Thatcher’s Britain, one scruffy, fading rock star — Bob Geldof — recalls how he and his motley band tried to pull off the impossible — a global televised concert, never before attempted, to save the lives of the starving millions in Africa and force the Establishment to sit up and take the problem seriously. But would it work, would the punters watch, and more importantly would they part with their cash?
The documentary throws light on how challenging it was to organize this concert with many of the big names in Rock and Pop at the time. Some behind-the-scenes hilarious details of the organization of such an event are also shown, along with key performances by great artists such as Elton John, Queen, Paul McCartney, David Bowie, U2, and others. Live Aid made a considerable impact on how future concerts were held. (For example, Queen’s performance in Live Aid is still considered one of the greatest live performances of all time by a rock band. The same appeared as the climax scene in the recently released Freddie Mercury Biopic ‘Bohemian Rhapsody’). Those who watched it at home, including Tony Blair, JK Rowling and Helen Fielding, appear in the documentary recalling the impact of this extraordinary event.
Hope you join us to reminisce about the mid-1980s, which was a great enjoyable time for our kind of music, even in Pune.
Please confirm your interest on any of the following WhatsApp numbers: 9730200711 (Avadhut Bapat), 9422016044 (Abhijit Vaidya) or Chintatur Jantu
There is a nominal charge of Rs. 100/- to take care of infrastructure and logistics.
Prior registration suggested since limited seating is available.

गोष्ट ‘लाईव्ह एड’ची

१३ जुलै १९८५ रोजी एक अचाट कार्यक्रम झाला. टीव्ही प्रसारण बाल्यावस्थेत असण्याचे ते दिवस होते. अशा काळात एकाच वेळी लंडन आणि फिलाडेल्फिया इथे दोन भव्य कार्यक्रम करून उपग्रहाद्वारे त्यांचं जगभर प्रसारण करण्यात आलं. एकूण दीड लाखांहून अधिक लोकांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला, तर दीडशे देशांतल्या कोट्यवधी लोकांनी तो त्याच वेळी टीव्हीवर लाईव्ह पाहिला. ही जगातली पहिली एवढी मोठी चॅरिटी कॉन्सर्ट होती.

या कार्यक्रमाचं नाव होतं ‘लाईव्ह एड’. त्यामागचं निमित्त होतं १९८३-८५ सलग तीन वर्षं इथिओपियामध्ये पडलेला भीषण दुष्काळ. या दुष्काळात पाच ते दहा लाख लोक मरण पावले (भूकबळी) आणि सुमारे २५ लाख लोक विस्थापित झाले. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभा करणं हे ‘लाईव्ह एड’चं ध्येय होतं. १२७ मिलियन डॉलर्सचा निधी त्यातून उभा राहिला.

हा कार्यक्रम घडवून आणणारा उपद्व्यापी बॉब गेल्डॉफ म्हणजे एक मावळता आणि किरकोळ पॉपस्टार होता. हातात काहीही नसताना, शून्यापासून सुरुवात करून बॉब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम कसा आयोजित केला? बीबीसीसारख्या जगन्मान्य संस्थेला त्यांनी त्यासाठी कसं भरीला घातलं? पॉप-रॉक जगातल्या बहुतांश मोठ्या स्टार्सना (त्यांचे इगो फाट्यावर मारून), साम-दाम-इ. वापरून, प्रसंगी गंडवून बॉबनं कसं राजी केलं? हा कार्यक्रम कसा पार पाडला?

ह्या प्रश्नांची उत्तरं देणारी दोन भागांची एक डॉक्युमेंटरी बीबीसीनंच पुढे तयार केली (‘Against all odds’ आणि ‘Rocking all over the world’). कार्यक्रमाची पूर्वपीठिका, प्रत्यक्षात आलेल्या अडचणी, त्यातून काढलेले धमाल मार्ग, आणि त्यातून उभा राहिलेला अचाट निधी याबद्दलची ही डॉक्युमेंटरी आहे. तत्कालीन पाश्चात्य जगातली सामाजिक परिस्थिती, पॉप स्टार्सचं वेगळं जग हेही त्यात दिसतं.

या डॉक्युमेंटरीची संपादित आवृत्ती वॉटरमार्क फिल्म क्लब, कोथरूड इथे रविवार २५ सप्टेंबर रोजी दाखवली जाणार आहे. (https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9)
वेळ : सकाळी १०-१२:३०
देणगी मूल्य : १००₹

जागा मर्यादित आहे त्यामुळे आगाऊ नोंदणी करावी. संपर्क : अभिजित वैद्य (9422016044), अवधूत बापट (9730200711) व चिंतातुर जंतु .

अबापट Wed, 24/05/2023 - 12:09

मराठी पुरोगामित्वाचा इतिहास: काही मुद्दे
राहुल सरवटे
रविवार २८ मे, सायंकाळी ५ वा.
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शहरी मध्यमवर्ग मानू लागला. त्यामागे काही घटक प्रभावी होते. उदा. सुधारकांमुळे सांसारिक जीवनवृत्तीला मिळालेली प्रतिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह, व्यक्तिवादी आणि इहवादी राजकीय जाणिवा, आणि साहित्यात एका नव्या पार्थिव स्त्रीची निर्मिती. विशेषत: परिश्रम करणारं, लैंगिक प्रेरणा असलेलं आणि जात नावाच्या अदृश्य पाशांत बंदिस्त असणारं मानवी शरीर ह्या महाराष्ट्र पुरोगामी असण्याच्या कल्पनेच्या केंद्रस्थानी आलं. ह्या व्याख्यानात अशा बहुविध मुद्द्यांचा आढावा घेतघेत मराठी पुरोगामित्वाच्या गुंतागुंतीच्या इतिहासाचं एक आकलन सादर केलं जाईल. रविकिरण मंडळाची कविता, ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्या, ‘ओलेती’ या चित्राच्या निमित्तानं झडलेले अश्लीलताविषयक वाद, किर्लोस्कर मासिकांतून व्यक्त झालेलं पुरोगामित्व, फडके आणि जावडेकर यांच्यातला पुरोगामी साहित्याविषयीचा सार्वजनिक वाद, असे हे काही मुद्दे होत.
राहुल सरवटे आधुनिक काळातील दक्षिण आशियाच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. १८९९-१९४८ दरम्यानची आधुनिक मराठी समाजाची जडणघडण या विषयावर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पीएचडी केली आहे. सध्या ते अहमदाबाद विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
सर्वांना सस्नेह निमंत्रण.
तारीख आणि वेळ : रविवार २८ मे, सायंकाळी ५ वा.
स्थळ : वॉटरमार्क फिल्म क्लब, कोथरूड पुणे.
WhatsApp for confirmation: 9422016044
https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9
देणगी मूल्य : १००₹

जागा मर्यादित आहे त्यामुळे आगाऊ नोंदणी करावी. संपर्क : अभिजित वैद्य (9422016044), अवधूत बापट (9730200711) व चिंतातुर जंतु .

चिंतातुर जंतू Mon, 11/09/2023 - 19:52

मराठीत चित्रपट रसास्वाद शिबिर : रविवार १ ऑक्टोबर ते शनिवार ७ ऑक्टोबर २०२३ असे सात दिवसांचे शिबिर ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, (टिळक रोड) पुणे येथे होणार आहे. या शिबिराचे शुल्क रुपये ५,००० आहे; ज्यामध्ये सात दिवसांच्या शिबिरादरम्यानचा नाश्ता आणि दुपारचे भोजन याचा समावेश आहे. शिबिरामध्ये रोज सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत चित्रपट रसास्वादासंबंधी दृक-श्राव्य व्याख्याने, निवडक चित्रपट बघणे, चित्रपटविषयक चर्चा, असा भरगच्च कार्यक्रम असेल.
चित्रपट रसास्वाद शिबिरामधील काही व्याख्याते : समर नखाते, उमेश कुलकर्णी, गणेश मतकरी, अशोक राणे, विकास देसाई, राहुल रानडे, अनुपम बर्वे, अभिजित रणदिवे, संतोष पाठारे, सुहास किर्लोस्कर, दीपक देवधर आणि सतीश जकातदार.
पुण्याबाहेरील चित्रपट रसिकांची पुण्यात राहण्याची सोय नसल्यास शिबिराच्या जवळ निवासाची सोय (twin sharing basis) करता येईल, ज्याचे एकूण शुल्क रुपये ४,००० एवढे माफक असेल.
चित्रपट रसास्वाद शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. त्याचबरोबर शिबिराचे शुल्क रुपये ५,००० ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ च्या खात्यावर जमा करावे.
Account Name: Maharashtra Culture Centre Pune
Bank Account No: 50100606709002
Bank: HDFC Bank
Branch: Narayan Peth
IFSC: HDFC0000427
शिबिराचे शुल्क GPay/Paytm द्वारे जमा करण्यासाठी QR code पाठवता येईल.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधू शकता.
सतीश जकातदार | सुहास किर्लोस्कर
9822975882 9422514910

चिंतातुर जंतू Tue, 16/01/2024 - 17:22

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उर्फ पिफ गुरुवार १८पासून सुरू होत आहे. वेळापत्रक व इतर माहिती महोत्सवाचे फेसबुक पान, इन्स्टा किंवा संकेतस्थळावर मिळेल.