सूचना

अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

झॅनॅक्स, क्लायमेट चेंज आणि डोन्ट लुक अप.

तुम्ही एकाच वेळी ब्राउझरच्या चार टॅब्ज खोलुन एकात वॉशिंग्टन पोस्ट, दुसर्‍यात एनवाय टाईम्स, तिसर्‍यात द गार्डीयन आणि चौथ्यात द व्हाईस/हफिंग्टन पोस्ट/स्क्रोल/ओपीइंडीया/लोकसत्ता/सनातन प्रभात/संध्यानंद वाचत असाल तर तुम्ही 'डोन्ट लुक अप' हा सिनेमा पाहिला असल्याची शक्यता ६० ट्क्क्यांहुन अधिक आहे. तुम्ही अद्याप हा सिनेमा पाहिलेला नसला तर तो सिनेमा पहाण्याची शक्यताही तशी मोठीच आहे. डोन्ट लुक अप हा नेटफ्लीक्सवरच्या सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत तीन नंबरवर आहे आणी येत्या काही दिवसात तो नेटफ्लिक्सवर सगळ्यात जास्त पाहिला गेलेला सिनेमा असेल आणि असे असुनही आंतरराष्ट्रीय चित्रपट समिक्षकांना तो बराचसा रुचलेला नाही. केवळ चित्रपट पहाणार्‍यांपैकी काहींना हा चित्रपट अजिबातच आवडलेला नाही तर काही जण त्याचे प्रचंड पोटतिडकीने समर्थन करीत आहे.

डोन्ट लुक अपची सुरुवात ही संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांच्या एका अद्वितीय शोधाने सुरुवात होते. हा शोध सरसकट मानवजातीवरती आणि ग्रहावरतीच परिणाम साधणारा असल्याने शोध लावणार्‍या सगळ्यांनाच व्हाईट हाउसकडून बोलावणे येते आणि त्यानंतर सुरु होते ती कुठल्याही सरळ वाटणार्‍या प्रश्नाची अनेक अंगाने मोडतोड. कुठल्याही मुलभूत सामाजिक प्रश्नाभोवती व्यवस्थेने तयार केलेली किटाळे आणि मुळ मुद्दा भरकटवून तो दुसर्‍याच मितीत नेउन ठेवण्याची माणसाची सवय, मुख्यतः सत्तेत असणार्‍या श्रीमंत, गोर्‍या, एक टक्का अमेरीकन माणसाची ही सवय आज ना उद्या पृथ्वीला एक दिवस कसे विध्वंसाच्या मार्गावर ह्याचे प्रत्ययकारी चित्रण 'डोन्ट लुक अप' मध्ये आले आहे. हा प्रत्यय मात्र नेहमीच्या सिनेमाच्या पठडीतला नाही. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही सिन्समध्ये नेमके काय चालले आहे हे सगळ्यांनाच रुचेल/पचेल असे नाही. पण ज्याने इंटरनेटच्या विस्फोटानंतर माहिती वाचण्यात प्रचंड काळ घातला आहे त्यांच्यासाठी ह्या सिनेमात येणारी प्रत्येक फ्रेम त्यांनी आधी कुठेतरी पाहिली असल्याने त्यांना हा सिनेमा अगदी जवळचा वाटू शकतो. ह्याशिवाय संशोधन करतांना निरनिराळ्या मानसिक कंडीशन्समध्ये जावे लागणार्‍यांना हा सिनेमा अधिकच व्यापक वाटू शकतो. पण हे असे 'काहींना काहीतरी वाटणे' हा मुळ सिनेमाचा उद्देश नाही. तो एक फ्रेममधुन दुसर्‍या फ्रेममध्ये जातांना आणि एका सिनमधून दुसर्‍या सिनमध्ये शिरतांना जागतिक समकालीन परिस्थीती अगदी लिलया उलगडून दाखवितो.

Don't Look Up (2021)

चित्रपटाच्या सुरुवातीच्या सिनमध्ये 'झॅनॅक्स'चा उल्लेख येतो जो नंतर तो वरचेवर येत रहातो. झॅनॅक्स (अल्पाझोरम) हे अ‍ॅन्झायटीवरचे औषध आहे आणि अमेरीकेसारख्या देशांमध्ये काही कोटी लोक झॅनॅक्स आणि इतर बेन्झोडायझेपाईन्स औषधे घेत आहेत. अ‍ॅन्झायटीवरची मुळ कारणे न शोधता सरसकट झॅनॅक्स प्रिस्क्राईब करीत रहाणे ही अमेरीकन भांडवलाची देण आहे आणि सिनेमात ती अगदी नैसर्गिकपणे वापरणारे लोक दिसतात. झॅनॅक्सच्या पॉईंट फाईव्ह आणि वन मिलीग्रामच्या गोळीच्या मधोमध एक रेघ असते ज्यामुळे तिचे दोन तुकडे करता येतात. ह्या गोळीचे केवळ दोन तुकडे करता येतात ह्याभोवती अनेक विनोद आणि मिम्स आहेत. डोन्ट लुक अप मध्ये उपयोजलेली झॅनॅक्स मात्र दोन मिलीग्रामची आहे आणि तिला तीन ठिकाणी रेघा असल्याने तिचे चार तुकडे करता येतात आणि मग उगीचच अ‍ॅन्झायटी आकड्यांत मोजली जाउ शकते असे चित्र डोक्यात तयार करतात, अर्थात हेही प्रेक्षकांवरच अवलंबुन आहे पण अर्धी झॅनॅक्स म्हणजे पुर्ण झॅनॅक्स नाही आणी ती अर्धी न घेता चतकोरच घेणे कसे योग्य आहे ह्याचे काहीसे समिकरण प्रेक्षकांच्या डोक्यात तयार होतांना एकच प्रश्न उभा रहातो. भवतालात दिसणार्‍या क्लायमेट चेंज आणि ग्लोबल हिटींगच्या प्रश्नाकडे आपण नेमके कसे पहायचे? अ‍ॅन्झायटी लेव्हल .५ ने की अ‍ॅन्झायटी लेव्हल १.० ने? आणी ही अ‍ॅन्झायटी वा अस्वस्थता वास्तवातून येत असेल तर तिच्याशी दोन हात करतांना कृत्रिमरित्या स्वतःला अँटीडिप्रेसंटच्या रासायनिक 'आशावादात' ठेवुन निराशाजन्य परिस्थीतीवर तोडगा शोधायचा का? आणि हा आशावाद नेमका किती ठेवायचा? झॅनक्सची चतकोर गोळी की अर्धी की पुर्ण घेउन?

संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना बहुतांशांना मानसोपचार घ्यावेच लागतात असे नाही पण काहींना ते घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारे सगळे निर्व्यसनी आणि स्थीर बुद्धीचे असतात असेही नाही. काही संशोधक हे मॅरीउआनाचे व्यसनाधीन असतात आणि त्यांना संशोधनामुळे व्यसन करावे लागते की व्यसनामुळे संशोधन करणे शक्य होते ह्याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. इथे झॅनॅक्स आणि मॅरीउनाचा उल्लेख करण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे 'डोन्ट लुक अप' पहिल्यावेळी नेमका कसा पहावा? हे सजेस्ट करणे. अँटीडिप्रेसंट घेउन जगणार्‍यांना आपल्या नियमित डोसनंतर हा सिनेमा पुर्णत: रिलेवंट किंवा पुर्णतः अनिभिज्ञासारखा वाटू शकतो. मॅरीउनासारखी युफोरीक व्यसने करणार्‍यांना हा सिनेमा विनोदी वाटू शकतो. तो नेमका किती विनोदी आहे त्याचे प्रमाण प्रेक्षकांनी मॅरीउनाचा कुठला वाण ओढला आहे त्यावर अवलंबून आहे. अधनंमधनं वा नियमितपणे मॅरीउनाचे सेवन करुन रोजच्या रोज मनातल्या मनात जगाची चिंता करणार्‍यांना हा सिनेमा खुपच विनोदी वाटू शकतो. त्यातही सतिवासारख्या वाणाचे सेवन करणार्‍यांना हा सिनेमा पोट दुखेपर्यंत हसवू शकतो. आपल्या नेहमीच्या औषधांच्या सेवनानंतर वा मॅरीउनाचा अख्खा जॉईंट ओढल्यानंतर ह्या औषधांचा प्रभाव उतरेपर्यंत सिनेमा एकाच बसणीत पाहिल्यास त्याचे अर्थ वेगळे ठरतात तर हाच सिनेमा काही मिनीटे आपल्या नियमित व्यसनांसह पाहून हसून घेतल्यानंतर, उरलेला सिनेमा काही दिवसांनी कुठल्याही बाह्यरासायनिक-प्रभावांशिवा पाहिल्यास त्याचे अर्थ पुर्णतः वेगळे ठरतात.

डोन्ट लुक अपचा प्रिमाईस जागतिक स्वरुपात जगणार्‍या लोकांच्या प्रत्येक दिवसाची कथा आहे. एकुणच ग्लोबल हिटींग आणि क्लायमेट चेंजच्या प्रश्नाला जगभरातल्या राजकीय पुढार्‍यांनी आणि कंपन्यांनी दिलेला प्रतिसाद हा किती पोकळ, निर्‍हा आत्मविश्वासाचा आणि मुळ भीतीपासून भरकटलेला आहे हे चित्रपटात दिसुन येते. आज अमेरीका आणि भारतासारख्या देशातल्या काही लोकांना करोनाव्हायरस मुळात अस्तित्वातच नाही आणि हे सगळे एक षडयंत्र असल्यासारखे वाटतेय. मुळात व्हायरस आहे, खरचं आहे आणि त्यापासुन रक्षण करण्यासाठी तुम्ही मास्क लावला पाहिजे, लस घेतली पाहिजे हे पोटतिडकीने सांगुनही काही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. व्हायरस खरोखरच आहे असे माननारे लोक जसे आहेत तसेच व्हायरस नाही असे माननारे लोकही आहेत आणि आपण दोन्ही प्रकारच्या प्रकारच्या मतांचा आदर करायला हवा असे म्हणणारे लोकही आहेत, करोनाव्हायरसमुळे आलेल्या ह्या जागतिक आणीबाणीचा सामना करण्यासाठी एकुणएक मानवजातीला तो अस्तित्वात आहे आणि तो घातक ठरु शकतो ही एक बाब मान्य करावीच लागेल पण तसे होत नाही. हे इथपर्यंतही ठिक पण पराकोटीच्या आत्मविश्वासातून कोव्हीडची परिस्थीती ही पुर्णतः आटोक्यात आली असुन तिच्याकडे सौम्यपणे पहा असे सांगणारेही अनेक आहेत. क्लायमेट चेंज मुळे होणारा विध्वंस हा करोनाव्हायरसमुळे होणार्‍या विध्वंसापेक्षा बराच जास्त असणार आहे पण मुळात क्लायमेट चेंज नाहीच आणि असला तरी तो चांगलाच आहे असे सांगणारे लोक आहेत. जग अधिकाधीक वाईट परिस्थीतीत ओढले जात आहे असे म्हटल्यास असे म्हणणे पुर्णपणे चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी डेटाची किचकट जंत्री देणारे लोकही आहेत. भवतालात चाललेल्या ह्या सगळ्या गदारोळाचे यथार्थ चित्रण 'डोन्ट लुक अप' मध्ये येते पण ही यतार्थता व्यवस्था, राजकीय आश्वासने आणि नेतृत्वाच्या निरर्थकतेतुन येते. एकुण अतिशय सुव्यव्स्थीतपणे चालणारी निरर्थकता एक दिवस आपल्या सर्वांना कुठल्या भयंकर परिस्थीती नेउन सोडणार आहे ह्यावर सिनेमा अगदी निर्लज्जपणे किंवा अगदी संयमाने भाष्य करतो. डोंट लुक अप सिनेमाच्या शिर्षकात 'लुक अप' असाही संदेश आहे. दुर्दैवाने तो सगळ्यांना दिसेलच असे नाही.

'डोंट लुक अप' सिनेमा नक्की पहा, कुठल्याही बाह्यप्रभावाशिवाय पहा आणि त्यानंतर आकाशात पाहून वास्तव स्विकारायचे की खालमुंडी पाताळधुंडी हा अ‍ॅप्रोच घेउन सगळे काही आलबेल चालले आहे हे छाती ठोकून सांगायचे हा निर्णय नक्की घ्या.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'डोंट लुक अप' बघायचा प्रयत्न केला. त्यांना काय म्हणायचं आहे, हे पटलेलं असूनही सिनेमा बघवला नाही. 'लोकसत्ता'चे अग्रलेख बघून बरेचदा असंच वाटतं. 'अहो, मला तुमच्याशी सहमत व्हायचं होतं हो, पण एवढं वाईट काही प्रसवलंत तर मी नाही लक्ष देणार'!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेकार सिनेमा आहे अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मला अनेक प्रकारे आवडला हा सिनेमा.

पृथ्वीचा विनाश ह्या विषयावर बक्कळ सिनेमे आहेत. त्यातही धूमकेतू किंवा उल्कापातावरच १०-१५ असतील.
पण त्या सगळया चित्रपटांत स्क्रीनसमोरच्या नर्डाने एकदा का वार्निंग दिली, की डायरेक्ट व्हाईट हाउसमधे झोपलेल्या प्रेसिडेंटशेजारचा फोन खणखणतो आणि तिसऱ्या मिनिटाला सगळे अतिमहत्त्वाचे लोक (तो नर्डसुद्धा मागे खुर्चीत बसून) कॉन्फरन्स कॉल घेतात- त्यात स्क्रीनवर बाकी देशांचे प्रमुख लोकही असतात.
हे सगळे लोक अतिगंभीर चेहेरा करून पर्याय शोधतात आणि पुढे काय करायचं ते ठरवतात.

हे एवढं गृहित धरून मग पुढे कुठलाही असा चित्रपट सुरु होतो.
"डोंट लूक अप'मधे ह्याच गृहितकाची उलटतपासणी केली आहे सटायर म्हणून.

पण त्यातलं काही सटायर इतकं खरं आहे की पोटात गोळा येतो. विषेशत: सोशलमिडिया कव्हरेज वगैरे.
अमेरिकन भांडवलशाही आणि बाजारीकरण (काहीही करा पण विका) - ह्याचं रूपकही उत्तम.

(हा चित्रपट क्लाय्मेट चेंज़ साठी चपखल बसतो. पण ते दाखवणं बोअर आणि कठीण असल्याने धूमकेतूचं रूपक वापरलं आहे असं ऐकलं.)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला पण आवडला सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळणे ह्या प्रकाराची तुलना क्लायमेट चेंजशी करणे हा मुळातच वाह्यातपणा आहे. इतक्या झपाट्याने येणाऱ्या संकटात मानवजात वाचवण्याची चर्चा होईल आणि भारत, चीन व रशिया एकत्र येतील हा आशावाद प्रचंड भंपक नि हास्यास्पद आहे.
धूमकेतूसारखे प्रचंड वेगाने येणारे संकट व त्यावरची प्रतिक्रिया चित्रपटाने खूपच मर्मभेदकतेने टिपली असली तरी चित्रपट अत्यंत बाळबोध झाला आहे.
क्लायमेट चेंजच्या बाबतीत झालेली फक्त आत्तापर्यंतचीच नाटके चित्रपटातल्या रूपकात पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
क्लायमेट चेंजचा ह्यापेक्षाही जास्त रंजक आणि बहुतांश पिक्चर अभी बाकी है.

दोन वाक्यं मात्र प्रचंड आवडली चित्रपटातलीः
१. The truth is way more depressing. These people are not even smart enough to be as evil as you give them credit to be.
2. My algorithms have determined 8 types of consumers. You think you’re motivated by beliefs, high ethical beliefs. But you just run towards pleasure and away from pain, like a field mouse.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“वाह्यात” हा शब्द तुम्ही चपखलपणे योजला आहे. बऱ्याच दशकांनंतर तो पुन्हा वाचला. माझ्या लहानपणी तो पुष्कळ ऐकलेला आहे (बहुधा मलाच लावलेले विशेषण ह्मणून). त्या दिवसांची आठवण होऊन मजा आली!

हिंदीत तो “वाहियात” असा आढळतो. पण अर्थाच्या छटेत थोडा फरक असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मी योजलेला बटबटीतपणा हा शब्द वाह्यातपणाशी तुलना करता बटबटीत आहे. मीही हाच शब्द वापरेन.

सुरुवातीचा 'सुबारू'चा जोकही मला आवडला. पण सिनेमा बघवलाच नाही, त्यामुळे संपूर्ण सिनेमाबद्दल काही म्हणणं कठीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.