मराठीतील वैज्ञानिक आणि विज्ञानविषयक साहित्य

मराठी साहित्यात विज्ञानविषयक आणि वैज्ञानिक संकल्पना आधारभूत मानून लिहिलेले काल्पनिक साहित्ये किंवा मनोरंजनासाठी लिहिलेल्या कादंबऱ्या कमी प्रमाणात आहेत.
नारळीकरांनी लिहिलेले त्यावेळी नावाजले गेले. मात्र विज्ञानाच्या बऱ्याचशा क्लिष्ट संकल्पना मराठीतून बऱ्याच लेखकांनी लिहिल्या. माझ्या वाचनात आलेले विज्ञानविषयक लिहिणारे मराठीतील लेखक म्हणजे नारळीकर, जावडेकर, मोहन आपटे, डॉ. प्रकाश तुपे, निरंजन घाटे, बाळ फोंडके, अच्युत गोडबोले हे आहेत.
इतर साहित्य प्रकारात मराठीत जशी बरीचशी प्रगती झाली आहे त्यामानाने विज्ञानविषयक साहित्य बाळबोध वाटते. आपल्याकडे वैज्ञानिक कादंबरी लिहिणारे फार कमी. विज्ञान विषयक लिहिणारे भरपूर. यंदाच्या साहित्य संमेलनात नारळीकर अध्यक्ष असल्याने विज्ञानविषयक चर्चा आणि इतर कार्यक्रम होतील अशी अपेक्षा होती. पण नेमाडे म्हणतात तसं साहित्य संमेलने ही सूज असल्यासारखी असतात. इकडची सूज कमी झाली की दुसरीकडे येते तशी संमेलने फक्त इव्हेंट साजरे करतात. त्यात विद्रोही संमेलनाचे वेगळेच दुकान चालू असते. त्यावर इथे नको चर्चा करायला.

माझा हेतू हा धागा तयार करण्याचा केवळ मराठीत विज्ञानविषयक साहित्य कमी असण्याबद्दल चर्चेचा आहे. मी काही पट्टीचा इंग्रजी साहित्य वाचक नाही. त्यामुळे आंग्लभाषीय वैज्ञानिक कलाकृती वर लिहू शकत नाही. इतर भाषांमध्ये विज्ञानविषयक नावाजलेले असेल त्याचा उल्लेख व थोडक्यात माहिती चर्चेत आली तर बरे होईल.

माझी काही मते खालीलप्रमाणे:

१) मराठीत विज्ञानविषयक साहित्य कमी असण्याचं मुख्य कारण मराठीतूनच कमी प्रमाणात विज्ञान शिकवलं जाते. त्यामुळे शाळेतून अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाची गोडी लागायला अडथळे येतात. इंग्रजी माध्यमातून विज्ञान शिकल्यामुळे कित्येक लोकांना मराठीतून विज्ञान वगैरे फारच बाळबोध वगैरे वाटते. त्याहुनही त्याचं साहित्य, कादंबरी वाचणारे ठराविकच.

२) मराठीतून विज्ञान विषयक माहिती देणारे साहित्य भरपूर उपलब्ध आहे. पण ते मनोरंजक वगैरे खूप कमी. विज्ञान कथा तर फारच तुटलेल्या वगैरे वाटतात. कोणी दर्जेदार वाचलेले कथासंग्रह किंवा कादंबऱ्या वाचलेल्या असतील तर चर्चेत उल्लेख करावा. ज्ञानात भर पडेल माझ्या. सत्यजित रे यांचे अनुवादित विज्ञान विषयक साहित्य त्याकाळात बंगाली भाषेत लिहिले गेले हे समजल्यावर मला फार भारी वाटले. मराठीत इतर साहित्याच्या बाबतीत चर्चा नको तेवढ्या ऊतु जातात. विज्ञानाच्या बाबतीत ढिम्म असतात. अणूचे अंतरंग विषयीचे एक मराठी पुस्तक कोण्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने लिहिलेले वाचले होते. नाव आठवत नाही लेखकाचे. पुण्यातील शनवार पेठेतील प्रकाशन होते हे माहिती आहे. मात्र तुरुंगात असताना पुस्तकाची टिपणं काढली होती असं प्रस्तावनेत वाचल्याचं स्मरते. जाणकारांनी याबद्दल माहिती द्यावी. ते पुस्तक वाचून बीएससी ला मला क्वांटम फिजिक्स समजायला सोपं गेलं होतं.

३) सध्याच्या घडीला आघाडीवर असणारे (३१४ विक्षिप्त अदिती यांच्या बिरुदावलीचा वापर करून) सर्वमाहितीसम्राट अच्युत गोडबोले यांची काही पुस्तके मला फारच आवडली. किमयागार त्यापैकी एक. पण नंतरची विज्ञानविषयक बरीच पुस्तके माहितीपर वर्गात मोडणारी. कधीकधी ते विज्ञान ललित लिहितात असे वाटते. मराठीत लिहिताना 'चक्क!' वगैरे शब्द येतात. अचंबित वगैरे होण्याचा फिल येतो वाचताना मला. लहानमुलांना समजावे तसे सोपे मराठी शब्द, वाक्ये वेगळी वाटतात वाचताना. कदाचित ते ज्याबद्दल लिहितात ते आधीपासूनच माहिती असल्याने किंवा त्याबद्दलची पुस्तके आधीच वाचल्याने वाटत असावे मला कदाचित. बहुतेक त्यांची विज्ञानविषयक पुस्तके सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत समजावीत म्हणून लिहिली असे वाटते. त्यांची बरीच पुस्तके मी वाचली काही आवडली जी संग्रहित ठेवली तर काही इनसायक्लोपेडिया टाईप वाटली. तसेच निरंजन घाटे, प्रकाश तुपे यांचे लेख, साहित्य पण विज्ञानविषयक वर्गातच मोडते माझ्या मते. आयुकाचे अरविंद गुप्ता, अरविंद परांजपे यांनीही मराठीत लिहिलेले लेख, पुस्तिका वाचल्या. पण हे सगळं माहितीपर वर्गात येतात. अनुवादित पण साहित्य मराठीत आहे. मात्र त्याचे मूळ साहित्य त्या त्या भाषेत रूजले. मराठीत तसं रुजलेलं का कमी? मराठीत मूळतः लिहिली गेलेली वैज्ञानिक कथा, कादंबरी फार कमी. लहानमुलांसाठी लिहिली गेलेली पुस्तके त्याहून वेगळी.

४) मराठीत लिखाण करून विज्ञान विषयक चळवळी माझ्या माहितीत नाहीत. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

विशेष सुचना: चर्चेत मराठीत लिखाण कमी होण्याची कारणमीमांसा, इतर भाषेतील साहित्याची तुलनात्मक चर्चा, नवीन लेखक आणि त्यांचे साहित्य प्रकार याबद्दल माहिती अपेक्षित आहे. कारण मराठीत गणित आणि विज्ञान क्षेत्रात मातब्बर लोकांची मांदियाळी खूप मोठी. साहित्यक्षेत्रात मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

माझ्या वाचनात आलेले विज्ञानविषयक लिहिणारे मराठीतील लेखक म्हणजे नारळीकर, जावडेकर, मोहन आपटे, डॉ. प्रकाश तुपे, निरंजन घाटे, बाळ फोंडके, अच्युत गोडबोले हे आहेत.

अच्युत गोडबोले???

हम्म्म्म्म्... असेल ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांची काही पुस्तके मला आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

किमयागार, बोर्डरूम मलाही आवडलं.

न'बांचे "पठ्ठ्या" आणि "चक्क" वाले चक्क हिंसक विचार वाचून माझ्यासारख्या अच्युत गोडबोले आवडणाऱ्या पठ्ठ्याला सुद्धा चक्क हसू आलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान विषयावर मराठीत लिहिताना असे शब्द व वाक्ये कशी सुचली याचं नवल वाटले होते.
मुळात मला त्यांच्या एकूण आवाक्याबद्दल कुतूहल आहे. बेडेकरांच्या मागोवा चळवळीतून आलेले बरेच जण समाजवादी किंवा साम्यवादी पंथात गेले. गोडबोले मात्र समाजवादी दृष्टीने सगळ्या प्रश्नांची उकल करतात. अर्थव्यवस्था विषयक पुस्तकात तर ते वाचताना लगेचच जाणवते.
त्यांच्या लेखनाविषयी आदर आहेच. बऱ्याचच लोकांना ते आवडतही नाहीत. कारण त्यांना त्यांच्या लिखाणात साहित्य सापडत नाही माहिती मिळते. प्रत्येकाची मते मतांतरे असू शकतात.

मलाही बोर्डरुम आवडलं. मुसाफिर थोडं प्रचारकी वाटलं. बाकी पाश्चिमात्य साहित्य, संगीत, कला, विज्ञान वगैरे विषयावर बुंदी पाडावी तशी पुस्तके पाडत असतात बुवा ते. मला तर कधीकधी वाटतं ते पॉर्नोग्राफी हा विषय सोडून सगळ्या विषयांवर पुस्तके लिहितील. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

आमच्या पूर्वजांना सर्व आधुनिक विज्ञान/ तंत्रज्ञान येत होते. एवढेच नव्हे, तर पाश्चात्य विज्ञानास भविष्यकाळात लागू शकणारे सर्व शोधही त्यांनी लाखो वर्षांपूर्वीच लावलेले होते (पाश्चात्य विज्ञानास ते शोध भविष्यात लागेपर्यंत ते नेमके कोणते होते, ते सांगतां येणार नाही, कारण परकीय आक्रमणे आणि पुरोगामी लोक यांमुळे ते नष्ट झाले). पतंजली वगैरे ते सगळे ज्ञानभांडार पुन्हा डिस्कव्हर करताहेत, पण नतद्रष्ट पुरोगामी त्याची खिल्ली उडवतात.

हत्तीचे मुंडके गणपतीच्या धडास प्लास्टिक सर्जरीने जोडण्यात आले इ. आमचे पंतप्रधान जाहीररित्या सांगतात. कोणी मुख्यमंत्री ह्मणतो, संजयाची दूरदृष्टी इंटरनेट वापरून आलेली होती.

तत्सम लेख “ऐसी” वरही येतात.

अशी जबरदस्त सायंटिफिक फॅक्ट असताना वर आणखी सायन्स फिक्षनची गरजच काय?

सायन्स फिक्षन त्या मागासलेल्या पाश्चात्यांनाच लखलाभ!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

गेली कित्येक दशके मनुवादी लोकांचीच सगळ्याच क्षेत्रात सत्ता, हुकुमत आणि प्रभाव होता. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टीने आपण मागासलेले आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

“पुरोगामी” ऐवजी तुह्मी चुकून “मनुवादी” ह्मणताय काय? की “गेली कित्येक दशके” (बोले तो, २०१४ पर्यंत) मनुवादी सत्तेत होते असे तुह्मांस खरोखरच ह्मणायचे आहे? ऐकावे ते नवलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

धाग्याच्या विषयाबद्दल ५ तारे आणि धागा काढल्याबद्दलही ५ तारे.

मराठीतल्या उत्तम विज्ञानकथा - हे म्हणजे दुर्मिळ रत्नांचा शोध घेण्यासारखं आहे.
खरं तर माझ्या लहानपणी (१९८०-९०) दशकांत उत्तम मराठी विज्ञानविषयक लेखन उपलब्ध होतं. मोहन आपटे ह्यांची अनेक विषयवार पुस्तकं (खगोलशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र इ. - मला उत्तर हवंय ही माला), बाळ फोंडके, निरंजन घाटे, रमेश महाले(?), जगदीश काबरे इ.इ. ची पुस्तकं वाचून बऱ्यापैकी विज्ञान कशाशी खातात हे समजलं होतं.
विज्ञानयुग सारखं उत्तम मासिक जवळपास २००० सालापर्यंत जोमाने चालू होतं - त्यांचा दिवाळी अंक हा खास विज्ञानकथांचा असे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाई.
पण मग इंटरनेट आणि जागतिकीकरण आलं - आणि "इंग्रजी" भाषेतल्या विज्ञानविषयक साहित्याची ओळख सोप्पी झाली.
एकदा इंग्रजी विज्ञानकथा वाचल्यावर मग मराठीतल्या तुटपुंज्या विज्ञानकथांवर भागणं शक्यच नव्हतं.

विज्ञानकथांमधेही उपप्रकार असतात, त्यात पुन्हा उप-उप प्रकार असतात, कथा फँटसीच्या जवळ जाणाऱ्या आणि संमिश्र असू शकतात - त्याला "साहित्य" म्हणता येईल इतकं ते प्रगल्भ असतं - हे सगळं वाचल्यावर मराठी दुर्दैवाने फार म्हणजे फारच बाळबोध वाटू लागलं (नारळीकरांच्या कथादेखील एका मर्यादेपलिकडे बोअर आणि सपाट असतात, पण ते वैज्ञानिक आहेत, लेखन नव्हे).

हे असं का?
मला वाटतं विज्ञान जेवढं पाश्चिमात्य देशांत रूजलं आहे तेवढं आपल्याकडे रूजलंच नाही. म्हणजे तिथलं पल्प फिक्षनही कुठल्यातरी सायन्सफिक्शनचे असतात (सिटकॉम, बी-मूवी, पोस्टर, चित्रपट, पेपरब्याक पुस्तकं)

आपल्याकडे पल्प फिक्षन ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असतं. (कादंबऱ्या, वैचारिक लेख, माहिती, प्रवास, आत्मचरित्र). फार तर ललित वगैरे किंवा मग कौटुंबिक वळणावर जातंच.

उत्तम विज्ञानकादंबरी मराठीत लिहिलीच तर ती खपण्याची शक्यता शून्य. त्या मानाने लोक भारतीय लोकांनी इंग्रजीत लिहिलेल्या विज्ञानकथा वाचतील तरी. (बरेच भारतीय लेखक इंग्रजीत फँटसी लिहितातच - त्यातही पुन्हा मायथॉलॉजीवर जोर देऊन.)

एक हॅरी पॉटर हवा मराठी विज्ञानलेखनाला- मग दिवस पालटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वल या विषयावर तुमच्या प्रतिसादाचीच वाट पहात होते. कारण आपल्याला या विषयात रुचि असल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी मान्य.
आपल्याकडे फिक्टिशिअस कँरँक्टर लिहिली तर त्यांचे धागे दोरे लागलीच पुराणकालीन संदर्भात शोधले जातात. मायथॉलॉजीचा प्रभाव तर असतोच असतो. मला नेहमी जाणवते की इंग्रजी कथा कादंबरी वर आधारित सिनेमांना जेवढे ग्लॅमर मिळते तेवढे मराठीतील विज्ञान कथांच्या सिनेमाला कधीच मिळू शकत नाही.
इंग्रजी सिनेमात म्हणाल तर मला नोलन चे सिनेमे आवडतात. कारण वैज्ञानिक संकल्पना ज्याप्रकारे तो दाखवतो ते लाजवाब असते.

मराठीत विज्ञानविषयक लेखन भरपूर आहे. विशेषतः कित्येक मराठी माणसं गणित आणि विज्ञान संबंधित संस्थेत बरेचदा आढळतात. ती बहुतेक मराठीत विज्ञानविषयक लेखन करतात. विज्ञान साहित्य प्रकार फार कमी.

भारतीय इतर भाषेत कोणी लिहिले असेल तर माहिती नाही. एक माझा तमिळ मित्र सांगत होता की तमिळी भाषेत खूप चांगल्या कथा, कादंबऱ्या आहेत सायन्स फिक्शन संबंधित.

बंगाली, कन्नड, तमिळ, मल्याळम वगैरे भाषेतील विज्ञान साहित्य मराठीत कोणी भाषांतरित करते का?
इतर साहित्य भाषांतरित होत असतात नेहमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

मराठी भाषेतून चांगल्या वैज्ञानिक कल्पना सांगणं थोडं कठीण आहे ( आठवा - संपृक्त द्रावण/उदजन ध्वम/ इ.इ. भयाकारी शब्द)
हे मान्य. पण कल्पना तरी तोकड्या असू नयेत?
मराठीत मुळात काहीतरी भव्य- कमालीचं नवीन-असं लिहिलं तरी जातं का?
म्हणजे उदा. भयकथा-कादंबऱ्यांचं उदाहरण घेऊ - "द साँग ऑफ काली" हे इंग्रजी लेखकाचं पुस्तक कलकत्ता शहर आणि त्यात घडलेल्या घटना ह्यांचं कमालीचं परिणामकारक वर्णन करतं.
एकाही मराठी साहित्यिकाला(!) मुंबैबद्दल ह्या अंगाने काहीच लिहिता येऊ नये? मतकरींच्या काही छोट्या गोष्टींमधे मुंबैवर बेतलेल्या काही थीम्स आहेत पण त्यातल्या किती उधार आहेत देव जाणे( स्टीफन किंगच्या "the last rung on the ladder" ह्या अप्रतिम गोष्टीची मतकरींंनी मुबैत बेतून वाट लावलीच)

मुंबैला भय हे अंग नाहीच का? जे काही भयकथा-कादंबरी म्हणून लिहिलं जातं तेही मिळमिळीत मध्यमवर्गीयांना पचेल एवढंच. (धारपांच्या कथा -ज्यात नायक/नायिका भयाला एकदम कौटुंबिक अंग देऊन कथेतली मजाच हरवून टाकतात.)
त्यापेक्षा दळवींच्या कादंबऱ्या/कथांमधे मुंबैचं भयाकारी अंग जास्त जाणवतं तरी.

आता वरचं उदाहरण भयकथेचं का? कारण एखाद्या 'अ' दर्जाच्या इंग्रजी विज्ञानकथा कादंबरीशी तुलना होईल असं मराठीत काही लिहिलंच जात नाही.
कथा तरी त्या मानाने सोपी आही- एका कल्पनेचा विस्तार केला तरीही उत्तम लिखाण होऊ शकतं. त्यातही पुन्हा फार काही "विज्ञान" असलं पाहिजे असं मुळीच नाही (the ugly little boy- ॲसिमोव किंवा flowers for algernon ) पण मराठीत 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' ही बेसिक अंगच तथाकथित साहित्याचा भाग मानली जात नाहीत.
असो. आणखी पुन्हा कधी तरी.
------------------------
@स्वयंभू - भारतीय भाषांमधलं विज्ञान साहित्य शोधणं कठीण आहे पण भारतील लेखकांनी इंग्रजीत लिहिलं विज्ञान साहित्य शोधणं आणि सापडणं तुलनेने सोप्पं आहे. ते मिळायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत असताना नववीच्या वर्षात विज्ञानाच्या पुस्तकात प्राण्यांच्या बद्दल धडा होता. त्यात "ग्रसनीस कल्लाविदरे नसतात" हे वाक्य अजूनही आठवतं. नंतर अकरावी बारावी सायन्स घेतले होते सुरुवातीला इंग्रजीत सगळं असल्याने अवघड वाटायचं. पण नंतर बरेचदा मराठीपेक्षा इंग्रजीत वाचलेलं लवकर समजतं गणित किंवा विज्ञान. सोबत विज्ञानविषयक मराठीत लिखाण आवडीने वाचू लागलो. नंतर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश जसे इंटरनेटवर उपलब्ध झाले तेव्हा बऱ्यापैकी वैज्ञानिक संकल्पना विषयी मराठीत वाचायला मिळाले. नंतर
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर बरीच मराठीतील पीडीएफ पुस्तके मिळाली. मात्र त्यातही विज्ञानविषयक पुस्तके बरीच आहेत. तशीच एक ईपुस्तकालयची वेबसाईट. इथे पण बरीच जूनी पुस्तके उपलब्ध आहेत.

मराठीत कित्येक उत्तम कथा, कादंबरी, ललित साहित्य उपलब्ध आहे. कित्येक लेखक शास्त्र विषयातील पदवीधर आहेत. तरीदखील मराठी विज्ञान साहित्य फार कमी.

आपल्याकडे मातृभाषेतून शिक्षण घेणे दुय्यम दर्जाचे वाटते बरेच जणांना. विज्ञानाचे कित्येक महत्त्वाचे प्रबंध मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या मातृभाषेत लिहिले. भारतात जगदीश चंद्र बोस यांनी बंगाली भाषेतून त्यांचा प्रबंध का रिसर्च पेपर लिहिला होता/सादर केला होता असे वाचल्याचे आठवते. तसेच मुरली मनोहर जोशी ह्यांनी फिजिक्स मध्ये डॉक्टरेट मिळवली. त्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी विषयावर हिंदीमध्ये प्रबंध का रिसर्च पेपर लिहिला होता. हे विकिपीडियावर आहे. युरोपियन तत्कालीन शास्त्रज्ञ, गणितज्ञ हे त्यांच्या मातृभाषेतून लिखाण करीत असत. भारतात म्हणाल तर गणित, विज्ञानाच्या बाबतीत मराठी लोक जसे आघाडीवर आहेत तसे बंगाल आणि तमिळ मधलेपण आहेत. मी कॉलेजमध्ये असताना बरेचदा मराठी, बंगाली, तमिळी लेखकांची पुस्तके संदर्भासाठी वापरली. इतर भाषांमध्ये विज्ञानाच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती नाही. मात्र मराठीतून विज्ञान शिकवणं बरेचदा जिकरीचे जाते.

दुसरी गोष्ट शाळेत किंवा कॉलेजमध्ये विज्ञानाची गोडी लागावी म्हणून जे काही उपक्रम राबवले जातात त्यापैकी विज्ञान सहल वगैरे ऐतिहासिक प्रकार ज्याने शोधून काढलाय त्याला नमन. कारण त्या सहलीचे प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करतात एक्टीव्हीटी म्हणून. त्यामुळे अशा उपक्रमात मुलांना फक्त माहिती मिळते.

कला शाखेच्या पदवीधरांना जशी मराठी साहित्य विषयक पुस्तके क्रमिक अभ्यासाला असतात तशी विज्ञान साहित्य विषयी पुस्तके असतात का माहिती नाही. असतील तर त्याचा उपयोग विज्ञान कथा, कादंबरी विषयी प्रचार, प्रसार आणि आवड निर्माण करेल. असं मला वाटतं.

बाकी असिमोव्ह, हाईनलीन, आर्थर क्लार्क वगैरे मंडळी पायोनियर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

स्वयंभू, साय फाय साठी ब्लॅक मिरर नक्की बघा. एक नंबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॅक मिररबद्दल ऐसीच्या दिवाळी अंकातला हा एक जुना लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विज्ञानविषयक लेखकांच्या यादीत नंदा खरे हेही नाव जोडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एका पुणेकराची टाईम ट्रँव्हल स्टोरी होती. भाषा इतिहासकालीन होती भूतकाळातील गोष्टीची. भारी वाटली होती.

त्यांचे उद्या नावाचे पुस्तक वाचायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

मराठीत वैज्ञानिक साहित्य निर्माण होण्यास, माझ्या मतें, तीन अत्यावश्यक मुद्दे आहेत. १) जी वैज्ञानिक संकल्पना उपयोगात आणायची त्याची अचूक आणि स्वच्छ माहिती २) सर्व सामान्यांना संकल्पनेच्या मूलभूत स्वरूपाकडे न नेता आयुष्यात प्रभाव कसा पडू शकेल असे लिहिण्यास लागणारी 'प्रतिभा' ३) आणि लिखाणाला आवश्यक तेवढे भाषेवर प्रभुत्व. एकाच वेळी या तीनही गोष्टी एकाच व्यक्तीत आढळणे खूपच दुर्मिळ आहे. अर्थात विज्ञानाचा सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंध आहे हेच मुळी विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांच्या गावीं नाही या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू