असाही एक कवितेचा दिवस

एखाद्या सकाळी तुम्ही जागे होता. आणि तुमच्या नेहमीच्या सरावलेल्या कामाला लागता, ते म्हणजे - Brooding. हे अर्थात रुसणं, चिडलेलं असणं, नाराज असणं, स्वत:शी नकारात्मक बोलणं यात तुम्ही इतके पारंगत झालेले असता म्हणुन सांगू - की तुमच्या लक्षातही येत नाही आपण स्वत:वरती, जगावरती इन फॅक्ट आपल्याला झेलणाऱ्या आपल्या प्रियजनांवरती नाराज आहोत. अहो का म्हणुन का विचारता - नेहमीचं अगदी सवयीचं असतं ना ते. शिवाय कित्ती कित्ती सोईस्कर!! एकदा चिडीला आलेलं असलं की लोक आपल्याला एकटं सोडतात. बद्ध्कोष्ठ झाल्यासारखा आपला चेहरा पाहून कोणी आपल्याशी बोलायला धजावत नाही. आपल्याला कसा गर्दीतला, एकांत मिळतो - वेळ मिळतो - अजुन धुसफुसायला, रडगाणं गायला, आपण किती गं कमनशीबी आहोत हे पुन:पुन्हा उगाळून स्वत:ला पटवुन द्यायला.

तसेच कसंबसं कामधाम, आटोपून आपण लायब्ररीची वाट धरतो. आज काय तर कवितांचा मूड असतो. मेरी ऑलिव्हरची २-३ पुस्तकं काखोटीला मारुन आपण बाहेर पडतो ते थेट बागेत जाउन बसतो, वाचू लागतो.

आणि एक गंमत होउ लागते,नवल होते - तिच्या कविता वाचता वाचता आपल्या चेहेऱ्यावरती स्मितहास्य उमटते. आणि मग अहो, दर ५-७ मिनीटांना ते उमटु लागते. मन कसे हलके हलके प्रसन्न होउ लागते. मेरीच्या निसर्गकविता ऐकता ऐकता आपल्या जवळ चाललेली खारींचा दबकत तर कधी धाडसाने होणारा वावर आपल्या लक्षात येउ लागतो. तिच्या कवितेतील ऑटर, कोल्हा, कोयोटे, लार्क आणि होय कबूतरे, हंसही अचानक आपल्या अवतीभवती लगबग करु लागतात. समोरच एक नीळेशार तळे च कुठुन तरी येते, बरं असं साधंसुधं नाही तर कमळं उमललेलं तळं. मेरीने एका मुलाखतीमध्ये सांगीतलेले वाक्य आपल्याला आठवते - मेरी म्हणते "मी कुठेतरी लपवुन ठेवलेला कवितांचा खजिना जर कधी तुम्हाला सापडला तर एक खात्री असू द्या तो खजिना प्रेम या विषयाबद्दलच्या कवितांचाच असेल. त्या कवितांमध्ये रागाला थाराच नसेल. अंहं!!" किती साधं आणि तरी तिचा जीवनविषयक सकारात्मक दृष्टीकोन परफेक्ट् सांगणारं वाक्य आहे ना!

माझ्या रोजच्या रुटीन जीवनात आपल्या निसर्गकवितांनी भरभरुन, उल्हास पेरणारी माझी अतिशय आवडती कवि - मेरी ऑलिव्हर. आपल्या कवितांमधुन,व्यक्तीव्यक्तीमधील रेशमी, तलम आणि तितक्याच टिकाउ संबंधावरचे तिचे भाष्य असो की प्रेमकविता असोत, निसर्गकविता असोत की साध्या २ ओळी असोत, प्रेरणादायी, मनामध्ये आशेचा किरण चमकावणाऱ्या अशा तिच्या कविता असतात. मृत्युविषयक कवितांमध्येही दुर्दम्य आशावाद असतो. "I AM PLEASED TO TELL YOU Mr. Death" ही कविता घ्या.

ती म्हणते हे मृत्यु तुझा हा जो मारे भारदस्त असा काळा कभिन्न रोब तू घातलेला आहेस ना तुला माहीतही नाही या रोबला भोकं पडलेली आहेत. - I am pleased to tell you, there are rifts in your long black coat. का सांगते ऐक - आज मला रुमी भेटायला आलेला होता. हांआता तो प्रत्यक्ष माझ्याशी बोलत नव्हता इतकेच काय तो उंच होता की खुजा तेही मी सांगू शकणार नाही. आणि तरीही, मी ज्या वृक्षाखाली बसून रुमीची कविता वाचली त्या वृक्षाइतकाच खराखुरा तो माझ्या समीप होता, माझ्याशी संवाद साधत होता. त्याने मला त्याच्या काही कविता ऐकवल्या. मी आणि तो वृक्ष, आम्ही दोघांनीही कवितांचा आस्वाद घेतला. आज मला रुमी भेटला कारण तो तुझ्या फाटक्या रोबमध्ये मावलाच नाही. तुझ्या त्या भीतीदायक रोबला पडलेल्या उसवणीतून तो केव्हाच निसटला होता.

I AM PLEASED TO TELL YOU

Mr. Death, I am pleased to tell you, there
are rifts in your long black coat. Today
Rumi came visiting, and not for
the first time. True he didn't speak with
his tongue but from memory, and whether
he was short or tall I still don't know.
But he was as real at the tree I was
under. Just because something's physical
doesn't mean it's the greatest. He
offered a poem or two, then sauntered on.
I sat awhile feeling content and feeling
contentment in the tree also. Isn't
everything in the world shared? And one
of the poems contained a tree, so of
course the tree felt included. That's
Rumi, who has no trouble slipping out of
your long coat, oh Mr. Death.

मेरीच्या अनेकानेक सुंदर निसर्गकविता वाचताना, प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल, लता-वृक्ष-वल्लरींबद्दल एक आत्मियता दाटून येते. फार भारी उपमा मी तरी तिच्या कवितांत कधीच वाचलेल्या नाहीत परंतु एक जो जेन्युइन म्हणजे खरेपणा आहे ना तो अस्खलित आहे. मोमेन्टस कविता माझी फार आवडती आहे. झपाटलेल्या आणि उत्कट अशा दुर्मिळ क्षणांबद्दल बोलताना म्हणते - काहीच क्षण अयुष्यात असे येतात, की ज्या क्षणांत, सावधानता बाळगत बसलात तर तुमच्यासारखे कपाळकरंटे तुम्हीच ठराल.

Moments

There are moments that cry out to be fulfilled.
Like, telling someone you love them.
Or giving your money away, all of it.

Your heart is beating, isn’t it?
You’re not in chains, are you?

There is nothing more pathetic than caution
when headlong might save a life,
even, possibly, your own.

'This Morning' कवितेत ती म्हणते - बागेत रेड्बर्डची अंडी उललेली आहेत आणि इवलीशी पिल्लं चोच वासुन 'भूक-भूक' करताहेत. त्यांना हे माहीत नाही की पुढचा घास कोण देणार आहे, कधी देणार आहे , कसा आपल्या मुखात पडेल, काह्ही नाही आणि तरीही या इवल्या पोरट्यांचा, 'अजुन दे- अजुन दे' म्हणुन चिवचिवाट चाललाय. डोळेही न उघडलेल्या त्यांना ना विशाल आकाश अजुन माहीत झालय ना उंच डेरेदार वृक्ष ज्यावर बसून ते पुढे झोके घेणार आहेत. अहो त्यांना हेही माहीत नाही की त्यांना ईश्वराने पंख दिले आहेत. आणि हा असा जगातील नवलसोहळा माझ्या अंगणात कसलाही गाजावाजा न करता,आज घडतो आहे.
This Morning
This morning the redbirds’ eggs
have hatched and already the chicks
are chirping for food. They don’t
know where it’s coming from, they
just keep shouting, “More! More!”
As to anything else, they haven’t
had a single thought. Their eyes
haven’t yet opened, they know nothing
about the sky that’s waiting. Or
the thousands, the millions of trees.
They don’t even know they have wings.
.
And just like that, like a simple
neighborhood event, a miracle is
taking place.

अशा साध्या साध्या कवितांमधुन एक वेगळच विश्व, निसर्गातल्या विश्वासाचं, श्रद्धेचं आणि निरागसतेचं ती ताकदीने, साकारते. तुम्हीच सांगा अशा कविता वाचताना कोणाचा तरी मूड बिनसलेला राहू शकेल का? आणि म्हणुनच आपला दिवस खूप मस्त गेल्याची भावना येत जाते, टिकते. तेव्हा कधीकधी अशा कवितावाल्या औषधांचीही गरज आपल्याला असते. नाही का?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अनंतयात्री.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं लिहिलय सामो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मनीषा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला परिच्छेद पटला. कवितेचा वाचनाचा भाग सोडून बाकी प्रकटन आवडले.
हा लेख माझ्यासाठी कविताच समजतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद च्रट्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामो, तुह्मी फार सुंदर अनुभव घेता आणि ते तितक्याच अर्थवाही शब्दांत शेअर करता! वरील लेखाने तो उत्कट अनुभव अटलांटिकपार माझ्यापर्यंत अलगद पोचला आणि “मिजाज शायराना” करून गेला, त्याबद्दल ही दाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

वाह!!! आपली दाद पोचली. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! झकास मामी!
लेख आवडला.
मला कविता ही सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ति वाटते. कवितेइतकं प्रामाणिक दुसऱ्या फॉर्मला होण्याची मुभा नसते असं वाटतं. रॉ, पूर्णतः खरी अशी केवळ कविताच असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

थँक्स पुंबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0