शेजारच्या काकांच्या मॅक आणि कपवापरावरून खळबळ

कॉफी कप मॅक कीबोर्ड

भांडुप, मुंबई, दिनांक ५ ऑगस्ट. शेजारच्या काकांच्या कप आणि कीबोर्डच्या फोटोमुळे कॉलनीत खळबळ उडाली आहे. सदर काका विविध, महागड्या ‌वस्तू वापरण्यासाठी प्रसिद्ध असताना काकांनी दोन कॉफ्या एकाच कपातून प्यायल्या असं दिसणारा फोटो व्हॉट्सॅपवर व्हायरल गेला आहे.

त्याबद्दल बोलताना एका कॉलेजकन्यकेचं म्हणणं पडलं की काका नेहमी महागड्या वस्तू आणतात. काकांकडे फक्त मॅकच आहे असं नाही, तर काका मॅकच्या सगळ्या ॲक्सेसरीजही आणतात. काकांच्यलयया घरी गेलं तर ते एकवेळ पाणी विचारणं विसरतील, पण मॅकबद्दल बोलायला विसरणार नाहीत. त्यांच्या घरी गेलं की हमखास कुठली तरी नवी ॲपलची वस्तू आलेली दिसते.

यावर आम्ही आमच्या तज्ज्ञांना विचारले असता, त्यांचे त्यावर दोन गट पडले. एकांनी प्रश्न विचारला, कपाकडे पाहता, काकांनी तीच कॉफी एकदा गरम आणि एकदा गार करून प्यायली असावी असं वाटतं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं पडलं की यात काकांनी दोनदा कॉफी प्यायली असावी. पहिल्या गटाला हा कप काकांचा आहे का काकूंचा आहे यावरही काही मत नव्हतं. दुसऱ्या गटाचं मात्र ठाम म्हणणं पडलं की हा कप काकांचाच आहे. "दोन्ही बाजूंनी, दोन्ही हातांनी कप हातात धरून कॉफी प्यायलेली दिसते; एवढा वेंधळेपणा काकू करणं शक्यच नाही", असं या गटाचं म्हणणं आहे.

शेजारच्या कॉलेजकन्यकेकडून याला दुजोरा मिळाला. "काकांनी हल्लीच कॉफीचं नवं यंत्र घेतलं आहे. ॲपल कॉफीयंत्र विकत नसल्यामुळे किमान आयफोनवरून चालवता येईल असं यंत्रं काकांना हवं होतं. पण शेवटी यंत्रात कॉफी, पाणी, वगैरे गोष्टी हातानंच घालाव्या लागतात हे समजल्यावर काका हताश झाले होते." शिवाय काका दोन्ही हातांनी कॉफी पितात का, या प्रश्नावरही तिनं मार्मिक टिप्पणी केली. "आयफोन जसा दोन्ही हातांनी वापरावा लागतो, तसंच ते सगळ्या गोष्टी दोन्ही हातांनी करण्याचा प्रयत्न करत असतात."

काका ॲपलचे फॅन असले तरी एकाच कपातून एवढ्या वेळा कॉफी का पित होते, याचं उत्तरमात्र अजूनही कॉलनीला मिळालेलं नाही. त्यामुळे अजूनही कॉलनीत सगळ्यांच्या मनात चलबिचल आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जरा माणसाला कळू शकेल, असे काही लिहायला काय घ्याल?

नाही, केवळ तुमचे लिखाण समजावे, याकरिता फेसबुकाचा सदस्य होण्याची अपेक्षा अती होते. सबब, जमणार नाही. आणि प्रयत्नदेखील करणार नाही.

तेथे त्या पटाईतकाकांनी पतंजलीची एजन्सी नि रामदेवबाबाचे वकीलपत्र घेतले आहे, तद्वत काहीतरी तुम्ही फेसबुकाच्या बाबतीत केले आहे काय?

सोडा हे लष्करच्या भाकऱ्या भाजणे!

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

किमान तुम्हाला 'द अनियन' माहीत असेल, आणि असले "काहीही हं" छापाचे विनोद परिचयाचे असतील असं वाटलं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगल्या कार्याची माहिती देणे म्हणजे अजेन्सी घेणे असे असेल तर मला त्याचा गर्वच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

श्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... पण हा कप कॉफीचाच आहे कशावरून?
काकांनी त्यांच्या पोष्टीत तस मेन्शन केलय का? तसं असेल तर ठीक. (कपाच्या एकंदर अवस्थेवरून काका फारसे नीट नेटके नसावेत अस वाटतं. किंवा नीट नेटकेपणा करायला त्यांना फारसा वेळ मिळत नसावा.)
काकांनी हा कप कॉफीचाच आहे असे टाईपलं नसेल तर संशयाला वाव आहे असं वाटत नाही का? अन्य कुठलाही (कॉफीसदृश्य द्रव पदार्थ) असू शकतो. तसं वासावरून व्हेरीफाय करता येईल पण फोटोतून वास कसा येणार?
सबब अजून माहितीची आवश्यकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

काका ॲपलचे फॅन असले तरी एकाच कपातून एवढ्या वेळा कॉफी का पित होते

काका पर्यावरणप्रेमी आहेत हे विसरता कि काय? पुनर्वापर हा पर्यावरणाचा पाया आहे. मी तर झूम मिटिंगमधे भोकाचा टी शर्ट घालतो. पाठीवर भोक असले तर झूमला त्याचे काय? शिवाय कॅमेरा बंद ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/