एम अँड द बिग हूम

Em and the Big Hoom

रीटा वेलिणकर वाचल्यानंतर, जेरी पिंटो यांचं 'एम अँड द बिग हूम' वाचणं साहजिक वाटलं. मी मूळ पुस्तक वाचलं, पण शांता गोखलेंनी याचा मराठी अनुवादही केला आहे. आणि शांता गोखलेंबद्दल मिळेल ती माहिती घेताना, त्या दोघांचा एक फार सुंदर व्हिडियो बघायला मिळाला, ज्यात दोघांच्या मैत्रीची झलक बघायला मिळाली. या पुस्तकाला २०१६मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि त्याच वर्षी, अमेरिकेचा विंडहॅम-कॅम्पबेल पुरस्कारही मिळाला.

मूळ गोव्यातल्या, पण मुंबईत स्थायिक झालेल्या, मेंडेझ कुटुंबाची ही गोष्ट आहे. एम म्हणजे इमेल्डा. आणि द बिग हूम म्हणजे ऑगस्टीन. या नावांमागची गंमत काय आहे हे पुस्तक वाचतानाच कळलेलं बरं, म्हणून इथे सांगत नाही. हे दोघं आणि त्यांची दोन मुलं असं हे कुटुंब आहे. या पुस्तकाचं निवेदन मुलानं केलं आहे त्यामुळे त्याचं नाव कुठे येत नाही. मुलीचं नाव सूझन. ती तिच्या भावापेक्षा मोठी आहे. मुलाच्या जन्माच्या आसपास इमेल्डाला मॅनिक डिप्रेसिव्ह मनोविकार होतो, ज्याच्यासाठी हल्ली द्विध्रुवी मनोविकार (बायपोलर डिसऑर्डर) हे नाव रूढ झालं आहे. या आजारात दोन स्थिती येतात. नावाप्रमाणे दोन ध्रुवांवरच्या असाव्यात अशा या दोन अवस्था असतात. काही दिवस रुग्ण अत्यंत बडबडा, उत्साही, सतत काहीतरी करत राहणारा असा असतो. यात तो वा ती आनंदीच असेल असं नाही. पण नेहमीपेक्षा जास्त उत्साह असलेली ही अवस्था असते. याच्या बरोबर उलट अवस्था येते आणि ती रुग्णाला निराशेच्या खोल गर्तेत घेऊन जाणारी असते. या स्थितीत निष्क्रियता येणे, निपचीत पडून राहणे इथपासून ते अगदी आत्महत्या करावीशी वाटण्यापर्यंत मानसिक अवस्था खालावू शकते. या दोन्ही अवस्था एकापाठोपाठ एक अशा आयुष्यभर येत राहतात. हा आजार बरा होणारा नाही. अनेकदा या आजाराचं स्किझोफ्रेनिया असं चुकीचं निदान करून त्याची औषधं रुग्णाला दिली जातात. या पुस्तकातही त्याबद्दल लिहिलं आहे.

तरुणपणी नुसतीच नोकरी करणारी नव्हे, तर आई-वडिलांचं घर चालवणारी एम या आजाराच्या विळख्यात सापडते आणि तिचं सगळं जग त्यांच्या माहीमच्या चारशे स्क्वेअरफूट घरात बंदिस्त होऊन जातं. आपली आई घरात एकटी राहिली तर ती आत्महत्या करेल ही भीती तिच्या दोन्ही मुलांच्या दिनचर्येचा भाग होते. कुठेही बाहेर जाताना, आपण नसताना आपली आई आत्महत्या करेल काय, हा विचार करून त्याप्रमाणे आपलं बाहेर जाणं मुलं आखू लागतात. पूर्णवेळची नर्स ठेवूनही, ती झोपलेली असताना एम आत्महत्या करायचा प्रयत्न करते आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची वेळ येते. जे. जे. हॉस्पिटलचा तेहतीस नंबरचा सायकिएट्रिक वॉर्डही तोवर या मुलांच्या ओळखीचा झालेला असतो. अगदीच असह्य झाल्यावर कधी कधी एम स्वतःच, "मला हॉस्पिटलमध्ये न्या," म्हणून सांगत असते. आपल्या आईबद्दल लिहिताना लेखकानं सुरवातीला, 'when we found out she wasn't whole' हा वाक्यप्रयोग केला आहे. तिच्या आजाराच्या वर्णनासाठी वापरलेले असे अनेक सुंदर वाक्यप्रयोग या पुस्तकात दिसतात. पण बाहेरच्या जगात मात्र तिला 'वेडी' म्हणणारेच लोक जास्त आढळतात. आईला वेडं म्हणणारं बाहेरचं जग; घरात आजाराच्या भोवऱ्यात कधी गटांगळ्या खाणारी तर कधी विनोद करणारी, कुणाचीही तमा न बाळगता भाषेचा मुक्त वापर करणारी, सतत विड्या ओढणारी आपली आई; आणि अशा दोन जगांत वावरणारा तिचा मुलगा, तिच्याकडे एखाद्या लोलकातून बघतो आहे असं हे पुस्तक वाचताना जाणवतं. हे पुस्तक वाचणं सोपं नाही. सिनेमा बघताना हमखास डोळ्यातून पाणी काढणारे प्रसंग, पुस्तक वाचताना मात्र कमी वेळा अनुभवले आहेत. पण हे पुस्तक याला अपवाद आहे. काही काही परिच्छेद वाचून मानसिक त्रास झाल्यामुळे, आता आपण थोडा वेळ हे वाचायला नको असंही वाटून गेलं. पण तो थोडा वेळ फार तर फार दहा मिनिटांपुरताच टिकायचा.

पुस्तकातला बहुतांश (म्हणजे मुलं मोठी होत असतानाचा) काळ १९७० ते १९८५चा असावा असं त्यातल्या काही तपशिलांवरून वाटतं. भारतात मानसिक आजारांबद्दल लोकांमध्ये आजही कमालीची अनास्था आहे. त्या वेळी काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. बाहेरच्या जगात स्थान नसलेली एम, घरात मात्र राणी असते. सगळं घर तिच्या तंत्रानं चालत असतं. ऑगस्टीनकडून तिला विड्यांचा अविरत पुरवठा होत असतो आणि विड्या ओढता ओढता ती तिच्या मुलांना तिची आणि त्यांच्या बाबाची प्रेमकहाणी ऐकवत असते. ही गोष्ट सरळ रेषेत लिहिलेली नाही. एमच्या मनासारखी ती सैरभैर आहे. पण पुस्तकाच्या नायिकेचा, वाचकालाही खचवून आणि दमवून टाकणारा मनोविकार, आणि त्यात अचानक कधीही उद्भवणारी एक सुंदर प्रेमकहाणी हे कसं काय जमलं याचं आश्चर्य वाटतं.

ऑगस्टीन आणि इमेल्डाच्या डेटिंगइतकं हळवं, गोड आणि मनाला भुरळ पडणारं असं काही मी गेल्या अनेक वर्षात वाचलं नाही. इमेल्डा-ऑगस्टीनच्या तरुणपणीच्या सगळ्या भेटींचे प्रसंग मी त्यातली इमेल्डा होऊनच वाचले. मोबाईल फोनच काय, रोटरी फोनच्याही आधीची,म्हणजे १९५५-१९६५ सालची मुंबई. त्यात ऑफिसमध्ये झालेली भेट. न बोलणारा, बुजरा पण इमेल्डासाठी प्रयत्नपूर्वक बोलता होणारा ऑगस्टीन. आणि दोघांचाही, विशेषतः इमेल्डाचा निरागसपणा. या सगळ्यामुळे, वाचता वाचता आपण अत्यंत बावळटपणे त्यात बुडत चाललो आहोत ही जाणीव होत राहते. पण त्याबद्दल काही करता येत नाही. हल्लीच्या 'ऑनलाईन असून माझे मेसेज अनसीन ठेवले' च्या काळात, या दोघांच्या भेटी एखाद्या परीकथेतल्या वाटतात. "संध्याकाळी पाचला अमुक ठिकाणी भेटू." असं सांगून जाणाऱ्या ऑगस्टीनवर मधले ६-७ तास त्याच्याशी काहीही संपर्क न होताही विश्वास ठेवून त्याला भेटायला जाणारी इमेल्डा आजच्या जगात असूच शकत नाही असं वाटतं. ऑगस्टीनला इमेल्डानं लिहिलेली अनेक प्रेमपत्र या पुस्तकात आहेत. ती वाचूनही "गतकाळाचं" वैभव हरवलं आहे असं सतत वाटत राहतं.
त्यांच्या भेटी मुंबईतल्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या दुकानात घडतात. त्यांच्या प्रेमकहाणीला मग इमेल्डाच्या घरच्यांमुळे लग्नाचं स्टेशन गाठावं लागतं. तिच्या घरच्या बायका ऑगस्टीनला ऑफिसमध्ये भेटायला येतात तो प्रसंगही फार विनोदी आहे. या पुस्तकाचं हेही एक वैशिष्ट्य आहे. अस्वस्थ करणारी असली तरी या गोष्टीत अनेक विनोदी प्रसंग आहेत.

लग्नांनंतर आणि इमेल्डाच्या आजाराच्या निदानानंतरही त्यांचं प्रेम कमी होत नाही. एके ठिकाणी, माझ्या आजारामुळे तुझी गैरसोय होते म्हणून तू दुसरी कुणी बाई बघ असं इमेल्डा ऑगस्टीनला सुचवते. त्यावर, "I would like to be faithul, if that's okay with you." म्हणणारा शांत ऑगस्टीन अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. एमची विकलता (vulnerability) ऑगस्टीनलाच नव्हे, तर सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आहे. तिच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे. काही प्रसंग मात्र चटका लावून जातात. मॅनिक अवस्थेत असताना अनेकदा इमेल्डा तिच्या मुलांना लागेल असं बोलते. पण त्या वयातही दोघांनाही ही आपली आई बोलत नसून तिचा आजार बोलतो आहे ही जाणीव असते. खरंतर ही जाणीव कारण नसताना आपल्याला दुखावणाऱ्या व्यक्तींबद्दलही असायला हरकत नाही.

कधी कधी आईच्या वागण्याला वैतागून तिलाही लागट बोलणारा तिचा मुलगा नंतर मात्र त्या आठवणीनं व्याकूळ होतो. या सगळ्यांत, तिघांच्या मागे खंबीरपणे पण न बोलता उभा राहणार ऑगस्टीन फार सुंदर लिहिला आहे, किंवा लिहिला नाही असं म्हणता येईल. ऑगस्टीनसाठी मुद्दाम लिहिलेलं एकच प्रकरण आहे. पण प्रत्येक प्रसंगात त्याची सावली आहे. संबंध घर आणि तिघांचंही आयुष्य व्यापून टाकणाऱ्या आईसमोर, बाबाचं व्यक्तिमत्त्व सहकलाकारासारखं असलं, तरी त्याचा मुलांना किती आधार आहे याची जाणीव लेखनातून पुन्हा पुन्हा होते. आईनं आत्महत्या केली तर काय होणार याचं अर्धं प्रात्यक्षिक मुलांनी अनेकदा अनुभवलेलं असतं. पण आपले बाबा आईच्या आधी गेले तर आपलं कसं होणार ही पोखरणारी भीती मात्र त्यांची पाठ सोडत नाही. तशीच आपल्यालाही हा आजार होईल का ही भीतीदेखील.

हे सगळं एका छोट्याश्या फ्लॅटमध्ये घडतं. जागेच्या अभावामुळे माणसं दाटीवाटीनं राहतात, नाइलाजानं जवळ येतात. दुःख झाल्यावर आपल्या खोलीचं दार धाडकन लावून त्यांना स्वतःला पलंगावर झोकून देता येत नाही. आईची बडबड, तिला खरे वाटणारे भास, तिचं कधी कधी झोपेविना तळमळत राहणं, कधी कधी खूप झोपणं हे सगळं कुठल्याही दाराआड लपलेलं राहत नाही. त्यामुळे त्या सगळ्यांना, आपल्या आणि इतरांच्या मनोव्यापारांना प्रामाणिकपणे सामोरं जावं लागतं.

मुलांसमोर भांडण नको म्हणून टाइम्प्लिज घेऊन रात्री भांडणारे आजूबाजूचे काही आई-बाबा, आईनं लहान मुलासमोर रडू नये असं सतत सांगणारे ज्येष्ठ नागरिक, दुःख म्हणजे काय हे आपल्या मुलांना अजिबात कळू नये म्हणून शक्य ती काळजी घेणारे मी बघितलेले काही आईवडील, हे सगळे मला हे पुस्तक वाचताना आठवले. कुठे ते सगळे, आणि कुठे आपलं मन सताड उघडं ठेवून छोट्याश्या घरात फिरणारी एम! दुःख म्हणजे काय हे आपल्या मुलाला कळूच नये ही अपेक्षा कितीही स्तुत्य आणि आदर्श वाटली, तरीही अगदी दोन वर्षांचं मूलही आई दुःखी आहे हे ओळखू शकतं हे अनुभवातून समजलं आहे. आपल्याला आपल्या भावना लपवता येत असल्या, कोंडून ठेवता येत असल्या, तरी त्या नेहमीच तशा ठेवाव्यात हेही पटत नाही. एमच्या मनाला मात्र ते लपवून ठेवायचं दारच नसल्याने ती हतबल आहे. त्यामुळेच ती आणि तिच्या आजूबाजूचे सगळे याबद्दल प्रामाणिक आहेत. असा प्रामाणिकपणा सर्वसाधारण (म्हणजे काय हासुद्धा एक प्रश्न आहे) कुटुंबांमध्ये क्वचित बघायला मिळतो. पण त्याची प्रत्येक कुटुंबाला गरज आहे. आपल्याला नकोश्या वाटणाऱ्या मानवी भावना बघत मोठी होणारी मुलं त्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. अर्थात, लहानपणी अशा गोष्टींचे मुलांच्या मनावर आघात होतात. पण त्यातून नेहमीच आणि सगळंच वाईट निष्पन्न होत नाही याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे. हे फिक्शन नाही हे मला नंतर कळलं (खालचा व्हिडियो बघा).

पिंटो एका भागात एमच्या लिखाणाबद्दल बोलतात. ती सगळीकडे, चिठ्ठ्याचपाट्यांवर काहीबाही लिहून ठेवत असते. पण तिला लेखिका व्हायचं असेल असं कुणाला कधी वाटत नाही. तिच्या लिखाणातला सफाईदारपणा बघून तिचा मुलगा म्हणतो, की तिनं कुठेतरी खूप कच्ची टिपणं लिहून ठेवली असतील, किंवा तिच्या मनातच तिनं खूप सराव केला असेल. त्यामुळे तिचं लेखन प्रवाही होतं. खरंतर हे वाक्य या पुस्तकालाच लागू आहे. अनेक वर्षं मनात रचलेली, मग अनेक वेळा लिहून काढलेली ही गोष्ट वाटते. तशी ती आहे हे पिंटो स्वतःच सांगतात. आणि आपलंच लेखन आवडत नाही म्हणून पुन्हा पुन्हा लिहिलं, अनेकवेळा लिहिलं हे त्यांचं वाक्य ऐकून फार गंमत वाटते. पण ते म्हणतात तसं, पुस्तक लिहिणं हे एक "क्राफ्ट" आहे. स्वतःसाठी लिहिणं आणि वाचकाला आवडावं म्हणून लिहिणं, या दोन्हींचा समन्वय साधून कदाचित संपूच नयेत अशी वाटणारी पुस्तकं लिहिली जात असावीत.
या पुस्तकाच्याही पलीकडे त्यांनी न लिहिलेल्या, किंवा काढून टाकलेल्या अनेक आठवणी आहेत, आणि हे त्यांचंच बालपण आहे हे कळल्यावर मात्र ती सगळी गोष्ट पुन्हा एकदा झर्रकन डोळ्यासमोरून गेली.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फारच सुंदर परिचय. संदर्भात उल्लेख केलेल्या व्हिडिओमुळे आणखी जास्त मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला जेरी पिंटो बोलताना ऐकायला फार आवडतं. कारण त्यांना शब्द कधीच कमी पडत नाहीत. आणि त्यांच्या बोलण्यापेक्षाही त्यांचे विचार जलद आहेत हेदेखील जाणवतं. He must be thinking at the speed of light.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिचय सावकाशीनं वाचतेच, पण या पुस्तकाचं कव्हरही आवडलं. हे पुस्तक असंच दिसलं असतं तरी मी हातात घेतलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूपच छान ओळख करून दिली आहे आपण .
पुस्तक वाचावे लागेल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिचय खूप छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेरी पिंटो या वयाचा असेल हे बघून आश्चर्य वाटले.
उगाचच तो वयाने खूप जास्त असेल असं वाटत होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि त्यांचे डोळे किती सुंदर आहेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तेवढ्यासाठीही क्लिप बघितली असती!

पुस्तकाचा परिचय आवडला. पुरेसं दाखवलंय आणि पुरेसं झाकलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

https://youtu.be/tEdkzscpZTU

I don't know why I don't get the embed option on my phone. Maybe I need more coffee.
ही शांता गोखलेंची पिंटो यांनी घेतलेली मुलाखत. जिच्याबद्दल पहिल्या परिच्छेदात लिहिलं आहे. या दोघांची मैत्री किती छान आहे याचं एक उदाहरण म्हणजे वन फूट ऑन द ग्राउंड मध्ये नावाजलेली पुस्तकं (वाडा चिरेबंदी आणि द फिमेल युनक) एम मध्येही डोकावून जातात. Fiction असूनही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत खेळीमेळीत घेतलेली मुलाखत. आवडली. शांता गोखले यांचे Memoirsबद्दलची टिप्पणी ऐकताना मला शशी देशपांडे याच्या Listen to Me या पुस्तकाची आठवण झाली.
क्लिप उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=iljf54ZCwn8

हा विडिओ पाहा. आणि हा माणूस Gen Z शी किती जबरदस्त कनेक्ट होऊ शकतो आणि तेही दया पवारांच्या बलुतं बद्दल सांगताना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

हे असं मुद्दा सोडून बोलणं आवडतं.
प्रश्न काय आहे? चहा आवडतो का?
उत्तर काय आहे? माझी आई चर्चमध्ये कशी गायची.
चला आता बलुतं वाचणार. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे असं मुद्दा सोडून बोलणं आवडतं.
प्रश्न काय आहे? चहा आवडतो का?
उत्तर काय आहे? माझी आई चर्चमध्ये कशी गायची.

आणि, हम जो थोड़ी सी पी के ज़रा झूमे...

असो चालायचेच.

(आणि, आमच्या आईचे डोळे जर सुंदर असते, तर आमचेही झाले असते. त्यात काय एवढे? परंतु, असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांचं मुद्दा सोडणं गोड आहे. न.बा.
तुमचं पण असू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(डिस्क्लेमर: प्रस्तुत व्हिडियो मी पूर्ण पाहिलेला नाही. प्रस्तुत प्रतिक्रिया या व्हिडियो केवळ वरवर पाहिल्यावर झालेल्या इन्स्टंट/फर्स्ट इंप्रेशन प्रकारच्या आहेत. चुकीच्या असू शकतात. तसेही, जेरी पिंटो या सद्गृहस्थाबद्दल तथा त्याच्या कृतींबद्दल मी आजपावेतो अनभिज्ञ आहे; किंबहुना, यापूर्वी हे नावसुद्धा माझ्या ऐकिवात नव्हते. (दोष अर्थात सर्वस्वी माझा!) त्यामुळे, तूर्तास तरी येथे सादर केलेला हा व्हिडियो (तथा अत्रैव सादर केलेले अन्य दाखले) वगळता, या सद्गृहस्थाबद्दल तथा त्याच्या कृतींबद्दल काही बरेवाईट मत बनवून घेण्यास पुरेसे संदर्भ मजजवळ नाहीत. अधिक संदर्भांशी वाक़िफ़ झाल्यास, पुढेमागे (माझ्या सवडीने) माझी मते बदलण्याचा अधिकार मी मजजवळ राखून ठेवतो. सो, हेल्प मी गॉड!)

----------

हा माणूस Gen Z शी किती जबरदस्त कनेक्ट होऊ शकतो

मला त्यापेक्षा हा शिंगे मोडून वासरांत घुसण्याचा प्रकार वाटला. बोले तो, त्याचे ते हावभाव, हातवारे, अधूनमधून उगाचच स्लँग किंवा हिंदी पाजळणे, वगैरे (स्टँड-अप कॉमेडी-छाप किंवा उगाचच ज्युव्हेनाइल) प्रकार पाहिल्यावर, खेळीमेळीच्या नावाखाली ओढूनताणून आपल्या लेव्हलवरून (नको तितके) खाली उतरून ऑड्यन्सचे अनुकरण करण्याचा (कदाचित डेस्परेट, कदाचित नॉट-सो-डेस्परेट - आय शॅल नेव्हर नो! - परंतु निश्चितपणे अतिरेकी) प्रयत्न वाटला. (त्या मानाने, उदाहरणादाखल, या लेखासोबत जो (मुलाखतीचा) व्हिडियो जोडला आहे, त्यात, किंवा खाली प्रतिसादांत कोणीतरी लोकसत्तेतल्या मराठी आर्टिकलची लिंक दिलेली आहे, त्यात, त्याची अभिव्यक्तीची पातळी नॉर्मल - ॲडल्ट! - वाटते. तेथेसुद्धा खेळीमेळी आहे - परंतु फालतूपणा नाही. त्यामुळे, वाचणारासुद्धा डिस्ट्रॅक्ट न होता त्याला जे काही म्हणायचे आहे, त्यावर गंभीरपणे विचार करू शकतो; त्याच्या मुद्द्यांना - निव्वळ बडबडीला नव्हे - योग्य तो आदर देऊन त्यांवर विचार करण्यास वाचक/श्रोता प्रवृत्त होऊ शकतो.)

नाही, पोरकटपणाबद्दल मला कोणताही आक्षेप नाही. माणसाने पोरकट असावे, अवश्य असावे, नि कोणत्याही वयात, कोठेही, नि कितीही पोरकटपणा करावा. त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही; किंबहुना, आदर आहे. (वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी मी स्वतः पोरकट आहे, नि निर्लज्जपणे - कदाचित इरिटेटिंगलीसुद्धा - पोरकट आहे. सबब, मला माझ्या स्वतःबद्दल जितका आदर वाटतो, किमान तितका तरी आदर जेरी पिंटो या सद्गृहस्थास न देण्यास मला काहीच कारण नाही. (Mind you, that was intended to be a compliment, and not one of the southpaw (or sinister) variety. Sincerely!)) परंतु, पोरकटपणा हा मनुष्याचा स्वतःचा असावा, त्याच्या आंतरिक ऊर्मीतून यावा; कोणालातरी इंप्रेस करण्यासाठी तो ओढूनताणून आणला जाऊ नये. (एवढी अपेक्षा, मला वाटते, अति नसावी. चूभूद्याघ्या.) येथे होते आहे काय, की ती मुले त्यांच्यात मिसळून केलेल्या त्यांच्या लेव्हलच्या पोरकटपणामुळे हसत आहेत, खिदळत आहेत. (त्या वयातली मुले कशालाही हसतात, अगदी बिनडोकपणे खिदळतात. कधीकाळी मीही त्या वयोगटात असल्याकारणाने मला याची चांगली(च) कल्पना आहे. (मीही असाच, कशालाही, अगदी बिनडोकपणे खिदळत असे. ठीक आहे; त्या वयात, मला वाटते, नैसर्गिकच असते ते.) त्यात काही गैर आहे, असे माझे म्हणणे नाही; त्या वयाकरिता ठीकच आहे ते. आणि, हे झ-पिढीचे वैशिष्ट्य खासे नसावे; मला वाटते, हे (कोठल्याही पिढीच्या बाबतीत) त्या वयाशी संबंधित असावे.) त्यामुळे, हा मनुष्य त्या मुलांशी छान कनेक्ट होतोय, असा आभास निर्माण होतोय खरा, परंतु, त्याला जे काही म्हणायचे आहे, सांगायचे आहे, जे काही मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत - आणि, mind you, I believe he has a lot of very valid points to convey! - ते या हा-हा-ही-ही-ऑऽऽऽ(तोंडावर हात ठेवून)-खुदुक-च्या धांदलीत त्यांच्या टाळक्यांत कितपत शिरत असावेत, हे शंकास्पद आहे. (त्या वयात माझ्या शिरत नसत. खास करून, केवळ खिदळायचे आहे म्हणून खिदळण्याच्या नादात. निव्वळ टाइमपास म्हणून ते ठीकच आहे, परंतु, काही डोक्यात शिरणे - नीट शिरणे - आणि त्याचे retention या दृष्टीने त्याचा फायदा (असलाच तर) मला वाटते अतिशय मर्यादित असावा. It is extremely distracting to any prospect of comprehension, to say the least.)

(अर्थात, खुद्द जेरी पिंटो या सद्गृहस्थास याची कल्पना नसेलच, असे नाही. (तसा ब्रिलियंट मनुष्य वाटला मला.) कदाचित, कोणास ठाऊक, त्या पोरांच्या टाळक्यांत फारसे काही शिरेल, याची अपेक्षासुद्धा तो करीत नसेल. परंतु, यदाकदाचित चुकून शिरलेच, तर काय घ्या, म्हणून आपला एक प्रयत्न. शिवाय, करील मनोरंजन जो मुलांचे, वगैरे. नाही शिरले, तर राहिले. (निष्काम कर्मयोग?) किंवा, कदाचित तो (आलिया भोगातून) स्वतःचेही मनोरंजन करून घेत असू शकेल. तेही अशक्य नाही.)

(बाकी, त्या मुलांचे एक वेळ सोडा. परंतु, इतकी बडबड केल्यानंतर, त्या बडबडीत सांगण्यासारखे पुष्कळ काही असतानासुद्धा, कोणाला जर जेरी पिंटो या सद्गृहस्थाचे सुंदर डोळेच तेवढे प्रकर्षाने लक्षात येत असतील - आणि दुसरे कोणी केवळ तेवढ्याकरितासुद्धा जेरी पिंटो या सद्गृहस्थाची बडबड ऐकायला - किंवा खरे तर पाहायला - प्रवृत्त होत असेल - तर तो (बाकी काही नाही, तरी) जेरी पिंटो या व्यक्तीचा सपशेल पराभव नव्हे काय? (श्रीमती नूतन यांच्या संदर्भातसुद्धा हाच मुद्दा उपस्थित करता येतो, याची मला कल्पना आहे. आणि, तो आरोप मला मान्य आहे. परंतु, ते तूर्तास असो.))

----------

अर्थात, आधी म्हटल्याप्रमाणे, ही केवळ फर्स्ट इंप्रेशने आहेत. त्यांत तथ्य असेलच, असे नाही, आणि, पुढेमागे बदलू शकतात. परंतु, जे वाटले, ते लिहिले.

----------

बाकी, हा सद्गृहस्थ गोवन कॅथलिक नावे-आडनावे वगैरेंचा उच्चार बहुतकरून मुळाबरहुकूम (???) करत असावा, असे जाणवले. इंप्रेस झालो. (कदाचित मूळ पोर्तुगीज धाटणीचे उच्चार? बोले तो, आमच्या इथे हिस्पॅनिक नावांचे उच्चार नेटिव्ह स्पॅनिशभाषक जसे आणि ज्या आघाताने करतात, थोडेसे त्या धर्तीवर? (स्पॅनिश-पोर्तुगीज उच्चारांतील ढोबळ फरक जमेस धरून?) 'जेरॉनिमो मारीय्या पीऽन्तो'... यातला 'जेरॉनिमो'चा भाग एक वेळ सोडून द्या - तो उच्चार काहीसा आंग्लाळलेला वाटतो - परंतु, बाकीच्याचे काय?) खास करून गोवेमुक्तीनंतर (या मनुष्याचा जन्म १९६६चा, असे विकीपीडिया सांगतो. बोले तो, गोवेमुक्तीनंतरचा. आणि, माझा समवयस्क.) आणि त्यात पुन्हा गोव्याबाहेर वाढलेल्या किरिस्तावांचे उच्चार - त्यांच्या नावांच्या बाबतीतसुद्धा - आंग्लाळलेले असतात, अशी काहीशी समजूत होती. (कदाचित चुकीचीही असेल. परंतु, 'मारीय्या पीऽन्तो' वगैरे उच्चार रिफ्रेशिंग वाटला खरा.)

(असो, हे खूपच अवांतर झाले. आवरते घेतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑड्यन्सचे अनुकरण करण्याचा

अनुकरण की अनुनय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुकरण की अनुनय?

हम्म्म्म्म्...

अनुनय anunaya m S Humble supplication. 2 Respectful or reverential deportment. 3 Leading along, training, disciplining.

(मोरेश्वरभट.)

supplication: the act of asking a god or someone who is in a position of power for something in a humble way:
Inside the temple, worshipers were kneeling in supplication.

(Cambridge Dictionary.)

नाही हो. इतकाही डेस्परेट नाही वाटला मला मनुष्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुनय चा एक अर्थ आहे - To appease, win over, persuade
As per Apte, अनुनी means अनुनी [anunī], 1 P. . To conciliate, win over, induce, persuade, prevail upon; request, supplicate, entreat, propitiate, pacify, appease (anger &c.)

Spoken Sanskrit
अनुनय anunaya m. conciliation
अनुनय anunaya m. friendly persuasion
अनुनय anunaya m. appeasing

मला वाटले तो अभिप्रेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म्म्म्म्... शक्यता अगदीच नाकारता येत नाही. (बोले तो, तुम्ही दिलेला अर्थ बरोबर असण्याची शक्यता नव्हे. त्याबद्दल शंका नाही. त्या अर्थाने अनुनयाचा प्रयत्न असण्याची शक्यता.)

परंतु, तसे यदाकदाचित असलेच, तर मग, 'का? गरज काय?' असा प्रश्न पडतो. बोले तो, 'हे हे माझे म्हणणे आहे, ते मी मांडले. Take it, or leave it.' असा स्टँड का घेता येऊ नये? (या मनुष्याने त्या पोरासोरांपेक्षा तर निश्चितच कितीतरी पावसाळे अधिक पाहिले असावेत. त्या अधिकाराच्या बळावर आपले म्हणणे matter-of-factly मांडता येऊ नये? अनुनयाची गरजच काय? आणि, अनुनय कोणाचा करावा?)

उलटपक्षी, आपले म्हणणे matter-of-factly मांडल्याने, आणि त्यावर 'पटले तर घ्या, नाहीतर सोडून द्या' असा स्टान्स घेतल्याने, प्रतिपक्षाचा सोडून देण्याचा अधिकार मान्य करून, प्रतिपक्षास बरोबरीने वागवून आदर दिल्यासारखे होत नाही काय? त्यायोगे, प्रतिपक्ष तुमचे म्हणणे प्रत्यक्षात लक्ष देऊन ऐकण्याची शक्यता (किंचित का होईना, परंतु) वाढत नाही काय? (आणि, नसेल जर वाढत, तर, was the effort worth it, in the first place?)

(याउलट, प्रतिपक्षाच्या पातळीवर उतरून baby-talk करणे (if you will) हे काहीसे condescending होत नाही काय? आणि मग, प्रतिपक्षानेसुद्धा तुमचे म्हणणे गंभीरपणे न घेता किंवा त्याकडे फारसे खोलात शिरून लक्ष न देता, 'एक तात्कालिक करमणूक' म्हणून 'हा-हा-ही-ही-खिक्' करून, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने जर सोडून दिले, तर याहून वेगळी अपेक्षा काय करावी? हं, 'पोरे तल्लीन होऊन आपले ऐकताहेत' अशी स्वतःचीच फसवणूक करून घ्यायची असेल, तर गोष्ट वेगळी. पोरे तिकडे 'अय्या! त्याचे डोळे किती सुंदर आहेत, नै?' किंवा 'कित्ती कित्ती गोड मनुष्य आहे! चो च्वीट!' हाच (आणि एवढाच) विचार करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे, ते राहिले बाजूला.)

(लोकप्रियता आपल्या जागी ठीकच आहे, परंतु ते एक दुधारी शस्त्र आहे. बोले तो, तुम्ही लोकप्रिय होऊ शकता, परंतु मग तुम्हाला जे काही म्हणायचे आहे, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहचवू शकत नाही. लोक त्याकडे ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत. लोक फक्त तुमच्याकडे पाहातात, कदाचित तुम्हाला admireसुद्धा करतात, परंतु तुम्ही जे काही (पोटतिडकीने) सांगू पाहाताय, त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात, त्याला हसण्यावारी नेतात. Your popularity becomes a great distraction, a great hindrance in the way.)

----------

असो. अवांतरभयास्तव अधिक खरडत नाही. (बोले तो, मला फरक पडत नाही, परंतु इथले पब्लिक वैतागते, नि मग 'पकाऊ' श्रेण्या देऊ लागते. (त्यांना बिचाऱ्यांना काय ठाऊक, की आय थ्राइव्ह ऑन 'पकाऊ' श्रेणीज़; आय टेक देम ॲज द ग्रेटेस्ट पॉसिबल काँप्लिमेंट्स, म्हणून?))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न.बा.
मला पिंटोंचं लेखन आवडलं, त्यांचं बोलणं आवडलं आणि त्यांचे डोळेही आवडले. तसे मला ऐश्वर्या रायचे डोळेही आवडतात. आणि माझ्या सासूबाईंचे असेच आहेत आणि ते सासूबाईंच्या चेहऱ्यावर असले तरी ते मला आवडतात(तुमचं मागचं निरीक्षण लक्ष्यात ठेवून मी आता त्यांना माझ्या नवऱ्याची आई असं संबोधत नाही).
त्यांचे डोळे तुमच्या डोळ्यात खुपण्याचं काहीच कारण नाही. उलट असंख्य चॉकलेट, कॉफीसारख्या दिसणाऱ्या डोळ्यात हे धड निळे नाहीत धड हिरवे नाहीत असे डोळे उठून दिसतात.

@सामो
It is indeed a heartbreaking account if you look at it from Augustine's perspective. I agree. That's why the book also breaks your heart.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांचे डोळे तुमच्या डोळ्यात खुपण्याचं काहीच कारण नाही

खुपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. (मला काय त्याचे!) फक्त, Beautiful eyes do not a Jerry Pinto (or whoever) make, एवढेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मोबाईल फोनच काय, रोटरी फोनच्याही आधीची, म्हणजे १९५५-१९६५ सालची मुंबई.

१९५५ साली मुंबईत रोटरी डायल फोन नव्हते??? मला खात्रीशीर माहिती नाही, परंतु, समहाउ, हे पचायला जड जाते ब्वॉ.

की, "मोबाईल फोनच काय, घरोघरी रोटरी फोन असण्याच्याही आधीची, म्हणजे १९५५-१९६५ सालची मुंबई", असे म्हणायचे आहे तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सुजाता' हा चित्रपट १९५९ सालचा आहे. म्हणजे १९५५-१९६५च्या दरम्यानचा.

'सुजाता' चित्रपटातले हे गाणे पाहा. नीट निरखून पाहा. (गाणे तलतचे आहे, सुंदरच आहे, परंतु तो भाग सोडून द्या. त्यात सुनील दत्त नि नूतन आहेत, त्यांच्याकडेही तूर्तास दुर्लक्ष करा. (गोग्गोड नूतन मला व्यक्तिश: कितीही आवडत असली, तरीही. (सुनील दत्त मात्र अगदीच 'हा' वाटतो. बोले तो, मला. परंतु, ते असो.) तूर्तास तो मुद्दा नाही.))

(आणि हो! नूतनचे डोळेसुद्धा सुंदर आहेत. परंतु, तो मुद्दा नाही.)

साधारणत: १:२२ ते १:३०च्या दरम्यान, १:५५ ते २:००च्या दरम्यान, तथा ३:५९ ते ४:०४च्या दरम्यान, त्या फोनच्या तबकडीकडे नीट निरखून पाहा.

आता, हा सीन मुंबईतला आहे, असे छातीठोकपणे सांगण्याकरिता पुरेसा विदा तूर्तास माझ्याकडे नाही. परंतु, भारतातल्याच कोठल्यातरी शहरातला आहे, हे निश्चित.

भारतातल्या कोठल्यातरी रँडम शहरात तेव्हा उपलब्ध असणाऱ्या सुविधा त्या वेळी मुंबईत उपलब्ध नसतील, हे शक्य वाटत नाही. (तेव्हाचा जमाना लक्षात घेता, घरोघरी नसतीलही कदाचित, परंतु, उपलब्ध असायला हरकत नसावी.)

QED.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

घरात नसायचे. त्याबद्दल सविस्तर आहे पुस्तकात. म्हणूनच पुस्तक वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा जन्म १९६६चा. (म्हणजे, १९६५नंतरचा.) माझ्या लहानपणीसुद्धा पुण्यात वा मुंबईत घरोघरी टेलिफोन नसायचे. (पुण्यात आमच्या आख्ख्या बिल्डिंगमध्ये एकांकडे होता. सगळे येणारे जाणारे कॉल त्यांच्या घरातून घ्यावे/करावे लागायचे. मुंबईत माझे आजोबा राहायचे, त्यांना जर फोन लावायचा झाला, तर त्यांच्या आजूबाजूला कोणाकडे नव्हता. ते दर रविवारी मावशीला भेटायला तिच्या घरी जात. मावशीच्या शेजाऱ्यांकडे फोन होता. ती वेळ साधून करावा लागे. तर ते एक असो.)

सांगण्याचा मतलब, १९५५ ते १९६५च्या दरम्यान मुंबईत घरोघरी टेलिफोन नसायचे, याची कल्पना मला तशीही आहे. ही (मला अगोदरच माहीत असलेली) गोष्ट कळण्यासाठी मी हे (आख्खे!) पुस्तक काय म्हणून वाचू?

(बॅड मार्केटिंग!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मी ज्या मोबाईलशी तुलना केली आहे त्या context मध्ये आहे. तसे वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुंडलकरांच्या कोबाल्ट ब्लू चा पिंटोंचा अनुवाद वाचलाय असे आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@नवी बाजू.
तुमचे सगळे मुद्दे बरोबर असतात.
घरोघरी शब्द लेखात असायला हवा हे मला पटलेलं आहे. परत येऊन मी संपादन करणार होते. पण तुम्ही नूतन, सुनील दत्त वगैरे आणून ओव्हरकिल केलं म्हणून मी ते वाक्य बदलणार नाही. ते गाणंही मला फार आवडतं. त्याचा असा उपयोग व्हायला नको होता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांचे मुद्दे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असू शकतात पण मूळ लेखांच्या संदर्भात बहुधा निरर्थक असतात. (तरी नशीब, त्यात यावेळी तळटीपा नव्हत्या!)

संप्राप्ते सन्निहिते काले,
न हि न हि रक्षति डुकृञ् करणे!

असल्या hair-splitting कडे दुर्लक्ष करा आणि असेच छान लेख लिहीत रहा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन….

संप्राप्ते सन्निहिते काले,
न हि न हि रक्षति डुकृञ् करणे!

समजले नाही. कोणाचा सन्निहित काल? त्याचा काय संबंध इथे?

(ही बायेनीचान्स धमकी वगैरे आहे काय?)

(तरी नशीब, त्यात यावेळी तळटीपा नव्हत्या!)

हो द्यायच्या राहिल्या खऱ्या. (रादर, कंटाळा केला.) पुढल्या खेपेस अशी आगळीक होऊ देणार नाही. तळटीपा आठवणीने नक्की देईन.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यात धमकी कसली? ऐसीवरचा तुमचा आविर्भाव “डुकृंकरण्याचा” असतो असे माझे वैयक्तिक मत आहे, आणि नुसता तो शब्द वापरून कदाचित पुरणार नाही म्हणून मूळ श्लोक उद्धृत केला, इतकेच. तशी तळटीप द्यावयास हवी होती!

हे मैत्रीपूर्ण सवालजबाब समजावे. तत्संबंधीही तळटीप “as read” मानावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन….

म्हणून मी ते वाक्य बदलणार नाही.

माझ्या शंकेचे समाधानकारक उत्तर मला मिळाले. याउपर, लेख तुमचा आहे; तुम्ही तो बदलला, वा न बदलला, याने मला नक्की काय फरक पडतो? तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.

ते गाणंही मला फार आवडतं.

मलासुद्धा!

त्याचा असा उपयोग व्हायला नको होता.

आयुष्यात कशाचा उपयोग कोठे नि कसा होऊ शकेल, सांगता येत नाही. (ते 'ऑफ-लेबल यूसेज' की कायसेसे म्हणतात, त्यातला प्रकार!)

इन एनी केस, प्रस्तुत उपयोगात काही illegal, immoral, किंवा fattening असल्याचे निदान मला तरी जाणवले नाही.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

फारच छान परिचय करून दिलात. व्हिडिओमुळे तर मजाच आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नितांतसुंदर पुस्तकाची तितकीच छान समीक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतक्या छान परिचय करून दिल्यामुळे पुस्तक वाचायची उत्कंठा वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेली कित्येक वर्षे कथा/कादंबर्‍याचे वाचन शून्य आहे. पण त्यातल्या त्यात सकस पुस्तक वाचली पाहिजेत हे समजते. उदा. झाडाझडतीमुळे विस्थापितांचे प्रश्न समजले होते. अन्यथा "ह्यांना दुसरीकडे 'सेटल' व्हायला काय प्रॉब्लेम आहे" असा एक शेरा माझा पण होता. त्यामुळे कथा-कादंबर्‍यांची परीक्षणे हटकून वाचतो. अलिकडेच जेरी पिंटो यांचा लोकसत्ता मधला "अनुवादकांचे वाचन" हा लेख वाचला होता. खूप आवडला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Just watched the interview. He seems to be playing a perfect writer’s role on the stage that is called world. He is hiding a lot of grief that he has been able to convert into fodder for the creativity.
What he talked about the care takers of psychologically challenged ppl struck a chord with me. Indeed a person needs to have a well of compassion to live side by side of these patients. Jerry seems to have that compassion, and the depth of understanding .
Salute to his father for providing a solid grounded childhood for Jerry. As much Em has share in Jerry’s upbringing even same or more share his father must be having. I believe he talked abt losing father at 21. That must have been davastating I believe.
Or am I just projecting my thoughts? No idea.
This interview was a remarkable peek behind those beautiful eyes.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A well-told lie can heal. Otherwise, what’s fiction?

Pinto, Jerry. Em and the Big Hoom (p. 52). ALEPH BOOK COMPANY. Kindle Edition.

SmileSmileSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे त्यांचं इंग्रजी कवितांचं पुस्तक आहे.
सगळ्याच कविता मला आवडल्या नाहीत. पण काही काही फारच सुंदर आहेत. ज्यांना कविता आवडतात त्यांच्यासाठी reference.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0