ही बातमी समजली का - भाग १८०
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १०० पेक्षा अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---
.
आंतरराष्ट्रीय नाणे निधी : २०१८ व २०१९ चे जीडीपी वृद्धी चे दर
आंतरराष्ट्रीय नाणे निधी : २०१८ व २०१९ चे जीडीपी वृद्धी चे दर
.
मूळ रिपोर्ट इथे
.
.
.
मोदींचे ट्रंप यांना २०१९ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास आमंत्रण
मोदींचे ट्रंप यांना २६ जानेवारी २०१९ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास आमंत्रण
.
सरकारने फेसबुक ताब्यात घ्यावे. तरच ...
सरकारने फेसबुक ताब्यात घ्यावे. तरच ... उजव्या विचाराच्या "विचारवंतांच्या विरोधी भेदभाव्" कमी होईल.
.
पालुपद - फक्त "त्यांनी" केलेला भेदभाव, शोषण, फसवणूक हे माझ्या समस्यांसाठी जबाबदार आहे. सिस्टिम च्या समस्यांचा उगम नेहमी सिस्टिम च्या बाहेर झालेला असतो. मुद्दा संपला.
.
हस्तिदंती मनोऱ्याचं खुजेपण
The Spectacle That Is Elon Musk Coming Undone
पार्श्वभूमी - थायलंडमधल्या एका गुहेत काही मुलं आणि त्यांचा प्रशिक्षक अडकले होते. त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित डायव्हर्सनी बरेच दिवस कष्ट केले. इलॉन मस्कनं त्यांना पर्सनल सबमरीन देण्याचा विचार जाहीर केला. त्यावर एका अनुभवी डायव्हरचं मत पडलं की हा प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे. इलॉन मस्कनं या डायव्हरवर व्यक्तिगत हल्ला करणारी ट्वीट्स केली आणि काही वेळात ती काढून टाकली गेली.
या पार्श्वभूमीवर सिलिकॉन व्हॅलीतल्या उद्योजकांचा दृष्टीकोन, त्यांतला स्वतःच्या कर्मचाऱ्यांना आणि खालच्या (आर्थिक) स्तरातल्या लोकांना डावलणं; राजकारणी लोकांचा भंपकपणा याबद्दल हा लेख.
एकंदरच आपापल्या हस्तिदंती मनोऱ्यांत बसून सामान्य लोकांच्या आशाआकांक्षाकडे दुर्लक्ष करणं, त्यांना गृहीत धरणं आणि त्यातून सगळ्याच समाजांत ध्रुवीकरण होताना दिसत असताना, विवक्षित उदाहरणं देऊन लिहिलेला लेख रोचक वाटला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अपू सिंपसन?
इथे कुणी सिंपसन्सचे चाहते आहेत का? लोकांना अपूचं चित्रण विशेष वंशविद्वेषी वाटतं का?
‘Simpsons’ Creator Matt Groening Says Debate Around Apu Is ‘Tainted’
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गमतीशीर
मॅट ग्रेनिंग गमतीशीर वाटला. भारतातल्या लोकांना अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय (वंशाच्या) लोकांच्या अडचणी आणि भावना समजतील असं म्हणणं हा गमतीचा कळस. याला मराठी आंजावर आणून निवासी-अनिवासी मारामाऱ्या वाचायला लावल्या पाहिजेत.
मला 'सिंपसन्स' फार आवडलं नाही. 'फ्युच्युरामा'त दिसणाऱ्या चेहऱ्यांसारखेच चेहरे पण काही तरी अमेरिकी सरासरी पातळीवरचं चित्रण दोन-चार भागांत बघितलं आणि मग बंद केलं.
---
पण मॅट ग्रेनिंगला एकट्यालाच का दोष द्या! आमच्या कंपनीत म्हणे 'डायव्हरसिटी ट्रेनिंग' सक्तीचं आहे. यात वेगवेगळ्या धर्माचे बाबाजी आणतात (त्यांत कोणीही माताजी नसतात). हिंदू म्हणून जो कोणी बाबाजी आणला होता तो एवढ्या गफ्फा हाणत होता की आंजावर मोठं नाव काढेल. तर diversity/विविधता अशी बडबड करणाऱ्या कंपनीच्या ब्लॉगवर बुद्धाचा फोटो झळकला. या बुद्धाच्या छातीवर नाझी स्वस्तिक होतं.
"बाबा रे, तो फोटो निदान १८० अंशात फिरवून डकव. पण... हिंदू चिन्ह बुद्धाच्या प्रतिमेवर डकवायला मी तरी जाणार नाही." असं म्हटल्यावर त्यानं फोटो बदलला. बदललेला फोटो मला अत्यंत पाश्चात्य आणि बालिश वाटला. 'बालिश बुद्ध' यातला विनोद सांगायचा प्रयत्न विफल झाला. मग सगळं सोडून दिलं आणि शेजारी बसणाऱ्या (गोऱ्या, ब्रिटिश) मित्राशी cultural appropriationच्या गप्पा सुरू केल्या. अत्यंत कुजकटपणे त्यावर दोघांनीही पाश्चात्त्यांना नावं ठेवली आणि आपापल्या कामाला लागलो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्वस्तिक
हे काय आहे? डाव्या-उजव्या स्वस्तिकाबद्दल आहे का? बौद्ध धर्मात दोन्ही प्रकारची स्वस्तिके वापरली जात असल्याचे वाचले आहे. बुद्धाच्या छातीवर कसले स्वस्तिक होते? सरळ की पंचेचाळीस अंशांनी कललेले? (आणि फोटो १८० अंशात फिरवून काय होणार? स्वस्तिक तसेच दिसेल, फक्त बुद्ध उलटा दिसेल!)
मला सिंपसन्स खुप आवडतं. (माझं
मला सिंपसन्स खुप आवडतं. (माझं ऐसिवर डकवलेलं चित्र यातलंच आहे.)
मला हा वाद अति निरर्थक वाटला. स्टिरिओटाईप्सवरुन जोक्सने लोक इतके का ऑफेंड होतात हे समजत नाही. आणि सिम्प्सन्समध्ये अगदी गोऱ्या अमेरिकन लोकांना देखील यथेच्छ झोडपलं आहे स्टिरिओटिपिकल विनोदांनी. होमर स्वत: अमेरिकन पुरुषांच स्टिरिओटाईप आहे. लोकांच्या अस्मिता फार टोकदार झालेल्या आहेत हे पटलं.
साईनफेल्डदेखील अलिकडे अनेक मुलाखतीत हे म्हणाला आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कोणी कोणाची कशावरून टिंगल करावी?
उदाहरणार्थ -
आमच्या हाफिसात बरेच गोरे पुरुष आहेत. कंपनीच्या नावाचा उच्चार काय करायचा यावरून चर्चा सुरू होती. नाव देणारा, कंपनी सुरू करणारा तरुण, भारतीय वंशाचा इमिग्रंट अमेरिकी, तेजस, आहे. मार्केटिंगवाल्या गोऱ्या पुरुषाच्या मते तेजसला स्वतःच सुरू केलेल्या कंपनीच्या नावाचा उच्चार करता येत नाही. म्हणून मी त्याला विचारलं, "कोणाचे उच्चार योग्य?" तर म्हणाला "हा अमका उच्चार योग्य आहे. कारण अमेरिकेत असा उच्चार होतो आणि कंपनी अमेरिकी आहे."
"पण अमेरिकेत कुठे? ग्रेग, इकडे ये रे. तू कसा उच्चार करतोस?" ग्रेगनं आणखीच तिसरा उच्चार केला.
मग मी विचारलं, "गोऱ्या अमेरिकी पुरुषानं केलेला उच्चार योग्य आणि तपकिरी त्वचेच्या तेजसनं केलेला उच्चार चूक, असं तर तू म्हणत नाहीयेस ना."
सदर गोऱ्या पुरुषानं मोकळ्या मनानं हार मान्य केली.
मात्र बहुतेकदा अशी हार मान्य केली जात नाही. मी आगाऊ आणि तोंडाळ आहे; बहुतांश अमेरिकी लोकांपेक्षा चांगलं इंग्लिश बोलते; jingoism, cultural appropriation वगैरे त्यांना माहीत नसलेल्या संज्ञा त्यांच्याच तोंडावर मारून त्यांचे अर्थही समजावून सांगू शकते, म्हणून त्यांना शेवटी मान तुकवावी लागते. मात्र सॉफ्टवेर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या पियूष, हरी, अॅनी या भारतीय लोकांना त्यांच्या उच्चारांवरून अधूनमधून चिडवलं जातं. मॅक्स नामक चिनी सहकर्मचाऱ्याला आपल्या इंग्लिश उच्चारांबद्दल न्यूनगंड आहे; स्वतः केलेलं काम कंपनीबाहेरच्या लोकांसमोर दाखवायला तो थोडा कचरतो.
ते निमूटपणे या गोष्टी सहन करतात... अगदी 'आनि-पानी' लोकांना मुंबई-पुण्यात जसं हिणवतात तसंच. मॅट ग्रेनिंग या गोऱ्या पुरुषाला अशी टीका कधीही सहन करावी लागणार नाही. कारण तो गोरा आहे. तीच गोष्ट जेरी साईनफेल्डची. तीच गोष्ट मुंबई-पुण्याच्या ब्राह्मणांची. आपल्याला समजत नाही, हे ही न समजणारे लोक!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सदर गोऱ्या पुरुषानं मोकळ्या
.
.
.
अनेक गोऱ्या पुरुषांना त्यांच्यावर - ते गोरा वि. तपकिरी असा भेदभाव करणारे असण्याचा शिक्का बसू नये म्हणून सुद्धा पडतं घेणे - हा गंड असतो व म्हणुन ते स्वत:हून, त्यांची बाजू बरोबर असो वा चूक - जास्त प्रतिवाद न करता हार मान्य करतीलही.
.
पण काय करणार ? इतरांना हे ही समजत नाही की त्यांना समजत नाही !!!
.
.
आत्याबाई-मिशा दृष्टांत
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुझे अनुभव शेअर करत जा. (शेअर
तुझे अनुभव शेअर करत जा. (शेअर ला मराठी शब्द नाही. पण मध्यंतरी मेघनाच्या वॉलवर वाचलं होतं की, शेअर ला मराठी शब्द नाही अशी तक्रार करण्यापेक्षा , वाक्याची संरचना बदला ना. वाक्याची सुरुवातच सर्वजण अशी करतात की तिथे शेअर हाच शब्द फिट्ट बसतो.)
त्या सल्ल्यानुसार - तुझे नवेनवेअनुभव सांगत जाच.
सहमत. अदितीने अनुभव लिहावेत.
सहमत. अदितीने अनुभव लिहावेत. म्हणजे ती अधुनमधून लिहितेच.
हाहाहा. या प्रकारे कोणताही
हाहाहा. या प्रकारे कोणताही विनोद कोणाला तरी हिणवणारा आहे हे दाखवता येईल. विनोदावर बंदी!
थट्टा करणं != रेसिझम
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बंदी?
बंदी का म्हणे? तुम्हाला मॅट ग्रेनिंगला रेसिस्ट म्हणायचं असेल तर म्हणा बुवा! ते माझे शब्द नाहीत.
मला मॅट ग्रेनिंग पैशांच्या मागे लागलेला बिनबुडाचा इसम वाटतो. त्याला अमेरिकेत आणि आजच्या जगात उज्ज्वल भविष्य आहे; त्याला चिकार गिऱ्हाईक आहे हे 'सिंप्सन्स'च्या लोकप्रियतेवरून दिसतंच. एके काळी 'फ्युच्युरामा' काढल्यावर त्याला व्यावहारिक अक्कल आली असणार. 'फ्युच्युरामा'च्या शेवटच्या सीझनच्या शेवटच्या भागाच्या (किंवा काही काळ तरी तो शेवटचा सीझन होता) सुरुवातीला 'See you on another channel' असा संदेश होता.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोणी कोणाचा कशावरून उपहास करावा याबद्दल....
.
जाताजाता.....
.
कोणी कोणाला कशावरून झोडपावे, व कोणाचा कशावरून उपहास करावा याबद्दल....
.
पियुष गोयल म्हणतात की शशी थरूर यांचा जो परदेशी ॲक्सेंट आहे तो .....
.
भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे.
भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे.. मोदींच्या सरकारच्या असहिष्णुतेचा परिणाम. दुसरं काय ?
.
कवि नीरज यांचे निधन . .
कवि नीरज यांचे निधन
.
.
लिखे जो खत तुझे हे गाणं मुळात
लिखे जो खत तुझे हे गाणं मुळात तीन पानी कविता होती असं आत्ताच एफ एम वर ऐकलं
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हो. निपो मला बोलले होते.
हो. निपो मला बोलले होते.
निपोंनी मला नीरज बद्दल २००० च्या आसपास प्रथम सांगितलं. त्यापुर्वी मी नीरज हे नाव ऐकलं नव्हतं.
.
ट्रंप हे रशियाच्या हातातलं बाहुलं झालेले आहेत असा.....
ट्रंप हे रशियाच्या हातातलं बाहुलं झालेले आहेत असा..... आरडाओरडा ... सुरु झालेला आहे. काही दिवसांपूर्वी "ट्रंप हे इगोमॅनिआक आहेत" असा आरडाओरडा होत होता.
.
काळाचा महिमा ? की ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी झालेली त्यांच्यावरची टिका समजून घेऊन स्वत:मधे बदल घडवून आणला ?
.
ट्रंपूली
अय्या, आमच्या ट्रंपूलीला कोणीतरी चक्क आदरार्थी बहुवचन वापरतंय! कित्ती बरं वाटेल त्याला ते ऐकून!
ते बाकी सगळं ठीकाय ओ.
ते बाकी सगळं ठीकाय ओ.
.
पण "अय्या" ???
.
इश्श, भलत्याच बै तुम्हाला
इश्श, भलत्याच बै तुम्हाला चांभारचौकशा!
हे शुद्ध अध:पतन आहे.
हे शुद्ध अध:पतन आहे.
अधःपतनच, पण नक्की कशामुळे?
इथल्या अनेक पात्रांशी संवाद साधणं, हेच मुळात अधःपतन नाही का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोणै रे
हस्तिदंती मनोऱ्यात तिकडे???
भांबड आलं
तवलीन सिंग यांचा लेटेष्ट लेख - मोदींनी निराशा केली
तवलीन सिंग यांचा लेटेष्ट लेख - मोदींनी निराशा केली
.
.
.
.
.
थत्तेचाचा, मला वाटतं तुमचं म्हणणं हे असेल की - "इतक्या उशीराने जाग आली तवलीन सिंग बाईंना ??".
.
>>थत्तेचाचा, मला वाटतं तुमचं
>>थत्तेचाचा, मला वाटतं तुमचं म्हणणं हे असेल की - "इतक्या उशीराने जाग आली तवलीन सिंग बाईंना ??"
तवलीन बाईंना अजूनही कळलंच नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांना अजून वाटतं आहे की "मोदी विकास करणार होते म्हणून ८-९% जास्त मतं" भाजपला मिळाली.
या पाठीमागे बऱ्याच लोकांचं जे गृहीतक आहे, "आजच्या तरुणाला राम मंदिर, हिंदू मुस्लिम तेढ, गोरक्षण यात मुळीच रस नाही"; तेच मुळापासून चुकलेलं आहे.
मोदींना हे नीट ठाऊक आहे. त्यामुळे हळूहळू ते विकासाचा मुखवटा फेकून देत आहेत. आणि कबरिस्तान-शमशान, ईदमें बिजली-दिवाली में बिजली हे मुद्दे प्रचारात आणीत आहेत. आजकाल गोरक्षकांना तोंडदेखले फटकारणे सुद्धा सोडून दिले आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आजची तरुणाई
थत्तेंशी सहमत. असं ज्यांना वाटतं ते लोक आजचे तरुण टिंडर वापरत नाहीत असंही मानतात. त्यामुळे त्यांचं गाढवही जातं अन् ब्रह्मचर्यही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मुलांना त्यांचं लिंग ठरवण्याची संधी दिली जावी का ?
मुलांना त्यांचं लिंग ठरवण्याची संधी दिली जावी का ?
.
पालकांनी त्यांच्या अपत्यांना मुलगा किंवा मुलगी असे न वाढवता त्यांना लिंगनिरपेक्ष पद्धतीने वाढवावे का ?
.
म्हंजे मुलं जेव्हा १८ वर्षांची होतील तेव्हा त्यांना हवे ते लिंग त्यांनी स्वत:साठी निवडावे का ?
.
सुरुवात म्हणून - मुलांना Baby न म्हणता Theybie म्हणावे काय ?
.
लिंगच का फक्त? योनीही
लिंगच का फक्त? योनीही ठरवण्याची संधी द्यावी. म्हणजे समजा कुत्रायोनीत जन्म हवा होता पण चुकून मनुष्ययोनी लाभली तर सर्जरी करून अंगावर हवे तितके दाट रंगीत केस रोपण करुन, स्वरयंत्राची शस्त्रक्रिया करुन फक्त भू भू असे आवाजच येतील असा छेद देऊन कापून काढणे, कान खेचून खेचून पाळ्या खाली पाडणे / इच्छा असल्यास क्रॉप करणे / व्हर्टिब्राच्या टोकापुढे अन्य ठिकाणच्या हाडाचे तुकडे जोडून, अन्य ठिकाणची कातडी चढवून शेपूट जोडणे अशा प्रकारे सर्जरीज करून द्याव्यात.
फक्त हे करायला अठरा वर्षे थांबता येणार नाही. एकूण आयुष्य दहा बारा वर्षंच असल्यामुळे नाईलाजाने.
पिल्लं होणार नाहीत. पण ती लिंगबदलानेही होत नाहीतच. तस्मात adopt puppies.
लिंगच का फक्त? योनीही
.
हान्तेजामारी.
.
लै भारी
कोणताही मानसिक शारीरिक गोंधळ
कोणताही मानसिक शारीरिक गोंधळ नसलेल्या ९९ टक्के मुलांना केवळ १% (योग्य आकडे टाकून वाचावेत) लोकांच्या घोळात ठरवून पाडणे हा महान प्रकार अमेरिका कॅनडाच करू जाणोत. दंडवत. अठराव्या वर्षापर्यंत लिंगच सांगायचं नाही? हसूही येईना बुवा.
कोंबडं झाकलं तरी..
By hiding cock your son won't stop rising..
झेपत असेल तर ...
ज्यांना झेपतं त्यांनी करावं. ज्यांना नसेल झेपत त्यांनी करू नये. सोपं आहे.
माझ्या लहानपणी मला केस वाढवण्याची परवानगी नव्हती; आईला झेपत नव्हतं. बाबांबरोबर न्हाव्याकडे रवानगी व्हायची आणि केस बारीक कापून आणलं जायचं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ज्यांना झेपतं त्यांनी करावं.
पटतं, नसेल पटत असं म्हणायचंय का? की त्या निर्णय घेण्यातही मानसिक क्षमता अक्षमता, (कुवत) असा काही झेपण्याचा /
न झेपण्याचा तुच्छतादर्शक भाग आहेच?
तुच्छता का?
लहान मुलांना लिंग(योनी)जाणीव बऱ्यापैकी लहान वयात होते. मागे काही रँडम वाचनात असं काही वाचलं होतं की एक-दीड वर्षांच्या मुलांनाही अशा जाणिवा असतात. त्यापुढच्या वयात सामाजिक लिंगभान येतं.
या (किंवा कोणत्याही) जाणिवा असूनही जर त्या अमान्य करायच्या असतील तर त्यासाठी प्रवाहाविरोधात, भले तो उत्क्रांतीचा प्रवाह असेल वा समाजमनाचा, पोहावं लागेल. ते झेपण्याची क्षमता मुळात असली पाहिजे. ही क्षमता असेल तरीही ती वापरावी का नाही हा पुढचा प्रश्न. पण यात तुच्छता किंवा लोकांना जोखण्याचा प्रश्नच कुठे येतो?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या (किंवा कोणत्याही) जाणिवा
अर्रे. आप तो मेरी साईडपे हो.. गलती माफ असावी.
आयडिया थोर आहे.
आयडिया थोर आहे.
मुलगा/मुलगी म्हणून जन्मल्यावर जी लैंगिक डेव्हलपमेंट होते ती अठराच्या बऱ्याच आधीच्या वयात होते. मुलगी म्हणून जन्मली असेल आणि तिला समजा १३-१४ व्या वर्षी मासिक पाळी आली नाही तर त्यावर (काही असलेच तर)* उपाय करावेत की नाही? की मुलगी म्हणून रहायचं आहे की कसं हे अठरा नंतर ठरणार असल्याने तिला मारून मुटकून नॉर्मल मुलगी बनवणं योग्य नाही? समजा हे उपचार १४/१५ वर्षाच्या आत केले तरच उपयोग असेल तर ते उपचार केले नाहीत म्हणून त्या मुलीचा माता बनण्याचा हक्क हिरावला जाईल त्याचे काय? त्याचा दोष कोणावर टाकायचा?
*केवळ हायपोथेटिकल सिनारिओ आहे. पाळी येण्याऐवजी मिशी येणे हा सिनारिओ घेऊ शकतो. असे काही उपचार असतात/नसतात याबाबत मला काही ठाऊक नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ते अठरा वर्षे वगैरे बहुधा
ते अठरा वर्षे वगैरे बहुधा गब्बरशेठच्या प्रश्नात आहे. मूळ बातमीत नसावं.
बरोबर.
बरोबर.
मुलांना निर्णय देण्याची संधी - हा मुद्दा आला की तो कायदेशीर सज्ञान होण्याचं वय वाला मुद्दा वगैरे ओघानेच येतो ना.
.
(कानूनन बालीग, याददाश्त खो गई, वसीहत, दस्तखत, चश्मदीद गवाह, ताजिरात-ए-हिंद, दफा तीनसौ दो, बाइज्जत बरी, मेरे मुअक्किल, मुजरिम = हे बॉलिवूडी शब्द ओघानेच आठवले.)
.
मूळ उद्देश अपत्यांना १८ व्या
मूळ उद्देश अपत्यांना १८ व्या वर्षी लिंग ठरवू देण्याचा नाही हे समजत असूनही एकूण अनावश्यक तिढा , क्रायसिस वगैर उभे करणारा प्रकार आहे हे निश्चित. यातून त्या पोरांचे अतोनात हाल होतील. स्टीरिओटाईप टाळण्यासाठी त्याहून जास्त अन्याय त्यांच्यावर होईल असं वाटतं. एखाद्याची लैंगिक ओळख मारणं हा गुन्हा नाही का?
हँग मी इफ यू कॅन हग मी
ऐसीवर दोन दिवसांत हगी-हगीबद्दल काहीच न आल्यामुळे एक ऐसीकर म्हणून शरमेनं माझी मान खाली झाली. त्यावर उतारा म्हणून २०१६मधून साभार -
Narendra Modi won’t stop hugging world leaders no matter how awkward it is
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्या हगाहगीचं कौतिक नाही.
त्या हगाहगीचं कौतिक नाही.
सै-पुष्कीच्या हगाहगीबद्दल बोला..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
व्हॉटबौटरी
रेशम-राजेश हगले तेव्हा कुठे गेला होता तुम्ही?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रेरा की महारेरा
रेरा की महारेरा
महाहग.
महाहग.
उद्धव ठाकरे : कोण राष्ट्रवादी आहे व कोण राष्ट्रवादी नाही...?
उद्धव ठाकरे : कोण राष्ट्रवादी आहे व कोण राष्ट्रवादी नाही...?
.
.
.
हे त्यांनी भाजप ला टार्गेट केले की बारामतीकरांना ?
.
.
मल्टीकल्चरिझम, पोलरायझेशन आणि
मल्टीकल्चरलिझम, पोलरायझेशन आणि फुटबॉल
टर्किश मूळ असललेल्या एका जर्मन खेळाडुने टर्किश राष्ट्रपती एर्डोहान यांच्या बरोबर दिलेल्या एका फोटोमुळे मोठा वाद उद्भवला आहे. त्याबद्द्ल हा लेख.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दोन ध्रुव
यात काही गैर नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एआय आणि सेक्सिझम, वंशवाद, इत्यादी
विदा/डेटा आहे म्हणून काढलेले निष्कर्ष योग्यच असतील असं नाही. विदाच भेदभाव करणारी असू शकते. त्यातून भेदभाव आणखी वाढीस लागू शकतो, याबद्दल नेचर नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला लेख.
AI can be sexist and racist — it’s time to make it fair
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तो फिर समस्या क्या है?
Are things getting worse – or does it just feel that way?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तो फिर समस्या क्या है?
.
त्या लेखात स्क्रोल केलंत तर समस्या आपोआप समोर येईल -
.
.
.
.
आम्हाला कोणतेही बायसेस नाहीत. आम्ही कोणाकडेही झुकलेलो नाही. आमचा अजेंडा करोडपती व अब्जाधीश लोक ठरवत नाहीत. आमचा अजेंडा आम्ही ठरवतो. आमच्या संपादकाचे लिखाण कोणीही संपादित करत नाही. आम्ही स्वावलंबी आहोत व आम्ही जी मतं मांडतो ती कोणाच्याही प्रभावाखाली येऊन मांडलेली नसतात. हे महत्वाचे आहे कारण - आम्ही बेजुबान, बेआवाज लोकांचा आवाज बुलंद करतो आणि बलशाली लोकांना उत्तरदायी धरतो. व म्हणून - ॐ भवति भिक्षां देही !!!
.
“When problems become rare,
“When problems become rare, we count more things as problems.”
हे वाक्य फार आवडलं. यापोटीच गेल्या शेकडो पिढ्या 'द वर्ल्ड इज साला गोइंग डाउन द फकिन ड्रेन, म्यान...' असं म्हणत आलेल्या आहेत.
प्रक्षुब्धतेचा महापूर
प्रक्षुब्धतेचा महापूर
.
आजकाल सामाजिक/राजनैतिक क्षेत्रात प्रक्षुब्धतेचा महापूर आलेला आहे. हे अमेरिकेतच नव्हे तर युरोपात देखील घडताना दिसते आहे. (आणि भारतात सुद्धा). सिव्हिल डिबेट चा तकाजा होत आहे, आणि सोशल मिडिया वर बंदिशे घालण्याची मागणी वाढत आहे. हे टोळीयुद्धाच्या आसपास जाते आहे असा आडाखा बांधला जातो आहे. पण सिव्हिल डिबेट तर १० वर्षांपूर्वी लोकसभेत, राज्यसभेत किमान ५०% वेळा व्हायचीच की. मग त्यावेळी लोक/श्रोते कुठे लोकसभेतली चर्चा आवडीने बघायचे अथवा ऐकायचे ? लोकांना सिव्हिल डिबेट खरोखर हवी आहे का ?
.
पण लेखकाने या कडवाहटभऱ्या माहौल वर स्पर्धा प्रक्रियेचा कसा व किती पगडा आहे त्याचा उहापोह का काय ते केलेलं आहे.
.
.
अतिरेकी पोलरायझेशनपायी आणि
अतिरेकी पोलरायझेशनपायी आणि स्रोतांच्या अमर्याद कोलाहलापोटी संवाद कर्कश आणि अनसिव्हिल झाला आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. मात्र यापैकी कशाचीच व्याख्या किंवा मोजमापं न करता तो नुसती विधानं मांडतो. त्यांना किती महत्त्व द्यावं? विरोधी विधानंही तशीच, बिनपुराव्याने आली तर ते केवळ ही सेज शी सेज पाचळीवर जातं. मग चर्चेला तरी काय अर्थ राहातो? सोडून द्यावं झालं.
इर्शाद.
इर्शाद.
लेखक माझा आवडता आहे ना .... त्यामुळे त्याचं म्हणणं जरा जास्तच सिरियसली घेण्याची माझी वाईट
सवयखोड आहे..
.
पुढे - डेव्हिड फ्रीडमन हा माझा आणखी एक आवडता लेखक. त्यातून तो आमच्या गावात असलेल्या विद्यापीठात शिकवतो. म्हंजे काय बोलायलाच नको. त्याचा एक क्वोट खाली देत आहे. प्लीज नोट - क्वोट मधे सुद्धा त्याने कोणतंही मोजमाप न करता नुसता क्वोट मांडलेला आहे. हा माणूस शिक्षणाने भौतिकशास्त्रद्न्य आहे. शिकागो विद्यापीठातून भौतिकशास्त्रातली डॉक्टरेट बाळगून आहे.
.
.
मला वाटतं इकॊनॊमिस्टांनी
मला वाटतं इकॊनॊमिस्टांनी खर्चाचं युनिट मोजायला सोपं म्हणून घेतलं. माझ्या मते मानसिक अवस्था मोजायला हव्या. त्या मोजणं कठीण असलं तरी त्यांसंबंधांत काहीतरी मांडणी व्हावी.
राष्ट्र्रीय स्त्री आयोग म्हणतो की .....
राष्ट्र्रीय स्त्री आयोग म्हणतो की ..... स्त्रियांना राजकारणात आरक्षण दिले तर त्याचा फायदा फक्त राजकीय नेत्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांनाच होईल.
ट्रंप च्या थापा....जीडीपी बद्दल्
मी देखील गरीबीतून वर आलो आहे.
मी देखील गरीबीतून वर आलो आहे. त्यामुळे मी गरीब आईचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. गरीबीने मला हिम्मत आणि प्रामाणिकपणा दिला. गरीबांचा आणि पीडितांचा मी भागीदार आहे. ____ इति.... यू नो हू !!!
.
इराणी रियाल कोसळला
ट्रंप यांच्या निर्बंधांचा परिणाम : इराणी रियाल कोसळला
एखादा सल्लागार भातरतातून(/
एखादा सल्लागार भातरतातून(/ दुसऱ्या देशातून) घेता येतो का?
११ भारतीय सिमेंट कंपन्यांना गटबाजीबद्दल दंड
११ भारतीय सिमेंट कंपन्यांना गटबाजीबद्दल दंड
.
.
खूशखबर खूशखबर : पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजुक
खूशखबर खूशखबर : पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजुक
.
.
.

.
मोदी सरकार हे प्रेशर कुकर आहे
मोदी सरकार हे प्रेशर कुकर आहे ___ वरिष्ठ नोकरशहा.
.
.
.
ट्राय प्रमुखांचे जीमेल, बँक खाते हॅक?
एक आधार क्रमांक काय जाहीर केला, ट्राय प्रमुखांचे जीमेल, बँक खाते हॅक झाले आहे असा दावा केला जातो आहे. कुणी खरं काय ते सांगू शकेल का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अजून हॅक नसावं झालं. त्यांची
अजून हॅक नसावं झालं. त्यांची वैयक्तिक माहिती (त्यांच्या स्वतःच्यामते ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये असलेली) एकत्र करून पब्लिश केली जात आहे. आधार नंबर मिळाल्याने काही खास ऍक्सेस मिळाला असं अजूनतरी कुठे वाचलं नाही. तशी पब्लिक डोमेनमधली व्यक्तिगत माहिती aggregate करून अनेक साईट्स देतात.
पण त्यावरून बँक खात्यात / ईमेलीत प्रत्यक्ष प्रवेश मिळवून तिथला कंट्रोल मिळणं अशा स्वरूपाचं काही घडल्याचं समोर आलेलं नाही.
आधार लिंकिंगने त्यांच्या लिन्कड खात्यात पैसे ट्रान्स्फर करणं, त्यांचा नंबर अनेक ठिकाणी सबस्क्रिप्शनमध्ये टाकणं, त्या नंबरचं फोटोशॉपच्या मदतीने डू कार्ड बनवून त्या आधारे नवीन अमेझॉन खातं बनवणं वगैरे बाहेरून करता येणाऱ्या गोष्टी काहींनी केलेल्या दिसतात रिपोर्ट्सनुसार.
नमुन्यादाखल त्यांच्या खात्यात
नमुन्यादाखल त्यांच्या खात्यात एक रु. जमा केलाय म्हणतात. आता यावर प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत.
१. कळ्ळं का आता आधारसक्तीचा विरोध का होता ते?
२. हूं! यात काय इशेश? फोन नंबरवरूनच हे करता येतंय, यात कसलं आलंय हॅकिंग? त्यांनी पैसे काढून दाखवले तर खरं.
वैयक्तिकरीत्या मला मुद्दा क्र. २ पटतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पैसे काढले तर त्याला अटक
पैसे काढले तर त्याला अटक वगैरे करून त्याची मारली जाईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मारली जाण्याचा ऑप्शन नक्की
मारली जाण्याचा ऑप्शन नक्की असला तर हॅकर साहेबांचं ज्यांच्या बरोबर पटत नाही अश्या एखाद्या कार्यकर्त्याच्या अकाउंट मधे टाकायचे पैसे शर्मांच्या अकाउंट मधून काढून. आणि ट्वीट करायचं "घेतलं तुमचं चॅलेंज. घ्या काय करायचं ते करून.".
भय
आधार क्रमांकावरून बँक खात्यांचे क्रमांक शोधून काढता येत असतील तर माझ्या मते ते पुरेसं भीतीदायक आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बँक खाते नंबर नसेल कळत. आधार
बँक खाते नंबर नसेल कळत. आधार लिन्कड काही पेमेंट मेथड असावी. त्यातून जे काही लिन्कड अकाउंट असेल त्यात ट्रान्स्फर झाली असणार. ट्रान्सफर करणाऱ्याला खात्याचा तपशील कळणार नाही अशा पद्धतीत.
Hi friends! Back from my
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काढू की घालू
यांच्या मते ते पैसे काढण्याचे स्क्रीनशॉट्स आहेत. पैसे आत घातलेले वेगळे दिसतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पैसे भरणं
खात्यात अचाट पैसे भरले तर शर्मांना हे पैसे आले कुठून, यांचा स्रोत काय, हे स्पष्ट करावं लागेल. ज्यांच्याकडे एवढे पैसे असतील, त्यांना आयकर खात्याकडे तपशील पाठवणं किती कठीण असणार! आयकर खात्यानं काही केलं नाही तर समाजमाध्यमं आणि/किंवा पत्रकार यांना हाताशी धरून एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची, सामान्य माणसांची शब्दशः वाट लावणं किती कठीण असणार!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बँक खाते नंबर
ह्या बातमीनुसार पाच बँकांतल्या खात्यांचे क्रमांक आणि IFSC कोड लीक केल्याचे दावे केले गेले आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आदरणीय इंदिराजी आणि सुब्बु स्वामी
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ते पुस्तक मी ग्रंथालयामधून
ते पुस्तक मी ग्रंथालयामधून आणलेले आहे. पण जरा अतिच मॅथॅमॅटिक्स असल्यामुळे (आणि आमची गणिताची बोंब असल्यामुळे) वाचायचा यत्न केला पण समजलं नाही.
पुस्तकाचे नाव - Indian economic planning;: An alternative approach – 1971
.
वागळे काय कमाल चुत्त्या माणुस
वागळे काय कमाल चुत्त्या माणुस आहे!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सगळा व्हिडिओ बघितला नाही ....
सगळा व्हिडिओ बघितला नाही .... पण साधारणपणे ५०% बघितला.
.
त्यांचा युक्तीवाद खालीलप्रमाणे आहे.
.
.
अच्छे दिन आले रे आले
नेशन वॉन्ट्स टू नो...
'फन्ने खान' मधील 'अच्छे दिन कब आयेंगे?' वरून वाद
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
उधारी चुकवण्यासाठी कर्ज ?
चीन ची उधारी चुकवण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून कर्ज घेतोय का ?
बांधकाम व्यवसायात तरुणांना/तरुणींना रुची कमी
बांधकाम व्यवसायात अमेरिकन तरुणांना/तरुणींना रुची कमी -
.
नाही नाही. हा Ageist भेदभावाचा प्रकार आहे - असा आरडाओरडा सुरू होईल आता.
.
सॅनफ्रान्सिस्को मुन्शिपाल्टी चे उद्योग
सॅनफ्रान्सिस्को मुन्शिपाल्टी चे उद्योग - स्थानिक टेक कंपन्यांमधे दिल्या जाणाऱ्या नि:शुल्क भोजनावर बंदी घालणार.
.
.
.
.
>>Free food is a wonderful
>>Free food is a wonderful amenity but doesn't do anything to extend the community around it,
कसं काय? त्या कंपन्यांमध्ये जेवण पुरवण्याचं कंत्राट "कम्युनिटी अराऊंड इट" ने घेऊन उत्कर्ष साधता येईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्या कंपन्यांमध्ये जेवण
.
असं कसं ?
.
खाजगी कंपन्यांचे सरकारकरवी हात पिरगाळल्याशिवाय, व् त्यांना सरकारकरवी ओरबाडल्याशिवाय कोणाचाही उत्कर्ष होत नाही.
.
.
शिवाय कर्मचारी जेवायला बाहेर
शिवाय कर्मचारी जेवायला बाहेर गेल्यास होणाऱ्या वेळेच्या अपव्ययाची जबाबदारी/कॉष्ट कोण घेणार?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अॅ
म्हणजे फेसबुक वगैरेंच्या बाहेर जेवण विकणाऱ्या कंपन्या खाजगी नाहीत?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
म्हणजे फेसबुक वगैरेंच्या
.
आहेत ना.
ते जे वर उल्लेखलेले Corridor रेस्टॉरंट आहे ते खाजगीच आहे.
.
इथे मुद्दा हा आहे की Corridor रेस्टॉरंट आणि इतर रेस्टॉरंट्स (व त्यांच्या असोशिएशन्स) मिळून एकत्र येऊन सरकारला (म्हंजे San Francisco Supervisors Ahsha Safai and Aaron Peskin या नगरसेवक लोकांना) हाताशी धरून नवीन नियम बनवत आहेत. याला क्रोनिइझम म्हणतात. तुम्ही त्याला क्रोनी कॅपिटलिझम पण म्हणू शकता.
व त्या नवीन नियम बनवण्यावर माझा आक्षेप आहे.
.
होमी भाभा
भारतात सगळ्या मान्यताप्राप्त संशोधन संस्थांमध्ये खाण्या-पिण्याची स्वस्तात सोय होते. राहण्याचीही. मुंबईतही. संशोधन करणाऱ्या लोकांना इतर कसलीही पंचाईत करावी लागू नये, असा होमी भाभांचा विचार त्यामागे आहे.
मला व्यक्तिशः ती गोष्ट अनेक कारणांसाठी अजिबात मानवली, पटली नाही*. किंबहुना संशोधकांनी नियमितपणे थोडी घरकामं करावीत, संशोधक आणि संशोधन दोन्हींचा त्यातून फायदा होईल असं माझं मत आहे. मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा मोजका पगार, कामाचे तास पाहता त्यांच्यासाठी स्वस्त/सबसिडाईज्ड कँटिन्स हा प्रकार फार गरजेचा आहे.
भारतात बाहेर जाऊन जेवणं हा नॉर्म नाही. बरेच लोक घरून डबा घेऊन येतात. स्वतः स्वयंपाक करतील किंवा लोकांना कामाला ठेवून स्वयंपाक करतील किंवा काही लोक डबा लावतील. अमेरिकेतही दिसतंय की आजूबाजूचे बहुतेकसे भारतीय घरून डबा घेऊन येतात; एकटी राहणारी तरुण भारतीय पोरंही बरेचदा डबा आणतात. (जवळपास आवडीचं भारतीय जेवण विकणारी दुकानं नाहीत, हाही त्यातला महत्त्वाचा भाग असू शकेल.)
*कामाच्या ठिकाणापासून अगदी जवळ राहण्याची सोय, हा प्रकार माझ्यासाठी फार सोयीचा झाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किंबहुना संशोधकांनी नियमितपणे
हे कळले नाही.
संशोधकांना घरकामाच्या धबडग्यातून सुटका हवी ना! छंद म्हणून स्वयंपाक वगैरे ठीक पन रोजचे डबे-फिबे नकोत लागावे आणायला.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अनुभव
संशोधकांचं माहीत नाही, पण ज्यात मेंदूला अजिबात त्रास द्यावा लागत नाही असं यांत्रिकपणे करायचं काम करताकरता चांगला विचार करता येतो आणि कल्पना सुचतात. मग तुम्ही हवं तर भांडी घासा, कणीक तिंबा नाही तर आणखी काही तरी करा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बेझोस/गेट्स
>>> मग तुम्ही हवं तर भांडी घासा, कणीक तिंबा नाही तर आणखी काही तरी करा.
--- हे आठवलं: https://www.cnbc.com/2017/11/10/why-jeff-bezos-and-bill-gates-both-do-th...
सहमत
मी अजूनही संशोधनाचंच काम करते. हे संशोधन माझ्या आधीच्या खगोलशास्त्रासारखं नाही, त्यात बहुतेकदा मळलेली वाट होती. सध्याचं संशोधन म्हणजे 'तो फिर समस्या क्या है', हे सुद्धा नीट समजलेलं नाही; मला समजलेलं नाही, बॉसलाही समजलेलं नाही. सध्या दोन आंधळे एकमेकांसोबत रस्ता शोधत आहेत. संध्याकाळी घरी जाऊन जेवण झाल्यावर टीव्ही बघण्याजागी बरेचदा काही वाचते. पण त्यात स्वतंत्र विचार करायला वेळ होत नाही. वाचन चांगलंच, पण सध्याच्या अडचणी सोडवायला त्याचा फार उपयोग झालाय, असं बरेचदा होत नाही.
काम बरेचदा अडतं ते प्रोग्रॅमिंग जमत नाही किंवा या विषयात मी रीतसर शिक्षण घेतलेलं नाही, म्हणून नाही; तर 'यापुढे काय करावं' किंवा 'समोर आहेत त्या आकड्यांचा अर्थ काय' हे सुचत, समजत नाही म्हणून. ते सुचण्यासाठी उत्तम परिस्थिती म्हणजे लादी पुसणं (केर काढायला रोबॉट आहे), भाजी चिरणं, अंधारात गर्दी नसलेल्या ठिकाणी चालायला बाहेर पडणं (दिवसाउजेडी बाहेरच्या गोष्टींमुळे लक्ष विचलीत होतं); व्यायामही निराळा, व्यायाम करताना मला कामाचा विचार करता येत नाही कारण किती व्यायाम झालाय याकडे लक्ष लागतं.
हा झाला संशोधनाचा फायदा. संशोधिकेचा फायदा निराळा.
बरेचदा मला हेही जाणवतं की जेव्हा शरीराला पुरेसे कष्ट होत नाहीत, तेव्हा आणखी आळस येतो. बौद्धिक आळसही. संशोधनाचं काम असं असतं की त्यात महिनोन महिने काही चांगली बातमी येण्याची वाट बघावी लागते. बरेच खाचखळगे लागतात. एकंदर संशोधिकेचा स्वभाव आनंदी असेल तरीही अनेकदा समोर दिसणारे निकाल तेवढ्यापुरते का होईना, हताश करणारे असतात. संशोधन निबंध प्रकाशित करण्याचं दडपण असतंच. हा ताण सहन करण्यासाठी बिनडोक कामांतून मिळणारा आनंदही महत्त्वाचा असतो. इतर अनेकांना पार्ट्या करणं, बारमध्ये जाणं, नातेवाईकांना भेटणं, खरेदी करणं यांतून आनंद मिळतो, तसा अनेक संशोधकांना मिळत नाही, असं माझं सांगोवांगीचं निरीक्षण आहे.
'माझा काही उपयोग आहे', असं वाटणं महत्त्वाचं असतं. 'बाकी काही नाही तरी निदान माझ्यामुळे माझ्या घरच्यांना तोशीस पडली नाही', यातला आनंद समजणं आणि तो मिळवण्यासाठी कष्ट घेणं यांतून संशोधकांच्या मनःस्वास्थ्यात बरीच भर पडेल. त्याशिवाय, संशोधिकेनं लग्न केलेलं असेल, पोरंबाळं असतील तर घरची कामं करायला, जबाबदाऱ्या उचलायला ठेवलाय बरा अर्धा, अशी परिस्थिती असणंही त्या दोन्ही लोकांच्या मनःस्वास्थ्यासाठी चांगली नाहीच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कंपनीचं कँटिन फक्त कामावरच्या
कंपनीचं कँटिन फक्त कामावरच्या कर्मचाऱ्यांसाठी असतं ना?
कंपनीचं कँटिन फक्त कामावरच्या
.
हो.
.
आता पिरॉबलेम असा आहे की कंपन्यांच्या कँटिन मधे दिले जाणारे जेवण झकास, वैविध्यपूर्ण आणि नि:शुल्क असेल तर कंपनीचे कर्मचारी बाहेरच्या रेस्टॉरंटांत जेवायला जात नाहीत. व त्या रेस्टॉरंटांना धंदा मिळत नाही. म्हणून ते रेस्टॉरंटमालक लोक सरकारला हाताशी धरून नियम बदलू इच्छीतात. म्हंजे या कँटीन मधे जेवण नि:शुल्क दिले जाऊ नये असा नियम करू इच्छीतात. जेणेकरून कंपन्यांचे कर्मचारी बाहेर रेस्टॉरंट्स मधे जेवायला जायला उद्युक्त होतील. व या रेस्टॉरंटांना धंदा मिळेल. याला क्रोनीईझम म्हणतात.
.
कायदा केला गेला तर त्याच्या विरुद्ध दाद मागितली जाऊ शकते ..... व त्यानंतर तो कायदा असंविधानिक ठरवला गेला काय अन न गेला काय - मिडियाला चर्चा करायला एक काँट्रोव्हर्सी मिळते आणि वकील लोकांना कायदा बेकायदेशीर आहे/नाही याचा वाद घालायला फी मिळते.
.
आणि मुख्य म्हंजे सरकारला (म्हंजे San Francisco Supervisors Ahsha Safai and Aaron Peskin या नगरसेवक लोकांना ) आणि नेत्यांना "आम्ही कंपन्यांना वेसण घालू शकतो" असं उच्चारवात बोंबलता येतं.
.
.
कामावरच्या
कामावरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच ते कंपनीत येणाऱ्या पाहुण्यांसाठीही असते. मी एखाद्या कंपनीत कामानिमित्त गेलो; उदा. विक्रीसाठी, प्रमोशनसाठी, रिक्वायरमेंट समजून घेण्यासाठी तर मी कर्मचारी नसूनही कंपनीच्या कॅण्टीनमध्ये जेवू शकतो.
बा द वे (मी अभ्यासला तेव्हा) भारतीय आयकर कायद्यानुसार फ्री लंच हे टॅक्सेबल पर्क्विझिट आहे तर सबसिडाइज्ड लंच हे टॅक्सेबल पर्क्विझिट नाही. म्हणजे १०० रुचे जेवण कंपनीने मला फुकट दिले तर १०० रु माझ्या करपात्र उत्पन्नात ॲडवायचे. पण कंपनीने त्याबद्दल माझ्याकडून १० रुपये घेतले तर मात्र ९० रु ॲडवायचे नाहीत. मी पूर्वी फॅक्टरीत नोकरी करायचो तेव्हा कंपनी १ रु घ्यायची आणि सुमारे ८ रु स्वत:चे घालून कॅण्टीन कंत्राटदाराला द्यायची. तेव्हा मला नेहमी प्रश्न पडे की कंपनी १ रु तरी का घेते? त्याचे उत्तर आयकर कायद्यात होते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जाताजाता : कोणत्याही लेबर
जाताजाता : कोणत्याही लेबर युनियन्स त्यांचे कलेक्टिव्ह बार्गेनिंग राईट्स वापरून कंपनीमालकाकडून जे काही पदरात पाडून घेतात त्याच्यावर ४०% प्राप्तीकर (टीडीएस) लावला पाहिजे.
फुकटचं फेसबुकी भोजन
फेसबुकात फुकटात जेवायला मिळतं. आपल्या मैत्रमंडळालाही फुकटात जेवू घालता येतं. माझ्या ओळखीचा एक तिथे नोकरी करतो. आमची मैत्री आहे असं म्हणणार नाही, पण एका कमिटीवर एकत्र काम करतो. कमिटीची मिटींग त्यानंच हक्कानं तिथे भरवली. जेवणाच्या वेळेस. फेसबुकात शिरताना NDA (Non-disclosure Agreement)वर सही करावी लागली.
मी दोनदा गिळलंय तिथे. भारतीय पदार्थांत पालक पनीर आणि जिरा राईस जेवले. कोंबड्यांच्या आत्म्याची मला पडलेली नाही, पण भारतीय धाटणीचं चिकनही होतं. चांगलं होतं चवीला. त्या जोडीला वाडगाभर कच्चा पालापाचोळा. काकडी-गाजराचं सरबत, चोथ्यासकट. शेवटी आईस्क्रीम, कुकी का कॉफी या विचारांत असताना थंड कॉफीची निवड केली. रात्री थंडा फराळ पुरला. फेसबुकानं एवढी विदा गोळा केल्ये माझ्याकडून, थोडं तरी वसूल केलं बै!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नागरिक सूची
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/no-names-of-former-pr...
माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावं या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे बंधू एकरामुद्दीन अहमद यांच्या कुटुंबीयांचंही या यादीत नाव नाही. आसामच्या दक्षिण अभयपुरी मतदारसंघातील भाजपचे आमदार अनंत कुमार यांचंही या यादीत नाव नसल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांची नावं नसलं तरी उल्फा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख परेश बरुआ याचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्याची पत्नी बॉबी भुयान आणि दोन मुलं अरिंदम आणि आकाश यांचं नाव या यादीतून गायब आहे.
माजी राष्ट्रपतींच्या नातेवाईकांनी आपल्या नावाचा समावेश होण्यासंबंधी काही काळजी घेतली होती का?
अवांतर: माझी आई भारताची नागरिक आहे हे मला किंवा तिला सिद्ध करायला सांगितले तर काय पुरावे सादर करता येतील हा प्रश्नच आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा प्रश्न सरकारवर उलटावा
.
हा प्रश्न सरकारवर उलटावा.
.
(१) मी भारताची नागरिक नाही याचा पुरावा सरकारनेच द्यावा. हा पुरावा सहज मिळवता येईल - विश्वातल्या सर्व देशांची नागरिकत्वाची रजिस्ट्रि तपासायला सांगा व तिथे माझे नाव नसेल तर मी त्या देशांची नागरीक नाही हे सिद्ध होते. हे आवश्यक आहे व/वा पुरेसे आहे याचे विश्लेषण करायला लागेल. अर्थातच हा थोडा भोळसटपणा आहे.
(२) माझ्या नागरिकत्वाचा पुरेसा पुरावा अस्तित्वात असायला हवा आणि ही माझी एकट्याची जबाबदारी नाही असं जर कोर्टात सिद्ध करता आलं तर सरकारकडून डेरेलिक्शन ऑफ डूटी बद्दल दंड वसूल करता यायला हवा.
.
(३) कंपन्या ह्या बाजारात कस्टमर्स ची सेवा करण्याच्या गोष्टी करत असतात. त्याच कंपन्यांवर निर्बंध घालायला कसं सरकार अतितत्पर असतं ?? (पुरावा. यातला रिलेव्हंट मजकूर खाली डकवत आहे.). मग सरकारने ते माझा सेवक असल्याचा बेसिक व रिलाएबल पुरावा (म्हंजे माझे सिटिझनशीप प्रोफाईल) बाळगू नये ?? कंपन्यांकडे कसं त्यांच्या कस्टमरचं तपशीलवार प्रोफाईल असतं ?? (उदा. CRMs, customer master data management tools). मग सरकारकडे का असू नये ??
.
(४) अर्थातच वरील (३) ला उलट प्रश्न केला जाऊ शकतो की तो डेटा सर्व्हेलन्स साठी वापरला जाऊ शकतो वगैरे. (जॉर्ज ऑर्वेल च्या १९८४ ......)
.
.
.
सावळा गोंधळ
आजच्या लोकसत्ताचा अग्रलेख याबद्दल आहे. त्यातून उद्धृत -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ब्राह्मण-बनियांवर अन्याय
एके काळी भाजपला ब्राह्मण-बनिया लोकांची पार्टी म्हणून खांग्रेसी हिणवत असत. नंतर ओबीसी-मराठा-दलित वर्ग भाजपकडे वळला हा भाजप सत्तेवर येण्यातला महत्त्वाचा घटक मानला जातो. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं जातिनिहाय विश्लेषण करता मिळालेला विदा :
We analysed 1,000 BJP leaders & found...
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चित्रं बघितली.
मात्र खांग्रेसी विश्लेषण आणि लोकसंख्येचं प्रमाण दाखवल्याशिवाय या आलेखांचा फार उपयोग समजत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आजपासून एमआरपीनुसारच
आजपासून एमआरपीनुसारच खाद्यपदार्थांची विक्री
मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहताना खाद्यपदार्थांसाठी खिसा रिकामा कराव्या लागणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/multiplexes-food-malls-in-maha...
अखेर तसं झालं.
अमर सिंग भाजपा मधे येणार की काय ?
अमर सिंग भाजपा मधे येणार की काय ?
.
'ज़ौक़' जो मदरसे के बिगड़े हुए हैं मुल्ला
उनको मय-ख़ाने में ले आओ सँवर जाएँगे
.
लष्कर चे तीन दहशतवादी....
लष्कर चे तीन दहशतवादी.... अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहेत.
.
इम्रान खान यांना भेट म्हणून ?
.
भारतीय कॉर्पोरेट सेक्टर ने यंव करावं अन त्यंव करावं ......
प्र. का. टा. आ.