अलीकडे काय पाहिलंत? - ३२

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

या धाग्याचा वापर करणाऱ्या सर्वांना विनंती - कृपया लिंक द्यावी. शक्यतो व्हिडियो एम्बेड करू नये. धागा लोड होईपर्यंत वृद्धापकाळ येतो.

-------

नागराज मंजुळे यांची शॉर्ट फिल्म 'पिस्तुल्या' आता अधिकृतरीत्या यूट्यूबवर उपलब्ध आहे.

https://www.youtube.com/watch?v=ovimYnrk07o

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चलो जीते है !!

चॅनल सर्फिंग करत असताना अचानक स्टार गोल्ड सिलेक्टवर " चलो जीते है " नामक प्रेरणादायी सिनेमा पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं.एका निसर्गरम्य गावात ,एक निरागस मुलगा भिंतीवर खडूने सुभाषित लिहीत असतो तितक्यात त्याला घरी बोलावून घेण्यात येतं. घरात विविध वयोगटातली बरीच मुलं दिग्दर्शकाने सांगितलेल्या गोष्टी जमेल तितक्या करत असतात. आई चूल फुंकून हैराण झाली कि फक्त बालनायकाकडे प्रेमळ कटाक्ष टाकते.बालनायकाला पुस्तक वाचल्यासारखं करत आईकडे अनिमिष का कायस बघाव लागतं.चिवट प्रेक्षकांना पुस्तकाचं नाव कळावं म्हणून झूमीन विवेकानंद ,कटटू झूमीन " स्वतःसाठी जगलास तर मेलास ;दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास " तत्सम अर्थाचं नेत्रदीपक सुभाषित झगमगू लागतं.या संमोहक सुभाषिताने प्रेक्षकांचे डोळे चित्रपट संपेस्तो स्क्रीनवर खिळून बसतात.
बालनायक प्रथम आईला विचारतो,"तुम किसके लिये जीती हो?" आई मोहक हसून तो चेंडू बापाच्या कोर्टात ढकलते. बाप वस्सकन तो चेंडू शाळामास्तरकडे टोलवतो. मास्तर प्रेमळ लुकायची पराकाष्ठा करत ,भगतसिंग आणि राजगुरू बघ कसे देशासाठी मरून देशासाठी जगले म्हणताच बालनायकाला तात्काळ देशप्रेमाचा पाझर फुटतो. मास्तर मात्र कोणासाठी जगताहेत याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. बालनायकाने जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी लोकं कोणासाठी जगतायत याचा शोध घेऊनही त्याची ज्ञानाची भूक अतृप्तच रहाते.
सिनेमाचा नायक कोण आहे हे मंदाड प्रेक्षकांना कळावे म्हणून बालनायकाला सर्व ऋतूत लाल स्वेटर घालावा लागतो. कुजकट लोकांनी कुशंका काढू नये म्हणून कधीतरी एका मुलाला हिरवं स्वेटर घालून बसवलं आहे.शाळेत रोज पंचेचाळीस मिनिटांचा हजेरीचा तास असतो.त्यावेळी एका गैरहजर मुलाचा हजर नाही असा जयघोष सगळ्या मुलांना करावा लागतो.मुलाच्या गैरहजर होण्याचं कारण शोधण्याचं कर्तव्य अर्थातच बालनायकाच असतं.प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत होईपर्यंत हे शोधकार्य आणि गैरहजर गरीब मुलाची हृदयद्रावक दास्तान बघण्याशिवाय गत्यंतर नसतं.गरिबीमुळे गणवेष परवडत नसल्याने तो मुलगा शाळेत येऊ शकत नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या आईला अकारण ओव्हर ऍक्टिंगच्या पीडेतून जावं लागतं.गणवेषाचं महत्व याविषयी मास्तरांनी केलेल्या प्रबोधनानंतर गणवेषाचा किडा बालनायकाचा मेंदू पोखरू लागतो.

यथावकाश शाळेत एक अश्रूधूर नाटक सादर होतं.बरीच स्पर्धा असूनही ऑस्करची बाहुली कोणाला मिळते ?? एनी गेस ??....... अँड द ऑस्कर गोज टू .... यु नो हू ....
बालनायकाला पुरस्काराचे पैसे मिळतात आणि....नेहेमीप्रमाणे गैरहजर मुलाचा जयघोष होताच तो गरीब मुलगा नव्वीन गणवेषात हजर होतो ! हाऊ रोमांचक !!!
तर लोकहो बालनायकाचं नाव काय ??
नरू !!
यानेकी नरेंद्र मोदी !!
ताक : लघुपट फक्त अर्ध्या तासाचा आहे असे सांगून फसवणूक करतात बरंका !
युगानुयुगं हा चित्रपट बघतच असल्याचं स्मरण आहे.
लोणी : तुम्ही कोणासाठी जगताय याचा रहस्यभेद करू नका. आमेन !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" स्वतःसाठी जगलास तर मेलास ;दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास " तत्सम अर्थाचं नेत्रदीपक सुभाषित झगमगू लागतं.या संमोहक सुभाषिताने प्रेक्षकांचे डोळे चित्रपट संपेस्तो स्क्रीनवर खिळून बसतात

.
जोरदार मारलाय !!!
.
"स्वतःसाठी जगलास तर मेलास ;दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास" - हे वाक्य (अनेक वर्षांपूर्वी) वाचल्यावरच मला असह्य झालं होतं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वत:साठी आणि दुसऱ्यासाठीही जग्+ग्लास तरच जगलास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे तिरशिंगरावांचं. एकटीनं दारू पिणं म्हणजे बेवडेपणाचं लक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा-ग्लास किती पिवळा आठवलं
(अवांतर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

'ये मेरी फॅमिली' ही टिव्हीएफची ७ भागांची वेबसिरीज बघितली. १९९८ सालच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतली गोष्ट १३ वर्षांच्या नायकाच्या नजरेतून. त्याचं बऱ्यापैकी सुखवस्तू असणारं कुटुंब, त्याच्या छोट्याश्या इच्छा-आकांक्षा, हुश्शार भावाची दादागिरी, अतरंगी पण अतिशय ब्राईट मित्राचे सल्ले घेऊन वेगवेगळे किडे करणे, १९९० च्या त्या काळातले ते वातावरण हे सगळे अफाट डिटेलींगसह दाखवले आहे. स्क्रिप्ट, संवाद, अभिनय सगळ्याच पातळ्यांवर अत्युच्च दर्जाचं काम झालंय इथं. नायकाचं काम करणाऱ्या मुलाचा आणी आई झालेल्या मोना सिंगचा अभिनय अतिशय म्हणजे अतीशय सुंदर झालेला आहे. मुलाचे डोळे तर इतके पाणीदार आहेत की बासच. त्याच्या खास मैत्रिणीच्या रोलमध्ये असणारी सुबक ठेंगणी अतिशय सुरेख आहे. शाळा कादंबरी हिंदीत गेलीये की नाही माहित नाही पण शाळाचा फार मोठा प्रभाव जाणवतो.
१३ वर्षांचा मी या नायकाप्रमाणे आजिबातच नव्हतो. याचं घर मोठा बंगला, माझं घर १० बाय १० ची एक खोली. त्याला कॉमिक्स बुक्स मिळायची, मला वह्या घ्यायला सुद्धा कित्येकदा पैसे मिळायचे नाहीत. पण तरीसुद्धा मला खुप रिलेट करता आलं. परिस्थिती भिन्न असेल पण फॅमिली तशीच अगदी तशीच होती. हसवलं आणि शेवटच्या तीन भागांनी रडवलं पण खुप. नक्की पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पाहिलीये आणि फॅन झालो या सिरीज चा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इवा ब्राउन १,२( हिटलरची प्रेयसी),
अॅवकाडो( चिलीतली नवीन बागायती),
हु वॅाज कार्ल मार्क्स,
द बिटर कप( दार्जिलिंग चहा आणि दर्जा प्रमाणपत्रे),
वेनिस ( टुअरिझमचे परिणाम),
मदागास्कर ( रत्नाचा शोध- पाचू, नीळ. परिणाम)
या काही ३० -४५ मिनिटांच्या डॅाक्यु० - यु ट्युब - 'dw documentary'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एचबीओ वर ही नवीन सिरीज सुरू झाली आहे. हाय एण्ड कॉर्पोरेट फॅमिली मधले वॉर आहे, थोडाफार कॉर्पोरेट ड्रामाही आहे. इन्टरेस्टिंग आहे.

वेस्टवर्ल्ड कशी आहे? कोणी पाहिली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने