गीता आणि गीताध्यान - 'उगमा'विषयी काही विचार

सर्वपरिचित आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलेल्या गोष्टींचा - पारंपरिक कथा, स्तोत्रे, म्हणी, शब्दप्रयोग - अशा मुळाचा शोध घेणे, त्यांचा निर्माता कोण असावा ह्याचा विचार करणे हा एक मोठा आनंददायी छंद आहे. आपल्या घरातल्या घरात संगणकासमोर बसून जगाच्या कानाकोपर्‍यात उपलब्ध असलेली माहिती वाचायला मिळणे ह्या जालाच्या सोयीमुळे हा छंद जोपासणे अधिकच सोपे झाले आहे.

असाच 'भगवद्गीते'चा निर्माता कोण हा विचार मी करत असतांना सुचलेले काही विचार येथे मांडत आहे.

एका अर्थाने 'भगवद्गीते'चा निर्माता कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे. ज्या निर्मात्यांनी जय, भारत आणि अखेर महाभारत ह्यांची निर्मिति करण्यात सहभाग दिला त्या अज्ञात निर्मात्यांपैकी कोणी एकाने - अथवा अनेकांनीहि - हे कार्य केले आहे. त्यांपैकी कोणाचीच नावे ऐतिहासिक व्यक्ति म्हणून आता माहीत नसल्याने ही चौकशी येथे येऊन थांबते.

महभारतातील १ लाख श्लोकांमध्ये गीतेचे सुमारे ७०० श्लोक शान्तिपर्वाचा एक भाग आहे आणि शान्तिपर्वातील अन्य अनेक श्लोकांप्रमाणे ते आहे तेथेच पडून राहू शकले असते. पण तसे न होता कोणीतरी हे ७०० श्लोक वेगळे करून त्यांची 'भगवद्गीता' अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. हे गीतेला स्वतःचे अस्तित्व देण्याचे काम इतके यशस्वी झाले की 'भारतीय तत्त्वज्ञानाचे सार' अशी तिची ओळख निर्माण झाली, त्यापुढे जाऊन गीता ही एक देवता मानून तिची देवळे होऊ लागली, गीता संदेशाचा प्रसार करणार्‍या संस्था निर्माण झाल्या. ख्रिश्चन धर्माला जसे बायबल, इस्लामला जसे कुराण, तसा हा हिंदूंचा हा प्रमाण धर्मग्रंथ आहे अशी जगात पुष्कळांची समजूत झाली. अशा अर्थाने गीता 'निर्माण' झाली. हे कोणामुळे घडले असा हा येथे प्रश्न आहे.

आदिशंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर, रामानुजाचार्य ते लोकमान्य टिळक अशा अनेक विद्वानांनी आपापल्या विचारांनुसार गीतेचे विवरण केले. अजूनहि नवनवे अभ्यासक हेच कार्य आपापल्या मार्गांनी करीतच आहेत. ह्या सर्वांमधील सर्वात जुने आणि मान्यताप्राप्त विवरण आदिशंकराचार्यांच्या गीताभाष्यामध्ये आहे. त्यांच्या पूर्वीहि गीताग्रंथ वेगळा अस्तित्वात असावा असे मानायला जागा आहे कारण गीताभाष्यातच स्वतः शंकराचार्यांनी त्यांच्या पूर्वीच्या टीकाकारांचे उल्लेख केले आहेत. (जसे अध्याय ३ चा प्रारंभ 'केचित्तु अर्जुनस्य प्रश्नार्थं अन्यथा कल्पयित्वा तत्प्रतिकूलं भगवतः प्रतिवचनं वर्णयन्ति|) मात्र त्यांनी कोठल्याच त्यांच्या पूर्वीच्या टीकाकाराचे नामनिर्देशन न केल्यामुळे आणि असा कोणताच टीकाग्रंथ वा त्याचे नाव वा टीकाकाराचे नाव आज उपलब्ध नसल्यामुळे असे म्हणता येते की हे टीकाकार जनमानसावर फार प्रभाव टाकू शकले नाहीत.

जनमानसावर प्रभाव पडला तो शंकराचार्यांच्या भाष्यापासून कारण तेव्हांपासून गीतापाठ आणि गीतेच्या अभ्यासाची साखळी अविच्छिन्न चालू दिसते. अशा अर्थाने मी म्हणेन की आदिशंकराचार्य हे गीतेचे निर्माते आहेत.

हा विचार मी विवेकानंदांच्या एका उतार्‍यावरून बनविला आहे. पहा:
(The Complete Works of Swami Vivekananda, Vol III P 328):
'The great glory of Sankaracharya was his preaching of the Gita. It is
one of the greatest works that this great man did among the many noble works of his noble life - the preaching of the Gita, and writing the most beautiful commentary upon it. And he has been followed by all founders of the orthodox sects in India, each of whom has written a commentary on the Gita.'

गीतापाठासोबतच 'गीताध्यान' नामक ९ श्लोकांच्या रचनेच्या पठणाचीहि प्रथा आहे. त्याचा प्रारंभ 'पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम्' असा होतो. 'सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः| पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्', सर्व उपनिषदे ह्या गाई, दोहन करणारा कृष्ण, भोक्ता अर्जुन आणि गीतामृत हे दूध, हे प्रसिद्ध वचनहि ह्या स्तोत्रातीलच आहे.

ह्यावर बरीच प्रदीर्घ चर्चा येथे वाचावयास मिळेल. चर्चा मीच तेथे सुरू केली होती. ती चर्चा प्रदीर्घ आहे म्हणून येथे तिचा सारांश देत नाही. पण चर्चेचे फलित म्हणजे मधुसूदनाचार्य सरस्वती (सु. १५४०-१६४०) (गूढार्थदीपिका ह्या टीकेचे लेखक) अथवा धेनकनाल जिल्हा, ओरिसा येथे वास्तव्य केलेले श्रीधरस्वामी (१५वे वा १६वे शतक) ह्या दोघांपैकी कोणी एकजण ह्या प्रसिद्ध स्तोत्राचा कर्ता असावा.

माझ्या मनातील दोनहि प्रश्नांना अशी काहीशी निश्चित उत्तरे मिळाल्याने मला खूपच बरे वाटले!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

लेखाच्या अनुषंगाने काही फुटकळ विचार सुचतात ते मांडतो. जर महाभारतातल्या (अाणि अर्थात गीतेतल्या) भाषेचा stylistics (शैली) च्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, तर कदाचित महाभारत रचण्यात एकूण किती लोकांचा सहभाग होता याबद्दल काही अंदाज करता येतील. (असा अभ्यास कदाचित झालाही असेल, पण मला तशी काही माहिती नाही.)

उदाहरणार्थ असं समजू की सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये एक गोष्ट रचली गेली, अाणि ती हळूहळू कर्णोपकर्णी सर्वदूर पसरली. अनेक ठिकाणच्या अनेकांनी अापल्या पदरचा मजकूर त्यात घुसडला, तसतशी गोष्ट जास्त जास्त मोठी अाणि गुंतागुंतीची होत गेली. असं समजा की सॅम्युअल जॉन्सन, थॉमस मॅकॉले, मार्क ट्वेन, मोहनदास गांधी अाणि सलमान रश्दी या सगळ्यांचा या उपक्रमात कुठे ना कुठे हात होता. अाता अठ्ठाविसाव्या शतकातल्या अभ्यासकाला केवळ इंग्रजी लिहिण्याच्या शैलीवरून ह्या पाची लेखकांच्या हातचे भाग वेगवेगळे अोळखणं फारसं जड जाऊ नये. त्याला ही नावं माहित होतीलच असं नाही, पण ३४००-३५७० ही पानं क्ष-१ ने लिहिलेली अाहेत, किंवा ४७१४-४९०३ ही पानं अाधी क्ष-२ ने लिहिलेली होती, पण त्यात मध्येमध्ये क्ष-४ ने बदल केलेले अाहेत, अशा प्रकारचे निष्कर्ष त्याला काढता येतील. अर्थात अशा निष्कर्षांबद्दल काहीशी अनिश्चिती राहणार हे सांगायला नकोच.

निदान गीता एका माणसाने लिहिलेली अाहे की अनेक, अाणि जर एकच असेल तर त्याच माणसाने महाभारतातला इतर काही भाग लिहिला अाहे का यांबद्दलही काही educated guess वाचायला अावडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तुमच्या साखळी कथेच्या उपक्रमात चिंतातूर जंतू ह्यांनी त्या धाग्यातील क्ष१, क्ष२ ...क्ष६ हे कोण आहे हे जबरदस्त निरिक्षणातून ताडले होते हे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जयदीप चिपलकट्टी ह्यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारला आहे.

संख्याशास्त्राची मदत घेऊन आणि शैली आणि शब्दांचा उपयोग ह्यांचे विश्लेषण करून रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये कशी विकसित होत गेली असावीत आणि त्याचे निर्माते कोणकोण असावेत असा अभ्यास निवृत्त आयसीएस अधिकारी एम.आर.यार्दी ह्यांनी केला आहे. ह्या विषयात त्यांनी काय म्हटले आहे ह्याचे वाचन करून प्रत्येकाने आपापला निर्णय बनवावा. मला ह्यात थोडीच गति आहे म्हणून केवळ संदर्भ देऊन थांबतो.

यार्दींचे 'The Ramayana, Its origin and growth, a statistical study' हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.

महाभारतावरहि त्यांनी असेच काम केले आहे. त्याची थोडीशी झलक येथे खालील शब्दांत दिली आहे. चर्चेच्या विषयाची पुरेशी कल्पना ह्या उतार्‍यावरून येते म्हणून हा थोडा लांब उतारा येथे देत आहे.

"Historical research does trace the philosophy of Gita to Shri Krishna, however it also casts doubts on many of the traditional beliefs as will be seen in the following.

The text of Mahabharata has had many additions made to it over the two millenia it has been in existence. A critical edition of Mahabharata has been prepared by the Bhandarkar Oriental Research Institute, Pune and is considered as reliable version of the epic. Today it contains about 100,000 verses. Its study has revealed that over the ages five persons have contributed to the text. This may be confirmed from the research made by Mr M. R. Yardi presented in his book titled "Mahabharata, Its Genesis and Growth, a Statistical Study" published by the Bhandarkar Institure.. Mr Yardi, a. eminent administartor and scholar now in Pune, is the author of similar analytical books on Ramayana and the Gita. He is also well known for his translations of Dnyaneshwari in Marathi prose, Hindi and English, (published by Bharatiya Vidya Bhavan). The essence of his study is as follows: (I am grateful to Mr Yardi for making his analytical publications available to me.)
The original version named Jaya composed immediately after the great Mahabharata war (which took place a little earlier than 1000 BC according to western scholars and much earlier according to some Indian scholars) was written by the great Rishi Vyas. It mainly described the family feud and the war. This composition is now lost. But a generation later, in around 950 BC, Rishi Vaishampayana retold the events to King Janamejaya, great-grandson of Arjuna during the Snake sacrifice (Sarpayajna) performed in order to avenge the killing of his father Parikshita by Takshaka the King of snakes. This narration was known as Bharat. Additions to this version were made much later in about 450 BC by Suta and his son Sauti who were well-known Puraniks (Mythological story-tellers) This was known as Mahabharata. Further additions were made by one Harivanshakara in the second century BC and still later by Parvasangrahakara in the first century BC. Haivanshkara also added Haivansha, a biography of Shri Krishna which is considered to be part of Mahabharata today.

Through a statistical analyses of the Anushtup metre used in the Shlokas (stanzas) of the epic Mahabharata, Mr Yardi has been able to separate the contribution of each of the additions as follows: Original Jaya by Vyas had 8,800 shlokas; Bharat by Rishi Vaishampayana had 21,,162 shlokas; Suta contributed 17,284 shlokas and his son Sauti 26,728 shlokas; Harivanshakara added 9,053 shlokas and Parvasangrahakara 1369 shlokas. This makes a total of 75596 Shlokas and together with Harivansha which has 6,073 Shlokas the total size of the Mahabharata Epic is 81,670 Shlokas. Different copies of Mahabharata give different numbers of Shlokas. Yardi has used the Critical Edition by Sukhatankar (1944) available with the Bhandarkar Oriental Research Institute Pune.

The analysis also shows that the Gita was added to Mahabharata by Sauti who lived around 450 BC. Shri Krishna was deified and considered as an avatar of Lord Vishnu some centuries after he died but before Sauti’s time thus enabling him to present Shri Krishna as the Supreme God.

In his scholarly book "The Bhagvadgita as a Synthesis", Yardi gives the following interesting information related to Shri Krishna and the source of the philosophies presented by Sauti through his lips in the role of the Supreme God:

There is sufficient evidence in Mahabharata to show that in his time Shri Krishna was considered as a human being and not an avatar. The deity worshipped in those times was Lord Shiva whom Shri Krishna also worshipped. He had propitiated Lord Shiva to obtain a boon of a son from Rukmini and again from another wife Jambavati. After he received the boon Uma, wife of Lord Shiva was delighted by his devotion to Lord Shiva and she too granted him boons addressing him as amaraprabhava i.e. one possessed of prowess equal to that of an immortal. Also, during a dialogue with Bhishma regarding the glory of Lord Shiva, Shri Krishna refers to himself as a mere human being and therefore not in a position to know that great God who was the final goal of all good men. However Shri Krishna was credited with high degree of spiritual power and was recognised by the Vrishni clan (to which Shri Krishna belonged) as a human god. In the days of Sauti he came to be recognised as a partial avatar of Vishnu. Though he is referred to as a cowherd in Suta-Sauti’s version of the Epic, the stories of his being a child-god in Gokul and his playing with Gopis occur only in the additions by Harivanshakara. The legends which connect him with Radha, his favourite gopi, occurs for the first time in 900 AD. Radha is not at all mentioned either in Mahabharata, not even in the Harivanshakara’s additions to it though the latter primarily deals with the biography of Shri Krishna."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यार्दींची पुस्तकं काळजीपूर्वक वाचल्याखेरीज निश्चित मत बनवणं योग्य नव्हे, पण तूर्तास काही शंका नमूद करतो.
१) माझ्या अाठवणीप्रमाणे विंटरनित्झच्या 'History of Indian Literature' मध्ये महाभारताचा रचनाकाळ इ.स. पूर्व चौथं शतक ते इ.स. चौथं शतक असा दिलेला अाहे. डॉनिजरच्या 'The Hindus' मध्ये जवळपास तोच अाहे. यात अाणि यार्दींच्या कालसंगतीत बराच विरोध अाहे, तेव्हा दोहोंपैकी निदान एकात मोठी चूक अाहे हे नक्की.
२) वर दिलेला इंग्रजी उतारा लिहिणाऱ्याच्या मते 'सापांचा राजा' तक्षक ही ऐतिहासिक व्यक्ती अाहे (की ऐतिहासिक साप अाहे?!), अाणि 'सर्पयज्ञ' ही ऐतिहासिक घटना अाहे. याचा अर्थ कसा घ्यायचा ते कळत नाही. (उतारा लिहिणारे बहुतेक शिरवईकर असावेत.)
३) उतारा लिहिणाऱ्याच्या मते भगवान शंकर अाणि त्याची बायको उमा हे जोडपं खरोखर अस्तित्वात अाहे (निदान तीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं). यार्दींचा असाच विश्वास अाहे का हे माहित नाही. (माझा बिलकुल नाही.)
४) माझ्या समजुतीप्रमाणे इ.स. पूर्व भारतात लिपीचा वापर फारच थोडा होता, अाणि तेव्हा महाभारत हे प्राय: मौखिक परंपरेने पसरलं. तेव्हा इ. स. पूर्व ९५०-४५० या काळात त्यात काहीच बदल होऊ नये याचं अाश्चर्य वाटतं. (वेदांची गोष्ट निराळी. एकदा संहिता निश्चित झाल्यावर त्यांच्या विशिष्ट पठणपद्धतीमुळे, अाणि अपौरुषेयत्वाच्या वलयामुळे त्यांत कोणी फेरफार करू धजलं नसेल हे पटतं. पण महाभारताचं तसं काही नव्हतं.)
५) एकूणच 'अ'ने इतके श्लोक लिहिले, अाणि त्यानंतर 'ब'ने इतके लिहिले याचा दिलेला हिशेब जरा अतिच नेमका वाटतो. जर 'अ' ने लिहिलेल्या कथेत 'ब' ने भर घातली, तर ती अाधीच्या कथेत फेरफार केल्याशिवाय घालणं अवघड अाहे. कुणीतरी खांडेकरांची 'ययाति' घेतली, अाणि त्यातलं एकही वाक्य न खोडता मध्येमध्ये भर घालून एक अाणखी मोठी कादंबरी तयार केली अशी कल्पना स्वीकारणं सोपं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

गीता पठणावरून आठवलं....

विविध दुकानांत "गीता सार" या नावाचे गीतेत नसलेल्या विचारांचे वॉल हँगिंग दिसते त्याचा उगम कोठून असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माऊंट अबू स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी नामक एक कल्ट आहे. यातील बेसिक विचारधारा त्यांच्या 'प्रीचींग'शी जुळते. तिथूनच हे आलेले असण्याची शक्यता आहे. जितक्या ठिकाणी पाहिले, तिथे तिथे या कल्टचा संबंध मला तरी दिसलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दोन तीन वर्शापूर्वी माऊंट-अबू ला गेलो होतो, तेंव्हा हा आश्रम पाहीला होता. ते ५००० रुपयांमध्ये मोक्षाची गॅरंटी देतात, अशीच वेगवेगळी पॅकेजेस आहेत त्यांची. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचला.लेख माहितीदायी आहेच पण त्यानंतर डॉ. यार्दींच्या संशोधनाचा उल्लेख असलेला कोल्हटकरांचा मोठा प्रतिसाद जास्त महत्त्वाचा वाटला.
सौती इ.स्.पू. ४५० मध्ये होऊन गेला असेल तर बेसनगर गरुडध्वज शीलालेखाच्या (ई.स्.पू. २००) २५० वर्षे आधीच श्रीकृष्ण हा ईश्वरपदाला पोचला होता असे पुन्हा वेगळ्या (वाङ्मयीन)पुराव्याने सिद्ध होते.
वैशंपायनाने जनमेजयाला महाभारत सांगितले. हा जनमेजय किष्किंधेचा सम्राट होता. जर किष्किंधा म्हणजेच हंपी असे असेल तर इ.स्.पू. ४५० मध्ये भागवत धर्म दक्षिण भारतातही पसरला होता असे मानण्यास जागा आहे. त्याबरोबरच जनमेजय हा रामसीता आणि हरि-हर उपासक असेल तर श्रीरामाचे दैवतीकरण इ.स्.पू. ४५० मध्ये पूर्ण झालेले होते असे म्हणावयास हरकत नसावी.

एन्शंट इंडिया : सत्य संहिता या ब्लॉगवरील Janamejaya’s Dana Sasana Patram
Telugu Encyclopedia: Vignayana Sarvaswamu: Tommidava Samputamu, Ganita, Khagola Sastramulu: Telugu Bhasa Samiti: Page 561:हा पुरावा किती विश्वसनीय असावा याबद्दल कोल्हटकरप्रभृती जाणकारांची मते वाचायला उत्सुक आहे.:::

In the 89th year of of Jayabhyudaya Yudhisthira Saka, in the Plavangakhya (The year named after Plavanga ( monkey. Hanuman?), In the Sahasya Masi, on the Amavasya Day (New Moon Day), on a Monday, Sri Janamejaya, ruler of the earth (king), born in the Gotra of Vaiagrani Vayaghra, enthroned in the city of Kishkinda, the protector of all Varnas and Asramas (classes and stages),

(… place)

in the western city of Sitapura, in the Vrukodara Kshetra ( Vrukodara means Bhima),

(… deities)

for the worship of SitaRama who are worshipped by the honoured disciple Kaikaya of GarudaVahana (means Vishnu) Tirtha (water place) and others of the matha (mutt – mission) of the band of munis (saints),

(…the gift)

I give in the hands of the Yati (saint), along with Gold, the decree of the donation of land, of the area to the east of the Tungabhadra Jaladhara (called River Pampa by Valmiki), , in the presence of HariHara (Vishnu and Siva) in the time of aparaga(?)

(… the purpose)

for the attainment of Vishnuloka by my forefathers, in the order of the four boundaries of the Muni brunda Kshetra, established by my great grandfather Yudhisthira.”

89 years, after Vyasa started writing the Mahabharata (Jaya), Janamejaya, (Arjuna’s great grand son), made a gift of land to a saint, near the Tungabhadra. Janamejaya ruled in Kishkinda (Hampi). Janamejaya worshipped Sita, Rama and Hari (Vishnu) and Hara (Siva).

श्रेय अव्हेरः
Authorship and Copyright Notice: All rights reserved: Satya Sarada Kandula

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसूनानांनी सुचविलेला ब्लॉग पाहिला आणि काहीहि बोध झाला नाही. इतके दिसले की भारताचा सर्व प्राचीन इतिहास महाभारत आणि पुराणांमध्ये आधीच लिहिलेला आहे आणि तो आपण समजावून घेतला पाहिजे असा काहीसा दृष्टिकोण दिसतो. काहीतरी जनमेजयाचे दानपत्र - जे किष्किंधा नगरीत निर्माण झाले असाहि काही दावा दिसतो. वरवर पाहता लिखाणात भरपूर लिंका दिसतात पण त्या सर्व http://ancientindians.wordpress.com , http://oldthoughts.wordpress.com ,आणि http://kishkinda.wordpress.com/ ह्या संस्थळाभोवती घुटमळणार्‍या आहेत आणि सर्वांमागे सत्या शारदा कंडुला नावाच्या एकटयाच बाई आहेत असे दिसते, बाकी कोणताच अभ्यासक त्यांना दुजोरा देतांना दिसत नाही.

अनेक दावे केलेले दिसतात पण वाचकाने सुसूत्रपणे वाचावे असे काहीच आढळत नाही. उदा. समुद्रमंथन भारताच्या दक्षिणपूर्व किनार्‍याजवळ झाले असा एक दावा दिसला ( http://ancientindians.wordpress.com/analysis/geography/ksheera-sagara-ma... ) विश्वासार्हतेवर ताण टाकणारी अन्य अशी अनेक विधाने आढळतात. जनमेजयाच्या तथाकथित दानपत्रावर बराच भर दिसतो पण हे दानपत्र सध्या कोठे आहे, ते कसे मिळाले, कोणाला मिळाले, इतका महत्त्वाचा असा हा लेखी पुरावा सत्याबाईंना मिळेपर्यंत इतर कोणालाच दिसला कसा नाही आणि इतका मोठा पुरावा समोर येऊनदेखील जगभरचे जाणते अभ्यासक त्याचा कोठेच उल्लेख का करत नाहीत अशी अनेक कोडी आहेत. शबरीमातेने आणि रामलक्ष्मणांनी अमुक दगडावरच बसून बोरे खाली असा छातीठोक दावा आणि हे जनमेजयाचे दानपत्र ह्यात मला काही अंतर दिसत नाही. ताजमहाल = तेजोमहालय आणि क्रिस्टिअ‍ॅनिटी = कृष्णनीति गटातील ह्या संशोधनावर घालवायला वेळ कोण दवडणार?

मला असे वाटते की सत्याबाईंच्या ह्या कपोलकल्पना असाव्यात.

ज्यांचा विश्वास बसत असेल त्यांनी जरूर ठेवावा, मी त्या रस्त्याला जायला तयार नाही इतके नोंदवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि चर्चा आवडली. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा लेख वाचायचा राहिला होता. त्यावरची चर्चा आवडली. कोल्हटकरांनी दिलेला उतारा रोचक. चिपलकट्टींनी त्यावर घेतलेले आक्षेप रास्त वाटतात. जेव्हा एखादी कथा चारपाचशे वर्षांनी पुन्हा सांगितली जाते तेव्हा ती समाजात कुठे ना कुठे फिरत राहिलेली असते. सतत बदलत रहाते. त्यामुळे सांगणारा माणूस चारपाचशे वर्षांपूर्वीचे श्लोक जसेच्या तसे ठेवून त्यात आपली भर घालून सांगेल का? कल्पना नाही. कदाचित सगळेच श्लोक आपल्या भाषेत लिहून काढेल. मुळात त्यांना संख्याशास्त्रीय अभ्यासापेक्षा भाषेचा अभ्यास अपेक्षित होता असं वाटतं. कदाचित संख्याशास्त्रीय अभ्यासात हे फरक पकडता येतीलही (उदाहरणार्थ - दाउ आणि यू वापरले गेलेले परिच्छेद वेगळे काढायचे, त्यातही डूएथ वापरलं आहे की डझ वापरलं आहे यावरून आणखीन जुनं-नवं भेद करायचा वगैरे वगैरे) पण तो काय अभ्यास आहे हे नीट समजावून घेतल्याशिवाय काही बोलता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंद कोल्हटकरांनी उल्लेखिलेले यार्दींचे पुस्तक या फेब्रुवारी महिन्यात मला मिळाले.

मिळाल्याबरोबर वाचायला सुरुवात केली. अगदी डीटेलवारी पान अन पान वाचले नाही पण जेवढे वाचले ते रोचक आहे खास! त्यांचा 'बेसिक प्रिमाईस' अतिशय साधा आणि पटणीय आहे तो तेवढा मांडतो.

भांडारकर क्रिटिकल एडिशन ही महाभारतासाठी जगभर प्रमाणभूत मानली जाते-यार्दींनीही तीच आधारास घेतली. तीत जवळपास ८०-८२ हजार श्लोक आहेत. त्यातही बहुतेक श्लोक अनुष्टुप वृत्तात आहेत. आता अनुष्टुप वृत्तातल्या १६ अक्षरी स्टँडर्ड श्लोकार्धात १३-१४-१५-१६ व्या अक्षरांचे लघु-गुरु-लघु-गुरु तसेच ५ वे अक्षरही लघु असते. यांनी थोडा बदल केला(असे मला वाटते) तो म्ह. १३-१४-१५ हे ल-गु-ल असेच ठेवले, १६ वे कसेही असेल असे मानले. शिवाय ५वे लघु, शिवाय ६वे व ७वे गुरू मानले. त्यामुळे 'फ्री' अक्षरे राहिली ती १-२-३-४,८,९-१०-११-१२ आणि १६ या क्रमांकांवरची.

अनुष्टुप सोडून शार्दूलविक्रीडितादि अन्य वृत्तांत लिहिलेले श्लोक वगळले, तसेच १० पेक्षा कमी श्लोक असलेले अतिलहान काही अध्यायही वगळले.

आता डेटा मांडला कसा ते पाहू. सुरुवात गीतेपासून करू. गीतेत जवळपास ७०० श्लोक आणि १८ अध्याय आहेत. त्याचा डेटा पहिल्या २ अध्यायांसाठी मांडलेला खालीलप्रमाणे आहे.रो मधील आकडे हे श्लोकार्धातील विशिष्ट क्रमांकाच्या पोझिशनमध्ये किती गुरू अक्षरे आहेत हे दर्शवतात.

अध्याय क्र. १० ११ १२ १६
५६ ५६ ७४ ५७ ५९ ५० ५६ ७७ ५२ ७३
७३ ८४ १०० ७४ ७९ ८२ ८९ ११० ६१ ८५

आता यामध्ये सोर्सेस ऑफ व्हॅरिएशन दोन आहेत. एक तर अध्याय १ ते अध्याय २ यांमधील ओव्हरऑल फरक किती तसेच एका अध्यायात पोझिशन-टु-पोझिशन फरक किती हे मोजून त्या दोहोंचा रेशो घेतला. तो रेशो जर स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असेल, तर सर्व अध्याय एकानेच लिहिले नाहीत असे म्हणता येईल. जर सिग्निफिकंट नसेल, तर हे सर्व अध्याय एकानेच लिहिले असे म्हणता येईल. ही लेखकाची ढोबळ विचारपद्धती आहे. या आधारे त्यांनी ५ वेगवेगळ्या व्यक्ती/लेखनपद्धती शोधून काढल्या.

आता यावर आक्षेप अनेक घेता येतील. मुख्य आक्षेप हा की वर्ण्य विषय काय आहे त्यानुसार त्यासाठीच्या शब्दसंपदेचा स्टॉक बदलतो, त्यानुसार गुरु अक्षरांचे प्रमाणही बदलणारच- उदा. वीररसातले वर्णन करतानाचे शब्द आणि करुणरसाचे किंवा तत्त्वज्ञानसंबंधी विषयाचे वर्णन करतानाचे शब्द वेगळे असणार.

याचे उत्तर असे आहे की अ‍ॅनॅलिसिस करून काढलेल्या ५ वेगवेगळ्या स्टायलींपैकी सर्व स्टायली सर्व प्रकारच्या विषयांत सारखेपणी दिसतात, त्यामुळे विषयाचे वेगळेपण अ‍ॅव्हरेज आऊट झाले.

शिवाय या ५ स्टायली आहेत पण कुठला भाग आधी व कुठला नंतर हे कशावरून ठरवणार? अर्थातच स्टॅटिस्टिक्स याचे उत्तर देऊ शकत नाही. प्रत्येक स्टायलीत बसणारा कथाभाग कंपाईल करून मग अजून काही लॉजिक लावून त्याआधारे 'मूळ' भारत कुठले असावे असे त्यांनी सांगितले आहे. कालनिर्णय इ. देखील बराच केला आहे. त्या सर्वांवर मत देण्याइतका अभ्यास नाही, मात्र हा प्रयत्न प्रचंड रोचक वाटला इतके नक्की.

याच लेखकाने असाच अ‍ॅनॅलिसिस रामायणाचाही केलेला आहे. त्याकरिता बडोद्यातील सयाजीराव इन्स्टिट्यूटने केलेली रामायणाची क्रिटिकल एडिशन वापरलेली आहे.(फॉर सम रीझन, रामायणाची क्रिटिकल एडिशन करणे याची चर्चा महाभारत प्रोजेक्ट इतकी दिसत नाही.) यावच्छक्य यावर डीटेल लेख लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं