गावाकडच्या मावळतीचे …….रंग बिलोरी
गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी
प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अ॑गणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा
गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
......... मोडुन नक्षी....
.........चुकार पक्षी......
उतरून यावा
निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा
कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा
प्रतिक्रिया
आवडली.
सरळ साधी कविता आवडली. कुठलेही तात्पर्य,सार,चमत्कृतीपूर्ण अंतिम धक्का नसलेली.
मस्त.
हेच बोलतो. आवडली कविता.
हेच बोलतो. आवडली कविता.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सुंदर चपखल नादमय शब्दांचा वापर
आवडला.
सुंदर चपखल नादमय शब्दांचा वापर
आवडला.
छानच!
मस्त आहे कविता. आवडली. मूड झाला कधी तर सुलेखनात वापरेन!
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
अप्रतिम.. पुन्हा वाचली,
अप्रतिम.. पुन्हा वाचली, पुन्हा आवडली..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अतिशय उत्तम कविता आहे.
अतिशय उत्तम कविता आहे. माझे सुदुर खेड्यात गेलेले बालपण आठवले
हे खेडे म्हणजे मौजे
हे खेडे म्हणजे मौजे मुहियाबाद काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटोबा, तुला उपहास करायला
बॅटोबा, तुला उपहास करायला काय जाते, तुझ्या निब्बर शहरी डोळ्यांना कळणार नाही ती खेड्यातली मजा.
तेही खरेच म्हणा.
तेही खरेच म्हणा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कविता
खूपच आवडली. शब्दरचना सुंदर, चमत्कृतीशिवाय. आज खरे, अनंताचे दर्शन घडवलेत.
काय सुरेख कविता आहे
ही कविता वाचून प्रश्न पडलाय की तू सिझोफ्रेनिक आहेस का काय? ते दिक्कालबंध आणि अश्वत्थामा असलं लिखाण (कविता या सदरात टाकलेलं लिखाण) करणारा आणि ही झकास रचना करणारा तू एकच आहेस? आता अर्थातच प्रत्येक कविता/लिखाण आवडणारंच असेल असं होणं शक्य नाही. पण ..... असो. कवीने लिहित रहावं आणि आमच्यासारख्याने, काहीतरी हाती लागेल या आशेने, वाचत रहावं.
परत एकदा दाद देतो, मित्रा, फार छान आहे ही कविता....
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
मिसळपाव, मी सिझोफ्रेनिक?
....कदाचित असेनही! पण खात्री आहे की मी एकटा नाहिये!!
कवितेला जी दिलखुलास दाद दिलीस त्याबद्दल धन्यवाद!!
सुंदर कविता!!!
सुंदर कविता!!!
कवितेला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना...
...मन:पूर्वक धन्यवाद !!