परदेशात स्थायिक होणे,गरज की निर्लज्जपणा?

थांबा थांबा,जुनाच विषय आहे ,मान्य.लगेच मला राष्ट्रभक्तीचे सर्टीफुकट देऊ नका.मी काही तितकासा प्रखर राष्ट्रभक्त नाही.हा विषय मनात आला त्याला कारण हा प्रसंग.
परवा नेहमी प्रमाणे फिरायला गेलो होतो.अर्ध्या वाटेवर असताना एका बुजुर्ग माणसाने लांबुनच मला थांबायची सूचना केली.मी थांबलो.ते जवळ आल्यावर मला चेहरा ओळखीचा वाटला .त्यांनी ओळख करुन दिल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला ,ते होते माझ्या बालपणीच्या मित्राचे वडील.मी ओळख विसरलो असलो तरी त्यांनी मला ओळखले.साहजिकच मित्राचा विषय निघाला .मी काय करतो हे त्यांचे आधिच विचारुन झाले होते.शेतीत लक्ष घातले आहे हे सांगितल्यावर माझ्याकडे गॉन केस असल्यासारखा कटाक्ष टाकला.माझा अधिक पंचनामा व्हायच्याआधी मी चर्चा ताब्यात घेतली.त्यांना विचारले मित्र सध्या काय करतो? हा प्रश्न आल्यावर स्वारी जरा खुश झाली.चिरंजीव सध्या अमेरीकेत Charlotte का कॅरोलायना कुठेतरी स्थायिक झाले आहेत असे त्यांनी सांगितले.त्याला ग्रीन कार्ड मिळाले आहे हे सांगताना त्यांच्या चेहर्यावर भारी कौतुक दिसत होते.पोराने नाव काढले हो ! आम्हीही काही दिवस अमेरिकेला जाणार आहोत हे ही दिवाळीच्या आनंदात सांगुन झाले.एवढे बोलुन काकांनी रजा घेतली.
मला आठवायला लागले ते शाळेतले दिवस,ती प्रतिज्ञा....
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझ
े सौख्य सामावले आहे।
मित्रही ही प्रतिज्ञा म्हणायचा ,आम्ही सर्वच जण ही प्रतिज्ञा म्हणायचो.पण त्या प्रतिज्ञेला फाट्यावर मारुन तो अमेरिकेत स्थायिक झाला.विचारचक्र सुरु झाले.देशाने काय दिले नाही त्याला? माध्यमिक शिक्षण मोफत दिले,इबीसीची सवलत दिली,बापाला सरकारी नोकरी होती.हुशार होता,देशात थांबला असता तर त्याच्या बुद्धीमत्तेचा देशाला काहीतरी फायदा नक्कीच झाला असता.IIT तित दाखल होणारे बहुतेक जण परदेशात जाण्यासाठी/स्थायिक होण्यासाठी आटापिटा करत असतात हे माहीत होते.पण आजकाल प्रत्येकाला परदेशातच स्थायिक व्हायचे असते.कुणी हॉटेल मॅनेजमेंट करुन कुणी आर्कीटेक्ट होऊन अन काय काय होऊन परदेशात जाण्याचा आटापिटा करत असताना बघितला तर मला माझ्या शेतकरी असण्याचा अभिमान वाटतो.चार दाणे पिकवून मी देशाची सेवा तरी करतोय.प्रखर देशभक्ती वगैरे नाही पण देशातल्या जनतेला काहीतरी परत करतोय याचे समाधान आहे.
महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध टुर्स कंपणीच्या संचालिकेचा अनुभव आठवला.तीही अमेरिकेत होती,तिला तिथले नागरिकत्व देताना एक प्रश्न विचारला गेला ,उद्या भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाले तर तुम्ही कुणाच्या बाजुने उभ्या रहाल? तिने ' अमेरिका ' असे उत्तर दिले .त्यावर मुलाखतकार छद्मी हसला.तिला बाहेर आल्यावर स्वतःचीच लाज वाटली.तिने निर्णय बदलला व भारतात येऊन एक यशस्वी उद्योजीका झाली.
परदेशात शिकायला जाण्यात काही वाईट नाही,काही दिवस तिथे नोकरी करणेही वाईट नाही.पण आपली बुद्धीमत्ता आपल्या देशासाठी वापरण्याऐवजी इतर देशांची सेवा कशाला.? हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. तिकडून इथे आल्यावर पेट्रोल पंपला ' गॅस स्टेशन म्हणने,भारतात चायला मायला म्हणणारे भारतवारीत fuck ! असे बिंधास्त बोलून स्वतःच्या आंग्लाळलेपणाची जाणिव करुन देतात तेव्हा आश्चर्य वाटते की यांनी देश विकुन खाल्ला आहे याची यांना जाणिव तरी आहे का?.स्वतःच्या देशात स्वाभिमानाने राह्ण्याऐवजी परदेशात निर्लज्ज होऊन राहणे यात मला तरी काही मोठेपणा दिसत नाही.
मला मान्य आहेइथे बरेच परदेशस्थ आहेत ज्यांना मी आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहे.पण आमच्यासारख्या शेतकर्यांनी,इतर कष्टकर्यांनी देश उभा करायचा ,इथले इन्फ्रास्ट्र्कचर उभे करायचे.यातुन होणारा विकासावर स्वार होऊन बरेच लोक परदेशाची वाट धरणार असतील तर् आम्ही का फुकट मरायचे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

मायबोलीवर बरेच परदेशस्थ आहेत ...

चोप्य-पस्ते, गरज की निर्लज्जपणा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परदेशात स्थायिक होणे

हे आंबट द्राक्ष आहे किंवा नाही यावर

गरज की निर्लज्जपणा?

याचे उत्तर अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख किंचित पसरट झालेला आहे हे खरं आहे. पण सुरुवातीच्या काही परिच्छेदात म्हातार्‍यांच्या वेदना मांडण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. ते वाचून जर कोणाला प्रतिवाद करणं झेपत नसेल तर ठीक आहे, पण निर्लज्जपणा वगैरे म्हणणं हेही निर्लज्जच ठरतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

<मला मान्य आहे मायबोलीवर बरेच परदेशस्थ आहेत ज्यांना मी आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहे.>

मायबोलीवर? मल वाटते की येथे तुम्हाला 'ऐसीवर' असे लिहायचे होते.

आता पुढचा मुद्दा. मी स्वतः परदेशस्थ आहे पण म्हणून तुम्ही उभ्या केलेल्या 'आरोपीच्या' पिंजर्‍यात' आपणहून उभे राहून आपला बचाव तुमच्यापुढे करण्याची मला काय गरज? तुमची काय पात्रता? मी कोठल्याहि कारणाने गेलो असेन, तुमचा त्याच्याशी काय संबंध?

असले प्रश्न इतरांना विचारून तुम्ही उद्दाम presumptuousness दाखवीत आहात. Get down from you moral high horse!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे पहिले दोन परिच्छेद अगदी मान्य. पण ट्रोलांची कसली उच्च नैतिक भूमिका! ट्रोलांना खायला घातलं तरी चालेल पण त्यांना डोक्यावर बसवू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाघ बकरी चहा जास्त दिवस उघडा ठेवला तर त्याचा वास जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सही जवांब

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्पीकिंग ऑफ वाघ बकरी, कधी वाघ बकरी दार्जीलिंगचे नाव ऐकले आहे काय?

(वदतो व्याघातःसारखे वाटेल कदाचित. मीदेखील पहिल्यांदा बाजारात पाहिलेला तेव्हा मलाही तसेच वाटलेले. पण बरा लागतो. नि इतर दार्जीलिंगांपेक्षा स्वस्त वाटलेला. फक्त, खूप सारे इंडियन ग्रोसरीवाले ठेवत नाहीत ष्टाकमध्ये. आणि दोन रुपये (डॉलरकरिता कलोक्वियल अमेरिकन मराठीतील शब्द.) वाचविण्याकरिता तीन-साडेतीन रुपयांचे पेट्रोल जाळून डिकेटरापर्यंत कोण झक मारायला जाऊन येतो? असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत सर्वजण फक्त पैशांसाठीच जातात असा लेखकाने ग्रह करून घेतला असे वाटते.
भारतात " सत्तेपुढे शहाणपण चालत नसते " याचा पदोपदी अनुभव येत असतोच. नवी मुंबई, पुणे, धुळे इ.अनेक ठिकाणच्या च्या महानगरातील आयुक्तांची कशी अवस्था करून टाकतात हे आपण वाचत असतोच. भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्यामुळे, कोर्टाच्या आदेशामुळे सत्ता हातातून जात आहे असे पाहून, निरक्षर बायकोला मुख्यमंत्री पदावर सहजतेने बसविता येते, आणि आय ए एस अधिकार्‍यांना, तिच्यापुढे नम्रतेने उभे रहावे लागते असे पाहिल्यावर कोणालाही अमेरिका वा परदेशात नौकरीच्या निमित्ताने जावेसे वाटले अगर स्थायिक व्हावेसे वाटले तर त्यात गैर ते काय ? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत जाणे इतके सोपे आहे काय ? आता तर काय, डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट म्हणून निवडून आलेले आहेत्, त्यांची निवडणूकीतील वक्तव्ये पहाता, येणारा काळ अमेरिकेत कसा असेल याचे भाकित कोण करील ?
लेखात बर्‍याच महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्यामुळे, कोर्टाच्या आदेशामुळे सत्ता हातातून जात आहे असे पाहून, निरक्षर बायकोला मुख्यमंत्री पदावर सहजतेने बसविता येते, आणि आय ए एस अधिकार्‍यांना, तिच्यापुढे नम्रतेने उभे रहावे लागते असे पाहिल्यावर कोणालाही अमेरिका वा परदेशात नौकरीच्या निमित्ताने जावेसे वाटले अगर स्थायिक व्हावेसे वाटले तर त्यात गैर ते काय ?

प्रजातंत्रात जी व्यक्ती राज्यकर्ती असते ती बहुपक्षीय निवडणूकीतील चुरस पार करून त्या मेरिट वरच आलेली असते. व याला मेरिट च म्हणतात कारण ते प्रचंड चुरशीतून तावूनसुलाखुन बाहेर निघते. त्या व्यक्तीचे स्पेशलायझेशन हे असते की लोकांना काय हवं आहे (कोणत्या सेवा हव्या आहेत) ह्याची जाण असणे. मग आय ए एस अधिकार्‍यांची फौज ते जे हवं आहे त्याची राबवणूक कशी करावी ते ठरवण्यासाठी व अ‍ॅक्च्युअली राबवण्यासाठी असते. म्हंजे जे घडतंय ते पूर्वनिर्धारित नियमांनुसारच घडतंय. ह्यात गैर काय आहे ?

दुसरे म्हंजे ते जे झालंय ते बिहारात. महाराष्ट्रात तसं झालेलं नाही. व सबब महाराष्ट्रातल्या मुलांनी परदेशी का जावे ?

(परदेशस्थित गब्बरसिंग)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रजातंत्रात जी व्यक्ती राज्यकर्ती असते ती बहुपक्षीय निवडणूकीतील चुरस पार करून त्या मेरिट वरच आलेली असते: उदाहरणार्थ पहा: इंदिरा गांधी , राजीव गांधी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अमेरिकेत सर्वजण फक्त पैशांसाठीच जातात असा लेखकाने ग्रह करून घेतला असे वाटते.

पण समजा, सर्वजण अमेरिकेत फक्त पैशांसाठीच गेले, तरी त्यात नक्की गैर काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नका हो, असा काळजाला हात घालू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निर्लज्जपणा नाही आणि गरज त्याहून नाही!
असलाच तर एक वैयक्तिक खाजगी निर्णय. त्याने सोडलेल्या वा जिथे गेलोय त्या देशांना काही फरक पडतो हे माणसांमुळे पृथ्वीचा विनाश होतोय म्हणण्याइतकं पोरकट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असलाच तर एक वैयक्तिक खाजगी निर्णय.

ऋ, त्यांना खालील मुद्द्याबद्दल बोलायचं असावं. की परदेशी जाण्याआधी तुमच्यावर भारतीय पब्लिकने पैसा खर्च केलेला आहे. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक वाहतूक सेवा वगैरे. आता त्या खर्चाचे रिटर्न्स भारतीय जनतेला मिळवून द्यायची वेळ आली की तुम्ही परदेशी जाणार काय ?? हे म्हंजे Privatization of benefits and socialization of costs झाले - असं त्यांना म्हणायचं असावं.

म्हंजे हा खाजगी निर्णय असलाच तर तो तेव्हाच योग्य असेल जेव्हा तुमच्या लालन/पालन्/पोषणाचा सर्व खर्च फक्त तुमच्या आईवडिलांनी केला. सरकारने काहीही केला नाही किंवा पर्यायाने भारतीय पब्लिकने केला नाही. अर्थातच या युक्तीवादापुरते हे कुटुंब ... पब्लिक या ग्रुप मधुन मधून बाहेर काढलेलं आहे.

धाग्यातून उधृत - देशाने काय दिले नाही त्याला? माध्यमिक शिक्षण मोफत दिले,इबीसीची सवलत दिली,बापाला सरकारी नोकरी होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं मग? त्याने हा निर्णय वैयक्तिक व खाजगी नाही असा दावा तुम्ही करताय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी फक्त वाद घालतोय रे (माझं ज्ञान पाजळतोय रे).

पळा पळा पळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझ
े सौख्य सामावले आहे।
मित्रही ही प्रतिज्ञा म्हणायचा ,आम्ही सर्वच जण ही प्रतिज्ञा म्हणायचो.पण त्या प्रतिज्ञेला फाट्यावर मारुन तो अमेरिकेत स्थायिक झाला

........ आम्ही का फुकट मरायचे?


तुमच्या देशबांधवांच्या कल्याण आणि समृद्धी ह्यांतच (किमान) तुमचं सौख्य सामावलं आहे ना? मग एवढी जळजळ का हो भौ? इनो घ्या किंवा एखादं पतंजली चूर्ण तरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध टुर्स कंपणीच्या संचालिकेचा अनुभव आठवला.तीही अमेरिकेत होती,तिला तिथले नागरिकत्व देताना एक प्रश्न विचारला गेला ,उद्या भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाले तर तुम्ही कुणाच्या बाजुने उभ्या रहाल? तिने ' अमेरिका ' असे उत्तर दिले .त्यावर मुलाखतकार छद्मी हसला.

अमेरिकन नागरिकत्वाच्या मुलाखतीत असले काहीही विचारले जात नाही, हे स्वानुभवाने सांगू शकतो.

फार कशाला, नागरिकत्वाच्या शपथेच्या सुरुवातीलाच 'I hereby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and abjure all allegiance and fidelity to any foreign prince, potentate, state, or sovereignty, of whom or which I have heretofore been a subject or citizen' अशा प्रकारची भाषा असते, तीही (केवळ परंपरेने, आणि) खरे तर नावापुरतीच असते, आणि (अमेरिकन सरकारसकट) कोणीही तिला महत्त्व देत नाही (अथवा तिची अंमलबजावणी करत नाही).

तिला बाहेर आल्यावर स्वतःचीच लाज वाटली.तिने निर्णय बदलला व भारतात येऊन एक यशस्वी उद्योजीका झाली.

काय सांगता? बोले तो, मुलाखत झाल्यावर नि शपथविधी होण्यापूर्वीच्या मधल्या दोनतीन तासांच्या काळात, तडकाफडकी निर्णय बदलला? तेही सरेंडर केलेले ग्रीनकार्ड "नाही ब्वॉ, आय चेंज्ड माय माइंड" म्हणून परत मागून? की "मेरी झाँसी नहीं दूँगी"च्या थाटात "माझे ग्रीनकार्ड देत नाही जा!" म्हणून सांगून? नाही, इतक्या तडकाफडकी, म्हणून विचारले.

नाही, बोले तो, अगदीच अशक्य नाही, परंतु, अ व्हेरी लाइकली ष्टोरी, इंडीड!

की, त्यावेळी (तेवढ्यापुरते) अमेरिकन नागरिकत्व घेतले, परंतु लगेच इंडियाला (कोणत्यातरी व्हिशावर) परतून यथावकाश भारतीय नागरिकत्व घेऊन अमेरिकन नागरिकत्व सोडून दिले? (नाही म्हणजे, एकदा गमावलेले भारतीय नागरिकत्व परत मिळवणे हीदेखील तितकी सोपी गोष्ट नाही, खास करून ओसीआयपूर्व काळात. बहुत लंबी प्रोसेस होती है वह| आता ओसीआय सुविधा झाल्यावर ती लंबाई किंचित कमी झाली आहे खरी, परंतु आज आले परत नि घेतले उद्या पुन्हा नागरिकत्व, इतकेही ते सोपे नाही.)

थोडक्यात काय, इंडियात अशा कहाण्या खपविणे अंमळ सोपे जाते. एक ढूँढो, हज़ार मिलते हैं|

--------------------------------------------------------------------------------

त्या अधिकार्‍यांना खरे तर फक्त (अ) तुमचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही (आणि/किंवा दंड अद्याप भरून न झालेली ट्राफिक तिकिटे (चलाने) तुमच्या नावावर औटष्ट्याण्डिंग नाहीत), आणि (ब) तुम्ही कम्युनिष्ट नाहीत (किंवा तत्सम संस्थांशी तुमचे काही लागेबांधे नाहीत; झालेच तर अमेरिकेचे लोकनियुक्त सरकार हिंसक, घातपाती अथवा अन्य अवैधानिक मार्गांनी उलथवून टाकण्याचा तुमचा इरादा नाही) याव्यतिरिक्त फारसे कशातही स्वारस्य नसते. त्यातही, यातल्या बहुतांश बाबींची छाननी ही तुम्ही आवेदन भरल्यानंतरपासून तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीचे बोलावणे येईपर्यंतच्या दरम्यानच्या काळात परस्पर नि तुमच्या अपरोक्ष होऊ शकत (नि होत) असल्याकारणाने, त्याहीबद्दल फारशी काहीच (आणि तीही क्वचित झालीच तर) प्रत्यक्ष विचारपूस होत नाही. त्यानंतर मग एक नागरिकशास्त्राची आणि एक इंग्रजीची जुजबी परीक्षा होते. नागरिकशास्त्राची परीक्षा म्हणजे काय, तर आपल्या २१ अपेक्षित प्रश्नसंचासारखा नागरिकीकरण सेवेनेच प्रकाशित केलेला एक १०० अपेक्षित प्रश्नसंच (उत्तरांसहित१अ) असतो, त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे ही एकदोन शब्दांपासून ते फार फार तर एखाददुसर्‍या वाक्यांपर्यंत असतात, त्यातलेच फार फार तर दहापर्यंत प्रश्न तोंडी विचारतात. त्यानंतर इंग्रजीची परीक्षा म्हणजे साधारणतः आपल्याकडच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला जमेल अशा पातळीवरचे एखादे वाक्य लिहायला सांगतात, आणि/किंवा अगोदर लिहून दिलेले वाचायला सांगतात. तेवढे जमले, की झालात तुम्ही पास. जर का झालात पास, तर मग 'आता आलाच आहात, तर शपथविधीही उरकूनच जा!' म्हणून शक्य तोवर त्याच दिवशी दुपारनंतर कधीतरी शपथविधीसाठी यायला सांगतात, तुमचे ग्रीनकार्ड काढून घेतात, नि मग दुपारी येऊन तुम्ही शपथविधी उरकलात, की नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देतात, की मग तुम्ही जायला मोकळे. एकंदरीत फारच रूटीन प्रकार असतो तो.१ब

१अ त्यातले काही थोडे प्रश्न - शंभरापैकी फार तर चारपाच - हे तुमचा सध्याचा स्थानिक महापौर/काँग्रेसमन/सिनेटर कोण, असे स्थानिक (आणि बदलत्या) स्वरूपाचे असतात, त्यांची उत्तरे अर्थातच १०० अपेक्षित प्रश्नसंचात प्रकाशित होत नाहीत. तेवढी गुगलून काढावी लागतात. पण तेवढे सोडल्यास बाकी सर्व प्रश्नांची अपेक्षित उत्तरेही जोडलेली असतात.

१ब माहिती अंमळ जुनी - सर्का २००८च्या इसवीच्या जानेवारी महिन्यातली, धाकट्या बुशकाकाच्या जमान्यातली - आहे, परंतु दरम्यानच्या काळात एक फीचा आकडा वगळता काही फार मोठा फरक पडला असेलसे वाटत नाही. चूभूद्याघ्या.

अमेरिकन नागरिकत्व घेतल्यानंतर आपले मूळ नागरिकत्व न सोडणे हा बाय इटसेल्फ अमेरिकन कायद्यानुसार गुन्हा नाही.२अ तदनुसार, असे मूळ देशाचे नागरिकत्व अबाधित राखले असता, (अ) (अमेरिकन पासपोर्टबरोबरच) त्या मूळ देशाचा(ही) पासपोर्ट बाळगणे२ब, (ब) त्या मूळ देशाच्या निवडणुकांत नागरिकत्वाच्या नात्याने मतदान करणे, फार कशाला, (बहुतांश परिस्थितींत) (क) त्या मूळ देशाच्या सैन्यात भरती असणे/होणे/व्हावे लागणे२क किंवा, (मर्यादित परिस्थितींत) (ड) त्या मूळ देशातील कोणत्याही पातळीवरच्या एखाद्या सरकारात एखादे छोटेमोठे पद भूषविणे२ड, ही (सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार) बाय देमसेल्वज़ अवैध कृत्ये ठरत नाहीत अथवा त्यामुळे अमेरिकन नागरिकत्वावर ऑपॉप गदा येऊ शकत नाही. किंवा अमेरिकन नागरिकाने अन्य देशाचे नागरिकत्व घेतल्याससुद्धा त्याच्या अमेरिकन नागरिकावर ऑपॉप गदा येऊ शकत नाही.२इ

२अ अमेरिकन - किंवा अन्य कोणतेही - नागरिकत्व घेतल्यावर भारतीय नागरिकत्व रद्द करून न घेणे हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे, अमेरिकन नागरिकत्व ग्रहण केलेल्या भारतीयांस आपल्या भारतीय नागरिकत्वावर पाणी सोडावे लागते, ते केवळ भारतीय कायदा आड येतो म्हणून; अमेरिकन कायद्यास त्याचे सोयरसुतक नसते.

२ब फक्त, अमेरिकेत प्रवेश करताना किंवा अमेरिकेतून बाहेर पडताना अमेरिकन Port of Entry/Exitवर (अ) स्वतःस अमेरिकन नागरिक म्हणून सादर करणे, आणि त्याकरिता (ब) केवळ अमेरिकन पासपोर्ट सादर करणे अपेक्षित आहे. अमेरिकन नागरिकाने अमेरिकन Port of Entry/Exitवर अन्य देशाचा पासपोर्ट हा प्रवेशासाठी/निकासासाठी वापरणे (वा अन्य देशाचा नागरिक म्हणून सादर होणे) हा गुन्हा आहे; मात्र, असा अन्य देशाचा पासपोर्ट (व नागरिकत्व) बाळगून असणे आणि अमेरिकेबाहेर तो वापरणे हे वैध आहे.

२क अमेरिकेबरोबरच मूळ देशाचेही नागरिकत्व राखले असता त्या मूळ देशाच्या सैन्यात भरती होणे, याकरिता अमेरिकन नागरिकत्व सदर व्यक्तीचे अमेरिकन नागरिकत्च तत्त्वतः हिरावून घेऊ शकत नाही असे नाही. परंतु, तसे करण्यापूर्वी, सदर व्यक्तीने ही गोष्ट (अ) जाणूनबुजून, आणि (ब) अमेरिकन नागरिकत्व गमावण्याच्या विशिष्ट इराद्याने केलेली आहे, असे सिद्ध करण्याची जबाबदारी अमेरिकन सरकारवर पडते. जोवर तो दुसरा देश आणि अमेरिका यांत युद्ध अथवा युद्धसदृश परिस्थिती नाही, तोवर त्या व्यक्तीचा असे करताना अमेरिकन नागरिकत्व गमावण्याचा इरादा नव्हता, हे प्रशासकीय गृहीतक असते, आणि त्या बाबतीत क्वचित काही विचारणा झाल्यास त्या व्यक्तीने केवळ "नाही ब्वॉ, माझा असा काही इरादा नव्हता" असे म्हणणे हे सदर व्यक्तीचे अमेरिकन नागरिकत्व टिकविण्याकरिता पुरेसे असते. (त्या देशात आणि अमेरिकेत युद्ध अथवा युद्धसदृश परिस्थिती चालू असल्यास मात्र गृहीतके बदलतात, नि सदर व्यक्तीच्या अमेरिकन नागरिकत्वावर त्या दुसर्‍या देशाच्या सैन्यात भरती असल्यामुळे गदा येऊ शकते.) अधिक माहिती इथे.

२ड वरीलप्रमाणेच, जोवर त्या दुसर्‍या देशाच्या सरकारात भूषविलेले पद हे धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता असलेले (जसे, पंतप्रधान, मंत्री वगैरे) नाही, तोवर ते भूषविण्यामागे सदर व्यक्तीचा अमेरिकन नागरिकत्व गमावण्याचा इरादा नाही, हे प्रशासकीय गृहीतक राहते. मात्र, प्रस्तुत पद हे धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता असलेले असल्यास गृहीतके बदलतात, नि अमेरिकन नागरिकत्वावर गदा येऊ शकते.

२इ अमेरिकन नागरिकाने अन्य नागरिकत्व स्वीकारल्यास, जोवर अशी व्यक्ती स्वतः होऊन आपले अमेरिकन नागरिकत्व गमावण्याकरिता अर्ज करीत नाही, तोवर, सामान्य परिस्थितीत, वरीलप्रमाणेच त्या व्यक्तीचा आपले अमेरिकन नागरिकत्व गमावण्याचा इरादा नाही, हे प्रशासकीय गृहीतक राहते.२फ

२फ थोडक्यात, (अ) स्वतः होऊन स्वेच्छेने अमेरिकन नागरिक्त्वाचा त्याग करण्यासाठी अर्ज करणे, (ब) राष्ट्रद्रोहात्मक कृत्ये करणे, (क) अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे अथवा अमेरिकेविरुद्ध युद्धात भाग घेणे, आणि (ड) परकीय सरकारात धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता असलेले पद भूषविणे, अशा काही मर्यादित परिस्थिती वगळता केवळ अन्य देशाचे नागरिकत्व बाळगण्याकरिता वा स्वीकारण्याकरिता अमेरिकन नागरिकत्वावर गदा येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीही अमेरिकेत होती,तिला तिथले नागरिकत्व देताना एक प्रश्न विचारला गेला ,उद्या भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाले तर तुम्ही कुणाच्या बाजुने उभ्या रहाल?

धागालेखक हा तद्दन खोटारडा आहे.
लेखनसीमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागालेखक हा तद्दन खोटारडा आहे.>>>>>>> नॉलेज वाढवा पिडा,निर्लज्ज होऊन राहत आहात परदेशात याचे भान ठेवा!
मागे एकदा मिपावर माझ्या आयुर्वेद धाग्यवर पाश्चात्य कसोट्या व पौरात्य कसोट्या असे तारे तोडले होतेत तुम्ही.आठवते का तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

तीही अमेरिकेत होती,तिला तिथले नागरिकत्व देताना एक प्रश्न विचारला गेला ,उद्या भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाले तर तुम्ही कुणाच्या बाजुने उभ्या रहाल?

वाट्टेल-ते प्रायव्हेट लि.
जन्माने अमेरिकन नागरीक असलेले लोकसुद्धा(ज्यांच्या बाबतीत दुहेरी निष्ठेचा प्र्श्नच उद्भवत नाही) आम्ही अमेरीकेच्या बाजूने उभे राहणार नाही असे बिनदिक्कत म्हणू शकतात. तेव्हा त्यांना भारतीयांचे कशाला टेंशन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाय द वे तुम्हीच का ते जे वेगवेगळ्या नावांनी मिपा व माबोवर नवनवीन "आजचा सवाल" टाकत असता? हा धागा पण टाकलाय तिकडे.
मिपावर टर्बोचार्जड फिलॉसॉफर, माबोवर सिंथेटिक जिनियस आणि ऐसीवर ग्रेटथिंकर. आप आखिर चाहते क्या हो भाई ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळी नावं ही बहुदा त्यांची अपरिहार्यता असावी. त्यांचा मुळातला ग्रेटथिंकर हा आयडी मायबोली आणि मिसळपाववर बॅन झाला असावा.

आप आखिर चाहते क्या हो भाई ?

याचं खरं उत्तर ते देणार असं वाटतं का तुम्हाला? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>आप आखिर चाहते क्या हो भाई ?

मिपा तांत्रिक कारणांनी बंद आहे; तेव्हा..............

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओके. पण इथे इन्फ्रास्ट्र्क्चर आहे यावर तुमचा एक शेतकरी म्हणून विश्वास आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथली धरणे ,अवाढव्य रेल्वे नेटवर्क ,चारपदरी रस्ते या खाली कुणाच्या जमिनी गेल्यात असे वाटते तुम्हाला धर्मराज मुटके???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मी बहुतेक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारला बहुतेक. पुन्हा विचारुन बघतो.

१. एक शेतकरी म्हणून इथे तुम्हाला उपयुक्त असे कोणते इन्फ्रास्ट्र्क्चर आहे असे तुम्हाला वाटते ?

इथली धरणे ,अवाढव्य रेल्वे नेटवर्क ,चारपदरी रस्ते या खाली कुणाच्या जमिनी गेल्यात असे वाटते तुम्हाला धर्मराज मुटके???
धरणांचा अपवाद वगळता वरील सुविधेसाठी वापरलेल्या सर्वच्या सर्व जमिनी ह्या उपजाऊ नसाव्यात. सर्वच्या सर्व शेतकर्‍यांच्या मालकीच्या नसाव्यात असे वाटते. उत्तर चुकीचे असल्यास क्षमस्व पण खरोखरच समजून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या जमिनी गेल्यात ते बरोबरच आहे. जमीन ही मालमत्ता आहे व तिचे रक्षण सरकारने करायचे तर शेतकर्‍यांनी सरकारला टॅक्स द्याय्ला हवा. व कृषिउत्पन्नावर प्राप्तीकर नाही. तो लावण्याचा केंद्रसरकारला अधिकारच नाही. सबब शेतकर्‍यांच्या जमीनी सरकारने शेतकर्‍यांना क्रूरपणे ठोकून ताब्यात घेतल्या व ओरबाडल्या तरी त्यात चूक काहीही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला मान्य आहेइथे बरेच परदेशस्थ आहेत ज्यांना मी आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहे.

एत्के सडेतोड विधान वाचुन तुमच्या खणखणीत स्पश्टवक्तेपणाचे कौतुक करायचे की एका व्यापक डिमेशन असणार्‍या प्रश्नाचे एका अर्थाने फक्त तुमचा व विश्वाच्या कोपर्‍याच्या नखातही ज्यांची गणती होत नाही अशा टीचभर ऐसीसदस्यांचाच विचार करुन मुळ प्रश्नाचे असुलभ संकुचीतीकरण केल्याबोद्दाल तुमची किव करायची हे ठरवणे जरी अस्पश्ट असले तरीही परदेशात स्थायिक होणे गरज की निर्लज्जपणा आहे ठरवायच्या फंदात न पडता ते करता येणे "क्षमता अन इछ्चाशक्ती" असे मी मानतो...

आपली बुद्धीमत्ता आपल्या देशासाठी वापरण्याऐवजी इतर देशांची सेवा कशाला.?
स्त्रिमुक्ती, राष्ट्रगीत्मुक्ती , टोरेंटमुक्ती इतर काही देशात जास्त चांगल्यासाध्य होतात, तिथे बेफिक्रे म्होवी स्टाइलही आरामात जगता येते असे जास्त व्यापक कॉजेसच्या सबलीकरण्ञा साठी जर माझी बुध्दी इतरदेशांना उपयोगी पडणार असेल ते ही मस्त मोबदला घेउन... तर मी माझ्या बुध्दीचा वापर फक्त आपल्याच देशासाठी करायचा संकुचीतपण्या का कराव्या ? बरे समजा सवलती मला मिळाल्या नसत्या, देशाने मला जेवायला दिले नसते तर मी मॉझी बुध्दी देशासाठी वापरली असती याची काय खात्री ? मग आपला न्क्कि विचार काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

काही मुद्दे:
१. मनुष्य खेड्यातून शहरात येतो तेंव्हा तो खेड्याशी "द्रोह" करतो का?
२. भारतातली गर्दी कमी करणे सर्वानाच चांगले नाही का?
३. भारतात कोणत्या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता आहे ? एका जागेसाठी वीस नाही, दोनशे उमेदवार अर्ज करीत आहेत.
४. संगणक-प्रणाली सोडल्यास इतर बऱ्याचशा क्षेत्रातल्या व्यावसायिकाच्या कामाचे मोठ्या प्रमाणात "फ़डतूसीकरण" झाले आहे . बी टेक होऊन मुकादमी काम करणे ही "देशसेवा" म्हणायची का?
५. अमेरिकेतील भारतीयांची आता भारताचे हित सांभाळणारी "लॉबी " उभी राहत आहे, जी अमेरिकन धोरणांवर नक्कीच प्रभाव पाडू शकेल .
५. परदेशी स्थायिक होणे ही फक्त त्या कुटुंबापुरती ट्रॅजेडी असते : विशेषतः आई-वडिलांची परदेशात राहण्याची तयारी नसेल तर . देशाला त्याचा कोणताही फरक पडत नाही . उलट गुंतवणुकीमुळे फायदाही होऊ शकतो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

>>संगणक-प्रणाली सोडल्यास इतर बऱ्याचशा क्षेत्रातल्या व्यावसायिकाच्या कामाचे मोठ्या प्रमाणात "फ़डतूसीकरण" झाले आहे . बी टेक होऊन मुकादमी काम करणे ही "देशसेवा" म्हणायची का?

संगणक क्षेत्रातही अ‍ॅक्च्युअली प्रणाली लिहिणार्‍यांचे केव्हाच फडतुसीकरण झालेले आहे. तिथेही म्यानेजर्सच* पैसे कमावतायत.

*खरे तर एनी जॉब दॅट इज बॅक-एंड इज ट्रीटेड अ‍ॅज फडतूस. आयटी क्षेत्रात देखील फंक्शनल काम करणार्‍या क्लायंट फेसिंग लोकांना अधिक पगार व मान मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फडतुसीकरण

मिलिंद, थत्तेचाचा : फडतूसीकरण हा शब्द व त्याची व्युत्पत्ती स्पष्ट करावी.

(tongue in cheek)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेक अ फडतूस (आउट ऑफ अ प्रीमिअम /नॉर्मल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I absolutely recognize the cultural ownership of the root "फडतूस" by The Right Hon. Gabbar Sing (whose tongue is in cheek!).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Oh!, That's interesting.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्मोकर्षासाठी देशत्याग करणे हा एक व्यक्तिगत निर्णय असू शकतो. म्हणजे व्यक्तिकडे दोन पर्याय आहेत - १. स्वतःस जगाचा एक स्वतंत्र घटक मानून इतर बाबींचा विचार न करता स्वतःचा जिथे फायदा आहे, आवड आहे, तिथे जाणे. २. असा पर्याय असताना देखिल स्वतःस देशाचा एक भाग मानून, आवश्यक असल्यास, देशात राहून तेथल्या उन्नतीसाठी यत्न करणे.
दुसरा भाग स्पष्ट श्रेष्ठतर वाटतो.
मात्र सर्वात नीचतम निर्लज्जपणाचा भाग मंजे परदेशात राहून (परतायची अजिबात इच्छा नसून) भारतीयांना उपदेश देत राहणे, त्यांच्या चूका काढत राहणे, त्यांना ते कसे मागास आहेत हे सांगत राहणे. पदवीधर भावाने नापास भावाला रोज हिंगवल्यासारखे.

(व्यक्तिगत लज्जेचा भाग सांगायचा तर अगदी गोरागोमटा पुणेरी कोकणस्थ ब्राह्मण पण परदेशात गेला तर थर्ल्ड वर्ल्ड मधून आलेला काळा बनतो. यावरून बाकी काय ते समजावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आत्मोकर्षासाठी देशत्याग करणे हा एक व्यक्तिगत निर्णय असू शकतो.

पिंक : देशोत्कर्षासाठी आत्मत्याग का करत नाही ? म्हंजे असं पहा की - लोकसंख्या खूप वाढलेली आहे. भारतात लोकसंख्या ही समस्या आहे. समस्येची तीव्रता कमी करायची असेल तर लोकसंख्या घटवणे हा मार्ग असू शकतो. व आत्मत्याग्/आत्महत्या हा मार्ग का अवलंबायचा नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात लोकसंख्या ही समस्या आहे.

हा गैरसमज आहे. तुझ्यासारखे बुद्धिमान लोक देश सोडून माझ्यासारख्या निर्बुद्ध लोकांच्या हातात इथली सुत्रे देतात ही समस्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा गैरसमज आहे.

मान्य.

पॉल एहल्रिच च्या मुद्द्यांशी मी सहमत नव्हतोच.

ओके मी माझा मुद्दा दुरुस्त करून मांडतो - अनेक भारतीय असं मानतात की भारतात लोकसंख्या ही मोठीच समस्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र सर्वात नीचतम निर्लज्जपणाचा भाग मंजे परदेशात राहून (परतायची अजिबात इच्छा नसून) भारतीयांना उपदेश देत राहणे, त्यांच्या चूका काढत राहणे, त्यांना ते कसे मागास आहेत हे सांगत राहणे. पदवीधर भावाने नापास भावाला रोज हिंगवल्यासारखे.

यात कुठेतरी अप्रत्यक्षपणे

भारतात राहणारे = नापास
बाहेर राहणारे = पदवीधर

हे गृहीतक दिसतं. तुमचा तसा उद्देश नसेल हे मान्य करूनही असा स्टिरिओटाईप असतो हे सत्यच आहे. त्यामुळे या परदेशातल्या लोकांना बिनकामी भाव दिल्यासारखे होते. तेव्हा ते तसे असू नये.

सांप्रत काळी भारत आणि एकूणच युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया सोडून बाकीचे जग, त्यातही विशेषकरून भारत कसा मागास वगैरे आहे याचे भावनिक पोर्न करून विकण्याची फॅशन आहे. ती फॅशन अनुसरली नाही तर आपल्याला बाहेर कुणी भाव देणार नाही अशी एग्झिस्टन्शिअल भीती सतावत असल्यामुळेच असा व्हर्बल डायरिआ बाहेर पडतो हे लक्षात घ्या. तो वाटतो निर्लज्जपणा. तसा तो आहेही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही वैचारिक अवस्था अतिशय केविलवाणी आहे, तिची काळजी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्याभाऊ ,
'' सांप्रत काळी भारत आणि एकूणच युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया सोडून बाकीचे जग, त्यातही विशेषकरून भारत कसा मागास वगैरे आहे याचे भावनिक पोर्न करून विकण्याची फॅशन आहे. ती फॅशन अनुसरली नाही तर आपल्याला बाहेर कुणी भाव देणार नाही अशी एग्झिस्टन्शिअल भीती सतावत असल्यामुळेच असा व्हर्बल डायरिआ बाहेर पडतो हे लक्षात घ्या. तो वाटतो निर्लज्जपणा. तसा तो आहेही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही वैचारिक अवस्था अतिशय केविलवाणी आहे, तिची काळजी वाटते."

हे असे असले तर नक्कीच केविलवाणे असेल , पण हे असे आहे का खरंच समाजात ? इथे सुध्दा एखाददुसरे नग सोडल्यास बाकी कोणी परदेशी असल्याने भारतवर्षाच्या मागासलेपणाबद्दल उपदेशामृत पाजणारे कोण सापडले नाही हो . ( उपदेशामृत देणारे खूप सापडतील पण त्यात देशी परदेशीवाद दिसला नाही ) इन फॅक्ट (माझ्यासारखे )लोक हित्त बसून परदेशावर उगाचच पिंका टाकतात ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत इ. जाऊन टेक्निकल क्षेत्रांत काम करणार्‍यांत तितकेसे दिसणार नाही, मात्र ह्युमॅनिटीज़ इ. मध्ये प्रोफेश्वर झालेल्यांचे मात्र हे व्यवच्छेदक लक्षण असते कैकवेळेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेल सुध्दा ,(म्हणजे कोणी नफडतूस म्हणताय काय ?) अश्या पुरुषोत्तमांशी संबध आला नाही कधी !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नफडतूसच.

आणि अशांशी संबंध नाही आला तेच बरेय. यू हॅवंट मिस्ड एनीथिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे गृहीतक दिसतं. तुमचा तसा उद्देश नसेल हे मान्य करूनही असा स्टिरिओटाईप असतो हे सत्यच आहे. त्यामुळे या परदेशातल्या लोकांना बिनकामी भाव दिल्यासारखे होते. तेव्हा ते तसे असू नये.

मान्य. डोळे उघडण्याकरिता धन्यवाद. I didn't even realize when I myself became victim of such stereotype!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो परत आले याचा अत्यानंद झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईला! गोविंदा!!

असो! वेल्कम वेलकम ब्याक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> २. असा पर्याय असताना देखिल स्वतःस देशाचा एक भाग मानून, आवश्यक असल्यास, देशात राहून तेथल्या उन्नतीसाठी यत्न करणे.

असा रोमॅण्टिसिझम मी माझ्या तरुणपणी बाळगला आणि त्या बहकाव्यात येऊन वयाने मोठ्या लोकांचे सल्ले धुडकावून इथेच राहणार अशी घोषणा केली होती.

इथे राहून देशासाठी नक्की काय केले ते आज मला सांगता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इथे राहून देशासाठी नक्की काय केले ते आज मला सांगता येणार नाही.

खरं सांगा थत्तेचाचा, काला धन कमावलेत की नाही?

फीलिंग देशभक्त वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>खरं सांगा थत्तेचाचा, काला धन कमावलेत की नाही?
हा हा हा. नाही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी एक रेसिडेंट भारतीय म्हणून विचार केला तर तुम्ही इथे राहिल्याचा मला फायदा झाला आहे असं बर्‍यापैकी म्हणता येईल. जे लोक सोडून गेले आहेत त्यांचा तोटा झाला आहे असं देखिल म्हणता येईल.
=================================
असे सोडून गेलेले लोक जमा करूनच काही देश सशक्त झालेले आहेत. बुद्धीमान, चरित्रवान, नेतृत्व करू शकणारे, श्रीमंत, चळवळे, उद्योगशील लोक देश सोडून गेल्याने देशाच्या स्रोतांत होणारी घट ही ते जे घेवून गेले त्यापेक्षा कैक पट जास्त असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अशा फुसकुल्या सोडणार्‍यांना एकच उत्तर द्यायचे,

ती अमेरिकेची गरज आणि धागाकर्त्याचा जळाऊ निर्लज्जपणा, काय म्हणणं आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0