तऱ्हेवाईक नातेवाईक

संकल्पनाविषयक

तऱ्हेवाईक नातेवाईक

लेखक - .शुचि

Families are like fudge, mostly sweet with a few nuts.

या वाक्याचा अनुभव सर्वांनाच येतो. नातेवाईकांबरोबर जेवणावळी उठवताना, सणसमारंभ साजरे करताना, कधी त्यांच्या सुख-दुःखात रक्ताच्या नात्याने हक्काचे साथीदार बनताना आपण कधी आणि कसे गुंतत जातो ते आपल्यालाही कळत नाही. बहुतेकदा या गुंतवणुकीचा त्रासच होत होतो पण जर त्रयस्थ दृष्टीने पाहिलं तर नानाविध मानवी स्वभाव दिसून येतात. अलिप्तपणाने बघताना अनेक गमतीजमती सापडून जातात. त्यांपैकी काही :

**

एकदा एका लग्नात माझ्या नणंदेच्या सासूबाईंच्या नणंदेची थोरली बहीण उपस्थित होती. या आजी ९० वर्षांच्यातरी असतील, ऐकायला कमी येई. वयाच्या मानाने त्या बर्‍यापैकी लवलवाट करत होत्या. त्यात ज्येष्ठत्वाचा मान असल्यामुळे जिकडेतिकडे त्यांचं मानपान होतही होतं. नवर्‍याचा एक मित्र आणि नवरा ही सर्व लगबग पहात होते. त्या जवळच होत्या तरी या वात्रट मित्राने, नवर्‍याला विचारलं "आज्जीबाई धामधुमीत दिसतायत. त्या कधी टोटल होणार याची वाट पहातायत बहुतेक सगळे. आता पुरे की म्हणावं." नेमकं हे कसं माहीत नाही आज्जींना ऐकू गेलं आणि त्यांनी नवर्‍याला जोराने विचरलं "काय रे, काय म्हणतायत तुझे मित्र? टोटल म्हणजे रे काय?"

बाप रे! बाका प्रसंग होता तरी सावरून घेत तो म्हणाला "अगं, म्हणजे जेवणार कधी? तुम्ही जेवणार कधी ते विचारतोय तो." यावर आजीबाई उवाच - "माझं म्हातारीचं काय रे! आधी वधु-वर टोटल होतील, मग वरपक्ष-वधुपक्षाकडचे टोटल होतील, नंतर विहीणी-वरमाईची टोटल व्हायची बारी आणि सगळ्यांचं झालं की मग मी टोटल." तिथल्या सर्वांची हसता हसता पुरेवाट झाली पण कोणाला उघड हसताही येईना. शेवटी आज्जीबाई काही कामानिमित्त तिथून निघून गेल्यावर मग जो काही हास्याचा कल्लोळ झाला त्याला तोडच नाही.

**

असेच माझ्या सासूबाईंचे धाकटे बंधू. कित्येक पावसाळे पाहूनही, 'धाकटेपणाची', लक्ष वेधून घेण्याची हौस काही पूर्ण होत नसे. प्रत्येक लग्नात मानपानासाठी अडून बसणारे. मग आपण वरपक्षाकडचे असो की वधूपक्षाकडचे, हे नेमके ओवाळण्याच्या, भेटवस्तू देण्याच्या वेळेला अळम्‌टळम्‌ करणार, खुर्चीच नाही सोडणार, जागेवरून ढिम्म हलणारच नाहीत! जोवर त्यांच्या मनासारखं घडत नाही तोवर बसल्या जागी 'सत्याग्रह'. खरं तर 'पेन इन द नेक', पण करणार काय? समारंभात विघ्न नको, अतृप्ती नको म्हणून सगळेजण कलाकलाने घेत. पण यांच्या मुलीच्या लग्नात काय मज्जा मज्जा झाली हे सांगायलाच हवं का? इतकी रुसवा-फुगवी झाली, इतक्या मनधरण्या झाल्या की नंतर पुन्हा हे मामा रुसल्याचं कोणी पाहिलं नाही.

**

आमची एक दूरची आत्या. म्हणजे आहे, खरीच सुंदर आहे; पण आल्यागेल्या, पाहुण्यारावळ्यांना कितीदा आपले आल्बम्स दाखवायचे त्याला काही लिमिट? म्हणजे मी पूर्वी अशी होते अन तशी होते, सुंदर होते आणि कॉलेजमध्ये माझ्यावर विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण कसे लट्टू होत. तिला कॉलेजात असतानाच मॉडेलिंगची ऑफर कशी आली आणि मग तिने ती कश्शी उडवून लावली, पण आता त्याचा कसा पश्चात्ताप होतो हे आख्यान तर आम्हां मुलांचं घोकून पाठ झालेलं होतं.

**

आणखी एक म्हणजे आमचा मामा आणि आई. या दोघांतली 'सिबलिंग रायव्हलरी' संपण्याची अजिबात शक्यता नाही. एकाने पूर्व दिशा म्हटली की हटकून दुसरी पश्चिमेकडे निघणार. आई एम.ए. करत होती त्याकाळची गोष्ट. मी मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे रहायला गेलेले होते. मामीची बहीण आणि तिची दोन मुलंही होती; माझी मामेभावंडंही होती. खूप धुडगूस घालायचो आम्ही. भरपूर हुंदडून, बालनाटकं वगैरे पाहून (टिळकस्मारकला बालनाट्यं लागत त्या काळी), रात्री भुताखेतांच्या गप्पा ऐकत वेळ एकदम खास जात असे. एकदा रात्री मी अशीच झोपेची आराधना करत होते आणि बाहेरच्या खोलीत मोठ्या माणसांच्या - मामी, तिची बहीण, मामा - यांच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा माझ्या तिखट कानांनी मामाचे एक वाक्य बरोबर ऐकलं. "रजीला काही नाही, मिरवायची हौस फार. म्हणून एम.ए. करतेय झालं. मुलां-संसाराकडे लक्ष द्यायचं सोडून लष्करच्या भाकर्‍या भाजायचे धंदे आहेत हे." मी तेव्हा सातवीत होते. लगेच दुसर्‍या दिवशी इमानेतबारे, आईच्या कानावर ते वाक्य घातले, मग जी खडाजंगी झाली म्हणता! भावा-बहिणीचं भांडण मस्त पेटलं.

**

मुग्धाताईंनी 'अर्थ काय बेंबीचा'मध्ये छान मुद्दा मांडला आहे. आपल्याला जसे तापदायक नातेवाईक असतात तसे आपणही कोणाचे तरी 'तापदायक' नातेवाईक असतोच की. आणि शेवटी आपले सगळ्यांचेच पाय मातीचे. हेवेदावे, मत्सर राग-लोभ हे कोणालाच चुकले नाहीयेत. हां, आता 'फज'मधले शेंगदाणे मजा लुटत खायचे की तोंड वाकडं करून ते आपले आपण ठरवायचं. माझं तरी हेच मत आहे की हे शेंगदाणे-काजू-बदाम कुडुम-कुडुम चावत, फज खाण्याची मजा काही औरच.

वाचकांचे असे अनुभव वाचायला मिळाले तर बहार येईल.

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

तऱ्हेवाईकपणा असा आपण शिक्का मारतो कोणावर तेव्हा त्यात दोन प्रकार आहेत.दुसय्रास या गुणाचा त्रास होणारा व न होणारा. शिवाय नातेवाइक असणे नसणे यानेही उपप्रकार पडतात कारण त्यांच्याशी आपला संबंध न आवडले तरी जोडला गेलेला असतो. उदा०व्रात्य मुलांना घेऊन दुसय्रा नातेवाइकाकडे राहाण्यास जाणे, काही सवयींचा होणारा त्रास इत्यादी. कधीकधी इकनॅामी अंतर्गत काही गोष्टी केल्या जातात. त्याच्याशी आपणास काही देणंघेणं नसतं पण हे फार होतय असं उगाच वाटतं.१) शाकाहारी असलो तरी काही नातेवाइक अंडी,मासाहार करतात. पण अंडी ताजी मिळावी म्हणून ब्लॅाकच्या बॅल्कनितच चार कोंबड्या पिंजय्रात ठेवलेल्या एकीने.पोपटाचा पिंजरा ठेवणं आणि कोंबड्या ठेवणं फरक आहे.
सर्वांत तऱ्हेवाईक मीच आहे असं बय्राच जणांचं म्हणणं आहे पण त्याचा इतरांशी संबंध नाही. तो माझ्यापुरताच असतो. परंपरा मोडणे नेहमीचंच आहे. चारचौघांसारखं न वागणं हा एक तर्हेवाइकपणाच मी करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फजमधले काही शेंगदाणे खवट असतील तर फजची मजा निघून जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सांगा की तुमचे अनुभव. इथे दुसऱ्यांच्या तोंडात आलेल्या खवट चवींबद्दल वाचून आपलं तोंड तात्पुरतं गोड करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करेक्ट. माझी इच्छा होती की हा धागा इन्टरॅक्टिव्ह व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्या नातेवाईकांना सहन करावेच लागते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईतजी अशी एका वाक्यावरती बोळव्ण करु नका. प्लीज काहीतरी रसाळ उदाहरणे द्या. तुम्हाला लेखनकला अवगत आहे तिचा आम्हाला लाभ घेऊ द्या की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी इच्छा होती की हा धागा इन्टरॅक्टिव्ह व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांप्रत काळच्या आण्विक कुटुंबात नातेवाईकांचा त्रास तितका होत नाही. अगोदर ते लै जवळ आणि लै वेळेस बरोबर असायचे म्हणून भांड्याला भांडी जास्त लागायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आधी म्हणजे कल्पनाच करवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीन देअर, सीन दॅट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नुसतं एवढंच म्हणू नका, काय काय पाह्यलं त्याचे गोरी डिटेल्स द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एकत्र कुटुंबाचे लाभ/फायदेही असतीलच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धडपणी वागले तर लाभ, नाहीतर आठवले तरी संताप होणार्‍या आठवणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयला आज्जीबाई लय भारी निघाल्या. मी हा किस्सा माझ्या एखाद्या शोमध्ये वापरणार. आजीला दंडवत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

जरुर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमॅन, आधीचं जगच वेगळं होतं.अचानक आई वडील वारले की मुलांची रवानगी जरा सधन मामा/काका/आत्याकडे/मावशीकडे व्हायची. तह्रेवाईक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या नात्यांनी अशावेळी मात्र फारच समजूतदारपणे वागल्याची उदाहरणं आहेत.किंबहुना अधिकच सौम्यपणा दाखवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान बाजू सांगीतलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही बाजू आहेत ओ. ज्याला जसे अनुभव येतील तसं त्याचं मत बनणार. चालायचंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नातेवाईक म्हणजे अनेक कडु गोड प्रसंगांचे मोहोळ असते. नात्यांचा गुंता सोडविता येत नाही. तोडता येत नाही, ... म्हणुन गुंतत राहणे हेच नशिब.

नातेवाईकांच्या अनेक त-हा. काही खूप मनमिळाऊ, अश्वासक काही वेळ आणि प्रसंगानुरूप बदलणारे, तर काही त्रास दायक तर काही... असो

ऋणानुबंधाच्या गाठी का पडतात हा एक विचित्र (दैवी) योगच https://www.youtube.com/watch?v=PI8en9bIS8A

ढोबळमानाने नातेवाईकांचे वर्गिकरण चांगले(पांढरे) आणि वाईट(काळे) अशा दोन प्रकारात करता येईल. पण सुक्ष्मात जाऊन पाहिले तर अनेक रंग आढळतील.

१) नाच रे मोरा नाच (https://www.youtube.com/watch?v=eadadyU74wg ) प्रकारचे नातेवाईक – हे सदा उत्साहाने रसरसलेले असतात. ते नेहमी अरे/अग चल ना, करूया ना, जाऊया ना, हरकत काय आहे? चालेल की अशा मूड मधे असतात. आणि इतरांनीही तसेच असावे असा आग्रह असतो.
२) तुझ्या गळा माझ्या गळा (https://www.youtube.com/watch?v=xmb-P1orT_Y ) प्रकारचे नातेवाईक – हे कायम आपुलकीने प्रेमाने ओथंबलेले असतात. सगळं एकत्र,बरोबर करायचं. तुझं जे आहे ते सगळ्यांसाठीच आहे असं मानायचं असं ते नेहमी सांगतात. आपल्या घरी अगदी हक्काने, त्यांचे घर असल्यासारखे राहतात, वावरतात.
३) ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले (https://www.youtube.com/watch?v=EHQ1bqT7tSs ) प्रकारचे नातेवाईक – हे म्हणजे साक्षात पुण्यात्मेच असतात. त्यांच्या चरित्राला कुठे डागच काय साधे गालबोट देखिल नसते (असे ते भासवतात ). पापाच्या कर्दमात अडकलेल्या माझ्यासारख्या पापी/अवगुणी जनांसाठी तर ते जणु प्रतिपरमेश्वरच..
४) फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार (https://www.youtube.com/watch?v=EeNd0JJbM-U ) प्रकारचे नातेवाईक – हे नेहमी उपदेशाच्या मूड मधे असतात. माझ्यातल्या असंख्य अवगुणांचे रूपांतर सद्गुणांमधे करण्याचा त्यांनी विडाच उचललेला असतो.
५) भरजरी गं पितांबर दिला फाडून ..(https://www.youtube.com/watch?v=cyAOzD6_5ms ) प्रकारचे नातेवाईक – हे निरनिराळ्या प्रेरणादायी घटना आणि कथा (सतत) सांगुन सुसंस्कार करण्याचे आणि चांगले वळण लावण्याचे कार्य पार पाडीत असतात.
६) सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ( https://www.youtube.com/watch?v=Ru7IWs-QbZk ) प्रकारचे नातेवाईक – अनेक अफाट आणि अचाट प्रश्नं विचारून सतत परीक्षा घेत असतात. उत्तर चुकले किंवा देता आले नाही (अथवा देण्याचा कंटाळा केला ) तर नापास करतात.
७) चाफा बोले ना चाफा चाले ना (https://www.youtube.com/watch?v=IIGMeQwXPGo ) प्रकारचे नातेवाईक – हे सदोदीत रागेजलेले वाटतात. काही केल्या यांची कळी खुलत नाही. आणि काय केले की त्यांना बरं वाटेल हेही ते सांगत नाही. दुसर्‍याने ते ओळखावे इतकीच त्यांची माफक अपेक्षा असते.
८) लटपट लटपट तुझं चालणं ( https://www.youtube.com/watch?v=O1Hav1JVGNA ) प्रकारचे नातेवाईक – हे लोकं नेहमीच टिपटॉप राहतात. त्यांचे वागणे,बोलणे देखिल नेहमीच मनमोहक असते. मी अगदीच बावळट आहे अशी जाणीव ते मला न चुकता करून देतात.
९) बुगडी माझी सांडली गं ( https://www.youtube.com/watch?v=GOEJZslEu6I ) प्रकारचे नातेवाईक – हे सज्जन कायम कुणाचे ना कुणाचे गुपित सांगून "कुण्णाला सांगु नको बर्का" असे बजावत असतात.
१०) गोमु संगतीनं माझ्या तु येशील का ( https://www.youtube.com/watch?v=7BdEj9mUttU ) प्रकारचे नातेवाईक – हे लोक काहीही विचारलं की 'मी नाही ज्जा' असच म्हणतात. मग अनेक विनंत्या विनवण्या केल्यावर मोट्ठ्या मिनतवारीने होकार दर्शवून आपल्याला उपकृत करतात.
११) म्यानातून उसळे तरवारीची पात (https://www.youtube.com/watch?v=OArezYEKog0 ) प्रकारचे नातेवाईक – हे लोक कायम आवेशात असतात. त्यांच्यावर कुणीतरी घोर अन्याय केला आहे असे ते सांगतात. आणि तो (अन्याय) करणार्‍याला चांगली अद्दल घडविन असे ते बजावत असतत.
१२) सूरत पिया की न छिन बिसराई (https://www.youtube.com/watch?v=CPjtk5_LlQw ) प्रकारचे नातेवाईक – काही वस्तू अथवा पैसे उधार घेऊन हे पसार झालेले असतात. दिलेली वस्तु/पैसे परत मिळेपर्यंत (काहीवेळा ती मिळतही नाही ) आपल्याला घडीघडी त्यांचे स्मरण होत असते. पण त्यांना त्याचे काहीच नसते.
१३) अवघे पाऊणशे वयमान (https://www.youtube.com/watch?v=BZl2JWzfemM ) प्रकारचे नातेवाईक –
हे चिरतरूण असतात. उत्साह तरूणांना लाजविणारा असतो. त्यांना ज्येष्ठं अथवा सिनियर म्हणवून घेणे पसंत नसते. त्यांच्याहून ज्यूनियरांना काही वेळा तरी ते आपल्याबरोबर नसावेत असे वाटू शकते हे त्यांना मान्य नसते.
१४) बोलावा विट्ठल पहावा विट्ठल ( https://www.youtube.com/watch?v=XJ00Oa49IdA ) प्रकारचे नातेवाईक – अत्यंत धार्मिक लोकं. माझ्या निधर्मि, अधार्मिक वागण्याला धर्मबुडवेपणाचे लेबल लावून नाके मुरडतात.
१५) समईच्या शुभ्रं कळ्या ( https://www.youtube.com/watch?v=ccdos20UltE ) प्रकारचे नातेवाईक – असे लोक फारच क्वचित भेटतात. शांत पण काहीसे गूढ.

असे अनंत प्रकार ---

काही काही असे --
https://youtu.be/jLhC79xC76Q

आणि असेही असतात. --

https://youtu.be/EdeFZDGFSv4

पण ते कुणाचे नातेवाईक असतात काही कल्पना नाही. कुणाचे तरी असणारच.

उत्तर फारच लांबले -- पण धागा इंटरॅक्टीव्ह व्हावा म्हणूनच केवळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मनीषा मस्त सुरुवात करुन दिलीत तुम्ही. खरं तर तुम्हीच हा धागा म्हणुन टाकायला हवा होता. मग सर्वांनी समरसुन प्रतिसाद दिला असता. असो आत्ताही आय होप ऐसीकर विल ओपन अप. Smile मी जे सांगणाते त्यात मी माझ्या मैत्रिणीही घेणार आहे.-
.
(१) अवघे पाऊणशे वयमान हा प्रकार मला चिरपरिचित आहे. सूनेच्या मैत्रिणी हायजॅक करत बसणारे अनेक लोक मला माहीत आहेत. कारणही जाणते कदाचित समवयस्कांचा तुटवडा आणि त्या तुटवड्यातून आलेले एकटेपण.
.
(२) ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर टाइप तर डोक्यातच जातात. तुम्ही स्खलनशील नाही याचा अर्थ तुमची घसरगुंडी कोणी पाहीली नाही एवढाच असते.
.
(३) माझ्यापुढे माझ्या नवर्‍यावर लाईन मारणार्‍या मैत्रिणीही मला दुर्दैवाने माहीत आहेत. मैत्रीपेक्षा स्वतःच्या रुपाचा उदोउदो करुन घेण्यात धन्यता मांनणार्‍या आणि हे अगदी एन्गेजमेन्टच्या सुरुवातीला म्हणजे खूप अननुभवी, तरुण असताना कळल्याने मला तरी शॉक बसलेला होता.
.
(४)पण काही मैत्रिणी म्हणजे सोनं निघाल्या हेही खरे आहे.
.
(५) ११ वर्षांनी गेल्या वर्षी भारतात दिवाळीस गेले होते तेव्हा काही "बुजुर्ग" लोकांनी दिवाळी नसताना अधुन मधुन यायला हरकत नाही हे सांगुन, कान टोचले होते. जे की डोक्यात गेलेच होते.
.
(६)सासरच्या किंवा भावजयीच्या कडचे नातेवाईक हा भीषण प्रकार असतो कारण आपले तर रक्ताचे नाते नसते. पण अपेक्षा या असतात की आपल्यालाही तितकेच उमाळे यावेत.
.
(७)कित्येक वर्षांनी भारतात गेले की वाटते खरच जेन्युइन नातेवाईकच भेटावे कारण वेळ ही कमॉडीटी असते.
.
(८)असंतुष्ट आणि त्यामुळे जळणारे आत्मेही भेटतात. त्यांच्याकडेही भरपूर असतं नसते ती फक्त स्वतःच्या ऐश्वर्याबद्दलची कृतज्ञतेची जाणीव मग अन्य लोकांवर जळत बसणे हेच हाती ऊरते.
,
(९)प्रत्येक लग्नात एकतरी वयाने परिपक्व पण मनाने "लब्बॉड, खेळकर" म्हणजे "वार्धक्यी शैशवास जपलेलीच नव्हे तर शैशवास पार कवटाळलेली" बेबी आत्या, छकुली आत्या, अमकी तायडी का असते हे न कळलेले कोडे आहे.
.
(१०) कितीदा तरी विचार करते कुंडलीतील आपला १० वा ग्रहं कसा असेल. फार उत्सुकता आहे, टेन्शनयुक्त कुतुहल आहे, स्वप्ने तर अनंत आहेत. कळलं की नाही. माझा जावई. पण तो यायला खूप वर्षे असली तरी स्वप्न पहायला कुठे मनाई आहे? मी कधीही स्वयंपाक धड शिकले नाही पण माझ्या जावयाकरता मी काही पदार्थ आवर्जुन शिकेन Smile
.
(११) मुलगी टीनएजर आहे. तिला मी नम्रपणे विचारावयास शिकले आहे की "तुझी हरकत नसेल,तुझा मूड असेल, सर्व शुभ ग्रह अलाइन झालेले असतील तर बाळ मला हे सांग किती वाजता घरी परत येणार? नाही म्हणजे त्या वेळेपासून तारवटलेल्या डोळ्यांनी काळजी करायला बरं. बाकी काही नाही." Wink
.
(१२) एक परिचित आहेत ज्यांना ४ का ५ वर्षाची जुळी आणि अत्यंत दंगाखोर मुले आहेत. ते येणार म्हणजे पोटात गोळा येतो. कॉम्प्युटर फुटतोय की टीव्ही असली टेन्शन्स असतातच परत ते लोक गेल्यानंतर घरात जो दारुण पसारा पडतो ना. पण काही लोक मात्र मुलांना शिकवतत की तू पसारा केलास तो तू आवरुन ठेवायचास.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन भारी प्रतिसाद!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनीषा मॅम हॅज रोलड द बॉल!! होऊन जाऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्यात जाणारे नातेवाईक :

१. भोचक काकू: ह्या पुणेरीच असतात असं काही नाही . शिवाय ह्या नात्याने काकू नसतात पण ह्यांच्याशी नातं इतकं लांबचं असतं किंवा कधी कधी नसतं सुद्धा तरीही आपल्या पद्धतीप्रमाणे ह्या काकू. जाणून किंवा अजाणता कोणत्याही विषयावर भोचक आणि खोचकपणे बोलणे त्यांना सवयीचे असते. "काय आता अजून किती दिवस मग तुझी पीएचडी ? बास झाला अभ्यास आता संसाराचं बघा " असं चार-चौघात बोलायला त्यांना काहीही वाटत नाही.
"५ वर्षं झाली , गुड न्यूज द्या आता. काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात. मला तर २४व्या वर्षीच बंटी झाला होता. शिवाय आमचे हात पाय चालू आहेत तोवर नातवंड खेळवायला बरं, क्काय? ते प्लांनिंग वैगेरे करत नाहीये ना तुम्ही?"

'मुळात माझ्या लग्नाला ५ वर्ष झालेली नाहीत, वेळच्या वेळी ही खूप सापेक्ष गोष्ट आहे. माझ्या आज्जेसासूबाईंना पहिला मुलगा १६व्या वर्षी झाला होता, त्यांच्या काळात तेही वेळच्या वेळीच होतं. आणि माझ्या बाळाला खेळवायला तुमचे हात पाय धड असण्याची काय गरज ? तुम्ही असंच भारतवारीत लग्नात किंवा कार्यक्रमात भेटणार आणि 'पहिल्या बाळाला भावंडं आणा आता!' असं म्हणणार फक्त. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी आणि माझा नवरा बेडरूम मध्ये काय करतो आणि कोणते कॉंट्रासेप्टिव्ह वापरतो ह्याची चर्चा मी तुमच्याशी का करू ? काय संबंध ? ' हे सगळं मी मनात म्हणते, आणि हसऱ्या चेहेर्याने मान डोलावून काढता पाय घेते.

२. अमेरिका द्वेषी मामा: काय अमेरिकेने ह्यांचं घोडं मारलंय देव जाणे , पण अमेरिकेत जाणारे ते देशद्रोही, चंगळवादी , पैशाला हापापलेले अशी ह्यांची धारणा असते. प्रत्येक भेटीत " काय मग इकडे कधी येणार?" हा त्यांचा प्रश्न. ' इकडे म्हणजे कुठे? पुढची ट्रिप पुढच्या वर्षी अशा उत्तरांतून त्यांचं समाधान होत नाही . ते पुन्हा पुन्हा भारतभूमी कशी श्रेष्ठ , अमेरिका कशी दुष्ट , आम्ही परत आलंच पाहिजे असा आग्रह करत असतात . आम्ही सगळं गाशा गुंडाळून भारतात परत यावं , रादर आम्हाला परत येण्याची सुबुद्धी व्हावी असं सूचित करणारे शुभेच्छा संदेश ते पाठवत असतात . हो म्हणून , हसून दुर्लक्ष हा उपाय ह्यांना सुद्धा लागू पडतो .

३. चौकशी मावशी : समोरच्याची उलटतपासणी घेऊन , इत्यंभूत माहिती मिळवणे हे ह्यांचं उद्दिष्ट असतं . सुरुवात अगदी निरुपद्रवी प्रश्नाने होते : 'काय मग कसा झाला आईचा वाढदिवस ? '
-छान , हा बघा फोटो
' केक तू केलास कि बाहेरून आणला ? '
-मी केला
'मग त्याला आयसिंग का नाही केलं ?'
-केलं होतं , फोटोत दिसत नाहीये
'तसं नव्हे , त्यावर हॅपी बड्डे लिहिलेलं नाहीये ना म्हणून म्हटलं '
- ( मी निशब्द !)
'गिफ्ट काय दिलं मग आईला ?'
-साडी दिली
'पण ती कुठं साडी नेसते ?
- आता नेसेल
प्रश्न मग कोणती साडी, रंग कोणता , कुठून घेतली , कितीला पडली , अमेरिकेत साडी मिळते का असे चालूच राहतात .
ह्यांच्यावर मी शोधलेला उपाय म्हणजे पहिल्या प्रश्नाला उत्तर देऊन लगेच प्रतिप्रश्न विचारायचा, आणि सगळे प्रश्न त्यांच्यावरच उलटायचे .
'काय मग कसा झाला आईचा वाढदिवस ? '
-छान , हा बघा फोटो ; तुमचा वाढदिवस कधी असतो? आणि साल ? अर्रे वाह मग ह्यावर्षी xx वा बड्डे की ! काय प्लॅन ? मागच्या वर्षी काय केलं होतं ? तुम्हाला केक आवडतो ? अंडं चालतं ?

एकामागून एक प्रश्नांचा सपाटा चालू ठेवायचा. सवयीने जमतं . चौकशी मावशीना प्रश्नांच्या रिसिव्हिंग एंडला असण्याची सवय नसते , त्यामुळे त्या लवकरच कंटाळतात आणि आपली सुटका होते .

४. ट्रॅजेडीची राणी : ह्यांना काय म्हणू कळत नाही काकूच म्हणते : आपण किती भारी आणि कसं परिस्थितीमुळे आपलं वाट्टोळं झालं हे सांगत बसायची ह्यांना खूप हौस असते.
" तुला सांगते मी इतकी हुशार होते ना, पण सगळी हुशारी पाण्यात ! करिअर करायचं होतं . पण संसारात पडले आणि कसलं काय ! गाण्याच्या परीक्षा दिल्यात मी, पण ह्यांना आवडत नाही म्हणून लग्नानंतर गाणं थांबलं . सासू सासरे , दीर नणंदा फार फार कष्ट केलेत मी सगळ्यांसाठी "
"तुला सांगते मी इतकी सुंदर , कित्ती स्थळ आली होती ; बदलापूरचे मधुबाला म्हणायचे मला , तीन मुलं झाल्यानंतर सगळी फिगर बिघडली. आता तर मेनोपॉज नांतर रयाच गेली "
ह्या पण तशा निरुपद्रवी असतात पण प्रत्येक वेळेस ह्यांना रिस्पॉन्स काय द्यायचा ते कळंत नाही . 'हो?' 'खरंच ?' 'बापरे!' ह्या तीन शब्दांत आलटून पालटून मी खेळात राहते आणि अधून मधून विषय बदलायचे क्षीण प्रयत्न करत राहते.

५. तुलना काकू : प्रत्येक गोष्टीत स्वत:शी तुलना करणे, ही ह्यांची खासियत. मग ती गोष्ट कितीही फुसकी का असेना! घरी आमचे फोटो मोट्ठे करून फ्रेम्स लावल्यात तर त्या बघून लगेच आपला फोन काढून त्यातले स्वत:चे फोटो दाखवत बसणार. माझा नवरा आणि मी बरोबरीने स्वयंपाक करतो ते बघून लगेच त्यांचा नवरा कसा छान लसूण सोलून देतो ते सांगत बसणार. माझ्या मार्कांची बरोबरी त्यांच्या मुलांच्या मार्कांशी करणार. आम्ही अनुष्का शंकरच्या कॉन्सर्टला जाऊन आलेलं कळलं की त्या कशा सोनू निगमच्या शोला गेल्या होत्या हे सांगत बसणार. एक ना दोन !

६. दिखाऊ सुंदरी : ही कधी लांबची बहीण , जाऊ , भावजय किंवा नणंद असते. ( मैत्रीण नसते कारण अर्थातच अशा मुलीशी माझी मैत्री होऊच शकत नाही ). लग्न समारंभ, वाढदिवस किंवा कौटुंबिक जेवण , जेव्हा सगळे लांबलांबचे, आडनाव एकच असणारे कुटुंबीय श्रेयस किंवा सुकांता सारख्या थाळी देणाऱ्या हॉटेलात जेवायला जातात अशा प्रसंगी ही भेटते. म्हणजे आधी तिच्या अत्तराचा भपकारा भेटतो ... कोण बरं अंघोळ करून आलं नसेल हा प्रश्न डोक्यात यायच्या आत ही भेटते. मी अमेरिकेत शिकत असल्यामुळे माझ्याशी कंपल्सरी इंग्रजीतच बोललं पाहिजे असं वाटून ती तिच्यापरी अमेरिकन अक्सेंट मध्ये सुरु होते. मी 'हिने चेहेऱ्यावर मेकअपची किती पुटं चढवली आहेत' असा विचार करत असताना तिच्या ' आय तो ना आल्वेज शॉप इन लाईक ब्रँडेड शॉप्स ओन्ली' ला 'हो ?' वगैरे म्हणत असते. मी तिच्याशी मराठीत बोलल्यावर एक तुच्छ कटाक्ष टाकून ती तिच्या दिखाऊ मराठीत "मी आली, मी गेली. हा वाला ड्रेस आणला . मी साडी कधी घालतच नाही " असं माझ्या कानाला टोचणारं मराठी बोलून सूड घेते . भडक कपडे , त्याहून भडक मेकअप आणि अत्यंत उथळ विचार असणारी ही पोरगी रोजच्या भेटण्यातली नाही ह्याचं हायसं वाटून मी तिचा निरोप घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

ट्रॅजेडी काकू व तुलना मावशी - चिरपरिचित आहेत.
छान लिहीले आहेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. भोचक काकू:

यावर माझ्या एका मित्राचा उपायः काकूंनाच उलटे महाभयानक पर्सनल प्रश्न विचारणे. तेही 'मॉकिंग टोन' मध्ये. उदा० "काय हो काकू, इंजिनियर होऊनपण क्षयझ लाख रुपयेच पगार मिळतो का तुमच्या बंड्याला?? त्या पलिकडच्या नंद्याला तर ..." किंवा "तुमच्या सुनेचे टठड हिल स्टेशनचे फोटो पाहिले - तुम्हाला विचारत नै वाटतं??"

यामुळे फाटक्या तोंडाचा/ची अशी ख्याती पसरते आणि प्रश्न आपोआप बंद होतात असा त्याचा दावा आहे.

हा प्रयोग "अरे जरा व्यायाम (उच्चारी: वॅम) करत जा" असा आग्रह करणार्‍या काकूंवर मी करून पाहिला. तेव्हापासून त्या काकू माझ्याशी अक्षरही बोललेल्या नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अशा एक भोचक काकू आमच्या ठाण्याच्या इमारतीमध्येही होत्या.

माझं एमेस्सी झालं होतं; पुढचं एक वर्षभर मी जीआरई आणि काय-काय परीक्षा देत घरी बसले होते. पॉकेटमनी म्हणून एका कॉलेजात कंत्राटी पद्धतीने भौतिकशास्त्राच्या जिलब्या पाडायचे. सिनेमा, पुस्तकं अशा चैनीसाठी पुरेसे पैसे मिळत होते. तर तेव्हा ह्या काकू भेटल्या.

"काय अदिती, कसं चाललंय?"
"नेहेमीचंच. तुमचे क्लासेस आता फुल्टाईम का?" काकू नुकत्याच शाळेतून निवृत्त झाल्या होत्या.
"हो. मला काय दुसरी कामं आहेत. पण तुझं नाही तसं."
"मला काय कामं असायची! अभ्यास आणि टवाळक्या एवढंच करते मी."
"फार झाला अभ्यास आता. पुढचं काय ते बघ आता."
"त्यासाठीच तर परीक्षा-बिरीक्षा सुरू आहेत ना!" माझी ट्यूब पेटली नव्हती.
"वय पाहा. एमेस्सी झालं, नोकरीही लागली..." माझ्या नोकरीचे तपशील ह्यांना माहीत नाहीत हे मला लगेच लक्षात आलं, आणि बोलण्याचा रोखही.
"छे, मला अजून शिकायचंय; पीएचडी करायचंय."
"शिकशील गं. आणि आणखी शिकून काय फरक पडणार आहे! पण आता तुझं वय काही कमी नाही." तेव्हा नुकतंच माझं आणि पहिल्या बॉयफ्रेंडचं फाटलं होतं, ह्याची खबर त्यांना नव्हती; असा विचार करून मी हुश्श केलं. काकू सुरूच, "काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या." म्हणजे मला बॉयफ्रेंड होता हेही ह्यांना माहीत नसावं, असा समज मी करून घेतला.
सुदैवाने तेव्हा मोबाईल बऱ्यापैकी लोकप्रिय व्हायला लागले होते आणि सुदैवाने आमच्या घरात एकाचा अकाली मृत्यु झाला होता, म्हणून मी आणि भावाने होलसेल-मोबाईल-खरेदी केली होती. अचानक मला लक्षात आलं की वेळी-अवेळी माझा फोन वाजू शकतो.
"काकू, फोन वाजतोय. भावाचा असेल, आमचं तसं ठरलं होतं. मला निघायला पाहिजे." असं म्हणून मी पळाले.

संध्याकाळी भावाला ही गोष्ट सांगून त्याच्यासमोर किरकीर करताना म्हटलं, "काकूंना म्हणायला हवं होतं, "काकू, काकांना जाऊन आता दहा वर्षं होऊन गेली. तुम्हीही काही बघा. दोघींचं एकदम बघू, होलसेल रेट मिळेल आपल्याला."..."

भाऊ उपचारापुरतं हसला तरी त्याच्या चेहऱ्यावर स्वच्छ लिहिलेलं होतं, 'हिची वायफळ बडबड ... त्यांच्या तोंडावर बोलली असती तर पुन्हा कधी कोणाला त्या छळायला गेल्या नसत्या. गॉसिपं करते फक्त!'

फाटक्या तोंडाची महती मलाही मान्य आहे, अगदी स्वानुभवातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा प्रयोग "अरे जरा व्यायाम (उच्चारी: वॅम) करत जा" असा आग्रह करणार्‍या काकूंवर मी करून पाहिला. तेव्हापासून त्या काकू माझ्याशी अक्षरही बोललेल्या नाहीयेत.

काय बोललात ते सांगा की. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोटल वाचुन फिस्सकन हसायला आलं.नातेवाईकांचे प्रकारही इंटरेस्टिंग.
मी व आमचे नातेवाईक फार गुणाचे असल्याने असले काही अनुभव नाहीत बोवा . लोल ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile मग तुमचे छान अनुभव सांगा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फाटके तोंड वत्सप्पवर वाजवल्यामुळे खूप मजा येते याची प्रचीती(चि की ची?) आलेली आहे. आता प्रत्यक्षातही वाजवण्याच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं