न-प्रेम...
तुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,
कानात घुमत राहते तू न मारलेली हाक..
आणि तू मला न लिहिलेली पत्र फाडून टाकताना,
डोक्यात रुंजी घालते तुला न आलेली आठवण..
बंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,
आणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,
तुझी सोबत न मिळालेल्या या वाटेवरुन..
पण तरीही मनात जपून ठेवेन मी कायम,
तू न केलेलं प्रेम.....
----------------------------
merakuchhsaman.blogspot.com
प्रतिक्रिया
छान आहे कविता.
छान आहे कविता.
मस्तच. हे गाणं ऐका.
मस्तच.
च्यायला, मस्त कविता. माधुरी
च्यायला, मस्त कविता. माधुरी दीक्षितने कधी न व्यक्त केलेले प्रेम मनात साठवून ठेवले आहे.
इर्शाद इर्शाद
.
actions not reactions..!...!
सर्वांना खूप धन्यवाद!
विवेक,
बरं....
merakuchhsaman.blogspot.in
मला या गाण्याची आठवण झाली
मला या गाण्याची आठवण झाली -
.
.
तुला न पडलेली माझी स्वप्नं
ही कल्पना आवडली..
बाकीचं सामान्य वाटलं...
श्वेता तुमचा ब्लॉग आता
श्वेता तुमचा ब्लॉग आता सापडला. पहीली कवितांकडे वळाले. किती सुंदर लिहीता तुम्ही. अ-स्वीकार सुरेख आहे पण "तरीही" ओह माय गॉड!!! इट्स ब्यु SSS टीफुल!
ओहोहो "वैशाखाची संगत", "सहज" - वेडी झाले.
___
शुक्रवार आणि तुमचा ब्लॉग. आय अॅम लकी. "बहुत निकले मेरे अरमान लेकिन..." , "उन्हाळा" देखील काय सुंदर आहे.
धन्यवाद स्वप्न.. इतकी भरभरून
धन्यवाद स्वप्न..
इतकी भरभरून दाद मिळायला पण वाचणारं माणूस रसिक असावं लागतं. इतक्या मनापासून कौतुक केल्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमची
merakuchhsaman.blogspot.in
(No subject)
आता कविता महाजन यांच्या कविता
आता कविता महाजन यांच्या कविता चाळताना मला पुढील अगदी याच विषयावरची कविता सापडली -
https://kavitamahajan.wordpress.com/2014/05/18/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4...
.
तुमची व त्यांची दोन्ही आवडल्या अर्थात.
न- कविता
न- कविता वाचताना प्रश्न पडतो की, या एकतर्फी प्रेमाची कधी वाच्यता केली जाते की शेवटपर्यंत अव्यक्तच राहते ते ?
Unrequitted Love म्हणजे कधीही
Unrequitted Love म्हणजे कधीही प्रेमिकाकडून स्कारात्मक प्रतिसाद न मिळालेले प्रेम. न-प्रेम हे तसे असावे. वाच्यता करुनही प्रतिसाद न लाभलेले.