तोच चंद्रमा नभात...

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे,
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे,
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे,
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे,
ती न आर्द्रता उरात, स्वप्न ते न लोचनी.
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

त्या पहिल्या भेटीच्या आज लोपल्या खुणा,
वाळल्या फुलात गंध शोधतो पुन्हा,
गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

शांता शेळके ह्यांचे हे प्रसिद्ध भावगीत आपणा सर्वांच्या कानावरून अनेकदा गेलेले असेल. मी कोठेतरी वाचल्यावरून आठवते की हे गीत शांताबाईंना ज्या श्लोकावरून सुचले तो मूळ संस्कृत श्लोक मम्मटाने आपल्या ’काव्यप्रकाश’ ह्या अलंकारशास्त्रावरील ग्रंथामध्ये उदाहरण म्हणून वापरला आहे. ’काव्यप्रकाश’ हा ग्रंथ शान्ताबाई स.प. महाविद्यालयात बी.ए.च्या वर्गात असतांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये होता.

तो श्लोक असा आहे:

य: कौमारहर: स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपा-
स्ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:।
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ
रेवारोधसि वेतसीतरुतले चेत: समुत्कण्ठते॥

अर्थ - (नायिका सखीला सांगत आहे) माझे कौमार्यहरण करणारा प्रियकर तोच आहे, आता तशीच चैत्राची रात्र आहे, फुललेल्या मालतीपुष्पांनी सुवासित झालेले कदंबवृक्षावरून येणारे वारे तसेच आहेत आणि मीहि तीच आहे. तरीहि ह्या रेवाकाठी वेताच्या तळापाशी सुरतक्रीडेच्या कल्पनेने माझे चित्त उत्कण्ठित होत आहे.

हा श्लोक मम्मटाच्या काव्यप्रकाशात उद्धृत केला गेला आहेच, तसाच तो विश्वनाथाच्या साहित्यदर्पणामध्ये मम्मटाशी आपला मतभेद स्पष्ट करण्यासाठी विश्वनाथानेहि दाखविलेला आहे.

मात्र तो ह्या दोघांपैकी कोणाचाच नाही. शीलाभट्टारिका नावाची कोणी एक तशी अज्ञात कवयित्री ७व्या-८व्या शतकामध्ये होऊन गेली. शार्ङ्गधरपद्धति नावाच्या एका जुन्या सुभाषितसंग्रहामध्ये - Anthology - तो तिच्या नावाने दाखविला गेला आहे आणि म्हणून श्लोकाची आणि तिची स्मृति टिकून राहून मम्मटापर्यंत पोहोचली आणि तेथून ती शांताबाईंना मिळाली.

शांताबाईंनी आपल्या गीताची कल्पना जरी ह्या श्लोकातून घेतली आहे तरी गीताचा अर्थ मूळ श्लोकाच्या अर्थाच्या विरोधामध्ये आहे. श्लोकामधील नायिका ’चेत: समुत्कण्ठते’ असे सांगत आहे तर गीतातील नायक ’गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी’ असे खेदाने म्हणत आहे हे लक्षणीय आहे.

७व्या-८व्या शतकातील आता स्मृतिशेष आणि जवळजवळ आणि अज्ञात शीलाभट्टारिका ह्या श्लोकाच्या रूपाने अद्यापि आपल्या आसपास आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

या कवितेचा इतिहास रोचक आहे.

मूळची कविता स्त्रीच्या तोंडून होती, आणि ही कविता पुरुषाच्या तोंडी आहे. त्यावरून मला असं वाटलं की कदाचित शांता शेळकेंनी त्याच जोडप्यातल्या पुरुषाच्या मनातले विचार मांडले असतील. जुगलबंदीप्रमाणे एकाने काही वाजवायचं आणि दुसऱ्याने त्याच सुरावटीत आपलं वेगळेपण दाखवणारं काही वाजवायचं अशा थाटाचा हा प्रकार दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता माझ्या आवडीची होतीच, नवी माहितीदेखील रोचक आहे. साहित्यलेखनामध्ये iceberg theory नावाची एक संकल्पना आहे; लिखाणातला सात अष्टमांश अर्थ वाचकाने शोधून काढायचा असतो असा तिचा सारांश सांगता येईल. ही कविता तिचं उदाहरण म्हणून चपलख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

लेख आवडला.
ती न आर्द्रता उरात,

'ती न आर्तता उरात' असे आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ती न आर्तता उरात' असे आहे का ?

हो Smile

ह्या गाण्यातले अनेक शब्द ऐकुन नीट कळत नाहीत हा माझा पण अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पूर्वी ते "दीन आर्तता सुरांत" आहे असे वाटे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरे वा! रोचक इतिहास. लेख पाहूनच वाटलेले की काहीतरी या गीताच्या इतिहासाशी संबंधित असावे. ती अपेक्षा पुरी झाली. अनेक धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही काव्ये तोडीस तोड आहेत. हा लेख फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ऐसीवर आलो आणि नवीन काही मिळाले नाही असे कधीच होत नाही. कोल्हटकर सर तुमचे धन्यवाद या लेखासाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

मी नुकतेच धूळपाटी हे शांता शेळक्यांचे पुस्तक घेतले आहे.

मूळची कविता स्त्रीच्या तोंडून होती, आणि ही कविता पुरुषाच्या तोंडी आहे. त्यावरून मला असं वाटलं की कदाचित शांता शेळकेंनी त्याच जोडप्यातल्या पुरुषाच्या मनातले विचार मांडले असतील. जुगलबंदीप्रमाणे एकाने काही वाजवायचं आणि दुसऱ्याने त्याच सुरावटीत आपलं वेगळेपण दाखवणारं काही वाजवायचं अशा थाटाचा हा प्रकार दिसतो.

हे बरोबर आहे. शांताबाईंनी असंच केलंय. शिवाय त्यांनी ही कविता वरील श्लोकाचे रुपांतर आहे आणि ते कसे स्फुरले यावर स्पष्ट लिहिले आहे. तो परिच्छेद लवकरच देईन. तोवर कृपया बूच मारू नये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

नभातल्या चंद्राला बूच ही कल्पनाच भारी वाटली.PSLV व्हाय श्रीहरिकोटा.
एकूण सातवे आठवे शतक ते आतापर्यंत श्रृंगारात काही फरक पडला असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहिती आहे, अनुमोदन. बाय द वे, उपरोल्लेखित अ‍ॅन्थॉलॉजीमध्ये किती कवयत्री आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile