मी नाही त्यांतला...

कथा

मी नाही त्यांतला...

- मासा

---------१---------

ती - वा! किती नीट दाबताय! असंच चालू ठेवा. चांगलं मर्दन करा.
तो - हो ना, मऊशार, मस्त आहे. दाबतोय जोर लावून.
ती - हां, छान चाललं आहे. सावकाश होऊ द्यात.
तो - कसा तजेला आला बघ. म्हणून म्हणतो, हे पुरुषाचंच काम. जेणो काम तेणो …
ती - म्हणूनच मी प्रेम करते तुमच्यावरती. अगदी छान कळतं तुम्हांला - कुठे, किती दाब देऊन तिंबायचं ते.

(नवरा कणीक तिंबून बायकोच्या हवाली करतो.)

--------२--------

ती - मी वर आणि तू खाली चालेल का?
ही - वरखाली कोणी का असेना, मला काही फरक पडत नाही.
ती - बघ हं, नाहीतर मी पुरुषांसारखी डॉमिनेटिंग आहे असं म्हणशील!
ही - तुझ्याशी कितीही भांडले, तरी तुला एवढ्या वाईट शिव्या देईन का मी, राणी?
ती - नाही गं! खरंय तुझं. मी आपला खुंटा हलवून बळकट केला.
ही - खुंटा? शिडी वापर, शिडी!

(दोघीही खिदळत बंक बेडकडे वळतात.)

---------३--------

तो - अगं ए! सोड ना.
ती - उम्म्म! आता नाही सोडायची मी.
तो - सोड गं राणी, काढू देत मला.
ती - काय गडे! मग घातलात कशाला? परत परत काढायला? एक तर घालून आम्हांला टीज्‌ करायचं आणि मग लगेच ‘काढतो-काढतो’. आमी नै ज्जा!
तो - (धापत धापत) दर वेळेस घातला की तुला जाम सोडवत नाही.
ती - असू दे ना राजा, गेल्या वेळेपेक्षा या वेळेला छानच बसलाय. जरा एन्जॉय करू देत की.
तो - थांब, तू नाही ऐकणार! मीच कसाबसा ओढून काढतो.
ती - अहो, किती ताणताय? नाही निघायचा असा. इश्श्य! अडकलाय तो. काय हा धसमुसळेपणा!

(झटापटीनंतर दोघे मिळून त्याचा टाय एकदाचा सोडवतात.)

---------४-------

तो - या वेळेस मागून हवाय की नेहमीसारखा पुढून?
ती - गेल्या वेळेला घातलंत की पुढून. जरा रुचिपालट म्हणून मागून द्या बाई.
तो - काय! तू म्हणतेयस हे? गेल्या सतरा वेळेस मी म्हणालो, मागून घे; तर म्हणालीस, नको, पुढूनच द्या.
ती - अहो, पण आता म्हणतेय ना मागून द्या? मेसी तर मेलं पुढून काय अन्‌ मागून काय, होणार ते होणारच. असं रागवायचं नाही गडे. गोडीत करायचं.
तो - (जोर लावत) हां, देतोय. घे… घे. हां, पकड. घट्ट दाबून पकड. घे ओढून. जरा पुढे-मागे ऍडजस्ट करून घे.

(दोघेही वायरीचे भेंडोळे काँम्प्युटरच्या मागून ओढून घेऊन कनेक्शन जुळवू लागतात.)

-------५--------

हा - किती ते पिळत चोखायचं! कधी न मिळाल्यासारखं करू नकोस.
तो - किती दिवसांनी मिळालाय! जरा मजा घेऊ दे की.
हा - अधाशी कुठचा! कसं दिसतं ते, काही विचार?
तो - घरातल्या घरात कसली आलीये लाज?
हा - पुरे तुझा अधाशीपणा! मला पटापट आवरायचं आहे.
तो - अरे!अरे! असा हातातून सोडवून काय घेतोस? अजून थोडा वेळ तरी चोखू देत.

(हा त्याच्या हातातून आंब्याची बाठ हिसकावून घेत, आवराआवरीला लागतो.)

-------६--------

तो - या वेळेस तू वर ये, मी खाली राहतो.
ती - माझं वजन पेलवेल का पण?
तो - अगं, ये तर खरी! पण जरा जपून हं. दुखापत नको - मलाही आणि तुलाही.
ती - हां, वरच छान वाटतं हो. माझं आता नियंत्रण राहील.
तो - मग? कितीदा म्हटलं, तू वर ये. आख्खं जग करतं. आपण का नाही करू शकणार? आता कसं छान हलवता येतंय तुला.
ती - इश्शं! आधीच करायला हवं होतं मेलं.

(थोड्या वेळाने)

तो - बरं, आता राहवत नाही मला. सोडू का?
ती - तुमची मेली घाईच नेहमी! थांबा. आधी मी येते, मग नंतर तुम्ही सोडा. उगा गेल्या वेळेसारखा बट्ट्याबोळ नको.

(शिडीवर चढून बायको सामान हलवते, काढते, ठेवते. नवरा खालून शिडी घट्ट धरून उभा राहतो. बायको आधी उतरते, मग नवरा शिडी सोडतो.)

---------७--------

तो - झालं का समाधान?
हा - तुझं झालंय का? किती ती काढघाल! पण माझी काही तक्रार नाही. तुझ्यासाठी कष्ट करणार नाही तर कोणासाठी!
तो - पुरेशी काढघाल झाली आहे, आता इकडून तिकडे घालतो. बघ हां.
हा - हं. घाल ना लवकर. मलाही घाई होते आहे. राहवत नाही आता.

(तो इकडची यूएसबी ड्राईव्ह काढून तिकडे घालतो. हा त्याच्या भाच्याच्या बारश्याचे फोटो उत्सुकतेने पाहू लागतो.)

--------८-------

ती - स्स्स्स्स्स्स... हळू ना!
तो - असं काय करता बाई? पहिल्या वेळेस त्रास हा होणारच.
ती - अहो, पण किती कडक आहे! तिथे दुखून आलं मला.
तो- थोडं व्हॅसलिन लावू का? मग सुरी लोण्यात जाते तस्सा जाईल आत.
ती - हां, लावा लावा.
तो - बरं वाटतंय का आता?
ती - जरा चोळा ना. जरा खाली - नाही, तिथे नाही - जरासं वर. हं, उंचवट्यावरच नीट चोळा. आता कसं, बरं वाटतंय…
तो - बाई, कधी घातला नाहीत का?
ती - इतका कडक नाही ना घातला!
ती - हाय हुई ...स्स्स .. मेले गं बाई! गेला... गेला आत. आह्ह्ह!
तो - (धापा टाकत) गेला... गेला. फिट्ट बसलाय. आता कसं वाटतंय?
ती - बरं वाटतय आता. काढू नका इतक्यात.
तो - (धापा टाकत) नाही, तुमचं मन भरेस्तोवर राहू द्यात. काही घाई नाही. थोडा मागे-पुढे करतो, म्हणजे तुम्हांलाही जास्त चांगलं वाटेल.

(शेवटी स्त्रीला सँडल पसंत पडतो आणि तीेही खूष, दुकानदारही खूश.)

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

असला मासा बघितला तर तलावात पोहायलाही भीति वाटेल स्त्रियांना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वायरींचं भेंडोळं, सँडल आणि आंबा हे घुटके अधिक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...निदान तुमचे तरी ष्ट्याण्डर्ड (याहून) जरा बरे असेल, असे (का कोण जाणे. बहुधा उगाचच.) वाटले होते. पण असो.

अहो कसले भयंकर भिकार, ओढूनताणून केलेले विनोद आहेत हो हे! बोले तो, शाळकरी वयात,
पौगंडावस्थेच्या आदिपर्वात असलेल्या कोणाला हे 'विनोद' कदाचित गमतीदार वाटू शकतीलही. परंतु ते 'प्रौढांकरिता' खचितच नाहीत. ('केवळ' तर सोडाच!)

तो आंब्याचा 'विनोद' अतिप्रेडिक्टेबल आहे. वायरींचे भेंडोळेवाला ओढूनताणून आहे. आणि सँडलवाला तर इतका फारफेच्ड आहे, की... वेल, एखाद्या चांगल्या कथेचा आस्वाद घेण्याकरिता सस्पेंशन ऑफ डिस्बिलिफ आवश्यक असू शकतो खरा, परंतु इथे त्याला इतका टांगणीवर लावावा लागतो, की टांगणीचा दोर अतिताणाने तुटतो.

(आजवर मी कोणताही पुरुष वा स्त्री वा इतर मनुष्य पादत्राणांच्या दुकानात नवेकोरे सँडल विकत घेण्यापूर्वी ट्राय करताना पायांस वंगण लावून त्यात घालताना पाहिलेला/ली/ले नाही. डझण्ट मेक सेन्स. त्याबरोबरचा संवाद तर केवळ काहीही.)

असो. नो अकौण्टिंग फॉर टेष्ट, आय सपोज़.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

बाकी अंकाचा दर्जा आणि हे ठिगळ यांचा विचार करता काही सँडल्स बळजबरी घुसवायला बरीच वंगणं वापरायला लागत असावीत हे पटणारं आहे.

ऐसीच्या अंकात असं काहितरी यावं हे म्हणजे... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सँडल, शिडी, वायरचे भेंडोळे - हाण्ण तेजायला!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे शुचे. तुझ्या मुळे ह्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाला रंग मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे शुचे.

शुचे??????

बोले तो, हा प्रतिसाद नार्सिसिझमचा आणि/किंवा सेल्फ-प्रमोशनचा प्रकार समजावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. मराठीतली सगळी क्रियापदं द्व्यर्थी असतात असं कुठेसं वाचनात आलेलं होतं. इतक्या कृतीसुद्धा द्व्यर्थी असतात याची कल्पना नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.

हो ना! तुम्हाला आवडण्यासारखेच आहेत हे विनोद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, असं म्हणून तुम्ही विनोदांची लायकी काढलीत की माझी हे समजलं नाही. पण कोणाचीतरी काढलीये खरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो ठ्ठो=)) ROFL :D>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

(प्रतिसादाचे शीर्षक द्व्यर्थी नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै आवडले. न बांशी सहमत आहे.
सहजता नाहीये यात. ठरवून ओढून ताणून काहितरी लिहिलंय

आणि सुरुवातीला थोडी वेगळेपणाने मजा येतेही पण खूप लांबलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही मालिका वाचल्या वाचल्या माझ्या डोळ्यांसमोर ती सुप्रसिद्ध खिडकीचित्रं तरळली होती. शाब्दिक खिडकी-चित्रं असंच तिचं स्वरूप आहे. तितकीच त्यातली गंमत. या मालिकेला तशी चित्रजोड मिळायला हवी होती...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन