तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?

Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच. अनिल बिस्वास, सज्जाद, खेमचंद, वगैरेंपासून (किंवा त्याहीआधी पंकज मलिक असावेत) आज रहमान, शंकर महादेवन वगैरेंपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे. अधे मधे शिवकुमार शर्मा वगैरेंनी सुद्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रयोग केले होते.
.
पण मूळ विषय नावडत्या गाण्यांचा आहे. आजतागायत हिंदी व मराठी चित्रपटांनी व गायकांनी व संगीतकारांनी आपल्याला अक्षरशः लक्षावधी गाणी दिलेली आहेत. सगळ्यांना सगळीच ऐकायला मिळतातच असे नाही. वेळ नसतो, तेवढी आवड नसते, शोधायचा प्रयत्न करूनही सापडत नाहीत वगैरे कारणांमुळे. पण काही गाणी अशी असतात की जी अजिबात म्हंजे अजिबात आवडत नाहीत. म्हंजे गाणं लागलं रे लागलं की टेप, रेडिओ, ट्रांझिस्टर, युट्युब बंद करायची इच्छा अनावर होते. काही गाणी अगदीच डोक्यात जातात. गायकाला/गायिकेला शिव्या द्याव्याश्या वाटतात. अर्थातच अनेकदा यामागे संगीतकाराची चूक असू शकते पण तरीही गायक्/गायिकेस दोष दिला जाऊ शकतो. माझ्या मातोश्रींना हिंदी व मराठी गाण्यांची अतिशय आवड होती. तसेच सुगम संगीत, नाट्यगीते वगैरे. पण काही गाणी अजिबात आवडायची नाहीत. उदा. "जिवलगा राहिले रे दूर घर माझे". हे गाणं लागलं की मातोश्री तावातावाने उठायच्या आणि रेडिओ बंद करून टाकायच्या. आमचे एक मामाश्री सुद्धा संगीताचे शौकीन. पण ते "गाडीवान दादा" हे गाणं लागलं की - "अरे, कोण आहे रे तिकडे, ते आधी बंद कर" असं फर्मान सोडायचे. व हे मामाश्री ज्येष्ठतम असल्यामुळे त्या फर्मानावर ताबडतोब "अमल" केला जायचा. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी देवासकर आठवा. त्यांचे ही असेच. "वाश्या, ती रेडिओ वरची ठुमरी बेसूर होऊन राहिलिये. रेडिओ बंद कर आधी" असं फर्मान सोडलं आणि वाश्याने त्याबरहुकूम.....
.
अनेकदा एखादं गाणं का आवडत नाही याचं खरंतर काही विशिष्ट कारण नसतं. तुम्हाला ते निव्वळ भिक्कार वाटतं. एखाद्याला एखादा गायक/गायिका आवडत असेल पण त्याची काही गाणी आवडत नाहीत. माझ्या एका रूम पार्टनर ला मदनमोहन आवडायचे पण त्यांची लैला मजनू चित्रपटातली गाणी अजिबात आवडली नव्हती. एखाद्याला एखादा संगीतकार/गायिका/गायक फार आवडत नसतो पण त्याचं एखादं गाणंच आवडतं. एखाद्याचं उलटं असतं. संगीतकाराचं/गायकाचं एक गाणं सोडून बाकी सगळी आवडतात. मला तलत चं "अश्कोंने जो पाया है" अजिबात आवडत नाही. पण बाकीचा तलत अतिप्रिय. माझ्या ओळखीच्या दोन मुलींना लता मंगेशकर फारशी आवडत नाही. पण त्यातल्या एकीला "ओ सजना बरखा बहार आयी" फार आवडतं. काहींना एखादा संगीतकार अजिबात आवडत नाही. माझ्या एका मित्राला आरडी बर्मन अजिबात आवडायचा नाही. पण त्याला जगजित, रफी, किशोर आवडायचे. त्याला आरडी चं पहिलं गाणं "घर आजा घिर आयी बदरा सावरिया" आधी ऐकवलं. म्हंटलं आवडलं का ? म्हणाला हो आवडलं. नंतर सांगितलं - संगीतकार आरडी. म्हंटला वा.
.
पूर्वी बिनाका, आपकी पसंद, हमेशा जवां गीत, चित्रहार, छायागीत, रंगोली, पुराने फिल्मोंका संगीत (सिलोन), जयमाला, आपली आवड, भूले बिसरे गीत, बेला के फूल असे डझनभर कार्यक्रम व्हायचे. आकाशवाणी, विविधभारती(हा आकाशवाणीचा च भाग होता), सिलोन, व दूरदर्शन हे मुख्य कंटेंट सर्व्हर्स होते. बाकीचे असतीलही. या सगळ्या कार्यक्रमांत काही गाणी अगदी "दत्तक" घेतल्यासारखी लावली जायची. "जो वादा किया वो निभाना पडेगा", "दूर रहकर न करो बात करीब आ जाओ", "दिल का खिलौना हाए टूट गया", "गाता रहे मेरा दिल", "रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना", "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही", "जरा सामने तो आओ छलिये", "मन डोले मेरा तन डोले", "होटो मे ऐसी बात मै दबा के चली आयी", "मिलो न तुम तो हम घबराए" ही व अशी अनेक गाणी अक्षरश: वीट येईपर्यंत ऐकलेली आहेत. गाणी गोड आहेत ओ ... पण कितीवेळा ऐकायची ती ? दर आठवड्यातून एकदा ? मग त्यातली मजा निघून जाणार नैका ?
.
.
तर माझी नावडती गाणी -

१) तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - गाणं गोड आहे. सुधा मल्होत्रांनी मस्त गायलंय. मुकेशने सुद्धा. पण माझा राग साहिर वर आहे. ती प्रेम व्यक्त करत्ये ... आणि हा तिला लेक्चर झाडतोय. काय डोक्याला त्रास आहे यार.

२) प्रीतीचं झुळझूळ पाणी - अगदी भिकार, तिडीक यावी असं गाणं

३) नही नही कोई तुमसा हसीन (स्वर्ग नरक) - हे निपोंचं एकदम आवडतं. पण मला अजिबात आवडत नाही. अर्थात तसं मी निपोंना कधीही सांगितलं नाही हा भाग वेगळा.

४) गाता रहे मेरा दिल - वीट आला त्याचा

५) जरा सामने तो आओ छलिये - का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही.

६) दिल का खिलौना हाए टूट गया - वीट आला

७) बिंदिया चमकेगी - भंकस गाणं आहे

८) ढल गया दिन ढल गई शाम ... जाने दो जाना है - अगदी भिकार गाणं.

९) मिलो न तुम तो हम घबराए

--

तुमची सर्वात नावडती गाणी कोणती ? - हिंदी वा मराठी

--
.
.
.
.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे काय आहे ते वर्णन करायला शब्द नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

१. रफीने मराठीत गायलेली बरीचशी गाणी -
बालपणी फारसे पर्याय नसताना वारंवार ऐकल्याने, हुकमी बेगडी लडिवाळपणा (शोधिशी मानवाऽऽऽऽ) जाणवल्यामुळे, बहुतेक गाणी एकाच संगीतकाराकडे गायल्याने आलेल्या त्याचत्याचपणामुळे. एरवी ती तितकीशी वाईट नसावीत.

२. लताबाई - अमिताभ - जयाप्रदा यांचं 'नाचेगी सरस्वती, गायेगी सरस्वती, झूमेगी सरस्वती तेरे लिए':

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नाचेगी सरस्वती, गायेगी सरस्वती, झूमेगी सरस्वती तेरे लिए':

हे गाणं चक्क ट्रक मधे आहे ही करामत फक्त बोकांडिया किंवा ममोदे च करू शकतो.

तसं बघायला गेलं तर गंगा जमना सरस्वती हा एकदम नमुनेदार पिक्चर आहे. काय तेजायला भंकस पणा होता सगळा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते खांद्यावर मगर घेतलेला बच्चन काय?
आइशप्पथ. लैच भारी प्रकरण होते ते. बर्फातून वाहत चाललेली मीनाक्षी शेषाद्री. टकलू अम्रीश पुरीला तोंडात पकडणारी पेंढ्याची मगर. साजन मेरा उसपार है सारखी गाणी. अहाहाहा. नियमानुसार सरस्वती गुप्त होते बहुतेक. कोणतरी एक जण मरते वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगागागागा ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्व प्रतिसाद वाचून काढता काढता ऐसीकरांनी आमची फारच निराशा केली ...

एवढ्या सगळ्या गाण्यांमधे आमच्या महागुरूंच्या आणि ड्यामिट कोठारेंच्या एकाही गाण्याचा समावेश नाही ..??

ह्या सगळ्या गाण्यांशिवाय ही यादी पूर्ण होउच शकत नाही ... म्हणून आमच्याकडून यादीत छोटीशी भर -

महागुरू ...

१. अलबेलाSSSS आSSSSला .. आला जयराम आला
२. आयत्या घरात घरोबा
३. निशाणा SSSS तुला दिसला ना

ड्यामिट कोठारे
१. अगं अगं पोरी फसलीस गं
२. ही दोस्ती तुटायची नाय
३. चिकी चिकी बूबुम्बूम
४. प्रियतम्मा .. प्रियतम्मा ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

२. ही दोस्ती तुटायची नाय - ---- केविलवाणं गाणं वाटतं.
३. चिकी चिकी बूबुम्बूम ---- अगदीच भिकार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>४. प्रियतम्मा .. प्रियतम्मा ..

हे एकवेळ किशोर कुमारच्या आवाजात चांगलं वाटलं असतं (सुदैवाने अशी गाणी त्याच्या वाटेला यायच्या आधीच गेला बिचारा). पण सुरेश वाडकर????? :-O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियतम्मा .. प्रियतम्मा ..

फक्त हीच ओळ तरी "मेहबूबा मेहबूबा" च्या चालीत म्हणता येते. बाकीच्या ओळी माहिती नैत, नैतर प्रयोग केला असता. लिरिक्स द्येता का जरा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या, बाकी काही नाही तरी त्या गाण्यातल्या ह्या ओळी रोचक आहेत

प्रेम दिवाणा नंदी ग मी
तू माझी हम्मा

प्रियतम्मा प्रियतम्मा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेम दिवाणा नंदी ग मी
तू माझी हम्मा

<चांद सितारों से निकला>
<दिलरूऽऽऽबाऽ>

या चालीत बसतंय की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रेम दिवाणा नंदी ग मी
तू माझी हम्मा

नंदी हा बैल होता, की वळू (सांड)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांड च असेल, फक्त त्याचा चेहरा अशोक सराफ सारखा होता असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महागुरू ...
३. निशाणा SSSS तुला दिसला ना

ड्यामिट कोठारे -
४. प्रियतम्मा .. प्रियतम्मा ..

....... अशोकमामांवर महा-कुठार का हो? इतके वक्री नका पाहू त्यांच्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यात ज्या कोणी 'शांताबाय' हे गाणं आवडत नाही असं लिहिलेलं आहे त्या सगळ्यांवर चार दिवस ऐसीबंदी करावी. 'शांताबाय' हे जे काही प्रकरण आहे त्याला गाणं समजण्याबद्दल एवढी शिक्षा कमीच आहे, पण पहिला गुन्हा म्हणून जरा कमी सजा पुरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या लहानपणी रेडिओवर सतत वाजणारी,

त्याचे हातीच्चा वेणु कुणी घ्या गं
आणि,
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची
ही गाणी तेंव्हाही आवडत नव्हती आणि आताही आवडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मावळत्या दिनकरा
या चिमण्यांनो परत फिरा रे
शुक्र तारा मंद वारा
तेरी शर्ट का मैं बटन सोनिये
क्या हुवा तेरा वाडा
कशी नशीबान थट्टा आज मांडली
ये शाम मस्तानी
आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मावळत्या दिनकरा
या चिमण्यांनो परत फिरा रे
शुक्र तारा मंद वारा
तेरी शर्ट का मैं बटन सोनिये
क्या हुवा तेरा वाडा
कशी नशीबान थट्टा आज मांडली
ये शाम मस्तानी
आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे
म्हारे हिव्डा? में नाचे मोर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हारे हिव्डा? में नाचे मोर

काय भंगार गाणं आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इरीटेट व्हायचे खरे कारण म्हणजे कोणीतरी सतत फोन करुन केबल वर ऑन डिमांड हे गाणं वाजवत असे...! दर दोन तासाला एकदा लागायचेच. सुरुवातीला इट इज सो बॅड दॅट इट इज गुड या न्यायाने फर छान वाटायचे पण नंतर नंतर डोक्यात जाउ लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

किमी काटकर मात्र झकास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

दूरदर्शन वर एक सीरिअल यायची "मिट्टी के रंग". तिचे शीषर्क गीत महा-डीप्रेस्सिंग होतं.

दुनिया बदल गयी, इन्सान बदल गये, बदले नही मिट्टी के रंग ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यशवंत मधील नानापाटेकरने गायलेलं (? कि म्हटलेलं) अतिशय डोक्यात गेलेले गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हे गाणं आहे की निव्वळ ड्वायलॉक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण नंतर मला असं समजावण्यात आलं की ते प्रत्यक्षात गाणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ओह अच्छा ओक्के.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही, गाणं बरं आहे; पण गेल्या दशकापर्यंत तरी हमखास मराठी मध्यमवर्गीय लग्नांच्या हॉलांत अखंड वाजून उपस्थितांना काव आणत असे. (गेले ते दिवस! आता 'संगीत' आणि कुडी-मुंडा-सोणी-तेणु-मेन्यू असतो Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवनात ही घडी अशीच राहू दे हे लग्नाच्या दिवशी म्हणजे कैतरीच.

"तो लग्नाचा क्षण तसाच राहू दे" म्हणजे जीवनात कायम होमाच्या समोर बसून डोळ्यात धूर घालून घ्यायचा की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटतं, पिक्चरमध्ये हे गाणे परटाने आणलेले कपडे हातात घेतल्यावर आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिक्चरमध्ये बरोबर. पण लग्नात लावत असतील तर ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण लग्नात लावत असतील तर ......

विपरीट Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> "तो लग्नाचा क्षण तसाच राहू दे" म्हणजे जीवनात कायम होमाच्या समोर बसून डोळ्यात धूर घालून घ्यायचा की काय?
सैराटपूर्व काळातली 'जाळ आन् धुर संगटच'ची सोय असेल Smile

अवांतर - 'Smoke Gets in Your Eyes' हे प्रसिद्ध गाणे आठवले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गुनगुना रहे है भँवरे खिल रही है कलीकली
कलीकली, इल्लिगली (हे आमचे शेपूट)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आये, तो बाप बन जाये'
'ढिस्को दिवाने'
एकूणच नाझिया हसनची गाणी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुम्ही उचकवलंच आहे म्हणून...

गाण्यांबाबतच असं नाही, पण जनरलच घिसेपिटे विनोद/कोट्या करणारे लोक संताप आणतात. भाऊ, नाही जमत विनोद तर र्‍हावंदे ना. आम्हाला पण नाकाच्या शेंड्याला जीभ लावता येत नाही. सगळ्यांना सगळं यायला पाहिजे असं थोडंच आहे? पण लोक उसन्या कोट्या आणून डोकं पिकवतात.

'आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आये, तो बा बन जाये'

यासारखंच:

< घिपिवि मोड >

"रातकली एक ख्वाब में आयी और गले कहार हुई..."
कहार बरंका.. क हा र झाला अगदी गळ्याला... हॅ हॅ हॅ
(टाळीसाठी हात पुढे*)

< / घिपिवि मोड >

किंवा

< घिपिवि मोड >

"आती नहीं, आती नहीं, सामने है पर नजर"
म्हण्जे बर्का, असा संडासात बसलाय माणूस, अन् हे गाणं म्हणतोय... हॅ हॅ हॅ
(टाळीसाठी हात पुढे*)

< / घिपिवि मोड >

_________
अवांतर: याबाबतीत व्हॉट्सअ‍ॅपचे आम्ही शतशः ऋणी आहोत. व्हॉट्सअ‍ॅपमुळे जोक "सांगणं" आता जवळजवळ बंद झालं आहे. त्यामुळे ओढूनताणून हसावंही लागत नाही.

*या प्रजातीबद्दल परत कधीतरी. (स्मरणनोंदः या लोकांना "एक्स्ट्रा जॉली आईसक्रीम" असं नाव एका मित्राने ठेवलं आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबांच्या नावाने एक फाईल सुरू केलेली आहे. आबा का कावत्यात, कसे कावत्यात याची प्रतिसाद, खरडफळ्यावरची नोंद तिथे नोंदवून ठेवली जात आहे. या सगळ्यावर आबंना लिहायला लावलं पाहिजे.

अवांतर: याबाबतीत व्हॉट्सअ‍ॅपचे आम्ही शतशः ऋणी आहोत. व्हॉट्सअ‍ॅपमुळे जोक "सांगणं" आता जवळजवळ बंद झालं आहे. त्यामुळे ओढूनताणून हसावंही लागत नाही.

अगदी सहमत.
ज्या लोकांशी बोलायचा कंटाळा येतो पण संपर्क मुद्दाम तोडवत नाही त्या सगळ्यांना इंटरनेटवर आणावं. "मला बोलायला वेळ मिळत नाही, पण इमेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप कुठेतरी या. मग आपल्या गप्पा होत राहतील."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पन म्या कुटं तुमास्नी उचकिवलं?
म्या काय आसं म्हनालो का की आदूबाळ, हे वाचा आनि आता हासा पघू?
च्यायला, आबा सुक्काळिचं कारन नसताना उगाचच कावत्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आये, तो बाप बन जाये'

माझ्या लहानपणी तर हे असे होते

आप जैसा कोई मेरे बेडरुम मे अहे, तो बाप बन जाये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां जिंदगी फार जनरल होतय हे "बेडरुम" वगैरे डिटेल्ड स्पेसिफिक जास्त समर्पक आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. नीले नीले अंबर पर - डोक्यात जात
२. चुम्मा चुम्मा दे दे अतिशय भिकारचोट गाणं आहे.. कोणी कधी म्हणत असेल तर थोबाड नक्की फोडीन
३. जीता था जिसके लिये -- रडका अजय देवगण वीट आणतो
४. राणी में तू राजा (सन ऑफ सरदार ) - याला काही कारण नाहीए... उगाच नाही आवडत.. काय आता
५. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या (शाळेत सगळ्यांना हेच का म्हणायचं असायचं??)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...ही एका तमिळ गाण्याची कॉपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला 'एक लडकी को देखा ...' रद्दड वाटते. दवणीय उपमांची जंत्री नुसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुदाई पिच्चरातलं गाणं - "मुझे प्यार हुआ, प्यार हुआ, अल्लामियां"
ह्या गाण्याचे शब्द माझा चुलत भाउ, जो तेंव्हा तिसरीत होता, थोडे बदलायचा -
"मुझे प्यार हुआ, प्यार हुआ, अल्ला ने दिया"
मला वाटायचं तो चुकिचं गातोय, पण आता वाटतंय त्याची आंतरधर्मीय गर्लफ्रेंड होती का काय आणि तो तिच्याबद्दल सांगत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडं विषयांतर आहे, पण नाट्यसंगीताइतकंच चित्रपटसंगीतही उपरंच आहे. गाणं असेल चमकदार, उठावदार. पण त्यामुळे कथनाला ठिगळच लागतं. बेतीवपणा हा चित्रपटाचा अविभाज्य भाग असला तरी चित्रपटांत गाणं हा एकूणच अत्यंत कृत्रिम प्रकार आहे. संगीतातील महान कर्तृत्ववान फौज वापरण्याचा मोह हा चित्रपटाला कुठे ना कुठे उणीव आणण्यास कारणीभूत होतो असं वाटतं. कितीही उत्तम संगीत असलं तरी दोन कडव्यांमधलं अवघडलेपण पडद्यावर केविलवाणं, अतिकृत्रिम असतं. म्हणून गाणं कितीही सुमधुर असलं तरी ते चित्रपटात आलं की नकोसंच होतं.
गाण्यांच्या प्रसंगांतला, चित्रीकरणांतला कृत्रिमपणा आणि बिनडोकपणा याबद्दल लिहावं तेवढं थोडंच. दोन तीन उदाहरणं देते -
गाइडमध्ये एक रोझी नर्तकी म्हणून तयार करायला एवढा आटापिटा करायला लागतो, तर गाण्यामध्ये एक्स्ट्राजचा ताफा कुठून, कसा विनासायास येतो ?
जगाच्या पाठीवरची सुरुवात ''काहो धरिला मजवरी राग'' या गाण्याने होते, ते चाळीत. चाळकरी असल्या गाण्याचा घाट त्यांच्या चाळीत घालतील ? पुढे त्या गाणारणीला काहीच काम नाही या अर्थाने ते एक प्रकारचं -- पुढे गाणं घुसवण्याला निर्ढावलेपणाने म्हणायला लागले तसं -- आयटम सॉंग गाणं नाही का ?
मुंबईचा फौजदार मधलं "मराठमोळं गाणं, शंभर नंबरी सोनं" या गाण्यात वाद्यांचा नुसता उल्लेख आणि वाद्यमेळाची रेलचेल आहे ते फक्त प्रेक्षकांसाठी, तिथल्या, प्रसंगातल्या प्रेक्षकांनी ते गुणगान कसं मानावं ?
एकूण डोकं बाजूला ठेवून चित्रपट पाहायचा हे त्यातल्या गाण्यांनाही बरेचदा लागू होतं. मग सुमार शब्द, चाल आणि गायकी असेल तर बघायलाच नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला तर ठिगळ नाही म्हणू शकत. हे तर कोरीवकाम.

शाळेत असताना आम्ही असं ऐकायचो की, ‛गाणं हीच खरी आपली (देशी) ताकद!’ ... वगैरे. आता तीच ताकद किती देशी‛वादी’ आहे ते लक्षात येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांदी जैसा रंग है तेरा....
हमखास वैताग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. काठीने घोंगडं घेउद्या की रे (काठीने कसं घेणार हा एक बारकासा प्रश्न आहेच) - अत्यंत अत्यंत भिकार गाणं
२. एक गरम चाय की प्याली हो (आणि त्यात घशात बेडूक अस्ल्या सारखा अन्नू मलिकचा आवाज... य्य्य्याक्क्क्क्क)
३. शिटी वाजली गाडी सुटली (तद्दन फाल्तू)
४. अल्ला दुहाई है मुश्कील जुदाई है (यात जु च्या जागी चु टाकून कॉलेजमध्ये बेक्कार फाल्तूपणा केला होता, मग सगळी जुदाईवाली गाणी शोधून अशक्य मूर्खपणा करत बसणे हा त्याच्या नंतरचा टाईम्पास)
५. गोरेगाव स्टेशन समोर सुरभी आहे, त्याच्याकडे सुरेश वाडकरचं ओम गण गणपतये नमो नम: चा अखंड जप लावलेला असायचा, त्या टेपने डोकं फिरायचं
६. प्रशांत दामलेचं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ........ भ या न क!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

४. अल्ला दुहाई है मुश्कील जुदाई है (यात जु च्या जागी चु टाकून कॉलेजमध्ये बेक्कार फाल्तूपणा केला होता, मग सगळी जुदाईवाली गाणी शोधून अशक्य मूर्खपणा करत बसणे हा त्याच्या नंतरचा टाईम्पास)

हे कोणते गाणे सांगता आहात, याबद्दल कल्पना नाही. परंतु...

आमच्या वेळेस, ते 'चार दिनों दा प्यार, ओ रब्बा, बड़ी लंबी जुदाई' हे ('हीरो' पिच्चरमधलेच ना? चूभूद्याघ्या.) गाणे या फालतूपणाचे टार्गेट असे. आम्ही कॉलेजात असताना तो पिच्चर नुकताच रिलीज़ झाला होता. एक तर तो आख्खा पिच्चर तद्दन भिकार. त्यात पुन्हा त्यातली सगळी गाणी एकाहून एक भिकार. परंतु त्यातसुद्धा, हे गाणे प्रकर्षाने भिकार होते. भरीस भर म्हणजे, तेव्हा आम्ही कॉलेजात होतो, तरुण होतो. (शिवाय, ही सुधारणा त्या मूळ गाण्याच्या तुलनेत अधिक लॉजिकलसुद्धा होती. निदान, तेव्हा आम्हांस तसे वाटत असे. असो.)

आजची तरुण पिढीसुद्धा आमच्या वेळच्या तरुणाईसारखाच विचार करते, हे पाहून भडभडून आले. मात्र, आजची तरुणाई आमच्या काळच्या तरुणाईच्या चार पावले पुढे असेल, अशी अपेक्षा होती. असो.

----------

तळटीपा:

ज्याकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री या दोन (अनुक्रमे पुरुष आणि स्त्री) भिकारोत्तमांबद्दल, ते दोघेही प्रचंड डोक्यात जातात, याव्यतिरिक्त तूर्तास अधिक काही लिहीत नाही. असो.

अर्थात, हे गाणे कोणाला आवडूसुद्धा शकेल. आम्हांस त्याबद्दल आक्षेप नाही. लोकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याप्रमाणेच, लोकांचे अभिरुचिस्वातंत्र्यसुद्धा आम्हांस मान्य आहे.२अ फक्त, या गाण्यासंदर्भातले आमचे मत आमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून मांडले, इतकेच.

२अ शिवाय, "There's no accounting for taste" आणि "It takes all sorts to make a world" ही दोन इंग्रजी सुभाषिते अशा वेळेस खांदा उडविण्यास आमच्या कामी येतात, हाही भाग आहेच. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

गाणे भयंकर आहे. परंतु तरीही, पूर्ण पेशन्सनिशी अथपासून इतिपर्यंत बघितले, ऐकले. त्यात 'अल्ला दुहाई है'नंतर वेगळेच काहीतरी म्हटलेले आहे, 'मुश्किल जुदाई है' नव्हे.

किंबहुना, आख्ख्या गाण्यात कोठेही 'जुदाई' हा शब्द, किंवा फॉर्दॅट्मॅटर 'मुश्किल' हा शब्द, किंवा त्या दोन शब्दांचे कोठलेही पर्म्युटेशन अथवा काँबिनेशन आढळले नाही.

कदाचित या गाण्याची आणखी एखादी आवृत्ती अस्तित्वात असेल, म्हणून (पुन्हा, अतीव पेशन्सनिशी) यूट्यूबशोध घेतला असता, आणखी एक आवृत्ती सापडली खरी. आणि, आश्चर्य म्हणजे, त्यात 'मुश्किल' असा शब्दसुद्धा सापडला! मात्र, 'मुश्किल'नंतरचा शब्द 'जुदाई' असा नसून, 'रिहाई' असा आहे. (मेक्स सेन्स. 'जुदाई'पेक्षा 'रिहाई'चे यमक 'दुहाई'बरोबर अधिक चांगल्या प्रकारे जुळते.)

कदाचित, विडंबनाच्या सोयीकरिता 'जुदाई' हा शब्द आपण तेथे कल्पिला असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वर्जिनल आहे गाणं , तुम्च्या धुंडाळायच्या वाटा भलत्या दिशेने गेल्या.
यात सगळे शब्द बरोबर आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

काही लोक बे नकाब होण्याची कधीची वाट पहातोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1. "काठी नी घोंगडं..." असं आहे ते
2. सहमत....अल्ताफ राजा रफी वाटेल असे आहे हे गाणे
3. लै भारी गाणे आहे हे...फुल्ल टाईमपास
4. Ditto ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

why not Wink

१) सरकाए लेओ खटिया जाडा लगे
२) बेबी बेबी बेबी (दुसऱ्यांदा सेन्साॅर होण्याआधी “सेक्सी सेक्सी सेक्सी”) मुझे लोग बोले,
३) मेरी पॅंट भी सेक्सी: यांत पुढे मम्मी, डॅडी, पूरी फॅमिली इत्यादिसुद्धा सेक्सी होते, पण नंतर ते पुरेसे सेक्सी नव्हते असे सर्वानुमते ठरविण्यात आले, त्यामुळे ते गळाले!

याच धर्तीवरचं “Stop that” (शादी के लिये मैं तो कच्चा हूं, इत्यादि) मात्र अफलातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

"कोंबडी पळाली" या गाण्याला डोक्यात जाण्याचे नोबेल पारितोषिक मिळावयास हवे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मला 'कोंबडी पळाली' आवडतं. मला हेही गाणं आवडतं. ह्यात काही उपरोध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने