आपापल्या डीडीएलजेंची गोष्ट

ऋणनिर्देशः जॅबरवॉक हा सिनेमा आणि पुस्तकविषयक एक इंट्रेष्टिंग ब्लॉग आहे. त्यावर नुकताच एक गंमतीशीर प्रयोग वाचला. या धाग्याची कल्पना तिथून ढापलेली आहे. तसंच इथेच काही दिवसांपूर्वी राही यांनी असं सुचवलं होतं, की आपण आपल्या व्यक्तिगत अनुभव वा आठवणींविषयी बोललो, तर 'ऐसी'च्या चर्चांचा कोरडेपणा थोडा कमी होईल. तेही या धाग्यामागे आहे.

तर - थोर आणि कालातीत आणि माध्यमाला नवीन वळण देणारे आणि प्रयोगशील सिनेमे खूप असतात. आपण ते वेळोवेळी पाहतो. अभ्यासाला पुस्तक लावल्यासारखे, क्वचित कंटाळवाणे, जडबंबाळ, प्रतीकबहुल, निरर्थक, बाल की खाल खीचनेवाले... असे कसेही वाटले; तरी आपला शाणपणा काढून ठेवून, काहीएक समजून घेण्याच्या प्रयत्नापोटी आपण ते बघतो. पण त्यातून आपल्याला फार मजा आलेली असते, येतेच, असं काही नाही. हा धागा त्या सिनेमांविषयी बोलण्यासाठी नाही. किंबहुना सिनेमा चांगला आहे की वाईट आहे हा मुद्दाच इथे गैरलागू आहे. त्या सिनेमाशी निगडीत कोणत्या आठवणी आपल्यापाशी आहेत, तो कोणत्या वयात, कुणासोबत, किती वेळा पाहिला (जातो), तो तेव्हा आवडण्याची / जवळचा वाटण्याची / पुन्हा पुन्हा पाहावा वाटण्याची / डोक्यात राहून जाण्याची कारणं काय होती, त्यामुळे आपल्या पुढच्या आवडीनिवडींवर काय परिणाम झाला, झाला का... असं बरंच काही.

मला अशा तीव्र भावना 'डीडीएलजे' अर्थात 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'बद्दल आहेत.

DDLJ

पालक ही गोष्ट सिनेमात खलनायक न उरता मायबाप-देवता-तारकमारक-दाता-विधाता होण्याची ती सुरुवात होती. सिनेमा १९९५ सालचा. म्हणजे नव्वदोत्तरी स्थित्यंतराचीही ती सुरुवातच. त्यामुळे असेल, माझ्या नवप्रेमाळू वयामुळे असेल, आईबापाला फाट्यावर न मारता इंटेन्स प्रेम करण्याची ही सोईस्कर वाट पथ्यावर पडल्यामुळे असेल, शाहरुख खानचे डोळे भयंकर आवडल्यामुळे असेल, काजोल सुरुवातीला (एकदाच) कविताबिविता लिहिताना दाखवल्यामुळे तिच्याबद्दल जवळीक वाटल्यामुळे असेल, चोप्रीय सौंदर्यामुळे असेल, फरीदा जलाल बाईंच्या माफक स्त्रीवादी भूमिकेमुळे असेल, पण मला सिनेमा बे ह द्द आवडला. अजूनही सिनेमा लागलेला टीव्हीवर दिसला, तर थोडं ओशाळून का होईना पण तो पाहिला जातोच. निदान त्याची रेवडी उडवण्यासाठी का होईना, थांबलं जातं. 'हिंदुस्तानी लडकी की इज्जत' या थोर संकल्पनेवर फिदिफिदि चर्चा होतात. इतक्या पॅट्रियार्कल व्यवस्थेत काजोलची ती आत्या इतकी वर्षं बिनलग्नाची कशी बॉ राहिली, हा आणि यासम अनेक प्रश्न पडतात. पण त्या सिनेमानं डोक्यात व्यापलेली जागा वादातीत राहते.

अशाच भावना तत्कालीन 'बॉम्बे'बद्दल आहेत.
Bombay
त्यातला प्रचंड फ्रेश रॉनेस हे त्याचं एक प्रमुख कारण असावं असं वाटतं. रेहमान हे दुसरं दणदणीत कारण. पण त्यातली सुरुवातीची कोवळी, हिरव्या ओल्या पात्यासारखी, थरथरती मनीषा; नंतर दोन बाळंतपणांनंतरची तृप्त, अंगावर साय धरल्यासारखी, पोसवलेल्या केळीसारखी दिसणारी पूर्ण बाई मनीषा; सिनेमात दिसलेली मुंबई; वर्तमानपत्रातलं बॅकस्टेज; सहज-विनायास काम करणारा मिश्कील डोळ्यांचा अरविंदस्वामी, त्याचा तो खास तीळ, "तुम्ही मरायची वाट बघत बसू की काय?" असं खाटदिशी बापाला विचारणं; नासर यांचा अभिनय... यांतलं काहीच अजूनही विसरू म्हणता विसरता येत नाही. त्या दृश्यचौकटींनी बहुतेक ठरीव-साचीव-खोट्या-कृत्रिम-चोप्रीय रंगचौकटींची मिजास मोडली असणार माझ्या डोक्यातली, असं आता वाटतं. कारण तो हिरवा पडका किल्ला, उसळतं निळं-राखाडी पाणी, निळ्या स्ट्रिप्सच्या टीशर्टातला सैरभैर स्वामी, आणि मोरपिशी साडीवरचा बुरखा त्रिशुळात सोडून देत बेभान होत धावणारी मनीषा - यांनी परिपूर्ण केलेली चौकट डोक्यात तशीच्या तशी ताजी आठवून येते. तेव्हा गाणीही कॅसेटीवर ऐकली जात. त्यात गाण्यांचे शब्द असलेलं एक लहान पत्रक असे. ती गाणी वाचत अ सं ख्य वेळा ऐकली. नंतर रेहमानच्या नव्या सिनेमाची कॅसेट भक्तिभावानं विकत आणण्याची सुरुवात तिथून झाली. पण त्या गाण्यांमधली आर्तता वगळता त्याबद्दल लिहायला मी योग्य माणूस नव्हे. त्यासाठी इथे अनेक दिग्गज लोक आहेत.

असं बरंच काही याबद्दल आणि इतरही काही सिनेमांबद्दल लिहिता येईल. पण ते यथावकाश होईलच.

पुढे पुढे हे असे ठसे डोक्यावर उमटवून ठेवणारे सिनेमे कमी होत गेले. ते होतातच. आपण अधिक निबर होत जातो. इतर व्यवधानं / आकर्षणं वाढत जातात, तसं झालं.. तेही ठीकच.

पण - तुम्हांला असं कोणत्या सिनेमांबद्दल वाटतं? नि का? ते सांगा...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

बीबीसी चे प्राईड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस!
किमान क्ष*१०० वेळा तरी ही बीबीसीची अतर्क्य सुंदर सिरीज पाहिली असेल पण हा धागा चित्रपटासंबंधी असल्याने याला त्यात गणता येणार नाही

==

असे दोनच चित्रपट तुला आठवावेत याचं नवल + कुतुहल वाटलं काही क्षणात माझ्यासमोर किमान ३०-४० चित्रपटांची नावं आली जी मी दर वेळी लागला/दिसला/उगाच मुड आला की बघतो. का मला विषय आकळलाच नाहिये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छे... अनेक सिनेमे आहेत. पण मीच किती लिहू? मला लोकांचा नॉस्टॅल्जिया वाचण्यात रस आहे! नि सिनेमा म्हणजे सिनेमा असं काही नाही.... लिही रे. साहित्य अकादमीचा पुरस्कार थोडाच द्यायचाय, तांत्रिक बाबींची इतकी काटेकोर पूर्तता करून? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डीडीएलजेची आठवण एक भलतीच आहे.

आमच्या घरात त्या काळी सिनेमा पाहणे, 'हॉटेला'त जाणे (किंवा जनरलच 'बाहेरचं' खाणे) हे "चैन्या" या सदरात मोडत असे. अर्थातच या चैन्या सहकुटुंब सहपरिवार करण्याच्या असत. (अपवाद बाबा, कारण त्याची फिरतीची नोकरी होती.)

तर डीडीएलजे पाहायचा आहे हा ठराव घरात पास झाला, पण सगळीकडे तोबा गर्दीचा दुसरा आठवडा चालू होता. तिकिटं मिळेनात. दरम्यान आईच्या हपीसातल्या एका मित्राने त्याच्या मोठ्ठया कुटुंबासाठी तिकिटं काढली होती, त्यातले दोन मोहरे गळले. त्याने आई-बाबांना "येता का" विचारलं आणि तेही तयार झाले.

मला न घेता जाणार म्हटल्यावर डोकंच सटकलं. आईबाबा अपराधी चेहऱ्याने "तू नको म्हटलास तर नाही जाणार. आपण नंतर परत जाऊ" वगैरे म्हणत होते, पण मी "तुम्हाला जायचं तर जा, मला हा सिनेमा बघायचा नाही" असा आडगा निश्चय जाहीर केला. शेवटी आईबाबा सिनेमा बघून आलेच.

हा निश्चय जवळजवळ दशकभर टिकवला. आईबाबा "जाऊ जाऊ" म्हणून आग्रह करत होते तेव्हा गेलोच नाही. टीव्हीवर लागला की उठून जात असे किंवा च्यानल बदलत असे. आईबाबांशी काही राडा झाला तर डीडीएलजे माझी बार्गेनिंग चिप होती.

हळूहळू ती निरगाठ उकलली. मोठाही झालो, आईबाबांशी बार्गेनिंग चिपा वापरायची गरज उरली नाही. घरात/नातेवाईकांत माझ्या डीडीएलजे द्वेषाचा किस्सा फ्यामस झाला होता. त्या रेपुटसनला जागण्यासाठी डीडीएलजे टीव्हीवर लागला की फक्त सवयीने उठून जात असे.

ऑडिटांसाठी नाशिकला जाणं होत असे. फर्म चांगली व्होल्वोने पाठवत असे (अर्थात क्लायंटच्या खर्चाने). व्होल्वोमध्ये तुंबा झोप काढून ऑडिटची जागरणं भरून काढत असे. व्होल्वोवालेही बरसात, परदेसी बाबू वगैरे चित्रपट लावून झोपेला प्रोत्साहन देत असत. एकदा मात्र डीडीएलजे लागला! दशकभराचा राग विसरून पाहिला. आवडलासुद्धा. आईला फोन करून "शेवटी डीडीएलजे पाहतोय बर्का" वगैरे कुजकटपणाही केला.

गाणी नि "जा सिमरन जी ले अपनी जिंदगी" वगळता फारसं काही लक्षात नाही. "..मैं छोड आयी खुद को जहां पे, वो रह गया मोड पीछे" ही आवडत्या ओळींपैकी एक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय रे बाबा एकेक! असलं माझ्या अंगाशी उलट आलेलं एक प्रकरण म्हणजे 'हम दिल दे चुके सनम'. कॉलेजात असताना कधीतरी तो रीलिज झाला होता. तोवर आम्ही सहकुटुंब सिनेमे पाहत असू. त्यामुळे समित्र सिनेमे पाहण्याची वेळच येत नसे. आमच्याइतके सिनेमे मित्रांच्यात पाहतच नसत कुणी. पण त्या सिनेमाला कधी नव्हे ते कॉलेजातून बंकिंग करून जाण्याची टूम निघाली आणि दुपारी १२ ला सिनेमा बघून मी ३ वाजता घरी. घरी संध्याकाळची तिकिटं तयार होती. काय करता? गुपचूप परत पाहिला!
बादवे, तेव्हा त्यांतली रंगांची उधळण आवडली होती जाम. पण आता परवा टीव्हीवर निंबुडा लागलं होतं ते पाहिलं, तर एकदम नवीन रंगपेटी मिळालेल्या माणसाने हरखून जाऊन चित्रात सगळे रंग ओतावेत आणि रंगसंगतीचा चुथडा करावा, तसं काहीतरी वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लौल. निंबुडाबद्दल सहमत आहे. त्यातलं आलबेला साजन मात्र झक्कास आहे. संजू भन्साळीने बा० म० मध्ये तो मुखडा घेऊन घाण केली आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सगळी गाणी छान आहेत त्यातली. सलमान-ऐश्वर्या-रेखा राव-स्मिता जयकर या भिकार नटांकडे दुर्लक्ष करता आलं तर.

पण आता निमित्त मिळालंच आहे तर त्यातल्या स्मिता जयकरच्या पात्राबद्दलची भडास काढून घेते. कशी दाखवलीय ती बाई. या वयात नवर्‍याच्या मागे मागे लाडीकपणे फिरतेय बया आणि पोरीला मात्र भोचक सल्ले. तो बापही धन्य. काय चाललंय कळेना होय त्याला दिवसाढवळ्या नाकाखाली?

बाकी - भन्साळीच्या जलफेटिशीच्या खुणा त्याही सिनेमात दिसतात हो! पाणी आणि झुंबरं पेटवणं नि विझवणं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आबा कावत्यात आणि पावत्यात.वरच्या लेखापेक्षाही ( माफ करा ) हे फार भावलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हात्तेरेकी! केलं माफ. आता सांगा बरं तुमच्या लाडक्या सिनेमांबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमच्या घरीही सिनेमे बघायचे म्हणजे काहीतरी चूक करतोय असं समजण्याची पद्धत होती. पण मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, वगैरे विचारही होते. त्यामुळे कॉलेजात गेल्यावर कधीतरी सठीसामाशी मित्रमंडळाबरोबर सिनेमा बघणं मान्य होतं. १२ वी ते टीवाय चारही वर्षं माझं मित्रमंडळ तेच होतं आणि आम्ही वार्षिक परीक्षा संपल्यावर चारही वर्षं भिक्कारतम सिनेमे बघितलेले होते.

त्यात 'कुछ कुछ होता है' बघून झाल्यावर 'होते एकदा चूक' अशी आम्ही आपापली समजूत काढली. नंतर 'मस्त' बघितला. आता बघितल्यावर नावं ठेवायची कशी म्हणून मी 'आफताब कसला दिसतो ना...' छाप चिकार बडबड केली. अर्थात 'मस्त'मधल्या गाण्यांबद्दल कोणाचीही काही तक्रार नव्हती. इतर दोन भिकार सिनेमे कोणते बघितले त्यांची नावंही आता आठवत नाहीत. पण हा 'इतिहास' असल्यामुळे मुद्दामच 'लगान' या मित्रमंडळाबरोबर बघितला नाही. तो दुसऱ्या ग्रूपबरोबर बघितला आणि एकीकडे बडबड करून चिक्कार करमणूकही झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला आठवणारा सिनेमा म्हणजे - "हनी आय श्रंक द किडस" - मैत्रिणींबरोबर कँप मधील थिएटरमध्ये पाहीला. आवडला होता.
___
"दिल चाहता है" दुर्दैवाने नवर्‍याबरोबर पाहीला. आणि त्याचा सतत वैतागलेला चेहरा व शेवटी केलेली टीका ऐकून, उबग आला.
____
"This is forty" - बरोब्बर चाळीसाव्या वाढदिवसाला, मैत्रिणीबरोबर पाहीला. आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट पाहणे अतिशय आवडत असल्याने वेगवेगळ्या चित्रपटांशी निगडित अशा वेगवेगळ्या आठवणी आहेत. अर्थात मी कलात्मक वगैरे चित्रपट टाळून संपूर्ण व्यावसायिक आणि मनोरंजनाची कंप्लीट खात्री असणारेच चित्रपट शक्यतो पाहतो. मात्र कोणत्या सिनेमाशी अत्यंत तीव्र आठवणी जोडलेल्या आहेत हे आज आठवून पाहिलं तर मला ग्रंपी ओल्ड मेन (आणि ग्रंपीयर ओल्ड मेन) हे दोन चित्रपट आठवतात. २००४ मध्ये काही कामानिमित्त २ महिन्यांसाठी मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो. नोव्हेंबर ते जानेवारी हे दोन महिने आणि सिराक्युज हे ठिकाण. तिथं इतका तुफान बर्फ पडायचा की सुरुवातीचं स्नोफॉलचं अप्रूप पहिल्याच आठवड्यात वितळून गेलं. सुदैवाने कामाची जागा आणि राहण्याचे हॉटेल हे अगदी एकाच कंपाऊंडमध्ये म्हणावेत असे रस्त्याच्या अलीकडे-पलीकडे होते. इतका कमी कालावधी आणि प्रथमच वेगळ्या देशाचा प्रवास यामुळे गाडी वगैरे चालवण्याच्या भानगडीत पडलो नाही. सुरुवातीला माझ्याआधी आलेल्या मित्रांची वाहतुकीसाठी मदत झाली. मात्र दिवाळी, नाताळ वगैरे सुट्ट्या पाहून त्यांनी भारतात कलटी मारली.

भारतात परतण्याचा दिवस २४ जानेवारी हा होता. सिराक्युजला नेहमीप्रमाणेच सातआठ इंच बर्फ पडला होता. त्याचं फारसं काही वाटत नव्हतं. त्यादिवशी हॉटेलातलं सामानबिमान आवरुन, फ्रीजसकट सगळं रिकामं करुन ठेवलं. चेकआऊट करुन ट्याक्सीने सिराक्युज विमानतळावर आलो आणि तिथं पूर्व किनाऱ्यावर प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे दोन दिवसांसाठी बंद असल्याची सुवार्ता कळली. परत बोंबलत हॉटेलवर आलो.

नंतरचे दोन दिवस आणखी बर्फ पडला आणि अगदी तुरुंगवासात गेल्यासारखे झाले. टॅक्सीसेवा बंद झाल्या होत्या. रेस्टॉरंट्स आणि टेकआऊट जागा बहुतांशी बंद होत्या. सुदैवाने हॉटेल समोरच्या एका छोट्या दुकानात दूध-अंडी-ब्रेड-दारू अशा माफक जीवनावश्यक गोष्टी मिळाल्या. Wink हॉटेलातल्या व्हीसीडी कलेक्शनमधले बहुतेक सर्व अॅक्शन चित्रपट पाहून झाले होते. टीवीवर अमेरिकन पद्धतीच्या 'मुलाचा बाप कोण' या न्यायदानाच्या मालिका पाहण्यात काडीचाही रस नसल्याने उरलेल्या ग्रंपी ओल्ड मेन आणि ग्रंपीयर ओल्ड मेन ह्या दोन व्हीसीडी उचलल्या आणि ऑम्लेट-दारूच्या संगतीने लुत्फ उठवला. हे चित्रपट सुमारच आहेत (दुसरा भाग तर फारच सुमार) पण त्यांनी दोन दिवस चांगली साथ दिली.

खरंतर जोरदार बर्फवृष्टी म्हटल्यावर फार्गो किंवा अलीकडचा हेटफुल एट आठवायला हवा. पण मला हे दोन चित्रपटच आठवतात.

अशीच वेगळी आठवण नोलानच्या बॅटमॅन मालिकेबद्दलही आहे पण ती तितकी तीव्र नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी चित्रपटवेडा नसल्याने त्यात काही विशेष चित्रण असल्यासच कोणाकडून कळल्यास पहात असे.भावनिक गुंता वगैरेमध्ये गुरफटून जाणे परवडत नाही.अर्थात हिंदी सिनेमे बाद.तरीही शेवटचा हिंदी सिनेमा शोले सिनेमा हॅालमध्ये जाऊन( बसंत चेंबूर )१९७५ पाहिला त्यातल्या एंजिनाच्या स्टिअरिओ साउंडसाठी.बाँड्सपट अर्थातच फॅार योर आइज ओनली असल्याने पाहिले.सुरवातीची रेस खासच.नंतर ती गॅजेट्स लोकांच्याच हातात आल्यावर गम्मत संपली.
एक चाइनिज पाहिला मित्राच्या आग्रहाखातर नंतर तो म्हणाला हा तुला नक्की आवडेल कारण "वेड्याना सर्व माफ असतं" हे दाखवलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही समजले नाही नक्की कशाबद्दल लिहायचे आहे. तो जॅबरवॉक वरचा लेखही वाचला, पण तेथे 'लिस्ट' ची चर्चा आहे.

कृपया जरा संत्रे सोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भौ, तुम्हांला आवडणार्‍या सिनेमाबद्दल लिहायचे आहे हो. सिनेमापेक्षाही त्याच्याशी असोसिएटेड आठवणींबद्दल लिहिलेत तर बोनस गुण. चला, खा बरं फोडी, सोलून दिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

थॅन्क्यू थॅन्क्यू. लिहीतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' बद्दल एकदा फेबु वर हे लिहिल होत

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' चा शेवट . राज चालत्या ट्रेनमधुन सिमरनचा हात पकडतो आणि पब्लिक टाळ्या वाजवत . काही बायकापोरी डोळे पुसतात . पण त्या धुळीत रक्तबंबाळ होऊन पडलेल्या कुलजितकडे कुणाचं लक्ष जात का ? मी जेंव्हा जेंव्हा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' पाहतो तेंव्हा तेंव्हा त्या कुलजितचं पुढ काय झालं असेल हा प्रश्न मला छळतो . मित्र म्हणून घेणाऱ्या एका माणसान भर मांडवातून त्याची होणारी बायको पळवली . त्याच्या घरी राहून , त्याचीच बीअर पिउन . वर अख्ख्या गावासमोर शेवटी त्याला तुडव तुडव तुडवला . Humiliate झालेल्या कुलजितच पुढ काय झालं असेल ? त्याने दारूत स्वतःला बुडवून टाकल असेल ? की गाव सोडून गेला असेल ? आपली बहिण पण राजवर प्रेम करत होती हे कळल्यावर त्याच्या जखमेवर मीठ चोळले गेले असेल काय ? किंवा 'जब वुई मेट ' मधल्या त्या अंशुमानच पुढे काय झाले असेल ? . ९०% भारतीय पुरुषांना (आकडा personal sample survey वर आधारित) आवडती पोरगी मिळत नाही, म्हणजे तसे बघायला गेले तर 'कुलजित ' आणि 'अंशुमान ' हे खलनायक सर्वसामान्य भारतीय पुरुषांचे पडद्यावरचे प्रतिनिधी . महागड्या गाड्या फिरवणाऱ्या , सुंदर पोरींशी फर्ड्या इंग्रजीत बोलणाऱ्या , भारी कॉलेजात शिकणाऱ्या हिरोत असे किती भारतीय पुरुष स्वतःला पाहू शकतील ? तरी आपलं पब्लिक व्हिलन मार खातो तेंव्हा टाळ्या पिटत . आपल्याच माणसाला मार खाताना पाहून टाळ्या पिटणाऱ्या पब्लिकला 'अहसान फरामोष ' नाही म्हणार तर काय म्हणार ? व्यवसायीक बॉलीवूड प्रेमपट हे नेहमीच सगळ्या पात्रांना काळ्या पांढऱ्या रंगात रंगवतात . सगळ्या 'आहे रे ' वर्गातल्या लोकांच्या प्रेमकथा . 'नाही रे ' वर्गातला माणूस तिथे फक्त मार खातो . माझ्या आजूबाजूला नाही रे वर्गातल्या पुरुषांचा भरणा आहे . मुलींकडून नकार मिळालेले पुरुष ! आपल्यापेक्षा सरस (आर्थिकदृष्ट्या ?) पोराकडून प्रेमात हरलेले पुरुष ! माझे मित्र , नातेवाईक आणि काही प्रमाणात मी पण ? या चकचकीत बॉलीवूड मध्ये 'नाही रे ' वर्गातल्या लोकांची , खलनायकाची प्रेमकथा कधी बनेल का जिथे एखादी सिमरन उलटीकडे पळत येईल आणि धुळीत पडलेल्या कुलजीतला विचारेल ," तुला जास्त लागलं नाही ना रे ?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

प्रत्येक वाक्याला कानामात्रावेलांटीसकट अनुमोदन.
कॉलेजातली सुरूवातीची वर्ष अगदीच डफ्फर सिनेमांनी आणि त्याहून भिकार फ्याशनीने झाकोळलेली होती. तरी मी दहावी नंतरच्या सुट्टीत विविध मैत्रिणींबरोबर मिळून ३ वेळा तेजाब पाह्यला होता. त्यात एक गाणे वाढवले म्हणून परत एकदा जाऊन पाह्यला होता. ११ वीत असताना मै प्या कि हा थेट्रातच लोल लोल करत बघितला आणि मग मुद्दामून व्हिडिओ क्यासेट आणून एकेका शब्दावर खिदळत पाह्यला होता. १२ वी नंतरच्या सुट्टीत अशी रामलखनची पारायणे केली होती. हम आपके है कौन मंगला ला स्टॉलमधे ब्लॅकमधे तिकिटं काढून पाह्यला. आणि मग ज्या मैत्रिणीने हम आपके ला जायचा प्लॅन केला होता तिच्याकडून परत सिनेमाचा प्लॅन ठरवणार नाही असे कबूल करून घेत भेळेची पेनल्टी घेतली होती. यातल्या कुणाचाही असर फार काळ टिकला नाही.

पण कॉलेजशेवटास असताना आलेला बॉम्बे आणि मग मास्टरात असताना आलेला डीडीएलजे यांच्यावर लैच्च जीव जडला. अजूनही आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

'मैने प्यार किया' या सिनेमाच्या फारच हृद्य आठवणी आहेत. मी प्राथमिक शाळेत असताना याची व्हिडीओ कॅसेट आमच्या एका मैत्रिणीकडे आली. आमच्या घरातल्या सगळ्यांची एकमेकांशी मैत्री. ही मैत्रीण माझ्या मोठ्या भावाच्या वयाची, माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे.

आम्ही तिघे एकत्र हा सिनेमा बघायचो, फक्त सिग्रेट फुंकण्याचे सीन्स. हातात सुरनळीत भरलेली पावडर किंवा धूपाची कांडी घेऊन सिगरेटी फुंकण्याची नक्कल करायचो. मला तेव्हा धूपाच्या वासाचा त्रास व्हायचा तरीही हौस किती! एक उन्हाळ्याची सुट्टी अशा सिग्रेटी ओढण्यात घालवली. वर पुन्हा मोठ्या लोकांना कळू नये याची खबरदारी घेण्याबद्दल आम्ही फार जागरूक. तेव्हा घरच्यांना समजलं असतं तर किती ओरडा पडला असता कोण जाणे!

अजूनही आम्हां तिघांपेकी कोणीही सिगरेट ओढत नाही. म्हणूनतरी तेव्हा ओरडा खायला पाहिजे होता असं वाटतं. आता नाक वर करून "बघा, नकला केल्यामुळे कोणी फुके होत नाही" असं म्हणता आलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी हा सिनेमा फारच उशिरा पाहिला. तेव्हा एकदम 'लोक येडेच असतात. कायपण हिट करतात!' असा साक्षात्कार. नंतर एकदा गोव्याच्या विमानतळावर विमान उशिरा येणार असल्यामुळे लटकले होते, तेव्हा हा सिनेमा तिथल्या एका टीव्हीवर लागला होता. सोबत खिंकाळायला सोईस्कर लोक होते. बाकी शांतता आणि लोळायला जागा होती. मग काय - चेहर्‍यावर प्रणयसुख मिळाल्याचे भाव सदोदित बाळगून असलेली भाग्यश्री, वेडसर सलमान, त्या सगळ्या येड्या कोल्हाळात अडकून पडल्यासारखी दिसणारी भांगेत तुळस रीमा, टकलाला चुकून बोट लागलं तर हाताला तूप लागेल असा आलोकनाथ, सूड उगवणारं कबूतर, स्मार्टनेस न लपणारा मोहनीश, लक्ष्मीकांत बेर्डेचे आचरट 'आंची-आय-आंची'छापाचे जोक्स... हैदोस धमाल आली. नंतर नंतर तर आम्ही - शिट, पंधराच मिनिटं उरल्येत आत जायला, अजून स्वेटरचं गाणं व्हायचंय... वगैरे घायकुतलेले उद्गार काढत, विमान अजून उशिरा यावं अशी प्रार्थना करण्याइतपत चेकाळलो होतो. पायलटनेही आमची प्रार्थना ऐकून सिनेमा संपल्यावरच आत बोलावलं. सिनेमाचा शेवट बघायला मिळाल्याची इतकी धन्यता बाकी कधी वाटल्याचं आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चाची ४२० - फोरबिडन फ्रूट टेस्ट्स द स्वीटेस्ट

कूलपणाच्या आणि 'यो'त्वाच्या व्याख्या देशकालपरिस्थितीप्रमाणे बदलतात. आठवीत असताना खिशात भरपूर पैसे असणे, आणि त्यामुळे आलेलं स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगणे हे आमच्यात कूल समजलं जाई. असा एक सुपरकूल मित्र होता (सोयीसाठी त्याला "बंकर" म्हणू). खिशात चिक्कार पैसे असत, आणि घरी फारशी विचारपूस करणारं कोणीच नव्हतं. (हे असं का होतं याची कहाणी जरा क्लिशेड आहे, पण ते जाऊद्या.)

बंकर मध्येच शाळेला दांडी मारत असे. त्याला घरून शाळेच्या गणवेशात निघताना दुसरा मित्र पाहात असे, पण शाळेत पत्ता इल्ले. ही जादू करणारे बरेच नरपुंगव (आणि काही नारीपुंग्या) शाळेत होत्या, त्यामुळे तो शाळा बंक मारून सिनेमा बघायला जातो हे काही शिक्रेट नव्हतं. बाकीचे लोक शाळेच्या गेटावरून सरळ लक्ष्मीनारायण किंवा अप्सरा वगैरे शाळेजवळच्या थेट्रात घुसत असत. बंकरचं वेगळेपण असं की हा त्या थेटरांत दिसत नसे.

त्या दुसर्‍या मित्राने आणि मी बंकरला एक दिवस थेट विचारलं. असं समजलं की हा लक्ष्मीनारायण, राहुल ७०मिमि वगैरे "टॉप एंड" थेटरात सिनेमा बघतो, कुठल्यातरी पंजाबी हॉटेलात चिकन बिर्याणी वगैरे खातो आणि मग शिस्तीत नेहेमीच्या वेळेला घरी येतो. हे स्वर्गीय आयुष्य एकदा तरी आपल्या मित्रांना उपभोगायला मिळावं म्हणून बंकरने आम्हाला पुढच्या वेळेला घेऊन जायची ऑफर दिली. आम्ही पैसे वगैरे घेऊन यायचा प्रश्नच नव्हता, कारण तत्कालीन पॉकेटमनीमध्ये एक पेरू वन-बाय-टू खाणंच परवडत असे.

ठरला दिवस जवळ यायला लागला तशी आम्हा दोघा नवख्या मित्रांच्या पोटात पाकपुक व्हायला लागलं. बंकर अर्थातच निवांत होता. आम्ही दोघा मित्रांनी अं०अ०अ० फेम राबटला लाजवेल असा तपशीलवार पिल्यान बनवला. वेळ पडल्यास शाळेच्या बसपर्यंत गेलो होतो हे सिद्ध व्हावं म्हणून बाबाचे दोन शर्ट शाळेत जाताना उगाच इस्त्रीवाल्याला दिले. खालच्या मजल्यावरचा एक पकाव म्हातारा रोज रस्त्यात दिसत असे. त्याला स्वतःहून हटकून त्याच्याकडून पकवून घेतलं. वगैरे. दुसर्‍या मित्रानेही असलंच कायकाय केलं.

राबटीय पिल्यान के मुताबिक आम्ही सगळी काळजी घेतली, पण कुठल्या थेटरमध्ये कुठला सिनेमा लागला आहे हा किरकोळ तपशील पहायचं आमच्या दोघांच्याही डोक्यात आलं नाही. बंकर अर्थातच निवांत होता. त्याने आपण राहुलला "चाची ४२०" मॅटिनी बघणार आहोत असं फर्मावलं. शाळेच्या बसआधी पंधरा मिनिटं आम्ही तिघे भेटलो. आमच्या डोक्यात बसचे रूट तयार होते, पण बंकरने थेट रिक्षा पकडली. यो-दिन सुरू झाला होता!

बंकरने आज आपल्या खिशात खुळखुळणार्‍या मालाने आम्हांला दिपवूनच टाकायचं असं ठरवलं होतं. प्रत्येकी पस्तीस रुपयांची बाल्कनीची तिकिटं काढली. सिनेमा झकासच आहे, पण आम्ही गैरकानूनी कृत्य करून तो बघत होतो त्यामुळे तो जास्तच आवडला.

त्याआधी कधीतरी मिसेस डाऊटफायरसुद्धा पाहिला होता. पण चाची डाऊटफायरपेक्षा उच्च आहे हे तेव्हा बनलेलं मत अजूनही टिकून आहे. उदा० "चाची का पती कौन?" हा राडा डाऊटफायरमध्ये नाही. चाचीआधी हिर्वीण+हिरो=सिनेमा असं जे समीकरण मनात होतं ते ओम पुरी आणि परेश रावल यांच्या अद्वितीय अभिनयामुळे मोडकळीला आलं. त्यासाठीही चाचीचं मनातलं स्थान कायम आहे.

सिनेमा संपल्यावर बंकरचं दानशूरत्वही संपुष्टात आलं. "मला माझ्या चुलतभावाकडे जायचंय, तुम्ही जा आता घरी..." वगैरे टेपा लावून त्याने राहुलच्या दारातूनच कल्टी घेतली. आमच्या दोघांच्या एकत्रित मालमत्तेवर पंजाबी हॉटेलात वगैरे जाणं अर्थातच शक्य नव्हतं. त्यामुळे संभाजी बागेत जाऊन आपापला डबा खाल्ला. एका पाणीपुरीवाल्याला दुपारच्या झोपेतून उठवून वनबायटू पाणीपुरीही खाल्ली. विविध बसेस पकडून घरी आलो.

दबकत दबकत घरी पोचलो. घरी कोणालाही या उद्योगाचा पत्ता लागला नव्हता, पण आमच्या मनात उगाच धाकधूक. तासातासाने एकमेकांना फोन करून "खुशाली" कळवायची असं ठरलं होतं. आपण खुशाल असल्याचा एक परवलीचा शब्दही ठरवला होता. आम्ही दोघेही रहस्य आणि साहसकथांचे नियमित वाचक असल्याने तो शब्द अमर्याद खुळचट होता. पण अर्थातच घरी वातावरण नॉर्मल होतं, आणि असल्या सर्कशीची गरज नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वा! काय मजा येतेय!

तो 'वो जो निली चड्डी हाथ में लिए खडा है वो? फिकर मत करो, वो उसको होगी नही'वाला संवाद. बाबा - अजूनही मला तेवढंच खिदळायला होतं. त्यातले अनेक संवाद पाठ आहेत. ते गुलजारने लिहिल्याचं कळलं होतं पहिल्यांदा तेव्हा त्याला मनोमन साष्टांग घातला होता. काय तोल आहे यार त्या संवादांचा! ते अश्लील नाहीत, पण प्रचंड चावट आहेत! हसू येतं, पण किळस वाटत नाही - असा कमालीचा तोल सांभाळून लिहिलेले आहेत. त्या सिनेमाचा कुठेही 'मस्ती' किंवा तत्सम आचरटपणा होत नाही, याचं श्रेय गुलजारच्या त्या संवादांना आणि ओम पुरी-अमरिश पुरी-तब्बो-नासर या थोर लोकांना आहे. आणि हो - पार्श्वसंगीत. परेश रावलच्या प्रसंगांत काय बहार आणलीय त्या संगीतानं! केवळ थोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

आम्ही दोघेही रहस्य आणि साहसकथांचे नियमित वाचक असल्याने तो शब्द अमर्याद खुळचट होता.

कोण्ता कोण्ता कोण्ता? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त मस्त गोष्ट. चाची चारसोबीस बघण्यासाठी आदूबाळ आणि त्याचा मित्र चारसोबीस बाय टू कसे झाले हे वाचायला भारी मजा आली. आपल्या लहानपणी शाळा बंक मारता येते ही कल्पनाच माहीत नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी लिहीले आहे.

चाची ४२० पहिल्यांदा पाहताना भारी वाटला नव्हता. बट इट ग्रोज ऑन यू. अमरीश पुरी, परेश रावळ व ओम पुरी तिघांनी धमाल उडवली आहे. या पिक्चर मधे मला वाटते ओम पुरी चे विनोदी सीन्स महान आहेत. कदाचित तिघांमधे तोच सरस झाला आहे. त्या लहान मुलीला पाण्यात टाकल्यावर जेव्हा अमरीश पुरी विचारतो "किस उल्लू के पठ्ठे ने इसे पानी मे डाला?" यावर "इस" म्हंटल्यावर चाची समोर दिसल्याने वाक्य अचानक बदलून "उल्ली की पठ्ठीने" म्हणताना काय जबरी सीन दिला आहे त्याने. कायम हसतो ते पाहताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईतील सिनेमागृहात सिनेमा परवडायचा नाही. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत अलिबागला १ रु. तिकीटात सगळे सिनेमे पाहिले जायचे. चुलत-आते भावंडांबरोबर ऋषी कपूर-टीना मुनीमचा कर्ज लागोपाठ दोन दिवशी पाहिला होता. त्यातली "ती धून" डोक्यात फीट बसली होती.
पुन्रर्जन्म वगैरे खरं वाटत होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

ज्या काळात छोटा भीम सारखी भिकारडी भारतीय कार्टून्स नव्हती, डिस्कव्हरी आणि नॅशनल जियोग्राफिक, हिस्टरी सारख्या चॅनेल्सची नवथर सवय होत होती त्याकाळातल्या आठवणी. हिंदी सिनेमाविषयी तिडिक ही फर्दीन खान(कुठे टळला कोण ठाऊक)चा प्रेम अगन आणि मोहब्बतेची डायलॉग कॅसेट एकशे एकतीस वेळा रिपीट मारणार्‍या टीनेजर काका मुळे नुकतीच डोक्यात ऊठायला सुरुवात झालेली.

त्याचं असं, आमच्या गावी इनमिन तीन थिएटर्स. त्यापैकी दोन एकाच मालकाची पण ती गावाच्या दोन टोकांना. प्रतीक आणि प्रणंद. तिसरं थिएटर म्हणजे चंद्रभागा आणि सदासर्वकाळ गरम या कॅटेगरीतलं होतं. प्रतीक नुकतंच बांधलं जात होतं आणि त्यामुळे त्याच्या मालकाच्या कर्जबाजारीपणाच्या आवया आमच्या ग्रुपांत उठत. प्रणंद लहानसंच होतं. आणि पावसात प्रतीक निकामी ठरलं की प्रणंदला पर्याय नसे.

आमच्या भणंग गावात इंग्रजी चित्रपट इंग्रजीतून पाहणारी मंडळी ही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी होती. त्याच्या वीसपट इंग्रजी चित्रपट हिंदीतून पाहणारी मंडळी पकडा. शंभर वर्षांत याला अपवाद ठरले ते दोनच चित्रपट. एक म्हणजे ज्युरासिक पार्क आणि टायटॅनिक.

पण प्रतीकचा मालक हुषार होता. आमचं बालपण आणि पौगंड प्रतीकने घडवलं असं वाटतं. त्याला कसलीतरी टेस्ट होती की त्यात निव्वळ व्यवहार असे की ठाऊक नाही पण आवर्जून तो हॉलीवूडपट आणत असे. त्याने मॅट्रीक्स सेरिज सलग दाखवली होती. (सिंगल स्क्रीन ). हेच हॅरी पॉटर पटांचं. हॅरी पॉटरची पुस्तकं मिळणं हे कल्पनेपलीकडची गोष्ट होती. त्यामुळे तो सगळा दुज्या दुनियेचा पसारा आयुष्यात आला तो चित्रपटांनीच. पहिला आणि दुसरा भाग हे तेव्हाही विषेश आवडले नव्हते. तिसरा, चौथा आणि त्या नंतरचे सगळे भाग हे प्रतीकचं देणं आहे. त्यात हळू हळू वाढत जाणारी काळसर भिती तिथं तीव्रतेने अनुभवायला मिळाली. गंमत म्हणजे शेवटचा भाग येण्या आधी सहावा आणि सातवा भाग दोन्ही आणले गेले होते.

त्या सगळ्या चित्रपटांतलं लेणं म्हणजे स्टार वॉर्स ही मालिका.

या चित्रपटांनी फॉलोईंग काय असतं याची झलक दाखवली. नुकतीच दहावी झाल्यावर आलेला रिवेंज ऑफ सिथ पाहताना आलेले शहारे अजुनही स्मरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

या सगळ्या तुलनेत माझ्या लहानपणी चित्रपट बघण्यासाठी फार सव्यापसव्य करावी लागत नसतं कारण नियमितपणे (म्हणजेर वर्षातून दोनदा Wink - एकदा उन्हाळी एकदा नाताळाच्या सुट्टीत) मला ते दाखवले जातच. आणि साधारणतः ते इंग्रजी लहानमुलांसाठीचे असत. हनी आय श्रंक द किंड्स, १०१ डाल्मेशियन्स, डन्स्टन चेक्स इन, होम अलोन इत्यादी चित्रपट थिएटरात बघितल्याचं लख्खं आठवतंय.

नक्की आठवत नाही पण हा प्रकार आम्ही ७वी-८वीत गेल्यावर सुरू झाला असावा. तेव्हा कार्यक्रम असा असे. आमच्या (माझ्या व माझ्या आतेभावाच्या - दोघेही साधारण सारख्याच वयाचे) सुट्टीत एक विवक्षित दिवस ठरे. तेव्हा बाबा सकाळी ऑफिसला-चर्चगेटला- जात. मी आणि माझा आतेभाऊ जेवणं झाल्यावर गर्दीच्या वेळा टळल्या की एकट्याने चर्चगेटपर्यंत जात असु. त्यासाठी लागणारे तिकीट काढणे, एकट्याने डब्यात चढून जाणे वगैरेचं भयंकरच अभिमानास्पद काम करून चर्चगेटला पोचल्यावर बाबा स्टेशनवर घ्यायला येत. मग आधी बाबांच्या हाफिसात जात असु. वर्षातून दोनदा तिथे जाणे, चर्चगेटच्या भुयारी मार्गातून बाहेर पडणे, लोकांच्या लोंढ्यासोबत क्रॉसिंग करणे वगैरे खूपच मजेचे वाटे. हाफिसात बाबांचे काम (उरकणे) चाललेले असे. तोवर त्यांच्या सहकार्‍यांकडूनकडून नेहमीचे प्रश्न विचारणे - फुकटचे चावणे - झाल्यावर त्यांच्याचतर्फे शिपायाकडून मागवून आम्हाला हटकून 'गोल्ड स्पॉट' पिलवण्यात येई (त्यासाठी आम्ही ते प्रश्नही झेलायला तयार असु). बाबांनी संध्याकाळच्या शो ची तिकीटे काढून ठेवलेली असत. ते आम्हाला 'इरॉस'ला सोडून येत. ते फक्त 'हनी आय श्रंक ..'ला सोबत आलेले आठवतात. एरवी ते आम्हालाच आत सोडत. स्वत: आपल्या मित्रांसोबत 'रिदम हाऊस' (आणि एकुणच काळा घोडापरिसरात) रेंगाळत असत. (याचे कारण मुलांना एकटेपणा देणे होते की आर्थिक माहित नाही - विचारले नाही - पण दोन्ही असावे). रात्री मरीन ड्राईव्हला भटकणे. चालत गिरगाव चौपाटीपर्यंत जाणे. तोवर अव्याहत तोंड (नि पाय) दुखेपर्यंत नुकत्याच पाहिलेल्या चित्रपटाबद्दल बाबांचे डोके खाणे चालु असे! मग चौपाटीवर भेळ/पावभाजी वगैरे खायला मिळत असे. ती दमल्याने गपगुमान खात असु. मग तिथे मुडप्रमाणे खेळणे, गप्प बसणे, नाहितर घरी परत येणे असा प्रोग्राम असे.

या सगळ्या मुळे माझे चित्रपट पाहणे, त्याबद्दल सुट्ट्यांनंतर शाळेत फुशारून सांगणे हा नियमित क्रम फारच आवडीचा होता. लहानपणीचे चित्रपट पाहणे म्हटलं की हे सगळंच आठवतं.. छान वाटतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पौगंडावस्थेत आठवणीत राहिलेला सिनेमा म्हणजे १०. विशेषतः त्यातली बो डेरेक, त्याहीपेक्षा तिचा तो फेमस रन! Smile
तशा आजूबाजूला अनेक स्त्रिया असल्या तरी स्त्रीत्व ही काय प्रखर चीज आहे त्याचा साक्षात्कार तेंव्हा पहिल्यांदा झाला!
नंतर तिचा टारझन सिनेमा आला....
परवडत नसतांनाही मेट्रोमध्ये तो तीनवेळा पाहिला.
नंतर ती फारशी सिनेमात चमकली नाही.
तिचा भाबडा पण अभिनयशून्य चेहरा तिच्या करियरच्या आड आला असावा.
पण तेंव्हापासून मी तिचा फॅन!!!!
.....
.....
.....
नशिबाचा काय खेळ असतो पहा!
आज ती बो डेरेक माझ्या सबडिव्हिजनमध्ये रहाते. अजूनही फिगर कमावून आहे.
कधी चालायला किंवा जॉगिंग करायला बाहेर पडली आणि मी जर माझ्या यार्डमध्ये काम करत असलो तर नजरेस पडते...
ती बिचारी चांगुलपणे हाय, हलो, करते. मीही तिला प्रतिसाद रिटर्न करतो.
पण मग ती पाठमोरी झाली की तिच्या त्या फिगरकडे पाहून स्वतःशीच खुदकन हसतो!!
जुने दिवस आठवतात, गंमत वाटते.
बाकी देणं-घेणं काहीच नाही...
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डांबिस आहात! Wink (ह. घ्यालच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'बो'ला बघून डांबिस 'टाय'ट.

अजूनही भलतेसलते ज्योक सुचताहेत, पण राहूदेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इकडे या एकदा, तुमचीसुद्धा ओळख करून देतो तिच्याशी!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आमंत्रण स्वीकारुन कधी होणार गुर्जी डेरेदाखल? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बोबो या शब्दाचा मारवाडी भाषेत अर्थ होतो
..........
यावरुन एक मराठी कविता होऊ शकते
एक बो घ्या बाई दोन बो घ्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भो* डेरेका चुकलं,
भो पिवळा डांबिसा नेबरहुड कसा आहे असा प्रश्न अधुनमधून विचारण्याचा हक्क प्राप्त करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आदुबाळा माफ कर तुझ्या पोस्टी आता चांदोबातल्या वाटू लागल्या आहेत.
मेघना लेख लिहून किल्ली फिरवल्याबद्दल धन्यवाद.डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लेख टाके फारच योग्य प्राइम स्लॅाट झालाय.
( भो राजन् वगैरे संस्कृतात संबोधन आहे असं अंधुक आठवतंय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भो पिवळा डांबिसा नेबरहुड कसा आहे असा प्रश्न अधुनमधून विचारण्याचा हक्क प्राप्त करून दिल्याबद्दल धन्यवाद.

भो अचरटा, मी मुद्दाम म्हणून सांगणार नव्हतो पण तूच असा प्रश्न विचारून सांगण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
वर सांगितल्याप्रमाणे बो डेरेक आहेच, आणि जवळच ब्रिटनी स्पियर्स आहे, तिच्या पलिकडे वेस्टलेकमध्ये हेदर लॉकलियर आहे, जादा पिंकेट स्मिथ आहे, उत्तरेला कायली क्युको (द बिग बँग थियरीमधली) आहेत.
सारांश काय, तर नेबरहूड मस्त आहे म्हण ना!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>वर सांगितल्याप्रमाणे बो डेरेक आहेच, आणि जवळच ब्रिटनी स्पियर्स आहे, तिच्या पलिकडे वेस्टलेकमध्ये हेदर लॉकलियर आहे, जादा पिंकेट स्मिथ आहे, उत्तरेला कायली क्युको (द बिग बँग थियरीमधली) आहेत.

संभाळा......

घरात डांबिस काकू आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संभाळा......
घरात डांबिस काकू आहेत.

त्या आहेत म्हणून तर आम्ही निष्कलंक आहोत!!!!
Smile
हे वरचं सगळं सत्य असलं तरी फक्त 'कलेसाठी कला' म्हणून हो!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती ती कलारसिकता आणि तो मनाचा दिलदारपणा
पावलो या वर्षाच्या शेवटी.
किंगफिशरच्या कॅलेन्डरची आतुरतेने वाट पाहणार्यांची कीव करावीशी वाटली आज.बिचारा अतुल{कसबेकर}फोटोग्राफर आणि त्याचे लाइट बॅाइज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना लोकशाही थोडी जास्त समजण्याआगोदर, सत्ता टिकवण्यासाठी सरकार जास्त डोके लावत नव्हते त्यावेळची गोष्ट. सुखाची परमावधी म्हणजे, आठ बाय आठच्या दिवाणखान्यात बसुन कधिकाळी गाजलेला एखादा पिच्चर काळ्या पांढ-या रंगात, कुटुंबासमवेत बेडवर झोपुन पहायला मिळाला तर मध्यमवर्गीय जाम खुश. इलेक्शन्च्या दिवसात तर फक्त पिच्चर पहायला भेटेल यासाठी मध्येच कॉग्रेस कशी सत्तेत परत आलीये याच्या बातम्या पहायचे. कुणि मोठा अभिनेता मेला तर हळहळल्यासारखे करुन आता त्याचा गाजलेला पिच्चर दुरदर्शन वर येणार म्हणुन मनातल्या मनात मांडे खायचे, त्याकाळात काहिंनी शोले पहायला मिळेल म्हणुन बच्चन मरावा असेही स्वप्न रंगविले होते. गेलाबाजार गायक मेला तर निदान शुक्रवारच्या छायागीत मध्ये सगळी त्याचीच गाणि असणार म्हणुन आगोदरच फक्त वरण भात अन बटाटयाच्या भाज्यांचा कुकर लावायचे लोक. किशोर कुमार गेला त्यादिवशीच्या चित्रहारच्या गांण्याचा सिक्वेन्स सांगणारे लोक सापडतील. कोण म्हणतो प्रेम लपवता येत नाहि म्हणुन? रामायण चालु असतांना सोसायटीच्या गच्चीत सात जन्माच्या आणाभाका घेउन लिमिटेड शरीर क्रिडांचा आजही थांगपत्ता लागु दिला नाहिये एका पिढिने.

बच्चन मेला असता तर शोलेच्या टायमात गच्चीत तीला आणखी थोडे कन्विन्स करता आले असा विश्वास आजही ठेवणारे आम्ही. दहाववी अकरावीला उखाड्यावरचे सेल फोडुन त्याचे पत्रे विकुन रामसे चे पिच्चर बघायला जायचो. तीन बाथरुम सिन एकदम ग्यारंटिड. भुताची भीती वाटत नव्हती पण राग यायचा. भेXXX ते भुत तीनही हिरोइनीला आंघोळ करता करताच मारुन टाकायचे. तीसरी हिरोइन मेली म्हणजे आमच्या लेखी पिच्चर संपायचा. आम्ही थेटराच्या बाहेर, पुन्हा फेकुन दिलेले सेल किंवा दुधाच्या रिकाम्या पिशव्या गोळा करीत. या काळात आवडलेले पिच्चर - खुनी महल, चुडैल, लेडी किलर, खुनी शिकंजा, मुर्दा, मुर्दे का बदला, डायन, खुन की प्यासी डायन. आज इंटरनेटवर सगळे बघायला मिळुन सुद्धा त्या दिवसांची थोरवी काय वर्णावी सायबा!. मुन्नीबाई हा या काळातला शेवटचा पिच्च्रर.

नंतर मनमोहन सिंघांनी मुक्त अर्थव्यवस्था स्विकारायची ठरवली. पहिला ऐतीहासिक फायदा, ATN नावाचे च्यानल. यावर सोमवारी ऐतीहासिक चित्रपट, पण नो प्रोब्लेम, मंगळवार पासुन चंगळवार सुरु. आवडलेले पिच्चर, जंगल ब्युटी, टारजन, शैतान, सामरी, अजुन लय काही. सगळे थेटरासारखेच + दुपारी रिपीट टेलीकास्ट, आई चाळितल्या पारावर धान्य निवडायला आणि आम्ही शाळा बुडवुन टिव्हिसमोर. आर एस एस प्रणित शाळेत सगळ्यात जास्त सेक्स बद्दलचे ज्ञान असणारे आम्हिच पहिले, काहि शिक्षकांना याचा प्रंचंड राग तर काहिंना सहानभुती, परिणाम आम्हि एका विषयात हायेस्ट आणि एकात सरळ सरळ नापास, पण खत्रुड शिक्षकांना तीन टाइम कोलयचो, बोर्डाचे पेपर ते थोडी तपासणार होते? सगळे लोचे करुन पण आम्ही फर्स्ट क्लासात, सायन्सला दाबुन मार्क, कारण बायोलाजीचा असल्या थेरांमुळे झालेला फु़कटचा अभ्यास.

मनमोहन सिंघांच्या अर्थव्यवस्थेने पाय पसरायला सुरुवात केली, झी टिव्हिने दुरदर्शनला मागे टाकले अन ATN विकत घेउन त्याचा ETC मुजिक च्यानेल बनवला. रामसे हिरोइनिला बाथरुमात पाठवायचे सोडुन झी हॉरर शो मध्ये खरंच भीती वाटेल अशी भुतं दाखवु लागले. गोसावीवाडितले शीतल थेटर बंद होउन तिथे बियर बार सुरु झाला आन आम्हि ईटरनेटवर आलो. दुस-या विडोंमध्ये जाउन आम्ही पराकोटीच्या गोष्टी बघु शकतो पण खरं सागु? कांती शहा आणि सपनाच्या कामची सर नाहि येणार त्याला. कांती शहा तुला कसलाच एवार्ड कसा नाहि रे दिला त्यांनी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वसूल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खत्तरनाक प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कांती शहा तुला कसलाच एवार्ड कसा नाहि रे दिला त्यांनी?

कांती शहा, तुझ्या त्या सिरियल्स पाहून तुला अजूपर्यंत फाशी का नाही रे दिलं त्यांनी, असा विचार मनात घोळतो.
पण पुन्हा मग....

आम्ही थेटराच्या बाहेर, पुन्हा फेकुन दिलेले सेल किंवा दुधाच्या रिकाम्या पिशव्या गोळा करीत.

ही जर खरंच वस्तुस्थीती असेल तर मग, 'अरेरे' हा सोडून दुसरा कसलाच प्रतिसाद देता येत नाही. Sad
चूभू द्या घ्या....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यापेक्षा प्रतिक्रियेने मजा आली... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

_/|\_ महान प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वसूल.
धागा वसूल.
धागा वसूल.
धागा वसूल.
धागा वसूल.
धागा वसूल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सिनेमाची जाहिरात मी त्याच्या येण्यागोदर टीव्ही वर पाहिली होती. त्यावेळी आतासारखे प्रोमो ट्रेलर नव्हते. त्यामुळे ते जाहिरात म्हणून गाण्याचा एक तुकडा , कलाकारांवर फोकस असेच असायचे. आकर्षक बनवायला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यावेळी मी लहान म्हणजे सहावीत होतो . त्यावेळी सुद्धा त्या सिनेमाचा वेगळेपणा अर्थात जाहिरातीतून जाणवला तेवढा जाणवला. आमच्याकडे सिनेमा पाहणे म्हणजे चुकीची गोष्ट किंवा फार मोठी गोष्ट मानली जात नसे पण तरी सिनेमा म्हणजे एक करमणुकीची गोष्ट म्हणून थोड्या प्रमाणात पहायचे असाच दृष्टीकोण होता. आवडत्या कलाकारांचे किंवा खूप हिट झालेले असेच सिनेमे पाहिले जायचे.त्यामुळे मी तो पाहिला नाही. आणि त्यावेळी एका पेपरमध्ये त्याचे अत्यंत निगेटिव समीक्षण आले होते हे चांगले आठवते. असो.
तीन वर्षानी मी नववीत गेलो. तोपर्यंत मी बरीच बंधने सैल करून घेतली होती. एखादा सिनेमा पाहावसा वाटला तर पहायचो , टीव्ही वर उशिरापर्यंत जगणे वगैरे . त्या दिवशी स्पष्ट आठवते. मी अशीच कुठलीतरी सिरियल पाहायला म्हणून टीव्ही लावला होता. आणि चॅनेल बदलताना 'दिल चाहता है' जस्ट सुरू होत असताना दिसला. casually बघायला लागलो आणि बाकी विसरून तोच संपेपर्यंत बघत बसलो. जाणवले , हे खूप नवीन आणि मस्त आहे. आतापर्यंतच्या पाहिलेल्या सिनेमापेक्षा खूपच वेगळे. अत्यंत खरं. जणू काही आमच्यावरच कॅमेरा रोखला गेला आहे आणि आम्ही जे वागतो , जसे बोलतो तसे दाखवले जात आहे. त्या वयात शाळा आणि कॉलेज मधले अंतर धूसरच होते त्यामुळे त्यातले कॉलेज लाइफ परके वाटले नाही. पुढे अनेक वेळा हा सिनेमा पाहिला तरी नाही. ( कॉलेज मध्ये असताना आणि ग्रॅजुएशन झाल्यावर सुद्धा) . उलट इतर सिनेमातले कॉलेज सीन्स , मैत्री सीन्स , रीलेशन्स अत्यंत फिल्मी वाटले. हा सिनेमा कायम एकटाच बघत आलो आणि तेच आवडते. त्यावेळी तो सिनेमा फ्लॉप होता हे कळले तेव्हा आश्चर्य वाटले होते. ते समीक्षण आठवले की अजूनही हसू येते. अर्थात आता त्याला कल्ट स्टेटस आहे. नंतर जेव्हा मी पहिले तेव्हा नुसत्या फ्रेंडशिप या गोष्टीला धरून किती सुंदर पटकथा आणि दिग्दर्शन होते हे जाणवले आणि राहते. नंतर बॉलीवुड मध्ये रीयल सिनेमा वाढू लागला आणि कमर्शियल आणि थोड्याश्या ऑफ द रोड फिल्म मधील अंतर या 10 वर्षात बरेच कमी झाले यात बर्‍याच प्रमाणात 'दिल चाहता है' चा वाटा आहे असे माला तरी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दिल चाहता है' त्यावेळी फ्लॉप होता?! नाही बहुदा. आणि त्यात 'कॉलेज लाईफ' दाखवलंय?! नाही बहुदा. मला वाटतं, कॉलेजनंतरचं लाईफ आहे त्यात. तरूणांची गोष्ट आहे पण सो कॉल्ड कॉलेजकुमारांची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दिल चाहता है' मध्ये कॉलेज लाइफ दाखवले नाही हे बरोबर आहे पण काही सीन्स , नंतर येणार्‍या आठवणी आणि काही उल्लेख यावरून थोडी कल्पना येत होती. आणि नंतर जेव्हा वारंवार हा सिनेमा पहिला त्यावेळी कदाचित कॉलेज नंतर करायच्या गोष्टी आम्ही कॉलेज मध्ये करत असू म्हणून तो impact राहिला असेल कदाचित Biggrin पण हो , तो फ्लॉप होता हे मात्र खरे . महानगरे आणि आणि विकसित शहरे यात थोडाफार चालला पण तो सुदधा ओके टाईपच ! बाकी overall फ्लॉप होता . आता wiki ने पुन्हा बदलून नवीन आकडेवारी दिलेली आहे आणि superhit म्हणले आहे (आश्चर्य आहे कारण त्यांनीच यागोदर फ्लॉप म्हणले होते ) पण माझ्या तेव्हाच्या आठवणीप्रमाणे मी जिकडेतिकडे फ्लॉप झाला असेच ऐकले वाचल्याचे आठवते . (महानगरे सोडून )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीसीएच कुठला फ्लॉप? तूफान चालला. लोकांनी आणि समीक्षकांनी - दोघांनीही कौतुक केलं त्याचं जाम. (निगेटिव समीक्षण आलेला पेपर 'सकाळ' होता काय? तेच त्यातल्या त्यात शक्य वाटतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बरोबर आहे . बहुतांश समीक्षकांनी कौतुक केले आहे पण त्या काली तेच समीक्षण लक्षात राहिले आहे. असो. फ्लॉप च्या बाबतीत पुन्हा माझ्या आठवणीप्रमाणे मी तसेच ऐकल्या वाचल्याचे ठामपणे आठवत आहे . एक शंका : एखाद्या फिल्म ला कल्ट स्टेटस मिळाले म्हणतो तेव्हा तो पहिल्यांदा फ्लॉप किंवा कमी यशस्वी झालेला असतो का ?

तो समीक्षण वाला पेपर कुठला खरेच आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे वन अँड ओन्ली शोले. मी तो तब्बल ३५० वेळा पाहिलात आणि हा आकडा माझा नाही, मातोश्रींनी नोंद ठेवून केलेल्या हिशोबाचा आहे. (पैसे तीच द्यायची ना). आमच्या डोंबिवलीच्या टिळक टाॅकीजमध्ये एकदा शोले लागला होता. तो माझा मावसभाऊ आणि मी यांनी अनुक्रमे काॅलेज आणि शाळा बुडवून पाहिला होता. माझा चष्मा नेमका सकाळी फुटला. दुपारचा शो. माझ्याकडे एक अंतर्वक्र भिंग होतं. त्यातून बघितलं तर गोष्टी चष्म्यातून बघाव्यात तशा सुस्पष्ट दिसतात हा शोध नुकताच लागलेला होता. त्यामुळे मी आणि भाऊ - आम्ही दोघंही गेलो. मॅटिनीला म्हणून गेलो तर ३-६ च्या शोची तिकिटं मिळाली. तेव्हा त्या भिंगातून शोले पाहिला.
एकदा मोरादाबादला शोले पाहिला. आख्खं थिएटर संवाद म्हणत होतं. बायकासुद्धा. विचार करा. साडी नेसलेली, डोक्यावरून पदर घेतलेली बाई ' सुव्वर के बच्चों' म्हणून ओरडतेय.
बादवे, अंग्रेज लोग जब मरते है तो उसे सुसाइड कहते है - हा आॅलटाईम ग्रेट संवाद आहे, अगदी पूरे पचास हजार पेक्षाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्यांव!

म्हणजे वन अँड ओन्ली शोले. मी तो तब्बल ३५० वेळा पाहिलाय आणि हा आकडा माझा नाही, मातोश्रींनी नोंद ठेवून केलेल्या हिशोबाचा आहे. (पैसे तीच द्यायची ना). आमच्या डोंबिवलीच्या टिळक टाॅकीजमध्ये एकदा शोले लागला होता. तो माझा मावसभाऊ आणि मी यांनी अनुक्रमे काॅलेज आणि शाळा बुडवून पाहिला होता. माझा चष्मा नेमका सकाळी फुटला. दुपारचा शो. माझ्याकडे एक अंतर्वक्र भिंग होतं. त्यातून बघितलं तर गोष्टी चष्म्यातून बघाव्यात तशा सुस्पष्ट दिसतात हा शोध नुकताच लागलेला होता. त्यामुळे मी आणि भाऊ - आम्ही दोघंही गेलो. मॅटिनीला म्हणून गेलो तर ३-६ च्या शोची तिकिटं मिळाली. तेव्हा त्या भिंगातून शोले पाहिला.
एकदा मोरादाबादला शोले पाहिला. आख्खं थिएटर संवाद म्हणत होतं. बायकासुद्धा. विचार करा. साडी नेसलेली, डोक्यावरून पदर घेतलेली बाई ' सुव्वर के बच्चों' म्हणून ओरडतेय.
बादवे, अंग्रेज लोग जब मरते है तो उसे सुसाइड कहते है - हा आॅलटाईम ग्रेट संवाद आहे, अगदी पूरे पचास हजार पेक्षाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्यांव!

पुस्तकांचं एक बरं असतं- त्यांना वाट्टेल ते आणि वाट्टेल तेवढ्या स्केलवर लिहिता येतं. म्हणजे एखाद्या ओळीत " २००० फुटी प्रचंड असा तो कडा आणि त्यावरून कोसळणारा धबधबा बघताना शेवंता आणि चंपक मोहरून गेले".
पण ह्यावर सिनेमा काढायचा असेल तर शेवंता आणि चंपकसमोर तो २००० फुटावरून कोसळणारा धबधबा दाखवताना दिग्दर्शकाला भयानक उद्योग करावे लागतात- आणि एवढं करूनही बरेचदा ते सगळं खोटंच वाटतं.
असो.
तर सांगायचा मुद्दा हा की - ही असली अगडबंब दृश्यं कल्पनेतच बघावी लागत होती.
आजवर रामायणआणि महाभारत ह्या पातळीच्या स्पेशल इफेक्ट्सना पहात आलेल्या माझ्या डोळ्यांसाठी ही एक क्रांती होती.
----------
अशा वेळी मग ज्युरासिक पार्क पाहिला. नजर खिळणे, मंत्रमुग्ध वगैरे विषेशणं वापरून संपतील इतका भारी वाटला होता, म्हणजे काहीच्या काहीच. थेट्रातच बरेचदा पाहिला. मग येता जाता मित्रांसोबत त्या डायनोसॉरच्या चर्चा. नवनवीन (बरेचचे खोटे) "सॉरस" बनवून त्यांच्या सुरस कथा ऐकवणे, रॅप्टर्स म्हणजे काय चीज असते ते अज्ञानी जन्तेला सांगणे- असले उद्योग करून मी "ज्युरासिक पार्क" परत परत जगत होतो.
ते ३-४ महिने डायनोसॉरांतच गेले.
---------
इंडिपेंडन्स डे हा वेगळा प्रकार, पण कुठल्याशा स्टेशनात त्याचं पोस्टर बघून मी हबकून गेलो. थेट्रात चित्रपट सुरू झाला तेव्हा मी आनंदाने जवळपास रडलो असेन- नाही म्हणायला मी विज्ञानकथा वगैरे बर्‍याच वाचल्या होत्या, पण प्रत्यक्षात परग्रहवासी, उडत्या तबकड्या वगैरे प्रकार दिसतात कसे- ते अजून पाहिलं नव्हतं. बरं, एलियन, स्टार वॉर्स वगैरे त्या काळी दूरदर्शनवर लागतही नसत, त्यामु़ळे तिथेदेखील बोंबच होती.
त्यामुळे संपूर्ण शहराला व्यापू शकेल इतकी मोठी UFO, त्यावर विमानांनी केलेले हल्ले आणि एकदम खतरनाक एलियन्स - हे जाम आवडलं होतं.
त्यानंतर केबलवर पुन्हा बघण्यासाठी क्लास वगैरे बंक केल्याचंही आठवतं.
----------
पण हे दोन्ही चित्रपट बराच काळ नंबर १ होते ह्यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अशी सापेक्षानंदानं 'शरलॉक'च्या गेल्या सीझनात रडले होते. यंदा एकच एपिसोड असल्यामुळे आनंद अंमळ आटोक्यातच ठेवला होता. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आचरटकाकांनी आवरायची सूचना दिली आहे, पण राहवत नाही म्हणून आणखी एक.

बूमः हे पाखरू मजसि येईल काय कामा?

कॉलेजात एक अनिलकुंबळे होता. त्याला प्रथेप्रमाणे एक मुलगी आवडली. प्रस्तुत मुलगी तमाम कॉलेजात "काकू" म्हणून ओळखली जाई. म्हणजे तुळशीबागेत डेट आणि प्रभा डायनिंग हॉलमध्ये क्यांडललाईट डिनरला नेण्याइतपत काकू. त्यांच्या निवासस्थानाचा पिनकोड सांगायची गरज नसावी.

टोपणनावाला जागत अनिलकुंबळे एकदम सरळसोट माणूस. उसको उसके हाल पे छोड देते तर त्याने मोजून तीन शब्दांत काकूंना प्रपोज केलं असतं. असल्या मिताक्षरी प्रपोजलवर काकूंची रिअ‍ॅक्षन नकारार्थी असणार असा जनमताचा कौल पडला. मग काकूंना अनिलकुंबळेने सिनेमाला घेऊन जावं आणि आपली रसिक बाजू दाखवून मग प्रपोज करावं असं ठरलं.

असल्या उद्योगासाठी ईस्क्वेअर हे मान्यताप्राप्त थेटर होतं. बरे मराठी सिनेमे थेटरात पडीक असण्याच्या आधीचा हा काळ. मग तडजोड म्हणून "लेटेष्ट मूव्ही" असं ठरलं. पुढच्या रांगेत अनिलकुंबळे+काकू आणि मागे पाचसहा रांगा सोडून आम्ही बाकीचे हौसलाअफजलखान. एकाने जाऊन तिकीटं आणली. सिनेमा होता "बूम".

पुढचं वर्णन करण्यात अर्थ नाही. बूम सिनेमाच्या गुणवत्तेबद्दलची मतं आयएमडीबीवर वाचता येतील. उलगडणार्‍या एकेक सीननिशी काकूंची कानशिलं (बहुदा संतापाने) गरम होत गेली आणि अनिलकुंबळे इंचाइंचाने खुर्चीत खचत गेला. मागच्या अफजलखानांना मात्र सिनेमा बेहद्द आवडला होता. आपण इथे मित्राला धीर देण्यासाठी आलोय हे विसरून जोरजोरात कॉमेंटी, शिट्ट्या वगैरे चालू होतं. त्यातलं एक पवित्रा नावाचं पात्र जॅकी श्रॉफला टेबलाच्या खाली ब्लोजॉब देतं असं दाखवलं आहे. तेव्हा तर पब्लिक कहर पिसाळलं.

तरी काकूंनी आख्खा सिनेमा पाहून काढला. त्यांचं सिनेमाविषयीचं (आणि सिनेमाला आणणार्‍याविषयीचं) मत चेहर्‍यावर स्पष्ट लिहिलं होतं. अनिलकुंबळे उभरता रेपिस्ट असावा, किंवा गेलाबाजार त्याला काही विकृती असावी असे भाव होते. अनिलकुंबळेचा उरलासुरला धीरही खचला. हौसलाअफजलखानही परागंदा झाले होते. गुपचुप अनिलकुंबळे काकूंना गंतव्य स्थळी सोडून आला. होठोंकी बात होठोंमेंही रह गयी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला एका मित्राने "सिनेमा बघायला जाऊ" असं सुचवलं. आम्ही दोघंच 'हैद्राबाद ब्लूज २' बघायला गेलो होतो. मी थेट्रात जांभया द्यायला लागल्यावर त्यानेही "फार बोअर होतंय, निघूया" असं सुचवलं. तोपर्यंत तो बिचारा फार बुजून बसला होता.

तेव्हा तिथे मागे हौसलअफजलखान बसले होते का, त्या अनिल कुंबळेची मी काकू होते का हे माहित नाही. काकू आपल्या आपणच घरी गेल्या; पण तो बिचारा फार स्कँडलाईज झाला होता तेव्हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी अचरटकाकांना आवरण्याची आणि आबांना पिसाळण्याची विणम्र विनंती करीत आहे. 'उभरता' रेपिस्ट? हौसलाअफजलखान? कुंबळेकाकू? _/\_ आता 'बूम' पाहावा लागेल की हो आबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बूम सिनेमा अगदीच टूकार आहे. आम्ही कत्रीनाच्या ( तिचा पहिला सिनेमा आहे तो!) काही दृश्यांसाठी पाहिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आबाजींचा बाइस्कोप भलताच मनोरंजक आहे. आणिक गोष्टी पाहायला आवडतील.
लिखाणाच्या शैलीसाठी __/\__.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटल ऑफ द बल्ज
थेट्रात जाऊन चित्रपट पाहणे, आइस्क्रीम खाणे, इ. गोष्टी मजेची परमावधी होती असं मध्यमवर्गीय चाळीतलं घर. 'पुराव्यानं शाबीत करीन' म्हणण्याइतपत नसले तरी समग्र वि. श्री. जोशी, वि. स. वाळिंबे, सावरकर वगैरे वाचून इतिहासात रमणारे वडील. त्यांनी दाखवलेला ‌(नि तोही थेट्रात नेऊन‌‌‌ दाखवलेला !) एकमेव चित्रपट म्हणून हा चित्रपट स्मृतीत अजरामर राहील. ८४-८५ साल. मी, माझा भाऊ, वडील नि डोअरकीपर मिळून मोजून ७ जण प्रेक्षक. दादर पश्चिम स्टेशनजवळचे कोहिनूर थिएटर शेवटल्या घटका मोजत होते त्यावेळी. त्यामुळे आओ-जाओ-थिएटर-तुम्हारा अशी अवस्था. बसायला कडकडीत लाकडी खुर्च्या. बसल्यावर त्या किंचित वाकल्या की त्यांतल्या भेगा फाकत नि पाय हलवला, जरा नीट बसायला गेलं की नको तिथे अचूक नि असह्य चिमटे बसायचे. त्यातच मध्यंतरानंतर ढेकणांना सुगावा लागून त्यांच्याही चाव्यांची ('चावा'चे अनेकवचन) भर पडली. युद्धजन्य परिस्थिती प्रत्यक्ष सोसून पडद्यावर पाहिलेला पहिला युद्धपट. दुसरं महायुद्ध वगैरे काय होतं वगैरे माफक माहिती वडिलांनी दिलेली. रणगाड्यांचं पहिलं दर्शन. त्यानंतर संभाजी पार्कमध्ये प्रत्यक्ष रणगाडा पाहिल्यावर त्यात बसून 'बल्ज'मधले वाळवंटातले प्रसंग आठवून 'हे लोक तिथे कसे लढत असतील ना!' वगैरे अप्रूप वाटलं होतं.

मि.नटवरलाल / प्यार भुकता नहीं
वेगवेगळ्या सार्वजनिक गणपतींना जाऊन सजावट पाहण्याचे दिवस. चार इमारती सोडून पलीकडल्या बोळात मोठ्ठा पांढरा पडदा. मागे खटर्रर्रर्र आवाजात चाकांवर चालणारा प्रोजेक्टर. प्रोजेक्टर पडद्याच्या ज्या बाजूस त्या बाजूस अधिक गर्दी. पलीकडे बसणार्‍यांना उलटं कसं दिसत असेल, म्हणजे डाव्या हाताने डफली खाजवणारा अमिताभ उजव्या हाताने कशी खाजवतो (फक्त ऋषी कपूर डफली वाजवतो (उदा. डफलीवाले डफली बजा) - बाकी कुठलाही हिरो डफली खाजवतो अश्या गहन विषयांवर चर्चा झडण्याचा काळ होता तो‌) हे पाहण्याचं सुप्त आकर्षण असूनही मोक्याची पटकावलेली जागा सोडली तर पुन्हा मिळणार नाही या विचारांनी होत राहणारी चुळबूळ. जनरेटर हटकून बंद पडणे, महत्त्वाच्या प्रसंगांत प्रोजेक्टरसमोरून आल्यागेल्यांच्या सावल्या प(पा)डणे, पायाला मुंग्या येऊन ते निर्जीव होणे इ. गोष्टी झाल्याशिवाय त्याला गणपतीतल्या पडद्यावरचा शिनुमाचं सर्टिफिकिट मिळत नसे. मि. नटवरलाल, मिथुनचा प्यार भु(झु)कता नही, असे आणि इत्यादी पाहिलेले चित्रपट.

व्हिडीओ कॅसेट्वाले चित्रपट (एन्टर द ड्रॅगन, हिम्मतवाला)
सई परांजपेंच्या 'कथा' चित्रपटात जसे चाळीतले बाळ कर्वेंचे ते घर अल्ट्रामाड्रन असते (फोल्डिंग टेबल, सन्मायका लावलेली कपाटं, त्यातूनच एक दार सरकवलं की दिसणारा टीव्ही, वगैरे) तसे आमच्या चाळीत एक होते. चाळीतला पहिला टीव्ही (तोही 'सोनी'चा, तोही रंगीत), पहिला व्हिडीओ कॅसेट प्लेअर, पहिली दुचाकी/अ‍ॅम्बेसेडर वगैरे त्यांच्याकडेच आले. कुणाच्याही घराचं दार वाजवून शिरायचे नि आज्ज्यांकडून श्रीखंडाच्या वड्या, खारीक, दाणे असं खिशांत खुळखुळवायला मिळायचे ते दिवस. ह्या घरातला गृहस्थ चाळीतल्या पोरासोरांना गोळा करून कॅसेट लावून चित्रपट दाखवायचा. श्रीदेवी-जीतेंद्रचा 'लडकी नहीं तू लकडी का खंबा हैं, बकबक मत कर नाक तेरा लंबा हैं' नि 'तुम तर् तर् तर् दुम तर् तर् तर्, नैनों में सपना'वाला 'हिम्मतवाला' नि ब्रूसलीचा 'एन्टर द ड्रॅगन' वगैरे चित्रपटांची काही पारायणं तिथेच झाली. 'ड्रॅगन'मध्ये काही विशिष्ट वेळी निळे लाल दिवे असलेला, सिगरेट ओढत धूर करत विनाकारण हसणार्‍या बायका असलेला वगैरे प्रसंग चालू झाला की तो गृहस्थ वानप्रस्थाश्रम मोडमध्ये जाऊन 'काही नाही रे पोरांनो, मालिश करतात त्या बायका.. त्यात काय पाहायचं!' असं सांगून 'फॉरवर्ड' प्रसंग फॉरवर्ड करत असे. पोरांना ते मालीशप्रसंग काय ते कळायला बरीच वाट पाहावी लागली. ब्रूसली कसा सहा जणांना नूनचाकने लोळवतो वगैरे पाहणे नि त्या हत्याराला नूनचाक म्हणतात की नानचाकू वगैरे चर्चा अतीव गंभीरपणे होत. काही वेळा घरी जाऊन मोडक्या ब्याटींचे दांडे घेऊन त्याला दोरी बांधून कष्टममेड नूनचाक तयार करून आरशासमोर प्रात्यक्षिकं होत पण दांड्यांचा सणकून मार बसल्यावर ब्रूसलीविषयी आदर वाढे. पुढे कधीतरी तो प्लेअर बिघडला नि ते दुसर्‍यांकडे जाऊन रंगीत टीव्हीवर चित्रपट पाहणंही थांबलं. जाने कहाँ गये वह दिन वगैरे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिड्यो क्यासेटींवरून आठवलं आम्ही मैने प्यार किया नि त्यातली अंताक्षरी जवळजवळ पाठ होईपर्यंत बघितलेली.
त्याचं असं झालं की पुण्यात माझ्या आतेभावंडांसोबत मे महिना घालवत असु. तेव्हा आमची आत्या ऑफिसला जाताना आणखी एका (गावातील एका वाड्यात भाडेकरू म्हणून रहाणार्‍या) नातेवाईकांकडे आम्हा बच्चे कंपनीला सोडून जाई. त्या दुर्दुरच्या नातेवाईकांचा मोठा मुलगा मोठा झोलर! त्याने काहीबाही खुडबुड करून एक पिच्चरची क्यासेटच चोरलेली आणि त्याच वाड्यात (एकमेव) व्हीसीआर प्लेअर असणारे एकाचे घर आम्हाला दुपारी आंदण मिळाल्यासारखेच असे.. त्यानेही चोरून चोरून काय चोरले होते तर 'मैने प्यार किया' (अ‍ॅक्च्युअली त्याला दुसरी 'गंमत' चोरायची होती पण इतक्यात क्यासेट दुकानाचा मालक आल्याने जी क्यासेट हाती लागली ती अलगद ब्यागेत शिरली Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ड्रॅगन'मध्ये काही विशिष्ट वेळी निळे लाल दिवे असलेला, सिगरेट ओढत धूर करत विनाकारण हसणार्‍या बायका असलेला वगैरे प्रसंग चालू झाला की तो गृहस्थ वानप्रस्थाश्रम मोडमध्ये जाऊन 'काही नाही रे पोरांनो, मालिश करतात त्या बायका.. त्यात काय पाहायचं!' असं सांगून 'फॉरवर्ड' प्रसंग फॉरवर्ड करत असे.

आधुनिक मसाजपार्लरांनी काकांचे शब्द खरे करून दाखवले की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्यार भुकता नही......... आफ्टर लाँग टाइम भुकता म्हणणारा भेटला. हल्ली च्यायला हिंदीत पण झ मराठीसारखाच काढतात.

नायतर भील के उस पार वगैरे बरेच पिक्चर यायचे पूर्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(मलाही) व्हिड्यो कॅसेटवरुन एक आठवलं. नवे हिंदी चित्रपट आमच्या गावातील थेटरमध्ये लगेच येत नसत. अगदी सुपरहिट चित्रपट (मैने प्यार किया, प्यार किया तो डरना क्या, दिदु ले जायेंगे वगैरे) हे यायला तर सहा-आठ महिने लागत. गोविंदा-चंकी पांडेचा आँखे चित्रपट असाच तुफान हिट झाला होता (किंवा तशी वदंता होती). त्या चित्रपटाची व्हिड्यो कॅसेट बाजारात आली तरी थेटरात तो चित्रपट यायचं नाव नाही. आम्हा रसिकांना कॅसेटचं भाडं परवडलं असतं, तरी भाड्याने व्हीसीआर आणायला परवडला नसता. सुदैवाने गल्लीत एका सुखवस्तू फ्यामिलीच्या घरात नुकतंच लग्न झालं होतं. त्यांनी प्रथेप्रमाणे लग्नाचे सर्व सोपस्कार पुराव्यादाखल व्हिड्यो कॅसेटमध्ये रेकॉर्ड केले होते. ती व्हिड्यो कॅसेट फक्त घरातल्यांना दाखवण्याऐवजी गल्लीत सार्वजनिक दाखवा असा आग्रह सर्वांनीच धरल्याने खूष होऊन त्यांनी व्हीसीआर भाड्याने आणण्याचे कबूल केले. तेवढा लग्नाचा समारंभ सहन करावा लागला पण त्या निमित्ताने 'आँखे' पाहून आम्ही आमचे डोळे निवून घेतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेवढा लग्नाचा समारंभ सहन करावा लागला

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वस्तात सुटलात हो ! आम्हाला चित्रपट पाहण्याअगोदर व्हीसीआर भाड्याने आणणार्‍या मालकाच्या भावाच्या लग्नाची कॅसेट आणि त्यानंतर मालकीणबाईंच्या अ‍ॅपेंडीक्स का कसल्याश्या ऑपरेशनची कॅसेट बघीतल्याशिवाय सुटका नसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0