'आकाश' - अनास्था आणि भ्रष्टाचाराचा बळी?

'न्यू यॉर्क टाईम्स'नं 'आकाश' टॅबलेटच्या सद्यस्थितीविषयी दोन लेख नुकतेच प्रकाशित केले आहेत. त्यात अनेक धक्कादायक दावे आहेत :

सुरुवातीपासून गाजणार्‍या 'आकाश'ला आणि तो बनवणार्‍या 'डेटाविंड' या कॅनेडियन कंपनीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रकल्पात सहभागी असणार्‍या आय्.आय्.टी. राजस्थान आणि क्वॉड इलेक्ट्रॉनिक्स (भारतीय सबकॉन्ट्रॅक्टर) यांनी डेटाविंडकडे थकबाकी किंवा नुकसानभरपाईचे दावे केले आहेत. हजारो 'आकाश' धूळ खात पडले आहेत. प्रकल्प आता आय्.आय्.टी. मुंबईकडे हलला आहे. मानवी संसाधन विकास मंत्रालयाकडून झाल्या प्रकाराची नीट माहिती मिळत नाही आहे. आय्.आय्.टी. राजस्थाननं आपल्या चाचण्यांत ४ इंच पाऊस सोसण्याची क्षमता वगैरे निकष लावले. याउलट अशा क्षमता केवळ सैन्यासाठीच्या वापरात वगैरे अपेक्षित असतात आणि त्या पार करायच्या झाल्या तर किंमत खूप वाढेल असा डेटाविंडचा दावा आहे. अधिक माहितीसाठी मूळ लेखमाला वाचावी.
लेखांचे दुवे : भाग १ आणि भाग २

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

न्यूयॉर्क टाईम्स मधले दोन्ही लेख वाचले. माहितीपूर्ण आणि अर्थातच मनस्ताप वाटेल असेच आहेत.

हा विषय कुठल्याच भारतीय वर्तमानपत्रात कसा नाही ? की न्यूयॉर्क टाईम्सने काही investigative journalism केलेले आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टॅबलेट किंवा एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण अशा प्रकारे हाताळले जाण्याची अपेक्षा असते का?
Others were rejected when testers hung them from their power cords and shook the cords strenuously, and some tablets detached from the cords, he said.

हे सगळं मनस्ताप देणारंच आहे. आय्.आय्.टी. मुंबईतून काही बरी बातमी येईल अशी आशा सध्या करते आहे.

नोकियाचे काही फोन अशा प्रकारे पडले तरी व्यवस्थित काम करतात. माझ्याच हातून माझा फोन पहिल्या मजल्यावरून खाली झुडपातून जमिनीवर पडला. अजूनही दीड वर्षानंतर व्यवस्थित सुरू आहे. तो फोन तिथेच मेला असता तरी चूक माझीच होती. हा फोन २.५ जीच आहे आणि आकारानेही अगदी लहान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.