मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा, विषयक कथासूत्रांची तौलनिक चर्चा

मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हे कथासूत्र अनेक भारतीय कथांमध्ये सामायिक दिसत, भारतीय जन मानसावर या कथासूत्रांचा मोठा प्रभाव राहीला आहे.

१) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक भारतीय कथांची यादी/सूची करून हवी आहे.

२) भारताबाहेर अशी कथासूत्रे आहेत का ?

३) या कथासूत्रांचा माता पित्यांचा मूलगा हा मुख्य टार्गेट असतो. (मुलगी टार्गेट असलेली कथानके आहेत का ? असतील तर कोणकोण-ती ?)

(पहिल्या तीन प्रश्नांची उत्तर विकिप्रकल्पातून वापरण्याचा मानस असल्यामुळे तेवढ्यापुरती प्रतिसाद अंश प्रताधिकारमुक्त समजले जातील)

४) क्रमांक ३ च्याच प्रश्नाकडे सर्वसामान्य भारतीय स्त्री कोणत्या दृष्टीने बघत असे ? किंवा बघते ? किंवा त्याबाबत फारसा विचार भारतीय स्त्रीकडून होत नाही ?

५) क्रमांक ३ च्याच प्रश्नाकडे लिंगभाव अभ्यास अथवा स्त्रीवादी दृष्टीकोणातून कसे पाहिले जाऊ शकते ?

६) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक कथासुत्रांचे भारतीय जनमानसाच्या विचारप्रणाली/संकल्पनांवर कोण कोणते प्रभाव आणि संस्कार झाले ?

७) क्रमांक ६ च्याच अनुषंगाने मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक कथासुत्रांचा भारतीय जनमानसावरील प्रभाव २०व्या शतकानंतर ओसरू लागला आहे असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर त्याची कारणे कोणती ?

८) या कथा सूत्रांचे कालच्या आणि आजच्या कुटूंब संस्थेवरील संस्कार करणारे आणि तणाव आणणारे प्रभाव कोणते ?
* हाच प्रश्न जरा वेगळ्या प्रकारे मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा असा संस्कार स्विकारणारा भारतीय पुरुष आणि असे संस्कार कारण मुलगी म्हणून या कथासूत्रांची स्त्री हि टार्गेट नसते त्या दृष्टीने एक पत्नी म्हणून भारतीय पुरुषांच्या मनावरील प्रभाव भारतीय स्त्रीच्या मनावर असेलच असे नाही. विभक्त होत चाललेल्या भारतीय कुटूंबसंस्थेवर यामुळे तणावाचे प्रसंग येतात का ? येत असतील तर कोणत्या प्रकारे ?

९) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हि कथासूत्र जाणीवपुर्वक बिंबवली नाही तरीही अंशतः हि बुद्धी मानवाला उपजत असते का ? मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हि कथासूत्र जाणीवपुर्वक बिंबवलेला प्रभाव असलेला भारतीय समाज आणि तसा जाणीवपूर्वक प्रभाव नसलेला उर्वरीत भारतीय समाज आणि भारताबाहेरील समाज यांच्या आचार विचारात कोण कोणते फरक जाणवतात ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

वैचारीक चालना देणारा धागा आहे. मला तरी स्त्रीपात्र आठवत नाही ज्यांनी आई-वडीलांच्या वृद्धोपकाळाचा भार स्वीकारला. आणि अवांतर - आजूबाजूला गुजराथी लोकांत तर हेच पाहीलेलं आहे, की बायका अभिमानाने सांगतात- आमच्या घरी आले की आई-बाबा पाणीही पीत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही म्हणावयास, महाभारतातील ययातीची मुलगी माधवीचे पात्र -पितृआज्ञा झेलणारे या प्रकारात मोडते का ? असलेल्या कथेचे वर्गीकरण मुलगी टार्गेट असलेली कथानकात करता येऊ शकेल का माहित नाही. बहुधा अपवादात्मक कथानक (अर्थात अशी कथानके अजून कुणास आठवल्यास जरूर नोंदवावीत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

भारताबाहेर अशी कथासूत्रे आहेत का ?

ब्युटी अँड द बीस्ट मध्ये ब्युटी, वडीलांना भयाण व शापित राजवाड्यातून सोडविते व त्या जागी स्वतः बंदी होते. तिचा त्याग यात दाखविला आहे. एकंदरच गोष्ट विविध पात्रांच्या (ब्युटी व बीस्ट) त्यागावरती आधारीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत. पण तिसरा प्रश्न वाचल्यावर माधवीचं नाव तत्काळ आठवलं. ही ययातीची मुलगी. (होय, तोच. खांडेकरांनी मराठीत आणून बसवलेला.)

गालव नामक एक शाणपणा शिष्य ययातीकडे आला. त्याचा झोल असा झाला होता, की त्यानं विश्वामित्र या आपल्या गुरूला त्याची फी विचारली. विश्वामित्राला याची औकात ठाऊक असल्यामुळे त्याने म्हटलं, "नको रे काही. चल, तेरे को फ्री फ्री फ्री..." तरी गालवाच्या अंगात रेमंडचे किडे. "नाई! सांगाच्च!" मग विश्वामित्रानं भडकून त्याला म्हटलं, "८०० घोडे आण. घोडे पांढरे हवेत. पण कान मात्र काळे." विश्वामित्राला ठाऊक होतं, असे ८०० घोडे नाहीच्चेत. पण म्हणाला, इतके किडे आहेत ना अंगात. ज्जा - बस शोधत साल्या. गालवाची पाचावर धारण बसली. चार ठिकाणी माती खाऊन, मग तो झोळी पसरून ययातीकडे आला. तो तेव्हाचा पावरबाज राजा होता. पण आपल्याकडे घोडे नाहीत म्हटल्यावर गप र्‍हायचं की नाही? पण गप र्‍हाईल तर तो ययाती कुठला? त्याला दानाची खाज मोठी. त्यानं काय करावं? चक्क्क्क्क माधवी ही आपली तरुण मुलगी गालवाला दिली आणि सांगितलं, "हिच्या बदल्यात काय ते घोडेबिडे मिळव. काम झालं की हिला परत आणून घाल."

माधवीनं बापाची आज्ञा शिरसावंद्य मानून गालवाच्या मागे प्रयाण केलं. आणि पुढे तिचं जे काय झालं ते झालं... बाकी या असल्या कथांचे प्रभाव आहेत की नाहीत, नाहीत ते बरं की वाईट, या नेहमीच्या जांगडगुत्त्यात शिरायचा कंटाळा आलाय. त्यामुळे ते मरोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१) या धागालेखाचा विषय असलेली भारतीय कथासूत्रे (narratives) भारतवर्षात मोठ्याप्रमाणावर प्रसृत होण्याच्या मागे केवळ आदर्श हि एकच भावना असावी का ? आदर्श समोर ठेवणे एवढी मर्यादीत भूमिका असेल तर थोडी कथानके पुरतात पण भारतात अशा कथासूत्रांची भरपूर भरमाड आहे त्या मागे असुरक्षीततेची भावना असण्याचीही शक्यता असू शकेल का? खास करून ब्रह्मचर्य आणि संन्यास याचही समाजात मोठ प्रस्थ असे आणि ब्रह्मचर्य आणि संन्यास narrativesचा सामना करण्यासाठी मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हि narratives वापरण्या मागचा सुप्त उद्देश असू शकेल का ?

२) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हि नरेटीव्हज भक्ती संप्रदायाकडून प्रभावीपणे पोहोचवली गेली, कदाचित हे जाणीव पुर्वक असेल अथवा नसेल पण भावनेला हात घालणारी हि कथासूत्रे जैन आणि बौद्धधर्माशी स्पर्धात्मक दृष्ट्या भक्ती संप्रदायास ऊपयूक्त ठरली असू शकतात का ?

३) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा बद्दलची भारतीय कथासूत्रे भक्ती संप्रदायाच्या मार्फत भारतातील ज्युडायीक धर्मीय परंपरा पाळणार्‍यांपर्यंत यशस्वीपणे का पोहोचू शकली नसावीत ?

याच्याच जोडीचा प्रश्न भारतातील ज्युडायीक धर्मीय परंपरा पाळणारे पुर्वाश्रमीचे हिंदू असण्याची मोठीच शक्यता आहे. बहुतांश मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा कथासूत्रे जी सर्वसाधारणपणे व्यक्तीगत जिवनशैली आणि घराघरात सांगीतली जात ती कथासूत्र परंपरा धर्म म्हणून नसेल ठिक पण संस्कृतीक प्रभाव म्हणून ज्युडायीक धर्मीय परंपरा पाळणार्‍यांच्या घरात का पोहोचू आणि टिकू शकली नसावी ? हा मुद्दा आणखी जरा स्पष्ट करतो जसे की शास्त्रीय संगीत, बांगड्या, मेंदी या गोष्टी परधर्म स्विकारूनही अपवादाने का होईना राहू शकल्या. हजार कथानके त्यांच्या घरात टिकल नाहीत ठिक पण हजारो लोकांच धर्मांतर व्हाव आणि लोककथेच स्वरूप आलेली कथासूत्रे अपवादम्हणूनसुद्धा धर्मांतरीतात पोहोचू आणि टिकू शकली नाहीत असे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

>>मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक कथासुत्रांचा भारतीय जनमानसावरील प्रभाव २०व्या शतकानंतर ओसरू लागला आहे असे तुम्हाला वाटते का ?

दवणे जिवंत आहेत अजून....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दवणे ? ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पीएसपीओ नै जान्ता काय रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दवणे - पीएसपीओ किस पंखेकी कंपनी के साथ चलता है औsर उसका फक्शंन क्या हई ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

प्रवीण दवणे हे नाव सर्चवा, त्यांच्या लिखाणाचे दोनचार नमुने वाचा. जगलावाचलात तर बोलूच मग. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि माहीतगारकाका, पतीची आज्ञा मानणार्‍या बायका लई सापडतील की. की त्या नाही बसत तुमच्या कोष्टकात? ही भली मोठी यादी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL
तुम्ही वेगळ्या अर्थानी घेतल पण माझा अंदाज होता की 'मातृभक्ती सोबत मातृआज्ञा येत नाही तर पितृआज्ञा येते कारण पती परमेश्वर हे कथासूत्र' असे कुणी उत्तर देईल पण असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.