मोकळं मोकळं वाटतंय
टाचांच्या भेगा झोंबत नाहीएत
गुडघे दुखत नाहीएत
पाठीतून कळ येत नाहीए
सततचा खोकला थांबला एकदाचा
जवळचं लांबचं सगळं व्यवस्थित दिसतंय आता
हातपाय थरथरत नाहीत
छातीत दुखत नाही
सारखं लघवीला लागल्यासारखं वाटत नाहीए
डोकं जड जड झाल्यासारखं वाटत नाहीए
प्रकाशाचा त्रास होत नाही
कान किटत नाहीत
भाजतसुद्धा नाहीए अजिबात...
मोकळं मोकळं वाटतंय
प्रतिक्रिया
खपल्यावर
मोकळ मोकळ वाटतय असय वाटत हे?
.... छान !
....
छान !
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
मला वाटलं तुमचं नाव दुटांगी
मला वाटलं तुमचं नाव दुटांगी धोतर आहे ना म्हणून धोतर नेसल्याने सगळं कसं मोकळं मोकळं वाटतंय.
-अनामिक
कुणिएक, ह्म्म. मनीषा, थॅंक्यु
कुणिएक,
ह्म्म.
मनीषा,
थॅंक्यु.
अनामिक,
हाहा.
हे अस कधिपासून वाटतय हो ???
हे अस कधिपासून वाटतय हो ???
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
दुटांग्या
दुटांग्या, बरी केलीस हो कविता. सुरुवातीला वाचून वाटले की आमच्या 'ह्यां'नीच केलेय की काय हे काव्य ? पण ह्यांचा उभा जन्म गेला सरकारी फायली वाचण्यात्.असो. कैलास जीवन्,झंडु बाम्,अमृतांजन्,त्रिफळा चूर्ण तू ही जवळ बाळगतोस असे दिसतेय.
रमाबाई
अरेरे
अरेरे! कै?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असेच म्हणतो -
म्हणजे हिंदू असणार बहुतेक. "नाहीतर श्वाससुद्धा गुदमरत नाहीये अजिबात" असे काहीतरी आले असते.
श्रीराम जय राम जयजयराम!