Skip to main content

कलाकार

Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी

Five point someone,Three mistakes of my life,2 states यासरख्या मनोरंजक कादांबर्‍या वाचल्यानंतर प्रकाशना पुर्वीपासुन गाजत असलेले आणि प्रकाशनानंतर best seller असलेले Half girlfriend कसे असेल याबद्दल उत्सुकता होती.चेतन भगतच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गोष्ट सांगतो ती तुमच्या आमच्या सारख्याच एखाद्या मुलाची,म्हणजे त्याच्या कथेतील नायक हा काही फार मोठा तीर मारणाराही नसतो आणि दुखः,दैन्य,दारिद्र्याने ग्रासलेला-अन्याय सहन करणारा बिचारा वैगेरे ही नसतो.म्ह्णुनच त्याच्या गोष्टींशी आपण सहजपणे जोडले जातो.

समीक्षेचा विषय निवडा

रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन

२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्‍या "रिंगण" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या "सावित्री"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या "बहुत रात हो चली है" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या "रात्र काळी" या नाटकाचे नाट्यवाचन होते.
=======

समीक्षेचा विषय निवडा

झिम्मा

झिम्मा हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र वाचले .
शेवटी मात्र मनात तरळत राहतो तो बाईनी सांगितलेला पिकासो चा कोट . ''सर्व कला म्हणजे धादांत खोटेपणा आहे , जी अंतिम सत्याकडे घेऊन जाते ''.
बाईनी नाट्य ,कला क्षेत्रात भरपूर , जबरदस्त काम केलंय . विजु जयवंत असल्याचा पार्ट जरा कंटाळवाणा वाटतो . विजु खोटे झाल्यापासून मात्र वाचायला मजा येते. सर्वच नाटकांची छान सखोल माहिती मिळते . रंगायन चळवळीचा इतिहास कळतो .
तेंडूलकर आणि एलकुंचवार असे नाटककार आणि त्यांना न्याय देणाऱ्या बाई हे कॉम्बो उत्तम आहे .

समीक्षेचा विषय निवडा

भास्करबुवा बखले: भरभरून देणारे संगीतज्ञ

p2 शैला दातार यांनी लिहिलेल्या भास्करबुवा बखले यांच्यावरील ‘देवगंधर्व’ हे ‘राजहंस’ने प्रकाशित केलेले चरित्र वाचताना संगीत व नाट्यक्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबरोबरच एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा वाचकांना प्रत्यय येतो. ह्या दोन्ही क्षेत्रांतील बेभरवशांच्या जीवनपद्धतीची माहिती असूनसुद्धा आपल्यातील माणुसकीला धक्का न लावता एक निकोप जीवन जगलेल्या भास्करबुवांचे यथार्थ चित्रण लेखिकेने फार सुंदरपणे उभे केले आहे.

समीक्षेचा विषय निवडा

भेटीत तुष्टता मोठी!

'कुमारस्वर, एक गंधर्वकथा' हे कुमार गंधर्वांचं चरित्र माधुरी पुरंदरेंनी लिहिलं आहे. या वर्षी कुमार गंधर्वांची जन्मशताब्दी आहे. त्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत. हे पुस्तकही त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारं आहे. पुस्तकात कुमारजींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर बेतलेली चंद्रमोहन कुलकर्णींनी चितारलेली अप्रतिम चित्रं आहेत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, की हे चरित्र लहान मुलांसाठी किंवा कुमारवयीन मुलांसाठी लिहिलेलं आहे. आठ वर्षांच्या मुलाला ते वाचून दाखवताना आलेले अनुभव सांगताहेत सई केसकर.

समीक्षेचा विषय निवडा

सिनेसंगीताच्या अनोख्या जगामध्ये...

गाणं आवडत नसेल असा माणूस विरळाच. गाण ऐकणं आणि गुणगुणणं हे बहुतेकांना आवडतं. गाण्याची उपजत आवड असणारे पुष्कळ असतात आणि आपल्यावर संस्कार करून घेत आपल्या रसिकतेची कक्षा रुंदावणारेही पुष्कळ असतात. गाणं साऱ्या खंडामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. मानवी जगण्याला इतकी लगत चिकटलेली, सातत्याने चिकटलेली कला दुसरी क्वचितच कुठली नसेल....
--- नवे सूर अन् नवे तराणे या पुस्तकाच्या पान चारवरून

समीक्षेचा विषय निवडा

प्रज्ञावंत पिकासो

माधुरी पुरंदरे लिखित 'पिकासो' पुस्तकाचा अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेला परिचय विश्वकर्मा पब्लिकेशन्सकडून लवकरच येत असलेल्या ‘ग्रंथांचिया द्वारी’ पुस्तकातून.

समीक्षेचा विषय निवडा

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.