दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२४ मे
जन्मदिवस : तापमान मापनाची पद्धत सुचवणारा दानियल फॅरनहीट (१६८६), डॉक्टर शास्त्रज्ञ व ले. कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर (१८४९), संगीतकार क्रांतिवादी कवी, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उद्गाते काझी नझरूल इस्लाम (१८९९), टेनिसपटू सुझन लेंग्लेन (१८९९), जादूगार रघुवीर भोपळे (१९२४), नोबेलविजेता कवी जोसेफ ब्रॉड्स्की (१९४०), संगीतकार, गायक बॉब डिलन (१९४१), पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ (१९४२), अभिनेता आल्फ्रेड मोलिना (१९५३), संगीतकार राजेश रोशन (१९५५)
मृत्युदिवस : सूर्यकेंद्री विश्वाचा सिद्धांत मांडणारा निकोलस कोपर्निकस (१५४३), जाझ पियानोवादक व संगीतकार ड्यूक एलिंग्टन (१९७४), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम (१९९९), कवी मजरूह सुलतानपुरी (२०००), सौंदर्यसमीक्षक रा. भा. पाटणकर (२००४), अभिनेता तपन चॅटर्जी (२०१०)
---
स्वातंत्र्यदिन : इरित्रिया (१९९३)
राष्ट्रकुल दिवस
१६८९ : इंग्लंडच्या पार्लमेंटने 'अॅक्ट ऑफ टॉलरेशन' संमत केला. अँग्लिकन चर्च मान्य नसलेल्या प्रॉटेस्टंटांना त्यामुळे संरक्षण व मर्यादित हक्क मिळाले. कॅथॉलिक वा नास्तिकांना त्यात समाविष्ट केले नव्हते. तरीही, परधर्माविषयीच्या मर्यादित सहिष्णुतेला त्यामुळे संसदीय मान्यता मिळाली.
१८४४ : मोर्सकोड वापरून पहिला तारसंदेश पाठवला गेला.
१९४० : इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.
१९७६ : लंडन ते वॉशिंग्टन डी.सी. अशी कॉँकॉर्ड विमानसेवा सुरू
१९९३ : मायक्रोसॉफ्टने विण्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
१९९९ : द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सर्बियन राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिचला कोसोव्होतील युद्धगुन्हे आणि मानवतेविरोधातले गुन्हे यांबद्दल दोषी ठरवले.
२००० : इस्रायलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- मिसळपाव
- मार्मिक गोडसे