दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ जून
जन्मदिवस : अर्थशास्त्रज्ञ अॅडम स्मिथ (१७२३), अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (१८८३), भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक ना. म. जोशी (१८७९), संगीतकार, पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे (१८८१), कवी व नाटककार फेदेरिको गार्सिया लॉर्का (१८९८), अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेश रंगोजी भिडे (१९०९), 'पटावरील प्यादे' या सडेतोड आत्मकथनाच्या लेखिका यमुनाबाई विनायक खाडिलकर (१९१८), कुस्तीगीर हरिश्चंद्र बिराजदार (१९५०), सॅक्सोफोनवादक केनी जी (१९५६)
मृत्युदिवस : कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर (१९४३), इतिहास संशोधक ग. ह. खरे (१९८५), साहित्यिक आचार्य कुबेरनाथ राय (१९९६), संत साहित्याचे गाढे अभ्यासक व मराठीतील आद्य 'दिनविशेष'कार डॉ. प्र. न. जोशी (२००४), लेखक रे ब्रॅडबरी (२०१२)
---
जागतिक पर्यावरण दिन
राष्ट्रीय दिन : सेशेल्स, डेन्मार्क
१८५१ : हॅरिएट बीचर स्टो यांची गुलामगिरीच्या विरोधातील कादंबरी 'अंकल टॉम्स केबिन' वृत्तपत्रात क्रमशः प्रकाशित होण्यास सुरुवात.
१८८३ : युरोप मध्यपूर्वेला जोडणारी 'ओरिएंट एक्सप्रेस' आगगाडी सुरू.
१९१५ : डेन्मार्कच्या नव्या संविधानानुसार स्त्रियांना मतदानाचा हक्क.
१९४७ : युद्धात बेचिराख झालेल्या युरोपच्या पुनर्निर्माणासाठीचा 'मार्शल प्लॅन' जाहीर.
१९५६ : 'हाऊंड डॉग' गाण्यात एल्व्हिस प्रेस्लेने आपली विख्यात कंबरेची प्रक्षोभक हालचाल प्रथम सादर केली.
१९६७ : इस्राएलचा इजिप्तवर हल्ला; 'सहा दिवसांचे युद्ध' सुरू.
१९६८ : दिवंगत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे भाऊ व डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार रॉबर्ट केनेडी यांच्यावर खुनी हल्ला; एका दिवसानंतर मृत घोषित.
१९७५ : 'सहा दिवसांच्या युद्धा'मु़ळे बंद पडलेला सुएझ कालवा पुन्हा खुला.
१९८१ : अमेरिकेतील Center for Disease Controlने लॉस अँजेलीस येथे समलिंगी पुरुषांमध्ये एका दुर्मीळ न्यूमोनियाचा प्रादुर्भाव होत असल्याचे नमूद केले. 'एड्स'ची ही सुरुवात होती.
१९८४ : इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरावर हल्ल्याचे आदेश दिले.
१९८९ : जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'त्रिशूल'ची यशस्वी चाचणी.
१९९५ : बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट प्रथम निर्मिती.
२००२ : मोझिला ब्राऊजरची प्रथम आवृत्ती उपलब्ध.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- चिंतातुर जंतू
- १.५ शहाणा