पुस्तक परिचय

देव्युपासना: बंगाली कविता:- भाग २

कवितांचा आढावा घ्यायचा तर इतके विविध भाव कालीच्या कवितांमध्ये आढळतात की सगळ्याकरता एकेक बकेट करावी लागेल आणि मग परत कुणाचा पायपोस कुणास उरणार नाही. तरी स्थूलमानाने पुस्तकामध्ये कवितांची वर्गवारी केलेली अहे तदनुसार कविता येत जातील. कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ नये म्हणुन प्रत्येक कवितेतील, काही ओळी गाळलेल्या आहेत.
पहीला प्रकार आहे ज्यात कवि त्याच्या मनामध्ये देवीचे रुपडे, तिची प्रतिमा पहातो आणि ती जशीच्या तशी कवितेत उतरविण्याचा प्रयत्न करतो. आता देवीच अशी रौद्र म्हटल्यावर या प्रकारातील बहुसंख्य कविता या तिचे रणांगणातील भीतीदायक रुप वर्णन करणार्‍याच आहेत.
महाराजाधिराज महताबचंद यांची-
.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

देव्युपासना: बंगाली कविता:ओळख - भाग १

https://lh3.googleusercontent.com/-EPZTTezv1VE/UAt3xAvrTNI/AAAAAAAAPmU/HTBAOL39f6YVlCHbxTJegyhf_6hVYTzzgCCo/s512/12.jpg
.
कलकत्ता या नावचा उगमच मुळी "काली" या नावाशी आहे. अर्थात कल्कत्त्यामधील दुर्गापूजा, कालीपूजा, शाक्त, तंत्र संप्रदाय आदिंची माहीती देणारी काही पुस्तके आधाशासारखी वाचून काढली, त्यातीलच गोळा केलेली माहीती या भागात देते आहे.
.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाक-साहित्य संपदा

रविवारी आशुतोष जावडेकर यांचा लोकरंग पुरवणीतील 'वा! म्हणताना… 'हा लेख वाचला आणि माझ्या कडील पाक-साहित्य संग्रह खूप दिवसांनी हाताळला. तेव्हा लक्षात आले की हल्ली बाजारात पाककृतीच्या पुस्तकांचे पेव आले आहे. काय बरे घेऊ मी? ह्या विचाराने नवीन पीढी बावरून जात असेल. तर माझ्या कडील पाक-साहित्य संपदेतील काही आवर्जून उल्लेख कराव्या अशा पुस्तकांचा मागोवा घेणारा लेख मी लगेचच लिहिला. तो इथे देत आहे. कोणाला उपयोग झाला तर आनंदच वाटेल मला.

पाक-‘कला’आहे, पाक-‘शास्त्र’ आहे. अशा या कलेविषयी आणि शास्त्राविषयी मुबलक साहित्य मराठीत उपलब्ध आहे. पाक-‘साहित्य’!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सौंदर्यलहरी - भाग १

http://www.vedicbooks.net/images/saundaryalahari_of_Sri_Sankaracarya%20(Shankaracharya)_medium.jpg
वर उधृत केलेले, "सौंदर्यलहरी" ची मीमांसा करणारे एक इंग्रजी भाषेतील पुस्तक ""सौंदर्यलहरी - inundation of divine splendour" पुस्तक" परत वाचते आहे. फार पूर्वीपासून त्याचा जमेल, झेपेल तितका अनुवाद येथे माहीती म्हणून देण्याची इच्छा होती. आजपासून ती सुरुवात करते आहे. १०० श्लोक आहेत. जमेल तसा अनुवाद लिहीत जाईन. हाच धागा वेळोवेळी संपादित करीत राहीन. असे प्रत्येकी १० श्लोकांचा एक भाग असे भाग काढत राहीन.
________________

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पुस्तक ओळख - Diffusion of Innovations

एखादे innovation अर्थात नावीन्यपूर्ण कल्पना जनमानसात कशी रुजते. ती स्वीकारली जाते अथवा नाकारली जाते जाते का? असल्यास कारणे व त्या निर्णयामागील विचारप्रक्रियेचे घटक यांचे सखोल मीमांसा करणारे एक अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक माझ्या वाचनात आले. Diffusion of Innovations, 5th Edition: Everett M. Rogers हे पुस्तक फार आवडले. विशेषतः व्यासंगपूर्ण भाषा, कल्पना व अतिशय प्रभावी कल्पना, सोप्या शब्दात मांडण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.

.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी

पुस्तक परिचय - अंधार छाया

प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी आत्मनिवेदनात्मक, सत्य घटनेवर आधारित कादंबरी... कै ती दादांना व कै आईस सादर समर्पित...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - २: अनुभव

दीप्ती राऊत यांची 'जातीच्या जोखडात' ही डायरी विलक्षण हादरवून सोडणारी. अगदी क्वचित येणारं एखादं मूल्यमापनात्मक वाक्य वगळता, 'जसं पाहिलं तसं' नोंदवत गेल्याने नोंदींच्या पक्षपातीपणाचा/झुकलेपणाचा आरोप टळतो आणि मूळ घटनांमधील रखरखीत वास्तव थेट तुमच्या मनावर आघात करते.

मयुरेश प्रभुणे यांची मंगळ मोहिमेबद्दल माहिती सांगणार लेख अभ्यासपूर्ण विस्तृत नि सांगोपांग.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - १: अक्षर

निळू दामलेंचा 'पंतप्रधान विकणे आहे' हा लेख नेत्याचे मार्केटिंग या अभिनव कल्पनेचा वेध घेणारा आहे. परंतु हा बव्हंशी तपशीलाच्या, माहितीच्या पातळीवरच राहतो. विश्लेषण, विवेचन फारसे खोल जाताना दिसत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - पुस्तक परिचय