Skip to main content

द मेझनीन

नाड्या बांधणे, बांधता येणे, बांधलेल्या नाड्या सोडता येणे (हे जास्त महत्त्वाचं आहे), गरज पडल्यास नाड्या आवळता येणे - या सगळ्याचा आपणच विचार केला आहे असं वाटून स्वतःच्या या (निरुपयोगी) निरीक्षणशक्तीबद्दल अनभिज्ञपणे समाधानी असताना  माझ्या हातात ‘द मेझनीन’ हे निकोलसन बेकरचं पुस्तक पडलं. तुम्हाला जर रोजच्या आयुष्यातल्या अतिशय फालतू गोष्टीचा खोलात जाऊन अतिविचार करायची सवय असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.

वाहवा वाहवा

काही वर्षांपूर्वीची गोष्ट.

"अहो सिंधुआज्जी, ही सुटाबुटातली माणसं आलीयेत दोन. तुमच्या घरी यायचं म्हणताहेत," सोसायटीच्या वाॅचवुमनचा फोन आला.

"सुटाबुटातल्या माणसांना प्रवेश निषिद्ध!" सिंधुआज्जींनी उत्तर दिलं, आणि स्वतःशीच गगनभेदी स्मितहास्य करून मग पुस्ती जोडली, "पण बूट बाहेर काढले तर सुटातल्या माणसांचं स्वागत आहे."

पाहुण्यांचं स्वागत झालं. चहा झाला. नवलकोल आणि बेळगावी कुंदा झाला. आणि मग चर्चेला सुरूवात झाली.

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी:

1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही.

2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं

समाजहिताच्या आंदोलनात भाग घेतलेल्या कामत जोडप्यांचे कार्यचरित्र

या कॉफी टेबल टाइप कन्नड भाषेतील पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. ए आर वासवी यानी विचारल्याप्रमाणे २१व्या शतकातील समाजहितासाठीच्या चळवळी व आंदोलनं यशस्वी होण्यासाठी परंपरागत क्रांतीकारी सिद्धात व त्यासाठी चोखाळलेल्या नेहमीच्या मळलेल्या वाटा पुरेसे ठरतील का? नवीन तंत्रज्ञान व त्यास अनुसरून बदलत असलेली समाजाची मानसिकता व दैनंदिन व्यवहार यांच्यासाठी नेमके काय करता येईल? भांडवली जगात वावरत असताना कार्यकर्त्यांचे वैयक्तिक जीवन कसे असावे? वंचित, दलित, कष्टकरी, इत्यादी आर्थिकरित्या मागासलेल्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या चळवळीत परिणामकारक लवचिकता कशी आणता येईल?

बखरीच्या पानाआड

बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर

प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून

जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी

बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
मला भुलवी गारूड

त्यजली एक भावना..

त्यजली एक भावना..

सुट्टीचा दिवस नुकताच सुरू होत होता. साहजिकच आराम होता. कामं आटोपती घेण्याची घाई नव्हती. कानांवर एकाएकी जर दुर्मिळ पक्ष्याचं गुंजन पडलं, तर त्याचा निसर्गाच्या सान्निध्यात वेध घ्यावा इतका वेळ हातात होता. सुंदर दिवस जाण्याची संभावना होती‌. अशाच वेळी नेमकी अघटीत काही घडण्याची धाकधूक मनात जागृत होत असते. दचकण्याची इतकी सवय जडलेली असते की, वरवर कुणाला तसे दिसूनही येणार नाही.

श्री. सुधीर फडके : स्वरसम्राटाचा अविस्मरणीय वारसा

भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव म्हणजे श्री. सुधीर फडके, अर्थात ‘बाबूजी’. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. आज त्यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संगीतमय जीवनाचा आणि अमूल्य योगदानाचा मागोवा घेणार आहोत.

बालपण व संगीताची सुरुवात 

‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न

जगभरातल्या लाखो चाहत्यांचा लाडका, हेवी मेटल संगीताचा अनभिषिक्त सम्राट ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न याचं ७६व्या वर्षी निधन झालं आहे. त्याचा हा अल्पपरिचय.

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.