उच्च शिक्षणातील वास्तव: चिमण्यांना घारीचे पंख देण्याचा प्रयोग?
( हा लेख कुणाच्याही बाजूने पक्ष घेण्यासाठी नाही, तर शिक्षण क्षेत्रातील गंभीर परिस्थितीची वास्तवता स्पष्ट करण्यासाठी लिहिला आहे.)
काही दिवसांपूर्वी एका निवृत्त अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेत माझ्या मित्राच्या भावाची कथा सांगितली. तो हुशार होता. आरक्षण आहे म्हणून वयाच्या तिशी उलटेपर्यंत परीक्षा देत राहिला. नंतर निराश होऊन डिप्रेशनमध्ये गेला. घरचा आणि हितचिंतकांचा सपोर्ट असल्याने तो डिप्रेशनमधून बाहेर पडू शकला. तीस उलटल्यावर मेहनतीचे काम शिकणे ज्यांना संभव नाही, असे लाखो तरुण रस्त्यावर येतात. कथा ऐकल्यावर ते म्हणाले, “चिमण्यांना घारीचे पंख लावले, तर त्या उंच आकाशात उडू शकणार नाहीत; उलट मरून जातील.” उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि आरक्षणाचा मुद्दा आज याच वास्तवाभोवती येऊन ठेपला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ताणतणाव, कौटुंबिक व आर्थिक दबाव किंवा प्रचंड स्पर्धेमुळे शिक्षण अर्ध्यावरच (ड्रॉपआउट) सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, यामध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे; जे या शिक्षणप्रणालीतील गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकते.
जे विद्यार्थी आयएएस आणि आयआयटीसारख्या इत्यादी कठीण परीक्षा देतात, त्यांच्यात योग्यता निश्चित असते. आरक्षणाची कट-ऑफ(10-15 %), वयोमर्यादा (कुशलता क्षेत्र सोडून) एमटीएस–आयएएस (२५–३०) आणि प्रयत्न करण्याच्या संख्येवर मर्यादा (परीक्षेनुसार २–५) ठेवण्याची गरज आहे. अयशस्वी होणारे योग्य वयात दुसरा मार्ग शोधू शकतात. नवीन नोकरीत ३० वर्षांपुढील उमेदवारांना प्राधान्य मिळत नाही, हे नोकरी बाजारातील वास्तव आहे.
आयआयटी केस आणि परिणाम
आधी अनेक वर्षांपूर्वी एक ऐकलेला किस्सा. नोकरी लागल्यावर एका शिक्षिकेने सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी आणि अभ्यासात सुधारणा करण्यासाठी कडक भूमिका घेतली. पहिल्याच परीक्षेत तिने कठीण निकाल लावला, तेव्हा मुख्याध्यापकांनी तिला फैलावर घेत खडे बोल सुनावले, “तुम्हाला येथे विद्यार्थ्यांना कुंभारासारखे माठ घडवण्यासाठी नाही, तर सरसकट पास करून कोर्स पूर्ण करण्यासाठी ठेवले आहे; जर मुलांनी नापास होऊन उद्या कायदेशीर खटला केला, तर तुम्हाला वाचवायला कोणीही पुढे येणार नाही!” अधिकांश राज्यांमध्ये दहावीच्या परीक्षेचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक असतो.
प्रा. शिरीष केदारे यांना ऊर्जा विज्ञान व सौर तंत्रज्ञानातील संशोधनासाठी डॉ. पी. के. पटवर्धन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अवॉर्ड, डिपार्टमेंटल एक्सलन्स इन टीचिंग अवॉर्ड तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कार व पेटंट्स मिळाले आहेत; तर प्रा. सूर्यनारायण डूलल्ला यांना उत्कृष्ट अध्यापनासाठी ‘प्रोफेसर एस. पी. सुखात्मे एक्सलन्स इन टीचिंग अवॉर्ड’ (२०२१), ‘आयआयटी बॉम्बे एक्सलन्स इन टीचिंग अवॉर्ड’ (२०१७), तसेच सुरुवातीच्या संशोधन काळात ‘यंग फॅकल्टी अवॉर्ड’ आणि IEEE कडून सन्मान प्राप्त झाले आहेत.
एका मुलाने निराश होऊन आत्महत्या केली त्या नंतर जे काही मुंबई आयआयटीमध्ये घडले आहे त्याचे परिणाम दूरगामी होतील. पहिले म्हणजे उत्कृष्ट शिक्षक मिळणे कठीण होईल. दुसरे, नोकरी टिकविण्यासाठी किंवा कायदेशीर भीती व दबावामुळे, पात्रता नसताना विद्यार्थ्यांना पास केले जाणार. तिसरे म्हणजे, या घटनेवर सोशल मीडियावर झालेल्या चर्चेमुळे खासगी क्षेत्रातील लहान व मध्यम उद्योग, नोकरी देताना कायदेशीर कटकटींचा विचार करूनच निर्णय घेतील.
शेवटी आरक्षण आणि कायद्यांमध्ये सुधारणा केली नाही, तर आरक्षित वर्गाला लाभ होण्याऐवजी नुकसान जास्त होणार. हे निश्चित आहे. आरक्षित समाजाच्या व्यापक हितासाठी मोठ्या नेत्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही प्रोफेसरांना आयआयटी पासून दूर जण्यापासून रोखले पाहिजे. सरकार आणि न्याय व्यवस्थेने ही कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे. दुर्दैवाने, व्होट-बँक साठी आरक्षित समाजाचे नुकसान सर्वच करतील.
टीप: दासबोधातील दृष्टिकोन समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात,
“दुसऱ्याचा प्राण घ्यावा। आपला आपण स्वयें द्यावा।
विसरवी जीवभावा। तो तमोगुण॥”
विष आवरा आता.
पटाईत काका, एरवी तुम्ही भोंदू बाबाबुवा, छद्मविज्ञान किंवा मोजीजींची तळी उचलून धरण्यासाठी जे लिहिता, त्याची टिंगल करण्याची तीव्र इच्छा मला होते. इथे तुम्ही आरक्षण, आणि विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निमित्तानं संदर्भासारखं वाटणारं गोलमाल दाखवत जे काही विष लिहिलं आहेत, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे!
आय० आय० टी० मुंबईतील…
आय० आय० टी० मुंबईतील आत्महत्त्या प्रकरण सध्या गाजत आहे. या निमित्ताने माझे २ पैसे ४० वर्षापुर्वीच्या अनुभवावर आधारित-
आय० आय० टी० मध्ये बाहेरच्या समाजातील जातीव्यवस्था पाळली जात नसली तरी आय० आय० टी० ने स्वत:ची एक जातीव्यवस्था निर्माण केली आहे. मुख्य कारण स्पर्धात्मक वातावरण अत्यंत विषारी पातळीवर पोचले आहे. मानवी जीवशास्त्राचे भान खालपासून वर पर्यंत असल्याचे अजिबात जाणवत नाही (तसे असते तर रात्री-बेरात्री विज्ञार्थ्यांवर जागरणे लादून तब्येतीची वाट लावण्याचे उद्योग तिथे राजरोस चालू दिले नसते) तिथे "चातुर्वर्ण्य मया सृष्टं..." या गीतावचनाचा उघड जयघोष करणारे प्राध्यापक मी स्वत: बघितले आहेत. सध्याची परिस्थिती माहित नाही. पण सवलतींचा लाभ घेत असलेली मुले अभ्यासू मुलांना अभ्यास करू देत नसल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत (मला स्वत:ला वैयक्तिक अनुभव नाही).
पण मेडीकल कॉलेजेसच्या तुलनेत आय०आय०टी०मधले वातावरण खूपच चांगले आहे, असे माझे स्पष्ट आहे. जगातील आणि भारतातील वैद्यकीय शिक्षण अतिशय विकृत आणि चिंताजनक बनले आहे. याचा एकेमेव पुरावा म्हणजे त्यांच्या मानसिक आरोग्यावर जगभर होणारे संशोधन... आज विज्ञार्थी आय०आय०टी० मधून बाहेर पडला की आपल्या मातृसंस्थेवर भरभरून प्रेम करतो. सर्व आय० आय० टी० ना माजी विज्ञार्थ्यांकडुन मिळणार्या देणग्या याचे प्रमाण आहे.
*मेडीकल कॉलेजेसना अशा भरभरून देणग्या त्यांच्या यशस्वी विज्ञार्थ्यांकडुन किती मिळतात हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे.*
साहिल वाकोडेसारख्या घटनापासून संस्थात्मक हानी टाळायची असेल तर मला एक उपाय सुचवावासा वाटतो-
परिक्षा हॉलमध्ये कुणी संशयास्पद वर्तन करत असल्यास प्रथम त्याला रस्टीकेट करण्या आधी क्वारण्टाईन करून परिक्षा द्यायला लावावी. तिथे सीसीटीव्हीची कड्क निगराणी ठेवावी.
सगळे जण साहील वाकोडे हुशार असल्याचे सांगतात. त्याला तिने महीने छळ झाल्याचे बोलले जाते, मग त्याच्या आईवडीलांना त्याच्याबरोबर काही दिवस येऊन राहण्यास का सांगितले नाही. आमच्या वेळेस आईवडीलांना काही दिवस मुलांबरोबर येऊन राहता येत असे?
समुपदेशन सीसीटीव्हीच्या कडक निगराणीमध्ये व्हावे. समुपदेशन हा माझ्या मते मोठ्ठा विनोद आहे आणि बर्यावेळा समुपदेशक समस्या सोडविण्यापेक्षा गंभीर करताना दिसतात. समुपदेशनाचे समर्थक याबद्द्ल अवाक्षर काढत नाहीत.
जाताजाता - काहीवर्षांपूर्वी मी एका प्राध्यापकांना काही निमित्ताने फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांनी राजीनामा दिला आहे आणि अमुक दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे. मला धक्का बसला तेव्हा मी राजीनाम्याचे कारण विचारले.
ते म्हणाले, "प्रवेश परिक्षेत शून्य मार्क पडलेल्या विज्ञार्थ्याला मी प्रवेश द्यावा, यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. त्याला अर्धा मार्क जरी असता तरी त्याचा १ मार्क देऊन मी त्याला प्रवेश दिला असता."
-राजीव उपाध्ये
पटाईत
तुम्ही अधिकारी म्हणून भारत सरकार मध्ये असाल तर भारतात selection दर्जा वर होत च नाही.
भारतात परीक्षा च्या नावावर फक्त बकवास गिरी असते. मार्क हे हुशारी चे परिमाण च नाही.
99.99 टक्के मार्क मिळवणारा ना.
भारतातील उत्तम डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे.
ना 99.99 टक्के वाला यशस्वी उद्योग पती आहे.
50 टक्के आरक्षण आहे 50 टक्के open आहेत. त्यांनी काय दिवे लावले आहेत.
भारतात एक संशोधक ह्या 50 टक्क्या मध्ये पण नाही.
भारतात स्वातंत्र झाल्या पासुन T. N शेषण हेच योग्य निवडणूक आयुक्त होते. ते ब्राह्मण होते. ठीक आहे. पण 50 टक्के मध्ये हजारो ias ips आहे काय त्यांचे कर्तृत्व आहे.
स्वतः तुमचे काय कर्तृत्व आहे.
आरक्षण आडून स्वतः बुद्धीहीन आहोत हे लपवू नका. विष इथे पेरू नका.
या निमित्ताने scst act संदर्भातील काही तरतुदी अनाकलनीय
या नुकत्याच घडलेल्या IIT mumbai मधील अत्यंत दुर्दैवी अशा आत्महत्येच्या निमित्ताने सतत वेगवेगळे पैलू विचारात घेत असताना आणि चर्चा करत असताना SCST act संदर्भातील अत्यंत वेगळ्या अशा तरतुदी बघून आश्चर्य वाटले. मी जमेल तसा वेळ मिळेल तसा हा कायदा समजून घेण्याचा अजून प्रयत्न करतो आहे. यातील किमान compensation हा मुद्दा बघा. या कायद्यानुसार
1
ज्या व्यक्तीने SC ST समुदायातील तक्रार दाखल केली तर त्या व्यक्तीस ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते.
2
आता ही रक्कम गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार वेगवेगळी ठरवलेली आहे. यात उदा.केवळ शिवीगाळीची तक्रार केली असल्यास साधारण काहीतरी 30 ते 40 हजार (चूकभूल देणे घेणे) अधिक गंभीर धिंड काढण्याचा किंवा बलात्कार किंवा हत्या गुन्हा असल्यास 8 लाख इत्यादी अशा रक्कम निश्चित केलेल्या आहे.
3
या नुकसान भरपाईची रक्कम सरकारने द्यावयाची असते. आजपर्यंत काही करोडो मध्ये ही रक्कम देण्यात आलेली आहे
4
इथ पर्यंत ठीक आहे मात्र सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे केवळ तक्रार केल्या बरोबर किमान 25 टक्के ते 50 टक्के रक्कम अदा केली पाहिजे हा नियम आहे. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे चार्जशीट फाईल झाल्यानंतर उर्वरित दुसरी instalment 25 टक्के दिली पाहिजे. आणि अंतिम निकाल लागल्यानंतर उर्वरित 25 किंवा 50 टक्के रक्कम फिर्यादीस सरकारने दिली पाहिजे अशी तरतूद आहे.
5
यानंतर सर्वात क्रिटिकल मुद्दा असा की जर मूळ तक्रार जर अंतिम निकालात खोटी सिद्ध झाली तर पहिल्या दोन टप्प्यात मिळालेली नुकसान भरपाई ची रक्कम परत मिळेल का म्हणजे वसूल कशी करणार ?
6
तर कॉम्पेनसेशन देण्या संदर्भातील तरतुदी क्रिस्टल क्लिअर आहेत. केवळ तक्रार दाखल केल्याबरोबर चार्जशीट च्या सुद्धा अगोदर चौकशी च्या ही अगोदर किमान रक्कम 25 टक्के of the total amount of compensation देण्याची सुस्पष्ट तरतूद आहे. मात्र गुन्हा सिद्ध न झाल्यास आणि याहून महत्वाचं म्हणजे मूळ तक्रारच जर खोटी त्रास देण्याच्या हेतूने केली असे सिद्ध अंतिमतः झाले तरी ती परत करण्यासंदर्भातील तरतुदी या नाहीत किंवा अस्पष्ट आहेत.
7
साधारण एक आकडा (चूकभूल) 30000 केसेस अंतिमतः सिद्ध झालेले आहे की मूळ तक्रारच बोगस होती. मात्र याचा कुठेच आकडा मिळत नाही की अशा केसेस मध्ये recovery किती झाली.
8
या रकमेचे वाटप करण्यासाठी atrocities fund असा एक विशिष्ट फंड तयार करण्यात आलेला आहे.
9
कायदा कमालीचा कडक आहे आणि हे सुद्धा योग्यच आहे. उदा. इतर तरतुदीनुसार तपास किमान dysp स्तरावरील अधिकारी करणार, onus of proof ज्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपीवर असणार, अटकपूर्व जामीन मिळणार नाही (यावर सध्या सर्वोच्च न्यायालयाने हलकीशी सूट दिली आहे ) अशा मजबूत तरतुदी आहेत.
10
भारतीय सामाजिक व्यवस्था बघता न्याय मिळणे फार कठीण असल्याने या तरतुदी ज्या या कायद्यात टाकल्या ते योग्यच आहे.
11
मात्र त्याच बरोबर ज्या केसेस खोट्या सिद्ध झालेली आहेत त्यात नुकसान भरपाई च्या रकमेची वसुली सुद्धा झाली पाहिजे किंवा तशा स्पष्ट तरतुदींचा अंतर्भाव कायद्यात केला पाहिजे असे वाटते.
त्याही पुढे जाऊन अगदी केवळ तक्रार आणि चार्जशीट दाखल या दोन टप्प्यावर नुकसान भरपाईची रक्कम न देता अंतिम निकालानंतरच ही रक्कम दिली पाहिजे म्हणजे वसुलीचा प्रश्न उरणार नाही. आणि काही केसेस मध्ये जो या कायद्याचा दुरुपयोग होत आहे तो सुद्धा निश्चितच आटोक्यात येईल.
12
हे केवळ तक्रार दाखल केल्याबरोबर रक्कम देणे हे चुकीचे आहे. अजून दोन्ही पक्षाची बाजू मांडून झाली नाही तपास सुद्धा झाला नाही चार्जशीट सुद्धा नाही आणि त्या अगोदर अशी रक्कम देणे हा आर्थिक दृष्ट्या नव्हे मूलभूत न्यायाच्या दृष्टीने सुद्धा अगोदरच एका बाजूने एकतर्फी न्याय दिल्यासारखे होते. जे की सर्वस्वी चुकीचे आहे.
माझे स्पेसीफीक आक्षेप
या कायद्यातील कठोर तरतुदींना मी समजुन घेऊ शकतो. कारण भारतीय सामाजिक वास्तव बघता दलित वर्गाला न्याय मिळण्यासंदर्भात अनेक अडथळे अडचणी असतात. त्यामुळे सरकारांनी आणि विशेषत: मोदी सरकारने सर्वाधिक कठोर तरतुदी या कायद्यात आणलेल्या आहेत. यामुळे या कायद्याचे विरोधक याला उपहासाने " मोदी ॲक्ट" असे संबोधतात. माझा त्या कठोर तरतुदींनाही विरोध नाही. माझा विरोध हा खालील तरतुदींना आहे.
१- हा कायदा एकुण ४७ प्रकारचे विविध गुन्हे निश्चीत करतो. आणि जर सवर्ण व्यक्तीने दलितांविरोधात जर यापैकी कुठलाही गुन्हा केला तर प्रत्येक गुन्ह्यासाठी एक रक्कम निश्चित केलेली आहे. उदा.
अ- ३(१) इ नुसार जर एखाद्या दलित व्यक्तीचे जबरदस्तीने कपडे फाडले, किंवा केस कापले , किवा मिशा कापल्यास किंवा चेहरा रंगवल्यास जर अशा प्रकारची जबरदस्ती करुन अपमानित केल्यास एकुण मोबदला रक्कम १ लाख निश्चित करण्यात आलेली आहे.
ब- ३(१) आर नुसार सार्वजनिक जागी जर एखाद्या दलित व्यक्तीला हेतुपुर्वक अपमानित केले किंवा करण्याची धमके दिली गेली. तर यासाठी सुद्धा एकुण मोबदला रक्कम १ लाख रुपये निश्चीत केलेली आहे.
अशा वरील दोन उदाहरणाप्रमाणे एकुण ४७ गुन्हे व त्यावरील मोबदला रक्कम central SC/ST (Prevention of Atrocities) Rules, 1995, Annexure-I to the Schedule मध्ये सविस्तर गुन्हा त्याचे वर्णन याप्रमाणे नमुद केलेल्या आहेत.
( या एकुण गुन्ह्याची संख्या पुर्वी २२ होती ती मोदी सरकारने २०१६ आणि २०१८ मधील सुधारणानुसार ४७ पर्यंत वाढवलेली आहे. तसेच यातील अधिकतम मोबदला रक्कम जरी ८,२५,००० आहे आणि कमीत कमी मोबदला ८५,००० आहे.. तरी कायद्यानुसार या रकमे व्यतिरीक्त राज्य सरकार अधिकचा मोबदला देऊ शकते. )
आता वरील उदाहरण घेउ मोबदला देण्याच्या तीन स्टेजेस सुनिश्चीत आहेत. एक FIR STAGE दुसरी CHARGESHEET तिसरी अंतिम निकालानंतर. तीनही स्टेजेस मध्ये दोन टाइपनुसार मोबदला दिला जाईल
एकतर २५%- २५% -५०% म्हणजे २५,००० पहील्या २५,००० दुसऱ्या आणि उर्वरीत ५०, ००० तिसऱ्या स्टेजला. हा झाला पहीला टाइप
दुसरा ५०%-२५%-२५% म्हणजे ५०,००० पहील्या २५,००० दुसऱ्या आणि २५,००० तिसऱ्या स्टेजला मोबदला दिला जाईल
म्हणजे पहील्या दोन स्टेजमध्ये मिनिमम ५०% एकुण रकमेच्या किंवा ७५% मॉक्सीमम मोबदला दिला जाईल
आता पुन्हा या कायद्यात अजुन एक नियम आहे जो हे सुनिश्चित करतो की दलित तक्रारदाराला वरील रक्कम ७ दिवसाच्या आत तात्काळ दिली गेली पाहीजे. ते कलम असे
Rule 12(4) says the District Magistrate/SDM/Executive Magistrate must arrange immediate relief within seven days to the victim/family/dependants according to Annexure-I and Annexure-II.
तसेच अजुन एक नियम हे निश्चीत करतो की वरील रकमेचे वाटप करण्यासाठी डिस्ट्रीक्ट मैजिस्ट्रेट ला एक विशेष अधिकार दिलेला आहे ज्यानुसार तो सरकारी खजिन्यातुन रक्कम काढुन या वरील रकमेचे पेमेंट करु शकतो तो नियम असा
Rule 12(4A) Allows the State/UT to authorize the DM to withdraw money from the treasury so relief can be provided promptly
हे नियम मुद्दाम देण्याचे कारण असे की कायदा हा मोबदला दलित व्यक्तीला एकतर
१-
तक्रार दाखल केल्याबरोबर देण्यास भाग पाडतो त्यासाठी ७ दिवसाची स्पेसीफिक मुदतही आहे शिवाय त्यासाठी सरकारी तिजोरी सुद्धा खुली करण्याची तरतुद आहे.
२-
दोन्ही टाइप ग्रुहीत धरले तरी पहील्या दोन स्टेजेस मध्ये एकुण मोबदला रकमेच्या उदा. १ लाखाच्या मिनिमम ५०% म्हणजे ५०००० किंवा अधिकतम ७५% रक्कम म्हणजे ७५००० ही अदा करुन झालेली असते.
३-
आता सर्वाधिक आक्षेपजनक बाब यात ही आहे की
अ- या दोन स्टेजेस वर देण्याची इतकी घाई का मुळात ? शिवाय हा सर्व मोबदला १ लाखाचा पुर्ण अंतिम निकाल लागल्यावरच का देत नाही तेच अधिक योग्य आणि न्यायाला धरुन नसेल का ? की जेव्हा गुन्हा सिधा झालेला आहे.
ब- जसे हा मोबदला देण्यास इतकी घाई आणि इतक्या कडक तरतुदी आहे त्याच्या अगदी उलट जर ही फिर्यादीने दाखल केलेली केसच मुळात खोटी असेल असे जरी अंतिम निकालात सिद्ध झाले असले तरी अशी कुठलीही तरतुद कायद्यात नाही की ज्यायोगे ही फिर्यादीला दीलेली ( सात दिवसाच्या आत दिलेली ) रक्कम त्याच्या कडुन वसुल करण्यात यावी अशी एकही अक्षरश: एकसुद्धा तरतुद नाही. याचा सुस्पष्ट अर्थ हा की जरी क्ष नावाच्या दलिताने अगदी पुर्णपणे खोटा गुन्हा दाखल केला व कोर्टात अगदी अंतिम निकालात जरी तसे सिद्ध झाले तरी त्याला देण्यात आलेली वरील ५०,००० ते ७५,००० रुपये हे पुन्हा कधीही त्याच्याकडुन कायद्याने वसुल करता येतच नाही. हे सर्वाधिक चुकीचे आहे आक्षेपजनक आहे. कारण याचे परीणाम
१- यामुळे अप्रत्य्क्षपणे खोट्या केसेस दाखल करण्यास कायद्याकडुन अक्षरश: आर्थिक उत्तेजन दिले जात आहे जे भयावह आहे. कारण मला जर माहीत आहे की माझी मुळ केस जरी खोटी असली आणि ती सिद्ध जरी अंतिम निकालाद्वारे झाली तरी मला पहील्या दोन स्टेज मध्ये मिळालेले पैसे मला परत करायचेच नाहीत.
( आणि दुर्देवाने असे प्रत्यक्षात होतच आहे. जवळपास ३०,००० केसेस बोगस होत्या हे सिद्ध झालेले आहे. अजुन जवळ पास २.५० लाख खटले प्रलंबित आहेत जसजसे अंतिम निकाल लागतील तसे मुलत: बोगस तक्रारी होत्या अशांची संख्या आणि त्याला दिलेल्या मोबदला रकमेची संख्या ही वाढतच जाणार आहे. )
काही गाजलेली उदाहरणे ज्यात हा दुरुपयोग झालेला आहे
१-
In Arvind Kumar & Others v. State of U.P. & Others, the Allahabad High Court in August 2026 noted that Santosh Kumar Dohrey and his family members had received approximately ₹23,36,250 from State funds in connection with different criminal cases, with another 10–12 matters reportedly pending for consideration of further benefits.
२
2018 Supreme Court case — monetary incentive was expressly raised as a misuse concern
In Dr. Subhash Kashinath Mahajan v. State of Maharashtra, the Supreme Court considered submissions that the SC/ST Act could be misused because financial relief could become available after registration of a case.
The judgment records NCRB data cited to the Court showing that in 2016, 5,347 investigated SC cases and 912 investigated ST cases were classified as false by police disposal statistics. The Court also recorded the concern that monetary relief could potentially encourage false cases.
For 2016, the Supreme Court recorded NCRB data in Dr. Subhash Kashinath Mahajan v. State of Maharashtra:
SC-related cases: 5,347 were classified as false among investigated cases
ST-related cases: 912 were classified as false among investigated cases.
तर माझे असे मत आहे की मुळात पहील्या दोन स्टेजेसवर तरी मोबदला दिलाच जाऊ नये तर अंतिम निकाल आल्यानंतरच हा मोबद्ला दिला जावा.
रोचक रीत्या श्री चंद्रशेखर रावण या नेत्याने मोबदला रक्कम ३० लाखापर्यंत वाढविण्याची मागणी केलेली होती.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सध्याची जी कमीत कमी मोबदला रक्कम ८५,००० ते अधिकतम ८.२५ लाख आहे तिला वाढवुन कमीत कमी मोबदला १ लाख ते जास्तीत जास्त १२ लाख करण्याचा प्रस्ताव कमिटी कडे पाठवलेला आहे जो लवकरात लवकर पास होइल असे दिसतेय.
The Union Ministry of Social Justice and Empowerment has proposed increasing the existing compensation slabs from:
Current: ₹85,000 → ₹8.25 lakh
Proposed: approximately ₹1 lakh → ₹12 lakh
The proposal represents an increase of more than 40% at the upper end and is linked to the rise in the Consumer Price Index. According to the August 2026 report, the proposal had been sent to the Expenditure Finance Committee for approval.
अजुन एक चमत्कारीक तरतुद जी मला तरी अनाकलनीय आहे
SC/ST (Prevention of Atrocities) Rules, 1995, च्या Rule 3(1) नुसार राज्य सरकार असे काही जिल्हे भुभाग ठरवु शकतात की जे त्यांच्य मते atrocity-prone area आहेत याचा अर्थ असा की या भागांमध्ये दलितांवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे शक्यता अधिक आहे वगैरे. उदा समजा नगर जिल्हा महाराष्ट्रातील समजा असा ठरवण्यात आला. तर साहजिकच आहे की जे असे जिल्हे किंवा शहरे असतील तिथे दोन्ही समाजामध्ये खुप तेढ वाढलेली असणार अत्यंत शत्रुतापुर्ण संबंध झालेले असतील दोन्ही कडे वातावरण तापलेले असणार.
तर अशा विभागात राज्य सरकारला एक अधिकार दिलेला आहे त्यानुसार या शहरात जिल्ह्यात जितके शस्राचे परवाने सर्वणांना वाटप केलेले आहे म्हणजे दलित सोडुन फक्त तेवढे सर्व परवाने रद्द करण्याचा विशेष अधिकार या तरतुदीनुसार सरकारला मिळतो . म्हणजे दलितांना सवर्णांकडुन धोका आहे म्हणुन त्यांचे गन्स, इत्यादी शस्त्रे परवाने रद्द करणे.
मात्र त्याच बरोबर सरकारला हा सुद्धा अधिकार दिलेला आहे की अगदी त्याच वेळेस असे शस्त्र परवाने जर त्याच विभागातील दलित व्यक्तीना दिलेले असतील तर ते तसेच कायम ठेवावेत कारण ते त्यांच्या स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहे.
आता हे किती कमालीचे धोकादायक आहे नाही का ?
जिथे त्या भागातील दोन्ही गटातील वातावरण अगोदरच गढुळ झालेले आहे. दोन्हीकडे सुड भावना निर्माण झालेली आहे तिथे दोन्ही गटाकडुन शस्त्र काढुन घेणे परवाने रद्द करणे नक्कीच समजु शकते मात्र एका गटाला शस्त्रहीन करुन दुसऱ्या गटाला शस्त्रसज्ज ठेवणे यात कुठले लॉजिक आहे ? दोन्हीना निशस्त्र करणे योगयच किंवा चला दोन्ही कडे स्वरक्षणासाठी सुट दिली ठिक पण हे असे ?
तुम्हाला काय वाटते ? हे किती धोकादायक आहे ? चुकीची परीस्थिती निर्माण करणारे नाही का ?
देशात मोजून 10 एक च
देशात mojun10 ते 12 च उच्च पदस्त अधिकारी आहेत ते उत्तम काम करत आहेत. बाकी काय करतात कोणाला माहित नाही.
चांगल्या अधिकाऱ्यांन मधील एक तुकाराम मुंडे साहेव.