एक कविता
Sandipan
रोजच होते तरीही
वाटते अकस्मात
रात्र ढकलते मला
दिवसाच्या अंधारात
नंतर काय होते
नेमके उमगत नाही
दिवस मला ढकलतो
की दिवसाला मी
आयुष्य वाहते मात्र
स्वच्छ पाण्यापरी
शेवाळ का साचते
मनाच्या दगडावरी
दगडाच्या हृदयात पडती
दगडाचे ठोके क्षणाला
चुकून क्षण येता काचेचा
एक कविता स्मरते!