नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र
नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र
==================================
-- राजीव उपाध्ये
टीप - हा दोन जुन्या लेखांचे हे एकत्रिकरण आहे. काही विशिष्ट उद्देशाने हे लिखाण इथे पुनर्प्रकाशित करत आहे. या लेखाचा आणि ए०आय०चा काहीही (म्हणजे पूर्णविरामाचा पण ) संबंध नाही.
डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती). याचा मुद्दामून उल्लेख अशासाठी की मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला.
खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते. फिल्म सोसायटी ही बॉलीवुड आणि हॉलिवुडचे लोकप्रिय चित्रपट दाखवायची तर फिल्मक्लब चे चित्रपट ’कलात्मक’ (वास्तवाचे यथार्थदर्शन करणारे) असत. बहुतेक चित्रपट युरोपात तयार झालेले असल्यामुळे त्यात मंचकदृष्ये, मैथुन, नग्नता याची रेलचेल असे. पण ते अतिरंजित नसत. फिल्मक्लब मध्ये १८+ वयाच्या व्यक्तीनाच प्रवेश मिळत असे.
मी (अर्थातच) फिल्मक्लबचा सभासद होतो.
एकदा आमच्या फिल्मक्लबमध्ये एक जर्मन चित्रपट आला होता. ते एक नृत्यनाट्य होते. या चित्रपटात ३०-४० कलाकार प्रथमपासून शेवटपर्यंत पूर्ण नग्न होते. पण त्यात कुठे ही विकृत उत्तेजकपणा नव्हता. पण तरीही या चित्रपटाने माझ्या सोवळ्या (आणि कोवळ्या) मानसिकतेला धक्का बसून फ्यूज उडाला.
माझ्या संस्कृतीने निषिद्ध ठरवलेलं आचरण/वर्तन दुसर्या एका, विशेषत: पुढारलेल्या, संस्कृतीत नॉर्मल असू शकतं ही जाणीव मोठी मानसिक उलथापालथ घडविणा्री होती. कारण भारतीय संस्कृती नग्नतेच्या बाबतीत अतिशय दुटप्पी आहे. धार्मिकतेच्या वेष्टनातील नग्नता भारतीय स्वीकारतात, तिच्यापुढे लोटांगण घालतात. तर खजुराहो सारख्या ऐतिहासिक वारशातील नग्नता अभिमानाने चघळतात. पण उर्फी जावेदला मात्र ते स्वीकारू शकत नाहीत.
जगभरच्या नग्नतेचा निरीक्षणात्मक अभ्यास चालू केल्यावर काही ठळक गोष्टी लक्षात आल्या. जगात किमान डझनभर नग्नतेशी संबंधीत ’उत्सव’ आहेत. भारतात फक्त कुंभमेळ्यात अशी उत्सवी-नग्नता दिसते. पण ती नागासाधुंपर्यंतच मर्यादित आहे. नागासाधू "विकारांवर विजय मिळविण्यासाठी" अघोरी उपायांचा अवलंब का करतात, असा एक मला पडलेला प्रश्न आहे. याचं कारण असं की जगात अनेक समुद्र किनार्यावर विशेषत: न्यूडबीचेसवर समुद्रस्नानाचा आनंद घेणारे लोक बघितले की एक प्रश्न पडतो - नग्नतेने लैंगिक भावना/विकार उद्दीपित होत असतील तर न्यूडबीचवर सर्वात जास्त बलात्कार व्हायला हवेत. पण तसं होताना दिसत नाही. अगदी फ्रान्स मधल्या कॅप द’आग्द सारख्या मुक्त नग्नसंस्कृती जपणार्या शहरात पण राजरोस बलात्कार झाल्याचे ऐकायला मिळालेले नाही. पण जिथे स्त्रिला आजन्म बुरख्यात, नखशिखांत शालिनतेच्या ओझ्याखाली दबून ठेवलं जातं तिथे बलात्कार जास्त होतात. तात्पर्य असे की विकारांवर विजय मिळविण्यासाठी अघोरी मार्ग अवलंबायची गरज नसते. कदाचित एखादी गोष्ट मुबलकपणे उपलब्ध झाली की त्याती्ल नावीन्य संपते आणि आपोआप विकारांवर विजय मिळतो. सतत रक्तपात/मृत्यू बघणार्यांना मरणाची भीति उरत नाही, तसेच. त्यामुळे नग्नतेने लैंगिक गुन्ह्यांना उत्तेजन मिळते हे मला मान्य नाही.
तात्पर्य आपण भारतीय लोक नग्नतेबद्दलच्या दुटप्पी भूमिकेमुळे पूर्णपणे गंडलेलो आहोत. त्यात पूर्ण कपडे घालून पोहोण्याचा अलिकडचा ट्रेण्ड तर मला भयानक विनोदी वाटतो. त्यामुळेच मला तर आजकाल नग्नतेमध्ये ’सवस्त्र’ आणि विवस्त्र असे दोन भेद करावेत असे वाटते. होय "सवस्त्र" नग्नता असू शकते. यात लाजेकाजेस्तव किंवा श्लील-अश्लीलतेच्या कल्पनांमुळे कपडे टाकून तर देता येत नाहीत. पण अंगसौष्ठ्वाचे प्रदर्शन करायची उर्मी/खुमखुमी जबरदस्त असते. कातडे पूर्ण झाकले तरी तंग कपड्यांनी सौष्ठव "नागडे" पडल्याने ही "सवस्त्र नग्नता" ठरते. विवस्त्र नग्नता स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की सवस्त्र नग्नता, विवस्त्र नग्नतेपेक्षा जास्त उद्दीपक ठरू शकते.
समकालीन नग्नतेबद्दल आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. संधी मिळाली की लिहीनच...
सध्या अचानक फेसबुकवर सेक्सटॉइजच्या जाहिराती मुबलक दिसू लागल्या आहेत. हा अचानक बदल "सनातनी" मानसिकतेला कितपत झेपेल माहित नाही. पण मला तो संस्कृतीच्या स्थित्यंतरात महत्त्वाचा वाटतो...
जननेंद्रियांविषयी लज्जा, तिरस्कार किंवा घृणा जगभर सापडते. हे एक acquired behavior आहे. मनुष्यप्राणी सभोवतालच्या निरीक्षणातून किंवा अनुभवातून योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकत जातो. हे योग्य/अयोग्य त्या त्या समूहापुरतेच मर्यादित असते, याचे भान सहसा सर्वसामान्य व्यक्तीला नसते. जो समूह ताकदवान असतो, तो आपल्या योग्य/अयोग्यतेच्या कल्पना इतरांवर लादतो. भारतीय संस्कृती याला अपवाद नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जननेंद्रियांची पूजा पण होते. हा परस्पर विरोध गमतीदार आहे. सर्वेषामिन्द्रियाणामुपस्थमेव निधानं। म्ह० जननेंद्रिये सर्व आनंदाचे मूळ आहेत याज्ञवलक्य मैत्रेयी संवादातील हे वाक्य बहुसंख्य भारतीयांना ठाउक पण नसेल.
पण जगभर मात्र एक मोठा वर्ग जननेंद्रियांविषयी नकारात्मक भावनातून मुक्त झालेला दिसतो. तसेच नग्नतेविषयी उदार दृष्टीकोन बाळगतो. मानवी जननेंद्रिये मोठ्या प्रमाणात कलाविष्काराचा (१,२, ३) विषय बनलेली दिसतात. teatro oficina या एका प्रसिद्ध नाटक कंपनीच्या एका नाटकात एक पात्र स्टेजवर हस्तमैथून करते. तर दूस-या एका नाटक कंपनीच्या एका ऑपेरात १२० पूर्णनग्न पात्रे गायन करतात! मला या कलाकारांच्या धाडसाचे कौतूक वाटते. लुई गॅरेल नावाचा एक माझा आवडता फ्रेंच नट त्याच्या एका सिनेमात असाच पडद्यावर हस्तमैथून करतो.
याच बरोबर जननेंद्रियांच्या आकारातील खाद्यपदार्थांची रेलचेल अनेक देशांत दिसून येते. पुरुष जननेंद्रियांच्या आकारातील बेकरीपदार्थ, आईस्क्रीम किंवा मिठाया इ० जपानपासून फ्रान्सपर्यंत अनेक युरोपीअन देशात दिसून येतात.
अलिकडेच "मास्टरशेफ" या जगप्रसिद्ध पाकस्पर्धेत बैलांच्या जननेंद्रियांपासून (Bull's penis Pho) बनवलेला पदार्थ pressure test साठी निवडलेल्या स्पर्धकांना करायला सांगितला होता. हा पदार्थ चीन, व्हिएतनाममध्ये (४) एक delicacy म्हणून बनवला जातो. स्पर्धकांमध्ये असलेल्या एका मराठी महिलेने कोणताही थयथयाट न करता हा पदार्थ बनविण्याचे आह्वान स्वीकारले. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे उर्फी जावेदच्या फॅशनमुळे उडवली गेलेली धूळ आठवली आणि हसू आले.
कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे का?
विविध विषयावर मानव कसे व्यक्त होतात हा डेटा जमा करायचं.
Fb वर तुम्ही हा डेटा घेऊ शकत नाही लोक फक्त शिव्या देतात.
त्या मुळे तुम्ही तुमचे तीव्र बुद्धी चे लेख fb अकाउंट वर बिलकुल टाकत नाही. टाकला तर ऍक्सेस देत नाही. तिथे . 90 टक्के डेटा दूषित असतो इथे किमान 80 टक्के तरी शुद्ध डेटा मिळेल ही लालच आम्हाला एक दोन डॉलर पण मिळणार नसतील तर आमची अमूल्य मत आणि विचार का लिहावीत
?
कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे का? विविध विषयावर मानव कसे व्यक्त होतात हा डेटा जमा करायचं.
समजा, घेतले असेल. तरीही, यात अनैतिक अथवा अवैध असे नक्की काय आहे?
आम्हाला एक दोन डॉलर पण मिळणार नसतील तर आमची अमूल्य मत आणि विचार का लिहावीत
इतर प्रतिसादांतून तुमची अमूल्य मते आणि विचार लिहिण्याचे तुम्ही नक्की किती पैसे घेता? (तुमचा दर काय?)
(केवळ कुतूहल म्हणून हा प्रश्न विचारीत आहे; भविष्यकालीन ऑफर म्हणून नव्हे.)
आणि, नसले लिहायचे, तर नका लिहू तुमची अमूल्य मते आणि विचार! तुम्हाला सक्ती (किंवा फॉर्दॅट्मॅटर आग्रहसुद्धा!) येथे नक्की कोणी केला आहे?
बाकी चालू द्या.
(संकीर्ण)
त्यामुळे नग्नतेने लैंगिक गुन्ह्यांना उत्तेजन मिळते हे मला मान्य नाही.
मुळात लैंगिक गुन्ह्यांचा नग्नतेशी (किंवा फॉर्दॅट्मॅटर लिंगभावनेशी अथवा लैंगिक उद्दीपनाशीसुद्धा) काही संबंध आहे, या गृहीतकाची फेरतपासणी होण्याची गरज आहे.
लैंगिक गुन्हे हे माझ्या समजुतीप्रमाणे जास्त करून दुसर्यावर (दुसरीवर?) वर्चस्व लादण्याच्या/गाजविण्याच्या धारणेतून घडत असावेत.
(यावरून अवांतर शंका: मानवेतर प्राण्यांत कपडे घालण्याची प्रथा नाही. एखाद्या मानवेतर स्पीशीज़मधील लैंगिक गुन्ह्यांचे स्टॅटिस्टिक्स उपलब्ध आहे काय? की, (केवळ) 'लैंगिक गुन्हा' अशी काही संकल्पनाच त्या 'समाजां'त नाही, हे(च) (यदाकदाचित त्या 'समाजां'त लैंगिक गुन्हे घडत असल्याचे आढळत नसल्यास — मला ठाऊक नाही, म्हणून तो अगोदरचा स्टॅटिस्टिक्ससंबंधीचा प्रश्न विचारला!) त्या 'समाजां'तील लैंगिक गुन्ह्यांच्या (असल्यास) अभावाचे एकमेव कारण असावे?)
(त्या 'समाजां'त 'लैंगिक गुन्ह्यां'ची संकल्पना यदाकदाचित नसल्यास, ती (मानवी) संकल्पना त्यांच्यावर लादून संबंधित स्टॅटिस्टिक्सचा अर्थ लावल्यास काय निष्कर्ष निघू शकतील? कुतूहल आहे!)
त्यात पूर्ण कपडे घालून पोहोण्याचा अलिकडचा ट्रेण्ड तर मला भयानक विनोदी वाटतो.
पूर्ण कपडे घालून नाही, तरी कमरेखालच्या अर्धवस्त्रासहित (स्वतःच्या घरात!) आंघोळ करण्याची पद्धत एके काळी समाजाच्या काही स्तरांत प्रचलित होतीच की!
(नशीब, मलविसर्जनाच्या अथवा मैथुनाच्या वेळी (लज्जेच्या कारणास्तव!) पूर्ण कपड्यांनिशी करायची प्रथा नसावी. किंवा, कोणास ठाऊक, करीतही असतील कदाचित — मी थोडीच पाहावयास गेलोय? With Indians, you'd never know...)
बाकी, 'सवस्त्र नग्नते'ची कल्पना रोचक.
सवस्त्र नग्नता, विवस्त्र नग्नतेपेक्षा जास्त उद्दीपक ठरू शकते.
"Statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital." असे एक सुवचन ऐकिवात आहे. ते प्रस्तुत संदर्भात जरी बर्यापैकी अवांतर असले, तरी, suggestive हे उघडउघडपेक्षा बहुधा अधिक प्रभावी ठरत असावे. (शेवटी, लैंगिकता हा जर मेंदूचा आविष्कार असेल, तर मग (कल्पनाशक्तीद्वारे) मेंदूला काही खाद्य नको काय?)
पण जगभर मात्र एक मोठा वर्ग जननेंद्रियांविषयी नकारात्मक भावनातून मुक्त झालेला दिसतो. तसेच नग्नतेविषयी उदार दृष्टीकोन बाळगतो. मानवी जननेंद्रिये मोठ्या प्रमाणात कलाविष्काराचा (१,२, ३) विषय बनलेली दिसतात. teatro oficina या एका प्रसिद्ध नाटक कंपनीच्या एका नाटकात एक पात्र स्टेजवर हस्तमैथून करते. तर दूस-या एका नाटक कंपनीच्या एका ऑपेरात १२० पूर्णनग्न पात्रे गायन करतात! मला या कलाकारांच्या धाडसाचे कौतूक वाटते. लुई गॅरेल नावाचा एक माझा आवडता फ्रेंच नट त्याच्या एका सिनेमात असाच पडद्यावर हस्तमैथून करतो.
हे त्यांच्या परीने ठीकच आहे. आणि, त्यांनी ते अवश्य करावे. प्रश्न इतकाच आहे, की ते पाहायला मी फाइट मारून (स्वकष्टार्जित दमड्या मोजून!) नक्की काय म्हणून जाईन, असे (त्यांना) वाटते?
दुसरा कोणीतरी स्टेजवर हस्तमैथुन करीत आहे, हे पाहण्यात मला नक्की काय रस असावा? (ज्यांना जायचे आहे, त्यांनी अवश्य जावे; त्यांना माझा विरोध नाही.)
(याच धर्तीवर, नाटकात अथवा सिनेमात कोणी स्टेजवर अथवा पडद्यावर मलविसर्जन करण्याचा प्रयोग करून पाहिलेला आहे काय? बोले तो, सांकेतिक नव्हे, प्रत्यक्ष. केवळ कुतूहल म्हणून विचारतोय; विरोध म्हणून नव्हे.)
पुरुष जननेंद्रियांच्या आकारातील बेकरीपदार्थ, आईस्क्रीम किंवा मिठाया इ० जपानपासून फ्रान्सपर्यंत अनेक युरोपीअन देशात दिसून येतात.
पुन्हा, तोच प्रश्न. बनविणार्याने काय वाटेल ते बनवावे. विकत घेणार्यास (उदाहरणार्थ, मला!) त्यात नक्की काय रुची असावी?
(अर्थात, विकत घेणारे असतीलच. म्हणून तर बनविणारे बनवू शकतात. हा उद्योग केवळ 'कलेसाठी कला' तत्त्वावर (अथवा स्वान्तसुखाय) खचितच नसावा.)
असो. फॉरअचेंज महत्त्वाचा, रोचक विषय. चालू द्यात.
(आणि हो, एक राहूनच गेले!)
'नग्नतेने लैंगिक गुन्ह्यांना उत्तेजन मिळते' असे मानणार्या समाजात pedophilia घरोघरी आढळत नाही, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण, जवळपास प्रत्येकच घरात एखादे नागडे मूल (किंवा, कधीकधी, एकाहून अधिक नागडी मुलेसुद्धा) कधी ना कधी बागडलेच असेल!
(पाळीव प्राण्यांना कपडे — विशेषेकरून, जननेंद्रिये झाकणारे कपडे — घालण्याची प्रथा समाजात क्वचितच आढळते. समाजातील साधारण किती टक्के लोक पाळीव प्राण्यांसोबत रत होत असतील? बरे, समजा प्रत्येक जण नव्हे, तरी समाजातील ०.०००००१ टक्का (उदाहरणादाखल) पाळीव प्राण्यांसोबत (त्यांच्या नग्नतेमुळे उद्दीपित होऊन) रत होतो, असे जरी मानले, तरीसुद्धा, म्हणून काय पाळीव प्राण्यांची जननेंद्रिये झाकणारे कपडे त्यांना घालण्याची सक्ती करणारा कायदा आणावा काय?)
बंदिवासातल्या प्राण्यांचे लैंगिक जीवन
बंदिवासातल्या प्राण्यांचे लैंगिक जीवन हा खुप रंजक आणि डोळ्यात अंजन घालणारा विषय आहे. पाळलेले प्राणी एक प्रकारे बंदिवासातले प्राणीच असतात. फक्त त्यांना प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांपेक्षा वेगळी वागणूक मिळते. डेस्मण्ड मॉरीस या माझ्या एका आवडत्या मानववंश शास्त्रज्ञाची ’ह्युमन झू’ आणि ’नेकेड एप’ ही दोन पुस्तके या साठी अवश्य वाचावित. मॉरीस काही विशेष निरिक्षणे अशी आहेत-
० आधुनिक शहरांना आपण सिमेंटची जंगले म्हणतो ते मॉरीसला मान्य नाही. त्याचा युक्तीवाद रोचक आहे. तो म्हणतो, शहरे ही जंगले नसून प्राणिसंग्रहालये आहेत. कारण संग्रहालयांमधल्या प्राण्यांचे वर्तन आणि शहरातल्या मनुष्यप्राण्याच्या वर्तनात खुप साधर्म्य आहे. कंटाळा आणि तो घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधायचे प्रयत्न, सतत उद्दीपन शोधणे इ० तसेच बलात्कार, हस्त/स्वमैथुन पण बंदिवासातील प्राण्यात दिसतो, असा मॉरीसचा दावा आहे.
तो एके ठिकाणी असे पण म्हणतो की बर्याचदा एका प्रजातीच्या जीवाचे दुसर्या जीवाकडून पालन-पोषण होते तिथे निष्ठा आणि प्रेमभावना निर्माण होतात आणि आंतर-प्रजातीय संभोगाची प्रवृत्ती उफाळते. थायलंडमध्ये पुरुष हत्ती त्याच्या उद्दीपित जननेंद्रियाने माहुताला कुरुवाळताना बघायला मिळतात. पाळलेली कुत्री मालक जर स्त्री असेल तर तिच्याशी संभोग करायचा प्रयत्न करतात. घरातल्या उशीबरोबर आत्ममैथुन कुत्र्यांमध्ये सर्रास दिसतो. जेन गुडाल या मर्कटवंशाचा अभ्यास करणार्या विदुषीने तिने माकडे तिच्यावर प्रेम करू लागल्याचे म्हटले आहे.
त्याला मनुष्यपण अपवाद नाही. पण माणसाने हे वर्तन "अनैतिक" आणि म्हणून दंडनीय ठरवले आहे. दक्षिण अमेरिकेतील एका देशात लग्नापूर्वी गाढवाशी संभोग करायची प्रथा अजुनही अस्तित्वात आहे.
प्राण्यांना कपडे - बैलांना आणि हत्तीना झुली घालणे हे पूर्वीपासून आहे. पण त्याचा अतिरेक कुत्र्यांच्या बाबतीत झालेला. लोक कुत्र्यांना बूट, हेल्मेट गॉगल पण घालू लागले आहेत. लवकरच कपडे घातलेल्या कुत्र्यांचा कपडे न घातलेली कुत्री दिसल्यामुळे "विनयभंग"झाल्याच्या तक्रारी आल्या तर आशर्य वाटायला नको.
कपडे घालून सेक्सचा नवा ट्रेण्ड नेटफ्लीक्सवर अनेक ओटीटीवर खुप दिसतो. मला हे खुप धोकादायक वाटते.
एका गोष्टी बरोब्बर दुसरी असतेच
जगात कोणती ही गोष्ट एकटी येत नाही जोडीदार असतो च.
काही हाव असेल तर काही सोडावे लागते.
Adult चित्रपट बघण्यासाठी 18. वर्ष वय ही अट आहे.
का?
जगात एक पण कुटुंब सापडणार नाही अगदी प्रगत, अति प्रगत समाजात जिथे आई, वडील, मूल स्वतः च्या घरात नग्न वावरतात.
का?
कुटुंब हाव असेल तर नग्न तेवर मर्यादा येतात.
मला जगात प्रगत देशातील एक कुटुंब सांगा त्या कुटुंबात आई, वडील मुलं पूर्ण नग्न वावरत असतात ते पण स्वतः च्या घरा त.
मंदिरात नग्न स्वरूपात स्त्री पुरुष च शिल्प आहेत म्हणजे समाज नी नग्नता स्वीकारली होती असा त्याचा अर्थ नाही. ती एक कलाकृती आहे त्याचा संबंध मानवी समाज शी जोडता येत नाही..
शरीर शास्त्र शिकताना मानवी देह (mrut)नग्न च लागतो.
कपडे खालून कस शिकता येईल.
तिथे नग्न मृत देह असतो म्हणजे समाजाने नग्नता स्वीकारली असा होत नाही.
अभ्यास कौतुकास्पद आहे!
आपला या विषयाचा अभ्यास कौतुकास्पद आहे! मी हजारो उदा० देऊ शकेन. पण इथे संदर्भ दिले तर आपल्या देशातले मंदबुद्धी आणि विकृत लोक माझ्या संदर्भ देण्याच्या कृतीचा चूकीचा अर्थ लावून नको त्या कटकटी मागे लागतील. सध्याचे देशातले वातावरण खणखणीत अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी पोषक नाही.
स्वीडन सारख्या देशात भर रस्त्यावर गर्दीत पूर्ण नग्न लोकांनी केलेली नृत्य-नाट्ये (व्हिडीओ) मी बघितली आहेत. तिथे आजुबाजुला लहान मुळे खेळताना दिसतात. हे अपवादात्मक उदा नाही. डोळ्यावरची झापड काढली तर सर्रास दिसेल...
विशेष स्थिती मधील exa नका देऊ
नग्न वास्तू शिल्प.
2) धार्मिक सण समारंभ.
ह्या ठिकाणी नग्नता असली तरी तीला एका खास गोष्टी च वेष्ठान असते.
धार्मिक समारंभ मध्ये धर्म च वेष्टन असते, सण मध्ये परंपरे च वेष्टन असते.
सार्वजनिक जागेत.
रेल्वे, रस्ते, शाळा, ऑफिस, सरकारो ऑफिस, गार्डन, मार्केट,, गार्डन etc.
ठिकाणी जगात नग्न फिरणे कुठे मान्य आहे का?
आणि
सर्वात महत्वाचे.
घरात , घर ही पूर्ण पर्सनल जागा आहे तरी जगात एका पण संस्कृती मध्ये किंवा अपवाद म्हणून पण एक कुटुंब सापडणार नाही जें घरात नग्न वावरतात.
( कुटंब म्हणजे आई, वडील, मुलं, इत्यादी एकत्र राहतात ते )
सर्व बाजू ला ठेवू
नग्नता समाजाने, राष्टे नी, लोकांनी पूर्णतः स्वीकारली.
नग्न सर्व राहू लागले तर अशिलता वाढेल. का? तर नाही.
बलात्कार ( हा पूर्ण पणे वेगळा विषय आहे अशिलता शी तो जोडता येत नाही. तीव्र मानसिक धक्का देणारा तो विषय आहे. त्या मुळे तो गंभीर गुन्हा पण आहे )
इतकी सहमती मिळून पण लोक कपडे च वापरतील. कारण मुळात माणूस हा सुंदर प्राणी नाही, अत्यंत ओबाड धोबड प्राणी आहे.
बैल, घोडे, कुत्री, अगदी सर्व च प्राणी खूप देखणे आणि रुबाबदार असतात.
त्यांची शरीर एका मोज मापात अगदी रेखीव असतात.
माणसाचे बघा. 99 टक्के लोक कुरूप वाटू लागतील नग्न राहिली तर.
कपडे सुंदर ता वाढवाय साठी एक tool आहे.
फ्रान्स मधले कॅप द आग्द हे…
फ्रान्स मधले कॅप द आग्द हे गाव नग्न-पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे,
Germany — Strongest cultural tradition of Freikörperkultur (“free body culture”). Non-sexual public nudity is generally legal and common in marked FKK zones: many beaches and lakes, parts of parks (e.g., official nude areas in Munich’s Englischer Garten and Berlin’s Tiergarten), and mixed-gender saunas where nudity is the norm. It is not free-for-all in city centers.
Spain — No national criminal ban on non-sexual public nudity (repealed in 1988). It is legal on any public land in principle and widely practiced on beaches (especially Canary Islands, Balearics, Costa Brava, Costa del Sol). Local bylaws in cities such as Barcelona restrict it on streets and commercial areas, but beaches remain fine.
https://legalclarity.org/is-nudity-legal-in-spain-local-laws-and-rules/
France — Many official naturist beaches and resorts. Cap d’Agde (southern coast) is the world’s largest naturist village — an entire district with shops, restaurants, and beach where everyday life is clothing-optional. Topless sunbathing is common on ordinary beaches.
Netherlands — Designated beaches (Callantsoog is the oldest official one, since 1973). Mixed public saunas expect full nudity. Topless is widely accepted on beaches.
Croatia — Long-established naturist destination with many official beaches, camps, and resorts (especially Istria and islands). Very tourist-friendly for clothing-optional recreation.
Scandinavia (Denmark, Sweden, Finland, Norway) — High tolerance. Denmark has allowed nude bathing on any beach since 1976. Saunas are typically mixed and nude. Attitudes toward non-sexual nudity are relaxed.
मेक्सिको मध्ये या शहरात सार्वजनिक मैथुन कायद्याने परवानगी आहे. (https://www.npr.org/2018/08/22/640875743/mexican-city-decriminalizes-pu…)
ॲमस्टरडॅम मधिल Vondelpark हे पार्क सार्वजनिक सेक्सला परवानगी देते - “Attracting 10 million visitors per year, the Vondelpark is Amsterdam’s largest – and most famous – municipal park. The lush 47-hectare (120 acre) site includes a famous open-air theatre, numerous children’s playgrounds and several cafés and restaurants, making it a thriving hub of activity in any season.” (Holland.com)
Not only is it the largest city park in Amsterdam, but Vondelpark also holds the status of being the only place in the Netherlands where public sex is legal. https://yourmileagemayvary.com/2024/09/21/the-4-places-in-the-world-whe…
सापेक्ष प्रश्न आणि विषय आहे
नग्नता
सवस्त्र आणि विवस्त्र.
सामाजिक दृष्टी ने वेगळे उत्तर आहे.
वैयतीक स्वातंत्र च्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
कला कृती च्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
विचार स्वातंत्र च्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
कायद्या च्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
सामाजिक आरोग्य आणि कायद्या चे राज्य ह्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
कुटुंब व्यसथे च्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
नात्यांच्या सीमा राखण्या च्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
डाव्या न चे वेगळे उत्तर आहे.
उजव्या न चे वेगळे उत्तर आहे.
धार्मिक लोकांचे वेगळे उत्तर आहे.
नास्तिक लोकांचे वेगळे उत्तर आहे.
लहान मुलांचे मानसिक आरोग्य, संगोपन, स्थिरता ह्या दृष्टी नी वेगळे उत्तर आहे.
आणि ह्या सर्व दृष्टी नी असलेली उत्तर 100 टक्के सत्य च आहेत..
आणि सरासरी काढली तर नग्नता सवस्त्र आणि विवसत्र ता बहुमत नी मान्य नाही.
असे चित्र दिसेल
सापेक्ष प्रश्न ना कधीच एक ठाम उत्तर नसते.
अशा प्रश्नाची उत्तर सरासरी मध्ये असतात.
अवांतर
झाडे ही पाऊस पडण्या साठी आवशक्य आहेत. असे निसर्ग प्रेमी, पर्यावरण वादी मोठ्या आवाजात सांगतात आणि ते 100 टक्के सत्य पण आहे.
(पण पाऊस पडण्या साठी एक घटक कारणीभूत नसतो अनेक घटक कारणीभूत असतात)
मग दिसताना अति हुशार वाटणारा, पूर्ण लॉजिक असणारा प्रतिप्रश्न केला जातो.
मग समुद्रात झाडे नाहीत तिथे का पाऊस पडतो.
वर वर हा प्रश्न खूप योग्य वाटतो, लॉजिक वाला वाटतो.
पण हा प्रश्न सर्वात मूर्ख प्रश्न आहे.
आणि ह्याची तुलना मी. नग्न ता विवस्त्र की , सवस्त्र ह्या प्रश्न शी करतो.
लेखक राजीव उपाध्ये म्हणजे तुम्हीच का?
अथवा त्यांचा फेसबुकचा लेख इथे छापलाय समजत नाही. ते असो.
राजा रवी वर्माच्या {देवतांच्या} नग्न चित्रांना खूप विरोध झाला आणि मॉडेलने आत्महत्याही केली. ते एकूण प्रकरणच त्यांच्यावरच्या पुस्तकात [ राजा रवी वर्मा, लेखक रणजीत देसाई, १९८६] वाचण्यासारखे आहे.
ममलापुरमचे { चेन्नईजवळ}सात रथ ज्या राजाने खोदवून घेतले त्यांतले देव देवता आणि राजा राणीही शिल्पकाराने नग्नच दाखवले आहेत.
आता प्रश्न उरला नग्नतेला विरोध करणारे का करतात? मला वाटतं समाजात काही नियम अटी घालण्याचे हक्क आमच्याकडे आहेत हे दाखवण्याचे शक्तिप्रदर्शन असावे.