विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने
नीट परीक्षेचे पेपर लीक (आणि त्याआधीच्या काही काही परीक्षांच्या बाबतीत झालेल्या गैरप्रकार) या विरोधात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा मागण्यासाठी गेल्या महिन्यापासून शांततापूर्ण आंदोलन सुरु होते.
गेल्या दोन दिवसात मात्र त्याला नाट्यपूर्ण वळण लागले.
या विषयावर इथे काहीच चर्चा दिसली नाही म्हणून हा धागा उघडला आहे .
जो तो टपून बसलाय
जो तो टपून बसलाय
जो तो टपून बसलाय
सोमडीत डाव टाकायला
फक्त टायमिंग महत्वाचे
नंतर आहेच बोंबाबोंब
सगळे धूर्त बेरकी
भरून पोटाची खळगी
लागलीच करती उपोषणे
संधी साधत येती वाटेने
दिसला तंबू की लाव स्पीकर
टाकून मांडव बजाव डफली
फडकवून झेंडा करा पथनाट्य
भरून ट्रकभर येतील माणसं
बाहेरचे घोळके असंतुष्ट
इकोसिस्टिम आहे मजबूत
आतले लपलेले भोंदू
पुरविती रसद गपचूप
बबाल करती माध्यमे
कर्कश्य आकांडतांडव
अजेंड्यावर इप्सित मनसूबे
बातम्यांचे प्रायोजित धबधबे
बळीचे बकरे अमर्यादित
दरवेळी सुनियोजित इव्हेंट
नवा गडी नवा डाव
मुद्दा अखेर सेटलमेंट
घेऊन घाऊक लवाजमा
भरून गर्दीच्या ठिकाणी
भाडोत्री लावून सापळा
उकळूण्यासाठी खंडणी
गंजलेल्या निषेधाचे हत्यार
आवाहन करून भरभर
मांडव तोच संघ नवा
करायला ढोंग मुद्दा हवा
©️भूषण वर्धेकर
१०:१५ रात्रौ
२२ जूलै २०२६
पुणे
…
गंजलेल्या निषेधाचे हत्यार
“गंजलेल्या निषेधाचे हत्यार”, की “निषेधाचे गंजलेले हत्यार”?
बोले तो, गंजलेले नक्की काय आहे? निषेध (रॉ मटीरियल), की हत्यार (एंड प्रॉडक्ट)?
आणखी स्पष्ट करून विचारायचे झाले, तर, आधी गंजलेला निषेध घेतला नि मग त्याचे हत्यार बनविले, की आधी (न गंजलेला) निषेध घेऊन त्याचे हत्यार बनविले, नि त्यानंतर मग ते (हत्यार) गंजले?
नाही, दोहोंत फरक आहे, म्हणून विचारले.
(बाकी, कविता तितपतच आहे, म्हणून तिला तितपतच भाव देऊन हे असले (तितपतच महत्त्वाचे) प्रश्न उपस्थित करतोय, झाले. चालायचेच.)
(बाकी, मुळात निषेध गंजलेला असो वा त्या निषेधापासून बनविलेले हत्यार गंजलेले असो, एकदा का ते गंजलेले आहे, म्हटल्यावर, त्याने जर का वार केला आणि त्याने जर का जराशी जरी इजा झाली, तर त्या जखमेतून सेप्टिक होऊन ती जखम चिघळत जाणार, ही बाब येथे तुम्ही विचारात घेतलेली दिसत नाही. केवळ निषेध (वा हत्यार) गंजलेला (किंवा गंजलेले) आहे, म्हणून त्याला हिणवू नका, मिष्टर; नव्याकोऱ्या चमकणाऱ्या धारदार निषेधापेक्षा (किंवा हत्यारापेक्षा) त्यात घातकता अधिक आहे. नेव्हर अंडरएष्टिमेट द घातकता ऑफ अ गंजलेल्या निषेधाचे हत्यार (अँड/ऑर अ निषेधाचे गंजलेले हत्यार)!)
असो चालायचेच.
निषेध मोर्चे आंदोलन आणि उपोषणे
निषेध मोर्चे आंदोलन आणि उपोषणे वगैरे आजकाल साधने झाली आहेत ज्याची त्याची साध्यं वेगळीच आहेत.
सरकारे बदलून व्यवस्था बदलत नाहीत फक्त लाभार्थी बदलतात.
आपण फक्त फाटक्या पोत्यातील जिन्नस बदलतो पोते तेच ठेवून.
आंदोलन फक्त पडदा असतो मागे जो प्रबळ असतो तोच व्वस्थेवर स्वार होण्यासाठी दावेदार असतो.
विद्यार्थी आंदोलन
""बबाल करती माध्यमे
कर्कश्य आकांडतांडव
अजेंड्यावर इप्सित मनसूबे
बातम्यांचे प्रायोजित धबधबे""
हे बरोबर आहे. चॅनेल वाले माइक आणि कॅमेरे घेउन गर्दी करतात, त्यातील कितीजणांना मूळ मुद्द्याशी कर्तव्य आहे? आणि कितीजण सनसनाटी ब्रेकिंग न्युज साठी धावत आहेत? ते देवजाणे. पण निदान त्या कव्हरेज मूळे माझ्यासारख्या सामान्याना तिथे काय चालले आहे ते कळते तरी आहे.
शिक्षण हा खरे तर कळीचा मुद्दा आहे. उत्तम प्रतिचे शिक्षण मिळाले तर नविन पिढी उत्तम नागरिक बनु शकेल असे मला वाटते. पण लबाडी करून परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांकडून कोणत्या नैतिकतेची अपेक्षा करायची? मुद्दा गंभीर आहे आणि तो राजकारण आणि प्रसिद्धीमध्ये भरकटायला नको.
""गंजलेल्या निषेधाचे हत्यार
आवाहन करून भरभर
मांडव तोच संघ नवा
करायला ढोंग मुद्दा""
म्हणजे तुम्हाला आंदोलन "फेक" वाटते आहे का? फ्रॉड पद्धतीने प्रवेश परीक्षा पास करून होणारे डॉक्टर्स तुम्हाला मान्य आहेत का?
केळीचे साल
काही लोकांना चालताना रस्त्यावर फेकून दिलेले केळीचे साल दिसले की पाय घसरून पडायची सवयच लागलेली असते. माहिती असते की केळीच्या सालीवरून पाय घसरतो आणि तोल जाऊन खाली पडतो तरीही तो माणूस दिसले केळीचे साल की ठेवतो पाय पडतो घसरून वरून करतो बोंबाबोंब.
जगात चार प्रकारचे लोक असतात -
एक केळीच्या सालीला ओलांडून जाणारे (व्यवहारी),
दुसरा पाय ठेवून घसरून पडणारे (हसं करून घेणारे),
तिसरा केळीचे साल उचलून फेकून देणारे (परिवर्तनवादी)
चौथा तेच केळीचे साल ज्यांनी टाकलेय त्यांच्या xxत कोंबणारे (दुर्मिळ प्रजाती)
विशेष सूचना: xxत = तोंडात असे वाचावे (सूचना संपली)
©️भूषण वर्धेकर
२२ जूलै २०२६
पुणे
"" सरकारे बदलून व्यवस्था…
"" सरकारे बदलून व्यवस्था बदलत नाहीत फक्त लाभार्थी बदलतात.""
वा! क्या बात कहीं है?
केळीच्या सालावर पाय ठेवून घसरणारे बरेच आहेत.
तुम्ही सांगीतलेल्या प्रकाराना मी जरा निराळी नावे ठेवीन.
(१) निर्विकार
(२) बेसावध,
(३) सुधारणावादी म्हणता येइल फारतर किंवा चकाचक टोळीचा सदस्य म्हणता येइल.
(४) शेवटची प्रजाती फारशी दुर्मिळ नाही. रस्त्यावर केळीचे साल कोणी फेकले कळणार कसे? म्हणजे कुणाच्यातरी गुन्हाची शिक्षा भलत्याच कुणाला मिळण्याची शक्यता जास्तं, नाही का?
(५) आणखी एक प्रकार म्हणजे पडल्याचा देखावा करून कुणाकडेतरी निर्देश करत "त्याच्यामूळे" असे ओरडणारे कांगावखोर.
तर असो ...
विडंबन
विडंबन
मूळ गीतकार - अप्पा कांबळी
बॅनर न् तंबू घेऊन द्या की रं
मला बी आंदोलनात येऊन द्या की
पोरं आलीय रस्त्यावर, बघ गाड्या गेल्या भरभर
त्या जंतर मंतर वर, मांडव टाकूनी बसलेत रातभर
घेऊन जेवण डबाभर, वळकूटं घेऊन खांद्यावर
त्याची गाडी लै भारी, आलंय सामान ढिगभर
पाय पळत्यात सरसर अन् कशी उडतीय झरझर
कांदा न् भाकरी खाऊन द्या की रं
मला बी आंदोलनात येऊन द्या की
पळपळून म्या गावभर, बोंबाबोंब करून आणल्यात पोरंटोरं
आचारी हाय ह्यो चतुर, देतो करूनी स्वयंपाक भरपूर
डायवर हाय लई जोरदार, गाडी हाकायला दूरदूर
मांडव तपावर नेऊन द्या की रं
मला बी आंदोलनात येऊन द्या की
मी टोकाचा हाय कट्टर, नसा ताणून वरडेन गरगर
आपला प्रधान लय् मगरूर, सेवकावर करू कुरकूर
डोक्यामंदी नाही विचार, लावून काडी पेटवा मशाल
अरं लगेच घेऊन जाऊद्या की रं
मला बी आंदोलनात येऊन द्या की
गावपाटलाचा पोरगा जोरदार, नातू पणतू आघाडीवर
गाव पुढाऱ्याचा वारसदार, वरल्या गल्लीचा भाऊ डेंजर
घराशेजारी आपली घरं, लंगोट घालून मैतर
अरं तुमच्यात सामील होऊन द्या की रं
मला बी आंदोलनात येऊन द्या की
©️भूषण वर्धेकर
पुणे
२४ जूलै २०२६
…
म्हणजे तुम्हाला आंदोलन "फेक" वाटते आहे का?
(डिस्क्लेमर: आंदोलन फेक आहे किंवा नाही याबद्दल मला स्वतःला यत्किंचितही फर्स्टहँड कल्पना नाही. कदाचित जेन्युइन असेल, किंवा कदाचित फेकही असू शकेल — मला माहीत नाही. परंतु तरीही…)
…एखादी गोष्ट (आपल्या पक्षाच्या वा आपल्या पक्षाच्या सरकारच्या) विरोधात जाऊ लागली, की (समकालीन) ‘समाजमाध्यमां’च्या द्राक्षवेलींतून खुसपूस चालू करून ती गोष्ट फेक असल्याचे नॅरेटिव सेट करणे, ही (जागतिक) उजव्या वर्तुळांची कार्यपद्धती नवीन नाही. (रादर, सनातन आहे.)
चालायचेच.
बाकी,
पण निदान त्या कव्हरेज मूळे माझ्यासारख्या सामान्याना तिथे काय चालले आहे ते कळते तरी आहे.
दुर्दैवाने, हे खरे असेलही. परंतु, माध्यमांचे हे अमेरिकनायझेशन (रादर, ओव्हरअमेरिकनायझेशन — out-Americaning the Americans) घातक आहे, असे मला वाटते. यातून एवढेच साध्य होते, की कशावरच विश्वास ठेवता येत नाही — सगळेच अविश्वसनीय होते.
(पूर्वीच्या drab ‘अधिकृत माध्यमां’च्या जमान्यात जे काही पेश होत असे, ते नेहमीच अवलंबनीय जरी नसले — अगदी बीबीसीसारखे नामांकित माध्यमसुद्धा नेहमीच तटस्थ भूमिकेतून निखालस सत्य प्रेषित करीत असेलच, असे नाही — तरीसुद्धा, ते गाळून/‘रीडिंग बिटवीन द लाइन्स’ करून त्यातून तथ्यासंबंधी काही कामचलाऊ आडाखे बांधणे निदान काही अंशी तरी शक्य असे. आजकाल कशातूनच काहीच समजत नाही. आजकालच्या या माध्यमांनी सनसनाटीच्या मागे लागून समाजाला ही एक भली मोठी disservice केलेली आहे. अर्थात, या माध्यमांना समाजाची काहीच पडलेली नाही, म्हणा. चालायचेच.)
""…एखादी गोष्ट (आपल्या…
""…एखादी गोष्ट (आपल्या पक्षाच्या वा आपल्या पक्षाच्या सरकारच्या) विरोधात जाऊ लागली, की (समकालीन) ‘समाजमाध्यमां’च्या द्राक्षवेलींतून खुसपूस चालू करून ती गोष्ट फेक असल्याचे नॅरेटिव सेट करणे, ही (जागतिक) उजव्या वर्तुळांची कार्यपद्धती नवीन नाही. (रादर, सनातन आहे.)""
सहमत ...
द्राक्षवेल...
द्राक्षवेल. कृपया २अ (2a) क्रमांकाच्या अर्थाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
आता, याच्या उगमाबद्दल म्हणाल, तर त्याविषयी अधिकृत वा लब्धप्रतिष्ठित स्रोतांकडून काही माहिती मिळू शकली नाही, परंतु, क्वोरावरील ही चर्चा कदाचित (अर्थात, मिठाच्या खड्यासहित) रोचक तथा उद्बोधक ठरू शकावी.
आभार.
सरकार
मुळात सरकार ही कल्पनाच मानवी आहे.
दैनंदिन गरजा नीट चालव्यात म्हणून आहे..
लोकशाही असो किंवा हुकूम शाही ह्यांनी he विसरू नये.
राज सत्तेत ज्यांना जी जबाबदारी दिली आहे ती उत्तम रित्या पाळावी.
कोणी ही असू पंतप्रधान पासुन, न्यायाधीश, ias ips ह्या देशाचे मालक नाही. सिस्टिम मध्ये जी जबाबदारी आहे he पाळणे त्यांचे काम आहे. त्यांचे घर त्या वर च चालत जो पर्यंत लोकं हा priminister आहे, हा ias आहे, हा न्यायाधीश आहे he गृहीतक मान्य करतात
तो पर्यंत. रिअल मध्ये ही मानस आहेत देव नाहीत .
कोणत्या ही परीक्षेत घोटाळा होणे चूक च. ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांची ती जबाबदारी आहे. शिक्षण मंत्री, आणि बाकी संभंधित अधिकाऱ्यांनी त्वरित राजीनामा देणे आणि ह्या प्रकरणाची चोकशी होऊन दोशीत लोकांना कोणती ही दयामायान दाखवता तुरुंगात टाकणे अपेक्षित आहे.
पण he घडले नाही. निर्लज्ज सारखे फालतू दावे केले गेले.
Student नी विरोध केला, घोटाळ उघड केला तर त्यांना चर्चे ल बोलवून. घेतले पाहिजे होते.
पण सिस्टिम मधील सर्व संस्था भंगार आणि स्वतः ल देशाचे मालक समजत असल्या मुळे त्यांनी he केले नाही.
पुढे काय लिहू.
जगात जें पण अतिशय प्रगत देश आहेत सर्व बाबतीत त्यांना हे सत्य माहित आहे. अतिशय प्रभावशाली प्रशासन व्यवस्था त्यांच्या देशात आहे.
भारत खूप मागास आहे.
पदावर असणारी लोक स्वतः ला काही तरी वेगळे समजतात. मूर्ख पणा मुळे हे घडते
भगवी वस्त्रे
https://www.indiatoday.in/india/story/sonam-wangchuk-hunger-strike-ends…
उपास सोडताना भगवी वस्त्रे परिधान करायची असा काही प्रोटोकॉल असतो का?
…एखादी गोष्ट (आपल्या…
…एखादी गोष्ट (आपल्या पक्षाच्या वा आपल्या पक्षाच्या सरकारच्या) विरोधात जाऊ लागली, की (समकालीन) ‘समाजमाध्यमां’च्या द्राक्षवेलींतून खुसपूस चालू करून ती गोष्ट फेक असल्याचे नॅरेटिव सेट करणे, ही (जागतिक) उजव्या वर्तुळांची कार्यपद्धती नवीन नाही. (रादर, सनातन आहे.)
हे बेहद आवडलं… आणि हे आपण गेली बरीच वर्ष पाहतो आहोत. त्यामुळे व्यक्त होण्यासारखे फारसे काहीच नाही.
मूळ मुद्द्याल बगल देऊन फाटे कसे फोडायचे हे यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.
प्रधानाचा राजीनामा घेऊन काय होणार? इतिहासातही पेपर फुटी झाली आहेच तेव्हा कोणत्या राजीनाम्याने परिस्थिती बदलली होती? इतपत तर सवय झाली होती.. पण याही पुढे जाऊन पोलिस अत्याचाराचं नागडं समर्थन करण्याइतपत हे आंधळे झालेले आहेत किंवा मुद्दाम साळसूदपणा करतायत.
संसदेवर "हल्ला करायला"(?) आले होते म्हणून वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागलं (खरंच की काय?)
आंदोलन चिरडून टाका असा वरून आदेश आल्याशिवाय इतपत अत्याचार होत नाहीत हे एका माजी अधिकार्याने बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
आणि तरीही पॅलेट गन वापरलीच नाही हे खोटं बोलून झालं.
सिब्बलच्या यूट्यूब चॅनलवर आज तिथे प्रत्यक्ष हजर असलेल्या मुलीने अनुभव सांगितलाय. बसवा कमीटी. काढा सीसीटीव्ही फुटेजेस. दाखवा जनतेला. पॅलेटगन, गणवेश नसलेले पोलिस हे सगळं का वापरावं लागलं? मॉब हिंसक झाला होता म्हणे.
तो फुटेज देता येत नसेल तर गप्प माफी मागा पोरांची. निर्भया आंदोलन काय पाहिलं नाहीत? तेव्हा पॅलेट गन लागली नव्हती, डोक्यावर काठी मारण्याइतपत क्रूरता करावी लागली नव्हती. दाखवा मग सीसीटीव्ही फुटेज. जमाव कितपत हिंसक होता ते.
पेपर सेट करणारेच पेपर फोडतात.
त्यांच्याविषयी कणव आहे. ते पेपर देतात म्हणून शिरिमंतांची मुले चांगले गुण मिळवू शकतात.
हे सर्व विद्येच्या माहेरातून पुण्यातून झाले. संभाजीनगरानेही हातभार लावला. कुणालाही कुंपणावर बसवा तो पैसे घेऊन आत सोडणार नाही याची ग्यारंटी कोणते सरकार देणार?