कॉकटेल लाउंज : जामुनटीनी

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "जामुनटीनी

पार्श्वभूमी:
मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन पुण्याला आलो होतो. आल्याआल्या बायकोने मंडईत जायचा फतवा काढला. सगळा असंतोष मनातल्या मनात दाबून टाकून हसर्‍या चेहर्‍याने पिशव्या हातात घेऊन गुणी नवरा असल्याचा साक्षात्कार बायकोला करून दिला. (अ‍ॅक्चुली ह्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात पण असो...)

जाऊदे, 'जे होते ते भल्यासाठीच' (हाही १२ वर्षाच्या लग्नाच्या अनुभवाने आलेला एक शहाणपणा). मंडईत गेल्यावर टप्पोरी जांभळे दिसली. जांभूळ म्हणजे माझे एक आवडते फळ, तोंडाला निळेशार करणारे! बर्‍याच वर्षांनंतर जांभूळ बघितले आणि बरे वाटले.

मग लगेच एक कॉकटेल आठवले, 'जामुनटीनी'. जेम्स बॉन्डच्या मार्टीनी ह्या कॉकटेलला दिलेला एक जबरदस्त देशी ट्वीस्ट.

प्रकार जीन बेस्ड (मार्टीनी)
साहित्य
जीन (लंडन ड्राय) २ औस (६० मिली)
मोसंबी रस ०.५ औस (१५ मिली)
सुगर सिरप १० मिली
टपोरी जांभळे ४-५
बर्फ
मडलर
Hawthorne Strainer
ग्लास कॉकटेल

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमध्ये बर्फ आणि पाणी घालून फ्रीझ मध्ये ग्लास फ्रॉस्ट करण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कॉकटेल शेकर मध्ये जांभळाचे तुकडे कापून घ्या.

आता मडलर वापरून जांभळाचे तुकडे चेचून जांभळाचा रस काढून घ्या

एका परसट बशीत मीठ आणि लाल मिरची पूड ह्यांचे मिश्रण करून पसरून घ्या. फ्रॉस्ट झालेल्या कॉकटेल ग्लासच्या कडेवर मोसंबी फिरवून कडा ओलसर करा आणि बशीतल्या मिश्रणामध्ये ग्लासची कडा बुडवून घ्या.

आता शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर जीन, मोसंबीचा रस आणि शुगर सिरप घालून व्यवस्थित शेक करा.

शेक केलेले मिश्रण शेकरच्या अंगच्याच स्ट्रेनरने एका स्टीलच्या ग्लासमध्ये गाळून घ्या.

आता Hawthorne Strainer वापरून कॉकटेल ग्लासमध्ये मिश्रण दुसर्‍यांदा गाळून घ्या. (ह्याला डबल स्ट्रेनिंग म्हणतात.)

चला तर, चवदार जामुनटीनी तयार आहे Smile

(सदर कॉकटेल 'टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल्स' मधून साभार)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे कॉकटेल करून बघायची इच्छा आहे, पण ती काही एवढ्यात पूर्ण होईलसं वाटत नाही. दुर्दैवाने आम्हा अभाग्यांना जांभूळ, आंबा वगैरे फळं मिळत नाहीत. त्यामुळे केवळ नेत्रसुखच घेतलं. आणि काही हरामखोर लोकं असलं काय काय खाऊन पिऊन फार मजा करतात म्हणून जळफळाट करून घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहवा! याला तर मज्जामून म्हटलं पाहिजे! Wink
बाकी ट्रॉपिकल फळे आणि थंड प्रदेशातील जीनचा अपूर्व संगम आहे हा.

बाकी ट्रॉपिकल फळांचेही कॉकटेले असतात का? जसे आंबा, फणस, पेरू वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ट्रॉपिकल फळांचेही कॉकटेले असतात का? जसे आंबा, फणस, पेरू वगैरे?

हो सर्व फळांचे कॉकटेल बनवता येते. आंबा वापरून मँगो मार्गारीटा बनते.

पेरुचे एक कॉकटेल एकदा पुण्यात चाखले होते पण तितकेसे आवडले नाही कारण पेरुच्या रसाला एक उग्र चव असते त्यामुळे ती चव कॉकटेला डॉमिनेट करते.

फणसाचे कॉकटेल अजुनतरी माहिती नाही पण बर्‍याच फ्रुटपंच मध्ये फणसाचा रस वापरला जातो.

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेरुच्या रसाला एक उग्र चव असते त्यामुळे ती चव कॉकटेला डॉमिनेट करते.

धन्यवाद. असाच अंदाज होता. सार्‍याच ट्रॉपिकल फळांना तीव्र वास असतो. त्यामुळेच त्यांची कॉकटेले बनतात का अशी शंका होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नावही रोचक आहे. कॉकटेलचा प्रकार आवडला, कधी पिणार माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.