भरल पापलेट

साहित्यः
५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल

पाककृती:
१) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.

२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.

३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.

४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.

५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.

६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट

७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट

अधिक टिपा:
(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)

वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे छान पाककृती जागु
माझी ताई लहान लहान पापलेट असेच भरले करते ते आठवलं. फक्त तिच्या मसाल्यात चिंचदेखील असल्यामुळे मसाला हिरवागार न दिसता जरासा काळपट दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निषेध!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे ही अस्ली प्रचि पाहून मग खवळलेल्या जठराग्नीने जेवायला बसलो, की ताटात आलेली गिलक्याची भाजी पाहून जिवाचा तीळपापड होण्याची नवीन (ना)पाककृती होते ~भोकाड पसरतो~

म्हणूनच,
मोडकांच्या निषेधास अनुमोदक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे इथं अशी पाकृ वाचून, पाहून जळजळ होत असताना ताटात गिलक्याची भाजी येते? कुठली पापं फेडताय मालक? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चोरून अस्ले फोटू पहायची पापं हो.. दुस्र काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फोटो पाहून एखाद दिवसापुरता गवती आहार सोडून परमेश्वराच्या पहिल्या अवतारावर ताव मारण्याची इच्छा झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झकास

वेस्टर्नवरुन उरण किती लांब आहे ग जागुतै

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

भरलं पापलेट मस्तच पण पापलेटाला रवा लावून तळण्यापेक्षा तांदळाचे पीठ लावून तळले तर ते जळल्यासारखे दिसणार नाही. जेव्हा मासा आख्खा तळायचा तेव्हा रव्यापेक्षा तांदळाचे पीठ चांगले कारण रवा चटकन जळायला लागतो.

वर शहरजाद यांनी सांगितल्याप्रमाणे मीही वाटणात थोडी चिंच घालते. त्यामुळे स्वाद आणखी चांगला येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रव्याने माश्याची मजा जाते असं मला वाटतं. रवा / मैदा / तांदूळपीठ लावून फ्राय केलं तर त्याचं कटलेट होऊन जातं..

मी बर्‍याचवेळा घरी करतानातरी रवा अजिबात लावत नाही. थेट मसाल्यात माखवून फ्राय.
कोणाचं अनुमोदन आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मसाल्यात माखवून मी सहसा फ्राय करत नाही कारण मला तांदळाची पीठी तळल्यावर एक पापुद्रा धरते तो फार आवडतो. मैदा मात्र मी कधीच वापरत नाही आणि रवाही अगदीच पर्याय नसेल तर.

मसाल्यात माखवून तळण्यापेक्षा ऑवनमध्ये बेक करणे/ भाजणे अधिक आवडते.

पण रवा लावून कटलेट बनते याच्याशी सहमत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जागुतै मी आलो... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-चातक