By anant_yaatree, 20 June, 2024 जटिलाच्या दारावरती दुर्बोध देतसे थाप भेटीत उमजले दोघा, "उभयतांस एकच शाप सद्दीत सुमारांच्या ह्या उ:शाप नसे शापाला अस्वस्थ उद्याची हाक ऐकू ना येई कुणाला" दुर्बोध जटिलसे हसले दुर्बोधून जटिलही गेले अन् विषण्ण होऊनी दोघे आश्रयी कवीच्या गेले :) शेवटच्या कडव्यातील पहिल्या शेवटच्या कडव्यातील पहिल्या दोन ओळी खरेच दुर्बोध आणि जटील आहेत!! सुमारांची कविता अपूर्णतेच्या अंधारात पूर्णत्वाचे विवर अर्थकाहुर शब्दभांडारात विषण्णतेचे प्रहर पद्यपंक्तिच्या मांडवात् शब्दफुलांची झगमग दुर्बोध रचनांच्या जाळ्यात वाचकांची तगमग सुबोध स्पष्ट विचारांचे अर्थवेत्त्यांना वावडे तिमिरघन मायाजालात रसिकांना शब्दकोडे ! Log in or register to post comments 775 views
सुमारांची कविता अपूर्णतेच्या अंधारात पूर्णत्वाचे विवर अर्थकाहुर शब्दभांडारात विषण्णतेचे प्रहर पद्यपंक्तिच्या मांडवात् शब्दफुलांची झगमग दुर्बोध रचनांच्या जाळ्यात वाचकांची तगमग सुबोध स्पष्ट विचारांचे अर्थवेत्त्यांना वावडे तिमिरघन मायाजालात रसिकांना शब्दकोडे !
शेवटच्या कडव्यातील पहिल्या
शेवटच्या कडव्यातील पहिल्या दोन ओळी खरेच दुर्बोध आणि जटील आहेत!!
सुमारांची कविता
अपूर्णतेच्या अंधारात
पूर्णत्वाचे विवर
अर्थकाहुर शब्दभांडारात
विषण्णतेचे प्रहर
पद्यपंक्तिच्या मांडवात्
शब्दफुलांची झगमग
दुर्बोध रचनांच्या जाळ्यात
वाचकांची तगमग
सुबोध स्पष्ट विचारांचे
अर्थवेत्त्यांना वावडे
तिमिरघन मायाजालात
रसिकांना शब्दकोडे !