दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे.

विकीपेडीया मधुन्

अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे". त्याने उत्तर दिले, "बाबा, तुम्हाला जे करण्यास सांगितले आहे ते करा."
अब्राहामने देवाच्या इच्छेला अधीन राहण्यास आणि देवाच्या विश्वासाचे आणि आज्ञाधारकतेचे कृत्य म्हणून आपल्या मुलाचा वध करण्यास तयार केले. [२२] [२३] तयारी दरम्यान, इब्लिस (सैतान) ने अब्राहम आणि त्याच्या कुटुंबाला देवाची आज्ञा पाळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि अब्राहमने इब्लिसवर खडे टाकून तेथून हाकलून दिले. इब्लिसला नकार दिल्याच्या स्मरणार्थ, हजच्या विधीच्या वेळी प्रतीकात्मक खांबांवर दगड फेकले जातात, ज्या ठिकाणी इब्लिसने अब्राहमला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. [२४]

अब्राहाम आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्यास तयार होता हे मान्य करून, देवाने अब्राहाम आणि त्याच्या पुत्राचा सन्मान केला. देवदूत गॅब्रिएल (जिब्रील) ने अब्राहमला हाक मारली, "ओ' इब्राहिम, तू प्रकटीकरण पूर्ण केले आहेस," आणि स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला. अनेक मुस्लिम अब्राहमची भक्ती आणि त्याचा मुलगा इश्माएल याच्या स्मरणार्थ ईद अल-अधा साजरी करतात. [२५] [२६] [२७]

ईदच्या प्रार्थनेनंतर, उधिया , किंवा गुरांचा विधी बलिदान केले जाऊ शकते. श्रीमंत मुस्लिम ज्यांना हे परवडते ते हलाल गुरे, सहसा उंट, बकरी, मेंढ्या किंवा मेंढ्याचा बळी देतात, हे अब्राहमच्या त्याच्या एकुलत्या एका मुलाचा बळी देण्याच्या इच्छेचे प्रतीक आहे. [३६] [३७] बलिदानासाठी प्राण्यांना विशिष्ट वय आणि गुणवत्ता मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. [३८] एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला. [३९] [४०] बळी दिलेल्या प्राण्याचे मांस साधारणपणे तीन भागात विभागले जाते: उधिया करणाऱ्या कुटुंबाने तृतीयांश ठेवला आहे; उर्वरित मित्र आणि नातेवाईक आणि गरीबांमध्ये समान प्रमाणात विभागले गेले आहे. [३६]

तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.

Several vegan Muslim PETA India supporters celebrated Eid by having goats for dawat – not as the main course but as the guests of honour. They prepared a beautiful spread of fresh fruits and vegetables for the rescued animals while sharing the message that Islam, like all religions, teaches compassion and mercy and urging others to sacrifice cruel habits – not animals – by going vegan.

1

2

या स्तुत्य धाडसी संवेदनाशील उपक्रमासाठी पेटा संस्थेचे मनापासुन हार्दिक अभिनंदन.
अधिक माहीती इथे बघु शकतात
https://www.petaindia.com/features/vegan-muslim-peta-india-supporters-ce...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संबंधितांना पिटा-ईद उपक्रमाच्या शुभेच्छा!

संबंधितांना ईद-उल-अजह च्या शुभेच्छा!

---

असे पेज-थ्री-टाइप् उपक्रम्स् राबवून जर जनप्रबोधन झाले असते तर आज...

---

पहिल्या चित्रातील बकऱ्या आवडल्या.

---

यज्ञात बकरी पुत्राचाच बळी देतात, सिंह पुत्राचा बळी देत नाहीत अश्या काहीतरी अर्थाचा कोणतातरी एक संस्कृत श्लोक मनात तरळून गेला. कुणाला आठवला तर सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।
अजापुत्रं बलिं दद्याद् देवो दुर्बलघातकः ॥

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेज्यायला!

सहज संदर्भ पाहावा म्हणून "अश्वं नैव गजन नैव व्याघ्रम नैव च नैव च। अजपुत्रम बलिन दड्याड देवो दुर्बलघटकः॥" हे गुगलून पाहिलं तर -

"अश्वं नैव गजन नैव व्याघ्रम नैव च नैव च। अजपुत्रम बलिन दड्याड देवो दुर्बलघटकः॥" म्हणजे घोडा, हत्ती, वाघ किंवा इतर कशाचाही बळी दिला जात नाही. फक्त कमकुवत बकरीचा बळी दिला जातो. याचा अर्थ असा होतो की दुर्बलांसाठी देव देखील घातक ठरतात. अशक्तपणा खूप घातक आहे. त्यामुळे हिंदूंनी ठरवायचे आहे की त्यांनी आपल्या मुलांना शिकार म्हणून वाढवायचे की शिकारी म्हणून.

- गूगल चा हा पहिला कृबु निकाल दिसला. हिंदुत्ववादी हिंदुत्वाच्या पाशवी विळख्यास इंटरनेट, कृबु बळी पडतंय असं दिसतंय!

---

@त्रिशंकू, श्लोकासाठी धन्स् !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदुत्ववादी हिंदुत्वाच्या पाशवी विळख्यास इंटरनेट, कृबु बळी पडतंय असं दिसतंय!

अगोदर (प्रस्तुत धाग्याकडे) दुर्लक्ष केले होते, परंतु, now that you have mentioned this, मला एक वेगळीच प्रक्रिया येथे दिसून येते, ती लक्षात येण्याकरिता (कदाचित अनवधानाने का होईना, परंतु) आपला हा प्रतिसाद कारणीभूत ठरला, याबद्दल आपले आभार.

बोले तो, तसे पाहायला गेले, तर प्रस्तुत (किंवा अन्यही) मुसलमान व्यक्तींनी प्रस्तुत (किंवा तत्सम) उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविणे (पक्षी: व्हीगन असणे किंवा बनणे, ईदच्या दिवशी बकरा/री न कापणे, ईदच्या दिवशी बकऱ्यांना जेवू घालणे, यांपैकी एक किंवा एकाहून अधिक किंवा याव्यतिरिक्तही अन्य काही) ही त्यांच्या वैयक्तिक अखत्यारीतील बाब आहे, सबब, त्याबद्दल कोणालाही बरेवाईट मत असण्याचे काही कारण नाही, असे वरकरणी भासणे साहजिक आहे. आणि, प्रस्तुत (किंवा अन्यही) मुसलमान व्यक्तींनी खाजगीत जर असे काही केले असते, तर तो खरोखरच त्यांचा वैयक्तिक प्रश्न ठरता, आणि कोणासही त्याबद्दल काही बोलण्यास जागा न उरती. मात्र, प्रस्तुत उपक्रम जाहीररीत्या राबविल्यामुळे आणि त्यातसुद्धा (उदाहरणादाखल, प्रस्तुत लेखाद्वारे वगैरे) त्यास प्रसिद्धी वगैरे दिल्यामुळे काही प्रश्न अपरिहार्यपणे उभे राहतात. (आणि, पब्लिक डोमेनमध्ये आ(ण)ल्यावर पब्लिकला त्याबद्दल मतप्रदर्शनाचा – किंवा, गेला बाजार, त्याबद्दल काही मत असण्याचा – अधिकार नाकारता येत नाही.)

१. खरे तर सणासमारंभाला प्राण्यांचा (घाऊक भावात) बळी देणे (आणि ते मांस नंतर मग भक्षण करणे) हा प्रकार काही केवळ मुसलमानांची (किंवा ईदची) खासियत नव्हे. शाकाहारी/व्हीगन नसलेल्या सर्वच समाजांत हा प्रकार चालतो. (जसे, कालीमातेला बोकडाचा बळी, किंवा (अमेरिकेत) थँक्सगिव्हिंगला जवळपास आख्ख्या राष्ट्राने टर्की खाणे, वगैरे. (घाऊक भावात टर्की जे खाल्ले जातात, ते काय घाऊक भावात टर्की मारल्याशिवाय? तर ते एक असो.))

२. थँक्सगिव्हिंगचे उदाहरण हे भारताशी संबंधित नाही म्हणून तूर्तास सोडून देऊ. (तसेही ते उदाहरण असे प्रकार ही केवळ मुसलमानांची मक्तेदारी नव्हे, एवढेच दाखवून देण्याकरिता घेतले होते. आणि, कदाचित काही वेगळ्या मु्द्द्याच्या अनुषंगाने त्या उदाहरणास पुन्हा भेट देऊसुद्धा. परंतु सध्यापुरते ते उदाहरण बाजूस ठेवू.)

३. आता, काही मुसलमान व्यक्तींनी पेटा इंडियाच्या प्रस्तुत कार्यक्रमाद्वारे उपरनिर्दिष्ट काही गोष्टी केल्या. इथवर ठीक. त्यांच्या या कृती पेटा इंडियाने प्रस्तुत जाहीर कार्यक्रमाद्वारे facilitate केल्या, तथा त्या कार्यक्रमास प्रसिद्धी दिली. त्याउपर, प्रस्तुत लेखकाने प्रस्तुत लेख लिहून त्या कार्यक्रमास अधिक प्रसिद्धी दिली. यातील संबंधित सर्व पक्षांचे यापैकी सर्व गोष्टी करण्याचे सर्व अधिकार मान्य करूनसुद्धा काही प्रश्न उपस्थित होऊ लागतात.

– प्रस्तुत (मूठभर) मुसलमानांप्रमाणेच, कालीमातेच्या निदान मूठभर भक्तांना दुर्गापूजासमयी (किंवा कालीमातेसमोर बोकड कापण्याचा जो कोणता उत्सव असेल (चूभूद्याघ्या.) त्या उत्सवाच्या दिवशी) उपरती होऊन त्या दिवशी त्यांनी बोकड कापण्याऐवजी संबंधित बोकडांसोबत उपरनिर्दिष्ट सर्व किंवा तत्सम कृती स्वयंप्रेरणेने करण्याची शक्यता कितपत आहे? (त्यांनी असे करावे वा न करावे याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही; फक्त, ते असे करतील याची शक्यता किती, एवढाच प्रश्न विचारायचा आहे.)

– पेटा इंडिया ही संस्था दुर्गापूजासमयी (किंवा कालीमातेसमोर बोकड कापण्याचा जो कोणता उत्सव असेल त्या दिवशी) कालीभक्तांकरिता असा काही उपक्रम राबवून त्यास प्रसिद्धी देईल काय / यापूर्वी कधी दिली आहे काय?

– प्रस्तुत लेखक पेटा इंडियाने (किंवा तत्सम अन्य संस्थेने) कालीमातेसमोर बोकड कापण्याच्या उत्सवाच्या दिवशी कालीमाताभक्तांकरिता राबविलेल्या तत्सम एखाद्या उपक्रमास इतक्याच उत्साहाने येथे लेख लिहून प्रसिद्धी देईल काय?

एकंदरीत, ‘मुसलमान समाजात उत्सवाच्या दिवशी प्राण्यांचा घाऊक भावात बळी देण्याचा प्रकार चालतो’ या बाबीला (प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे) हायलाइट करून मुसलमान समाजास (बदनामीकरिता) टार्गेट करण्याचा अंडर-द-टेबल प्रकार वाटला मला हा. (जणू काही फक्त याच समाजात हा प्रकार चालतो.) आणि म्हणूनच,

पहिल्या चित्रातील बकऱ्या आवडल्या.

“‘बकऱ्या’ कोणाला म्हणता ओ?” म्हणून निषेध नोंदविण्याचे एक वेळ मनात आले होते, परंतु विचार रहित केला. बोले तो, प्रस्तुत (मुसलमान) व्यक्तींनी व्हीगन असणे, ईदच्या दिवशी बकऱ्या कापण्याऐवजी बकऱ्या कुरवाळणे, वगैरे कृत्ये खाजगीत केल्यास तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; मात्र, जाहीररीत्या आणि कॅमेऱ्यासमोर त्यांना तसे करण्यास उद्युक्त करून प्रस्तुत संस्थेने त्यांचा भलत्याच प्रचारासाठी (कदाचित त्यांच्या अजाणतेपणी) वापर करून त्यांच्या बकऱ्या (आणि दुसऱ्या चित्रातील त्या मुसलमान सद्गृहस्थाचा बकरा) बनविला आहे, या घृणास्पद प्रकारापुढे त्या दोन (मुसलमान) स्त्रियांचा ‘बकऱ्या (आवडल्या)’ असा (सेक्सिस्ट) उल्लेख हा (आक्षेपार्ह असला, तरी तुलनेने) काहीच नव्हे. असो.

असे पेज-थ्री-टाइप् उपक्रम्स् राबवून जर जनप्रबोधन झाले असते तर आज...

अशा उपक्रमांचा उद्देश जनप्रबोधन हा असतो, या गृहीतकास आधार काय?

——————————

हं, तर थँक्सगिव्हिंगच्या टर्कीबद्दल.

तर आमच्या अमेरिकेत, अगोदर म्हटल्याप्रमाणे, थँक्सगिव्हिंगच्या दिवशी (हा राष्ट्रीय सण आहे; धार्मिक नव्हे.) असंख्य टर्की मारले जातात (नि नंतर खाल्ले जातात). (त्याबद्दल आक्षेप नाही. खायचे आहेत, म्हटल्यावर मारणे प्राप्त आहे. आणि, त्या दिवशी (तुरळक अपवाद वगळल्यास) जवळजवळ आख्खे राष्ट्र टर्की खात असते. म्हणजे किती टर्की मारले नि खाल्ले जात असतील, याची कल्पना करा. तर ते एक असो.)

तर थँक्सगिव्हिंगच्या दिवशी टर्की (मारून) खाण्याच्या (राष्ट्रीय) प्रथेबरोबरच आणखीही एक (काहीशी निरर्थक) राष्ट्रीय प्रथा जोडलेली आहे. त्या दिवशी अमेरिकेचा अध्यक्ष, व्हाइट हाउसमध्ये (अध्यक्षीय अधिकृत निवासस्थानात) मेजवानीकरिता मारून खाण्यासाठी राखीव ठेवलेल्या टर्कींपैकी एका (होय, फक्त एका!) टर्कीला जाहीररीत्या ‘माफ’ (pardon) करून (जणू काही त्या टर्कीने काही गुन्हा केला होता, ज्याला अध्यक्ष मोठ्या मनाने नि दिलदारपणे क्षमा करीत आहे!) मुक्त करून सोडून देतो.

पेटा इंडियाचा प्रस्तुत उपक्रम मला काहीसा या अध्यक्षीय कृत्यासारखा वाटतो. (सिंबॉलिक, परंतु निरर्थक.) म्हणजे, ईदच्या दिवशी मूठभर मुसलमानांकडून मूठभर बकऱ्यांना कॅमेऱ्यासमोर कुरवाळून घ्यायचे. येनकेन प्रकारेण त्याला प्रसिद्धी द्यायची. ईदच्या दिवशी कापल्या जाणाऱ्या असंख्य बकऱ्यांना त्याने काहीही फरक पडत नाही. फार कशाला, वर्षाच्या उर्वरित तीनशेचौसष्ट दिवशी (मुसलमानांकडून किंवा इतरांकडून) कापल्या जाणाऱ्या असंख्य बकऱ्यांनादेखील (यात त्या ईदच्या दिवशी कुरवाळल्या गेलेल्या बकऱ्यांचाही समावेश असू शकतो!) त्याने फरक पडत नाही. फक्त कॅमेऱ्याची ऐश होते.

परंतु, चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

तुमच्या पक्षाचा प्रतिवाद मी 3 शैली त करावयाचे योजिले आहे.
1-मवाळ सहज
2-जहाल खवचट
3-विस्तृत केशत्वचालोचना
थोडा अवधी द्यावा कार्यबाहुल्यामुळे सध्या रुमाल ठेवून जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढा काही विचार केला नव्हता मी हे लिहिताना. फारतर एक पिंक टाकली होती असे म्हणता येईल. (वाईट अर्थाने म्हणत नाही)

चूभूदेघे.

पण या पामराच्या पिंकेस आपण आपल्या ख्यातीप्रमाणे (कदाचित धाग्याहूनही) मोठा प्रतिसाद दिलात त्याबद्धल आभार.

---

बाकी, राष्ट्रीय व धार्मिक व इतर कोणत्याही कारणाने कोणताही मानवेतर प्राणी कायदेशीर रीतीने मारून खाण्यास माझा काही विरोध नाही. मग तो प्रसंग ईद असो की दसरा. अर्थात याचा अर्थ मी स्वतः मांसाहारी आहेच असा नाही.

---

अवांतर: भारतात बहुधा हरीण खाण्यास बंदी आहे. (तसे नसेल तर इग्नोरा.)

मला असे वाटते, एखादा पुरेशी उपलब्ध प्राणी खाण्यास बंदी घालणे हे अन्नव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने अयोग्य आहे.

बंदी का आहे? बहुधा, हरीण मारण्यावर बंदी नसेल तर लोक तो प्राणी मारून ती प्रजाती संपवून टाकतील. (तसे नसेल तर इग्नोरा.)

सध्या बंदी असल्यामुळे, पण हरीण खाण्याची लालसा असल्यामुळे धाडसी लोक जंगलात असलेली / शेतात येणारी हरणे चोरून मारतात. ते लोक पकडले गेले तर त्यांना संबंधितांना चिरीमिरी द्यावी लागते. चोरून लपून खाण्यामुळे खाण्याचा पुरेसा आनंद मिळत नाही. हरिणांचे मांस चढ्या दराने विकले जाते. विकत घेतलेले मांस हरिणाचेच असेल याची खात्री नसू शकते.

त्याउलट विचार करा -

हरीण मारण्यावर बंदी नाही. खरंतर हरिणांची व्यावसायिक पोल्ट्री पद्धतीने पैदास करून अधिकाधिक हरणे (ज्यांना हवे त्यांना) खाण्यास प्रोत्साहन मिळते आहे.
हरिनाचे मांस स्वस्त झाले आहे आणि लोकांना प्रोटीन वगैरेचा स्वस्त पुरवठा होत आहे. असे चांगले होईल ना?

वगैरे.

---

विस्कळीत लिहिले आहे हे मान्य आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राण्यांचे मांस फक्त मुस्लिम च खातात असे नाही.

पण ईद मुळे धार्मिक कारणाने जरी हत्या होत असल्या तरी ते माणसं खाण्यासाठी च वापरतात..

जगात मांसाहारी लोकांची संख्या प्रचंड आहे .आणि खाद्य संस्कृती वर खुप मोठ्या लोकांची उपजीविका चालते.

आणि दूध, मांस शेती योग काम म्हणून ज्या प्राण्यांचा वापर होतो तो वापर बंद झाला तर ह्या जाती पृथ्वी वरून नष्ट होईल.

ज्या प्रण्यान पासून काहीच फायदा नाही त्यांची वाढ,संगोपन,संरक्षण हे माणूस करणार नाहि.
सर्वात नीच प्राणी तर माणूस आहे .
प्राण्यांचे नैसर्गिक खाद्य,जागा,माणसांनी नष्ट केलेल्या आहेत त्या मुळे नैसर्गिक रीत्या त्यांचे अस्तित्व च टिकणे शक्य नाही.
स्वतःच्या आई वडिलांना( वृध्द) माणसं सांभाळत नाहीत ते प्रण्याहा काय सांभाळणार .

जगभरात खूप प्राणी प्रिय संस्था आहेत त्यांनी जगातील सर्व जातीच्या प्राण्यांचे संगोपन मैठ्या प्रमाणात केल्याचे एक पण उदाहरण नाहि.

त्यांचे प्राणी प्रेम हेच एक ढोंग आहे.

पृथ्वी वर तेच प्राणी पुढे वाचतील ज्यांचा माणसाला उपयोग आहे.
ज्या प्राण्यांचा माणसाला उपयोग नाही त्या प्रजाती कायम स्वरुपी पृथ्वी वरून नष्ट होतील हे सत्य आहे.

मांसाहार मुळे जो करोडो लोकांना रोजगार निर्माण होतो.
प्राणी पाळणारे आणि बाकी लोक.
त्यांचा रोजगार बंद होईल त्यांना पर्यायी रोजगार देण्याचा प्लॅन प्राणी प्रेमी संस्थांकडे आहे का?.

अणू बॉम्ब टाकला की लाखो माणसे मरतात तरी असे बॉम्ब माणूस बनवतो म्हणजे तो किती नीच नालायक असेल .है वेगळे सांगायची गरज नाही..
तो उपयोग नसणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व च नष्ट करेल है सरळ आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Deleted

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण इकोफ्रेंडली गणेशोत्सव किंवा दिवाळीची जेवढी जाहिरात केली जाते तशी इकोफ्रेंडली बकरी ईदच्या जाहिराती होत नाहीत अध्यक्षमहोदय

म्हणून साठी आमचा ज्हाईर णिषेढ

अवांतर..
एकूणच नवपुरोगाम्यांना अन् नवहिंदुत्ववाद्यांना झुंज(व)ण्यासाठी राखीव ठेवणीतला मुद्दा म्हणजे बकरी ईदच्या दिवशी कापल्या (सॉरी कुर्बानी दिल्या) जाणाऱ्या बकऱ्या. याकडे नवविवेकी पुढारलेले हिंदू मात्र अतितटस्थ पणे बघतात. दूर्दैव असं की कोणताही मुस्लिम सत्यशोधक चळवळीतील उमदा कार्यकर्ता हिंसा करू नका म्हणून कोणत्याही मुसलमानांचे बौद्धिक घेत नाही. तसंही जोपर्यंत इस्लाम ची परखडपणे चिकित्सा सार्वजनिकरित्या करत नाहीत तोपर्यंत हे रमजान, इद, दिवाळी, होळी वगैरे सण धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी वापरले जाणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

समस्या काय आहे?
प्राणी हत्या .

मग इथे धर्म, आणि उजवे, डावे,हिंदुत्व वादी,मुस्लिम वादी .

हे उप प्रकार राजकीय हेतू नी,राजकीय फायद्या साठी , वेगळाच हेतू साध्य करण्यासाठी तर नाहीत ना ?

समस्या आहे प्राणी हत्या आणि ती थांबवायची आहे ..

प्राणी हत्या धार्मिक कारणाने होते आणि रोपज फक्त खाण्यासाठी पण होते.
मुस्लिम समाजाची प्राणी हत्या फक्त eid पूर्ती थांबवली तरी वर्षभर ते मांसाहार करणार च .
मांसाहार करणार म्हणजे प्राणी हत्या आलीच.
जगभरात खूप लोक मांसाहार वर्ष भर करतात तर हत्या कश्या थांबवायचा ही समस्या असली पशिजेम
पण ती समस्या आहे असे कोणी manat नाही.

म्हणजे प्राणी हत्येला पाठिंबाच आहे.

प्राणी हत्या न करता मांसाहारी जिभेचे चोचले पुरवले पाहिजे .
म्हणजे ह्या कंपन्या मांस निर्माण करणार जीवंत पेशी वापरूनच आणि प्राणी हत्येला पर्याय देणार.
प्राणी ह्या व्याख्येत एक पेशिय प्राणी पण येतात.

आता हा जो व्यवसाय आहे त्याचे लाभार्थी गरीब,सामान्य जनता आहे जी प्राणी पाळतात.
हे बंद केले की .
मांस तर असणार च आहे बाजारात पण लाभार्थी फक्त एक च अंतर राष्ट्रीय कंपनी असेल.

. व्यावहारिक दृष्टी नीच ह्या समस्या कडे बघितले पाहिजे.
धार्मिक दृष्टी नी नाही.
उजवे,डावे असल्या राजकीय दृष्टी नी नाही.
तर जगातील एक समस्या म्हणून धर्म विरहित व्याव्यारिक विचार करून मार्ग शोधला पाहिजे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0