डॉनल्ड ट्रंप दोषी!

आधी नाचून घेते. Dance 4

न्यू यॉर्क राज्यात डॉनल्ड ट्रंपवर खटला सुरू होता. पॉर्नस्टारला पैसे दिले, आणि त्या पैशांची नोंद वकिलाची फी म्हणून केली - या अफरातफरीमुळे निवडणुकांवर विपरीत परिणाम झाला असं या खटल्याचं स्वरूप होतं. एकूण ३४ आरोप होते. ज्यूरी लोकांच्या मते ट्रंप सगळ्या ३४ आरोपांमध्ये दोषी आहे.

ट्रंपला शिक्षा जुलै महिन्यात सुनावली जाईल.

field_vote: 
0
No votes yet

माझ्या संवेदना डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यामुळे ट्रम्पला निवडणुकीला उभे रहाता येणार नसेल तरच नाचण्यात अर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी नाचून घेते. Dance 4

अहो, जरा थांबा! याने काहीही फरक पडणार नाही.

केवळ गुन्हेगार (convicted felon) ठरला म्हणून काय झाले? अध्यक्षपदाकरिता उभे राहण्याकरिता आणि/किंवा अध्यक्ष म्हणून निवडून येण्याकरिता या कारणास्तव संविधान त्याच्या आड येते, असे निदान वरकरणी तरी दिसत नाही.

(आणि समजा, संविधान आड येते, किंवा कसे, असा जर का काही प्रश्न उद्या कोणी उगारलाच, तर त्याला ‘येत नाही जा!’ असे उत्तर ठणकावून द्यायला ट्रंपच्या/रिपब्लिकनांच्या ठेवणीतले सुप्रीम कोर्ट जे सेटिंग करून तिथे बसवून ठेवलेले आहे, ते कशासाठी आहे मग? The bestest Supreme Court in the world that influence (if not money) can buy!)

त्यात गंमत पुन्हा अशी, की convicted felon ठरविला गेल्यावर ट्रंप स्वतः मतदान करण्यास अपात्र ठरतो, मात्र निवडणूक लढविण्यास वा निवडून येण्यास अपात्र ठरत नाही! (याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास सुप्रीम कोर्ट तसा निर्वाळा देईलच!) अर्थात, निवडून येण्याकरिता ट्रंप जर स्वतःच्या मतावर अवलंबून असता, तर मुळात आज हा प्रश्न येता ना!

तिकडे न्यूयॉर्कात तुरुंगात जरी गेला, तरी तुरुंगातून राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता गाजवेल! आणि कोणी त्याचे *टसुद्धा वाकडे करू शकणार नाही! America, truly the greatest nation on earth! (Never thought that it could be possible, परंतु, आजमितीस, मोदींच्या भारताहूनही भि***ट देश!)

(अतिअवांतर: माझी बायको तूर्तास स्थानिक निवडणूकखात्यात अधिकारी आहे. (स्थानिक निवडणुकांपासून ते अध्यक्षीय निवडणुकांपर्यंत ज्या ज्या मिळून निवडणुका आमच्या कौंटीत होतात, त्यांचे आमच्या कौंटीपुरते संचालन तिच्या कार्यक्षेत्रात येते.) यंदा जर ट्रंप निवडून आला, तर देशातली ही बहुधा शेवटची निवडणूक असेल, नि मग त्यानंतर निवडणूकखाते बरखास्त होऊन तुला पोटापाण्याकरिता लवकरच दुसरा काही व्यवसाय पत्करावा लागेल, असे मी तिला अनेकदा सुचवितो. अर्थात, आमच्यात हा खाजगी विनोद म्हणून जरी चालत असला, तरी प्रत्यक्षात असे काही आणि इतक्या थराला जाऊन होणारच नाही, याची शाश्वती आजच्या क्षणाला आजवरचा एकंदर ट्रेंड पाहता छातीठोकपणे निदान मी तरी देऊ शकणार नाही. त्यात पुन्हा आमचा बायडेनमामा! इस्राएलच्या अतिरेकी नि आंधळ्या पाठिंब्यापायी यंदा स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायांवर धोंडा पाडून घेणार आहे, अशी लक्षणे दिसताहेत. आधीच त्याला विरोधक कमी नाहीत, त्यात पुन्हा या कारणास्तव त्याचे हक्काचे मतदार त्याच्यावर भडकलेले आहेत, त्यांची मते तो गमावून बसणार. (हे भडकलेले मतदार ट्रंपला मते देणार नाहीत बहुधा, परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेस मतदान न करता घरी बसून राहातील, which is damaging enough.) तसेही, the lesser of two evils म्हणून त्याला मत द्यायचे, झाले. परंतु, हा असा विचार आम्ही करतो, त्याप्रमाणे आमच्यासारखे इतर अनेकजण करणार नाहीत. (विशेषतः, तरुण मंडळी – Gen Z – आणि अरब अमेरिकन.) आणि, त्याबद्दल त्यांना निदान मी तरी दोष देऊ शकणार नाही. (Gen Zच्या दृष्टिकोनातून पाहायचे, तर बायडेन हा केवळ ट्रंप नाही, या एकमेव कारणास्तव त्याला मत काय म्हणून द्यायचे? या गटाची मते मिळविण्याकरिता केवळ ‘ट्रंप नसणे’ याव्यतिरिक्त त्याने नेमके काय केले आहे, की या गटाने वाकडी वाट करून त्याला आवर्जून मते द्यावीत? आणि, अरब अमेरिकनांच्या दृष्टिकोनातून पाहायचे, तर ट्रंप आला, तरी यांच्या नातलगांना नि आप्तेष्टांना तो इस्राएल्यांकरवी मारविणारच आहे, म्हणून ट्रंपला मत द्यायचे नाही, हे ठीक. परंतु, बायडेनही आत्ता तेच करीत आहे. मग त्याला तरी मत नक्की काय म्हणून द्यायचे? असा प्रकार आहे सगळा.) एकंदरीत, बायडेन या वेळेस निवडून न येण्याची शक्यता बरीच मोठी वाटते. आणि, आलाच जरी निवडून, तरी त्याचा विशेष आनंद नाही. (मात्र, ट्रंप नको, हे तरीही माझे वैयक्तिक मत, परंतु इतरांचे तसे असेलच, असे नाही.) परंतु एकंदरीत, घवघवीत यशाच्या जबड्यातून अपयश हिसकावून कसे घ्यावे, हे आमच्या डेमोक्रॅटांकडून शिकावे! असो चालायचेच.)

——————————

बरे, ते असो. गर्भपातास देहान्त प्रायश्चित्तावाचून गत्यंतर नाही असा काही कायदा करण्याचा घाट तुमच्या टेक्सासातले रामशास्त्री-वॉनाबी लोक घालून राहिलेत, म्हणून जे काही वाचतोय, ते खरे, की गंगाधर बाष्ट्याच्या ‘शुद्ध बेळगावी तुपा’सारखे पीठ मिसळलेले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्सल बेळगावी लोण्यासारखे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉट sap वरून साभार.

US Presidents have set up torture sites, staged coups, ordered human experiments, invaded entire countries, ethnically cleansed indigenous peoples, enabled genocides. That the first Presidential conviction ever is over hush money to cover a sex scandal is… very telling I guess.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या प्रकरणात (सखेद) आश्चर्य वाटण्यासारखी एक बाब म्हणजे मौन पाळण्यासाठी तुफानीला फक्त एक लाख तीस हजार डॉलर्स मिळाले. मी ह्यापेक्षा बरेच जास्त मागितले असते. जेंडर-पे-गॅपबद्दल ओरड चालते ती उगीच नाही.
--

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मी ह्यापेक्षा बरेच जास्त मागितले असते.

ते “बरेच जास्त” मागण्यास पात्र होण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम ट्रंपबरोबर भानगड करावी लागली असती नि एखादवेळेस ट्रंपबरोबर संबंधही ठेवावे लागले असते, त्याचे काय?

बोले तो, ट्रंप एक वेळ (अगदी आनंदाने) ठेवीलही. पण, तुम्ही??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे नक्की किती मागितले असतेत, काही अंदाज द्या. म्हणजे जेंडर पे गॅपबद्दलही काही अंदाज येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दामू नेना चचला.

(आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून साभार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःचा देश नीट सांभाळता येत नाही आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि त्यांचे राज्य करते ह्या वर भारतीय विचार व्यक्त करतात है हास्यास्पद नाहि का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेक रामास्वामी ट्रंपचा उजवा हात आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ट्रंपला बरेच हात आणि पाय असू शकतात. काही हात, नंतर पाय बनून लाथा मारतात. अश्याच एका मायकल कोहेननं नंतर पाय बनून ट्रंपला चिकार लाथा मारल्या. त्याचीच साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली; कदाचित सगळ्यांत महत्त्वाची. आणि ट्रंपला ज्यूरीनी दोषी ठरवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.