भोज्जा.....

भोज्जा.....

न सुटताच
लपाछपीच राज्य
माझ्यावर येतं
ठरलेल्या खांबावर
ओंजळीच्या गुहेत
चेहरा आडकूशी असताना
एक ते शंभर आकडे मोजून
आजूबाजूला नजर फिरते
तेव्हा बिनराज्याचे सगळेच
लपण्यासाठी पांगलेले...
मला आता एकेकाला हुडकायचयं
पण खांब सुटत नाही
अचानक कुणी येऊन भोज्जा दिला
तर फिरून येणार राज्य मला नकोय
मी खांबाला चिकटून
कितीतरी वेळ....
जाऊ वाटत खांब सोडून
आणाव सगळ्यांना शोधून
नी मोकळ व्हाव चटकन
पण.....
नाही सुटत खांब
घट्ट चिकटून बसलेला
लपलेले सगळेच धावून येतात
मी बेसावध असताना
भोज्जा करतात पाठीवर
पुन्हा एकदा लपण्यासाठी
आणि परत राज्य
माझ्यावरच...!
-श्रेया पांचाळ

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Good for you.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0