मोतीचूर आणि मूग 

शिरपा: (पद्यात) 

मोतीचूरs मोतीचूरs अस आमी बोलून राहिलो 
पर त्यांला कायी येगळंच वाटून राहीलय  
अन जनतेच्या उद्धाराच नाटुक फूडं चालू राहीलय 

मोतीचूर हा शबूदच करा बाद
अळीमिळी गुपचिळी हा खरा फार्मात 
अन उद्धाराच नाटुक न केल्या बिगार नाही करमत 

आता सनासुदीस खावा खिलवा मूगगिळ लाडु 
शुss काय बी बोलू नका हे कसोशीनं पाळू
अन उद्धाराच नाटुक कसं फर्मास खेळू 

कोनचा चोर न कोनचा फौजदार, कसं गावनार 
दर पाच-धा वरशानी डिरेसं बदलून फिरनार
अन उद्धाराच नाटुक असच शेवटपत्तोर चालणार 

कदम: आरं चालू दे, चालू दे, बर, येतो का कोर्टात साक्ष ऐकायला 

शिरपा: नाय, माजा बा हानील धरून. पर माज्या बाचा यो साक्षी चा धंदा लय पावरबाज चाललंय. 

पावणे: अहो, अहो, कुठंला धंदा ? 

शिरपा: पावणे, तुमाला काय ठाव नाय, तूमी काय हे इथे णविन ए, हि लोकलशाही मधली कोरटशाही हे! इथं जो तो बुडाखाली आग लागल्यागत तिथे धाव घेतोया. आमच्या बाच्या कामाला मरन नाय. 

कदम: बुडाखाली आग लागल्याव काय हळदी-कुंकू घालावं होय? 

शिरपा: तस नाय, पर मला काय वाटतंय बुडाखाली आग खरंच लागलीय का तपासून बघाव, किती नुस्कानी झाली ते पाहावं, इतरांची बुडं तपासावी - समद्यांचीच थोडी बहुत जळलेली हाईत, मग तुमचं काय ते येगळं. हां, जीवन मरनाचा प्रश्न असेल तर ठीक. पर जो तो उठ सुठ तिकडेच घावतोय, काम नाय धंदा नाय. 

कदम: तुज्या बाला कळलं, तर खरंच धरून हानतय ते तुला!  

शिरपा: त्यो नाय हानत, त्याला टाइम नाय. त्यो बी धावतोय तिकडं.. आज इथच्या, तर उद्याच्याला थोरल्या, तर परवाच्याला म्होरल्या.. आणि मग... 

कदम: असू दे असू दे. पर म्या म्हंतो, त्यांनी तरी अशी बिन-बुडाची गाऱ्हाणी ऐकावीतच का? 

शिरपा: आता माझा बा धरून हानतोय तुला, आर तो त्यांचा नाटुक हाय. चोर-फौजदाराच उद्धाराच नाटुक, हा ह्यांचा. बा भारी इस्टोऱ्या सांगतोय - यकेक नीर्नय - रातचाला फटाकडे, कर्णे वाजवू नका, आता मला सांग, जर एखाद्या  पोट्ट्याने फटाका वाजिवलाच - तर कोन्चा फटाका, कोन्च्या दिशेने, अन कवा फुटला कस कळणार? आनी कळलंच तर त्या पोट्ट्याला धरणार कि आई-बापाला? आणि का? आन ही अशी निरर्थक गाऱ्हाणी गाऊन आपुन जनतेचा पैका वाया घालवतोय की. सर्वात पहिले कायदा स्थानिक पातळीवर करा ज्यामदी सर्व लोकांचा सहभाग असेल, लोकांच्या मताला खरी किंमत असेल, नुसती मतदानापूर्ती नाय. तुला ठाव हाय, आपन स्वातंत्र्यासाटी लढलो, लोकलशाही साटी नाय! म्हणून लोकलशाही कळायला न वळायला टाइम लागेल पब्लिकला. तोपत्तुर आपुन नाटुक पाहू आनि किशनदेवाचा आरजूनाला दिलेला सल्ला पाळू.   

   
शिरपाs  शिरपाs  रे  शिरपा अशी आरोळी ऐकताच सगळे पांगतात. 

पावणे: गावातील निष्पापपण टिको न टिको, पण थोडी विचारशक्ती नक्कीच टिकून आहे, चला आता कुठे मूगगिळ लाडू मिळतोय ते पाहूया.

संवाद, पात्रं (पू . लं च्या वराती वर आधारित) व त्याच्या कल्पना पूर्णपणे काल्पनिक. (हे विडंबन, सध्या भारतात व भारताबाहेर चर्चेत असलेल्या अब्रू-नुकसानी दाव्या बाबत आहे. मूळ नावांच्या ऐवजी मोतीचूर वापरून आणि त्यामुळे शिरपाची झालेली पंचाईत व त्यातून थोडी मौज-मजा करायचा प्रयत्न)  

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काऽही कळले नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी वाचनात आली राहुल गांधी म्हणाले "मोदी नावाच्या सर्व व्यक्ती चोर आहेत" >> मोदी चोर आहेत >> मोदीचोर >>  "मोतीचूर" असा काल्पनिक अपभ्रंश. मोदी नामक व्यक्तीने दावा ठोकला. प्रकरण दिवाणी कोर्टातून, हाय कोर्टातून, अपिल वगैरे सुप्रीम कोर्टात. ह्या पार्श्वभूमीवर, अभिव्यक्ती स्वातंत्र, प्रशासकीय शाखांची (कायदे व न्याय) कार्यप्रणाली ह्यावरील टिप्पणी विडंबनच्या माध्यमातून. अगदी थोडक्यात सगळं कसं छान नाटुकलं चालू आहे, जनतेचं भलं बुर याचा फारसा कोण विचार करतो. अ. मा. ज. (अधिक माहितीसाठी जमल्यास) शोधा " slapp lawsuit "  - टीकाकारांना घाबरवणे, गप्प करणे आणि निर्बंधित करणे हा ह्या खटल्यांचा हेतू असतो. अनेक देशात anti-slapp laws आहेत. आपल्याकडे होतील का कोण जाणे? 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0