तळ ढवळताना : जाणीव, नेणीव, वृत्ती आणि भूमिका

कचरा दिवाळी अंकातील लेख, लेखावरील मतं आणि लेखातील मूळ मुद्दे सोडून भलत्याच गोष्टींवर दिले गेलेले ट्रोलयुक्त प्रतिसाद, नकारात्मक होत गेलेली चर्चा आणि त्यातून निर्माण झालेली खळबळ याला आता काही दिवस उलटून गेलेत. चर्चेत सहभाग घेतलेल्यांच्या भावना आत्तापर्यंत बर्‍यापैकी शांत झाल्या असतील. लेखकाला गरज वाटत नसली तरी संस्थळावरील सदस्यांनी आपली जाण वाढावी या हेतूने आता या घटनेचा सारासार विचार व्हायला हवा असं मला वाटतंय.

लेखकाने टिका टिप्पणी सहन करायला हवी हे निर्विवाद सत्य. पण टिका जर लेखाला अनुषंगून असली, एकमेकांचा आदर बाळगून असली तर ती लेखक आणि वाचक दोघांच्याही वाढीस उपयोगी ठरते. केवळ मज्जा म्हणून चाललेली खेचाखेची सगळ्यांनाच मानवते असं नाही. इथे मातब्बर मंडळी कुजकेपणा हा आपला मूलभूत हक्क मानणारी आणि लेखक त्वरीत संवेदनांच्या कड्यावर येऊन पोचलेला. लेखकाने वारंवार तशी हिंट देऊनही एकाचवेळेस अनेकांकडून मिळणारे शेरे सहन न होऊन लेखकाने सदस्य बामणी वृत्तीचे आहेत असा आरोप केला. ह्या आरोपाने अनेकांना व्यथित केले असणार.

चर्चेत सहभागी बहुतांश सदस्य आयडी वापरणारे. त्यामुळे त्यांची जात समजणे शक्य नाही आणि गरजेचेही नाही. पण लेखकाने केलेल्या आरोपाचा ज्या प्रच्छन्नपणे प्रतिवाद करण्यात आला, त्यातून लेखकाचा आरोप अगदीच चुकीचा नाही हे समोर आले.

शेवटी आम्ही भटे असं स्वतःच मिरवणाऱ्यांना सोडून देऊया. पण भलभलत्या पुरोगामी विद्वानांच्या मनाचा तळ ढवळून निघाला आणि पाणी गढूळ झालं हे पाहणं दुःखदायी होतं.

त्यातूनच रामदासांविषयीचे शल्य मनात ठेवून संत ज्ञानेश्वर ते तुकाराम हा महाराष्ट्राचा प्रवास हिणवला गेला, भयंकर म्हणत अनेक कविंची संभावना केली गेली.

वादविवादात रागाच्या भरात एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप समजून घेता येऊ शकतात, पण त्यानंतर काव्यरसाची मैफिल जमली याचं वाईट वाटलं.

संस्थळावरील चर्चा एंगेजमेंट या मूळ उद्दिष्टापासून दूर जात असताना संपादक मंडळाने समन्वयाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा असते. मात्र आहे हे असे आहे अशी भूमिका घेणार्या सदस्याने मर्ढेकरांच्या कढईत वेगळेच रसायन उकळवले.

आज सो काॅल्ड पुरोगामी ब्राह्मणांसाठी काळ मोठा कठीण आला आहे. आपली चहुबाजूने कोंडी होते आहे असे त्यांना वाटते आहे. आपण कितीही जात मानत नाही म्हटलं तरी जाणीव नेणीव म्हणत आपल्या प्रत्येक कृतीला जातीय नजरेतून पाहिले जात आहे असं वाटून ते अस्वस्थ आहेत. बामणी म्हणून कोणाला हिणवणं सोपं झालं आहे. बहुसंख्याक वर्चस्ववादाच्या आजच्या काळात आपलं काय होणार ही भिती त्यांना भेडसावते आहे. या संस्थळासारख्या मराठीत काही भरीव करु इच्छिणार्यांनी या अस्वस्थतेला वाचा फोडण्याचं काम करायला हवं.

कोत्या, कुजक्या, दुसर्‍याला तुच्छ लेखण्याच्या, विषयातील आशय समजून न घेता शब्दच्छल करण्याच्या वृत्तीला बामणीच का म्हणायचं यावर चर्चा व्हायला हवी. त्यामागे काही खरी खोटी कारणं आहेत का याचा विचार व्हायला हवा. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं मानणं, ते इतरांना जाणवेल अशा कृती करणं, तर्‍हेवाईक विद्वत्ता, कुजकटपणा, तुच्छभाव हे आपल्याला वारसाहक्काने मिळालेले दागिने आहेत असं समजणं या (अव)गुणांना बामणी म्हणायची खरं तर काहीच गरज नाही.

अगदी आताआतापर्यंत अनेकांनी अशी बिरुदं मानाने मिरवली आहेत. आता मात्र यातून बाहेर यायला हवं. आयडी मागून बोलताना कदाचित या गोष्टी टाळण्याची गरज वाटणार नाही. सातासमुद्रापारच्या, समाजाशी देणंघेणं नसणाऱ्यांना कसंही वागण्याने फरक पडणार नाही. पण 'ओ कुलकर्णी - देशपांडे' अशी हाक ज्यांना रस्त्यावर ऐकावी लागते त्यांची भिती अशा प्रसंगातून वाढते.

प्रश्न या एका प्रसंगाचा नाही. लेखकाच्या अपमानाचा नाही. प्रश्न एका संस्थळाचाही नाही. प्रश्न आता वारंवार घडू शकणाऱ्या घटनांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाचा आहे. माणूस म्हणून आपण कुठे जाणार आहोत याचा आहे.

दिवाळी अंकातील खालील लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्यांनी हा विचार मांडायला प्रवृत्त केले असले तरी ह्या घटना केवळ इथेच घडताहेत असं नाही. एकूणच ट्रोल, प्रतिक्रिया , त्यांना दिले जाणारे प्रतिसाद यांच्या जोडीनेच तथाकथित बामणी वृत्ती, तळातील गाळ यावर सांगोपांग चर्चा होऊ शकली तर त्यात सहभागी व्हायला आवडेल.

संदर्भ :
RRR च्या निमित्ताने : टेस्ट आणि ट्रॅश :
https://aisiakshare.com/node/8601

खूप कचरा आहे :
https://aisiakshare.com/node/8605

एका झूमकॉलची गोष्ट :
https://aisiakshare.com/node/8607

दोन बाजू, चार हाथ लांब : नाणं आणि नेणिवा :
https://aisiakshare.com/node/8611

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

जाती भेद पहिला आणि आताचा.

खूप फरक आहे.

पहिला जाती भेद होता (समाजाच्या काही हिस्से हे जास्त बाधित होते ते मानवीय नव्हते)
पण त्याला एक मर्यादा होती.
प्रत्येकाचा हक्क अबाधित होता

प्रत्येकच पोट पाण्याचा व्यवसाय अबाधित होता.
त्या ठिकाणी त्याच जातीचा व्यक्ती असावा अशी मर्यादा होती त्याला पर्याय नव्हता
तेल्याने तेलाचा उद्योग करू नये असा विचार नव्हता एक उदाहरण.
त्याचा हक्क अबाधित होता.
आताच्या जातीय व्यवस्थेत सर्व हक्क नाकारले जातात.
हा विरुद्ध बोलला टाका बहिष्कार.
हा प्रगती करत आहे टाका bahishkarm
हा आपल्या टोळी मधील नाही टाका बहिष्कार.
हे खूप धोकादायक आहे.
तरी त्या व्यवस्थेचे समर्थन नाही.
चूक ते चूक च
आताची जातीय व्यवस्था कोणत्याच तत्व वर आधारित नाही.
जातीय टोळ्या निर्माण झाल्या आहेत आणि
ह्या टोळ्या च वापर करून सत्ता मिळते.
हे सत्ताधारी लोकांना माहीत आहे.
हा भेद कमी होण्या पेक्षा वाढत जण्या वर सर्वांचा भर आहे.
आस्तिक,नास्तिक, विविध धर्माचे तत्व. कोणाचेच विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेश नाही.
पण माझेच खरे ही वृती वाढत आहे.

आताचा जातीय भेद हा पहिल्या पेक्षा जास्त विनाश कारक आहे....
राजकीय पक्ष,संघटना,वेब पेजेस, WhatsApp group .
Face book बनवून टोळ्या निर्माण झाल्या आहेत

ना कोणी इथे पुरोगामी आहे.
ना कोणी प्रतिगामी आहे.
पण त्यांना पुरोगामी आणि प्रतिगामी chya
व्ह्याखेत मात्र अडकवले आहे.
टोळी मध्ये सहभागी झाले की आपले गैर हक्क पण सुरक्षित होतात.
हा स्वार्थी विचार तमाम जमात करतें

स्वतःची बुद्धी जो पर्यंत लोक वापरणार नाहीत.
लोक मध्ये जो पर्यंत संयम ठेवणार नाही. त
खरे दुश्मन कोण हे लोकांना जो पर्यंत स्वतःच्या बुध्दी नी समजणार नाही.
तो पर्यंत पुराण काळा पेक्षा जास्त जातीय वाद होईल.
. स्व बुद्धी वापरणे, आणि संयम जे गुण माणसात आले तर काहीच प्रॉब्लेम राहणार नाहीत

विविध प्लॅटफॉर्म वर ज्या जातीय , धर्मीक, अस्तिक,नास्तिक,उजवे, डावे ह्या ब्रँड खाली ज्या
टोळ धाडी निर्माण झाल्या आहेत .
त्यांचा प्रभाव स्व बुद्धी वापरून लोकांनी नाकरवा तोच सुदिन.

माझे विचार इथे कोणाला पटणार नाहीत.
कारण ते खूप वेगळे आहेत.
प्रवाह विरुद्ध आहेत
संघटित व्हा आणि हक्क साठी लढा .
म्हणजे नक्की काय.
टोळ्या निर्माण करा आणि बाकी सर्वांवर अन्याय करा
हा अर्थ तर नक्कीच नसावा
मग गुन्हेगारी टोळ्या पण त्याच तत्व वर चालतात.त्यांना का बदनाम करायचे.

का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0