रावबाजी

('महाराष्ट्र टाइम्स'मध्ये एकेकाळी सदरलेखन करणाऱ्या श्री. बा. जोशी यांच्या ‘उत्तम मध्यम’ या पुस्तकातील ‘विषण्ण आणि विलक्षण’ हा लेख आवडल्यामुळे त्या लेखाचे काही संपादित अंश ‘ऐसी’वरील वाचकांसाठी!
पेशवाई बुडविणारा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या दुसऱ्या बाजीरावाच्या ‘रावबाजी’ जीवनशैलीचे हे किस्से ‘ऐसी’करांनाही आवडतील!
)

p2 रावबाजी उत्तर पेशवाईतील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पेशवाई बुडवली असाच इतिहासाचा कौल आहे. परंतु माणूस होता तरी कसा या कुतूहलाची अंशत: पूर्ती या (‘शेवटचे बाजीराव यांच्याविषयी अखेरच्या काही आख्यायिका’ ले. अनंत वामन बरवे, 1910) पुस्तिकेने होते. त्यांचा विक्षिप्त, तऱ्हेवाईक स्वभाव या आठवणीतून स्पष्टपणे उभा राहतो. इंग्रजांचा पेन्शनर म्हणून दूर उत्तर प्रदेशातील ब्रह्मावर्त येथे त्यांची रवानगी झाली. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात याची प्रचीती तेथील त्यांच्या वर्णनावरून येते. हा पीळ स्वाभिमानाचा वा बाणेदारपणाचा नसून अहंकाराचा आणि गतवैभवाचा आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीचे जे चित्र उभे राहते ते काहीसे केविलवाणे आहे. पुण्याहून निघताना अट्ठावीस हत्तींवर संपत्ती लादून नेली होती म्हणे. दरमहा पेन्शन होते सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट (66,666/-) रुपये। त्यापैकी पाऊण हिस्सा तैनातीच्या ताफ्याच्या पगारावर खर्च होई व पाव हिस्सा भोजनावर.

सोवळ्याओवळ्याचे बंड त्या जमान्यात फार असे. परंतु रावबाजींनी ते इतके पराकोटीस नेले होते की, एकदा चातुर्मासातील सकाळी संध्या आटोपून ब्रह्मयज्ञ करीत असताना तनखा घेऊन इंग्रज एजंट आला असता, ब्रह्मकर्मात साहेबाचा शब्द ऐकल्याने बाधा आली असे मानून त्यांनी सर्व रुपयांची रास भागीरथीत बुडवली! हा प्रकार कलकत्त्यास इंग्रज सरकारास समजताच त्यांनी सदर साहेबास सातशे रुपये दंड ठोठावला, पुन्हा रक्कम पोचती केली आणि तनखा सुपूर्त करण्याची तजवीज रामचंद्र व्यंकटेश या वकीलावर सोपवली! हा तनखाही त्यांना कंपनीच्या मुखवट्याच्या नाण्यात चालत नसे, तर सुरती रुपयांतच! सोन्या-रुप्याखेरीज इतर धातूस स्पर्श न करण्याचे त्यांचे व्रत होते. सोन्याच्या ताटात जेवीत. रुप्याच्या चौरंगावर सोन्याची थाळी, सभोवती अठ्ठावीस सोन्याच्या वाट्या व तितकेच सोन्याचे चमचे असा थाट असे.

त्यांच्या खाण्यापिण्याचा बराच तपशील आठवणी सांगणाऱ्याने पुरविला. बहुधा तो पाकशाळेतील बल्लवाचार्य अथवा वाढपी असावा. ताटात फक्त भात आणि वरण असे. बाकी चटण्या-कोशिंबिरीपासून सर्व पदार्थ वाट्यातून घेत. दहा भाज्या, दहा चटण्या, सर्व पदार्थांस तुपाच्या फोडण्या आणि खाशा पंक्तीला रोज पुरणपोळी असे. रावबाजी रुपयास शेरभर मिळणारा दिल्लीचा तादूळ आणि बऱ्हाणपुरी तुरीची डाळ पसंत करीत. त्यांना रोज मक्याची कणसं लागत आणि कलकत्त्याहून त्यांच्यासाठी खास शहाळी येत. रोज एका शाहाळ्यातील पाणी पिण्याचा त्यांचा परिपाठ असे. पंक्तीत बायकांमुलांना चांदीची ताटे असत व इतरांना सव्वाहात केळीची पाने! केशर रोज शेर शेर खर्च होई. पंक्तीच्या वेळी दुवक्ता वाजंत्री वाजत. रांगोळ्या, रंगीत पाट, केशरी गंध, अगरबत्त्या हा दरबारी थाट तर नेहमीचाच. रोज अच्छेर कापूर, अष्टगंध असा मालमसाला लागे. दोन एकादशा व चतुर्थीचे उपास करत. द्वादशीच्या पारण्यास व चतुर्थीच्या सायंकाळी व्रतमुक्तीच्या भोजनास ब्राह्मणांस मुक्तद्वार असे व तेव्हा दोन दोन हजारांपर्यंत पान होई. कोवळ्या उत्तम भाज्या व फळफळावळ असली म्हणजे रावसाहेब फार खूष होत. भोजनाच्या वेळेशिवाय मध्ये पाणीसुद्धा पीत नसत. दुपारच्या पंक्तीस रोज एखादे तरी पक्वान आलटूनपालटून असे. नानासाहेब, बाळासाहेब, रावसाहेब यांच्या शंभर शंभर पानांच्या पंक्ती बसत. शिवाय तीन बायकांच्या तिघी सुनांच्या व तिघी लेकींच्याही पंक्ती असत. मुलांचा स्वयंपाक वेगळा असून सुना, लेकी, बायका यांचा मात्र एकत्र होई. बाजीरावास भोजनानंतर रामटेकच्या दहा पानांचा विडा लागे. रोज अच्छेर उदबत्त्या.

दशहरा उत्सवात एका रात्री बारा वाजता रामचद्र तात्या वाकनीस यांना हकूम झाला की, उदईक ब्राह्मणभोजनास मोदक करावे. वाकनीसांनी रातोरात कानपुरास माणूस पाठवून तीन आण्यास एक या दराने नारळ आणवले व लागलीच रांधणाऱ्या बायकांस स्वयंपाकास लावून सकाळी आठच्या पंक्तीस मोदक वाढले. साहेबांनी त्यावर वाकनीसाला हजार रुपये पोशाखादाखल बक्षीस दिले!

रावबाजींचा नेसूचा धोतरजोडा येवल्याचे रेशीम व चंदेरीचे सूत यांचा विणलेला असे. मध्ये सूत काय ते वीतभर रुंदीचे, बाकी दोहो अंगास रेशमी काठ असा त्या धोतराचा वाण असे. आरंभी रंगीबेरंगी वस्त्रे वापरत. पुढे पुढे सर्व पोशाख पांढराच करू लागले होते. दसऱ्यास मात्र दरबारी साजशृंगार असे. बसायची आसने शालजोड्यांची असत. ही आठ आसने रोज धुवून ठेवावी लागत. थंडीच्या दिवसांत रजई, दुलई, शाली पांघरत नसत. बिछान्यालगत दोन शागीर्द बसत व पेटत्या शेगड्यांवर धोतरे शेकून घेऊन आळीपाळीने साहेबांवर पांघरीत! रेसिदेंतांच्या भेटीसाठी वेगळी जागा (आऊटहाऊस) होती. त्यात गाद्या, रुजामे अशी बिछायत असे. रावसाहेबांची बिछायत वेगळी असे. इंग्रज रेसिडेण्टासही बूट बाहेर काढून ठेवून गुडघे टेकून बिछायतीवर बसावे लागे. त्यासाठी तो मुद्दाम पोकळ विजार घालून येई. संभाषण दुभाष्यामार्फत होई.

रात्री झोपण्यास उशीर झाला, तर दुसरे दिवशीचे नित्यनेमास विलंब होई व साहेब आगपाखड करत. त्यासाठी चाकरांनी युक्ती अशी केली होती की उठण्याची ठरलेली वेळ टळून गेली तरी तासाचे टोले राव उठल्यानंतरच देत! ब्रह्मयज्ञासाठी स्वारी भागिरथी तीरावर जाई तेव्हा बरोबर चार उंट असत. एकावर मोहरा, पुतळ्या, रुपये, दुसऱ्या दोन उटावर धाबळ्या. मुकटे, शाली, धोतरे वगैरे व चौथ्यावर शौचकूपाची सोय असे! शाही उंटांवर दहाचा आकडा डाग देऊन घातलेला असे.

दानधर्म करण्यात त्यांनी बरीच दौलत उधळली. चिंचवडच्या मोरयाचे पुजारी भेटीस आले, त्यांना लक्ष रुपये दक्षिणा दिली. शंकराचार्यांना पत्नास हजार रुपये, गंगेवर ब्रह्मयज्ञाचे वेळीही दक्षिणा, वस्त्रे, तीळ-तांदूळ यांची खैरात करत. रोज खर्चाच्या याद्या पाहून दोन प्रहरी व रात्री सह्या करत. नानासाहेबाने इंग्रजांचे पाहून २७०० रुपयांची बगी घेतली. ‘जलचरांची वाहने कशाला पाहिजेत?’ असे म्हणून त्यांनी बगीचे तुकडे करवले, आणि सात हजार रुपये खर्चून मोत्याच्या झालरी लावलेला रथ करवून नानास दिला. दक्षिणेचा बराच तपशील निवेदकाने नमूद केला आहे. कथाकीर्तनाचे वेळी लवंगासुपाऱ्या मुठी भरभरून वाटत. ब्राह्मणांना केळीचे पान अडीच हात लांबीचे मांडत. त्यावर पदार्थ एवढ्या रेलचेलीने असत की, हात पोचत नसे; म्हणून दूरचे पदार्थ जवळ सारण्यासाठी दोन ब्राह्मण शागीर्द प्रत्येक पानाच्या दोन बाजूस बसवीत होते!!
दुष्काळ पडला तेव्हा स्वत:चा राहता वाडा पाडून नव्याने बांधण्याचे काम काढले व दीड वर्षपर्यंत गोरगरिबांस पोसले. पंचवीस लाख रुपये या दुष्काळी कामावर खर्च झाले म्हणून वाकनीसांनी कुरकुर करताच “रुपये नुसते खजिन्यात ठेवून काय करावयाचे आहेत, आज माणसांचे जीव वाचले, रुपये सार्थकी लागले.” असे उद्गार काढले. एकदा दोन लक्षांचा दरोडा पडला. पंधरा असामी पकडले गेले. तेव्हाही दया दाखवून त्यांना पदरी ठेवले. जडजवाहीर सांभाळण्यासाठी विंचुरकराच्या पागेतील ब्राह्मणांचा पहारा बसवला. जरीपटक्याचे निशाणही विंचुरकरांच्या हवाली असे. उत्सवप्रसंगी स्वारी निघे तेव्हा निशाणासह सर्व साजसरंजाम असे. गणेशचतुर्थीच्या उत्सवासाठी एकशेएकवीस तोळे वजनाची सोन्याची मूर्ती होती. ती भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासूनच पूजीत. चतुर्थीस मृत्तिकेचा मूर्ती मखरात व 121 मूर्ती बाहेर बसवीत. बाहेरचे गणपती पंचमीस बोळवीत व मखरातील मूर्तीचे अनंतचतुर्दशीस विसर्जन होई. पर्वणीस्नान चुकवत नसत. आसनमांडी घालून गंगेचे सबंध पात्र पोहून जात, अशाच अतिपोहण्यामुळे अखेर पक्षाघाताचा झटका आला. त्यावेळी अग्निहोत्र घेतले होते. स्वारीचा मुक्काम गंगेकाठी. कुटुंबकविला दूर वाड्यावर. अग्नीला आहुती द्यायच्या तर दंपतीने द्याव्या लागतात. तेव्हा दोन कोस लांबीची रेशमी दोरी करवली व तिचे एक टोक तिकडे बाईसाहेबांनी धरावे व दुसरे इकडे यांनी अशी आठ दिवस तजवीज केली होती!

इंग्रज सरकारने त्यांना तीन खून माफ केले होते. त्यांपैकी एक त्यांनी कारभारी तात्या दीक्षित यांच्या गुन्हेगारीचे वेळी खर्ची घालून त्यास वाचवले.

अशा या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी जितक्या विलक्षण तितक्याच मन विषण्ण करणाऱ्या!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आख्यायिका गंमतीच्या आहेत. केशराबरोबर तिखटमीठही सढळ हाताने वापरलं असणार, पण तीन खून माफ म्हटल्यावर इतक्या किरकोळ प्रमादाचं आता काय?

> (‘शेवटचे बाजीराव यांच्याविषयी अखेरच्या काही आख्यायिका’ ले. अनंत वामन बरवे, 1910)

हे पुस्तक इंटरनेटवर कुठे उपलब्ध आहे का? २०१८ साली द्विशताब्दीनिमित्त आपल्या मायबाप सरकारने पुनर्मुद्रित करायला हरकत नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

>>भोजनाच्या वेळेशिवाय मध्ये पाणीसुद्धा पीत नसत.
म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग पेशवेकालीन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजीराव उठल्याशिवाय टोल वाजवत नसत, हे वाचून फारच मौज वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाजीरावला षष्ठीचा प्रत्यय लावला असता तर अधिक मौज वाटली असती. Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

रावबाजींचे किस्से सुरस आणि रंजक आहेत. त्यातले तथ्य पडताळणे आता अवघड आहे, विशेषत: जेवणावळी आणि त्यांचा खाजगी दिनक्रम या बाबतीतले.

अती पोहण्यामुळे पक्षाघात झाला हे विधान मला फारच थोर वाटले.

इंग्रज सरकारने त्यांना तीन खून माफ केले होते. हे वाक्य वाचल्यावर शिंदे, होळकरांसारख्या सरदारांचे जे स्वामी, त्या पेशवे सरकारांना माफ करणारे हे इंग्रज कोण लागून गेले? असे वाटले. परंतु पेशवे गाफील राहिले आणि स्वकीयांनी विश्वासघात केला त्यामूळे परकीयांच्या दयेवर जगणे प्राप्तं ठरले हे खरे.

दुसरे बाजीराव पेशवे हे रघुनाथराव पेशव्यांचे दत्तक चिरंजीव होते. त्यांनी पेशवाई बुडविली हे म्हणणे तितकेसे बरोबर वाटत नाही. पानीपतानंतर मराठेशाहीचा पडता काळ सुरू झाला. थोरले माधवराव होते तो पर्यंत जरा टिकाव धरला होता. पण काकासाहेंबाच्या कुटील कारस्थानी राजकारणेच खरे तर पेशवाईच्या अस्ताला प्रारंभ झाला होता.

बावनखणी आणि लोकशाहीर राम जोशी याच पेशव्यांच्या काळातले होते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सोवळ्याओवळ्याचे बंड त्या जमान्यात फार असे. परंतु रावबाजींनी ते इतके पराकोटीस नेले होते की, एकदा चातुर्मासातील सकाळी संध्या आटोपून ब्रह्मयज्ञ करीत असताना तनखा घेऊन इंग्रज एजंट आला असता, ब्रह्मकर्मात साहेबाचा शब्द ऐकल्याने बाधा आली असे मानून त्यांनी सर्व रुपयांची रास भागीरथीत बुडवली! हा प्रकार कलकत्त्यास इंग्रज सरकारास समजताच त्यांनी सदर साहेबास सातशे रुपये दंड ठोठावला, पुन्हा रक्कम पोचती केली आणि तनखा सुपूर्त करण्याची तजवीज रामचंद्र व्यंकटेश या वकीलावर सोपवली! हा तनखाही त्यांना कंपनीच्या मुखवट्याच्या नाण्यात चालत नसे, तर सुरती रुपयांतच!

ही दया?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण तनखा घ्यावा लागे... परकीयांकडून.
छत्रपतींकडून नव्हे.
त्या पूर्वी पेशवे राज्यकर्ते होते... पदरी अनेक सरदार बाळगुन होते, ते देणारे होते- घेणारे नव्हते.
पेशव्यांचा शब्द प्रमाण मानणारे महाराष्ट्रा मधे अनेक होते. खुद्द साताऱ्याचे छत्रपती देखिल पेशव्यांचा मान ठेवित असत.
नंतर त्यांच्याकडे सत्ता, अधिकार काहीच नव्हते. सर्व काही इंग्रजाच्या स्वाधीन केले होते ... नाईलाजाने करावे लागले होते.

तैनाती फौजेसाठी तनखा मिळत असे. स्वत:चे सैन्य बाळगण्याची मुभा नव्हती. ही गुलामीच ना?
भारतातील सर्व सत्ता हस्तगत करण्याकरता जितके अडथळे, संघर्ष कमी होतील तितके चांगले. हे साधण्याकरता पेशव्यांना चुचकारून शांत ठेवणे इंग्रजांना भाग होते. म्हणून हे सर्व प्रकार चालू शकत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

हे सगळं वाचल्यावर लोकं पेशवाईचा द्वेष का करतात त्याची कल्पना येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपर्युक्त विषयावर पुढील दोन पुस्तके मी वाचली आहेत.

PC Gupta
The Last Peshwa and the English Commissioners 1818-1851
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.283448

Michael McMillan
Last of the Peshwas A tale of the Third Maratha War
https://archive.org/details/lastofpeshwastal00macmiala

दोन्ही पुस्तकांवरून बाजीरावच्या आयुष्याच्या शेवटच्या तीसबत्तीस वर्षांची यथार्थ कल्पना येते. दुसरे पुस्तक ही एक कादंबरी आहे पण ती अशी लिहिली आहे की एका इंग्रजाचे ते स्वानुभवकथन वाटावे. पुणे आणि आसपासच्या परिसराचे तपशीलवार वर्णन त्यात आहे. इंग्रजांच्या तत्कालीन पराक्रमांचे गुणगान करणे हा उद्देश त्यातून स्पष्ट दिसतो. खडकीच्या शेवटच्या लढाईचे वर्णनहि आपणास माहितीपूर्ण वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मामींचं देवेंद्र फडणवीसांबद्दलचं वक्तव्य वाचल्यावर मला हा लेखच आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खायचे??????

भूतकाळ का बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोकांना आपलं वय झाल्याची जाणीव असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या म्हणीत भूतकाळच तर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव आणि कर्मकाण्डाचे अवास्तव स्तोम राज्यकर्त्यांनी माजवले की काय परिणाम होतात याचे पेशवाई हे उत्तम उदाहरण आहे. याच उलट देवधर्माला जरूरीपुरते महत्व देउन उत्तम राज्यकारभार करता येतो हे शिवाजीच्या कार्यावरून दिसून येते. तरीही बहुसंख्य ब्राम्हण आजही यज्ञयाग पूजाअर्चा जाहीरपणे करणाऱ्यांच्या प्रेमात आहे.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

आक्षेप नक्की कोणत्या मुद्द्याला आहे हे कळले तर त्याचा अभ्यास वाढवता येईल. तिसऱ्या वाक्याबद्दल म्हणत असाल तर बहुसंख्य असा शब्द वापरल्याने त्यासाठी विदा देण्याची आवश्यकता नसावी.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्षेप सरसकटीकरणाला (आणि बादरायण संबंध जोडण्याला) आहे. आणि

बहुसंख्य असा शब्द वापरल्याने त्यासाठी विदा देण्याची आवश्यकता नसावी.

का बुवा? ही politically correct पळवाटसुद्धा नाहिए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

पण मुद्दा नक्की कोणता ते राहिलेच. बादरायण संबंध नक्की कोणाचा कोणाशी? बहुसंख्य ब्राम्हणांचा आणि कर्मकांड पूजाअर्चा यांचे स्तोम माजवणाऱ्या राजकर्त्यांशी की पेशवाईचा धर्म वगैरे यांच्याशी? मुद्दे पटत नसतील तर नुसते 'अभ्यास वाढवा' म्हणणे सोपे आहे. पण ते मुद्दे खोडून काढले तर तो योग्य प्रतिवाद झाला.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते मुद्दे खोडून काढले तर तो योग्य प्रतिवाद झाला.

मान्य, पण मूळ प्रतिसादात काही मुद्दा मांडला गेला आहे, याविषयी साशंक आहे. Not even wrong अशी काहिशी स्थिती आहे, असे वाटते.
१. सदर लेख रावबाजींच्या राज्यकर्ते म्हणून पायउतार झाल्यानंतरच्या जीवनशैलीविषयी ( लोकापवादावर आधारीत, बखर स्वरूपात) आहे. या काळातील/ पूर्वी राज्यकर्ते म्हणून रावबाजी हे व्यक्तिमत्व हे पेशवाईचे प्रातिनिधिक म्हणून गणता येईल, असे वाटत नाही.
२. तत्कालिन समाजअपेक्षेनुसार, आणि साम्राज्याच्या सधनतेनुसार शिवरायांनीही धार्मिक मदत, देणग्या दिल्याच्या नोंदी आहेत. सैन्य, सरकारी कामकाज इत्यादींमध्ये मराठी राज्यकर्त्यांनी( अपवाद वगळता) धार्मिक बाबींना फार ( हे अर्थातच कालसापेक्ष आहे-
उदा. सध्याच्या राज्यकर्त्यांचीही भविष्यात तत्कालीन चष्मे घालून समीक्षा होणारच आहे) ढवळाढवळ करू दिल्याची उदाहरणे कमीच आहेत( अर्थात, ह्यात त्यांचे द्रष्टेपण आहे असे नाही, काही बाबतीत( उदा. सैन्यात दुसऱ्या धर्माचे सरदार असणे इ.) धर्म ही काहिशी fluid संकल्पना असावी.)
३. रावबाजी ह्या कोणत्याही अर्थाने प्रातिनिधीक नसणाऱ्या गतकालिन राज्यकर्त्यांच्या जीवनशैलीचा, आणि २०२२ मध्ये 'बहुसंख्य' ब्राह्मणांच्या ( राज्यकर्ते नसताना( गेले बिचारे!)) वैयक्तिक जीवनातल्या वर्तनाचा संबंध बादरायण नव्हे, तर काय म्हणावा? मुळात असा काही संबंध असलाच पाहिजे, असे का गृहित धरले जातेय (" तरीही...")?

मूळ प्रतिसादात मुद्दयांपेक्षा वैयक्तिक पूर्वग्रह जास्त आहेत, अशी शंका आहे- म्हणजे ते असण्यावर मुळीच आक्षेप नाही, पण त्यांचा प्रतिवाद कसा करणार? पूर्वग्रह ही ज्याची- त्याची privileged विचारधारणा असते-
साधार, निराधार कशीही असली तरी चालते. सांख्यिकीच्या नियमांचे(statistically significant association,p value असे काही...) त्याला बंधन नाही. त्यामुळे प्रतिवादाला माझा पास.
पण causation, correlation, association यामध्ये अंमळ गल्लत होते आहे, हे विनम्रपणे निदर्शनास आणून देतो, आणि रजा घेतो.
ता.क.: मूळ विनंती Rational thought process चा अभ्यास वाढविण्याविषयी होती, हे स्पष्ट करतो. इतिहास, समाजकारण इ. चा नव्हे. (आणि तसेही, बखरींचा अभ्यास वाढवून या विषयात नवीन काय मिळणार?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

(आणि तसेही, बखरींचा अभ्यास वाढवून या विषयात नवीन काय मिळणार?)

याच धाग्यावर वर ही प्रतिक्रियासुद्धा आहे. अभ्यासातून नवीन काय मिळणार ते माहीत नाही, पण माहीत आहे तेच पुन्हा लिहिण्यातून काही नवीन मिळू शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपला रोख समजला नाही. Could you be please note explicit?
सदर धागा नानावटींनी 'मौजमजा' सदरात मोडला आहे.appreciate his subtle wisdom and request the respondents to maintain the spirit.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

मलाही धागा वाटून मजाच वाटली. रावबाजीचा माज वगैरे वगळला तर ह्या गोष्टी मौजेच्या आहेत. विशेषतः मालक करवादू नये म्हणून नोकरांनी केलेली चापलूसी, मालकाला गंडवणं, हा प्रकार मला आवडल्याचं सुरुवातीलाच लिहिलं आहे.

सगळे प्रतिसाद अशाच प्रकारचे असते तर काय "मजा" राहिली असती! उत्तर पेशवाईत जे चाळे चालत असत त्यांबद्दल वाचून रावबाजीबद्दल करुणा वगैरे वाटणं अशक्यच होतं. लेखातला शेवटचा वाडा पाडण्याचा किस्सा वगळला तर सदर व्यक्तीबद्दल मला आदर, प्रेम वगैरे वाटणं अशक्य आहे. तरीही तशा अर्थाच्या प्रतिक्रिया येतात. हे बघून बखरी वाचून नवं काही त्या काळाबद्दल समजेलसं वाटत नाही, पण आजच्या समाजाबद्दल समजेलसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Thanks for clarification: and now some generous rambling on my part(not necessarily as a response to your post and Dr Maneesha's prior posts pointed by you).

उत्तर पेशवाई (आणि काहीअंशी त्याआधीचाही) मराठ्यांचा इतिहास बऱ्याचशा बाजारगप्पा, propaganda इ. नी एवढा कलुषित झाला आहे, की त्यापैकी आख्यायिका-बखरींकडे तरी मौजमजा यापलीकडे जाऊन serious social commentary, evidence for judging personae dramatis म्हणून बघणे अवघड आहे. Before analysing this data, we're not really sure about the sanctity of the data. प्रतुलचंद्र गुप्तांचं नाव उपरनिर्दिष्ट आहेच, जदुनाथ सरकार, रि.सरदेसाई इ. नी या विषयांवर संशोधनात आयुष्य खर्च केले आहे- तत्कालिन इतिहासाचे objective (as much as possible, more informed and better researched, maybe) critique मराठेशाहीला/पेशवाईला तितकेही प्रतिकूल नाही( येथे तुलनेला control group तत्कालीन भारतीय आणि युरोपियन राज्यकर्त्यांचा आहे, हे नमूद केलेच पाहिजे-३ खून माफ वगैरे मग फार exceptional वाटत नाही-morally objectionable असले तरीही). १८१८ नंतरच्या जेत्यांनी sponsored, लिहून 'घेतलेला' इतिहास, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या, प्रत्येक पिढीत अतिशयोक्तीने, मीठमसाल्याने फुगणाऱ्या आख्यायिका ह्या गोंधळातून सत्य बाहेर काढणे अवघड असते- कहाचित अशक्यही. मला वाटतं, बॅटमॅन यांनी याविषयी यापूर्वीही येथे लिहिले आहे.
त्यातून दुसऱ्या बाजीरावाबद्दलचा साराच इतिहास उलटसुलट, परस्परविरोधी किश्श्यांनी भरलेला आहे. त्यातला सत्य इतिहास किती, आणि jinx of losing team's captain स्वरूपात असलेला मराठी जनतेचा राग किती, हे सत्य शोधून काढणे दुरापास्त आहे.( Stalin with all his draconian policies happens to be far more popular than liberal Gorbachev even presently in Russian surveys.) त्यामुळे लोकापवाद, ऐकीव माहिती हेही त्याच्या कारकिर्दीचे प्रमाणपत्र ठरू शकत नाही. तत्कालिन बखरींवरून टोकाची मते बनवणे, हे फक्त जुनेच पूर्वग्रह बळकट करायला(reinforce) उपयुक्त ठरू शकेल, त्याहून काही constructive criticism शक्य नाही, असे मला अभिप्रेत होते. शेवटचे वाडा पाडून बांधण्याचे उदाहरण आपण त्याच्या व्यक्तिमत्वाला अपवाद म्हणून गणले आहे, आणि आलेला तनखा 'विटाळ' म्हणून बुडवला, याला माज म्हणता आहात- पण ही सारीच ऐकीव माहिती, अन् त्या मागचा कार्यकारणभाव कथनकाराची personal interpretations ठरतात. विटाळ म्हणून पदच्युत झालेल्या राज्यकर्त्याने एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असलेली तनख्याची धनराशी बुडवावी, हा एक किस्सा. ह्याच बाजीरावाने राज्यकर्ता असताना, देवीची लस जनतेला देण्याची सोय केली, लोकांची भीड चेपावी अन् तत्कालिन धर्ममातंडांचा चक्रम विरोध मोडून पडावा, म्हणून सपत्निक पुण्यातील पहिली लस स्वतः घेतली, ह्या documented इतिहासाचा कसा अर्थ लावायचा? (२०२० मध्ये सध्याचे राज्यकर्ते सरकारी खर्चाने होमिओपॅथीचे पाणी करोनाचा उपाय म्हणून वाटत होते.) Was he schizophrenic to have such a split personality, or did this all have some mundane explanation?

याखेरीज, दुसरेही मुद्दे आहेत: उदा. मनीषा म्हणताहेत तसं, अति पोहण्याने पक्षाघात झाला, हे आजच्या वैद्यकशास्त्रानुसार हास्यास्पद वाटलं, तरी तत्कालिन चष्म्यातून तितकेसे वावगे नसावे, समाजप्रथेला धरून असावे. असे अनेक चष्मे समाजकारण, राजकारण इ. नुसार पुढेही उतरवले जातील, आणि आज समाजमान्य असलेल्या गोष्टी भविष्यात अमानुष वाटतील, असे वाटते.

मनीषा ह्यांचा मुद्दा वेगळा आहे (British privilege of condoning crimes), आणि ( तुम्हाला अभिप्रेत आहे त्यापेक्षा वेगळ्या अर्थाने) चूक आहे, असे वाटते. उत्तर पेशवाईतील बहुतांशी पेशवे titular heads (नामधारी नायक) होते, असे मानायला वाव आहे. नारायणरावांचा खून झाला, त्यावेळी ते १८ वर्षांचे होते. सवाई माधवरावांनी आत्महत्या केली २१व्या वर्षी. म्हणजे ही तरुण पोरे सगळी मराठी रियासत उडाणटप्पूगिरी करत चालवत होती ( आणि धुरंधर मुत्सद्दी, अतिरथी-महारथी झोपा काढत होते), किंवा ही तरूण, अननुभवी पेशवे पिढी शिक्कामात्र होती आणि अठरापगड बारभाई मंडळ खरे रहाटगाडगे चालवत होते- काय जास्त सयुक्तिक वाटते? तेव्हा 'शिंदे होळकरांचे स्वामी' वगेरे कागदावर असतीलही, पण सत्यपरिस्थिती वेगळी असावी. उत्तरपेशवाईत मराठी मसनद जिवंत ठेवण्यासाठी अनेकांचे बरेवाईट हातभार लागले असावेत: ह्यामागे दरवेळी मराठेशाही वाचविण्याचा उदात्त हेतू असेलच असे नाही- उलट सर्वमान्य, निरुपद्रवी, कर्तबगार बनण्याची क्षमता नसेल असा वाटणारा, काबूत राहू शकेल असे वाटणारा नामधारी चेहरा वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि घराण्यांचे हेवेदावे आटोक्यात ठेवण्याचा प्रभावी उपाय असावा(१०, जनपथ मॉडेल गेले ३० वर्षे असेच तर चाललंय की!). त्यामुळे मराठेशाहीच्या शेवटी घडणाऱ्या प्रत्येक बऱ्‍यावाईट गोष्टींचे खापर एकाच्याच डोई फोडणे(आणि सगळे राज्य वाचविण्याचे श्रेय एकाच माणसाच्या, पहिल्या बाजीरावाच्या पदरी टाकणे) हे अतिच oversimplification वाटते आहे.

कुतुहलाखातर: रावबाजी १९ व्या वर्षीपर्यत धारच्या किल्ल्यात नजरकैदेत होता. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीला कैसर विल्हेल्म दुसरा ह्याचे traumatic childhood आणि त्यातून उद्भवलेला त्याचा अविवेक, लहरीपणा, स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची खुमखुमी एक कारण आहे, असे समजले जाते. शेवटच्या मराठी राज्यकर्त्याच्या बाबतीतही असे काही घडले असेल का?

Anyway, TL;DR version: वुडहौससाहेबाला स्मरून: It's pointless to hate in plurals.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

उत्तर पेशवाईत खरोखर काय सुरू होतं हे तपशील माझ्या दृष्टीनं गौण आहेत. 'शिंदे-होळकरांच्या स्वाम्यांचं' पुणं याच शिंदे-होळकरांनी पुण्यावर हल्ले करून लुटलं; आणि महारांची पलटण ब्रिटिशांच्या बाजूनं लढली ह्या घटना बऱ्यापैकी लोकांनी मान्य केल्या आहेत. हे सगळं त्याच पेशव्यांच्या नाकाखाली झालं. ह्या पेशव्यांबद्दल त्यांच्या हाताखालच्या लोकांत काय मत होतं, याचा विचार करून मला उत्तर पेशवाईबद्दल अजिबात आदर-प्रेम वगैरे वाटत नाही.

(हा प्रतिसाद लिहितेसमयी मी ज्या कंपनीत नोकरीला आहे तिथे लोक गेले काही महिने नोकऱ्या सोडून जात आहेत. कंपनीकडे पैसे नाहीत ही अडचण कमी आणि कामं करायला लोकांना उत्साह नाही ही अडचण जास्त आहे. ग्लासडोअर, आणि इतर कितीतरी ठिकाणी कंपनीबद्दल लोक काय-काय लिहितात ते मी 'लोकांची मतं काय असतात' याबद्दल कुतूहल म्हणून वाचत्ये. त्यातलं किती खरं, किती खोटं हे करण्यात मला फार नाही. पण त्यातून उत्तर पेशवाईबद्दल लोक जे काही म्हणायचे, म्हणतात ते कुठून येत असेल हे मला काही अंशी समजतं.)

नारायणरावाचा खून वगैरे तुम्हीच लिहिलं आहेत. तेवढं तरी तुम्हाला निश्चित मान्य असावं. तर या सत्ताधारी पुरुषांच्या मुतायच्या मैफिली सामान्य लोकांसाठी कधीही लाभदायक नसतात. मला त्या सामान्य लोकांमध्येच रस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

I sincerely hope you read my prior response in entirety.

व्यक्ती सामान्य की असामान्य हा मुद्दा माझ्यामते गौण आहे. एवढी टोकाची मते बनवताना विदा-स्त्रोत असामान्य असला पाहिजे, Expert opinion च्या दर्जाचा असला पाहिजे ( असे मत मांडल्यावर रिचर्ड डॉकिन्सवर Elitist असण्याचा आरोप झाला होता- I hope I won't be held guilty of that charge here on this august forum) असा आणि एवढाच मुद्दा मी मांडला आहे. बाकी मुतायच्या मैफिली वगैरे... चालू द्या .I don't think that merits a response.
काहीसे अवांतर- in the context of your last response regarding judging the authority by the opinion of the subordinates- how do you then interpret Stockholm syndrome? Just trying to play Devil's advocate here.

तसेही, पुण्याबद्दल लिहायला येणारे सगळे पुणेकर असामान्यच असतात, हा मुद्धा अलाहिदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

बाकीचे सोडा, परंतु...

तर या सत्ताधारी पुरुषांच्या मुतायच्या मैफिली सामान्य लोकांसाठी कधीही लाभदायक नसतात.

आपल्याला बायेनीचान्स 'मुतायच्या स्पर्धा' असे म्हणायचे होते काय?

(भाषेच्या अमेरिकीकरणास विरोध नाही, परंतु, करायचे तर त्यात अचूकता बाळगावी, इतकीच किमान अपेक्षा. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचा शब्द वापराण्यामागचा उद्देश महत्वाचा आहे, and I think she'd stand by it.
Otherwise, बूँद से गयी, वो हौद से नही आती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

मॅन्सप्लेनिंगबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुषांच्या स्पर्धा हेसुद्धा पिसारा फुलवून नाचणंच असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(अवांतर: हा 'पिसारा'वरील श्लेष आहे काय?)

पुरुषांच्या स्पर्धा हेसुद्धा पिसारा फुलवून नाचणंच असतं.

हे कदाचित मान्य करता येईलही, परंतु... माझा मूळ मुद्दा अमेरिकॅनिझम योग्य रीत्या वापरण्यासंदर्भात होता. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिसाऱ्यावरचा श्लेष हे मुदलावरचं व्याज आहे. हा वाक्‌प्रचार लोकसाहित्य किंवा लोकांच्या भाषेचा भाग आहे. प्रताधिकार असणारा मजकूर नाही. त्यामुळे आपापल्या (विनोद)बुद्धीनुसार केली भाषांतरं तरी काही फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Pissing contests ठाऊक होत्या. Pissing orgiesबद्दल (अद्याप तरी) ऐकलेले नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Pissing orgiesबद्दल (अद्याप तरी) ऐकलेले नाही. असो.

हे माहीत आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो ते (ट्रम्पच्या संदर्भात) ठाऊक आहे परंतु त्याचा मी आणि अदिती ज्याबद्दल बोलत आहोत (अशी माझी समजूत आहे) त्याच्याशी संबंध नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाच प्रतिसादात चिंजं आणि ३_१४ दोघांचेही दर्शन झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाकडे आहेत काय?
अभ्यास वाढवण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://kalchiron.blogspot.com/2011/11/horoscopes-of-maratha-stalwarts.ht...
म्हणजे राजयक्ष्मा, तत्कालिन वैद्यकशास्त्र इ. लिंबू टिबू विषयांचा अभ्यास राहिला बाजूला, कुंडली महत्वाची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

उपयुक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0