नि:शब्द

नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी
जसा झेप घेण्यास सरसावतो-

-खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी
चिदाकाश व्यापून झंकारतो

-स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा
उगा विरघळावा तसा भासतो

-जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
तिथे कोणी नि:शब्द हाकारतो

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>>>>>जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
जिथे सागरा धरणी मिळते ... गाण्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0