अद्भुताचे निळे पाणी
आडबाजूच्या अंगणी
बिना खांब तुळयांचा
एक वसतो महाल
जीवलग कवितांचा
नभापार पोचतसे
त्याची बेलाग ही उंची
रेलचेल महालात
जे न देखे रवि त्याची
महालात जाण्यासाठी
जिना जपल्या शब्दांचा
आणि उतरण्या साठी
सोपान हा गहनाचा
चुनेगच्ची सौधावर
नवरस पुष्करणी
पितो मन:पूत तेथे
अद्भुताचे निळे पाणी
परवलीची एकच
खूण इथे चालतसे
एका हृदयीचे दुज्या
सोपवावे लागे पिसे
प्रतिक्रिया
कविता आवडली. पिसें शब्द
कविता आवडली. पिसें शब्द बऱ्याच वर्षांनी पाहिला. “अद्भुताचे निळे पाणी” ही कल्पना वाचून जीएंची आठवण झाली.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
अद्भुताचे निळे पाणी पुलंनी
अद्भुताचे निळे पाणी पुलंनी वर्णिलेल्या त्या नीलकुहरासारखं असावं का?
मस्त मस्त!!!
मस्त मस्त!!!