जाईन विचारित रानफुला

जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथें ग, सजण मला

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढें बन
तरुवेली करतिल गर्द झुला

उंच पुकारिल मोर काननीं
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनकळा

वाहत येइल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुनें घर
जाइल बुडुन हा प्राण खुळा

कवयित्री : शांता शेळके

=================

विचारले मी दिसे ज्या-त्याला
"राही कुठे देव ते सांगा मला"

"भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
राही तिथे देव," एक सांगे मला

"शुक्रिया" वदून जाता तुडवित रान
कोसळला पाऊस कृष्ण ढगातून
कडकडाट विजेचा लखलखत्या झाला

वाटेतिल नदीस आला पूर अनावर
हे पाहुन शिवनृत्य मनि आला विचार -
आला का शंकर मजपुढे दर्शन देण्या मला?

----------------------------------

जाईन विचारित रानफुला
"मिळेल कुठे बा, रसगुल्ला?"

"भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
तरुवेली सांगतिल मार्ग तुला

"उंच पुकारिल पोर्‍या दुकानी
गिलासी भरता गढूळ पाणी
’एक चाय, दो रसगुल्ला’

"घेउन येइल पोर्‍या सत्वर
’गुल्ला-वाटी नि चाय कपभर
तुष्ट होइल तव जीव भला"

.................................

field_vote: 
0
No votes yet