मुलांना आंतरजालावरील ‘कु’ स्थळांपासून कसे वाचवावे ?

आजकाल सर्व क्षेत्रत प्रभाव पाडणारे आंतरजाल शालेय जगतातही पोचले आहे. आंतरजाल हे माहिती तंत्रज्ञानाचे प्रभावी साधन असल्याने ते कुठे न पोचले असले तरच नवल. त्यातून शाळा म्हणजे ज्ञान अन माहितीची अधिष्ठाने ! तेव्हा इतर कुठल्याही साधनांपेक्षा आंतरजाल हे अत्यंत प्रभावी शैक्षणिक साधन ठरू शकेल.
मात्र जालावर प्रबोधक स्थळे आहेत तशीच, किंबहुना त्यापेक्षा जास्तच अश्लील स्थळेसुद्धा आहेत. न कळत्या वयातील मुलांच्या संवेदनक्षम मनांवर त्याचा नको तो परिमाण होऊ नये म्हणून त्यांना आंतरजालापासून दूर ठेवणे अशक्य आहे अन चूकही. एकतर आंतरजाल हे अद्ययावत तंत्रज्ञान असल्याने स्पर्धेच्या युगात मुलांना ते अवगत असायलाच हवे. दुसरे म्हणजे कुटुंबात माणसे कमी असल्याने खेळ वगैरे झाल्यावर मुलांसाठी करमणुकीची साधने म्हणजे टीव्ही आणि संगणक. त्यातून अलीकडे बऱ्याच शाळांमधून जे प्रकल्प देतात ते आंतरजालाशी संबंधित असतात. तेव्हा मुलांनी आंतरजालावर वावरण्याचे कौशल्य अवगत करणे हे आवश्यकच झाले आहे.
पालकांपुढे प्रश्न आहे तो हा की या मुलांचा आंतरजालावरील ‘कु’ स्थळांपासून बचाव कसा करायचा ? कृपया यावर मार्ग सुचवणाऱ्या सूचना, विचारविनिमय द्यावेत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आंतरजाल हे अद्ययावत तंत्रज्ञान असेलही पण स्पर्धा आहे म्हणून नकळत्या वयाच्या मुलांना ते अवगत असले पाहिजे हे पटत नाही.
आंतरजालावरून माहिती हवी असेल तर पालकाच्या देखरेखीखाली ती मिळवली जाऊ शकते.
मुळात प्रश्नाचेच अस्तित्व अनावश्यक वाटत असल्याने उपाय सुचवू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांचे आंतरजाल वापरणे हल्लीच्या/भविष्यातील पालकांसांठी समस्या ठरू शकते, त्यावर मुलांचे वेळोवेळी प्रबोधन हा सर्वात महत्वाचा उपाय आहे, पण आंतरजाल-चाळणी पण महत्वाची आहेच. आंतरजाल-वापर-नियंत्रणासाठी प्राथमिक-ते-प्रगत अशा अनेक प्रणाल्या(systems) आहेत, त्यापैकी काही फुकट(योग्य शब्द?)(ओपन-सोर्स) तर काही विकत वापरण्यासारख्या प्रणाल्या आहेत.

स्क्विड हा प्रॉक्झी व त्यावर वापरता येण्याजोगी स्क्विडगार्ड चाळणी(वेब-फिल्टर) ओपन-सोर्स आहे व बहुतांश ऑपरेटींग सिस्टिम्सवर चालते, ह्यातिल प्रॉक्झी ही प्रणाली वापरून पाहिजे ती युआरएल्स ब्लॉक करता येतात, पण तो प्राथमिक फिल्टर आहे, स्क्विडगार्ड चाळणी(वेब-फिल्टर) कंटेट ओळखून त्याप्रमाणे कोणतेही युआरएल ब्लॉक करू शकते जे अधिक परिणामकारक आहे, मी स्वतः स्क्विडगार्ड चाळणी(वेब-फिल्टर)वापरलेली नाही पण तसे परिक्षण वापरकर्त्याने मला दिले आहे.

विकत घेण्याची तयारी असल्यास वेबसेन्स कंपनिचा वेब-फिल्टर देखिल उपयुक्त आहे, त्यामधे स्क्विडगार्डप्रमाणेच कंटेट-अनुसार साइट्स ब्लॉक करता येणे शक्य आहे, तसेच हवे ते कंटेंट दिवसातील ठराविक काळासाठीच आंतरजालावर बघता येईल अशी सोय करता येते (जसे, मुलांना गेमसाईटचा वापर दिवसात १ तासासाठीच करता येइल असे नियम त्यात तयार करता येउ शकतील.)ही प्रणाली वापरून(ट्रायल) बघितल्यावर विकत घेता येते. हे विन्डोज आणि लिनक्स च्या काही ऑपरेटींग सिस्टिम्स वर चालते.

ह्या प्रणाल्या वापरण्यासाठी संगणकाचे बरेचसे ज्ञान असणे गरजेचे आहे.

इतर कंटेंट-नियंत्रण प्रणाल्यांबद्दल इथे माहिती उपलब्ध आहे.

अर्थात, ह्या सगळ्यां प्रणाल्यांना गंडवून पाहिजे ते आंतरजालावर बघता येऊ शकते, पण पाल्य तेवढा हुशार असल्यास ह्या चाळण्या फारश्या परिणामकारक नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतः अशा संस्थळाबाबत अद्ययावत माहिती राखून! वर वर हे वाक्य टवाळीचे वाटेल पण मथितार्थ लक्षात घ्यावा. नेट-नॅनी वगैरेला मुले केव्हाच पुरून उरतात.

नुकताच आलेला एक वाईट अनुभव. शाळेत शिकणार्‍या माझ्या एका पुतण्याने 'फोरप्ले' बद्दल काही लेखन त्याच्या फेसबुका भिंतीवर टाकले, त्याचा अर्थही कळण्याचे त्याचे वय नव्हते. कोण्या फेसबुक मित्राने कुठलेले अ‍ॅप रेकमेंड केले, याने केले रन नि दिले उत्तर छापून. खुद्द त्याचा बाप फेसबुकावर आहे नि कनेक्टेड आहे (की हे पोरगंच बापाचा आयडी चालवतंय देव जाणे) त्याला देखील त्या शब्दाचा अर्थ समजला नसावा. या चिरंजीवांना बापाने कौतुकाने आठवीतच लॅपटॉप नि वायरलेस नेट घेऊन दिले आहे. अगदी स्पष्टच सांगायचं तर बाप कम्प्यूटर या विषयात अडाणी. म्हणून पोराला जमतंय या कौतुकाच्या नादात ही अवस्था आलेली. दोन वेळ या बापाला मी त्याच्या पोराच्या एकुण नेटवरील वावराबाबत सावध केले होते. परिणाम शून्य. यावेळेस तीही तसदी घेतली नाही मी. थोडक्यात जे आपल्याला समजत नाही ते पोराला जमते या कौतुकाच्या भरात वाहवत न जाणे हा महत्त्वाचा धडा आहे. त्यासाठी त्याबाबत आईबापाने माहिती करून घेणे अत्यावश्यक.

कम्प्यूटर नि नेट द्यायचेच असेल तर लॅपटॉप न देता डेस्कटॉप द्यावा (जेणेकरून निश्चित ठिकाणी नि समोर राहिल) नि वायरलेस कनेक्शन न देता वायर्ड कनेक्शन घ्यावे, ज्यामुळे ते नेट अन्य कोणाच्या मशीनवरून वापरता येणार नाही. किमान एवढे तरी करू शकतो. इतके रिजिड झाले की मग नेट्-नॅनी वगैरे सॉफ्टवेअर वापरून त्याचा वापर नियंत्रित नि अन्डर्-सर्विलन्स ठेवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अश्या प्रकारचा प्रश्न प्रत्येक काळात पालकांसमोर असतोच. आणि त्यांनी काहीही केले तरी मुले ते साहित्य मिळवून वाचतातच.

श्री ज जोशी यांनी एक आठवण सांगितली आहे. त्यांच्या पौगंडावस्थेत ना सी फडक्यांच्या कादंबर्‍या उघडपणे वाचणे शक्य नसे (परंतु ब्रह्मचर्य हेच जीवन हे पुस्तक उघडपणे वाचता येत असे). त्या चोरून वाचल्या जात असत.

माझ्या पौगंडावस्थेत वाचनालयात इलस्ट्रेटेड वीकली, टाईम, न्यूजवीक सोबत डेबोनेअरसुद्धा असे Wink आणि ते आम्ही ग्रंथपालाची नजर चुकवून पहात असू.

यू ट्यूब सारखी संकेतस्थळे प्रौढांसाठीच्या कंटेंटसाठी ईमेल अकाउंटने लॉग इन करायला लागतात. पण हा उपाय कुचकामाचा आहे कारण आपल्या ८-१० वर्षांच्या मुलांना फेसबुक अकाउंट उघडता यावे म्हणून पालकांनीच त्यांना १८-२० वर्षांचे दाखवून अकाउंट उघडून दिलेले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या पौगंडावस्थेत वाचनालयात इलस्ट्रेटेड वीकली, टाईम, न्यूजवीक सोबत डेबोनेअरसुद्धा असे (डोळा मारत) आणि ते आम्ही ग्रंथपालाची नजर चुकवून पहात असू.

काही लोकं निदान एकेकाळी तरी का होईना नॉर्मल होती हे समजल्यावर (अजूनही) फार फार गंमत वाटते. Wink

जे संस्थळ सर्वाधिक वेळा उघडले जाते ते त्या त्या माणसाचे पॉर्न अशी एक व्याख्या अलिकडेच कानावर आली.

आपल्या ८-१० वर्षांच्या मुलांना फेसबुक अकाउंट उघडता यावे म्हणून पालकांनीच त्यांना १८-२० वर्षांचे दाखवून अकाउंट उघडून दिलेले असते.

आमचे एक प्रौढ दोस्त आहेत. ते स्वतःचे जन्मवर्ष टिळकांचा मृत्यु झाला तेच लिहीतात. गॅलिलेओ-न्यूटन या कन्स्पिरसी थिअरीवर त्यांचा विश्वास असावा असं आत्तापर्यंत वाटत होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Technophile या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय असावा? तंत्रलोभी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंत्रज्ञानाने काही संस्थळे जरी ब्लॉक करु शकलो किंवा त्यांना अक्सेस दिला नाही तरी नेटकॅफे मधे जाउन, मित्राच्या घरुन अन्य ठिकाणहून मुले आक्षेपार्ह बघतीलच. आजच्या सर्वच जेष्ठांनी कमी आधीक प्रमाणात त्यांच्या पौंगडावस्थेत काहीना काही आक्षेपार्ह केले आहे. हे असे चालायचेच.

नियमीत स्वरुपात आपल्या मुलांशी सर्व विषयांवर अमके योग्य, अमके अयोग्य अशी चर्चा करुन आपले मत सांगीतले तर मुलांना अचानक समोर आलेली आक्षेपार्ह माहिती हाताळता यायला मदत होईल. आपल्या पोरांना अगदीच धाकाखाली, अगदीच सोज्वळ ठेवले व आपणही गप्प राहीलो तर जेव्हा मुलांसमोर आक्षेपार्ह माहिती येईल ती बावचळून जातील. पालक त्यांच्यावर ओरडले तर मुले आपल्यासमोर विषय काढणार नाही, त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मग अन्य लोकांकडून उदा. मित्रमंडळी यांच्याकडून घेतील. ती उत्तरे चूकीची असु शकतात त्यामुळे आपल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे आपणच द्यायची. अवघड असली तरी.
अजुन एक सोपा उपाय वर्तमानपत्र वाचायला द्या. वाईट/ अत्याचाराच्या बातम्या आल्या असतील तर ते कसे अयोग्य आहे असे त्यांच्या मनावर बिंबवले. मुलांनी कसे वागायला हवे अन्यथा काय होउ शकते हे सांगीतले. तर मुलेही आक्षेपार्ह विषय कसे हाताळायचे शिकू / समजू शकतात. मुलांशी वेळोवेळी संवाद साधणे महत्वाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांना आंतरजालावरील ‘कु’ स्थळांपासून 'वाचवावे' म्हणजे काय? साधारणतः मुले (मुलगे+मुली) ठराविक वयात या गोष्टीत रस घेतातच. त्याचे कारण उत्सुकता असते. तेव्हा जर त्यांनी अश्या संस्थळावर डोकावले तर त्यात 'अब्रह्मण्यम' असा गहजब करण्यात काहीच हशील वाटत नाही. तुम्ही अशी संस्थळे बंद केलीत तरी मुलांना आता मोबाईल, इतरांच्या घरातले कंप्युटर्स, मासिके, सिडीज् वगैरे द्वारे या गोष्टी मिळणारच आहेत.

शिवया दुसरे असे की झाकले की वाकून बघावेसे वाटतेच Wink त्यात काही विषेश आहे, 'मोठे' काहितरी दडवत आहेत वगैरे संशय मुलांच्या मनात आला तर अधिक उत्सूकतेने किंवा आता त्यांना धडाच शिकवतो या अभिनिवेषाने परिस्थिती अधिक हाताबाहेर जाईल असे वाटते.

तेव्हा मुले कोणत्या वेबसाईट्स बघतात युआवर लक्ष असावे, हिस्टरी चेक करावी (अश्या संस्थळांवर डोकावणे क्वचित असल्यास काणाडोळा करावा;) ), डेस्कटॉप हॉल मधे ठेवावा, घरात संवाद असावा व कोणत्याही विषयावर बोलता येईल असे वातावरण असावे. माझ्यामते इतके खूप आहे. गाळणी वगैरे लावयची गरज वाटत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वयात आल्यावर शारीरीक संबंध असलेल्या गोष्टींकडे लक्ष जातंच. तुमचं नव्हतं का जात? म्हणजे मला नका सांगु पण स्वत:ला च विचारा. ऋषिकेश यांचा विचार चांगला आहे पण सगळ्याच पालकांचे मुलांशी खेळीमेळीचे वातावरण नसते हे नमुद करु इच्छीते. थोडंसं चालायचंच पण आपण आपल्याकडुन मुलांना त्यांचा हसरा, खेळकर मुड पाहुन वैज्ञानिक माहीती देणे उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न कळत्या वयात' म्हणजे कधी तेदेखील बदलतं आहे हे लक्षात घेत असाल अशी आशा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'कु'स्थळाची व्याख्या काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

शिवाय कुस्थळांची यादी दिल्यास (म्हणजे कोणत्या स्थळांपासून वाचवायचे त्याची यादी) लेख अधिक माहितीपूर्ण झाला असता असे वाटते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते विषय मांडणीमध्ये देले आहे. नीट वाचल्यास सापडेल.
शिवाय यादी देणे हे तसलीच आवड असणार्‍यांनाच चांगले जमेल. तेव्हा रस असणार्‍यांनी यादी देण्याचा अन घेण्याचा उद्योग अवश्य करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय मांडणीमध्ये देले आहे. नीट वाचल्यास सापडेल.

विषयात फक्त 'मात्र जालावर प्रबोधक स्थळे आहेत तशीच, किंबहुना त्यापेक्षा जास्तच अश्लील स्थळेसुद्धा आहेत' असे वाक्य आढळले. ह्यातल्या नेमक्या कशाला तुम्हाला 'कु'स्थळे म्हणायचे आहे ? प्रबोधक स्थळांना का अश्लील स्थळांना ? आणि का म्हणायचे आहे ते जरा निट कळेल असे सांगीतले तर बरे होईल.

बाकी अश्लीलता lies in the eyes of the beholder. मला तर इथले काही धागे वाचून हे संस्थळ देखील अश्लील वाटते आणि काही धागे वाचून प्रबोधक.

@ थत्ते चाचा :- तुम्ही असा प्रश्न विचारणे म्हणजे विजय मल्ल्याने गावातल्या देशी दारुच्या दुकानाचा पत्ता विचारल्यासारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

ह्यातल्या नेमक्या कशाला तुम्हाला 'कु'स्थळे म्हणायचे आहे ? प्रबोधक स्थळांना का अश्लील स्थळांना ? आणि का म्हणायचे आहे ते जरा निट कळेल असे सांगीतले तर बरे होईल.

स्थळ कसलेही असल्याने काही फरक पडतो का? बचाव करण्याची पद्धत समान असू शकते न?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्थळ कसलेही असल्याने काही फरक पडतो का? बचाव करण्याची पद्धत समान असू शकते न?

अच्छा म्हणजे वरील दोन्ही प्रकारच्या संस्थळांपासून बचाव करणे आवश्यक आहे तर !

पण मग मूळ प्रश्न तसाच राहीला. 'असा बचाव का आवश्यक आहे?'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

पण मग मूळ प्रश्न तसाच राहीला. 'असा बचाव का आवश्यक आहे?'

अर्थात ह्याचे उत्तर लेखिकाच देऊ शकेल पण साधारण प्रयत्न केल्यास खालील विचारांचा बोध होऊ शकतो.

लेखातील मूळ वाक्य -

न कळत्या वयातील मुलांच्या संवेदनक्षम मनांवर त्याचा नको तो परिमाण होऊ नये म्हणून त्यांना आंतरजालापासून दूर ठेवणे अशक्य आहे अन चूकही.

रीफ्रेज्ड वाक्य -
न कळत्या वयातील मुलांच्या संवेदनक्षम मनांवर त्याचा नको तो परिणाम होऊ नये असे वाटते, पण तो तसा होऊ नये ह्यासाठी त्यांना आंतरजालापासून दूर ठेवणे चूक आहे व तसे करणे अशक्य देखिल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न कळत्या वयातील मुलांच्या संवेदनक्षम मनांवर त्याचा नको तो परिणाम होऊ नये असे वाटते

पण ही मुले 'न कळत्या वयातली आहेत' किंवा त्यांचे मन 'संवेदनक्षम' आहे हे कसे, कोणत्या आधारावरती आणि कोणी ठरवायचे ?

एक वाचलेला जुना किस्सा आठवला :=

परदेशातल्या एका बैंनी (बहूदा अनिवाशी असाव्यात)'आता आपली मुलगी १४ वर्षाची झाली आहे, तरी तिला थोडे फार लैंगीक ज्ञान द्यायला हवे' असा विचर केला. ताबडतोब त्यांनी कन्येला बोलावुन घेतले.

आई :- उद्या शनीवारी तू लवकर घरी येशील ना ? मला तुझ्याशी काही महत्वाच्या विषयावरती बोलायचे आहे. अं... म्हणजे थोडे सेक्स ह्या विषयावरती बोलायचे आहे. तुझी हरकत नाही ना ?

मुलगी :- आई उद्यापर्यंत कुठे वाट बघत बसतेस ? तुला काय अडचण आहे ती आत्ताच विचारुन घे ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

पण ही मुले 'न कळत्या वयातली आहेत' किंवा त्यांचे मन 'संवेदनक्षम' आहे हे कसे, कोणत्या आधारावरती आणि कोणी ठरवायचे ?

ज्यांना ते कळते त्यांनी ठरवावे.

एक वाचलेला जुना किस्सा आठवला

साधारण विचार ओळखीचा आहे, पण मुद्दा स्वार्थचा आहे, पाल्याचे हित अमूक एका गोष्टीत आहे असे मानण्यात पालकाचे सुख आहे, त्या सुखाची गैरसोय होऊ नये म्हणून पालक त्याला योग्य वाटणार्‍या गोष्टी राबवितो, हा विचार न पटलेल्याची सुखाची कल्पना वेगळी असते, एवढाच काय तो फरक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुख नक्की कशाला म्हणावे ?

अशा संस्थळांपासून दूर रहाणे म्हणजे सुख म्हणता येईल काय ? तसे असेल तर मग आज जगात ६५% पेक्षा जास्ती लोक नेटवरती पॉर्न का सर्च करत असावेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

माझ्या (अल्प ) समजुतीप्रमाणे निदान भारतात तरी, मुलांचे हित अहित सर्वसाधारणपणे मुले १८ वर्षाची होईपर्यंत पालक पाहतात. यामध्येच ५ ते १५ वयातील मुलांवर योग्य ते संस्कार करण्याची जबाबदारीही येते. तसेच अपरिपक़्व वयात अश्लील, उत्तान दृश्ये पाहिल्यामुळे त्यांच्या मनावर अनैसर्गिक परिणाम होऊ नये म्हणून जपणे हीही पालकांची जबाबदारी आहे. श्रीयुत पराभाऊ भारतात रहात नसतील तर भारतातील या कुलीन संस्कारांची त्यांना कल्पना नसेल म्हणून स्पष्ट करून लिहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>

ते पुण्यनगरी (पक्षी पुणे शहर) येथे खैबर खिंड (पक्षी सायबर कॅफे) लढवित* (पक्षी चालवित) आहेत. अर्थातच, त्यांच्या व्यवसायावरून त्यांच्या युक्तिवादाची दिशा अशी का याचा तुम्हास उलगडा होईल अशी आशा आहे.

*पुण्यात सायकल चालविणे हे हत्यार चालविणे याप्रमाणे समजले जाते. पुण्यात दुकान चालविणे हेही सायकल चालविण्याप्रमाणेच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

ते पुण्यनगरी (पक्षी पुणे शहर) येथे खैबर खिंड (पक्षी सायबर कॅफे) लढवित* (पक्षी चालवित) आहेत. अर्थातच, त्यांच्या व्यवसायावरून त्यांच्या युक्तिवादाची दिशा अशी का याचा तुम्हास उलगडा होईल अशी आशा आहे.

आपल्या मागल्या भेटीतच आम्ही कॅफे बंद करून आता जमाना झाल आहे आणि सध्या आम्ही प्रकाशन संस्था आणि पुस्तकाचे दुकान चालवतो असे नमूद केले होते. बहूदा इतर चर्चांमध्ये आपण ते विसरलेला दिसता.

असो..

मुलांनी सो कॉल्ड 'कु'संस्थळे पाहोत अथवा थेट बाईकडे जाउन ज्ञान घेवोत, मला काही फरक पडत नाही. Smile माझे म्हणणे येवढेच आहे की जबाबदारी आणि संस्कार ह्याची गल्लत अजून किती दिवस लोकं करणार आहेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

असो.. >>

आपली भेट ११.११.२०११ रोजी झाली होती आणि तेव्हा आपण असा काहीच उल्लेख केला नव्हतात. त्यानंतर आपण कधीच भेटलो नाही व आपल्यात असे काही संभाषण झाले नाही हे मी खात्रीने सांगु शकतो.

असो. आपल्या नवीन व्यवसायास शुभेच्छा.

अवांतर :- आता आपल्या नवीन व्यवसायास अनुकूल असा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/56 या धाग्यावर नोंदवा बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

अवांतर :- आता आपल्या नवीन व्यवसायास अनुकूल असा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/56 या धाग्यावर नोंदवा बरे.

माफ करा पण तो आमचा व्यवसाय नाही.

आपण विनोद म्हणून हा प्रतिसाद दिला असेल तर चांगले आहे, तसे नसेल तर मात्र ह्या अपमानास्पद प्रतिसादाने भावनांना ठेच लागली अशी जाणिव करून देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

माझ्या (अल्प ) समजुतीप्रमाणे निदान भारतात तरी, मुलांचे हित अहित सर्वसाधारणपणे मुले १८ वर्षाची होईपर्यंत पालक पाहतात. यामध्येच ५ ते १५ वयातील मुलांवर योग्य ते संस्कार करण्याची जबाबदारीही येते. तसेच अपरिपक़्व वयात अश्लील, उत्तान दृश्ये पाहिल्यामुळे त्यांच्या मनावर अनैसर्गिक परिणाम होऊ नये म्हणून जपणे हीही पालकांची जबाबदारी आहे.

ओक्के !

आता एक शंका अशी, की ५ ते १५ वयोगटातल्या किती मुलांना पालक हित जपण्यासाठी असे दुर ठेवतात आणि त्याच्या कितपत परिणाम होतो ? अशा वयोगटातल्या किती मुलांना पुढे काही लैगीक गुन्ह्याखाली अटक अथवा शिक्षा झाली आहे ? काही विदा उपलब्ध आहे का ? तसेच ५ ते १५ या वयोगटातील मुलांनी अशी दृश्ये पाहिल्यास त्यांच्या मनावरती अनैसर्गिक परिणाम होतो आणि १५ वर्षाच्या पुढील मुलांनी पाहिल्यास होत नाही असे म्हणता येईल काय ?

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निव्वळ संस्थळांपासून दूर ठेवल्याने मुले ह्या विषयाशी निगडीत ज्ञान प्राप्त करू शकणार नाहीत असे म्हणता येईल काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हो.. हो.., पराभाऊ असे मूळ मुद्द्यापासून दूर का पळताय बरं ?
>>५ ते १५ वयोगटातल्या किती मुलांना पालक हित जपण्यासाठी असे दुर ठेवतात आणि त्याच्या कितपत परिणाम होतो ? अशा वयोगटातल्या किती मुलांना पुढे काही लैगीक गुन्ह्याखाली अटक अथवा शिक्षा झाली आहे ? आकडेवारी देणे किंवा शोधणे हा या धाग्याचा उद्देश नसून उपाय शोधणे हा आहे.
>>तसेच ५ ते १५ या वयोगटातील मुलांनी अशी दृश्ये पाहिल्यास त्यांच्या मनावरती अनैसर्गिक परिणाम होतो आणि १५ वर्षाच्या पुढील मुलांनी पाहिल्यास होत नाही असे म्हणता येईल काय ? अर्थातच असे म्हणता येणार नाही. पण १५ वर्षांपर्यंत संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची आहे, हे तुम्ही पुन्हा विसरताय. आणि १५ वर्षानंतर मने सक्षम बनवी, हित-अहित, चांगले-वाईट याचे तारतम्य या संस्कारांतून यावे अशी पालकांची अपेक्षा असते. त्यातूनही बरेच जण नाही शिकत तारतम्य ! याला पालकांचा इलाज नाही.
>>आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निव्वळ संस्थळांपासून दूर ठेवल्याने मुले ह्या विषयाशी निगडीत ज्ञान प्राप्त करू शकणार नाहीत असे म्हणता येईल काय ? धाग्याचा उद्देश अंतराजालाशीच फक्त संबंधित आहे. इतर गोष्टींची काळजी व विचार प्रत्येक पालक आपापल्या परीने घेत असतातच.
मला वाटते, कुणीही व्यक्ती प्रत्यक्ष स्वत: ‘पालक’ या भूमिकेत जाईपर्यंत अशा बाळबोध शंका येतच राहणार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच असे म्हणता येणार नाही. पण १५ वर्षांपर्यंत संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची आहे, हे तुम्ही पुन्हा विसरताय. आणि १५ वर्षानंतर मने सक्षम बनवी, हित-अहित, चांगले-वाईट याचे तारतम्य या संस्कारांतून यावे अशी पालकांची अपेक्षा असते. त्यातूनही बरेच जण नाही शिकत तारतम्य ! याला पालकांचा इलाज नाही.

आमच्या राजमातेला कधी समजायचे काय माहिती हे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

अच्छा, हे दु:ख आहे तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>सुख नक्की कशाला म्हणावे ?
सुख सापेक्ष आहे, त्याचप्रमाणे योग्य/अयोग्य देखील बर्‍यापैकी सापेक्षच आहे.

>अशा संस्थळांपासून दूर रहाणे म्हणजे सुख म्हणता येईल काय ?
काही लोकांचे तसे मत असू शकते.

>तसे असेल तर मग आज जगात ६५% पेक्षा जास्ती लोक नेटवरती पॉर्न का सर्च करत असावेत ?
८० करोड लोकं फेसबुकवर ज्याप्रमाणे जगतात ते बर्‍याच लोकांना वेडेपणाचं वाटतं, संख्येवर एखाद्या गोष्टीची योग्यता ठरवणे कितपत योग्य आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला असेच म्हणायचे होते.
लेखनातील 'मिष्टेक' सावरून घेतल्याबद्दल आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यू ट्यूब हे 'कु'स्थळ आहे का? त्यावर 'कु'व्हिडिओ सुद्धा असतात हे खरे आहे. पण यू ट्यूबला कोणी कुस्थळ म्हणणार नाही. म्हणून कुस्थळे म्हणजे नेमकी कोणती याची यादी विचारली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रसाद,

थत्ते साहेबांना लुटारू म्हणण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. पण यामागचं कारण अद्याप समजलं नाही, सांगण्याची कृपा कराल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

थत्ते साहेबांना लुटारू म्हणण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. पण यामागचं कारण अद्याप समजलं नाही, सांगण्याची कृपा कराल काय?

ते सांगण्याची परवानगी अजूनही त्यांनी मला दिलेली नाही. दिली की सांगेन.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

श्रीयुत मी व रमताराम यांच्या प्रतिसादांमुळे जालावरील स्थळांना रोखण्याबद्दल चांगली माहिती मिळाली आहे अन मुलांवर काही प्रमाणात अंकुश कसा ठेवता येईल हे समजले. चिजं यांच्या म्हणण्याप्रमाणे न कळत्या वयापैकी ‘बाल’ वयीन मुलांसाठी हा उपाय प्रभावी ठरेल. मात्र कुमारवयीन मुलांसाठी मात्र ‘सहज’ यांनी सुचवलेला मुलांना विश्वासात घेऊन माहिती देणे हा मार्गच योग्य ठरेल असे वाटते.
या सर्वांना धन्यवाद. तसेच इतर सर्वांच्या प्रतिसादांमधून य प्रश्नाच्या नवीन बाजू दिसल्या. त्यांनाही धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच उद्बोधक चर्चा चालू आहे.
(ही चर्चा वाचून मोठी माणसं लहानांच्याबाबतीत असा विचार करतात हे आता उघड झाल्याने कुस्थळे पाहण्यासाठी मला इतर उपाय करावे लागतील (असा विचार एखादा लहान मुलगा करू शकतो))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही