पुस्तक परिचय : महार कोण होते?

माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे पुस्तक :
महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप
लेखक - श्री. संजय सोनवणी
किंमत : १०० रु.
प्रकाशक : पुष्प प्रकाशन

एवढ्यांतच "महार कोण होते?" हे सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक "श्री.संजय सोनवणी" यांनी लिहिलेले पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण केले. महार समाजाचा इतिहास सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाकडे कोणी पाहिले तर तो या पुस्तकावर मोठा अन्याय होईल. महार समाजाचा उगम घेता घेता लेखक श्री. संजय सोनवणी यांनी प्रत्यक्ष मानव संस्कृती कशी अस्तित्त्वात आली? जन्मावर आधारित जातीय व्यवस्था कशी अस्तित्त्वात आली? त्यातून शूद्र म्हणून हिणवले गेलेल्यांवर अमानवीय अत्याचार कसे झाले? कर्मकांडांच्या अवडंबरातून सत्ता केंद्रीत करुन बहुजनांचे शोषण कसे झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांच्या आधारे व अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने या पुस्तकातून दिलेली आहेत. म्हणूनच हा ग्रंथ केवळ महार समाजाचा न राहता त्याहीपलिकडे जाऊन अखिल मानव समाजाचा होतो. केवळ १०९ पानांच्या या अफाट आवाका असलेल्या पुस्तकाचे संशोधन लेखकाने प्रचंड मेहनतीने, अत्यंत तर्कशुद्ध व तळमळीने केल्याचे जाणवते, त्याबद्दल लेखक श्री. संजय सोनवणी हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या या अनमोल संशोधनाची दखल भविष्यातील कित्येक शतके घेतली जाईल. पुस्तकातील केवळ १०% एवढ्याच गोष्टी मी या परिक्षणात घेऊ शकलो आहे यावरुन पुस्तकाचा आवाका लक्षात यावा.
प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचे भान आणवून देणारे पुस्तक असे मी या पुस्तकाचे वर्णन करेन. खरे तर पुस्तकाच्या शीर्षकापासूनच या पुस्तकाच्या आत काय दडले असेल याचा अंदाज येतो. पण एका अज्ञात संशोधनाच्या खोलीत शिरत असल्याचा थरारही जाणवतो. साधारणपणे संशोधनग्रंथ म्हटला की त्यात आकडेवारी, प्रचलित समजूती, लेखकाने पूर्वग्रहाने केलेली मते असा भडीमार असतो. पण 'महार कोण होते?' चे लेखक या सर्व किचकट मांडणीला पूर्ण फाटा देत सर्वसामान्यांना सोप्या भाषेत हे संशोधन समजावून देण्यात अतिशय यशस्वी झालेले आहेत. म्हणूनच या ग्रंथाचे मोल अद्वितीय असे आहे.
महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप या नावावरुनच लेखक संजय सोनवणी वाचकांना महारांचा उगमापासूनचा शोध घेऊन त्यांची भविष्यकाळातील दिशा स्पष्ट करणार असल्याचे वाचकाच्या लक्षात येते. अवघ्या १०९ पानांच्या या पुस्तकात लेखकाच्या भूमिकेबरोबर एकूण आठ प्रकरणे आहेत. मूर्ती लहान पण आवाका मात्र प्रचंड असे सामर्थ्य या पुस्तकात आहे. एकेक प्रकरणाचा थोडक्यात आढावा घेऊन पाहूयात.
पुस्तकाचे वाचन करण्यापूर्वी कोणताही पूर्वग्रह मनात वाचकांनी ठेवू नये यासाठी लेखकाने खास छोटीशी भूमिका मांडली आहे. पुस्तकांतील क्रांतिकारी विचार समजून घेण्याच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. संजय सोनवणी म्हणतात की जन्माधारित जातीय व्यवस्थेच्या माध्यमातून एका जातीय चौकटीत ढकलण्यात ब्राह्मण वर्ग हा कारणीभूत होता. पण ते हेही अधोरेखित करतात की (सर्वच ब्राह्मण समाज नव्हे), पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक ब्राह्मणाने ही गोष्ट लक्षात घेतली की या पुस्तकातील विचार तो खुल्या मनाने पाहू शकेल. जातीय व्यवस्थेला आणणार्‍या पुरोहित व्यवस्थेचे दोष दाखवताना 'माणूस बदलतो यावर माझा पुरेपूर विश्वास आहे','हिंसा शारिरिक असते तशीच सांस्कृतिकही असते' असे व्यवस्थेवर तटस्थ दृष्टीकोनातून लेखकाने टिप्पणी केली आहे. हा सिद्धांत पुढे नेण्यासाठी त्यात त्रुटी आढळल्याच तर त्या लक्षात आणून देण्याचे आवाहनही लेखक खुल्या मनाने करतात. यावरुन लेखकाची भूमिका स्पष्ट व्हावी. आता एकेक प्रकरणाचा आढावा घेऊयात.

प्रकरण १:
यात लेखक ऋग्वेद काळापासून हिंदू धर्माचा वेध घेताना 'जन्माधारित वर्ण-जात ठरवणारी ही जगातील एकमेव धर्मव्यवस्था आहे' हेही कठोरपणे वाचकाच्या निदर्शनास आणून देतात. लेखकाने मते मांडण्यापूर्वी ऋग्वेदातील पुरुषसूक्त व त्याचा अर्थ दिला आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जसेच्या तसे दिले आहेत. त्यानंतर ऐतरेय ब्राह्मण व मनुस्मृती चे दाखले देऊन क्र. ११ व १२ या ऋचा पुरुषसूक्तातील बाकीच्या ऋचांपेक्षा कशा भिन्न आहेत व कालौघात या ऋचा नंतर त्यात जोडल्या गेल्या आहेत हे लेखकाने या प्रकरणात सिद्ध केले आहे. यासाठी लेखक आर.सी.दत्त यांचा दाखला देऊन मूळ ऋग्वेदात छेड्छाड केली गेल्याचे झरथ्रुष्टाच्या उदाहरणाने लेखक सप्रमाण सिद्ध करतात. तसेच व्यासांनी वेद संकलित केल्याचाही दाखला ते विचारात घेतात. ऋग्वेदातील इतर सर्व १०,००० पेक्षा अधिक ऋचांमध्ये कुठेही जन्मावर आधारित जातीय व्यवस्थेचे उल्लेख नसताना फक्त एका पुरुषसूक्ताच्या ११ व १२ व्या ऋचेत हा उल्लेख असल्याने लेखकाचे मत मान्य होण्यास वाचकाला अडचण पडत नाही.

प्रकरण २:
यात हिंदू हा शब्द कोठून आला याची लगेच पटणारी तार्कीक मीमांसा केली आहे. तसेच व्यक्तीप्रणीत धर्म आणि रुढ धर्म यांतील मूलभूत फरक लेखकाने अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला आहे. प्रत्यक्ष महाभारतातील दाखल्यापासून अनेक गोष्टींचा यात विचार केला आहे की ज्या कारणामुळे जन्माधारित जातीय व्यवस्था अस्तित्त्वात कशी आली याची भूमिका वाचकाच्या लक्षात यावी.

प्रकरण ३:
यात लेखकाने सृष्टीत सर्वात आधी कोण अस्तित्त्वात आले आणि कोणत्या क्रमाने अस्तित्त्वात आले याची तार्कीक फोड केली आहे. त्यासाठी पुरुषसूक्ताच्या आधाराने जन्माधारित वर्णव्यवस्था अस्तित्त्वात कशी आली यावर मंथन केले आहे. बाकीचा ऋग्वेद कुठेही वर्णव्यवस्था असल्याचे वा अत्यावश्यक असल्याचे सांगत नाही हे अधिक स्पष्ट करताना पुरातन मानवाची शिकारी मानवाकडे वाटचाल झाली त्यानंतर मानवाचे जे विचारी मनवात स्थित्यंतर झाले त्याकाळी धर्म अस्तित्त्वात तरी होता काय? हेही लेखक परखडपणे दाखवून देतात. 'आदिमानवाने प्रतिकूल निसर्गाशी संघर्ष करत असतानाच ज्या गूढांशी ज्या पद्धतीने वैचारिक सामना केला त्याला तोड नाही' हे एक शाश्वत सत्य लेखक या प्रकरणातून मांडत असताना धर्म म्हणजे काय? याची मानवाने निसर्गाशी तादात्म्य साधत कशी उकल केली हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. याच प्रकरणात नाग हा शब्द आपल्या जीवनात किती घट्ट्पणे रुळला आहे हे स्पष्ट करताना लेखक नगर, नागरिक, नागर हे शब्द उदाहरणादाखल देतो तेव्हा आपसूकच वाचकाच्या मनात प्रश्न उमटतो की, अरेच्च्या हे आपल्याला कसे माहिती नव्हते? या प्रकरणाच्या शेवटी लेखकाने मानवी विकासाचा मुद्देसूद क्रम दिला आहे, याचा उपयोग वाचकाला पुढील प्रकरणांतील गुह्य समजण्यात होते.

प्रकरण ४:
या प्रकरणात लेखकाने रक्षक संस्थेचा इतिहास सांगितला आहे. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींतून लेखकाने जे संशोधन समोर ठेवले आहे त्याला तोड नाही. लेखकाने थेट सातवाहनांच्या (इसवी सनाच्याही आधीच्या) काळापासून रक्षक संस्था कशी अस्तित्त्वात आली याचे पुरावे देता देता महार शब्द कसा निर्माण झाला याचाही वेध घेतला आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असलेल्या मॅगॅस्थेनिस या वकीलाने त्याकाळी केलेल्या नोंदींतून लेखकाने अतिशय परिश्रमाने माहितीचे सगळे तुकडे शोधून आपल्याला जोडून दाखवले आहेत. या अस्सल पुराव्यांतून रक्षक संस्थेचा इतिहास लेखकाने कसा शोधला ते अवश्य या प्रकरणात वाचा. जात कशी निर्माण झाली याचाही परामर्श लेखकाने या प्रकरणात घेतला आहे. रक्षक संस्थेच्या जबाबदार्‍या या प्रकरणांत नोंदवल्या आहेत.

प्रकरण ५:
महार समाजाला एक गौरव प्राप्त करुन देणारे असे हे अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे. या प्रकरणातून लेखकाने महार कोण होते? यावर अतिशय तर्कनिष्ठ मांडणी करुन त्यांच्या जबाबदार्‍या वाचकांच्या समोर मांडल्या आहेत. मागच्याच प्रकरणात लेखकाने रक्षक संस्थेचा इतिहास समोर ठेवला होता त्याची आठवण वाचकाला झाल्याशिवाय रहात नाही. वाचक मनातल्या मनात तुलना करत असतानाच लेखकाने हा तर्क पुढे अधिक स्पष्ट करुन महारांवर असलेल्या जबाबदार्‍यांचा वेध घेतला आहे. पण महारांना ज्या हीनतेच्या पातळीवर ढकलल्या गेले त्याबद्दल लेखक खंत व्यक्त करताना म्हणतो की - 'त्याचे जे दूरगामी परिणाम भारतीय मानसिकतेवर पडले ते दूर करायला अजून किती पिढ्या लागतील हे आज तरी सांगता येत नाही.'

प्रकरण ६:
या प्रकरणात महार शब्दाची उपपत्ती शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. इरावती कर्वे, शिवरामपंत भारदे, रॉबर्टसन, महात्मा फुले, रा.गो.भांडारकर अशा मान्यवर संशोधकांचे महार शब्दाबद्दलचे मत लेखकाने दिले आहे व त्याचे तर्कशुद्ध विश्लेषणही केले आहे. मनुस्मृती, इतर पुराणे, उपनिषदे, वेद अशा सर्वांचा सखोल अभ्यास करुन लेखकाने दाखवून दिले आहे की - 'जाती या विशिष्ट सेवा-उद्योगातील कौशल्यातून निर्माण झाल्या आहेत.' जन्माने कोळी असलेल्या व्यास व वाल्मीकी यांनी विश्वविख्यात काव्ये लिहिल्याचे दाखवून पुरातनकाळी जन्माधारित जातीय व्यवस्था नसल्याचे लेखक सप्रमाण दाखवून देतात. 'महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवय्या अशी राहिलेली आहे' हे आजच्या प्रगल्भ वाचकाला लेखक जाणवून देतात. महारांची वस्ती गावाबाहेर का? त्यांची कामे यांबरोबरच मरिआई या देवतेचे देखील तार्किक विश्लेषण लेखकाने केले आहे.

प्रकरण ७:
या प्रकरणातून लेखकाने महार समाजाची सामाजिक अवनती कशी आणि कधी झाली? यावर प्रकाश टाकला आहे. हा इतिहास कापवून टाकणारा असला तरी वाचकाने तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे त्यामुळे त्या अनुषंगाने अधिक सांगून वाचकाचा थरार घालवत नाही. तरी या प्रकरणात लेखकाने पुराणांनी घातलेल्या समुद्रबंदी, महामंदी, दुष्काळांची रांग, अस्पृश्यतेचा आरंभकाळ अशा अनेक अंगांनी सखोल विचार केला आहे. बेदरच्या महाराजाने १४ व्या शतकात विठ्या महाराला दिलेल्या सनदेच्या पुराव्याच्या आधारे काही समजूतींना आणि पूर्वग्रहांना अर्थ नव्हता हे देखील लेखकाने सिद्ध केले आहे.

प्रकरण ८:
यात लेखकाने वर्तमान व भवितव्य यावर अतिशय परखडपणे व तटस्थ असे अवलोकन करुन विचार महार समाजापुढे ठेवले आहेत. आजच्या समतेच्या जगात महार समाजाने पुढे कसे जायचे याचा एकंदरीत आराखडाच लेखकाने मांडला आहे व महार समाजाने व त्यांच्या नेत्यांनीच या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत असेही लेखक शेवटी दाखवून देतात.

या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन झाल्यावर अजून काही थोडक्यात सांगतो -
लेखकाने पहिली तीन प्रकरणे वैदिक कालापासूनच्या उत्खननास दिलेली आहेत. या तीन प्रकरणांतून पुरुषसूक्त कसे प्रक्षिप्त आहे हे लेखकाने सप्रमाण सिद्ध करुन त्याअनुषंगाने जन्माधारित जातीयतेची पाळेमुळे पुराणग्रंथांतून कशी रुजवली गेली. आणि त्याद्वारे फक्त महारांचेच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे अवमूल्यन कालौघात कसे झाले यादॄष्टीने ही तीन प्रकरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. अगदी अलिकडच्या काळापर्यंत महारांचे अवमूल्यन का आणि कसे झाले? हे समजून घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात कोठे झाली आणि नंतरच्या काळात ती वाढीस कशी लागली यावर प्रकाश पडल्याशिवाय महार कोण होते? या प्रश्नाचा विचार करुनही उपयोग नव्हता हे अगदी पटते. संशोधन प्रश्नाच्या अगदी मुळापासून कसे असावे हे या पुस्तकातून शिकायला मिळते.

पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर आजचे महार (मनांत भावना असलीच तर ) लाचारीचे जगणे सोडून अभिमानाने जगायला नक्कीच शिकतील असा विश्वास वाटतो. आणि महारेतरांना या पुस्तकामुळे महारांविषयी (असलीच तर) हीनत्त्वाची भावना समूळ नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल.
जाता जाता महार कोण होते? हा शोध हा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जातीय व्यवस्थेचा शोध खरेतर आहे. असे तटस्थ मूल्यांकन वाचकांना देताना लेखक श्री. संजय सोनवणी यांची श्री. हरि नरके यांना अर्पण केलेली अर्पणपत्रिका लेखकाच्या संवेदनशीलतेचा परिचय वाचकांना देतात.
परंपरागत समजुतींना धक्का देणारे आणि वारंवार वाचून चिंतन करावे असे 'महार कोण होते?' हे पुस्तक आहे असे आवर्जून म्हणेन. संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे महारांचा शोध घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. महार कोण होते या सिद्धांताची अत्यंत तर्कनिष्ठ आणि सप्रमाण अशी मांडणी श्री. सोनवणी यांनी केलेली आहे, त्यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. वाचकांनी खुल्या मनाने या पुस्तकाचे स्वागत करावे ही विनंती.

धन्यवाद,
-सागर

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम पुस्तक परिचय सागर. अशाच धरतीवर स्त्रियांवरचे एक पुस्तक वाचले आहे ( ते पाश्चात्य लेखिकेने लिहिले असून देखील काही गोष्टींमध्ये साम्य असावे असे वाटते!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाईट बर्च,

या (माझ्यासाठी असलेल्या) नव्या माहितीबद्दल धन्यवाद. मी कधी अशा पुस्तकाबद्दल ऐकले नव्हते.
त्या पुस्तकाचे नाव सांगू शकाल का?
मला ते पुस्तक वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाचा अतिशय उत्तम परिचय करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद. पुस्तकाचा विषय अतिशय वेगळा, आणि चांगला आहे आणि ते अतिशय परिश्रमपुर्वक, अभ्यासुवृत्तीने व कळकळीने लिहीले आहे असे तुमच्या परिक्षणावरून लक्षात येते. हे पुस्तक कुठे मिळू शकेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

संजीवजी,

हे पुस्तक पुण्यात रसिक साहित्य मधे मिळेल.
ऑनलाईन खरेदी करायची असेल तर बुकगंगा.कॉम वर मिळेल. महार कोण होते? या पुस्तकाचा बुकगंगा वरचा हा थेट दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक वाचल्याशिवाय मत देणं योग्य नाही. पुस्तकपरिचयामुळे काही शंका उपस्थित होतात त्या अर्थातच अज्ञानातून. या परिचयातून असे वाटते कि महारांची वाटचाल अस्पृश्यतेकडे किंवा बहिष्कृत जातीकडे कशी झाली याचा वेध घेतला गेला आहे. योग्यही असेल. पण मग ज्या जाती महार नाहीत त्यांचीही अवस्था महारांप्रमाणे बहिष्कृत म्हणून कशी झाली असावी ? सातवाहनांचं राज्य तर दक्षिणेस एका मर्यादीत भूभागात होतं. संपूर्ण भारतात अस्पृश्य जाती कशा उदयास आल्या याबद्दल या पुस्तकात उहापोह केला आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

....

पण मग ज्या जाती महार नाहीत त्यांचीही अवस्था महारांप्रमाणे बहिष्कृत म्हणून कशी झाली असावी? सातवाहनांचं राज्य तर दक्षिणेस एका मर्यादीत भूभागात होतं. संपूर्ण भारतात अस्पृश्य जाती कशा उदयास आल्या याबद्दल या पुस्तकात उहापोह केला आहे का ?

निर्जंतुक जंतुजी,

याही प्रश्नांचा वेध लेखकाने या पुस्तकांतून घेतला आहे. त्यासाठी मात्र तुम्ही म्हणता तसे हे पुस्तक वाचावे लागेल Smile
लेखकाने पार ऋग्वेद काळापासून एकूणच अस्पृश्यता कशी निर्माण झाली व तिचा प्रसार कसा झाला यावरही या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगल परिचय
सध्या पुस्तकं वाचुन परिक्षणं लिहायचा तुझा संकल्प आम्हाला मेजवानीच असणार आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ'शी सहमत. और आन्दो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

धन्स ऋ,

नव्या वर्षाच्या संकल्पाप्रमाणे प्रयत्न करतोय Smile
मागच्या वेळी सुहास शिरवळकरांच्या पुस्तकावर लिहिले होते. 'महार कोण होते?' हे पुस्तक थोडे चाकोरीबाहेरचे व वेगळे वाटले म्हणून वाचायला घेतले आणि एका बैठकीतच पूर्ण केले. हा परिचयही लगोलग लिहून काढला होता. शेवटच्या २ प्रकरणांवर लिहायला थोडा वेळ लागला एवढेच Smile

पुढचा पुस्तक परिचय सिडने शेल्डनच्या मेमरिज ऑफ मिडनाईटचा किंवा मग गोनीदांच्या एका पुस्तकावर लिहायचा बेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सागर, पुस्तक परीक्षण वाचून अनेक प्रश्न मनात आले. उदाहरणार्थ - जन्माधारित जातीय व्यवस्था नेमक्या कोणत्या कारणांमुळे स्थिरावली असावी याचा वेध घेताना नेमके कोणते नवे मुद्दे मांडले आहेत लेखकाने? डॉ. आंबेडकरांच्या Who Were The Shudras? यातील मांडणीशी लेखकाची सहमती कुठवर आहे आणि कुठे वेगळा विचार सुरु होतो?
अर्थात परीक्षणात सगळ्या मुद्यांचा सविस्तर उहापोह करणे शक्य नसते याची जाणीव आहे. त्यामुळे पुस्तक 'वाचायचे आहे' या यादीत जोडले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सविता ताई,

जन्माधारित जातीय वर्णव्यवस्था घेताना लेखकाने आंबेडकरांनी मांडलेल्या मुद्द्यांपासूनच सुरुवात केली आहे. त्यानंतर अनेक संशोधकांची मते विचारात घेतली आहेत. सर्व मान्यवर अभ्यासक-संशोधकांची मते मांडून मगच लेखकाने ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे या उपपत्तीची मांडणी केली आहे. जन्माधारित जातीयव्यवस्थेची पाळेमुळे ऋग्वेदातील केवळ एका पुपुरुषसूक्तात कशी रुजली आहेत व पुढे त्याचा विस्तार मनुस्मृती व पुराणे यांच्यातून कसा झाला याचा मार्मिक वेध लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. पहिली २ प्रकरणे मुळातूनच वाचावी अशी आहेत सविताताई, त्यामुळे सर्व विस्ताराने मी सांगू शकेल. पण तुमचा वाचनातील थरार माझ्यामुळे जाऊ नये एवढीच इच्छा आहे, म्हणून सांगत नाहिये Smile

त्यासाठी तेव्हा सविताताई तुम्हाला अवघ्या १०९ पानांचे हे पुस्तक वाचावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>

एखाद्या जातीविषयी हीनत्त्वाची भावना ठेवणे चूकीचे असते कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. व्यक्तींची आपण वर्गवारी करू शकत नाही. तरीही समाजात असे घडते. वर्षानुवर्षे घडत आलेले आहे आणि सद्यपरिस्थिती पाहता कदाचित आपल्या हयातीत तरी हे बदलेल असे वाटत नाही. हे बदलण्या आधी हे का घडते / घडले याचा अभ्यास करणे महत्त्वाचे. त्या अनुषंगाने सदर पुस्तक मोलाची कामगिरी बजावत असणार असे परीक्षण वाचून वाटते.

जाती विषयी जशी हीनत्त्वाची भावना असतेच तशी एका प्रांताविषयी दुसर्‍या प्रांतातील लोकांची हीनत्त्वाची भावना असते. उदाहरणार्थ, फ्रान्सचे लोक ब्रिटीशांना कम-अस्सल समजतात. तद्वतच आपल्याकडे उत्तरेकडील राज्ये ही दक्षिणेकडील राज्यांना हलके लेखतात. एकदा तर मी एका पंजाबी व्यक्तिला महाराष्ट्राबद्दल अत्यंत हीनत्त्वाने बोलताना ऐकले. तो म्हणाला - "यहां के बम्मन और मरहट्टे भी सही में उच्च जातीके नही है| सभी ओरिजिनली महारही है| जहां महार रहते है वही महाराष्ट्र कहलाता है|" एका सार्वजनिक ठिकाणी हा मनुष्य स्वतःच्या गटातील इतरांशी असे संभाषण करीत होता. हे सर्वच लोक माझ्याकरिता पूर्णतः अनोळखी असल्याने त्याच्या विधानांविषयी अधिक स्पष्टीकरण मी त्यास मागितले नाही. परंतु तो असे का बोलला? त्याने याविषयी पूर्वी कुठे काही वाचले / ऐकले असेल का? हे प्रश्न माझ्या मनात अजून ठाण मांडून बसले आहेत.

महाराष्ट्र व महार या दोन शब्दांचा परस्परांशी खरंच काही संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर सोनवणींच्या पुस्तकात मिळू शकेल काय? तसे असेल तर हे पुस्तक वाचण्याकरिता वेळ काढता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

महाराष्ट्र व महार या दोन शब्दांचा परस्परांशी खरंच काही संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर सोनवणींच्या पुस्तकात मिळू शकेल काय? तसे असेल तर हे पुस्तक वाचण्याकरिता वेळ काढता येईल.

होय चेतन मित्रा,

या पुस्तकात या प्रश्नाचे उत्तर मिळेल.लेखकाने या पुस्तकांत महार शब्द कोठून आला व त्यावरुन 'महारांचा देश तो महाराष्ट्र' अशी उत्तर भारतीय संशोधकांच्या उपपत्ती कशा चुकीच्या आहेत, हे ही साधार मांडले आहे. तू पंजाब्याकडून जे ऐकलेस त्यावर उत्तर भारतातल्या संशोधकांचा प्रभाव असावा. या प्रश्नाचाही वेध लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. जुन्या समजूती कशा पसरल्या गेल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे पाहण्याचा उत्तर भारतीयांचा दॄष्टीकोन कसा पूर्वग्रहदूषित झाला हाही एक संशोधनाचा विषय असावा. पण लेखकाने 'महार कोण होते?' मध्ये सर्व बाजूंनी विचार करुन जी मते मांडली आहेत त्यामुळे तुझ्या प्रश्नांना उत्तरे नक्की मिळावी

पुस्तक वाचलेस की तुझे मत जाणून घ्यायला आवडेल मित्रा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापरे! बराच मोठा आवाका दिसतोय!
इतका पसारा कसा १०९ पानांत बसवला आहे याची उत्सूकता लागली आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बापरे! बराच मोठा आवाका दिसतोय!
इतका पसारा कसा १०९ पानांत बसवला आहे याची उत्सूकता लागली आहे

अरे ऋ,

पुस्तक वाचून झाल्यावर माझी पण नेमकी हीच अवस्था झाली होती Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ब्राह्मणांवरती आणि ब्राह्मण्यावरती किती कोरडे ओढले आहेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ब्राह्मणांवरती आणि ब्राह्मण्यावरती किती कोरडे ओढले आहेत ?

ब्राह्मणांवरती ? - अजिबात नाहीत. Smile

परा मित्रा, कोरडे ओढले असतीलच तर ते प्रवृत्तींवर आहेत.

पण पुस्तकाचा मूळ हेतू महारांचा शोध घेणे असल्यामुळे लेखकाने त्याचे भान ठेवूनच सर्व पुस्तकात लेखन केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाची ओळख आवडली.

कोरडे ओढले असतीलच तर ते प्रवृत्तींवर आहेत.

या भागाचा थोडा खुलासा करावा. प्रवृ्त्ती म्हणजे नक्की काय? व त्यांवर कोणी कोरडे ओढावेत?

मी लहान होते तेव्हा बाहेरून खेळून आल्यावर माझी आजी मला ओरडून म्हणायची "अगं महारणी आधी पाय धुवून ये" तिचा जन्म झाला तेव्हा जातीपाती भरपूर पाळल्या जायच्या. त्याकाळी महार खरोखरच खालची कामे करीत. तसेच ते गरीबही असंत. त्यामुळे त्यांच्यात अस्वच्छता असे. मग अस्वच्छ रहाण्याच्या प्रवृत्तीला महार प्रवृत्ती म्हणणे योग्य ठरेल काय? म्हणजे समजा कोणी म्हटले, 'की सगळेच महार अस्वच्छ असंत/असतात असे आम्ही म्हणत नाही. आम्ही केवळ अस्वच्छतेच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढत आहोत. आणि तिला महार हे नाव देण्याचे कारण केवळ ऐतिहासिक आहे - त्याकाळी अनेक महार (सगळेच नव्हे) अस्वच्छ असायचे.' तर या प्रवृत्तीवर कोरडे ओढावेत का?

मुळात जातीनिहाय प्रवृ्त्तींचे वाटप करणे कितपत न्याय्य आहे असा प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहराजाद,

प्रवृत्ती या कोणत्याही जातीसापेक्ष असू शकत नाहीत. प्रवृत्तींवर कोरडे ओढणे याचा अर्थ कदाचित माझ्या शब्दांवरुन चुकीचा लागला गेला आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे होते की या पुस्तकात लेखकाने कोणत्याही जातीवर टीका अजिबात केली नाहिये. तर वर्चस्ववादी मानसिकतेतून समता कशी डावलली गेली याचा लेखकाने वेध घेतला आहे.
लेखकाने महारांवर अन्याय समाजातील कोणत्या प्रवृत्तींमुळे झाला हे दाखवताना महार समाजाच्या अवनतीचे कारण शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच महार समाजातील चुकांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरुन भविष्यकाळात समतेबरोबरच बहुजन समाजाची प्रगती होण्यास मदत व्हावी.

असो, पुस्तक तुम्ही वाचल्यानंतर तुमचे मत ऐकायला जास्त आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचून झालं का पुस्तक ? कि न वाचताच ही शंका आली ? या शंकेच्या मागे काही पार्श्वभूमी वगैरे ???
त्या काळी अस्पृश्यांना ब्राह्मण घरी जेवावयास बोलावत. त्यांचा आदर सत्कार करीत. त्यांना सोनंनाणं, गाई -गुरं देत. त्यांच्याकडून कर्मकांडं करून घेण्याच्या बदल्यात दलितांच्या घरची सगळी कामे ब्राह्मण बिनबोभाट करत. ब्राह्मणांवर फारच अन्याय झाले. त्यांना पाण्याला शिवू देत नसत. तरीही ते स्वच्छ राहत. त्यांना धान्य मिलू देत नसत तरीही ते आपली भूक मारून कसे बसे दिवस काढत. त्यांना शिकू दिले गेले नाही. वेदाभ्यास केल्यास मुंडके उडवण्यात येई. इतकं भोगूनही लोक त्यांच्यावरच का बरं टीका करत असावेत ? खरंच समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ब्राह्मणांवरती आणि ब्राह्मण्यावरती किती कोरडे ओढले आहेत ?

वाचून झालं का पुस्तक ? कि न वाचताच ही शंका आली ? या शंकेच्या मागे काही पार्श्वभूमी वगैरे ???
त्या काळी अस्पृश्यांना ब्राह्मण घरी जेवावयास बोलावत. त्यांचा आदर सत्कार करीत. त्यांना सोनंनाणं, गाई -गुरं देत. त्यांच्याकडून कर्मकांडं करून घेण्याच्या बदल्यात दलितांच्या घरची सगळी कामे ब्राह्मण बिनबोभाट करत. ब्राह्मणांवर फारच अन्याय झाले. त्यांना पाण्याला शिवू देत नसत. तरीही ते स्वच्छ राहत. त्यांना धान्य मिलू देत नसत तरीही ते आपली भूक मारून कसे बसे दिवस काढत. त्यांना शिकू दिले गेले नाही. वेदाभ्यास केल्यास मुंडके उडवण्यात येई. इतकं भोगूनही लोक त्यांच्यावरच का बरं टीका करत असावेत ? खरंच समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिचयाबद्दल आभार, एक वेगळा दृष्टीकोन वाचण्यासाठी उत्सूक, इतिहास सर्वांचाच असावा, कोणिही उपक्षित राहू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतिहास सर्वांचाच असावा, कोणिही उपक्षित राहू नये.

जाम आवडले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सागर....

हे पुस्तक मला खुद्द श्री.संजय सोनवणी यानीच त्यांच्या परवाच्या कोल्हापूर भेटीप्रसंगी मित्रप्रेमाने भेट म्हणून दिले आणि त्याच रात्री मी ते वाचलेही. या विषयावर तसेच 'महार' स्वतःला अन्य दलित जातीपासून [राज्य शासन नोंदीनुसार एकूण ५९ जाती अनुसूचित जाती प्रवर्गात येतात, त्यापैकी महार एक] वेगळे का मानतात? त्यांच्या चळवळीची व्याप्ती फक्त शासकीय सवलतीपुरतीच मर्यादित का झाली आहे ? मांग, ढोर, व्हल्लार आदी तितक्याच मागासलेल्या जातींशी ते का फटकून वागतात, याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती.

खुद्दा बाबासाहेबांनाही 'महारां'ची ही वर्तणूक खटकलेली होती. २९ जून १९२९ रोजी परळच्या दामोदर हॉलमध्ये भरलेल्या जाहीर सभेत ते म्हणालेच होते, "आपल्यातीलच काही लोक महार-महारेतर असा वाद उभा करीत आहेत. महार जरी महाड चवदार तळ्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्याशी झगडले आणि तो तलाव आपलासा करून घेतला तरी त्या तळ्यातील पाणी चांभारांना आणि मांगांनादेखील पिता आले पाहिजे...." ही शिकवण महारांनी आपल्या अंगी बाणवली नाही, हे दुर्दैव होय. अशी काही उदाहरणे मी इथे कोल्हापूरातही पाहिली होती आणि त्या संदर्भात श्री.संजय सोनवणीसरांशी वैचारिक देवाणघेवाणही झाली आहे.....अजूनही होतेच.

हे पुस्तक लिहिल्यानंतरही श्री.सोनवणींचा हा अभ्यास थांबलेला नाही {तसा तो थांबविणारही नाहीत}. त्यांची अपेक्षा इतकीच आहे की, इतिहासाचे पापुद्रे सोलत सत्याकडे जात राहावे आणि त्या अनुषंगानेच समाजव्यवस्थेचा अभ्यास याच समाजातील प्रत्येक घटकाने करावा. पुस्तकाची तुम्ही छानच ओळख करून दिली आहे.

'जाती' चा विषय मांडणारे हे पुस्तक नसून फक्त एका समाजाच्या इतिहासाची वाटचाल दाखविणारे संशोधन होय.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशोक काका,

सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही म्हणता तसे ''जाती' चा विषय मांडणारे हे पुस्तक नसून फक्त एका समाजाच्या इतिहासाची वाटचाल दाखविणारे संशोधन होय.'
यात थोडी भर टाकतो.

हे पुस्तक वाचल्यानंतर मी लेखकाशी सविस्तर चर्चा देखील केली होती. सदर पुस्तकाचे लेखक संजय सोनवणी हे सर्वच जातींच्या अनुषंगाने अधिकचे संशोधन करत आहेत. लवकरच सर्व जातींच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे त्यांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे अशी माहिती देखील त्यांनी मला दिली आहे.
संशोधन ही सातत्याची प्रक्रिया आहे. पण अशोक काका, तुम्ही अगदी समर्पक उपमा दिली आहे. 'इतिहासाचे पापुद्रे सोलत सत्याकडे जात राहावे आणि त्या अनुषंगानेच समाजव्यवस्थेचा अभ्यास याच समाजातील प्रत्येक घटकाने करावा. ' केळाच्या गोड गाभ्याची चव घेण्यासाठी त्याचे साल सोलावे लागते तद्वतच तुम्ही म्हणता तसे इतिहासाचे आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>'महार' स्वतःला अन्य दलित जातींपासून वेगळे का मानतात? मांग, ढोर, व्हल्लार आदी तितक्याच मागासलेल्या जातींशी ते का फटकून वागतात?

याचं मला माहीत असणारं उत्तर म्हणजे 'गावकुसाबाहेरच्या इतर जातींपेक्षा महारांना गावगाड्यात अधिक मान होता, कारण त्यांच्या परंपरागत कौशल्यांमुळे गावातल्या सत्ताधार्‍यांशी ते निकट संपर्कात असत.' हे आहे. म्हणजेच जातिव्यवस्थेतली उतरंड ही केवळ सवर्ण-दलित अशी नसून ती अनेकपदरी आहे. अशीच उदाहरणं सवर्णांतदेखील आढळतात (उदा : ब्राह्मणांमधली किरवंत पोटजात अंतविधीशी संबंधित परंपरागत कामामुळे कमी दर्जाची मानणे वगैरे). सोनवणी यांना याहून काही वेगळं म्हणायचं असेल तर ते ऐकायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओ, जरा गपा की. आले लगेच पिना घेऊन... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंतातुर जंतुजी,

अजून एका ब्लॉगलेखकाने 'महार कोण होते?' वर एक परिक्षण लिहिले आहे.
हा पहा दुवा

या परिक्षणातून तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पहा.
त्यातून काही असेल तर मी माझ्यापरिने शंकानिरसन करायचा नक्की प्रयतन करेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महार स्वतःला (पूर्वीपासून) वेगळे मानतात याबद्दल माहीती उप्लब्ध नाही. बाबासाहेबांना अस्पृश्यविरोधी लढ्यात साथ न दिल्याने आपोआपच तट पडले. जसे माळी समाजाने म फुलेंना जातीबहिष्कृत केले होते तसेच महारांच्या एका गटाने देखील हिंदूंच्या दबावाखाली बाबासाहेबांना बहिष्कृत करण्याचा ठराव मांडला होता. इतर जातींनी या लढ्यात पूर्ण योगदान दिले नाही. त्यामुळे त्यांच्यात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. महारच पुढेही महारेतर जातींमधे जागृती करीत राहीले. १९८० चा नंतर मात्र इतर जातींमधे इतरांकडून महारांविरूद्ध अपप्रचारास सुरूवात झाली. त्यामुळे वेगळे मानण्याचा मुद्दा हा उगाच आहे. मात्र शिकलेले महार वेगळे झाले हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक परिचय आवडला. पुस्तक वाचायला आवडेल.

पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर आजचे महार लाचारीचे जगणे सोडून अभिमानाने जगायला नक्कीच शिकतील असा विश्वास वाटतो./blockquote>

हे विधान तुमचे की लेखकाचे? कारण यातील पहिले वाक्य म्हणजे स्विपींग जनरलायझेशन वाटत आहे.या वाक्याचा अर्थ असा होत आहे की त्या जातीतले लोक लाचारीचे जगणे जगतात आणि त्यांना अभिमानाने जगायला शिकणे गरजेचे आहे. ही सत्य परिस्थिती आहे का? तशी ती नक्कीच नाही असे माझे मत आहे. अर्थात तुमचेही मत तसेच असावे अशी माझी अजिबात अपेक्षा नाही पण वरील विधानातून वेगळा अर्थ निघू शकतो हे दाखविण्यासाठीच हा प्रतिसाद लिहित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

पिसाळलेला हत्ती,

माफ करा माझीच चूक आहे ही. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य तो बदल त्या वाक्यरचनेत केला आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अजून एका ब्लॉगलेखकाने 'महार कोण होते?' वर एक परिक्षण लिहिले आहे.
हा पहा दुवा

या परिक्षणातून तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पहा.

या परीक्षणावरून मूळ पुस्तकाविषयी मोठाच संभ्रम निर्माण होतो आहे. पुस्तकलेखकाने १७६१ पर्यंत महार अस्पृश्य नव्हते असं म्हटलं आहे असं दिसतं. पण बंका महार, चोखामेळा तर चौदाव्या शतकात होऊन गेले. चोखामेळा महार होता म्हणून तर तो 'उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन। पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग।' ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ ‘बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’ ‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’ ‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’ असे जातिव्यवस्थेवर प्रहार मारून गेला.

एवढा मोठा पुरावा समोर असण्यामुळे सोनवणींचा हा शोध चमत्कारिक वाटतो आहे.
संदर्भ : चोखामेळा - विकिपीडिया
आठवणीतली गाणी - चोखामेळा

किंवा इथे असं म्हटलं आहे आणि हे खरं आहे असाच माझा समज आहे :

महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना विनंती केली होती की पेशवाईत महारादी अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे. महार सैनिक मायभूमीसाठी प्राण देण्यास तयार आहेत; पण त्यांची ही विनंती पेशव्यांनी अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती

नंदा खरे यांच्या 'बखर अंतकाळाची'मध्येही पेशवाई आणि महार यांचे जे संबंध चित्रित केले आहेत ते म्हणजे 'पेशवाईला महारांची सेवा हवी होती, पण त्यांना योग्य मान द्यायची तयारी नव्हती' असे आहेत. उदाहरणार्थ हे पाहा.

या सर्वाला छेद देऊ शकतील इतपत रास्त पुरावे सोनवणींकडे आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या सर्वाला छेद देऊ शकतील इतपत रास्त पुरावे सोनवणींकडे आहेत का?

नक्कीच लेखकाने सर्वांगाने विचार करुन पुस्तक लिहिले आहे. त्या अनुषंगाने पुरावेही दिले आहेतच.

पुस्तकलेखकाने १७६१ पर्यंत महार अस्पृश्य नव्हते - असे लेखकाने अजिबात म्हटलेले नाहिये.

या सर्वाला छेद देऊ शकतील इतपत रास्त पुरावे सोनवणींकडे आहेत का? या सर्वाना छेद देण्याची मला वाटते आवश्यकता नसावी. कारण लेखकाने पार वैदिक काळापासून महारांचा शोध घेतला आहे. उलट त्याअनुषंगानेच हे संशोधन आहे.

मला जे गवसले ते मी थोडक्यात मांडले आहे. तुम्हाला कदाचित वेगळे काही सापडू शकते. पण त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावे लागेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडे ब्लॉगलेखक श्री. संजय क्षीरसागर स्पष्टपणे असे म्हणतात की -

परंतु सोनवणी हे महार समाजातील नसूनसुद्धा त्यांनी अतिशय मेहनत घेऊन स. १७६१ पर्यंत तरी महार समाज हा अस्पृश्य नसल्याचे आपल्या ग्रंथात साधार स्पष्ट केले आहे.

इकडे तुम्ही म्हणता की -

पुस्तकलेखकाने १७६१ पर्यंत महार अस्पृश्य नव्हते - असे लेखकाने अजिबात म्हटलेले नाहिये.

हे कसे काय? एकतर परीक्षकांपैकी एकाने हे पुस्तक नीट वाचलेले नाही किंवा एकाच पुस्तकाच्या दोन प्रतींत वेगवेगळा मजकूर छापलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विसुनाना,

लेखकाने जर असे म्हटले असेल तर लेखकाला त्यासाठी ऋग्वेद काळापासून उत्खनन करायची गरजच नव्हती.
पेशवेकाळात अस्पृश्यतेचा अतिरेक झाला होता एवढाच फार तर निष्कर्ष काढता येतो

ब्लॉगलेखकाचा गैरसमज असू शकतो किंवा तो त्यांचा निष्कर्ष असू शकतो. स्पृश्य - अस्पृश्य हा एक वेगळा विषय आहे.

शिवाय स्पृश्य - अस्पृश्य यापेक्षा महार कोण होते? त्यांची अवनती कशी झाली? आजचे त्यांचे स्थान काय? भविष्यात त्यांनी काय केले पाहिजे. अशा अनुषंगाने लेखकाने हे संशोधन केले आहे. या पुस्तकात लेखकाने अस्पृश्यतेकडे फार रोख दिलेला नाहिये. तशी आजच्या काळात त्यावर फार फोकस करायची गरजही नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सागर,
तुमची भूमिका समजली.
पुस्तकाच्या प्रकरण ७ मध्ये -'अस्पृश्यतेचा आरंभकाळ' हा विषय आल्याचे आपण नमूद केले आहे.
या प्रकरणात लेखक या आरंभकाळाबद्दल नक्की काय म्हणतो? शूद्र जर पुरुषसूक्त काळापासून अस्तित्त्वात होते तर तेव्हापासूनच ते अस्पर्श्य होते का?
'स्पृश्य - अस्पृश्य हा एक वेगळा विषय आहे' असे (पुस्तकाच्या लेखकाला वाटत) असेल तर या मुद्द्याबाबत त्याने का उहापोह केला आहे?
कृपया लेखकाचे मत कळावे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखक या आरंभकाळाबद्दल नक्की काय म्हणतो? शूद्र जर पुरुषसूक्त काळापासून अस्तित्त्वात होते तर तेव्हापासूनच ते अस्पर्श्य होते का?
'स्पृश्य - अस्पृश्य हा एक वेगळा विषय आहे' असे (पुस्तकाच्या लेखकाला वाटत) असेल तर या मुद्द्याबाबत त्याने का उहापोह केला आहे?
कृपया लेखकाचे मत कळावे.

विसुनाना,

तुम्ही दिलेल्या मुद्द्यांच्या दिशेने थोडा प्रकाश टाकू इच्छितो.
'स्पृश्य - अस्पृश्य हा एक वेगळा विषय आहे' - हे माझे मत होते. पण अस्पॄश्य म्हणून शिक्का मारल्यामुळे महारांवर अन्याय झाला त्याचे हे एक मुख्य कारण होते त्यामुळे लेखकाने यावर थोडक्यात पण आवश्यक असा परामर्श घेतला आहे.

शूद्र वैदिक काळापासून होते तरी ते त्याकाळापासून अस्पर्श्य नक्कीच नव्हते. शूद्रांबद्दल ऋग्वेदात आलेल्या पुरुषसूक्तांतील दोन ऋचा सोडल्या तर संपूर्ण ऋग्वेदात शूद्रांबद्दल उल्लेख नाहिये. पुढे मनुस्मृतीत या संकल्पनेचा विस्तार कसा झाला हे लेखकाने सुरुवातीच्याच प्रकरणात स्पष्ट केले आहे.
अस्पृश्यतेचा आरंभकाळ या प्रकरणात लेखकाने महारांच्या रोजगाराच्या गरजेमुळे निर्माण झालेली परिस्थिती विशद केली आहे. त्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले यांचा परामर्श घेतला आहे. जसे दुष्काळ, इस्लामी आक्रमणे, सेवा हाच रोजगाराचा मार्ग असल्यामुळे दुष्काळांत झालेली परवड, इत्यादी. मृताहारी असल्यामुळे महारांना वाळीत टाकण्याच्या प्रकारांना सुरुवात झाली.

अस्पृश्यतेला १२व्या शतकापासून सुरुवात झाली असावी असा लेखकाचे मत आहे.
पुस्तकातील काही भाग त्यासाठी देतो.
"१२व्या शतकापासुन महार समाजाचे क्रमश: अवमूल्यन करत त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आले असावे असे मला उपलब्ध पुराव्यांवरुन अंदाजिता येते.
उदा. चोखा मेळा या महान संतास विठ्ठल मंदीर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्पृश्य मानत नव्हते आणि अगदी ज्ञानेश्वरही, असे अस्पष्ट संकेत मिळतात."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शूद्र वेगळे अस्पृश्य वेगळे. विसूनाना योग्य शंका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंतातूर जंतू यांचा प्रतिसाद आवडला. संजय सोनवणी यांचे लिखाण अभ्यासपूर्ण असेल. पण ते योग्य असेलच हे आताच सांगता येणार नाही. वाचावे लागेल बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महारांविषयीचे प्रचलित समज किंवा इरावती कर्वेप्रभृती संशोधकांची मांडणी यांहून सोनवणी यांची मांडणी नक्की वेगळं काय सांगते याविषयी अजून तरी नीट काही कळत नाही आहे. पुस्तकाच्या गुणवत्तेविषयी संभ्रम त्यामुळे उत्पन्न होत आहेत. धागालेखक किंवा पुस्तक वाचलेले इतर लोक यांपैकी कुणीतरी हे स्पष्ट केलं तर हवं आहे. त्यानुसार मग पुस्तक वाचायचं की नाही हे ठरवेन. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

महारांविषयीचे प्रचलित समज किंवा इरावती कर्वेप्रभृती संशोधकांची मांडणी यांहून सोनवणी यांची मांडणी नक्की वेगळं काय सांगते याविषयी अजून तरी नीट काही कळत नाही आहे.

याविषयी माझ्या लेखात मी सांगितले आहेच की इरावती कर्वे, भांडारकर यांच्यासारख्या संशोधकांची मतेही लेखकाने विचारात घेतली आहेत.
सोनवणींची मांडणी मी सर्व लिहायची म्हटली तर तो एक अजून मोठा विस्तार होईल. थोडक्यात सांगायचे झाले तर रक्षक संस्थेचा इतिहास वैदिक काळापासून दाखवला आहे. वेळोवेळी त्यात पुरावेही दिले आहेत. ही रक्षक संस्था आणि महार यांच्यातील साधर्म्य सोनवणींनी दोघेही करत असलेल्या कार्यांवरुन उलगडून दाखवले आहे. जसे गावाचे रक्षण करणे, गावात येणार्‍या जाणार्‍यांवर लक्ष ठेवणे, महसूल गोळा करणे, गावात चोरी झाली तर तिचा शोध लावणे, इ..इ... आणि काळाच्या ओघात महारांची अवनती कशी झाली याचाही खुलासा लेखकाने केला आहे.

पुस्तकाच्या गुणवत्तेविषयी संभ्रम त्यामुळे उत्पन्न होत आहेत.
हा मुद्दा नाही कळला. कशावरुन हा निष्कर्ष काढलात? फार तर माझ्या लेखाची गुणवत्ता तुम्ही काढू शकता.

शेवटी पुस्तक वाचायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरेस्टिंग! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे बघा आले आपली प्रसिद्ध स्मायली घेऊन! Smile
मागे आरागॉर्नने इंटरेस्टिंग च्या सार्‍या छटा दाखवणारा शब्द मराठीत नाही म्हटले होते ते आठवले Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>इरावती कर्वे, भांडारकर यांच्यासारख्या संशोधकांची मतेही लेखकाने विचारात घेतली आहेत.

मतं विचारात घेण्याला तरणोपाय नाही, पण त्यांनी मांडलेल्यापेक्षा वेगळं काही लेखकानं म्हटलं आहे का? असेल तर ते काय? उदा : गावाचं रक्षण करण्याची गरज जगभर नेहमीच असते. भारतासारख्या (म्हणजे व्यवसायाधारित जातींचा इतिहास असणार्‍या आणि प्रादेशिक बहुविधता असणार्‍या) देशाच्या विविध भागांत विविध जमाती कदाचित ते करत असतील. पण त्यामुळे महारांविषयीच्या आपल्या आकलनात काही फरक पडतो का? विशिष्ट प्रदेशातल्या विशिष्ट रक्षक जमाती महाराष्ट्रात आल्यानंतर महार म्हणून परिचित झाल्या असं लेखकाचं संशोधन सांगतं का?

>>काळाच्या ओघात महारांची अवनती कशी झाली याचाही खुलासा लेखकाने केला आहे.

लेखकाला अभिप्रेत अवनती नक्की कोणती, ते कळल्याशिवाय लेखकाच्या विवेचनाच्या गुणवत्तेचा अंदाज येत नाही. एक उदाहरण देतो : आंबेडकरी प्रभावाखाली बौद्ध होणं ही जर लेखक अवनती मानत असतील तर मला वेगळे प्रश्न पडतील, आणि निव्वळ सवलतींची अपेक्षा करत त्यांचं राजकारण होत राहणं, पण पुरेसं समाज प्रबोधन न होणं ही जर अवनती मानत असतील तर त्याविषयी वेगळे प्रश्न पडतील.

>>हा मुद्दा नाही कळला. कशावरुन हा निष्कर्ष काढलात?

पुस्तकात पुरेसा स्वतंत्र विचार असला तर तो काय हे कळत नाही आहे एवढाच माझा आक्षेप आहे. पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी परिचयात मांडता येत नाहीत हे ठीकच आहे, पण मांडलेल्या प्रमुख आणि तुमच्या मते नव्या किंवा मूलगामी विचारांचा संक्षेपात आढावा घेतला तर ते 'पुस्तक का वाचावं?' या प्रश्नाला सार्थ उत्तर होऊ शकेल असं मी थोडक्यात म्हणतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला असे वाटते आहे की चर्चा भरकटते आहे. तुमचा रोख समजून घेण्यात माझ्या काही मर्यादा असू शकतील. तरी मी प्रयत्न करतो.

आधीच्या विचारवंतांची मते विचारात घेण्याशिवाय तरणोपाय नाही या मताशी सहमत आहे, त्याशिवाय नवे संशोधन सिद्ध कसे होणार? नाही का? होय. लेखकाचे मत वेगळे आहे. महारांचा देश तो महाराष्ट्र, महार समाज नागवंशीय, इत्यादी अनेक उपपत्ती लेखकाने तपासल्या आहेत व या उपपत्तींतील उणीवा आणि योग्यपणा साधार दाखवल्या आहेत. सोनवणींनी महार शब्दाची उपपत्ती मांडली आहे. संस्कृत भाषेऐवजी तत्कालीन प्रचलित असलेल्या प्राकृत भाषेच्या आधारे 'महारक्ख' (महारक्षक) चे 'महार' मधे रुपांतर कसे झाले त्याची चर्चा केली आहे.

विशिष्ट प्रदेशातल्या विशिष्ट रक्षक जमाती महाराष्ट्रात आल्यानंतर महार म्हणून परिचित झाल्या असं लेखकाचं संशोधन सांगतं का?

नाही, लेखकाचे मत असे नाहिये. मूळ महाराष्ट्रातील असलेल्याच रक्षकांचे महार या जातीत कसे परिवर्तन केले गेले हे लेखकाने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. महार ही जात फक्त महाराष्ट्राला लागून असलेल्या एका विशिष्ट भूभागातच आहे, पुराणांतही महार या जातीचा उल्लेख नाहिये हा दाखलाही लेखकाने दिलाय.

लेखकाला अभिप्रेत अवनती नक्की कोणती,
ही अवनती केवळ आजची नसून महारांना अस्पृश्य म्हणून हिणवल्याच्या सर्व काळातील आहे. अगदी पेशवे काळात महाराची सावली एका ब्राह्मणाच्या अंगावर पडली म्हणून त्याचे मुंडके उडवले गेले या सत्य ऐतिहासिक घटनेचा दाखलाही ते देतात. (या घटनेचा ऐतिहासिक पुरावाही उपलब्ध आहे)

निव्वळ सवलतींची अपेक्षा करत त्यांचं राजकारण होत राहणं, याच दिशेने लेखकाने सखोल चिंतनात्मक विचार मांडले आहेत. नेतृत्त्व कसे भरकटले आहे. केवळ सवलती मिळवण्यापेक्षा स्वतःचा उत्कर्ष समतेच्या पातळीवरुन कसा करुन घेतला पाहिजे, या दिशेने लेखकाने विचार मांडले आहेत.

पुस्तक वाचण्याबद्दलची तुमची भूमिका लक्षात आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाचे लेखक संजय सोनवणी हे ही जालावर लिखाण करतात. त्यांनी इथे येऊन विसुनाना आणि जंतू यांच्या आक्षेप, शंकांचे निवारण केल्यास बर्‍याच प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या पुस्तकाचे एकूण कवित्त्व पाहता काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. अज्ञानातून आलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळं विचारतो आहे.
१. ऋग्वेदाची भाषा कोणती, त्या भाषेचा संजय सोनवणी यांचा अभ्यास आहे का? ऋग्वेदाचा त्यांनी केलेला अभ्यास त्या मूळच्या भाषेतून आहे की अन्य कोणत्या? अन्य भाषेतून असेल तर ते लेखन कोणाचे आणि त्यातील संस्कृत शब्दांचा अर्थ - अन्वयार्थ लावण्यामागची भाषाशास्त्रीय तसेच सांस्कृतीक भूमिका कोणती होती?
२. १०९ पाने या संख्येला मी महत्त्व देत नाही. पण, ग्रंथ म्हणण्याइतका या पुस्तकाचा आवाका ठरवण्यासाठी पानांच्या संख्येत हे पुस्तक बसत नाही, पानांची संख्या दुय्यम ठरवली तर आशयाने भरपाई केली असली पाहिजे आणि त्यासाठी विविध संशोधनांचे संकलन करून केलेली टिप्पणी यापलीकडे पुस्तकातील मजकूर जातो का?
(स्पष्टीकरण: परिचयकर्त्याने (इथं सागर म्हणतात परिचय, संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर या लेखाचा समीक्षण असा उल्लेख पाहिला काल) त्यात पडण्याची गरज नाही, कारण ती परिचय या स्वरूपाचीच मर्यादा आहे. सागर यांनी परिचय, माझ्या मते, बरोबर दिला. पण त्यापुढे सुरू झालेले कवित्त्व पाहता आशयाची संतुलीत मीमांसा होणे गरजेचे आहे. चिंतातूर जंतू आणि विसुनानांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची उत्तरे पुस्तक वाचून त्यांनीच मिळवावी, असे म्हणायचे असेल तर ते परिचयातून अभिप्रेतच आहे. त्यापुढे दरवेळी 'पुस्तक वाचलेच पाहिजे' असा धोषा नको.)
३. या पुस्तकात संदर्भसूची आहे का? तळटीपा आहेत का? संदर्भग्रंथांची यादी आहे का?
(स्पष्टीकरण: हे प्रश्न मी संशोधनपद्धती (अन्वीक्षा आणि अन्वेषण अशा दोन्हीचा समावेश) ध्यानी घेऊन विचारतो आहे. ग्रंथ म्हटलं तर, इथं आकार नसल्यानं आशयासंदर्भात, असे प्रश्न माझ्यासारखा विचारणारच.)
या प्रश्नांची उत्तरे आल्यानंतर काही इतर प्रश्न येऊ शकतात. कदाचित, या प्रश्नांची उत्तरे आल्यानंतर हा विषय माझ्यापुरता संपू शकतो. आधी असा विषय नव्हताच. पण एकूण कवित्त्व पाहता प्रश्न विचारणे आवश्यक ठरले आणि तो विषय झाला आहे.
"समोरच्या ग्लासात पाणी आहे. 'ग्लास अर्धा भरला आहे', असे एकाने म्हणावे. 'ग्लास अर्धा रिकामा आहे', असे दुसऱ्याने म्हणावे" इतका हा सरळ विषय नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पुस्तक गांभिर्याने वाचण्यासाठी त्यातील लिखाण 'मूलगामी संशोधन' अशा स्वरूपाचे असणे गरजेचे आहे. (उदा. धर्मानंद कोसंबींचे बुद्ध चरित्र)
या विषयावर पूर्वीच संशोधन करून गेलेल्या वेगवेगळ्या लेखकांनी या विषयावर जी साधक मते मांडलेली आहेत त्यांचीच पुन्हा फेररचना करून लेखकाने आपला निष्कर्ष पुष्ट केलेला असेल तर या संशोधनाचे स्थान दुय्यम ठरेल.
हे लिहिण्याचे कारण की तसा हा विषय सोपा नाही. भारताच्या आदिम समाजरचनेचे अनेक पैलू आहेत. ते इतके की अनेक मोठमोठ्या विद्वानांची त्याबद्दलची परस्परविरोधी मते वाचून गोंधळायला होते. (आणि ते समाजजीवन खरे कसे होते? हे जाणून घेण्यासाठी आपण त्या त्या काळात अस्तित्त्वात नव्हतो / टाईम मशीन अजून तरी बनलेले नाही याचा खेद होतो. ;))
अगदी ऋग्वेदापासून (- ऋग्वेदातही तीन ते दहा (?) ही मंडलेच मूळ आहेत आणि नंतरची प्रक्षिप्त आहेत, ऋग्वेदातल्या सूक्तांचा अर्थ सायनाचार्यांनाही नीट लागलेला नाही इथेपासून -) या गोंधळाला सुरुवात होते.
त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर मूळ पाठ, त्यावरची पूर्वीच्या संशोधकांची मते आणि त्यावर प्रथम मंडन- नंतर खंडन ही शंकराचार्यांची शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबून आपला विचार कसा योग्य आहे ते संशोधकाने सांगावे (संदर्भासह सोदाहरण स्पष्टीकरण) अशी कोणत्याही सुजाण वाचकाची रास्त अपेक्षा असावी.

प्रस्तुत परीक्षण/समिक्षणात वाचकाची ही अपेक्षा पूर्ण झाली असल्याचे स्पष्ट होत नाही हेच श्री. मोडक यांच्या वरील प्रतिसादात दिसून येते. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास हे मूलगामी संशोधन आहे किंवा कसे ते ठरवून त्याप्रमाणे निर्णय घेता येईल.

न पेक्षा 'हेही एक मत' म्हणून या पुस्तकाचे वाचन करावेच लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रामो,

तुझ्या प्रश्नांना उत्तरे देईन असे म्हणालो होतो.
वर प्रत्यक्ष लेखकानेच तुझ्या प्रश्नांबद्दल मते मांडली आहेत, त्याचा आशय तू लक्षात घ्यावास ही विनंती.

तरी तुला अपेक्षित शब्दांत उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.

१. ऋग्वेदाची भाषा कोणती, त्या भाषेचा संजय सोनवणी यांचा अभ्यास आहे का?
संजय सोनवणी यांचा ऋग्वेदाचा सखोल अभ्यास आहे व त्यावर आधारित असे पुरावेच त्यांनी 'महार कोण होते?' या संशोधनात दिले आहेत. (ऋग्वेदाची भाषा कोणती हा प्रश्न प्रस्तुत विषयाला धरुन नाहिये असे मला वाटते. कारण ॠग्वेदात काय विचार मांडले गेले आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहे. ऋग्वेद कोणत्या भाषेत लिहिला गेला हा मुद्दा अतिशय गौण आहे. तरी उत्तर हवे असल्यास तो विषय माझ्या आवाक्यातला नाही, क्षमस्व.

२. ग्रंथ म्हणण्याइतका या पुस्तकाचा आवाका ठरवण्यासाठी पानांच्या संख्येत हे पुस्तक बसत नाही, पानांची संख्या दुय्यम ठरवली तर आशयाने भरपाई केली असली पाहिजे आणि त्यासाठी विविध संशोधनांचे संकलन करून केलेली टिप्पणी यापलीकडे पुस्तकातील मजकूर जातो का?

सुरुवातीलाच परिचयात "अवघ्या १०९ पानांच्या या पुस्तकात लेखकाच्या भूमिकेबरोबर एकूण आठ प्रकरणे आहेत. मूर्ती लहान पण आवाका मात्र प्रचंड असे सामर्थ्य या पुस्तकात आहे." असे स्पष्टच म्हटलेले आहे. पुस्तकात इतरांची मते विचारात घेऊन लेखकाने त्यांचे विचार स्वतंत्रपणे मांडले आहेत. हे विचार या आधी कोणी मांडलेले नाहीत. म्हणूनच तुझ्या प्रश्नाचे उत्तर - "टिप्पणी यापलीकडे पुस्तकातील मजकूर जातो का?" तर हो असे देता येईल.

३.या पुस्तकात संदर्भसूची आहे का? तळटीपा आहेत का? संदर्भग्रंथांची यादी आहे का?

होय संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे. लेखकाने प्रत्येक मत मांडताना जे ते संदर्भ त्या त्या ठिकाणीच दिलेले आहेत जेणेकरुन वाचकाला शेवटी जाऊन संदर्भग्रंथाची यादी तपासावी लागू नये व क्रमांक टाकून तळटीपा जोडाव्या लागू नयेत. उदाहरणार्थ झरथृष्टचा काळ इसवी सन पूर्व ६व्या शतकातला असून किमान इसवी सन पूर्व १५०० चा काळ मान्य असलेल्या ऋग्वेदात त्याचे नाव कसे येते? अशा अनेक उदाहरणांमुळे या संशोधन ग्रंथाची मांडणी अगदी साधी सरळ व सर्वांना कळावी अशी झालेली आहे. अ‍ॅकेडॅमिक नाही. तरी सुद्धा संदर्भग्रंथांची यादी शेवटी दिलेली आहेच.

अवांतर : चिंतातूर जंतू आणि विसुनानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे वेगळ्या लेखाद्वारे लवकरच देईन

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(ऋग्वेदाची भाषा कोणती हा प्रश्न प्रस्तुत विषयाला धरुन नाहिये असे मला वाटते. कारण ॠग्वेदात काय विचार मांडले गेले आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहे. ऋग्वेद कोणत्या भाषेत लिहिला गेला हा मुद्दा अतिशय गौण आहे. तरी उत्तर हवे असल्यास तो विषय माझ्या आवाक्यातला नाही, क्षमस्व.

धन्यवाद. ऋग्वेदाची भाषा गौण असे म्हणतो तेव्हा माझे "ऋग्वेदाचा त्यांनी केलेला अभ्यास त्या मूळच्या भाषेतून आहे की अन्य कोणत्या? अन्य भाषेतून असेल तर ते लेखन कोणाचे आणि त्यातील संस्कृत शब्दांचा अर्थ - अन्वयार्थ लावण्यामागची भाषाशास्त्रीय तसेच सांस्कृतीक भूमिका कोणती होती?" हे प्रश्न निकालात निघाले आहेत. मात्र, भाषा गौण असे म्हणून सोनवणी यांच्या "पण इतिहास हा फक्त उच्चवर्णीयांचाच असतो वा इतिहास लिहिण्याचा त्यांचाच अधिकार आहे, इतरांनी वेद वाचलेलाच असु शकत नाही वा त्यांना संस्क्रुत येणे शक्यच नाही अशा स्वरुपाची गुर्मी मोडक यांच्या प्रश्नांतुन ठळकपणे जाणवते" या आरोपाला परस्पर उत्तर दिल्याबद्दल आभार.

सुरुवातीलाच परिचयात "अवघ्या १०९ पानांच्या या पुस्तकात लेखकाच्या भूमिकेबरोबर एकूण आठ प्रकरणे आहेत. मूर्ती लहान पण आवाका मात्र प्रचंड असे सामर्थ्य या पुस्तकात आहे." असे स्पष्टच म्हटलेले आहे. पुस्तकात इतरांची मते विचारात घेऊन लेखकाने त्यांचे विचार स्वतंत्रपणे मांडले आहेत. हे विचार या आधी कोणी मांडलेले नाहीत. म्हणूनच तुझ्या प्रश्नाचे उत्तर - "टिप्पणी यापलीकडे पुस्तकातील मजकूर जातो का?" तर हो असे देता येईल.

भाषेचा प्रश्न निकालात निघाल्याने ही माहिती निव्वळ माहिती ठरते. त्यापलीकडे त्याला महत्त्व रहात नाही. पुस्तक वाचायचे किंवा कसे याचा निर्णय घेण्यास मला काहीही साह्यभूत झालेले नाही.

होय संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे... अ‍ॅकेडॅमिक नाही. तरी सुद्धा संदर्भग्रंथांची यादी शेवटी दिलेली आहेच.

धन्यवाद.
माझे प्रश्न संपले.
हे पुस्तक वाचण्याऐवजी मी तूर्त तरी आंबेडकर प्रमाण मानेन. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषा गौण असे म्हणून सोनवणी यांच्या "पण इतिहास हा फक्त उच्चवर्णीयांचाच असतो वा इतिहास लिहिण्याचा त्यांचाच अधिकार आहे, इतरांनी वेद वाचलेलाच असु शकत नाही वा त्यांना संस्क्रुत येणे शक्यच नाही अशा स्वरुपाची गुर्मी मोडक यांच्या प्रश्नांतुन ठळकपणे जाणवते" या आरोपाला परस्पर उत्तर दिल्याबद्दल आभार.

असले बादरायण संबंध जोडून अर्थाचे अनर्थ तू करु नयेस ही विनंती. अशी शब्दभ्रमंती तुला करायची असेल तर खुशाल कर, पण त्याला काहीही अर्थ नाहीये. तुला सोनवणींनी (तुझ्यामते केलेल्या आरोपाला) उतर देता येत नसेल तर असले शब्दच्छल करु नयेस

भाषेचा प्रश्न निकालात निघाल्याने ही माहिती निव्वळ माहिती ठरते.

ऋग्वेदाची भाषा कोणती? हा प्रश्न निकाली कसा निघाला? आणि त्यावरुन हे संशोधन न ठरता ही निव्वळ माहिती कशी ठरते? (तेही पुस्तक न वाचता) हे समजून घ्यायला आवडेल.
अन्यथा पुन्हा एकदा हा बादरायण संबंध.

हे पुस्तक वाचण्याऐवजी मी तूर्त तरी आंबेडकर प्रमाण मानेन. .

याबद्दल सादर शुभेच्छा. वैचारिक चिंतन एका कोषातच करायचे असेल तर त्याला तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>संस्कृत भाषेऐवजी तत्कालीन प्रचलित असलेल्या प्राकृत भाषेच्या आधारे 'महारक्ख' (महारक्षक) चे 'महार' मधे रुपांतर कसे झाले त्याची चर्चा केली आहे.

ही माहिती रोचक आहे. अशा पद्धतीची इतर माहिती पुस्तक-परिचयात आली तर पुस्तकाविषयी काही मत बनवणं शक्य होईल.

>>>>लेखकाला अभिप्रेत अवनती नक्की कोणती,

>>ही अवनती केवळ आजची नसून महारांना अस्पृश्य म्हणून हिणवल्याच्या सर्व काळातील आहे. अगदी पेशवे काळात महाराची सावली एका ब्राह्मणाच्या अंगावर पडली म्हणून त्याचे मुंडके उडवले गेले या सत्य ऐतिहासिक घटनेचा दाखलाही ते देतात. (या घटनेचा ऐतिहासिक पुरावाही उपलब्ध आहे)

हे ठीकच आहे, पण हा सुपरिचित इतिहास झाला. सोनवणी यांच्या संशोधनामधून त्याविषयी काही नवीन हाती आलं असेल तर ते काय हे जाणून घ्यायला आवडेल.

>>उदा. चोखा मेळा या महान संतास विठ्ठल मंदीर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्पृश्य मानत नव्हते आणि अगदी ज्ञानेश्वरही, असे अस्पष्ट संकेत मिळतात.

हे तर्कशास्त्र काहीसं उलट आणि म्हणून अजब वाटतं. ज्ञानेश्वर किंवा नामदेव यांचं वर्तन त्या काळी अपवादात्मकच होतं. म्हणून तर त्यांना आज आपण संत म्हणतो आणि सर्वांना आपलं म्हणणारी वारकरी परंपरा नावाजतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नरहर कुरुंदकरांच्या आकलन या लेखसंग्रहाची आठवण येते. शुद्र कोण होते? या त्यांच्या लेखात बाबासाहेबांच्या हू वेअर द शुद्राज या ग्रंथाच्या आधारे केलेले विवेचन वाचनीय आहे. बाबासाहेबांच्या भिन्न मतांचा ते उल्लेख करतात. त्यांची मते विचारार्ह आहेत पण स्वीकारार्ह आहेत या विषयी ते साशंक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>

>

पुस्तक परिचयकर्त्याच्या या मताप्रमाणेच लेखकाचेही मत आहे का? जर तसे असेल तर असा अन्याय होऊ नये याकरिता पुस्तकाचे शीर्षक वेगळे असायला हवे होते. शीर्षकामुळे पुस्तकाकडे एका ठराविक दृष्टीकोनातून(च) पाहिले जाणार व त्यावरच पुस्तक वाचायचे की नाही याचा निर्णय होणार. गंथप्रदर्शनात कित्येक पुस्तकांची केवळ शीर्षके पाहूनच मी ती हाताळत देखील नाही. विकत घेऊन वाचणे ही तर फार पुढची बाब आहे.

सागर यांच्या या पुस्तक परिचयाचा एक फायदा असा की, पुस्तकाच्या शीर्षकामुळे त्यात काय मजकूर असू शकेल याचा जो काही अंदाज लावला होता त्यापेक्षा काहीसे अधिक असे त्यात असावे असे वाटते. आता निदान हे पुस्तक प्रदर्शनात दिसले तर चाळून तरी बघितले जाईल व त्यानंतर (कदाचित) विकत घेऊन वाचले देखील जाईल. हे परिचय लेखन वाचनात आले नसते तर मी सरळ सरळ या पुस्तकाला केवळ शीर्षकावरूनच टाळले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेतन, इतकं सरळ नसतं हे. आंबेडकरांची पुण्याई मोठी आहे राव. त्याचा तुमच्यावर प्रभाव पडत नसेल, म्हणून काही प्रभाव नसतोच असं थोडंच असतं, हे दिसतंच की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रभाव असावा. काही हरकत नाही. पण, काही शीर्षके वाचकांना (निदान मला तरी) अगदीच निरुत्साही करतात. उदाहरणार्थ, मी एका वाचनालयात समीक्षा विभागात एक पुस्तक पाहिले त्याचे शीर्षक होते - दलित जाणिवांच्या साहित्यामधील काळवंडलेली सूर्यप्रतिमा. या शीर्षकावरूनच पुस्तकाला टाळून पुढे गेलो. आपल्याला झेपेल तेच वाचायला हवे; नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

पुस्तक परिचयकर्त्याच्या या मताप्रमाणेच लेखकाचेही मत आहे का?

@चेतन
त्याबद्दल कधी लेखकाशी बोललो नाही. पण हे माझे मत आहे. पुस्तकांत वैदिक काळापासून अनेक प्रकारच्या जाती-वर्ण व्यवस्था अस्तित्तवात कशा आल्या आहेत, त्याचा विचार २-३ प्रकरणांतून यात केला आहे, म्हणून माझे तसे मत झाले आहे. पुढील प्रकरणांतून लेखकाने पुस्तकाच्या विषयाच्याच अनुषंगाने लिहिले आहे. तरी तपशील वगळला तर थोड्याफार फरकाने या पुस्तकातील विचार सर्व जातींना लागू व्हाव्यात.

@सर्व वाचक मित्रांनो,
या धाग्यावर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत, मला थोडा वेळ द्या. चिंतातुर जंतु यांनी मला व्यनीतून या पुस्तकाबद्दल निर्माण झालेले प्रश्न कशा पद्धतीने मांडले पाहिजेत याचे सुरेख मार्गदर्शन केले आहे.
त्या अनुषंगाने मी लवकरच लिहीन, तूर्तास थोडी वाट पहावी ही विनंती.

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्यावर प्रतिक्रिया देणा-या सर्व सदस्यांचे नितांत आभार. सागर यांनी माझ्या पुस्तकाचा परिचय करुन दिला आहे. त्यावरील एकुणातील प्रतिक्रिया वाचल्या असता ब-याच प्रतिक्रिया या आपापले विचार मांडण्यापेक्षा पुस्तकात हे आहे का..ते आहे का, तळटीपा आहेत काय, संदर्भ साधनांची यादी आहे काय, ऋग्वेद कोणत्या भाषेत लेखकाने वाचला इइइइइ वगैरे स्वरुपाच्या आहेत. त्यात खरी जिज्ञासा दिसुन येत नाही, असती तर या प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला असता. परिचयकर्ते अथवा समिक्षकांचे एकाच पुस्तकाबाबतचे आकलन अनेकदा टोकाचे भिन्न असते, वाचकांनाही हीच बाब लागु पडते. आपल्याला आवडलेले पुस्तक आपल्या मित्रांनीही वाचावे अशी शिफारस आपण सर्वच करत असतो आणि प्रतिसादकर्त्यांपैकी अनेक सागर यांचे मित्र आहेत हेही दिसते. या शिफारशीमागे "कवित्व" ज्यांना दिसते त्यांचे नवल वाटते. कोणतेही पुस्तक कोणीही कोणालाही बळजबरीने वाचायला लावु शकत नाही. ते शक्यही नाही. परंतु काहींनी सागर यांच्यावर ज्या पद्धतीने प्रश्नांची सरबत्ती केलेली दिसते त्यातुन हे प्रश्न निखळ कुतुहलातुन अथवा जिज्ञासेतुन आलेले नाहीत हेही जाणवते. सागर यांचा पुस्तक परिचय हे त्यांचे पुस्तकाबाबतचे व्यक्तिगत आकलन आहे. या पुस्तकावर अनेकांनी लिहिले आहे व प्रत्येकाचे म्हणने वेगळे आहे आणि ते स्वाभाविकही आहे.

येथे मी एक बाब मुद्दाम स्पष्ट करु इच्छितो. या पुस्तकावर नवबौद्ध महार समाजाने बंदी घातलेली आहे. एकही विक्रेता हे पुस्तक विक्रीसाठी (आंबेडकरी)ठेवत नाही. या पुस्तकासंदर्भातील दोन कार्यक्रम उधळण्याचे प्रयत्न झालेले आहेत. याचे कारण म्हणजे, आंबेडकरांनी जी मांडणी केली त्याविरुद्ध माझी मांडणी जाते आणि बाबासाहेबांने जे सांगितले तेच अंतिक अशी त्यांचीही श्रद्धा (?) आहे. मी ब्रोकन म्यन वा पुर्वी महार बौद्धच होते म्हणुन अस्प्रुष्य झाले वगैरे पुर्णतया अमान्य केलेले आहे. आणि ते इतरांना मान्य नाही. दुसरे कारण असे कि मी त्यांच्या समाजाचा नाही, त्यामुळे हा कोण लागुन गेलाय आमचा इतिहास सांगणारा? ही विखारी प्रव्रुत्ती जशी उच्चवर्णीयांत आहे तशीच त्यांच्यातही आहे. श्री. अशोक पाटील यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत त्याबाबत साधार लिहिले आहे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.

पण इतिहास हा फक्त उच्चवर्णीयांचाच असतो वा इतिहास लिहिण्याचा त्यांचाच अधिकार आहे, इतरांनी वेद वाचलेलाच असु शकत नाही वा त्यांना संस्क्रुत येणे शक्यच नाही अशा स्वरुपाची गुर्मी मोडक यांच्या प्रश्नांतुन ठळकपणे जाणवते आणि असेच लोक नकळत जातीय तेढ वाढवायला हातभार लावत असतात. प्रत्येक जातीसमुहाचा आपापला इतिहास आहे आणि तो पुरोहितांपेक्षाही पुरातन आहे. ऋग्वेदातील पुरुषसुक्त हेच मुळात नुसते प्रक्षिप्त नव्हे तर त्यातील विशिष्ट दोन ऋचा कशा पुरुषसुक्ताशीही विसंगत आहेत हे मी दाखवुन दिले आहे. पण तो विषय नाही. प्रश्न या मंडळीच्या प्रव्रुत्तींचा आहे. या प्रव्रुत्ती सर्वच जातीघटकांत कमी होण्याऐवजी वाढत जाव्यात ही शरमेची बाब आहे. तरीही आम्ही बदललो किंवा आम्ही बहुजनवादी, माझे मित्र सर्वच जातींतील आहेत वगैरे भुलथापा देण्याचे कार्य अविरत चालुच असते. विशिष्ट मर्यादेबाहेर हे जातीय लोक कधीही कोणा अन्य जातीसमुहाचे मित्र नसतात. अपवाद आहेत, होते, पण अर्थातच ते लोकोत्तर लोक होते.

कोणाहीबद्दल कसलीही माहिती नसतांना, त्याच्या लेखनाचे स्वतःच्या चष्म्यातुन वाचन केलेले नसतांना, दुगाण्या झाडल्याप्रमाणे जी प्रश्नांची राळ उठवली गेलेली आहे ती या सर्व मनोव्रुत्तीचे एकुणातील रुप आहे. सागर हे माझे मित्र आहेत. संदर्भ शोधनात अधिक वेळ जावु नये म्हणुन मी त्यांची आवर्जुन व हक्काने मदत घेत असतो. असे माझे अनेक मित्र आहेत. मी त्यांचा ऋणी होतो व आहे. किंबहुना सर्वच पुर्वसुरींनी आपापल्या परिप्रेक्षात त्यात्या वेळी उपलब्ध पुराव्यांच्या प्रकाशात जे महनीय कार्य करुन ठेवले आहे त्यांचे ऋणही अर्थातच असते. "भाष्यकारांते वाट पुसतु" हा ज्ञानेश्वरांचा मार्ग असतो आणि तोच खरा मार्ग असतो. परंतु आपापल्या पुर्वग्रहांनीच प्रत्येक बाबींकडे पहायचे ठरवले तर त्याचा हा असा धागा होतो.

उदा. सागर यांनी परिचय करुन दिला आहे. तो वचुन आपापले बरे वाईट मत बनवत मुळ पुस्तकाकडे जायचे कि नाही हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु परिचयकर्त्यालाच पुस्तकासंदर्भातील त्यात नेमके काय आहे का आहे वगैरे स्वरुपाचे प्रश्न विचारले गेले तर परिचयकर्ता काय सारे पुस्तकच येथे देईल? तो ते तसे कोणत्याही कायद्याप्रमाणे करु शकतो काय? येथील प्रतिसादकर्त्यांना ही साधी बाब माहित नाही काय? कि वेड घेवून पेडगांवला जायचे आहे? माफ करा मी स्पष्ट बोलतो. प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण प्रश्नांची योग्यता तपासुन उत्तर द्यायचे कि नाही हे ठरवायचाही दुस-याला अधिकार असतो हे समजायला नको? "उत्तरे मिळाली नाहीत..." वगैरे घोषा सागर यांच्यामागे लावणा-या मोडकांना हे समजु नये याचे नवल वाटते. ख-या जिज्ञासेतुन येणा-या प्रश्नांना उत्तरे देण्यात एक वेगळा आनंद असतो. पण ते तसे नाही ही दुर्दैवाची बाब आहे...माझ्या नव्हे, अशा व्यक्तिंच्या. पण केवळ दुस-यांच्या पात्रता निरर्थक प्रश्न विचारत काढणा-याची पात्रता काढली तर मग" मग मात्र तो व्यक्तिद्वेष असतो..हा अजब न्याय आहे बुवा. बरे यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली कि लगेच हे पलायनच करतात हे अजुन एक विशेष!

असो. चालु द्यात. माझ्या आपणास शुभेच्छा आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरेच कष्ट घेतलेत. त्यातून मी वर विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यामुळं हे कष्ट वाया जातात. त्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर माझ्या ज्ञानात भर पडेल (मी वर म्हटले आहे की हे प्रश्न अज्ञानातून आले आहेत). त्या आधारे पलायन न करता सत्याचा स्वीकार करणे सोपे पडेल.

पण इतिहास हा फक्त उच्चवर्णीयांचाच असतो वा इतिहास लिहिण्याचा त्यांचाच अधिकार आहे, इतरांनी वेद वाचलेलाच असु शकत नाही वा त्यांना संस्क्रुत येणे शक्यच नाही अशा स्वरुपाची गुर्मी मोडक यांच्या प्रश्नांतुन ठळकपणे जाणवते आणि असेच लोक नकळत जातीय तेढ वाढवायला हातभार लावत असतात.

तुम्हाला काय जाणवले हा तुमचा प्रश्न आहे. इतिहास उच्चवर्णियांचाच असतो असला भंपक दावा मी करत नाही. कारण इतिहास हा समाजाचा (त्यात सारेच येतात, साऱ्यांचाच समाज घडण्यात सहभाग असतो). इतिहासाचे लेखन जेत्यांकडूनच अधिक होते हे खरे आहे, आणि म्हणूनच त्याकडे नीट, सर्वांग दृष्टीने पाहिलेच पाहिजे. इतिहासाची मांडणी तशा दृष्टिकोनातून केली गेली पाहिजे, आणि ती तावून सुलाखून निघाली पाहिजे या भूमिकेतून मात्र मी प्रश्न करत राहणार.
इतरांनी वेद वाचलेला असूच शकत नाही असा माझा ग्रह असावा हे तुमचे मत. त्याचा आदर. पण हे मत माझ्या लेखी निकाली निघते. मला ओळखणारेही ते निकालात काढतील हे नक्की.
(बडोद्याच्या एका संस्कृत शिक्षकाकडे शिकलेले एक विचारवंत मला माहिती आहेत. तो माणूस दीपस्तंभ आहे, हे मी नेहमीच सांगत असतो. आपण उच्चवर्णीय नसूनही संस्कृत कसे शिकलो हे त्यानं लिहून ठेवलं आहे. म्हणूनच मला ते कळलं आणि त्याने त्या माणसाविषयीच्या आदरात खंडीभर भर पडली.)

उदा. सागर यांनी परिचय करुन दिला आहे. तो वचुन आपापले बरे वाईट मत बनवत मुळ पुस्तकाकडे जायचे कि नाही हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु परिचयकर्त्यालाच पुस्तकासंदर्भातील त्यात नेमके काय आहे का आहे वगैरे स्वरुपाचे प्रश्न विचारले गेले तर परिचयकर्ता काय सारे पुस्तकच येथे देईल?

माझ्या प्रश्नांच्या संदर्भात हे जरा भारीच आहे. पुस्तक येथे देणे अपेक्षीत नाहीच, गरजेचेही नाही. संभाव्य, उदाहरणार्थ, सरळ उत्तरे अशी आहेत -
१. ऋग्वेदाची भाषा संस्कृत. संजय सोनवणी यांचा संस्कृतचा अभ्यास आहे. (किंवा) संजय सोनवणी यांनी अमूक व्यक्तीने ऋग्वेदाचा इंग्रजीत केलेला अनुवाद अभ्यासार्थ घेतला आहे. त्यात संस्कृतचा अन्वयार्थ लावण्यासाठी देशी (सबआल्टर्न) इतिहासाची चौकट, समाजशास्त्रीय दृष्टिकोन (वगैरे) मानला गेला आहे.
२. हे पुस्तक म्हणजे केवळ संकलन आहे, किंवा नाही.
(परिचय आणि समीक्षा यासंदर्भात अधिक बोलत नाही. सागर वारंवार या पुस्तकाला ग्रंथ म्हणतोय आणि तुम्ही या प्रदीर्घ प्रतिसादात केवळ पुस्तक म्हटले आहे हे पुरेसे आहे).
३. या पुस्तकात संदर्भसूची आहे, किंवा नाही. तळटीपा आहेत, किंवा नाही. संदर्भग्रंथांची यादी आहे, किंवा नाही.

ज्ञानावर कोणत्याच जातीची* मक्तेदारी नाही. ज्ञान खुले आहे, खुलेच असले पाहिजे.
*मी जात मानत नाही. त्यावर "आज जात मानत नाही, हे म्हणणे तुमच्या सोयीचेच आहे" हे ऐकले आहेच. आणि ते म्हणणारे माझे सुहृदच आहेत. त्यांच्या जाती मला पहाव्या लागत नाहीत. त्यामुळं कोणत्या जातीत माझे मित्र आहेत वा नाहीत हे सांगावे लागत नाही. (हे तुमच्या माहितीसाठी लिहिले आहे. गैरसमज असेल तर तो दूर करून घ्या. एरवी, असले पूर्वग्रह उपयोगाचे नसतात चर्चेसाठी, हे तुम्हालाही माहिती आहेच.)
तर, अॅड होमिनेम खूप झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गावगाड्यात मांगा-म्हारांना ढोरासारखं वागवायचे.
म्हणून आम्हाला तेंच्याशी जवळीक वाटते.
म्हणून हे वाचायला आलो. पण हाताला काय लागलं?
घंटा.

आपले इगो गोंजारत माणसं बसली की आपण जाम बोर होतो.
संतसूर्य दादाजी कोंडके म्हणून गेलेच आहेत.
मान्सापरास मेंढरं बरी. सांगून गेली द्न्यानेसरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

मित्रा, मी आपल्याशी पुर्ण सहमत आहे. खराय्...मानसापरिस मेंढरं बरी. पण चिंता नाही. असे प्रतिरोधाचे अकाराणचे डोंगर जेवढे वाढतात तेंव्हा तेवढीच ती उद्ध्वस्त करणारी वादळेही उठतात. मी येथील विद्वानांना विचारी असतील असे समजलो...चुक आहे...पण हरकत नाही. वेळ लागेल कदाचित्..हे खरे जिज्ञासु असते तर यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यात आनंद वाटला असता. पण यांच्या जातीय अहंकारांचा जो काही भ्रामक पर्वत यांनी उभारलाय... खरे आहे. पण म्हणुन निराश व्हायचे कारण नाही. हाती आज घंता लागला असेल्...पण हाच घंटानाद यांना एक दिवस नक्कीच जागे करेल्...बघुयात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे काही लोकांचा मोठा घोळ झालेला आहे. काही लोकांना शूद्र आणि अस्पृश्य हे शब्द समानार्थी आहेत असे वाटत आहे, मात्र ते सर्वार्थाने चुकीचे आहे. शूद्र हे चार वर्णा मधील सर्वात शेवटचा वर्ण तर अस्पृश्य हे वर्णा बाहेरचे लोक, हे लक्षात ठेवून प्रतिक्रिया द्याव्यात. डॉ. आंबेडकरांची दोन वेगवेगळी पुस्तके उपलब्ध आहेत १. शूद्र पूर्वी कोण होते? आणि २. अस्पृश्य पूर्वी कोण होते आणि ते अस्पृश्य कसे बनले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचा आणि विचार करा!