डाएट-भाग-१ -Intermittent Fasting

मित्रांनो

डाएट या विषयावर सखोल चर्चा करण्याची इच्छा आहे. डाएट हा एक अत्यंत व्यापक विषय आहे वाढलेले वजन घटवण्यासाठी ची विशिष्ट आहारप्रणाली म्हणजे डाएट असा जो दृष्टीकोण आहे तो माझ्या मते फारच तोकडा असा आहे. सुदैवाने मला जरी वजन ही समस्या कधी आली नाही तरी अनेकांच्या आयुष्यात वाढलेले वजन हा मोठा गंभीर प्रश्न आहे याची जाणीव आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करणे हा मुद्दा केंद्रात असल्यास ( व तो एक स्वतंत्र मुद्दाही अर्थातच फार महत्वाचाही असल्याने ) लोक डाएट साठी प्रेरीत होतात म्हणून आपणही तोच मुद्द्दा केंद्रीत ठेवुया मात्र त्या अनुषंगाने एकुण डाएट वर चर्चा होइल अशी अपेक्षा आहे. तर मला असे वाटते की एका एका भागात आपण एक पॉप्युलर डाएट घेऊन त्याची चिकित्सा केली तर नवे नवे पैलु समोर येतील. मी एक कच्चा खर्डा यासाठी Intermittent Fasting हा विषय घेऊन बनवला मात्र तो फारच विस्कळीत दिर्घ झाल्याने मलाच "पचला" नाही म्हणुन त्याएवजी मी विचार केला की फक्त विषय समोर ठेवतो व जसजसे प्रतिसाद येतील तशी एकेका मुद्द्यावर चर्चा करु या म्हणजे सर्वांनाच नवे पैलु उलगडतील व मजाही येइल.
तर बेसीक ओपनींग देण्याचा प्रयत्न करतो. सध्या Intermittent Fasting महाराष्ट्रात डॉ. दिक्षीत डाएट या नावाने लोकप्रिय आहे. Fasting चे मुळ तसे फार जुने वा प्राचीन असे आहे. डॉक्टर दिक्षीत यांच्या अगोदर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी महाराष्ट्रात सर्व प्रथम याची ओळख व प्रचार केलेला होता. त्यांच्या अकाली निधनाने मध्ये काही काळाची गॅप पडली नंतर डॉ, दिक्षीत यांनी त्यांचा विचार पुढे अधिक प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचवला. तर यामध्ये डॉ. दिक्षीत Intermittent Fasting च्या अनेक पॅटर्न पैकी केवळ एक ( याचे इतर व्हर्जन्स आपल्याकडे अजिबात चर्चेत नसतात असा अनुभव आहे किंबुहना हे एक व्हर्जन म्हणजेच सर्व काही असाही समज आहे ) १६/८ व्हर्जन वापरताअधिक यामध्येही डॉ. दिक्षीत १६/८ असा स्पेसीफिक आग्रह धरत नाहीत किंवा ही टाइम फ्रेम इनसीस्ट करत नाहीत. ते दोन जेवणाच्या सर्वसाधारण जेव्हा अधिक भुक लागते त्या ठरवुन घेण्यास सांगतात त्यामध्ये म्हणजे दिवसातुन दोन वेळेसच फक्त जेवण करावे त्यानंतर इतर वेळेत पुर्ण उपाशी रहावे असे सांगितले जाते. इतर मधल्या वेळात भुक लागल्यास डॉ. दिक्षीत काही ठराविक खाण्यासाठी परवानगी देतात. त्यात प्रामुख्याने साखरविरहीत ब्लॅक टी / ब्लॅक कॉफी , ताक , नारळपाणी एक टोमॅटो आणी अर्थातच पाणी दिवसभर. यामागचा तर्क असा आहे की या गोष्टींनी शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढत नाही म्हणुन या गोष्टी घेण्याची परवानगी आहे. संपुर्ण डाएट चा पाया शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात ठेवणे हा आहे. त्याचबरोबर ग्लुकॉगॉन या हार्मोन ला सक्रीय करण्यास वाव देऊन त्याद्वारे अनावश्यक मेदाचे फॅट चे ज्वलन करणे. व इतर बरेच असे आहे. शरीरात इन्सुलीन ची वाढलेली अनावश्यक पातळी व त्यामुळे निर्माण झालेला इन्सुलिन रेसीस्टन्स हा लट्ठपणासहीत अनेक रोगांचे मुळ आहे. यात एक निरिक्षण असे आहे की डॉ.दिक्षीत हे मुळ Intermittent Fasting चे " अतीसुलभीकरण" करतात त्यामानाने डॉ. श्रीकांत जिचकार हे अतीशय व्यवस्थित शास्त्रशुद्ध व्यापक मांडणी करत होते असे त्यांचे व डॉ. दिक्षीतांचे युट्युब वरील सर्व व्हिडीओ बघितल्यानंतरचे माझे मत आहे. जिचकारांचा प्लॅन व्यापक असा होता. दुसरी एक बाब डॉ. दिक्षीतांच्या अगोदरच सुलभ डाएट चे लोक त्याहुन अधिक सुलभीकरण करत त्यांच्या एकुण हेतुला व एकुण Intermittent Fasting च्या थेअरीची पार वाट लावुन काही भलतेच अंमलात आणतात. आश्चर्य म्हणजे कोणी Intermittent Fasting हा शब्च च वापरत नाहीत. स्वतः डॉ. दिक्षीत यांच्या तोंडुन हा शब्द ऐक्ल्याचे स्मरत नाही. म्हणजे जर डॉ. दिक्षीत यांची प्रणाली ( जी मुळात त्यांची नाही हे ते स्वतः ही मान्य करतात ) समजुन घ्यावयाची असेल तर मुळात हा विषय Intemittent Fasting या नावाने प्रचलित आहे हे समजुन घ्यायला हवे. बरेच मंडळींना माहीत असेलही पण इतर बरेच दिक्षीत डाएट म्हणून ओळखतात म्हणून हे सांगावेसे वाटते . म्हणजे या दिशेने जालावर शोधल्यास सखोल जाता येइल यासाठी हे म्हणतोय.

तर मित्रांनो तुमचे काय म्हणणे आहे तुमचा काय अनुभव आहे ?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाकी काहीही बंधने पाळली नव्हती.
(१) ऱोज एक पाकीट जे वेफर्सचे जायचे किंवा कुकी पोटात जाइ ती बंद केली.
(२) संध्याकाळी ६ ते सकाळी ८ अन्न घेणे बंद. = इन्टरमिटंट डायेट.
खूप फरक दिसून आला. वजन १० पौंड कमी झाले होते.
___________
एका आड एक दिवस १ तास स्टेशनरी बाइक होते आहे. नवरा खनपटीला बसून करुन घेतोच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

My wife and I are following the Dixit Diet since last December. We are both retired. It has given us the discipline of not eating biscuits, chivada etc. between the meals which has helped to reduce weight. We would advise all to follow it.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला शेवचिवडा खाण्याची सवय होती, ती सहा-एक वर्षांपूर्वीच मोडली आहे. गोड खायला आवडतं, पण ते आणलं नाही की खाल्लं जात नाही. गेले काही महिने खच्चून व्यायाम करूनही शेवटचे दोनेक किलो कमी होत नाहीयेत. त्यातून सध्या घरातच आहे तर स्वतःवर आणखी प्रयोग करणार आहे. त्याचा मुख्य भर असा -

साधे कार्बोहायड्रेट्स कमी किंवा नाहीच खायचे; त्याजागी फळं (गोड), भाज्या (अगोड), उकडलेली अंडी आणि सुकामेवा खायचा. व्यायाम होणार नाही त्या दिवशी लक्ष देऊन गरजेपुरतंच खायचं. त्यातून आकार कमी होतो का बघायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जीवनविद्या मिशन चे सदगुरु वामनराव पै (बी.ए.) हे आपल्या व्याख्यानात जीवनवीद्या काय म्हणते जीवनवीदया अमक म्हणते तमक म्हणते अशा रीतीने उल्लेख करत असत. आता इफा चा जनक मी नाही पण मी त्या स्टाइलने ती विचारसरणी काय म्हणते ते फक्त सांगतो.
तर इफा (इंटरमिटन्ट फास्टींग ) म्हणते की वजन कमी करण्यासाठी
१- दिवसभर चरण्यापेक्षा स्नॅकींग करण्यापेक्षा एक शिस्त आणुन ठराविक पॅटर्न मध्ये वेळ पाळुन खावे. यात सर्वात लोकप्रिय १६/८ हा आहे. म्हणजे ८ तासाच्या इटींग विंडो मध्ये समजा दुपारी १२ ते ८ किंवा १ ते ९ सोयीनुसार निश्चित केल्यावर त्यात दोनदाच व्य्वस्थित भोजन करावे ( डॉ,दिक्षीत हा पॅटर्न सांगतांना तासांचे महत्व बिंबवत नाहीत त्यामागील तर्कावरही भर देऊन समजवत नाहीत ) त्यांनंतर रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी १२ पर्यंत १६ तास होतात त्यात काहीही खाउ नये. ( याला अपवाद काही गोष्टी आहेत त्या मी वर लेखात दिलेल्या आहेत त्याची लिस्ट हा एक स्वतंत्र विषय आहे )
यामागील इफा चा तर्क काय आहे नेमका ?
तर एकदा काहीही खाल्यांनंतर ( अपवाद पदार्थ सोडुन ) शरीरात इन्सुलिन्चा स्त्राव पाझरण्यास सुरुवात होत असते. हे अगदी एक चॉकलेट एक पेढा खाल्यानेही होतो. तर जेव्हा आपण चरणं बंद करतो तेव्हा. सर्वसामान्यपणे इन्सुलिनची चढलेली पातळी पुन्हा बेसलाइन ला येण्यास किमान कालावधी ६ ते १२ तास लागतो. हे व्यक्तीगणिक प्रकृतीगणिक बदलते. तर इफानुसार तुमची इन्सुलीन पातळी बेसलाइन ला येण्यास जर कमाल १२ तास लागतात असे गृहीत धरले तर त्यानंतरच्या पुढील ४ तासांत तुमच्या शरीरात ग्लकॉगॉन हे हार्मोन सक्रीय होते व या काळात तुमच्या शरीराजवळ फॅट बर्निंग करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही ( प्रोटीन ही बर्न होते पण तुलनात्मकरीत्या कमी तो वेगळा भाग ) तर म्हणुन हा वेळेचा आग्रह इफा धरते.
२-इफा नुसार आता तुम्ही पहीली पायरी यशस्वी केली तर आणि तुम्हास वजन घटवण्याची प्रक्रीया अजुन तीव्र करायची असल्यास तुम्ही तुमचा व्यायाम हा फास्टींग विंडो मध्ये करावा त्याने तुमच्या फॅट बर्नींग ची गती अधिक तीव्र होते. म्हणजे दुपारी १२ ते ८ च्या मध्ये करण्याऐवजी उपाशी पोटी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता करावा. आता अजुन तीव्रता घटविण्याची हवी असेल तर त्यातही लवचिकता, किंवा कार्डियो एक्सरसाइजपेक्षा वेट ट्रेनींग वर अधिक भर द्यावा. ( अर्थात फास्टेड विंडो मध्ये व्यायाम करतांना डिहायड्रेट न होऊ देण्याची काळजी, जिम ते घराचे अंतर कितपत झेपतय हे सर्व बघुनच करावे )
३- वरील दोन झाल्यावरही अजुन तीव्रता हवी असल्यास १६/८ हा सर्वात जो बेसीक पॅटर्न आहे इफा चा त्यापुढच्या टप्याकडे सरकावे इतर ॲडव्हान्स्ड पॅटर्न मध्ये सुरुवात आठवड्यातुन एक दिवस २४ तास फास्ट किंवा ५/२ चा पॅटर्न किंवा इट स्टॉप इट चा पॅटर्न अवलंबु शकता.

आता कार्बोदकांमध्ये जहाल व मवाळ असे दोन गट आहेत. जहाल गटा मध्ये ज्यांचा नायक गॅरी टॉब ( गुड कॅलरीज बॅड कॅलरीज व व्हाय वुइ गेट फॅट व केस अग्नेसट शुगर वाला शोध पत्रकार लेखक ) व इतर मंडळी लो कार्ब ते नो कार्ब चा पुरस्कार करतात. यांच्या दुसऱ्या टोकाला कॉलीनसारखे काही कार्ब चा पुरस्कार करतात्. मात्र मला व्यक्तीगत मध्यममार्गी वॉल्टर विलेट यांचा मार्ग आवडतो ते आपल्या इट ड्रींक ॲन्ड वे लेस मध्ये कार्बोदका विषयी अशी भुमिका घेतात की संपुर्ण कार्बोदके टाळणे म्हणजे एक संपुर्ण मॅक्रोन्युट्रीएंट चा ग्रुपच् खाण्यातुन वगळणे सही नही है. तर ते त्याएवजी लो ग्लायसेमिक इंडेक्स लो ग्लाय्सेमिक लोड असलीली कार्बोदके घ्या, फायबर जास्त असलेले फुड निवडणे, व्होल व्हीट इ. चा वापर वाढवणे हे पर्याय देतात.
गोड हा मात्र मोठा घातक प्रकार आहे मात्र फळे गोड असली तर हरकत नाही त्यात किमान फायबर असतो. व इतरही चांगल असत, किमान् फ्रुट ज्युस पेक्षा नैसर्गिक फळ साली फायबर सकट खाणे केव्हाही उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी इतरत्रही ही शंका उपस्थित केली आहे.

सर्वसाधारण पणे मांसाहारी प्राणी वाघ, सिंह दिवसातून एकदा किंवा दोनदाच खातात असं दिसतं (सतत खात नाहीत हे नक्की)
उलटा शाकाहारी प्राणी ऑलमोस्ट दिवसभर सतत खात असतात असं दिसतं. माणूस हा मुख्यत्वे शाकाहारी असेल (मोठे पटाशीचे दात लहान सुळे, लांब आतडी, शिकारीस उपयुक्त नखांचा अभाव) तर दोनदाच जेवणे हे निसर्गाच्या विरुद्ध होणार नाही का?

शिवाय शाकाहारी प्राणी भरपूर चरबीचा साठा करतात असेही दिसते. ते सहसा फॅट असतात. गायी, म्हशी, हत्ती*, गेंडा पाणघोडा वगैरे.

*ऐसीवरील हत्ती श्री. सतीश रानडे हे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे माहिती नाही तसेच ते जाडे आहेत की बारीक हेही माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२००० साली एक व्यापक संशोधन करण्यात आले. ज्यात एकुण २२९ प्राचीन शिकारी आदिवासी जमाती ज्या आजही अस्तित्वात आहेत.आणि आधुनिक जगाशी अलिप्त राहुन स्वत:चे ओरिजीनल डाएट च घेत आहेत त्यांचा अभ्यास करण्यात आला. त्याचे ४ महत्वाचे निष्कर्ष असे होते
१- यांनी जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे शक्य झाले तेव्हा आपल्या आहारात केवळ मांसाहाराचाच अवलंब केलेला आढळला. यांच्या आहारातील ८५ % जवळपास कॅलरीज या मांसाहार व मासे इत्यादीतुनच मिळवलेल्या होत्या.
२- यांच्या डाएट मध्ये कार्ब्स चे प्रमाण नगण्य होते व फॅट आणि प्रोटीनचाच अधिकाधिक भरणा होता. हे त्याच रानटी प्राण्याची शिकार करण्यास प्राधान्य देत ज्याच्यात सर्वाधिक फॅट्सचा भरणा असे.
तसेच एका थेअरीनुसार मानव २५ लाख वर्षापासुन हंटर / गॅदरर म्हणुन जगुन राहीलेला आहे. व शेतीचा शोध हा केवळ १२ हजार वर्षापुर्वीचा आहे असे गृहीत धरले जाते. या जुन्या काळाला पॅलिओलिथीक एरा किंवा स्टोन एज म्हटले जाते. व या काळातील मानवाचा आहार जो होता तो आदर्श प्रमाण मानुन एक "पॅलिओ डाएट" विकसीत करण्यात आलेले आहे. त्यात जेनेटीकली मानव जात फारच कमी बदललेली आहे ( ह्युमन जिनोम ०.०२% इतकाच चाळीस हजार वर्षात बदललेला आहे वगैरे ) म्हणुन आपण त्यांचा जो आहार होता तो म्हणजे शुद्ध मांसाहार तोच खायला पाहीजे वगैरे येते. तर सांगण्याचा तात्पर्य आपण शाकाहारी कधीच नव्हतो. उलट हा स्टोन एज मानव ते आजपर्यंत आपण प्रामुख्याने मांसाहारीच आहोत.

आता दुसरा मुद्दा दोन वेळेस खाणे हे निसर्गाच्या विरोधात नाही. उलट दिवसभर चरत राहणे स्नॅकींग करणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. कारण पुन्हा तेच लाखो वर्षापासुन मानवाला भुकेचा अनुभव आहे. अलीकडची सुबत्ता असलेली शतके सोडल्यास मानवजातीला कधीही वाट्टेल तेव्हा वाट्टेल तितके अन्न उपलब्ध होत नसे. भुकेचा उपवासाचा अनुभव हा फार फार जुना आणि प्राचीन आहे. मानवी शरीर उपाशी राहण्यास सरावलेले आहे. त्यामुळे तुम्ही खाल्ले नाही तर तुमचा मेंदु स्टार्व्हेशन मोड मध्ये जातो व फॅट चा साठा करावयास सुरुवात करतो हा दावा पोकळ आहे. त्याउलट कमी वेळा खाल्ल्याने उपवास केल्याने उपलब्ध साठ्याचा सुयोग्य वापर करण्याकडे शरीराचा कल असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ऑगस्ट २०१९ पासून हा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला १६/८ असा करत होतो. एकाच महिन्यात १८/६ पर्यंत वाढवला. सप्टेंबरपासून २०/४ असा करत आहे. गेल्या सहा महिन्यांत चार वेळा ३६ तास उपवास करून पाहिला. दीक्षित सांगतात ती पद्धत मला पटत नाही. उपवासाच्या वेळेत मी जास्तीत जास्त ५ कॅलरी घेतो. (५ कॅलरी चा chewing gum). बाकी केवळ पाणी/काळी कॉफी. या काळात सुमारे १० किलो वजन कमी झाले आहे.
काही अडचणी
- उपवासाच्या वेळेत लाळ तयार होत नसल्याने तोंडाला वास येतो. सतत पाणी पिऊन फरक पडत नाही. त्यामुळे विना साखरेचे chewing gum चघळत राहतो.
- खाण्याच्या वेळेत अक्षरशः हात आडवा मारतो. आईस्क्रीम, केक, फरसाण, बिस्किटे, वगैरे काही बंधनं पाळली जात नाहीत.
- कधी कधी डोकं दुखतं. मिठाच्या कमतरतेमुळे हे होतं. खायच्या वेळेत खारे शेंगदाणे किंवा पाण्यात मीठ घालून घेतो.

आता घरबसल्या काळात थोडे नियम शिथिल करून पाहतोय. उपवास केवळ ४ दिवस. खाणं हा मोठा टाईमपास आहे. स्ट्रेस घालवण्यासाठी. शिवाय घरी बायकोला सोबत देता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिक्षीतांवर सर्वात मोठा आक्षेप हा आहे की एकदा दोन वेळा अधिक मधले परवानगी चे पाणी ब्लॅक कॉफी यादी दिल्यावर दिक्षीत सर " आता तुम्ही जेवतांना काहीही हाणु शकता " असा अप्रत्यक्ष सैल सल्ला देतात. ( ते प्रोटीन वाढवा वगैरे सांगतात हे मान्य आहे पण दोन वेळेत काय खाल्ले पाहीजे याबाबत दिक्षीत " सैल आहेत " आणि ते सैल आहेत म्हणुनच कदाचित हा डाएट लोकप्रिय आहे. ) त्यानंतर जनता त्याचा अधिक सैलसर अर्थ काढुन काय वाट्टेल ते खाण्याचे लायसन्स मिळाले आहे असे समजुन हात मारतात
इथेच सर्व खेळ खलास होतो.
अगदी किमान पातळीवरील न्युट्रीशियसली समजुतदारपणा दाखवला तरी जंक फुड केवळ क्वचित अपवाद म्हणुनच खाण्यात हित इतके तरी कळले पाहीजे. त्यामानाने त्यांचे गुरु डॉ.श्रीकांत जिचकार अगदी व्यवस्थित दोन वेळेत काय खावे याची नीट मांडणी देखील करुन देतात. जिचकारांचा मॅक्रोन्युट्रीएंट अवेयरनेस आणि आग्रह उत्तम दर्जाचा आहे. ते व्हिटॅमिन्स मिनरल्स च्या आवश्यकतेवरही उचित भर देतात.
म्हणजे गुरु खरोखर गुरु आहे चेला मात्र फारच डिस्काऊंट देऊन मुळास धोका निर्माण करुन चुकीची रुढी प्रस्थापित करतोय.
युट्युब वर जिचकारांचे उत्कृष्ठ व्हिडीयो उपलब्ध आहेत दोघांच्या मांडणीतला फरक बेसीक्स सोडले तर जमीन व आसमान इतका आहे.
जाणकारांनी स्वत: अनुभव घ्यावा
श्रीकांत जिचकार इथे https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4
डॉ. दिक्षीत इथे https://www.youtube.com/watch?v=9EwPB3uR4jY

उपवासाच्या वेळेत मी जास्तीत जास्त ५ कॅलरी घेतो. (५ कॅलरी चा chewing gum).
तुमची चॉइस आहे त्याला हरकत नाही. मात्र तो आग्रह योग्य आहे असे मी मानतो कारण जरी ५ कॅलरी असली तरी त्यामुळेही इन्सुलिन चा स्राव पाझरत असतो व उपवासभंग होतो. पुन्हा इन्सुलिन बेसलाइनला जाण्यास आणखी वेळ लागतो. बेसलाइनला इन्सुलिन न गेल्याने ग्लुकॉगॉन ला वाव मिळत नाही.
म्हणुन हे सर्व आग्रहाने मांडले जाते. जे पदार्थ मध्ये खाण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळे इन्सुलिन अगदी शुन्य पाझरते म्हणुन ते अलाऊड आहे. अर्थात हे तुम्हास माहीतच असणार. यात जो एक रोचक मुद्दा आहे तो असा की डॉ.दिक्षीत तुम्ही कितीही खाल्ल तरी इन्सुलिनच एकच माप पडणार हे जे विधान आहे ते अत्यंत चुकीचे आहे. ते तसे नसुन नेमकं काय आणि किती खाल्ल आहे त्याच्या प्रमाणात इन्सुलिनचा स्राव पाझरत असतो.
The claims of Dr. Dixit that amount of insulin released in response to meals has no relation with the quality and quantity of meals is factually incorrect, and is in stark contrast to the physiological facts established via numerous published studies.
https://www.altnews.in/fact-check-dr-dixits-two-meals-a-day-diet-for-wei...
आता दोन वेळेच्या मर्यादीत जेवणात खर म्हणजे हे आव्हानात्मक असते की नेमकं काय खाऊन कार्ब्स प्रोटीन फॅट या तिन्ही मॅक्रोन्युट्रीएंट चा बॅलन्स साधावा तसेच व्हिटॅमिन्स व मिनरल्स ही कव्हर करावेत.
याला दोन उपाय आहेत.
पहीला म्हणजे झोन डाएट ची दिलेली विभागणी इफा च्या बरोबरीने पाळावीत
म्हणजे इफा चा वापर कधी आणि किती वेळा खावे यासाठी करावा
आणि झोन डाएट चा वापर त्या वेळात नेमके काय व कसे खावे यासाठी करावा हे माझ्या मते अतिशय सुंदर असे कॉम्बिनेशन आहे.

What Breaks a Fast and What Does NOT Break a Fast हा माझ्या अत्यंत आवडत्या Thomas DeLauer इफा मास्टर चा व्हिडीयो जरुर बघा आवडेल तुम्हाला
https://www.youtube.com/watch?v=LftmhASRlEc

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दीक्षितांच्या मते ताक आणि टोमॅटोमध्ये 5 पेक्षा कमी कॅलरी असतात आणि ते खाल्यापिल्याने उपवासभंग होत नाही मात्र 5 क्यालरीच्या च्युईंगगमने उपवासभंग होतो असे आहे काय... मला नक्की आक्षेप समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दीक्षितांचं मत मला माहीत नाही.

मात्र कृत्रिम साखरेबद्दल असं वाचलं आहे की काहीही गोड तोंडात गेलं की तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे साखर पचवण्यासाठी जे हॉर्मोन, स्राव यायचे ते येतात.

अनेक मांजरांना पुदिना जातीच्या पानांचे वास आवडतात. कॅटनिप त्याच जातीचं असतं. तिर्रीला च्युइंगगमचा वासही आवडतो. ते ओट्यावर आहे, तर ती तिथला ओटाही चाटते. त्यावर तिच्या डॉक्टरचं म्हणणं की ते शक्यतोवर तिच्यापासून लांब ठेवा. उपाशीपोटी तिच्या पोटात गेलं तर साखर न मिळताही साखर खाल्ल्यासारखे स्राव येतील आणि तो डोस तिच्यासाठी फार मोठा झाला तर तिला चक्कर वगैरे येईल.

असो. मुद्दा असा की साखरेशिवाय इन्सुलिन येऊन त्रास होऊ शकतो. टूथपेस्ट, माउथवॉश सगळ्यांत हीच अडचण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लसणाच्या चटणीच्या फ्लेवरची टूथपेस्ट, माउथवॉश, झालेच तर च्युइंगगमसुद्धा बनवावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांदा नाही घातलात तरच मी घेईन ती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्ध्या जैन झाल्या आहात काय तुम्ही?

----------

१८५७च्या उठावानंतर इंग्रजांच्या पोलिसांनी चौकशीकरिता मिर्झा ग़ालिबला ताब्यात घेतल्यानंतर, चौकशी करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याने त्याच्या धर्माबद्दल विचारले असता ग़ालिबने 'अर्धा मुसलमान' म्हणून उत्तर दिले होते. का, तर म्हणे 'दारू पितो. डुक्कर खात नाही.'

तद्वत, लसूण चालतो, परंतु कांदा चालत नाही, अशा व्यक्तीस अर्ध-जैन मानावयास प्रत्यवाय नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही जन्मापासून अर्धी (किंवा पाव किंवा अदपाव ... किंवा काय ती) जैन असणार. (आता इतर काही कारणांमुळे बटाटा खाणं बरंच कमी आहे, पण बीट आणि गाजरं घरी लावून खाते.)

कच्च्या कांद्याचा वास मला अजिबात सहन होत नाही. चुकून खाल्लाच तर सकाळी उठल्यावर लगेच तोंडाला जो वास येतो त्यानं भीषण किळस येते. कच्चा कांदा खाणाऱ्या लोकांच्या तोंडीही मी लागत नाही, चुकूनही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी देखील जानेवारी पासून जेवणाचे विविध प्रयोग करत आहे.
कारणे आणि फायदे यावर ८-१० महिन्यांनंतर सविस्तर लिहिन.

सध्या इतकेच सांगू इच्छितो की तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि मनाची तयारी करायची असेल तर २१ दिवसाच्या लॉकडाऊन मधे फक्त इतकेच करा.

१. साखर, गुळ, मध किंवा खर्‍या आणि कृत्रिम साखरेपासून बनविलेले कोणतेही पदार्थ खायचे / प्यायचे नाहीत.
२. मैद्यापासून बनलेले कोणतेही पदार्थ खायचे नाहीत.
३. लॉकडाऊन च्या पिरियड मधे बटाटा खायचा नाही.

आज वजन करा आणि अजून २१ दिवसांनी वजन करा आणि या धाग्यावर लिहा.

आजचा गृहपाठ : वरील पदार्थ वगळल्यावर तुम्हाला बाजारात पॅकींगचे कोणते पदार्थ खाण्यासाठी मिळतात त्याची यादी येथे लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचीत तेलावर परतलेले चुरमुरे चालतात का? डाळं व शेंगदाणे व हिरवी मिरची मात्र मस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तांदळाच्या लाह्यांऐवजी ज्वारी / बाजरी / जवसाच्या लाह्यांचा प्रयोग करुन पहावा असे सुचवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पथ्य, बंधनं महिन्याचे २४-२५ दिवस पाळणं सोपं असतं. पाळीच्या दोन दिवस आधी आणि सुरुवातीचे दोन दिवस अजिबात झेपत नाही. तेव्हा मी (एरवीच्या मानानं) चिकार साखर, तळलेले जिन्नस, मैदा खाते. महिन्याचे ५-६ दिवस तसंही पाणीसाठ्यामुळे वजन वाढलेलं असतंच. त्यासाठी उगाच चिडचिड, अशांतता, अस्वस्थपणा वगैरे ओढावून कामात दिरंगाई करणं मला पटत नाही. त्यातून आणखी वैताग वाढतो.

शेवटचे दोन किलो नाही कमी झाले तरी मला काही फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

I do not believe in diet. I work hard all day, till I am tired and sleep peacefully. I eat everything. Oily, spicy sweet, sour, cheese, deep fried etc. etc.
I love eating and I can not give anything up. But I take care of my health and I am careful about how frequently I eat something. Having control over your body and mind is powerful. Never followed any diet, regularly active, I am in good health and wish the same for everyone.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला. आपले वय २०शी ३०शी मध्ये असावे असा कयास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या डोक्यातही हेच आलं. तरुण थी मय, तेव्हा असंच म्हणायचे मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile पण सध्या वर्क फ्रॉम होम चा पुरेपुर फायदा करुन घेता येतोय. उठसूठ स्टेशनरी बाइक करता येतेय. ट्रेड मिल नाही करता येत कारण गुडघ्याचा संधीवात. पण सायकल जमतेय. खाणं कमी खाल्लं तरी चालतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे वयाच्या १९ वर्ष पर्यंतचा कळू ग्रामीण भागात गेल्या मुळे आहाराच्या सवयी सुद्धा ग्रामीण च आहेत .
त्या अजुन सुद्धा माझ्या कडून बदलेल्या गेल्या नाही .

आमच्या घरात रणसंग्राम ह्याच विषया वरून होतो सौ आणि मुलगा पूर्ण शहरी आहार सवयी असलेल्या .
गावी असताना आहाराची एक पद्धत होती सकाळी नाष्टा ह्या मध्ये जास्त करून पोहे किंवा उपमा,आणि दूध हे पदार्थ असायचे.
दुपारी जेवण ह्या मध्ये जास्त करून कड धान्ये
चवळी, काळा घेवडा(हा फक्त सातारी लोकांनाच प्रिय आणि माहीत असलेला)उडीद,बटाटा, तुर,वाटाणा,ह्याची सुखी भाजी किंवा पातळ कालवण आणि ज्वारी,बाजरी,नाचणी ची भाकरी,
आणि त्या नंतर रात्री जेवण त्या मध्ये पण पदार्थ कड धान्य,मेथी, माठ,आणि बाकी हिरव्या भाज्या आणि थोडसं भात.
गोड पदार्थ मध्ये पुरण पोळ्या किंवा खीर फक्त सणासुदीला, .

आणि मला वाटतं हेच जेवण उत्तम जेवण आहे शरीराची सर्व गरज ह्या मधून भागवली जाते.
त्या साठी कोणत्याच आहार विश्लेषक च्या सल्याची गरज नाही.
मला हाताने जेवण करणे comfort वाटत मी हातानेच जेवतो चमचे वापरात नाही लोकांना काय वाटतं त्याचा बिलकुल विचार करत नाही.
हक्का नुडल्स च्या जागेवर घरी रव्या पासून बनवलेल्या शेवाय च माझ्या जास्त पसंतीच्या आहेत.
फळा मध्ये स्थानिक फळ च आणि ज्या सीजन होतात त्याच सीजन मध्ये आहारात असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मला वाटतं हेच जेवण उत्तम जेवण आहे शरीराची सर्व गरज ह्या मधून भागवली जाते.

Patriotism is, fundamentally, a conviction that a particular country is the best in the world because you were born in it. - G. B. Shaw.

हक्का नुडल्स च्या जागेवर घरी रव्या पासून बनवलेल्या शेवाय च माझ्या जास्त पसंतीच्या आहेत.

माणसाने रव्यापासून बनविलेल्या शेवया खाव्यात, नि हक्का नूडल्ससुद्धा खाव्यात. थोडा बॅलन्स राहायला मदत होते.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगले आरोग्य,उत्तम शरीर,निरोगी शरीर, हे ठरवण्याची अनेक मापक आहेत त्यातील वजन हे एक आहे.

वजन सुद्धा अनेक प्रकारे वर्गीकृत करता येते म्हणजे
उंची च्या प्रमाणात किती वजन असावे हे एक ढोबळ सूत्र आहे.
पैलवान लोकांचे वजन जास्त असते म्हणजे ते लठ्ठ आहेत असा होत नाही तर स्नायू चे वजन असते.
पण डाएट करणारे चे ध्येय हे एकमेव असते ते म्हणजे वजन कमी करणे ते असे पण नाही जेवलात तर कमी होईल पण शरीर सुद्धा कमजोर होईल.
उत्तम आरोग्य हे अनेक घटकांचा विचार करून ठरवले जाते फक्त वजन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0