नीतिमत्ता

वडीलोपार्जीत संपत्ती?
मानवतेचा ठेवा?
स्त्रीधनच.
बहुतेक
वापरु की नको?
जग कुठे चालल्लेय?

----------
उधळ्या इसाप
भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध!
आता, मी वाटून काय उपयोग?
आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला?
-----------------------

ती ना? नसतेच राजकारण्यांकडे,
सरकारी बाबूंकडे आणि
भांडवलशहांकडे.
म्ह्णूनच मीही वापरत नाही.
कशाला त्यांची वक्रदृष्टी?

--------------------------

म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या.
तुमच्या आयुष्यात स्थान द्या.
नाही जाणार पळून,
नाही होत मी भ्रष्ट.
ज्यांनी दिले, ते अजरामर झाले.
स्साली, जरा बोलू दिले,
तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हे नितीम्यान (नितीला म्यान केलेला) सहज चे विचार म्हणावे का? Smile
कल्पना, प्रकटन सारेच खूप आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मांडणी वेधक आहे. तिला न ठेवण्याचे बहाणे आणि दाखवण्यापुरती ठेवलीच तर शेवटच्या दोन ओळींतून गैरसोय होताच तिला सोडचिठ्ठी देण्याची प्रवृत्ती छान दाखवली आहे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0