Permalink Submitted by लंपन on रविवार, 16/02/2020 - 21:15.
बोजॅकचे अंतिम पर्व पहिले. आतापर्यंत पाहिलेल्या कुठल्याही मालिकेपेक्षा बोजॅक सोबत भावनिक बंध जास्त तयार झाला. सगळ्या पत्रांमध्ये आपला अंश सापडत गेला मला.पहिल्या एपिसोडमध्ये अतिशय बाष्कळ आणि बकवास वाटणारी हि मालिका अतिशय जास्त आवडून गेली.
बोजॅक मधील गाणी- Take me down easy Horse with no name Back in the 90's Sea of dreams Judah's song Impossible Mr.blue
यातील "take me down easy, horse with no name, Mr. Blue, impossible" अगदी सुदंर आणि न चुकवण्यासारखी गाणी आहेत.
Permalink Submitted by 'न'वी बाजू on मंगळवार, 18/02/2020 - 15:37.
'लंपन' हे नाव मानवी आहे???
तेवढे ते एक प्रकाश नारायण संतांचे पात्र वगळल्यास, आख्ख्या त्रिभुवनात 'लंपन' असे नाव कोणा मानवास त्याच्या जन्मदात्यांकडून दिले गेल्याचा किमान एक तरी दाखला आपणांस ठाऊक आहे काय?
Permalink Submitted by गौराक्का on मंगळवार, 18/02/2020 - 20:26.
त्याचं खर नाव वेगळं आहे.
-------------------------------------------
माझ्या लेकाचं (पुढे मागे जेव्हा केव्हा होइल तेव्हा) नाव मी लंपन ठेवणार आहे.
तुम्हास एक दाखला मिळेल
Permalink Submitted by १४टॅन on बुधवार, 19/02/2020 - 18:11.
बऱ्याच ठिकाणी आहे. लंपन तंद्रीत असल्यामुळे त्याला हाक मारलेली कळलीच नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. मनीने त्यांना माझं खरं नाव सांगितलं असंही लिहीलेलं आहे.
Permalink Submitted by 'न'वी बाजू on बुधवार, 19/02/2020 - 18:27.
... ते 'खरे नाव' काय, त्याचा गौप्यस्फोट कोठे केला आहे काय?
..........
बाकी, 'लंपन' या विशेषनामाची व्युत्पत्ती काय असावी? Lumpen या इंग्रजी शब्दावरून तर नव्हे? (पण मग हे त्या बिचाऱ्या लंपूकरिता अपमानास्पद आहे. कित्ती कित्ती गोड मुलगा आहे तो! त्याला असे म्हणायचे?)
Permalink Submitted by ऐसीचा जोकोविच on बुधवार, 19/02/2020 - 19:03.
त्याचं खरं नाव लंबोदर पनवेलकर होतं. पण शाळेत हजेरी घेताना गुर्जीनीच 'लंपन' केलं. मग तेच चिकटलं. आणि तो खूप चौकस, आज्ञाधारक, असल्याने सगळीकडे आदराने वागवला जायचा. ( लंबोदरच तो)
( लंबोदर पटवर्धन असतं तर 'पट्या' मात्र प्वोरांनी केलं असतं. )
Permalink Submitted by चिंतातुर जंतू on शनिवार, 22/02/2020 - 10:50.
ह्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचं ऑस्कर मिळवणारी 'अमेरिकन फॅक्टरी' बघितली. बंद पडलेला एक अमेरिकन कारखाना चिनी कंपनी विकत घेते आणि मग त्यातून दोन संस्कृतींतले फरक, शोषण आणि भांडवलशाहीचे पैलू दिसतात ते रोचक आहेत.
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Permalink Submitted by रवींद्र दत्तात्... on सोमवार, 24/02/2020 - 19:01.
गेल्या आठवड्यात कर्क डगलस गेला...अनपेक्षितपणे टेलिग्रामवर स्पार्टाकस आणि द बेड एंड द ब्यूटीफुल हे चित्रपट सापडले...
आधी द बेड एंड द ब्यूटीफुल डाउनलोड केला...आणि रात्री कामावरून घरी परतत्यावर एका बैठकीत बघून काढला...खूप वर्षानंतर हा चित्रपट पुन्हां बघायला मिळाला...
त्याच प्रमाणे स्पार्टाकस...बघितला...सव्वा तीन तासांचा चित्रपट दोन बैठकीत पूर्ण झाला...चित्रपटाची प्रत छान होती...सर लारेंस ऑलिव्हिएला बघतांना डोळयांचा पारणं फिटलं...स्पार्टाकसच्या बायकोशी बोलतांना त्याचा चेहरा बघण्यासारखा होता...स्पार्टाकस मेला की नाही...याची खात्री करतांना त्याचे हावभाव तर त्याच्या नैसर्गिक अभिनयाची जणूं पावतीच होते...
आता एक जुनी आठवण
काही वर्षांपूर्वी 75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेजवर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकलनी लिफाफा आपल्या बापाला दिला.
ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं-
‘एंड दि ऑस्कर गोज टू...’
तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढला, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’
फार पूर्वी त्याचा ‘दि बोल्ड एंड दि ब्यूटीफुल’ बघतांना नकळत गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ हा चित्रपट आठवला होता. विन्सेंट व्हेन गॉगच्या जीवनावर आधारित ‘दि लस्ट फॉर लाइफ’ देखील अप्रतिम होता. यात त्याचा सोबत एंथनी क्वीन होता...ही सगळी हॉलीवुडची दादा मंडळी...
Permalink Submitted by गोल्डन ब्राऊन on शनिवार, 07/03/2020 - 12:47.
मुर्खांना याचा बदला विद्रोही चित्रपट, नाट्य सृष्टी निर्माण करुन घेता येत नाही का? उगाच ब्राह्मणांना दोष देत बसायचं. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असं विभाजन करून टाकायचे.
Permalink Submitted by नगरीनिरंजन on रविवार, 12/04/2020 - 04:06.
स्टॅटिस्टिकली डहाके म्हणतात ते खरं आहे; आणि विद्रोही चित्र-नाट्य सृष्टी करायला सांगताय म्हणजे तुम्हालाही ते मान्य आहे असं दिसतंय.
मग मूर्खपणा नक्की काय त्यांचा ते कळले नाही.
सैराट येण्यापूर्वी सुबोध भावेंच्या एका मुलाखतीत त्यांनी प्रेक्षक मराठी नाटकं व चित्रपट जास्त पाहात नाहीत अशी तक्रार केल्याचे ऐकले होते; तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की महाराष्ट्राची लोकसंख्या १२० मिलियन असताना त्यातले दहा टक्केही लोक का फिरकत नाहीत मराठी सिनेमा पाहायला? काहीतरी डिसकनेक्ट नक्कीच आहे.
असो.
यात आलेले स्कूपव्हूपचे व्हिडिओज पाहिले.
एर्हवी हा माणूस (स्कुपव्हुप चा संमदीश) वादविवादाच्या दोनही बाजूच्यांची हसत खेळत फिरकी घेणारा, पण प्रथमच इतका सिरिअस झालेला पाहिला. न्यू इंडियाच्या राजधानीच्या लॉ एण्ड ऑर्डर गाथा.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ज्या प्रभावी पद्धतीने चायनाने रोग प्रसार आटोक्यात आणला त्यामुळे सरकारांनी लोकांवर कितपत पाळत ठेवायची आणि त्याचा वापर कसा करायचा हा मुद्दा आता चर्चिला जाईल.
वर्षानुवर्षाच्या ऑथरेटरीअन व्यवस्थेमुळेपण चायनिज लोकांची जडणघडण पण अशी आहे की, नागरिस्वातंत्र्यापेक्षा सरकारच्या पाळत ठेवण्याला ते जास्त पसंती देतील, पण पाश्चिमात्य सहज तयार होतील असे वाटत नाही.
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on रविवार, 15/03/2020 - 23:24.
करोना व्हायरसच्या चर्चा ऐकून वाचून फार कंटाळा आला. तेवढ्यात फेसबुकवर कोणी तरी 'द अफेअर' नेटफ्लिक्सवर आल्याचं म्हणालं. म्हणून हौसेनं बघायला गेले तर अमेरिकेत नाहीच. भारतात असणार. ते बघाच.
तरीही चटपटीत काही हवंच होतं. म्हणून 'पानिपत' लावला. डोकं बाजूला ठेवून बघायचा असेल तर उत्तम आहे. क्रिती सनोन छान दिसते; अधूनमधून अर्जुन कपूर आणि क्रिती सनोन मावळेछाप मुंड्या हलवतात. सर्वसाधारणपणे अमराठी लोक मराठी लोकांना किंवा अभारतीय लोक भारतीयांना विचारतात, 'तुम्ही अशी मान का हलवता?' आणि मी कुणालाही अशी मान हलवताना बघितलेलं नसतं. क्रिती सनोन आणि अर्जुन कपूर जितपत मराठी बोलतात, ते वाईट नाही. काही हिंदी वाक्यांची रचनाही इंग्लिशप्रणित वाटली.
संजय दत्त वाईट नट आहे. त्यातून अब्दाली फारच बटबटीत रंगवलाय. आशुतोष गोवारीकर एकेकाळी ठीक वाटला होता. गश्मीर महाजनी भीषण अगोचर वाटतो; त्याच्यापेक्षा रविंद्र महाजनी, अत्यंत सुरकुतलेला असूनही बरा दिसतो. नजीबचं काम करणारा छाने. बाजीराव-मस्तानीचा मुलगा दाखवलेला समशेर बर्फी आहे! समशेरला अजिबातच मराठी बोलताना दाखवलेला नाही, हे अत्यंत विनोदी वाटतं. मराठी लोक मुस्लिम नाव ऐकलं की भस्सकन हिंदी फाडायला सुरुवात करतात, ते सिनेमातही घेऊन जायची गरज नव्हती.
पॉपकॉर्न, बटाटेवडे, गरमागरम चहा, भजी वगैरे घेऊन 'पानिपत' बघायला हरकत नाही. मात्र देवनागरी टंक बघू नका; घाणेरडा मंगल वापरलाय! १ कोट खर्च केले पण चांगला देवनागरी टंक नाही सापडला!
Permalink Submitted by लंपन on गुरुवार, 19/03/2020 - 11:25.
Parasite बघितला.अगदीच सुंदर सिनेमा आहे. सुरुवातीला हलकाफुलका वाटणारा सिनेमा नंतर अंगावर येतो. जोकर, फँड्री आणि parasite तिन्ही सिनेमे अगदी वेगवेगळे असले तरी कुठंतरी खोलवर साम्य आहे असं जाणवतं.
Permalink Submitted by तिरशिंगराव on सोमवार, 13/04/2020 - 10:08.
हा इराणी चित्रपट पाहिला. एका पापभीरु सामान्य इराणी माणसाची कथा उत्तम रंगवली आहे. शहांमृगांची देखभाल करणाऱ्या या बिचाऱ्याची क्षुल्लक कारणाने नोकरी जाते. पण कुटुंबावर प्रचंड प्रेम असलेला हा माणूस हिंमत न हारता , मिळेल ते काम करत रहातो. त्याचा चेहेरा चित्रपट संपल्यावरही अनेक दिवस मनांत घर करुन रहातो.
Permalink Submitted by घाटावरचे भट on सोमवार, 13/04/2020 - 16:40.
'द मँडलोरिअन' संपवली. टाईमपास आहे. कथानक एंपायरच्या पाडावानंतर आणि न्यू रिपब्लिकच्या सुरुवातीमध्ये घडतं. ही मालिका बहुधा योडाच्या वंशजाची कथा म्हणून पुढे जाईल.
Permalink Submitted by नील लोमस on सोमवार, 13/04/2020 - 22:44.
मला फार आवडली. विशेषत: शेवटचे तीन एपिसोड. दर दोन वर्षांनी चित्रपटाचा रतीब पाडण्यापेक्षा हे भारीय. डिस्ने+ साठी डिस्नेने हे केलं, परंतु पुढचं सगळं सपक होऊ नये म्हणजे मिळवलं.
मार्मिक0
माहितीपूर्ण1
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
Permalink Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 16/04/2020 - 11:49.
'contagion' हा २०११ साली बनलेला सिनेमा पाहिला. सध्याच्या साथीचे आणि चित्रपटातील तपशील आश्चर्यकारक रित्या जुळताहेत. चित्रपट बनविणारे भविष्यदर्शी आहेत असेच म्हणावे लागेल.
Permalink Submitted by भटक्या कुत्रा on शुक्रवार, 17/04/2020 - 02:03.
कुंभलुंगी नाईट (मल्याळी). खलनायक-नायक नसलेला एक निखळ सिनेमा. चार भाऊ ज्यांचे आई वडील वेगवेगळे आहेत कसे सोबत राहतात याविषयी ही कथा आहे. शूटिंग चे लोकेशन सुद्धा भारी आहेत.
Permalink Submitted by नील लोमस on शुक्रवार, 17/04/2020 - 22:59.
एका शांत मध्य लयीत उलगडत जाणारी कथा, बाक्या प्रसंगात अतिशय कौशल्याने पेरलेले पण गांभीर्य अजिबात न उणावणारे विनोद, सहज साधे संवाद, संकलनातला सफाईदारपणा, अत्यंत मस्त प्रकाशयोजना-केरळच्या बॅकवॉटर्सचा पुरेपूर आणि पर्यटनी नसलेला यथोचित वापर, संयत पण अबोअरिंग संगीत आणि गाणी, उत्तम अभिनेते. खूप आवडला हा चित्रपट. (प्राईम वरती आहे).
हे आवडलेले एक गाणे :
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
Permalink Submitted by तिरशिंगराव on शुक्रवार, 12/06/2020 - 06:35.
हा अत्यन्त हृदयस्पर्शी आणि साधा पण परिणामकारक चित्रपट पाहिला. चायनीज चित्रपट म्हणजे कुंग फू, हाणामाऱ्या आणि सुमार अभिनय असा उगाचच गैरसमज झाला होता. अप्र्तिम अभिनय आणि सुंदर चिनी कंट्रीसाईड पहाण्यासाठी जरुर पहावा.
Permalink Submitted by तिरशिंगराव on सोमवार, 15/06/2020 - 21:40.
मी कुठल्याच प्रायव्हेट चॅनेल्सचा ग्राहक नाही. कोणी एखादा उत्तम चित्रपट सांगितला की नेटवरुन पहातो. चित्रपट अवश्य पहाण्यासारखा आहे.
नंतर चेक केल्यावर कळलं की तो यू ट्युबवर पण उपलब्ध आहे. तिथे तो सहजच बघता येईल.
Permalink Submitted by चार्वी on गुरुवार, 11/06/2020 - 19:46.
Super Delux
तामिळ सिनेमा. काहीसा dark आहे असं वाटत असतानाच....स्पॉयलर नको.
Transgender वडील, त्सुनामीत वाचल्याने देवभक्त झालेले वडील व porn चित्रपटात काम करणारी आई, प्रणयप्रसंगी प्रियकराचा मृत्यू झाल्यामुळे अडचणीत सापडलेली बायको, चार किशोरवयीन मुलं अशा समांतर कथा गुंफलेल्या आहेत. सामाजिक म्हणावेत असे मुद्दे मांडलेले असूनही कुठलाही आव आणलेला नाही. ही आर्ट फिल्म नाही, पण बटबटीत रंजन करणारा पिक्चरही नाही.
Permalink Submitted by अस्वल on शुक्रवार, 12/06/2020 - 06:47.
कश्यपचा चोक्ड -पाहिला.
चित्रपट म्हणून काही खास नवीन नाही- बराचसा ओके वाटला.
पण त्यात निश्चलनीकरणाचे उल्लेख, त्याची पार्श्वभूमी आणि मोदींना उघड संबोधलेलं पाहून आनंद जाहला.
इतका मोठा तुघ्लकी निर्णय- त्याबद्दल खरं तर डॉक्युमेंटरीज असायला पाहिजेत.
चित्रपटात उल्लेख झाला हेही नसे थोडके.
तेव्हा नेटफ्लिक्स/प्राईम वगैरे वापरून उत्तम आणि उघड राजकीय संदर्भांविषयी भाष्य करणाऱे चित्रपट /सिरीज आले तर आवडेल बघायला.
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on शुक्रवार, 03/07/2020 - 07:33.
'द स्पाय हू डंप्ड मी' नावाचा वाह्यात सिनेमा हुलूवर बघितला.
केट मकिनॉन आणि मिला कुनिस मुख्या भूमिकांत आहेत. संपूर्ण सिनेमा ॲक्शन सिनेमा, जेम्स बाँडचे सिनेमे, माचोपणा, सगळ्याची वाह्यात टिंगल आहे. दोन जीवाभावाच्या मैत्रिणी आणि त्यांचं न्यूरॉटिसिझम ह्याची गमतीशीर फोडणी त्याला आहे. मारामारी, जोरदार गाड्या पळवणं, हाणामारीचं अक्रोबॅटिक्स, हे सगळं आहे; केट मकिनॉन नेहमीप्रमाणे भीषण वाह्यात आहे. मोजके काही वगळण्यासारखे प्रसंग वगळता कुणीही कुणालाही अजिबात सिरीयसली घेत नाहीत!
करमणुकीची पूर्ण खात्री! सिनेमा जरूर पाहा.
केट मकिनॉनचे काही प्रसंग बघताना लुईस बुन्युएलच्या सिनेमांची आठवण झाली.
Permalink Submitted by मिहिर on शुक्रवार, 03/07/2020 - 20:42.
पाहिला. फारसा नाही आवडला. बराचसा सुसंगत असलेला कालप्रवास हे डार्क आवडण्याचे मुख्य कारण होते. इथे त्यालाच तिलांजली दिली आहे. वर गुंतागुंत हाताबाहेर जाऊ लागल्यावर नवीन विश्वे काढणे ह्या पळवाटीमुळे चिडचिड झाली. तुम्हांला कसा वाटला?
Permalink Submitted by चिंतातुर जंतू on शनिवार, 04/07/2020 - 11:11.
मला मुळात त्यातलं मुख्य सूत्र - कितीही वेळा जगता आलं तरी लोक त्याच त्याच चुका करतात / तेच तेच पर्याय निवडून त्याच वास्तवात अडकतात, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट पडतात, मूळ प्रेरणा बाजूला सारून वागावं लागतं आणि अक्कल चालवावी लागते - ठसवण्यासाठी त्या समांतर वास्तवांचा चांगला उपयोग केला असं वाटतं.
अशाच सूत्राच्या पायावर उभी, पण कमी पात्रं, कमी ॲक्शन असलेली आणि अधिक काव्यात्म असलेली रशियन फिल्म - सोलॅरिस.
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Permalink Submitted by चिंतातुर जंतू on मंगळवार, 07/07/2020 - 15:11.
किवा कमी पात्रे, आणि तेवढेच( किंवा कांकणभर जास्त) नाट्य: netflix-Predestination.
प्रीडेस्टिनेशन तशी वाईट नाही, पण काही बाबतीत डार्क वरचढ ठरते - वेगवेगळी कुटुंबं आणि प्रत्येक कुटुंबाच्या काही पिढ्या घेतल्यामुळे आई-बाप-मुलं ह्यांच्या संबंधांतले अनेकविध घटक त्यात दाखवता आले आहेत. शिवाय प्रेमाच्या विविध छटा आणि एकंदर मनुष्यस्वभावाच्या विविध छटाही त्यात आहेत. त्या सगळ्याचा एकत्र विचार करता त्यात त्यांना तत्त्वचिंतनात्मक मांडणीही करता आली आहे. 'प्रीडेस्टिनेशन'मधली ही त्रुटी आहे असं म्हणता येणार नाही, (कारण त्याचा फोकस वेगळा आहे) पण डार्क त्यामुळे एपिकसारखी बघता येते आणि ती शक्यताच 'प्रीडेस्टिनेशन'मध्ये नाही.
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Permalink Submitted by साबु on सोमवार, 06/07/2020 - 15:32.
टाइम मशीन , टाइम लूप , portal to another dimension, space-time continuum glitch असलं काही आवडत असेल तर नेटफ्लिक्स वर mirage हा सिनेमा आणि Dirk Gently's Holistic Detective Agency हि वेब सिरीज बघा. Dirk Gently's Holistic Detective Agency हि इतकी अचाट आणि अतर्क्य पण बघायला मजा आली .
Permalink Submitted by तिरशिंगराव on मंगळवार, 18/08/2020 - 11:17.
दीपा मेहताचे चित्रपट आले तेंव्हा वादाच्या भोवऱ्यांत सापडले त्यामुळे बघता आले नाहीत. म्हणून आता नेटवर शोध घेऊन बघितले.
वॉटर : चित्रपट आवडला पण तो आत्ताच्या काळात किती रिलेव्हंट आहे असा प्रश्न पडला. त्यांतल्या लहान मुलीचे काम फारच उत्तम झाले आहे.
फायर : शबाना आणि नंदिता दासची कामे उत्तम. पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देणारी चांगली कलाकृती.
अर्थ १९४७: या चित्रपटात दीपा मेहेताचा हिंदुंविषयीचा बायस दिसून आला. कथा लाहोर मध्ये घडत असताना तिथे शीख समुदाय दंगा करुन मुसलमानांना मारताना दाखवले आहेत ते पटले नाही. अत्याचार दोन्ही बाजूंनी झाले, पण ते आपापल्या प्रदेशांत. प्रेतांनी भरलेली रेल्वे लाहोरला आलेली दाखवली आहे, पण अशाच ट्रेन भारतात पण आल्या होत्या, त्याबद्दल अवाक्षर नाही.
मिडनाईट्स चिल्ड्रेन : ही सलमान रश्दीची कथा फँटसी आणि वास्तवाचे मिश्रण आहे. पण यातही, भारत म्हणजे गारुडी आणि जादुचे खेळ करणारे असा पाश्चिमात्य लोकांचा समज दृढ होईल असे चित्रण आहे. इतिहास दाखवण्याच्या ओघात, बांगलादेशचे युद्ध आणि इंदिरा गांधींची आणीबाणी दाखवली आहे. आणीबाणीवरची टीका ठीक पण इंदिराजींचे चित्रण विकृत वाटते. आत्ताच्या काळात जर हा भारतात दाखवला तर बहुधा हिंदुत्ववादी त्याविरुद्ध फतवा काढतील!
Permalink Submitted by सामो on मंगळवार, 18/08/2020 - 21:34.
हा सिनेमा पहायचा आहे. मी पूर्वी एकदा शोधला होता मला वाटतं नेटफ्लिक्स वरती पण नव्हता. विधवांना गंगेच्या काठावरती सोडून कुटुंबिय निघून जातात त्यावर आह्जे ना?
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on बुधवार, 19/08/2020 - 00:24.
मी हे सिनेमे बघून काळ लोटला. त्यामुळे तपशिलाच्या चुका असतील.
वॉटर : चित्रपट आवडला पण तो आत्ताच्या काळात किती रिलेव्हंट आहे असा प्रश्न पडला. त्यांतल्या लहान मुलीचे काम फारच उत्तम झाले आहे.
समाजानं टाकून दिलेल्या लहान मुलीचा निरागसपणा जपणाऱ्या स्त्रिया स्वतः दडपलेल्या असतात; तरीही त्या मुलीसाठी क्वचित स्वतःच्या स्वार्थाचा त्याग त्या करतात. हे वर्तन कधीही कालबाह्य होऊ नये, असं मला मनापासून वाटतं. पण सध्याच्या काळात ते पुरेसं जपलं जात नाही अशी भीती वाटते.
आणि अजूनही 'आमच्यात असंच करतात' म्हणत, विशेषतः लग्न केलेल्या बायकांना दडपण्याचे प्रकार सुरू असतातच. जीव जात नसेल म्हणून स्वातंत्र्यावर गदा येत नाही, असं नाही.
अर्थ १९४७:
राहुल खन्नाचं हिंदू पात्र ज्या पद्धतीनं मरतं, नंदिता दासच्या हिंदू पात्राचे जे धिंडवडे निघतात; आणि त्याची जबाबदारी काही अंशी आमीर खानच्या मुसलमान पात्राचीही असते. विशेषतः अतिशय क्षुद्र कारणासाठी तो सूड घेतो आणि त्यात परिस्थितीचा गैरफायदा घेतो. आपल्या मित्र-मैत्रिणीला वाचवणं शक्य असूनही, तो उलट त्यांना जमावाच्या हातात देतो. ह्यातही हिंदूद्वेष दिसतो?
मला ह्यात माणसाच्या क्षुद्रपणामुळे होरपळणारी माणसं दिसली.
फायर
हल्ली मला प्रश्न पडायला लागला आहे. मी माझं आयुष्य माझ्या बुद्धीनुसार जगते. पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देण्याचा प्रयत्न मी का करू? ते काम आपसूकच त्या संस्कृतीचे पाईक करतात. आता मला फायर तसा वाटतो. त्या दोघींना रूढ, चाकोरीत आनंद मिळत नाही, मग त्या आपला आनंद शोधतात. ह्यात बाकीचे भोपळे त्यांना सहन करू शकत नाहीत, तर त्याची जबाबदारी त्यांची!
Permalink Submitted by तिरशिंगराव on बुधवार, 19/08/2020 - 07:12.
राहुल खन्नाचं हिंदू पात्र ज्या पद्धतीनं मरतं,
राहुल खन्नाने यांत हसन चं काम केलं आहे. नंदिता दासशी लग्न करण्यासाठी तो भारतात पळून जाऊन हिंदु व्हायला तयार असतो. नंदिता दास ह्या एकाच पात्राचा शेवटी छळ दाखवला आहे. असो. चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते.
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on बुधवार, 19/08/2020 - 19:59.
त्यामुळे आता मला नवाच अर्थ लागला.
फाळणी ही मोठी आपत्ती होतीच. त्यासोबत बदला, द्वेष, हव्यास ह्या क्षुद्रपणामुळे समोरचा माणूस आपला मित्र आहे का, तो आपल्या धर्माचा आहे का, असा काहीही फरक पडत नाही. हा एक अर्थ. आणि दुसरा, मुसलमानांच्या धार्मिक बहुमताच्या क्षुद्र हव्यासापोटी (आमीर खानच्या पात्राचं क्षुद्र वर्तन) फाळणी घडली; त्यात आपलं आयुष्य जगणारे, सरळ, साधे लोक (राहुल खन्ना, नंदिता दासची पात्रं) बळी पडले.
सिनेमा कुणा माणसांची गोष्ट सांगतो; सिनेमा माहितीपट नसतो. इतिहासाचा एक भाग दाखवून दुसरा भाग वगळायची सिनेमाला, कथांना मुभा असते; माहितीपटांना नसते.
Permalink Submitted by सामो on बुधवार, 19/08/2020 - 20:33.
हल्ली मला प्रश्न पडायला लागला आहे. मी माझं आयुष्य माझ्या बुद्धीनुसार जगते. पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देण्याचा प्रयत्न मी का करू?
कारण तू ते करु शकतेस. प्रतिकार करण्याची क्षमता, बुद्धीमत्ता व शक्ती तुझ्यात आहे. नाहीतर दुर्बळ, भित्र्या स्त्रियाही असतात. 'मी का करु?' असा विचार करणाऱ्या सक्षम स्त्रिया या पुरुषप्रधानतेकडे दुर्लक्ष करतात म्हणुन ती सोकावते तर दुर्बळ स्त्रिया निमूटपणे बळी जातात म्हणुन ती सोकावते. मग फरक तो काय राहीला?
मला हे मान्य आहे की त्यात, भोपळ्यांना विरोध करण्यात तुझी उर्जा जाते, खूप मनस्ताप होतो. लष्कराच्या भाकऱ्या प्रकार आहे तो. वर नवे भोपळे व नवे दुर्बल घटक जन्म घेतच रहातात. कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखं अनंत, अनएंडींग आहे ते. माझ्याकडेही उत्तर नाही. तुझ्या लाठीने साप मारणे - हे काही उत्तर नाही.
Permalink Submitted by 'न'वी बाजू on बुधवार, 19/08/2020 - 22:28.
कारण तू ते करु शकतेस.
त्या ते करू शकतात, याचा अर्थ ते करण्याची (आणि/किंवा, टू पॅराफ्रेज़ पु.ल., भारतमातेच्या डोळ्यांतले अश्रू पुसण्याची) त्यांच्यावर नैतिक जबाबदारी आहे / त्यांचे ते घटनात्मक कर्तव्य आहे / स्त्रीजातीच्या त्याच एकमेव तारणकर्त्या असल्याकारणाने अशी नैतिक जबाबदारी अधिक घटनात्मक कर्तव्य त्यांच्याच एकटीच्या खांद्यावर आहे, असा नव्हे.
(थोडक्यात, त्यांची मर्जी.)
(त्यांना वाटेल - किंवा गरज भासेल - तेव्हा त्या करतीलच. (चूभूद्याघ्या.) त्या वेळी आलात, तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना. (पुन्हा, चूभूद्याघ्या.) आहे काय, नि नाही काय?)
(शिवाय, टू पॅराफ्रेज़ पु.ल. अगेन, ही भारतमाता ज्या दिवशी अश्रू ढाळण्याचा आपला एककलमी कार्यक्रम सोडून नातवंडांना अंगाखांद्यांवर खेळवेल, नाहीतर कीर्तनाला जाऊन बसेल, त्या दिवशी, इ.इ.)
'मी का करु?' असा विचार करणाऱ्या सक्षम स्त्रिया या पुरुषप्रधानतेकडे दुर्लक्ष करतात म्हणुन ती सोकावते तर दुर्बळ स्त्रिया निमूटपणे बळी जातात म्हणुन ती सोकावते.
'मी का करू?' असा विचार करणाऱ्या सक्षम स्त्रियांमुळे पुरुषप्रधानता सोकावत नसावी. (त्या तशाही दुर्लक्ष करत नसाव्यात. आपल्यापुरती / आपल्यावर वेळ आल्यास सक्षमपणे टक्कर देतच असाव्यात.) पुरुषप्रधानता सोकावत असावी, ती दुर्बळ स्त्रिया गप्प बसल्यामुळे. (चूभूद्याघ्या.)
सबब, गप्प न बसण्याची जबाबदारी ही (प्राथमिकत: किंवा सर्वस्वी) दुर्बळ स्त्रियांवर आहे.
(हं, आता, गप्प बसणाऱ्या दुर्बळ स्त्रियांबरोबर कॉमन कॉज़ करून स्ट्रेंग्थ इन नंबर्स वाढवण्यात सक्षम स्त्रियांचासुद्धा फायदा असू शकतो, नाही असे नाही. परंतु म्हणून त्यांची ती गरज असेलच, असे नव्हे, तथा त्यांच्यावर ती जबाबदारी असण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही. उलटपक्षी, सक्षम स्त्रियांबरोबर (त्या उपलब्ध तथा इच्छुक असल्यास) कॉमन कॉज़ करून आपला फायदा करून घेणे ही दुर्बळ स्त्रियांकरिता स्ट्रॅटेजी म्हणून जरी वाईट नसली, तरी (उपलब्ध तथा इच्छुक) सक्षम स्त्रियांवर त्यांनी त्याकरिता विसंबून राहणे ही स्ट्रॅटेजी होऊ शकत नाही. सक्षम स्त्रिया ती जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक (तथा उपलब्ध) आहेत, असे जरी मानले, तरी त्यांच्यावरील ती जबाबदारी नव्हे. शेवटी ज्याचातिचा पार्श्वभाग ज्यानेतिनेच पुसावा लागतो.)
लष्कराच्या भाकऱ्या प्रकार आहे तो.
मी तर म्हणेन झ** गाढवे अंगावर घेण्याचा प्रकार आहे. त्यात फक्त अंगावर घेणाऱ्या/रीला लाथा बसतात.
असो. मी काही अदितीचे (किंवा दुबळ्या/सक्षम कोणत्याही स्ट्राइपच्या स्त्रियांचे - किंवा फॉर्दॅट्मॅटर पुरुषांचेसुद्धा) वकीलपत्र घेतलेले नाही. सबब, इथेच थांबतो. (केवळ दुपारीदुपारी गब्बर चावल्यासारखे करण्याची हुक्की आली, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.)
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on बुधवार, 19/08/2020 - 23:47.
(केवळ दुपारीदुपारी गब्बर चावल्यासारखे करण्याची हुक्की आली, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.)
aww, that's so sweet to admit!
सामो, मला म्हणायचंय ते असं की, भोपळ्यांना किंवा पुरुषप्रधानतेला धक्का लावण्याच्या हेतूनं मी गोष्टी करत नाही. मला आनंद मिळतो; मला डांबरटपणा करावासा वाटतो, म्हणून मी काही गोष्टी करते. त्यातून ढुढ्ढाचार्यांना त्रास झाला तर बोनस, पण माझा हेतू तो नसतो.
'फायर' हा सिनेमा त्या दोघींनी आपला आनंद शोधण्याबद्दल आहे. पण मुळात त्यांचा हेतू एकत्रपणे आनंद शोधण्याचा नसतो. त्यांनी पुरुषांशी लग्न केलेलं असतं. ते पुरुष आणि समाजव्यवस्था कमी पडतात म्हणून त्यांना पर्याय शोधावा लागतो. म्हणजे मूळ व्यवस्था अन्याय्य नसती तर त्यांना स्वतंत्र, निराळा विचार करण्याची गरज पडली नसती. त्यांचा हेतू आनंद शोधणं आहे; त्यात जाताजाता पुरुषप्रधानतेला धक्का लागला, लाथा बसल्या तर बोनस. त्या आनंद शोधत राहिल्यामुळे बळी (व्हिक्टिम) राहत नाहीत. मला ती बाब आवडते.
'१९४७ अर्थ' आणि 'वॉटर'च्या कथा तशा नाहीत. 'वॉटर'मध्ये लिसा रे आनंद शोधायचा प्रयत्न करते, पण कमी पडते; किमान त्या लहान मुलीच्या भविष्याबद्दल आशा वाटते. 'अर्थ'मध्ये नंदिता दास देशोधडीला लागते (आणि राहुल खन्ना मरतोच).
Permalink Submitted by क्रेमर on बुधवार, 19/08/2020 - 01:43.
चांगली मालिका आहे. उत्तर भारतातल्या गून्हेगारीचे विविध जातीय, भौगोलिक आणि निव्वळ मानवी कंगोरे छान आहे. नोंद घेऊन पाहण्यासारखी. शेवट अर्थातच बकवास पण तो आताशा मला माध्यमाचाच प्रॉब्लेम वाटायला लागला आहे.
Permalink Submitted by तिरशिंगराव on बुधवार, 16/09/2020 - 17:08.
आज Turtles.Can.Fly.(Lakposhtha Parvaz Mikonand).2004 हा इराणी-इराकी चित्रपट पाहिला. सद्दामच्या पतनापूर्वी कुर्डिश-इराण सीमेवर च्या रेफ्युजी कँपमधल्या अनाथ, काही विकलांग मुलांची ही मन हेलावून टाकणारी कथा आहे. त्यातील निरागस मुलांचे चेहेरे विसरणं अशक्य आहे.
आजवर अनेक प्रकारच्या अनुभवांमुळे आपले मन निबर झाले आहे, अशी माझी समजूत होती. पण हा चित्रपट पाहिल्यावर तिला धक्का लागला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर पहावा. आता तो कुठे बघायला मिळतो, तर ॲमॅझॉन प्राईम वर आहे असं कळलं.
Permalink Submitted by अस्वल on गुरुवार, 17/09/2020 - 23:48.
हॉरर ह्या प्रकारात खास भारतीय काही म्हणोन बघायला मिळेल ह्या आशेने नेटफ्लिक्सावर "वेताळ"(बेताल) नामक सिरीज पाहिली.
भयानक बकवास.
मूळ आयड्या तशी बरी होती- पण कायच्या काय स्क्रीनप्ले.
-------------------------
घुल- आवडली मला, निदान पहिले १-२ भाग तरी.
--------------------------
Permalink Submitted by ऐसीचा जोकोविच on सोमवार, 21/09/2020 - 06:03.
Daraya: A Library under Bombs in Syria.
aljazeera.com >> witness >>Video documentary•
काही तरुण कुलुपबंद केलेल्या लाइब्रीतून पुस्तके काढून दुसरीकडे ठेवतात.( Barrel bombs सतत टाकले जातात, इमारती मोडतात,) खायला काही नाही तर पुस्तके कशाला वाचवताय? तरीही नेतात. पण शेवटी 'इडिअट'चे सैनिक दराया शहरातून नागरिकांना हाकलतात. काही जण तुर्की शहरात घुसतात. इकडे सैनिक ती लाइब्री शोधून ध्वस्त करतात.
Permalink Submitted by तिरशिंगराव on सोमवार, 21/09/2020 - 19:46.
पौगंडावस्थेत जेम्स बाँड या व्यक्तिरेखेचं आणि त्याच्या चित्रपटांचं आम्हाला फार आकर्षण होतं. सुरवातीचे सर्वच चित्रपट आम्ही आवर्जून पाहिले. तेंव्हा इंग्रजी संवाद समजण्याचा प्रश्न असल्यामुळे, ज्या चित्रपटांत अॅक्शन जास्त ते अधिक आवडायचे. त्यांत ती बाँडची स्टाईल, त्याचं ते मनीपेनीच्या समोर हॅट फेकणं, सुंदर ललनांची रेलचेल आणि त्याला मिळणारी स्पेशल आयुधं या सगळ्याचं एक जालिम मिश्रण तयार व्हायचं आणि त्याच्या धुंदीत, चित्रपट संपल्यावर तसल्याच भन्नाट वेगात आम्ही स्कूटर हाणायचो. संवाद फारसे न कळल्यानं स्टोरी कधीच पूर्ण कळायची नाही. तेंव्हा कशाला, आता इतकं वय वाढल्यावरही, प्रत्येक संवाद नीट ऐकू येतोय वा समजतोय, अशातली स्थिती नाही. पण आता सबटायटल्स हा प्रकार आल्यामुळे आमची कुचंबणा संपलीये.
तर सध्याच्या कोविडी परिस्थितीत, जुने पण न समजलेले आणि नवे इंग्रजी चित्रपट पहाण्याचा धडाका लावला. बरेचसे गंभीर आणि आशयघन, समीक्षकांनी नावाजलेले चित्रपट पाहिल्यावर एक प्रकारचा मानसिक शीण आला. मग ठरवले, आता पुन्हा एकदा ते बाँडपट सुरवातीपासून पाहू. त्याप्रमाणे, अगदी डॉ. नो पासून ओळीने पहायला सुरवात केली. पण सातव्या 'डायमंडस आर फॉरेव्हर' पर्यंतच प्रचंड कंटाळा आला. तरुण वयांत, स्टोरी समजत नव्हती तेच बरं होतं असं वाटायला लागलं. इतके बालिश चित्रपट आपल्याला का आवडायचे आणि शॉन कोनेरी श्रेष्ठ की रॉजर मूर यावर आपण किती हिरीरीने चर्चा केली होती ते आठवून हंसु यायला लागले. तशाच प्रकारच्या समकालीन हिंदी चित्रपटांची आपण (निव्वळ स्टोरी समजल्यामुळे) टिंगल करायचो आणि बाँड चित्रपटांपुढे त्यांना हास्यास्पद मानायचो याचेही आता आश्चर्य वाटते. तरीही घेतला वसा टाकणार नाही, या उक्तीप्रमाणे, उरलेले सर्व बाँड चित्रपट नेटाने पहायचेच असा दृढ निश्चय सध्या तरी केलेला आहे. बघु या, हा कोरोना आम्हाला काय काय करायला लावतो ते!
Permalink Submitted by ऐसीचा जोकोविच on सोमवार, 21/09/2020 - 19:56.
MNX चानेलवर दोन महिन्यांपूर्वी पाहिले पुन्हा. पळापळी >>कार्स,- बोट-हेकॉ- विमानं- स्की-फायरब्रिगेडची वाहनं-मोटरसायकल-बलून-प्यारशूटस मधून. मजा.
आणि तो लोखंडी दातवाला ( मूनरेकरमध्ये कंटाळवाणा होता) .
ग्याजेट्सची गंमत संपली पण ही मात्र आहे.
बोजॅक हॉर्समन
बोजॅकचे अंतिम पर्व पहिले. आतापर्यंत पाहिलेल्या कुठल्याही मालिकेपेक्षा बोजॅक सोबत भावनिक बंध जास्त तयार झाला. सगळ्या पत्रांमध्ये आपला अंश सापडत गेला मला.पहिल्या एपिसोडमध्ये अतिशय बाष्कळ आणि बकवास वाटणारी हि मालिका अतिशय जास्त आवडून गेली.
बोजॅक मधील गाणी-
Take me down easy
Horse with no name
Back in the 90's
Sea of dreams
Judah's song
Impossible
Mr.blue
यातील "take me down easy, horse with no name, Mr. Blue, impossible" अगदी सुदंर आणि न चुकवण्यासारखी गाणी आहेत.
लंपन
मला तुमचे नाव अतिशय आवडते...!
सही एकदम बेष्ट आहे!
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
प्रकाश नारायण संत यांचे पात्र
प्रकाश नारायण संत यांचे पात्र लंपन ना?
हो
हो
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
मिसनथ्रोपास
मानवी नाव आवडते?
???
'लंपन' हे नाव मानवी आहे???
तेवढे ते एक प्रकाश नारायण संतांचे पात्र वगळल्यास, आख्ख्या त्रिभुवनात 'लंपन' असे नाव कोणा मानवास त्याच्या जन्मदात्यांकडून दिले गेल्याचा किमान एक तरी दाखला आपणांस ठाऊक आहे काय?
मानवी नाव
जन्मदात्यांकडूनच दिले जावे असा काही नियम/कायदा आहे?
नाही
आत्याकडूनसुद्धा दिले जाऊ शकते.
अवांतर
त्याचं खर नाव वेगळं आहे.
-------------------------------------------
माझ्या लेकाचं (पुढे मागे जेव्हा केव्हा होइल तेव्हा) नाव मी लंपन ठेवणार आहे.
तुम्हास एक दाखला मिळेल
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
हे कुठे आले आहे? लंपनचे सगळे
हे कुठे आले आहे? लंपनचे सगळे नातेवाईक, शिक्षक, मित्र त्याला लंपनच म्हणतात सर्व कथांत. की इतरत्र कुठे हा रेफरन्स आलाय?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
हो
बऱ्याच ठिकाणी आहे. लंपन तंद्रीत असल्यामुळे त्याला हाक मारलेली कळलीच नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. मनीने त्यांना माझं खरं नाव सांगितलं असंही लिहीलेलं आहे.
Hope is for sissies.
पण...
... ते 'खरे नाव' काय, त्याचा गौप्यस्फोट कोठे केला आहे काय?
..........
बाकी, 'लंपन' या विशेषनामाची व्युत्पत्ती काय असावी? Lumpen या इंग्रजी शब्दावरून तर नव्हे? (पण मग हे त्या बिचाऱ्या लंपूकरिता अपमानास्पद आहे. कित्ती कित्ती गोड मुलगा आहे तो! त्याला असे म्हणायचे?)
माहीत नाही
त्याचे खरे नाव कुठेही लिहिलेले नाही.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
त्याचं खरं नाव लंबोदर पनवेलकर
त्याचं खरं नाव लंबोदर पनवेलकर होतं. पण शाळेत हजेरी घेताना गुर्जीनीच 'लंपन' केलं. मग तेच चिकटलं. आणि तो खूप चौकस, आज्ञाधारक, असल्याने सगळीकडे आदराने वागवला जायचा. ( लंबोदरच तो)
( लंबोदर पटवर्धन असतं तर 'पट्या' मात्र प्वोरांनी केलं असतं. )
ईईईईईईईईईईईईईईईईईईई!!!!!!
इतक्या गोड मुलाचे नाव 'लंबोदर' ठेवायचे??????
आत्या गणेशभक्त असल्याने ते
आत्या गणेशभक्त असल्याने ते सुचवलं.
हे मिसनथ्रोप काय प्रकरण आहे
हे मिसनथ्रोप काय प्रकरण आहे याची व्युत्पत्ती कळेल का?
मला वाटतं अर्थ - माणूसघाणा
मला वाटतं अर्थ - माणूसघाणा स्वभाव.
ते झालं, पण हे नाव घेण्याचा
ते झालं, पण हे नाव घेण्याचा उद्देश.
आता
मला वाटतं अर्थ - माणूसघाणा स्वभाव.
आता मला ति.मि. नांव घ्यावं लागेल!
आय लॉस्ट माय बॉडी
नेटफ्लिक्सवर आय लॉस्ट माय बॉडी ही ॲनिमेशन फिल्म पाहिली. ऑस्कर नॉमिनेशन होतं. गुंतागुंतीची रोमँटिक फिल्म म्हणून आवडली.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अमेरिकन फॅक्टरी
ह्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचं ऑस्कर मिळवणारी 'अमेरिकन फॅक्टरी' बघितली. बंद पडलेला एक अमेरिकन कारखाना चिनी कंपनी विकत घेते आणि मग त्यातून दोन संस्कृतींतले फरक, शोषण आणि भांडवलशाहीचे पैलू दिसतात ते रोचक आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१
ह्या आस्करची आणि माझी मतं जुळतात!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
होय छान डॉक्युमेंटरी आहे ती.
होय छान डॉक्युमेंटरी आहे ती.
Modi: Last Week Tonight with John Oliver
अलीकडे हे पाहिलं -
Modi: Last Week Tonight with John Oliver (HBO)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हां हे एक पहायला हवे. जॉन
हां हे एक पहायला हवे. जॉन ऑलिव्हर आवडतो.
कर्क डगलसचा स्पार्टाकस...बघितला...
गेल्या आठवड्यात कर्क डगलस गेला...अनपेक्षितपणे टेलिग्रामवर स्पार्टाकस आणि द बेड एंड द ब्यूटीफुल हे चित्रपट सापडले...
आधी द बेड एंड द ब्यूटीफुल डाउनलोड केला...आणि रात्री कामावरून घरी परतत्यावर एका बैठकीत बघून काढला...खूप वर्षानंतर हा चित्रपट पुन्हां बघायला मिळाला...
त्याच प्रमाणे स्पार्टाकस...बघितला...सव्वा तीन तासांचा चित्रपट दोन बैठकीत पूर्ण झाला...चित्रपटाची प्रत छान होती...सर लारेंस ऑलिव्हिएला बघतांना डोळयांचा पारणं फिटलं...स्पार्टाकसच्या बायकोशी बोलतांना त्याचा चेहरा बघण्यासारखा होता...स्पार्टाकस मेला की नाही...याची खात्री करतांना त्याचे हावभाव तर त्याच्या नैसर्गिक अभिनयाची जणूं पावतीच होते...
आता एक जुनी आठवण
काही वर्षांपूर्वी 75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेजवर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकलनी लिफाफा आपल्या बापाला दिला.
ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं-
‘एंड दि ऑस्कर गोज टू...’
तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढला, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’
फार पूर्वी त्याचा ‘दि बोल्ड एंड दि ब्यूटीफुल’ बघतांना नकळत गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ हा चित्रपट आठवला होता. विन्सेंट व्हेन गॉगच्या जीवनावर आधारित ‘दि लस्ट फॉर लाइफ’ देखील अप्रतिम होता. यात त्याचा सोबत एंथनी क्वीन होता...ही सगळी हॉलीवुडची दादा मंडळी...
रवींद्र दत्तात्रय तेलंग
हा अशक्य मुर्ख़पणा पाहीला आणि
हा अशक्य मुर्ख़पणा पाहीला आणि भर आफिसात ख्या ख्या करत बसलेय
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
सैराट शिनिमातली रिंकू मालिकेत
सैराट शिनिमातली रिंकू मालिकेत येणार आणि ट्रेंड बदलणार.
मुर्खांना याचा बदला विद्रोही
मुर्खांना याचा बदला विद्रोही चित्रपट, नाट्य सृष्टी निर्माण करुन घेता येत नाही का? उगाच ब्राह्मणांना दोष देत बसायचं. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असं विभाजन करून टाकायचे.
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
स्टॅटिस्टिकली डहाके म्हणतात
स्टॅटिस्टिकली डहाके म्हणतात ते खरं आहे; आणि विद्रोही चित्र-नाट्य सृष्टी करायला सांगताय म्हणजे तुम्हालाही ते मान्य आहे असं दिसतंय.
मग मूर्खपणा नक्की काय त्यांचा ते कळले नाही.
सैराट येण्यापूर्वी सुबोध भावेंच्या एका मुलाखतीत त्यांनी प्रेक्षक मराठी नाटकं व चित्रपट जास्त पाहात नाहीत अशी तक्रार केल्याचे ऐकले होते; तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की महाराष्ट्राची लोकसंख्या १२० मिलियन असताना त्यातले दहा टक्केही लोक का फिरकत नाहीत मराठी सिनेमा पाहायला? काहीतरी डिसकनेक्ट नक्कीच आहे.
असो.
कपिल मिश्रा
माणसाने विचारसरणीला चिकटून राहू नये अगदी कपिल मिश्रासारखे.
https://www.youtube.com/watch?v=xDD1O8hZQ7U
यात आलेले स्कूपव्हूपचे व्हिडिओज पाहिले.
एर्हवी हा माणूस (स्कुपव्हुप चा संमदीश) वादविवादाच्या दोनही बाजूच्यांची हसत खेळत फिरकी घेणारा, पण प्रथमच इतका सिरिअस झालेला पाहिला. न्यू इंडियाच्या राजधानीच्या लॉ एण्ड ऑर्डर गाथा.
https://www.youtube.com/watch?v=WrIxKBryiBo
https://www.youtube.com/watch?v=B0q8welJ18U
सरकारी पाळत
https://www.youtube.com/watch?v=awfoSQ0mVGg
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ज्या प्रभावी पद्धतीने चायनाने रोग प्रसार आटोक्यात आणला त्यामुळे सरकारांनी लोकांवर कितपत पाळत ठेवायची आणि त्याचा वापर कसा करायचा हा मुद्दा आता चर्चिला जाईल.
वर्षानुवर्षाच्या ऑथरेटरीअन व्यवस्थेमुळेपण चायनिज लोकांची जडणघडण पण अशी आहे की, नागरिस्वातंत्र्यापेक्षा सरकारच्या पाळत ठेवण्याला ते जास्त पसंती देतील, पण पाश्चिमात्य सहज तयार होतील असे वाटत नाही.
पानिपत
करोना व्हायरसच्या चर्चा ऐकून वाचून फार कंटाळा आला. तेवढ्यात फेसबुकवर कोणी तरी 'द अफेअर' नेटफ्लिक्सवर आल्याचं म्हणालं. म्हणून हौसेनं बघायला गेले तर अमेरिकेत नाहीच. भारतात असणार. ते बघाच.
तरीही चटपटीत काही हवंच होतं. म्हणून 'पानिपत' लावला. डोकं बाजूला ठेवून बघायचा असेल तर उत्तम आहे. क्रिती सनोन छान दिसते; अधूनमधून अर्जुन कपूर आणि क्रिती सनोन मावळेछाप मुंड्या हलवतात. सर्वसाधारणपणे अमराठी लोक मराठी लोकांना किंवा अभारतीय लोक भारतीयांना विचारतात, 'तुम्ही अशी मान का हलवता?' आणि मी कुणालाही अशी मान हलवताना बघितलेलं नसतं. क्रिती सनोन आणि अर्जुन कपूर जितपत मराठी बोलतात, ते वाईट नाही. काही हिंदी वाक्यांची रचनाही इंग्लिशप्रणित वाटली.
संजय दत्त वाईट नट आहे. त्यातून अब्दाली फारच बटबटीत रंगवलाय. आशुतोष गोवारीकर एकेकाळी ठीक वाटला होता. गश्मीर महाजनी भीषण अगोचर वाटतो; त्याच्यापेक्षा रविंद्र महाजनी, अत्यंत सुरकुतलेला असूनही बरा दिसतो. नजीबचं काम करणारा छाने. बाजीराव-मस्तानीचा मुलगा दाखवलेला समशेर बर्फी आहे! समशेरला अजिबातच मराठी बोलताना दाखवलेला नाही, हे अत्यंत विनोदी वाटतं. मराठी लोक मुस्लिम नाव ऐकलं की भस्सकन हिंदी फाडायला सुरुवात करतात, ते सिनेमातही घेऊन जायची गरज नव्हती.
पॉपकॉर्न, बटाटेवडे, गरमागरम चहा, भजी वगैरे घेऊन 'पानिपत' बघायला हरकत नाही. मात्र देवनागरी टंक बघू नका; घाणेरडा मंगल वापरलाय! १ कोट खर्च केले पण चांगला देवनागरी टंक नाही सापडला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गिल्टी - बाप रे! दाहक सिनेमा
गिल्टी - बाप रे! दाहक सिनेमा आहे. #मीटू वाला.
लाल कप्तान
फार न चर्चिला गेलेला सैफ अली खानचा लाल कप्तान पाहीला. ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
Parasite
Parasite बघितला.अगदीच सुंदर सिनेमा आहे. सुरुवातीला हलकाफुलका वाटणारा सिनेमा नंतर अंगावर येतो. जोकर, फँड्री आणि parasite तिन्ही सिनेमे अगदी वेगवेगळे असले तरी कुठंतरी खोलवर साम्य आहे असं जाणवतं.
.
हेमंत कर्णिकांनी हा सिनेमा इफ्फीत बघितला, त्याबद्दल 'ऐसी'वर लिहिलं होतं - दुवा
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पॅरासाइट चित्रपटावर लेख वाचला
पॅरासाइट चित्रपटावर लेख वाचला होता बहुतेक मायबोलीवर.
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
व्हायरल सिनेमा
करोनाच्या निमित्तानं काही साथीच्या रोगांवरचे सिनेमे पाहायचे असतील तर शिफारशी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काल 'ब्रिटनी रन्स मॅरॅथॉन'
काल 'ब्रिटनी रन्स मॅरॅथॉन' नावाचा प्रेरणादायक सिनेमा पाहीला.
'हु किलड गांधी' - ॲमेझॉनवरती.
'हु किलड गांधी' - ॲमेझॉनवरती.
जोजो रॅबिट पाहिला. हसता हसता
जोजो रॅबिट पाहिला. हसता हसता अंतर्मुख वगैरे. फारच छान!
मलाही अतिशय आवडला होता
मलाही अतिशय आवडला होता.विशेषतः भारतातील कोरोना पूर्व काळात (आणि कोरोनोत्तर थाळी दिवे काळात ) फारच चांगला वाटला .
Songs of sparrows
हा इराणी चित्रपट पाहिला. एका पापभीरु सामान्य इराणी माणसाची कथा उत्तम रंगवली आहे. शहांमृगांची देखभाल करणाऱ्या या बिचाऱ्याची क्षुल्लक कारणाने नोकरी जाते. पण कुटुंबावर प्रचंड प्रेम असलेला हा माणूस हिंमत न हारता , मिळेल ते काम करत रहातो. त्याचा चेहेरा चित्रपट संपल्यावरही अनेक दिवस मनांत घर करुन रहातो.
स्टार वॉर्स - मँडलोरिअन
'द मँडलोरिअन' संपवली. टाईमपास आहे. कथानक एंपायरच्या पाडावानंतर आणि न्यू रिपब्लिकच्या सुरुवातीमध्ये घडतं. ही मालिका बहुधा योडाच्या वंशजाची कथा म्हणून पुढे जाईल.
स्टार वॉर्स - मँडलोरिअन
मला फार आवडली. विशेषत: शेवटचे तीन एपिसोड. दर दोन वर्षांनी चित्रपटाचा रतीब पाडण्यापेक्षा हे भारीय. डिस्ने+ साठी डिस्नेने हे केलं, परंतु पुढचं सगळं सपक होऊ नये म्हणजे मिळवलं.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
'contagion' हा २०११ साली बनलेला सिनेमा पाहिला.
'contagion' हा २०११ साली बनलेला सिनेमा पाहिला. सध्याच्या साथीचे आणि चित्रपटातील तपशील आश्चर्यकारक रित्या जुळताहेत. चित्रपट बनविणारे भविष्यदर्शी आहेत असेच म्हणावे लागेल.
कुंभलुंगी नाईट (मल्याळी).
कुंभलुंगी नाईट (मल्याळी). खलनायक-नायक नसलेला एक निखळ सिनेमा. चार भाऊ ज्यांचे आई वडील वेगवेगळे आहेत कसे सोबत राहतात याविषयी ही कथा आहे. शूटिंग चे लोकेशन सुद्धा भारी आहेत.
कुंभलंगी नाईट्स (मल्याळी) : कालच पाहिला
एका शांत मध्य लयीत उलगडत जाणारी कथा, बाक्या प्रसंगात अतिशय कौशल्याने पेरलेले पण गांभीर्य अजिबात न उणावणारे विनोद, सहज साधे संवाद, संकलनातला सफाईदारपणा, अत्यंत मस्त प्रकाशयोजना-केरळच्या बॅकवॉटर्सचा पुरेपूर आणि पर्यटनी नसलेला यथोचित वापर, संयत पण अबोअरिंग संगीत आणि गाणी, उत्तम अभिनेते. खूप आवडला हा चित्रपट. (प्राईम वरती आहे).
हे आवडलेले एक गाणे :
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
Postmen In The Mountains
हा अत्यन्त हृदयस्पर्शी आणि साधा पण परिणामकारक चित्रपट पाहिला. चायनीज चित्रपट म्हणजे कुंग फू, हाणामाऱ्या आणि सुमार अभिनय असा उगाचच गैरसमज झाला होता. अप्र्तिम अभिनय आणि सुंदर चिनी कंट्रीसाईड पहाण्यासाठी जरुर पहावा.
कुठे पाहिलात? Amazon Prime
कुठे पाहिलात? Amazon Prime/Netflix?
घरी
मी कुठल्याच प्रायव्हेट चॅनेल्सचा ग्राहक नाही. कोणी एखादा उत्तम चित्रपट सांगितला की नेटवरुन पहातो. चित्रपट अवश्य पहाण्यासारखा आहे.
नंतर चेक केल्यावर कळलं की तो यू ट्युबवर पण उपलब्ध आहे. तिथे तो सहजच बघता येईल.
Super Delux
Super Delux
तामिळ सिनेमा. काहीसा dark आहे असं वाटत असतानाच....स्पॉयलर नको.
Transgender वडील, त्सुनामीत वाचल्याने देवभक्त झालेले वडील व porn चित्रपटात काम करणारी आई, प्रणयप्रसंगी प्रियकराचा मृत्यू झाल्यामुळे अडचणीत सापडलेली बायको, चार किशोरवयीन मुलं अशा समांतर कथा गुंफलेल्या आहेत. सामाजिक म्हणावेत असे मुद्दे मांडलेले असूनही कुठलाही आव आणलेला नाही. ही आर्ट फिल्म नाही, पण बटबटीत रंजन करणारा पिक्चरही नाही.
चोकड
कश्यपचा चोक्ड -पाहिला.
चित्रपट म्हणून काही खास नवीन नाही- बराचसा ओके वाटला.
पण त्यात निश्चलनीकरणाचे उल्लेख, त्याची पार्श्वभूमी आणि मोदींना उघड संबोधलेलं पाहून आनंद जाहला.
इतका मोठा तुघ्लकी निर्णय- त्याबद्दल खरं तर डॉक्युमेंटरीज असायला पाहिजेत.
चित्रपटात उल्लेख झाला हेही नसे थोडके.
तेव्हा नेटफ्लिक्स/प्राईम वगैरे वापरून उत्तम आणि उघड राजकीय संदर्भांविषयी भाष्य करणाऱे चित्रपट /सिरीज आले तर आवडेल बघायला.
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
बायसड असेल अथवा नसेल
अन्या अँटी मोदी शिक्का बसलेला असल्याने त्याचे चोकड, भावेश जोशी सुपरहिरो वगैरे चित्रपट मनोरंजनापलीकडे घेणे मी तरी टाळतो
खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.
वाह्यात आणि आगाऊ सिनेमा
'द स्पाय हू डंप्ड मी' नावाचा वाह्यात सिनेमा हुलूवर बघितला.
केट मकिनॉन आणि मिला कुनिस मुख्या भूमिकांत आहेत. संपूर्ण सिनेमा ॲक्शन सिनेमा, जेम्स बाँडचे सिनेमे, माचोपणा, सगळ्याची वाह्यात टिंगल आहे. दोन जीवाभावाच्या मैत्रिणी आणि त्यांचं न्यूरॉटिसिझम ह्याची गमतीशीर फोडणी त्याला आहे. मारामारी, जोरदार गाड्या पळवणं, हाणामारीचं अक्रोबॅटिक्स, हे सगळं आहे; केट मकिनॉन नेहमीप्रमाणे भीषण वाह्यात आहे. मोजके काही वगळण्यासारखे प्रसंग वगळता कुणीही कुणालाही अजिबात सिरीयसली घेत नाहीत!
करमणुकीची पूर्ण खात्री! सिनेमा जरूर पाहा.
केट मकिनॉनचे काही प्रसंग बघताना लुईस बुन्युएलच्या सिनेमांची आठवण झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डार्क
'डार्क' या जर्मन सायफाय / गूढ मालिकेचे कुणी फॅन्स आहेत का इथे? शेवटचा सीझन नुकताच नेटफ्लिक्सवर आला आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
स्पॉयलर
पाहिला. फारसा नाही आवडला. बराचसा सुसंगत असलेला कालप्रवास हे डार्क आवडण्याचे मुख्य कारण होते. इथे त्यालाच तिलांजली दिली आहे. वर गुंतागुंत हाताबाहेर जाऊ लागल्यावर नवीन विश्वे काढणे ह्या पळवाटीमुळे चिडचिड झाली. तुम्हांला कसा वाटला?
सूत्र
मला मुळात त्यातलं मुख्य सूत्र - कितीही वेळा जगता आलं तरी लोक त्याच त्याच चुका करतात / तेच तेच पर्याय निवडून त्याच वास्तवात अडकतात, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट पडतात, मूळ प्रेरणा बाजूला सारून वागावं लागतं आणि अक्कल चालवावी लागते - ठसवण्यासाठी त्या समांतर वास्तवांचा चांगला उपयोग केला असं वाटतं.
अशाच सूत्राच्या पायावर उभी, पण कमी पात्रं, कमी ॲक्शन असलेली आणि अधिक काव्यात्म असलेली रशियन फिल्म - सोलॅरिस.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
किवा कमी पात्रे, आणि तेवढेच(
किवा कमी पात्रे, आणि तेवढेच( किंवा कांकणभर जास्त) नाट्य: netflix-Predestination. https://youtu.be/vnQdZQ7DyQA
The Journey Is the Reward...
प्रीडेस्टिनेशन आणि डार्क
प्रीडेस्टिनेशन तशी वाईट नाही, पण काही बाबतीत डार्क वरचढ ठरते - वेगवेगळी कुटुंबं आणि प्रत्येक कुटुंबाच्या काही पिढ्या घेतल्यामुळे आई-बाप-मुलं ह्यांच्या संबंधांतले अनेकविध घटक त्यात दाखवता आले आहेत. शिवाय प्रेमाच्या विविध छटा आणि एकंदर मनुष्यस्वभावाच्या विविध छटाही त्यात आहेत. त्या सगळ्याचा एकत्र विचार करता त्यात त्यांना तत्त्वचिंतनात्मक मांडणीही करता आली आहे. 'प्रीडेस्टिनेशन'मधली ही त्रुटी आहे असं म्हणता येणार नाही, (कारण त्याचा फोकस वेगळा आहे) पण डार्क त्यामुळे एपिकसारखी बघता येते आणि ती शक्यताच 'प्रीडेस्टिनेशन'मध्ये नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मान्य. सूत्र सारखेच
मान्य. सूत्र सारखेच असण्याविषयी होता तो प्रतिसाद.
The Journey Is the Reward...
टाइम मशीन , टाइम लूप , portal to another dimension, space-time
टाइम मशीन , टाइम लूप , portal to another dimension, space-time continuum glitch असलं काही आवडत असेल तर नेटफ्लिक्स वर mirage हा सिनेमा आणि Dirk Gently's Holistic Detective Agency हि वेब सिरीज बघा. Dirk Gently's Holistic Detective Agency हि इतकी अचाट आणि अतर्क्य पण बघायला मजा आली .
दीपा मेहता
दीपा मेहताचे चित्रपट आले तेंव्हा वादाच्या भोवऱ्यांत सापडले त्यामुळे बघता आले नाहीत. म्हणून आता नेटवर शोध घेऊन बघितले.
वॉटर : चित्रपट आवडला पण तो आत्ताच्या काळात किती रिलेव्हंट आहे असा प्रश्न पडला. त्यांतल्या लहान मुलीचे काम फारच उत्तम झाले आहे.
फायर : शबाना आणि नंदिता दासची कामे उत्तम. पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देणारी चांगली कलाकृती.
अर्थ १९४७: या चित्रपटात दीपा मेहेताचा हिंदुंविषयीचा बायस दिसून आला. कथा लाहोर मध्ये घडत असताना तिथे शीख समुदाय दंगा करुन मुसलमानांना मारताना दाखवले आहेत ते पटले नाही. अत्याचार दोन्ही बाजूंनी झाले, पण ते आपापल्या प्रदेशांत. प्रेतांनी भरलेली रेल्वे लाहोरला आलेली दाखवली आहे, पण अशाच ट्रेन भारतात पण आल्या होत्या, त्याबद्दल अवाक्षर नाही.
मिडनाईट्स चिल्ड्रेन : ही सलमान रश्दीची कथा फँटसी आणि वास्तवाचे मिश्रण आहे. पण यातही, भारत म्हणजे गारुडी आणि जादुचे खेळ करणारे असा पाश्चिमात्य लोकांचा समज दृढ होईल असे चित्रण आहे. इतिहास दाखवण्याच्या ओघात, बांगलादेशचे युद्ध आणि इंदिरा गांधींची आणीबाणी दाखवली आहे. आणीबाणीवरची टीका ठीक पण इंदिराजींचे चित्रण विकृत वाटते. आत्ताच्या काळात जर हा भारतात दाखवला तर बहुधा हिंदुत्ववादी त्याविरुद्ध फतवा काढतील!
हा सिनेमा पहायचा आहे. मी
हा सिनेमा पहायचा आहे. मी पूर्वी एकदा शोधला होता मला वाटतं नेटफ्लिक्स वरती पण नव्हता. विधवांना गंगेच्या काठावरती सोडून कुटुंबिय निघून जातात त्यावर आह्जे ना?
माझं मत
मी हे सिनेमे बघून काळ लोटला. त्यामुळे तपशिलाच्या चुका असतील.
समाजानं टाकून दिलेल्या लहान मुलीचा निरागसपणा जपणाऱ्या स्त्रिया स्वतः दडपलेल्या असतात; तरीही त्या मुलीसाठी क्वचित स्वतःच्या स्वार्थाचा त्याग त्या करतात. हे वर्तन कधीही कालबाह्य होऊ नये, असं मला मनापासून वाटतं. पण सध्याच्या काळात ते पुरेसं जपलं जात नाही अशी भीती वाटते.
आणि अजूनही 'आमच्यात असंच करतात' म्हणत, विशेषतः लग्न केलेल्या बायकांना दडपण्याचे प्रकार सुरू असतातच. जीव जात नसेल म्हणून स्वातंत्र्यावर गदा येत नाही, असं नाही.
राहुल खन्नाचं हिंदू पात्र ज्या पद्धतीनं मरतं, नंदिता दासच्या हिंदू पात्राचे जे धिंडवडे निघतात; आणि त्याची जबाबदारी काही अंशी आमीर खानच्या मुसलमान पात्राचीही असते. विशेषतः अतिशय क्षुद्र कारणासाठी तो सूड घेतो आणि त्यात परिस्थितीचा गैरफायदा घेतो. आपल्या मित्र-मैत्रिणीला वाचवणं शक्य असूनही, तो उलट त्यांना जमावाच्या हातात देतो. ह्यातही हिंदूद्वेष दिसतो?
मला ह्यात माणसाच्या क्षुद्रपणामुळे होरपळणारी माणसं दिसली.
हल्ली मला प्रश्न पडायला लागला आहे. मी माझं आयुष्य माझ्या बुद्धीनुसार जगते. पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देण्याचा प्रयत्न मी का करू? ते काम आपसूकच त्या संस्कृतीचे पाईक करतात. आता मला फायर तसा वाटतो. त्या दोघींना रूढ, चाकोरीत आनंद मिळत नाही, मग त्या आपला आनंद शोधतात. ह्यात बाकीचे भोपळे त्यांना सहन करू शकत नाहीत, तर त्याची जबाबदारी त्यांची!
चौथा सिनेमा मी बघितलेला नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हसन
राहुल खन्नाचं हिंदू पात्र ज्या पद्धतीनं मरतं,
राहुल खन्नाने यांत हसन चं काम केलं आहे. नंदिता दासशी लग्न करण्यासाठी तो भारतात पळून जाऊन हिंदु व्हायला तयार असतो. नंदिता दास ह्या एकाच पात्राचा शेवटी छळ दाखवला आहे. असो. चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते.
बरोबर
त्यामुळे आता मला नवाच अर्थ लागला.
फाळणी ही मोठी आपत्ती होतीच. त्यासोबत बदला, द्वेष, हव्यास ह्या क्षुद्रपणामुळे समोरचा माणूस आपला मित्र आहे का, तो आपल्या धर्माचा आहे का, असा काहीही फरक पडत नाही. हा एक अर्थ. आणि दुसरा, मुसलमानांच्या धार्मिक बहुमताच्या क्षुद्र हव्यासापोटी (आमीर खानच्या पात्राचं क्षुद्र वर्तन) फाळणी घडली; त्यात आपलं आयुष्य जगणारे, सरळ, साधे लोक (राहुल खन्ना, नंदिता दासची पात्रं) बळी पडले.
सिनेमा कुणा माणसांची गोष्ट सांगतो; सिनेमा माहितीपट नसतो. इतिहासाचा एक भाग दाखवून दुसरा भाग वगळायची सिनेमाला, कथांना मुभा असते; माहितीपटांना नसते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हल्ली मला प्रश्न पडायला लागला
कारण तू ते करु शकतेस. प्रतिकार करण्याची क्षमता, बुद्धीमत्ता व शक्ती तुझ्यात आहे. नाहीतर दुर्बळ, भित्र्या स्त्रियाही असतात. 'मी का करु?' असा विचार करणाऱ्या सक्षम स्त्रिया या पुरुषप्रधानतेकडे दुर्लक्ष करतात म्हणुन ती सोकावते तर दुर्बळ स्त्रिया निमूटपणे बळी जातात म्हणुन ती सोकावते. मग फरक तो काय राहीला?
मला हे मान्य आहे की त्यात, भोपळ्यांना विरोध करण्यात तुझी उर्जा जाते, खूप मनस्ताप होतो. लष्कराच्या भाकऱ्या प्रकार आहे तो. वर नवे भोपळे व नवे दुर्बल घटक जन्म घेतच रहातात. कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखं अनंत, अनएंडींग आहे ते. माझ्याकडेही उत्तर नाही. तुझ्या लाठीने साप मारणे - हे काही उत्तर नाही.
एक्स्क्यूज़ मी...
त्या ते करू शकतात, याचा अर्थ ते करण्याची (आणि/किंवा, टू पॅराफ्रेज़ पु.ल., भारतमातेच्या डोळ्यांतले अश्रू पुसण्याची) त्यांच्यावर नैतिक जबाबदारी आहे / त्यांचे ते घटनात्मक कर्तव्य आहे / स्त्रीजातीच्या त्याच एकमेव तारणकर्त्या असल्याकारणाने अशी नैतिक जबाबदारी अधिक घटनात्मक कर्तव्य त्यांच्याच एकटीच्या खांद्यावर आहे, असा नव्हे.
(थोडक्यात, त्यांची मर्जी.)
(त्यांना वाटेल - किंवा गरज भासेल - तेव्हा त्या करतीलच. (चूभूद्याघ्या.) त्या वेळी आलात, तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना. (पुन्हा, चूभूद्याघ्या.) आहे काय, नि नाही काय?)
(शिवाय, टू पॅराफ्रेज़ पु.ल. अगेन, ही भारतमाता ज्या दिवशी अश्रू ढाळण्याचा आपला एककलमी कार्यक्रम सोडून नातवंडांना अंगाखांद्यांवर खेळवेल, नाहीतर कीर्तनाला जाऊन बसेल, त्या दिवशी, इ.इ.)
'मी का करू?' असा विचार करणाऱ्या सक्षम स्त्रियांमुळे पुरुषप्रधानता सोकावत नसावी. (त्या तशाही दुर्लक्ष करत नसाव्यात. आपल्यापुरती / आपल्यावर वेळ आल्यास सक्षमपणे टक्कर देतच असाव्यात.) पुरुषप्रधानता सोकावत असावी, ती दुर्बळ स्त्रिया गप्प बसल्यामुळे. (चूभूद्याघ्या.)
सबब, गप्प न बसण्याची जबाबदारी ही (प्राथमिकत: किंवा सर्वस्वी) दुर्बळ स्त्रियांवर आहे.
(हं, आता, गप्प बसणाऱ्या दुर्बळ स्त्रियांबरोबर कॉमन कॉज़ करून स्ट्रेंग्थ इन नंबर्स वाढवण्यात सक्षम स्त्रियांचासुद्धा फायदा असू शकतो, नाही असे नाही. परंतु म्हणून त्यांची ती गरज असेलच, असे नव्हे, तथा त्यांच्यावर ती जबाबदारी असण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही. उलटपक्षी, सक्षम स्त्रियांबरोबर (त्या उपलब्ध तथा इच्छुक असल्यास) कॉमन कॉज़ करून आपला फायदा करून घेणे ही दुर्बळ स्त्रियांकरिता स्ट्रॅटेजी म्हणून जरी वाईट नसली, तरी (उपलब्ध तथा इच्छुक) सक्षम स्त्रियांवर त्यांनी त्याकरिता विसंबून राहणे ही स्ट्रॅटेजी होऊ शकत नाही. सक्षम स्त्रिया ती जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक (तथा उपलब्ध) आहेत, असे जरी मानले, तरी त्यांच्यावरील ती जबाबदारी नव्हे. शेवटी ज्याचातिचा पार्श्वभाग ज्यानेतिनेच पुसावा लागतो.)
मी तर म्हणेन झ** गाढवे अंगावर घेण्याचा प्रकार आहे. त्यात फक्त अंगावर घेणाऱ्या/रीला लाथा बसतात.
लेट देम - फॉर वन्स! - लर्न टू फेंड फॉर / स्टार्ट फेंडिंग फॉर देमसेल्व्ह्ज़.
असो. मी काही अदितीचे (किंवा दुबळ्या/सक्षम कोणत्याही स्ट्राइपच्या स्त्रियांचे - किंवा फॉर्दॅट्मॅटर पुरुषांचेसुद्धा) वकीलपत्र घेतलेले नाही. सबब, इथेच थांबतो. (केवळ दुपारीदुपारी गब्बर चावल्यासारखे करण्याची हुक्की आली, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.)
'फायर' निराळा का वाटतो?
aww, that's so sweet to admit!
सामो, मला म्हणायचंय ते असं की, भोपळ्यांना किंवा पुरुषप्रधानतेला धक्का लावण्याच्या हेतूनं मी गोष्टी करत नाही. मला आनंद मिळतो; मला डांबरटपणा करावासा वाटतो, म्हणून मी काही गोष्टी करते. त्यातून ढुढ्ढाचार्यांना त्रास झाला तर बोनस, पण माझा हेतू तो नसतो.
'फायर' हा सिनेमा त्या दोघींनी आपला आनंद शोधण्याबद्दल आहे. पण मुळात त्यांचा हेतू एकत्रपणे आनंद शोधण्याचा नसतो. त्यांनी पुरुषांशी लग्न केलेलं असतं. ते पुरुष आणि समाजव्यवस्था कमी पडतात म्हणून त्यांना पर्याय शोधावा लागतो. म्हणजे मूळ व्यवस्था अन्याय्य नसती तर त्यांना स्वतंत्र, निराळा विचार करण्याची गरज पडली नसती. त्यांचा हेतू आनंद शोधणं आहे; त्यात जाताजाता पुरुषप्रधानतेला धक्का लागला, लाथा बसल्या तर बोनस. त्या आनंद शोधत राहिल्यामुळे बळी (व्हिक्टिम) राहत नाहीत. मला ती बाब आवडते.
'१९४७ अर्थ' आणि 'वॉटर'च्या कथा तशा नाहीत. 'वॉटर'मध्ये लिसा रे आनंद शोधायचा प्रयत्न करते, पण कमी पडते; किमान त्या लहान मुलीच्या भविष्याबद्दल आशा वाटते. 'अर्थ'मध्ये नंदिता दास देशोधडीला लागते (आणि राहुल खन्ना मरतोच).
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पाताललोक
चांगली मालिका आहे. उत्तर भारतातल्या गून्हेगारीचे विविध जातीय, भौगोलिक आणि निव्वळ मानवी कंगोरे छान आहे. नोंद घेऊन पाहण्यासारखी. शेवट अर्थातच बकवास पण तो आताशा मला माध्यमाचाच प्रॉब्लेम वाटायला लागला आहे.
Turtles can fly
आज Turtles.Can.Fly.(Lakposhtha Parvaz Mikonand).2004 हा इराणी-इराकी चित्रपट पाहिला. सद्दामच्या पतनापूर्वी कुर्डिश-इराण सीमेवर च्या रेफ्युजी कँपमधल्या अनाथ, काही विकलांग मुलांची ही मन हेलावून टाकणारी कथा आहे. त्यातील निरागस मुलांचे चेहेरे विसरणं अशक्य आहे.
आजवर अनेक प्रकारच्या अनुभवांमुळे आपले मन निबर झाले आहे, अशी माझी समजूत होती. पण हा चित्रपट पाहिल्यावर तिला धक्का लागला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर पहावा. आता तो कुठे बघायला मिळतो, तर ॲमॅझॉन प्राईम वर आहे असं कळलं.
सुचवण्याखातर धन्यवाद
सुचवण्याखातर धन्यवाद
थप्पड
पाहिला. नाय आवडला.
जुना "द थिंग" बघितला. मस्त आहे. नेटफ्लिक्स वर "घुल" नावाची राधिका आपटे ची मालिका आहे, कल्पना "द थिंग" शी फारच मिळतीजुळती आहे.
हॉरर.
हॉरर ह्या प्रकारात खास भारतीय काही म्हणोन बघायला मिळेल ह्या आशेने नेटफ्लिक्सावर "वेताळ"(बेताल) नामक सिरीज पाहिली.
भयानक बकवास.
मूळ आयड्या तशी बरी होती- पण कायच्या काय स्क्रीनप्ले.
-------------------------
घुल- आवडली मला, निदान पहिले १-२ भाग तरी.
--------------------------
सध्या रोज क्रीपीपास्ता वाचतो. काही काही जबरी आहेत.
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
क्रिपिपास्ता
भारी असतात. मी वाचले नाहीत पण युट्युबवर ऐकतो.
हंगर नावाची ही कथा ऐकली तेव्हा एकदम आश्चर्य
/किळस/भीती वाटलेली.
मस्त!
ऐकली मी गोष्ट - आता हे आणखी एक सापडलं.
शिवाय ॲमेझॉनवर "लोर (Lore)" ही सिरीज पाहिली- तिचा पहिला सीझन आवडला.
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
Big Data : India
https://howindialives.com/gram
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
पुस्तके (एक सोडून) वाचणे हराम आहे.
Daraya: A Library under Bombs in Syria.
aljazeera.com >> witness >>Video documentary•
काही तरुण कुलुपबंद केलेल्या लाइब्रीतून पुस्तके काढून दुसरीकडे ठेवतात.( Barrel bombs सतत टाकले जातात, इमारती मोडतात,) खायला काही नाही तर पुस्तके कशाला वाचवताय? तरीही नेतात. पण शेवटी 'इडिअट'चे सैनिक दराया शहरातून नागरिकांना हाकलतात. काही जण तुर्की शहरात घुसतात. इकडे सैनिक ती लाइब्री शोधून ध्वस्त करतात.
James Bond revisited
पौगंडावस्थेत जेम्स बाँड या व्यक्तिरेखेचं आणि त्याच्या चित्रपटांचं आम्हाला फार आकर्षण होतं. सुरवातीचे सर्वच चित्रपट आम्ही आवर्जून पाहिले. तेंव्हा इंग्रजी संवाद समजण्याचा प्रश्न असल्यामुळे, ज्या चित्रपटांत अॅक्शन जास्त ते अधिक आवडायचे. त्यांत ती बाँडची स्टाईल, त्याचं ते मनीपेनीच्या समोर हॅट फेकणं, सुंदर ललनांची रेलचेल आणि त्याला मिळणारी स्पेशल आयुधं या सगळ्याचं एक जालिम मिश्रण तयार व्हायचं आणि त्याच्या धुंदीत, चित्रपट संपल्यावर तसल्याच भन्नाट वेगात आम्ही स्कूटर हाणायचो. संवाद फारसे न कळल्यानं स्टोरी कधीच पूर्ण कळायची नाही. तेंव्हा कशाला, आता इतकं वय वाढल्यावरही, प्रत्येक संवाद नीट ऐकू येतोय वा समजतोय, अशातली स्थिती नाही. पण आता सबटायटल्स हा प्रकार आल्यामुळे आमची कुचंबणा संपलीये.
तर सध्याच्या कोविडी परिस्थितीत, जुने पण न समजलेले आणि नवे इंग्रजी चित्रपट पहाण्याचा धडाका लावला. बरेचसे गंभीर आणि आशयघन, समीक्षकांनी नावाजलेले चित्रपट पाहिल्यावर एक प्रकारचा मानसिक शीण आला. मग ठरवले, आता पुन्हा एकदा ते बाँडपट सुरवातीपासून पाहू. त्याप्रमाणे, अगदी डॉ. नो पासून ओळीने पहायला सुरवात केली. पण सातव्या 'डायमंडस आर फॉरेव्हर' पर्यंतच प्रचंड कंटाळा आला. तरुण वयांत, स्टोरी समजत नव्हती तेच बरं होतं असं वाटायला लागलं. इतके बालिश चित्रपट आपल्याला का आवडायचे आणि शॉन कोनेरी श्रेष्ठ की रॉजर मूर यावर आपण किती हिरीरीने चर्चा केली होती ते आठवून हंसु यायला लागले. तशाच प्रकारच्या समकालीन हिंदी चित्रपटांची आपण (निव्वळ स्टोरी समजल्यामुळे) टिंगल करायचो आणि बाँड चित्रपटांपुढे त्यांना हास्यास्पद मानायचो याचेही आता आश्चर्य वाटते. तरीही घेतला वसा टाकणार नाही, या उक्तीप्रमाणे, उरलेले सर्व बाँड चित्रपट नेटाने पहायचेच असा दृढ निश्चय सध्या तरी केलेला आहे. बघु या, हा कोरोना आम्हाला काय काय करायला लावतो ते!
बॉन्ड सिनेमे.
MNX चानेलवर दोन महिन्यांपूर्वी पाहिले पुन्हा. पळापळी >>कार्स,- बोट-हेकॉ- विमानं- स्की-फायरब्रिगेडची वाहनं-मोटरसायकल-बलून-प्यारशूटस मधून. मजा.
आणि तो लोखंडी दातवाला ( मूनरेकरमध्ये कंटाळवाणा होता) .
ग्याजेट्सची गंमत संपली पण ही मात्र आहे.
सध्या हे पाहातोय!
मामा मिकीचा - भाग १
मामा मिकीचा - भाग २